© कल्याणी पाठक (वृषाली काटे)
तात्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तशा माई घाबरल्या.. नेहमीसारख्याच..!
तसे शेजारीपाजारी धावायचे मदत करायला.. पण ते बिचारे तरी कुठवर पुरणार !
तात्यांचा स्वभाव मुलखाचा हट्टी ! दोघंच अपत्यं.. राघव नि मंजुश्री.. परोपरीनं सांगत.. " ह्या वयात असं एकटं राहू नका.. आमच्याकडे चला..काही कमीजास्त झालं तर.. बरं, आम्हीही काही हाकेच्या अंतरावर नाही.. यायला जायला चार पाच तास तरी लागतात.. "
एकदा तर राघव तात्यांवर चिडलासुद्धा .."तुमच्या हट्टापायी तुम्ही दोघंच दोघं गावी राहता अन् नातेवाईक आणि मित्रमंडळी आमच्या तोंडात शेण घालतात..!" पण तात्यांनी जन्मातही कधी कुणाचं ऐकलं नाहीय..
"अरे, इथे कोपऱ्यावर दत्ताचं देऊळ आहे.. येणारे जाणारे भेटतात.. बोलतात.. आम्हाला नाही करमणार तुमच्याकडे.. " तात्या काकुळतीने आपला मुद्दा पटवून देत.
माईंना मात्र भीती वाटे..
"दोघांचीही तब्येत तोळामासा झालेली.. रात्री अपरात्री दोघांपैकी कुणाचं काही कमीजास्त झालं तर..?" अनामिक भीतीनं त्यांची गाळण उडे.
पण तात्यांच्या हट्टापायी त्यांचं काहीच चालत नसे.
तात्यांना त्रास झाला की बिचाऱ्या माई घाबरून जात अन् डॉक्टरांच्या आधी मुलांना फोन लावत.
तात्यांना त्रास झाला की बिचाऱ्या माई घाबरून जात अन् डॉक्टरांच्या आधी मुलांना फोन लावत.
मुलं शेजाऱ्यांना पाठवत अन् कुणीतरी तात्यांना दवाखान्यात नेऊन आणी.. दोनचार दिवसांत तात्या पुन्हा शेळीचे वाघ बनत.
आजही तात्यांची तब्येत बघत माईंनी सगळ्यात आधी राघवला फोन लावला.
"राघव, अरे, पुन्हा ह्यांना त्रास व्हायला लागलाय.. धापा टाकताहेत.." माईनी घाबऱ्याघुबऱ्या सांगितलं.
"बरं..बरं.. तू काळजी नको करूस..मी देशपांड्यांच्या विनायकला कळवतो.. तो बघून जाईल.. ह्या शनिवार रविवारी आम्ही दोघे चक्कर टाकून जाऊ.." राघवनं माईंना दिलासा दिला..
"काय बाई, पुन्हा तेच ! सासरेबुवांना जरा कुठं शिंका खोकला झाला.. की लग्गेच सासूबाईंचा ह्यांना फोन..

अरे..आम्ही काही डॉक्टर आहोत का?
इथे फोन करून आम्हाला डिस्टर्ब करण्यापेक्षा डॉक्टरांना करा म्हणावं फोन !
आम्ही दोनशे किलोमीटरवर.. इथून काय करणार ?" सूनबाईचा आवाज दुरवरूनही माईंना ऐकू गेला.
राघवनं दिलासा दिला..पण माईंना चैन पडेना..
राघवनं दिलासा दिला..पण माईंना चैन पडेना..
त्यांनी मुलीला.. मंजुश्रीला फोन लावला..
"हॅलो, माई.. तात्या बरे आहेत ना ग? असा अवेळी फोन केलास म्हणून विचारलं.." मंजूनं मोबाईल स्क्रीनवरचं नाव पाहूनच प्रश्न केला..
"अग, ह्यांना दम लागलाय.. अजिबात श्वास घेता येत नाहीये.. राघव पाठवतोय विनू देशपांडेला.. पण माझा जीव राहवेना गं.. तुला कळवल्याशिवाय.. " माईंचा आवाज रडवेला झाला होता..
"माई, त्यांना इनहेलर दिलंस का ? दार खिडक्या उघडून दे.. मोकळ्या हवेत बसायला सांग.. योगा आणि प्राणायाम नीट सुरू आहे ना ग त्यांचा?" मंजुची काळजी वाढत होती.
"विनू आला बघ.. फोन ठेवते.. !" माईंनी फोन ठेवला.
"पिताश्रींनी पुन्हा दुखणं काढलं वाटतं.. ह्या वर्षातली ही कितवी खेप ?" मंजूच्या नवऱ्यानं विनोदाच्या स्वरात म्हटलं..
"आपण ह्या शनिवार रविवार गावी जातोय.. माई तात्यांना भेटायला..!" मंजूनं नवऱ्याच्या उपहासाकडे सपशेल दुर्लक्ष करत सुनावलं..!"
राघव अन् मंजूनं आपसांत बोलणं केलं अन् चौघेही शनिवारी दोन दिशांवरून गावाच्या दिशेनं निघाले..
तात्यांना आता पुष्कळ बरं वाटत होतं.. मुलांच्या येण्यानं त्यांना हुरूप आला होता.

त्यांनी घर आवरायला काढलं.. पूजेसाठी फुलंही वेचली.. जावयाला आवडतो म्हणून माईना गोडाचा शिरा भाजायला सांगितलं.. अन् सूनबाईला आवडतात म्हणून बटाटेवड्यांचा बेत ठरवला.
फाटकापाशीच साजूक तुपातल्या शिऱ्याचा खमंग वास दरवळला अन् सूनबाईच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"तरी मी सांगत होते.. आजारपणाची खोटी नाटकं आहेत म्हणून.. आजारी आहेत म्हणून तातडीनं बोलावलं.. अन् इथे ह्यांच्या पार्ट्या सुरू.." सूनबाईंनी नवऱ्याच्या कानाशी भुणभुण केली.
"माई, कशाला गं एवढा आटापिटा ? आम्ही आल्यावर बघितलं असतं ना स्वयंपाकाचं.. तात्या कुठे आहेत ?" राघवनं माईच्या पाया पडत चौकशी केली.
"देवपूजा करताहेत.." माईंनी उत्तर दिलं नि त्या स्वयंपाकघराकडे वळल्या.. सूनबाईही मागोमाग गेली.
"अरे व्वा ! तब्येत बरी आहे म्हणायची तात्यांची !" राघवनं स्वगत म्हणत स्वतःला सोफ्यावर झोकून दिलं.
पाठोपाठ मंजू आली अन् तडक तात्यांना हाका मारत तिनं त्यांची खोली गाठली.

तात्यांना सोवळं नेसून पूजेत रमलेलं पाहून तिच्या डोळ्यात समाधान झळकलं.
"तात्या, तुमच्यासाठी बेसनाचे लाडू आणलेत.." असं म्हणत तिनं एक लाडू तात्यांच्या तोंडात कोंबलासुद्धा.
"अगं..अगं..ते सोवळ्यात आहेत.." पाठोपाठ आलेल्या माई म्हणत राहिल्या..
"तात्या, तुमच्यासाठी बेसनाचे लाडू आणलेत.." असं म्हणत तिनं एक लाडू तात्यांच्या तोंडात कोंबलासुद्धा.
"अगं..अगं..ते सोवळ्यात आहेत.." पाठोपाठ आलेल्या माई म्हणत राहिल्या..
पण बापलेकीला त्यांचं बोलणं मुळीच ऐकू गेलं नाही.
दुसऱ्या दिवशी मुलगा सून अन् लेक जावई आपापल्या घरी जायच्या तयारीला लागले..
दुसऱ्या दिवशी मुलगा सून अन् लेक जावई आपापल्या घरी जायच्या तयारीला लागले..
चौघंही देवाला नमस्कार करायला म्हणून देवघरात गेले अन् तात्यांना धाप लागली.
ते कसनुसे करू लागले.
माई पुन्हा घाबरल्या.. पण आता मुलं जवळ होती !
"बाप रे! किती त्रास होतोय तात्यांना.. आम्ही निघालो नव्हतो म्हणून बरं.. नाहीतर केवढी पंचाईत !" राघव खरोखरीच काळजीत पडला.
"कसलं काय? आत्तापर्यंत अगदी मजेत होते.. आम्ही जायला निघालो अन् ह्यांची नाटकं सुरू झाली !" सूनबाई इतक्या मोठ्यानं पुटपुटली की ते माई अन् मंजुसह साऱ्यांनाच ऐकू गेलं.
"चला..! सासुरवाडीचा मुक्काम वाढला.. उद्याच्या पक्वान्नांचा बेत ठरवा बुवा !" जावईबापूंनी विनोद केला.
"अहो, उद्या तुमचं महत्त्वाचं प्रोजेक्ट प्रेझेंटेशन आहे ना? यूएसचे डेलिगेट्स येणार .. तुम्ही म्हटलं होतं.." सूनबाईनं नवऱ्याच्या ऑफिसची चिंता व्यक्त केली.
"दादा.., तू नि वहिनी खरंच निघा.. अहो.. तुम्ही पण गेलात तरी चालेल.. मला खरंच काही महत्त्वाचं काम नाहीय.. मी थांबते इथेच.. काही दिवस.. तात्यांना डॉक्टर पाध्येंकडे दाखवून आणेन म्हणते .. त्यांची ट्रीटमेंट नीट लावून देते आठ दहा दिवसात अन् मग येते.." मंजूनं भावाला अन् नवऱ्याला उद्देशून म्हटलं..
"आठ दहा दिवस ? मंजू, अगं तुझा इंटरव्ह्यू आहे ना शुक्रवारी.. प्रमोशनकरिता ? गेला महिनाभर जागरणं सुरू आहेत तुझी.. अभ्यासासाठी .." मंजूच्या नवऱ्यानं मंजुला टोकलं.
"नाही, अहो.. इंटरव्ह्यू नंतरही देता येईल.. मी बोलेन सरांशी.." मंजूने बोलताना चेहरा लपवला.
"आर यू शुअर ?" राघवनं विचारलं..
"येस.. आय मीन इट.." मंजू ने उत्तर दिलं.
अर्ध्या तासानं दोन कार धुरळा उडवत दोन दिशांना निघाल्या...अन् मंजू त्या धुरळ्यात हरवून उभी राहिली..
एकटीच ..
© कल्याणी पाठक (वृषाली काटे)
सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.