© वर्षा पाचारणे
कुलकर्णी काकांचं कुटुंब पुण्यात अगदी उच्चभ्रू वस्तीत राहणारं... घरी गाडी, पैसा-अडका, सोयीसुविधा कशाकशाची म्हणून कमतरता नव्हती.
आयुष्यभर बँकेत नोकरी केलेले कुलकर्णी काका अगदीच स्पष्टवक्ते होते... वडिलोपार्जित संपत्ती देखील भरपूर असल्याने त्यांचे लहानपणही अगदी सुखवस्तू कुटुंबातील...
त्यामुळे 'पैशाने सारंच मिळतं', ही भावना त्यांच्या मनात बळावत गेली होती... त्यांची पत्नी अंजली हीदेखील एका शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होती.
संसार वेलीवर मिलिंद आणि आरती ही दोन देखणी फुलं उमलली होती. पण म्हणतात ना संस्कार हे लहानपणापासून व्हावे लागतात ,नाहीतर परिस्थिती बिघडायला वेळ लागत नाही... तसंच काहीसं कुलकर्णी काकांच्या बाबतीत घडलं.
कुलकर्णी काका आणि अंजलीच्या संसाराला सुरुवात झाली आणि अंजलीने नेटाने सारी जबाबदारी पार पाडायला सुरुवात केली... कधी वायफळ खर्च नाही, कधी विनाकारण कसली बडबड नाही, किंवा इतका श्रीमंती कारभार हातात येऊनही कुठल्याही प्रकारचा लोभ किंवा गर्व नाही.

रोज सकाळी घरचं सगळं आटोपून शाळेत जायची.. पुन्हा घरी आल्यावरही ती अगदी उत्तम गृहिणी असायची... 'एवढ्या मोठ्या पदावर काम करते म्हणून घरी कामासाठी बाई ठेवावी' हे मात्र तिला कधीच पसंत नव्हते.
स्वतःची कामं स्वतःच करण्याची शिकवण लहानपणापासूनच तिला मिळाली होती... त्यामुळे आपण काही जगावेगळं करतोय, असं तिला कधीच वाटत नव्हतं.
पण नवरा मात्र अगदी या उलट स्वभावाचा मिळाला होता... आणि 'मुलं देखील अगदी वडिलांचाच वागण्याचा ठसा घेऊन जन्माला आली आहेत' असं तिला अनेकदा वाटायचं. कारण जन्माने मिळालेली श्रीमंती त्यांच्यासाठी बिघडण्याचं मुख्य कारण ठरू लागली होती.
मिलिंद आणि आरतीने कुठलीही गोष्ट मागावी आणि आईने कितीही विरोध केला तरी वडिलांनी मात्र ती तात्काळ हजर करावी हा जणू त्यांच्या घरचा नियमच झाला होता. त्यामुळे आईला घरात त्या अर्थाने थोडीफार कमी किंमत मिळू लागली होती.

मुलांच्या लेखी आई म्हणजे त्यांच्यावर शिस्त, संस्कारांची बंधनं घालणारी एक खडूस व्यक्ती ठरू लागली होती... तर बाबा म्हणजे प्रेमळ, कुठलीही वस्तू मागता क्षणी हजर करणारे असेच सुपरहिरो ठरू लागले होते.
अंजलीला या गोष्टीचा मानसिक त्रास व्हायचा. कारण ती लहानपणापासून एका सामान्य कुटुंबात वाढलेली आणि वस्तूंची, पैशाची किंमत असलेली मुलगी होती... 'एखादी गोष्ट मागता क्षणी मिळण्यापेक्षा काही कालावधीने मिळाली तर त्या गोष्टीचा आनंद आणखीन जास्त होतो', हे ती जाणून होती.. पण तिच्या मताला कुलकर्णी काकांच्या मते काहीच किंमत नव्हती.
शाळेत असताना दहावीचे वर्ग चुकवून मिलिंद मित्रांबरोबर बाहेर फिरायला गेलेला कळताच अंजलीने त्याला चांगलीच समज देण्याचा प्रयत्न केला.
शाळेत असताना दहावीचे वर्ग चुकवून मिलिंद मित्रांबरोबर बाहेर फिरायला गेलेला कळताच अंजलीने त्याला चांगलीच समज देण्याचा प्रयत्न केला.
मुलगा अडनिड्या वयाचा आहे हे ओळखून तिने न रागावता, प्रेमाने त्याला समजावले. पण एकीकडून ऐकून दुसरीकडून आईचं बोलणं सोडून द्यायची सवय लागलेल्या मिलिंदला लगेच डॅडने पाठीशी घालताच तासभर समजावून सांगितलेल्या गोष्टीची किंमत मात्र पुन्हा एकदा शून्य ठरली होती.
मैत्रिणींबरोबर पार्टीला जाणारी आरती 'आपण कुठे चाललो आहोत?', हे आईला सांगण्याची तसदीही घेत नव्हती... कारण "जाऊ दे तिला... वय आहे त्यांचं मजा करण्याचं"... असं सांगत डॅडने तिला अकरावीत असतानाच महागडा मोबाईल आणि गाडी घेऊन दिली होती.

शाळेत मुख्याध्यापिका असणारी अंजली आपल्या मुलांना मात्र नवऱ्याच्या हेकेखोरपणामुळे वळण लावण्यासाठी असमर्थ ठरत होती.
मुलं भविष्यात नक्कीच उच्चशिक्षित होतील हे जरी तिला दिसत असलं, तरीही त्याचबरोबर एक चांगला माणूस म्हणून जगणं देखील त्यांना जमायलाच हवं', हे अंजली त्यांना शिकवू पाहत होती, परंतु जे त्यांच्या सुपरहिरो डॅडमुळे मोडकळीस येत होतं..
मिलिंद आणि आरती दोघेही उच्चशिक्षित होऊन परदेशात स्थायिक झाले. दोघांनीही आपल्या जोडीदाराची तिकडेच निवड करून लग्न देखील केले.
मिलिंद आणि आरती दोघेही उच्चशिक्षित होऊन परदेशात स्थायिक झाले. दोघांनीही आपल्या जोडीदाराची तिकडेच निवड करून लग्न देखील केले.
परदेशी नागरिकत्व मिळाल्याने आता मुलं पुन्हा आपल्या देशात येतील याची तीळमात्र शक्यता नव्हती आणि 'तशी अपेक्षाही करू नका', असं मुलांनी जातानाच आई-बाबांना बजावलं होतं.
वर्ष सरत गेली.. कुलकर्णी काका आणि काकू रिटायर झाले. सुरुवातीला काकांनी ज्येष्ठ नागरिक संघ, वाचनालय यासारख्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवलं.
वर्ष सरत गेली.. कुलकर्णी काका आणि काकू रिटायर झाले. सुरुवातीला काकांनी ज्येष्ठ नागरिक संघ, वाचनालय यासारख्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवलं.
घरात असल्यावरही अंजली बरोबर संवाद साधण्यापेक्षा दिवस दिवस मोबाईलवर टाईमपास करण्यात त्यांना जास्त रस वाटू लागला. म्हातारपणामुळे अनेक दुखणी मागे लागली होती.
सततचा दवाखाना, होणारी धावपळ यात खरंतर माणसांची जास्त गरज असते.. अशावेळी तरुणपणात हेकेखोरपणामुळे वागलेल्या कुलकर्णी काकांच्या मदतीला कोणीही येत नव्हतं. सारं काही सांभाळताना काकूंची मात्र पुरती दमछाक होत होती.
एक दिवस सकाळी बाथरूम मध्ये अंघोळीला गेलेल्या काकांना छातीत तीव्र वेदना झाल्यासारखं जाणवलं आणि अंजलीsss अशी बाथरूम मधून एक मोठी किंकाळी ऐकू आली..
एक दिवस सकाळी बाथरूम मध्ये अंघोळीला गेलेल्या काकांना छातीत तीव्र वेदना झाल्यासारखं जाणवलं आणि अंजलीsss अशी बाथरूम मधून एक मोठी किंकाळी ऐकू आली..
स्वयंपाकघरात काकांसाठी नाष्टा बनवणाऱ्या अंजलीला सारं जगंच फिरल्यासारखं वाटू लागलं... बाथरूमच्या दारावर थाप मारून ,"अहोssss, दार उघडा नाsss", असं म्हणत तिने रडून, ओरडून खूप दार ठोठावलं...
काकांनी कशीबशी बाथरूमची कडी उघडली परंतु तितक्यात ते धाडकन जमिनीवर कोसळले.
अंजलीला भीतीने भोवळ यायचीच बाकी राहिली होती... तिने कसंबसं अंगात अवसान आणत शेजारच्या सौरभला बोलावलं.... ऍम्ब्युलन्स बोलावून काकांना तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं.
हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने काकांची आता यापुढे कायमच काळजी घेणं गरजेचं होतं... 'वाट्टेल तेवढा पैसा खर्च केला तरीही वेदना, त्रास हा मात्र ज्याचा त्यालाच सोसावा लागतो, तो काही पैशाने कमी होणार नसतो', हे आज काकांना आयसीयूमध्ये पडल्यावर जाणवत होतं.

"माझी मुलं परदेशात आहेत... उच्चशिक्षित आहेत",... असं म्हणत प्रौढी मिरवणाऱ्या काकांनी सौरभ आणि त्याच्या धाकट्या भावाला अनेकदा त्यांच्या देव पूजेच्या साहित्याचं दुकान असल्याने हिणावलं होतं.
ही मुलं आणि त्यांच्या घरचे नक्कीच आपल्यावर जळत असणार", असं म्हणत अनेकदा अंजली समोर त्यांनी स्वतःच्या गर्वाचे धडे गिरवले होते.
पण आज त्याच सौरभने हातातली सारी कामं सोडून काकांसाठी आठवडाभर हॉस्पिटल मधील धावपळ केली होती.. काकूंना हॉस्पिटलमधून घरी ने आण करण्याची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली होती.
"डॅड, टेक केअर", असं म्हणत एक मेसेज करून मोकळ्या झालेल्या पोटच्या लेकरांनी मात्र स्वतःच्या वडिलांची फोन वर विचारपूस करणं देखील टाळलं होतं.
"डॅड, टेक केअर", असं म्हणत एक मेसेज करून मोकळ्या झालेल्या पोटच्या लेकरांनी मात्र स्वतःच्या वडिलांची फोन वर विचारपूस करणं देखील टाळलं होतं.
'आज मुलांचा फोन येईल, उद्या फोन येईल', या आशेवर कुलकर्णी काका तळमळत पडून राहायचे.
डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितल्यानंतर एकट्याने बाहेर फिरणे वगैरे तर सोडाच, परंतु घरातल्या घरात चालतानाही त्यांना दमल्यासारखे वाटायचे.
काकांच्या मनाची घालमेल काकूंनी मात्र हेरली होती... मुलांपासून सुरुवातीपासूनच दुरावलेली ही आई तिच्या या वृद्ध लेकराला मात्र सतत आनंदी ठेवण्यासाठी झटत होती.
काकांच्या मनाची घालमेल काकूंनी मात्र हेरली होती... मुलांपासून सुरुवातीपासूनच दुरावलेली ही आई तिच्या या वृद्ध लेकराला मात्र सतत आनंदी ठेवण्यासाठी झटत होती.
सकाळी लवकर उठून देवासमोर दिवा लावून घरभर पसरलेला अगरबत्ती आणि धुपाचा दरवळ घर प्रसन्न करीत होता.. 'पैशाने सारंकही विकत घेता येतं, पण काळजी करणारी आपली हक्काची माणसं मात्र वागणुकीतून कमवावी लागतात', याची प्रचिती कुलकर्णी काकांना आत्ता कुठे येऊ लागली होती.
सुरुवातीपासून गोड बोलण्याने माणसं जपलेल्या कुलकर्णी काकू या साऱ्या प्रकारातून बाहेर पडू शकल्या, ते फक्त शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या सहकार्याने.
सुरुवातीपासून गोड बोलण्याने माणसं जपलेल्या कुलकर्णी काकू या साऱ्या प्रकारातून बाहेर पडू शकल्या, ते फक्त शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या सहकार्याने.
दोन वर्षांनी अल्पशा आजाराने काकूंचे देखील निधन झाले..स्वतःला खंबीर समजणारे काका त्या दिवसापासून एकांतात ढसाढसा रडत होते... आज पैसा, प्रतिष्ठा सारं काही होतं. नव्हती ती फक्तं आपल्या माणसांची सोबत.
तरुणपणात गर्व आणि भावनांच्या पारड्यात जरी गर्व जिंकला असला तरीही त्याचं फळ म्हणून आज असा जीवघेणा एकटेपणा नशिबी आला होता... मुलांनी सर्वस्वी जबाबदारी झटकली होती..
"मी माझी संपत्ती एखाद्या अनाथ आश्रमाला दान करून टाकेल", अशी धमकी कुलकर्णी काकांनी मुलांना देताच "खुशाल दान करून टाका", असं म्हणत दोघांनीही त्या दिवसापासून वडिलांशी असला नसलेला संबंधच संपवून टाकला...
आत्महत्या करून टाकावी, असा विचार अनेकदा काकांच्या मनात येऊ लागला... भिंतीवर लटकलेल्या काकूंच्या फोटोकडे पहात आज त्या फ्रेमवर बसलेली धुळ काकांच्या मनावरची जळमटं दूर करण्यासाठी कारणीभूत ठरली.

फ्रेमला पुसून लख्ख करून त्यासमोर अगरबत्ती लावून काका पुन्हा खुर्चीत विचार करत बसले... 'ज्या व्यक्तीला आपण आयुष्यात काहीही देऊ शकलो नाही, तीच व्यक्ती आजही फोटोच्या माध्यमातून का होईना, पण आपल्या सोबत आहे', या विचाराने काका गहिवरले.
फडताळात ठेवलेले जुने फोटो अल्बम बघण्याचा मोह आज त्यांना आवरला नाही.. लग्नाचे फोटो, मुलांचे वाढदिवस, मुलांचे शालेय स्नेहसंमेलन, रिटायरमेंट अशा कितीतरी क्षणांची गर्दी आज अचानक जाणवत होती...
"पण यात मी कुठे होतो... होता तो फक्त माझा पैसा... सगळं कसं डोळे दिपण्यासारखं झालं पाहिजे, या.... या हट्टापायी.. स्वतःतच मग्न असलेला मी.. कुटुंबाला पत्नीला वेळ द्यायला विसरूनच गेलो"...
कधी पैठणीतली, कधी पंजाबी ड्रेस मधली, कधी मराठमोळी नऊवारी नेसलेली तर केवळ आपल्या हट्टासाठी म्हणून आवडत नसतानाही स्लीवलेस टॉप घातलेली अंजली पाहून काकांना मागचे गेलेले आयुष्य पुन्हा अनुभवता यावे असं वाटून गेलं.

हृदयविकाराचा आलेला झटका, त्यात झालेली तिची धावपळ, मुलांच्या दुराव्याने अनेकदा एकांतात रडणारी अंजली आठवून ती खडूस आई कधीच नव्हती, हे आज त्यांना जाणवलं होतं..
मुलांवर संस्कार करू पाहणाऱ्या अंजलीला कायमच मागासलेल्या विचारांची समजणाऱ्या काकांना आज त्यांचं हे असं एकाकीपण म्हणजे त्यांच्या आयुष्यभर चुकीच्या वागणुकीसाठी मिळालेली योग्य शिक्षा वाटत होतं..
पण त्याच वेळी आपल्याला प्रत्येक क्षणाला सावरणारी 'ती' देखील आपल्या आयुष्याचा आज हयात नसतानाही अविभाज्य भाग आहे, या गोष्टीने कुठेतरी या दुःखाला एक सुखाची झालरही होती.
वाचकहो, जगण्यासाठी माणसाला पैसा जितका आवश्यक आहे, तितक्याच मेहनतीने माणसं देखील कमवावी लागतात, हे तरुणपणात जाणवत नसलं तरीही म्हातारपणात मात्र माणसांची कमतरता नक्कीच भासते... आपण जे पेरलं तेच उगवतं हे प्रत्येकाने लक्षात ठेवून भविष्यातल्या पैशांच्या तरतुदी बरोबरच आपल्या आयुष्यातला माणसांचा बँक बॅलन्स कसा वाढवता येईल, याकडेही थोडं लक्ष दिलं, तर आयुष्यभर पुरून उरेल इतकं प्रेमाचं व्याज मिळण्याची शाश्वती नक्कीच असते.

© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.