अन् ती मुक्त झाली - भाग 1

© अनुजा धारिया शेठ



अरे सुशांत, मी माधव बोलतोय...

हा बोल माधव.. काय कशी काय आठवण काढलीस?

अरे तूझा गडी आहे ना गणपत.. तो काम सोडायच म्हणतोय.. माझ्याकडे आला होता... साहेबांशी बोला म्हणाला..

अरे, पण अचानक काय झाले? विचार त्यांना.. पगारवाढ हवी का?... सुशांत म्हणाला..

थांब इथेच आहेत देतो त्यांना.. माधव

गणपत काकांनी घाबरत फोन हातांत घेतला, साहेब तुम्ही ईश्वास ठेवणार नाय.. आपल्या शेतात हाडळ आहे.. अजून बाहेर कोणाला बोललो नाय म्या.. माधवरावांना सांगून तुम्हाला फोन केला.. काय तो बंदोबस्त करा... गणपत काका घाबरत बोलले..

अहो काका असे काय नसते हो.. ह्या सर्व अंधश्रद्धा असतात हो.. सुशांत

नाय नाय साहेब.. मला नाय जमणार.. म्या काम नाय करणार.. म्या तिथ राहणार नाय... गणपत

तुम्ही माधवला फोन द्या.. सुशांत म्हणाला

माधव, मी ह्या वेळेस आठ दिवसाची सुट्टी काढले, येतोय मी आता.. दोन- तिन दिवस जरा तू बघशील का? .. सुशांत


हो, अरे बघतो मी... माधव म्हणाला

सुशांत ईनामदार एक बडे व्यक्तिमत्व... गावात खूप मोठी जागा, शेती- वाडी सर्व काही गणपत बघत होता.. त्याचा मुलगा पण आता तेच काम करत होता.. पण भाऊसाहेब ईनामदार गेले आणि वाड्यावर काही बाही हालचाली होऊ लागल्या... कामाला कोणी येईना.. गणपतने खूप प्रयत्न केले पण शेवटी तोही हतबल झाला.. आणि आज त्याने मालकांना फोन केला..


माधवने धीर देऊन त्याला पाठवल, अन् म्हणाला.. मालक येतील आता.. तोवर इथे येऊन रहा, भीती वाट्त असेल तर... गणपत भीत भीत निघून गेला...

दोन दिवसांनी सुशांत त्याच्या कुटुंबाला घेऊन आला, वाड्यावर राहायची इच्छा त्याने दाखवली... मालकाला एकट कस राहू द्यायचं, हाडळ आहे ना तिथे असा विचार मनात येताच गणपत पण परत वाड्यावर गेला...

मालकाचा ईश्वास नाय.. कस पटवून द्यायच?

या विचारात असताना मालकीण बाई म्हणजेच सुशांतची बायको सायली मळ्यात फेरफटका मारुन यायच म्हणाली.. ह्याना कस आडवू? जाऊ नका म्हणून तोपर्यंत तें मळ्याच्या दिशेने चालू लागले.. गणपतच्या मनात भीती त्यामुळे त्याला सारखा भास होत होता ती हडळ दिसत होती... बाई साहेब ह्या वक्ताला तिकड जाऊ नका जी.. सांजची कीरकीरती येळ हाय.. कसला फेरा व्हायचा..

सायली म्हणाली, अहो काका काय बोलताय हे..

अहो व्हय बाई साहेब.. छोट्या मालकास्नी नका नेऊ तिकड चला बिगी बिगी...


सायलीने सुशांतला घरी आल्या आल्या गणपत काका काय बोलले तें सांगितलं... सुशांत म्हणाला, सायली तू सुद्धा... मानतेस हे सर्व...

बर मला शांत विचार करू दे मी काय तें बघतो...

रात्री विहीरीच्या इथून आवाज येतं होते, गणपत मालक मालक ओरडत आला.. त्याच्या मुलाला गोविंदाला कोणीतरी उचलून आणले, बेशूद्ध झालेला तो...

मालक तुम्ही चला, आपून इथून जाऊ.. लय भयानक गोष्टी घडतायत... त्या दिवशी रक्मा पाणी काढायला ईहरीवर गेली तर त्या पाण्याचा रंग बदलला.. जनू काय रगात... कोनाच्या जीवाचा घातपात व्हायच्या आधी चला तुमि.. माज ऐका.. मालक..

सुशांतने त्याला धीर दिला... म्हणाला, काका मला दोन दिवस द्या फ़क्त.. तुम्ही घरी जाताय का तुमच्या? इथे भीती वाट्त असेल तर घरी जा...

नाय मालक असा नका बोलू... तुका सोडून म्या नाय जानार...

सुशांतने माधवशी बोलुन एक निर्णय घेतला.. फक्त कोणाला सांगायचं नाही हे ठरलं..

गणपत काका, सायली आणि गणपत काकांचा परिवार यांच्या मनाची शांती म्हणून भटजींना बोलावलं.. शांती करून घेतली. आता काय धोका नाय मालक.. गणपतने हात जोडले.


मालक लय उपकार झाले बगा.. तुमि शिकले हायसा. तुंम्हाला अशा गोष्टी पटत्याल कि नाय असा वाटत होता.. पर तुमि माझ्या येड्याच ऐकलत, बर वाटलं.. मोठ्या मालकावानी तुमि पर चांगल हायसा... आमच्या सारख्या गरीबाला पर आपल मानता, जीव लावता...

गणपत काकांच्या मनातली भीती कमी झाली होती. पण अजूनही चित्र-विचित्र प्रकार घडत होते.. सुशांतने केलेली आयडिया फ़क्त माधवला माहित होते.. त्यांना गावात येऊन ५ दिवस व्हायला आले.. अजून काही कळंत नव्हते.. त्या किंकाळ्या.. विहीरीचे लाल पाणी, रात्री होणारे आवाज. सायली खूप घाबरली होती.. मळ्यात काही झाल्याच गणपत काका बोलत नव्हते.. म्हणजे आता वाडा धरलाय त्या हडळीने मालक... हे कायतरी वेगळाच प्रकार हाय बघा..

सुशांतला पण काही कळत नव्हतं.. नक्की काय प्रकार आहे काहीच कळंत नव्हत.

सुशांतला ह्या गोष्टी काही पटत नव्हत्या.. माधवला हाताशी घेऊन त्याने त्या आवारात CCTV कॅमेरा बसवले, जेणेकरून जर मुद्दाम कोणी काही करत असेल तर त्या कॅमेर्यामुळे ती व्यक्ती पकडली जाईल..

पण काही गोष्टी या सुशांतच्या नकळत घडल्या होत्या, तो शिक्षणासाठी बाहेर होता त्यामुळे मधल्या काही वर्षात काय घडलं ते त्याला माहीती नव्हते..

त्याचा मोठा भाऊ सुशील याला याचा अपघात झाला आणि त्यात तो जागीच गेला. खर तर तो अपघात एक गुढ होते सर्वांसाठीच...

सुशीलदादाला काडीचे सुद्धा व्यसन नव्हते, आणि जास्त प्यायल्यामुळे गाडीवरचा ताबा सुटला असे त्याच्या मॄत्युनंतर समजले.. तो त्याच्या मित्राकडे पार्टीत गेला होता, आणि येतां येतां ही घटना घडली.

भाऊसाहेब या धक्क्याने खचले, आईसाहेब यांनी तर सुशील गेल्यावर महिन्यातच आपले प्राण सोडले.. एका मागून एक अशा घडलेल्या याघटनेमुळे सुशांत गावी आला तो तिथेच राहिला..

सायली सोबत लग्न झाले, अन् त्यांची शहरात असलेली जागा डेव्हलप करून तिथे त्यांना त्यांच्या मळ्यात येणारी फळे, भाज्या तसेच औषधी वनस्पती यांच्या व्यापार वाढवायचा होता.. तें शहरात स्थायिक झाले, इकडे बाई माणूस नाही, तुमची आई तिकडे जवळ आहे. त्यामुळे तुम्ही तिकडेच रहा सूनबाई असे भाऊ म्हणायचे.. सुशा़ंतने सुद्धा हे बोलणे कधी मनावर घेतले नाही.. तो म्हणायचा भाऊंना खूप काळजी आहे सायलीची.

पण आज इथे बऱ्याच गोष्टी अशा घडत होत्या की त्याने प्रत्येक गोष्टीचे मुळ शोधून काढायच ठरवलं.. लग्नं झाल्यावर गाव देवीची ओटी भरायला सायली आली त्या नंतर भाऊंनी तिला येउच दिले नाही. भाऊ जायच्या आधी आजारी पडले, म्हणून मी आलो. तेव्हा सुद्धा माझे काही बरे वाईट झाले तरी सूनबाईंना बोलवू नको.. एवढूस पोर त्यात त्या सुद्धा ओली बाळंतीण...

सुशांतचे डोकं सुंन्न पडत चालले होते.. भाऊ नाहीत, हे असे प्रकार घडतायत.. कोणाला विचारू?

सायलीला सतत भास होत होते.. कोणतरी आहे आजू बाजूला आहे, कधी तिच्या डोक्यावरून कोणी हात फिरवत आहे असे वाटायचं..

त्यात भाऊंचे धाकटे बंधू अण्णा अगदी उलट स्वभावाचे.. गुंडगीरी करून दारू पिऊन तमाशा करणारे. एकदा अण्णांनी गावात रहात असलेल्या सखारामाचा खून केला.. काही तरी व्यवहारावरून झाले होते.. त्या नंतर स्वतःच्या धाकट्या भावाच्या विरोधात भाऊंनी साक्ष दिली आणि अण्णांना शिक्षा झाली.. पुढच काहीच त्याला आठवत नव्हत..

हे सर्व झाले तेव्हा ५ वर्षाचा होता आणि सुशील दादा १० वर्षाचा...

माधव घरी आला, अरे हे बघ CCTV चे काही फुटेज.. मला तुझ्या अण्णा काकांचा संशय आहे.

सुशांत म्हणाला, काय? त्यांची सुटका झाली का?

हो... आताच काही महीने झाले..

माधव मला वेड लागेल आता.. काय चाललंय हे काहीच कळत नाही.. आपण कॅमेरा लावल्याचे मी कोणालाच बोललो नाही.. पण आता या वाड्यात काहीतरी विचित्र घडतय..

सायली कोणाशी तरी बोलते, विचारले तर म्हणते मी कुठे बोलत होते.. मला काहीच कळंत नाही माधव..

माधव सुशांतला धीर देतो.. गणपत काका खूप जुने आहेत तेच काय तें सांगू शकतील..


काय असेल सायलीचे रहस्य?
गणपत काका काय सांगतील?
अण्णांचे काय झाले?
भाऊ सायलीला का येऊ देत नव्हते?

या सर्व प्रश्नांसाठी भाग २  वाचा

© अनुजा धारिया शेठ



सदर कथा लेखिका अनुजा धारिया शेठ यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...


अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने