तिला काय हवं ??
© स्वामिनी(अस्मिता) चौगुले
नविका खूप गप्प गप्प असायची ती जणू स्वतःतच हरवली होती. विद्यांक तिला खुलवण्याचा खूप प्रयत्न करत होता. आज ही तो तेच करत होता. आज त्याने नविकाला डिनरसाठी बाहेर नेले होते. ते ही तिच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये! तिच्या आवडीचे पदार्थ तिच्या आवडीचे रोमँटिक म्युजिक! त्याला वाटलं की नविका खुश होईल. तिला आवडते म्हणून तो तिला डिनर नंतर लॉंग ड्राइव्हला ही घेऊन गेला. गाडीत तिच्या आवडीचे लेंहंगा गाणे वाजत होते. पण नविका मात्र शांत होती. बाहेर बरीच थंडी पडली होती आणि रात्रीचे बारा वाजून गेल्यामुळे रस्त्यावर वर्दळ ही कमी होती. नविका विद्यांकच्या शेजारी बसली होती. अगदी शांत पण विद्यांकवर बाहेरची थंडी आणि रोमँटिक वातावरणाचा परिणाम व्हायचा तो झाला होता. त्याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. ते पाहून नविकाने त्याला डोळ्यानेच काय झाले असे विचारले.
विद्यांक,“ निवी तुला काहीच फील होत नाही का? ही थंडी हे रोमँटिक वातावरण आणि गाडीत तू आणि मी?” त्याने तिच्या जवळ जात खट्याळ हसून विचारले.
नविका,“ अच्छा! म्हणजे तुला…. मी नाही म्हणाले का तुला!” ती सूचकपणे म्हणाली.
विद्यांक,“ म्हणजे तुझा …” असं म्हणून त्याने तिच्या ओठांवर ओठ ठेवले.
थोड्याच वेळात नविका त्याच्या मिठीत होती आणि विद्यांक तिच्यात अधिकाधिक उतरू पाहत होता. नविकाही त्याला रिस्पॉन्स देत होती पण यांत्रिकपणे. तिच्या डोळ्यात विद्यांकला प्रेम, आपुलकी, ओढ या ऐवजी फक्त कर्तव्य भावना आणि एक उदासीनता दिसली. त्या सरशी तो तिच्या पासून दूर झाला. नविकाने त्याला दूर झालेले पाहून विचारले.
नविका,“ काय झालं विद्यांक?”
विद्यांक,“ निवी तू हे मला विचारते आहेस! बरेच दिवस झाले तुला मी उदास पाहतोय तुझं काही तरी बिनसलं आहे पण तू मला सांगत नाहीस! आज ही तुझ्या डोळ्यात माझ्या बद्दल आधीचे प्रेम आणि ओढ नव्हती तर एक उदासी आणि फक्त कर्तव्य भावना पाहिली मी! मी ज्या निवीला पसंत करून लग्न केले रादर मी ज्या निवीच्या पाहता क्षणी प्रेमात पडलो ना ती माझी निवी कुठे तरी हरवली आहे! ती निवी उत्साहाचा प्रेमाचा खळखळता झरा होती. पण ही निवी खूप वेगळी आहे!” तो नाराजीने बोलत होता.
नविका,“ असं काही नाही विद्यु मी तुझी बायको आहे. Please don't spoil your mood!” असं म्हणून तिने त्याला जवळ ओढले.
विद्यांक,“ नको चल आपण घरी जाऊ!” असं म्हणून त्याने गाडी सुरू केली आणि दोघे घरी पोहोचले.
विद्यांक लॅपटॉपवर काही तरी काम करत होता. नविका कपडे बदलून आली आणि त्याच्या जवळ बेडवर असत म्हणाली.
नविका,“ तुला राग आला ना माझा I am sorry!” ती मान खाली घालून अपराधीपणे म्हणाली.
विद्यांक,“ नाही ग निवी मला तुझा राग नाही आला उलट तुझी काळजी वाटते मला! निवी काय झालंय तुला? तू खूप गप्प-गप्प असतेस जेवढ्यास तेवढंच बोलतेस तुझ्या डोळ्यात मी उदासी पाहू शकतो! तू नाही सांगितले तर कसे कळेल ग मला!” तो काळजीने तिचा हात धरून बोलत होता.
नविका,“ खरंच काही नाही झालं मला! पण तू तुझ्या मूड नको ना घालवू मला अपराधी वाटतय! You know that I love you! मग का असा दूर गेलास मघाशी!” ती त्याला बिलगत म्हणाली.
विद्यांक,“ I know you love me and I love you too म्हणूनच मला काळजी वाटते तुझी निवी. पण तू मात्र मला काही सांगायला तयार नाहीस!” तो तिचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीत घेत म्हणाला.
नविका,“ मी किती वेळा सांगितले रे मला काही झालेले नाही I am fine but you can't understand that!” ती चिडून म्हणाली आणि तिच्या जागेवर बेडवर झोपली.
हल्ली नविका अशीच चिडचिड करत होती. विद्यांकने तिला खूप वेळा विचारले पण ती मात्र त्याला काहीच सांगायला तयार नव्हती नविका दिवसेंदिवस आणखिनच उदासीन होत चालली होती. तिला कोणत्याच गोष्टीतून आनंद मिळत नव्हता. ती स्वतःच्याच कोषात गुरफटत चालली होती. विद्यांकला मात्र तिची काळजी वाटत होती. त्याने तिला बोलत करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काहीच सांगायला तयार नव्हती.दिवसेंदिवस तिचा जगण्यातला रस कमी होत चालला होता आणि चिडचिड वाढत चालली होती.नविका चिडून विद्यांककडे पाठ करून झोपली आणि विद्यांक मात्र विचारात गढून गेला होता.
विद्यांक आणि नविका, एक नवविवाहित जोडपे. लग्नाला जेमतम एक वर्ष झाले होते. विद्यांक आणि नाविकाचे अरेंज मॅरेज एका मॅट्रिमोनि वेबसाईटवरून दोघांनी एकमेकांना पाहिले आणि दोघांनी रितसर एकमेकांना पसंत करून लग्न केले होते. विद्यांक मेकॅनिकल इंजिनिअर होता आणि एका मल्टिनॅशनल कंपनी मध्ये ceo पदावर बेंगलोरमध्ये कार्यरत होता तर नविकाने M.A. B. ed केले होते इंग्लिश लिटरेचर मधून! दोघं उच्च शिक्षित आणि सुखवस्तू कुटुंबातील होते. नविका पुण्याची तर विद्यांक सोलापूरचा होता. लग्न झाले आणि महिन्याभरात विद्यांक नविकाला घेऊन बंगलोरला शिफ्ट झाला. तिथे त्याला कंपनीकडून थ्री बी. एच.के. आलिशान फ्लॅट मिळाला होता. सुरवातीचे गुलाबी दिवस दोघांचे ही छान गेले. विद्यांक नविकाला कोणतीच गोष्ट कमी पडू देत नव्हता. तो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता तर नविकाचे ही त्याच्यावर तितकेच प्रेम होते. पण लग्नाचे वर्ष सरता सरता नविका खूप उदास राहू लागली. विद्यांकने तुला नोकरी करायची का तर कर! तुला हवं असेल तर एखादा क्लास लाव! तुला हवा असलेला छंद जोपास असे सांगून झाले होते.तुला काय झाले आहे? तुला कशात आनंद मिळेल? असे सगळे विचारून देखील झाले होते. आज ही नविकाची उदासी घालवण्यासाठी त्याने डिनर, लॉंग ड्राइव्ह प्लॅन केले होते जेणे करून तो नविकाला आनंदी पाहू शकेल पण ती उदास होती. विद्यांकला नविकाची खूप काळजी वाटत होती. तो या सगळ्या विचारात असताना पाठ फिरवून झोपलेली नविका नेहमीप्रमाणे त्याच्या कुशीत शिरली आणि त्याला सॉरी म्हणाली. विद्यांकने मात्र मनोमन काही तरी ठरवले होते.
सूर्य नारायण सगळी सृष्टी उजळवत होता आणि प्रकाशाचे लेणे लेवून सृष्टी नटत होती. विद्यांकला जाग आली. नविका त्याच्या बाहुपाशात निवांत झोपली होती.,एखाद्या लहान मुला प्रमाणे ती निरागस दिसत होती आणि रात्री केलेल्या सलगीचे एक अल्लड आणि अवखळ हसू तिच्या चेहऱ्यावर विलसत होते.तिला असे पाहून विद्यांकला प्रसन्न वाटले पण ती उठली की पुन्हा तिचे डोळे उदास दिसणार हा विचार करून तो अस्वस्थ झाला. घड्याळात सात वाजले होते.त्याने तिला अलगद बाजूला केले आणि तो आवरायला निघून गेला.
तो तयार होऊन येऊ पर्यंत नविका उठून किचनमध्ये कामाला लागली होती.तिने ब्रेकफास्ट आणि टिफीन तयार केला आणि विद्यांकला हाक मारली.विद्यांक ब्रेकफास्ट करून ऑफिसला निघून गेला पण आज त्याने काहीतरी ठरवले होते. त्याने नविकाला त्याला आज ऑफिसमधून यायला उशीर होईल असे फोन करून सांगितले. त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारा रामकृष्णन ऎयर जो वयाने त्याच्या पेक्षा मोठा असला तरी त्याचा चांगला मित्र होता. त्याची बायको गायत्री सायकोलॉजिस्ट आहे हे त्याला माहीत होते.त्याने रामकृष्णन कडून तिची आज संध्याकाळची अपॉइंटमेंट घेतली आणि तिला भेटायला तो तिच्या क्लिनिकमध्ये गेला.
विद्यांक,“ हॅलो भाभी, कैसी हैं आप?” त्याने हसून खुर्चीवर बसत विचारले.
गायत्री,“ मैं तो ठीक हूँ लेकिन रामा बोल रहा था कि तुम्हारी वाईफ को कुछ प्रॉब्लम हैं?” तिने मुद्द्याला हात घातला
विद्यांक,“ पता नहीं कुछ दिनो से नविका बहुत उदास हैं। जैसे उसे कुछ बात अंदर ही अंदर खाए जा रही हैं। मैंने बहुत बार पूछा लेकिन ओ कुछ बताति ही नहीं । मुझे लगता हैं कि ओ डिप्रेशन में जा रही हैं।” तो काळजीने सांगत होता.
गायत्री,“ अच्छा! तुम्हारी मैरिड लाइफ में कोई प्रॉब्लम ? ”तिने संशयाने विचारले
विद्यांक,“ नहीं ऐसी कोई बात नहीं!” तो म्हणाला
गायत्री,“ ठीक हैं मुझे शूरु से सब बताओ!”ती म्हणाली.
विद्यांकने मागील चार-पाच महिन्यांमध्ये तिच्या वागण्यात झालेला बदल सविस्तरपणे गायत्रीला सांगितला. सगळं ऐकून गायत्री त्याला म्हणाली,
“ठीक हैं। तुम उसे कल तुम्हारे ऑफिस के पास वाले कॅफे में तुम्हारे ऑफिस के बाद बुला लेना! मैं उससे कॅज्युअली मिलकर मेरे तरिकेसे बातचीत करके उसके मन में क्या हैं ये जानने की कोशिश करूँगी as a friend! हाँ पर तुम कुछ बहाना करके नविका को मेरे साथ अकेले छोड़ देना!"
“ठीक हैं! कल मिलते हैं!” विद्यांक म्हणाला आणि घरी गेला.
दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना तो नविकाला म्हणाला शार्प सहा वाजता त्याच्या ऑफिस जवळील कॅफेमध्ये ये कारण रामकृष्णन आणि त्याच्या मिसेसना तुला भेटायचे आहे. असं सांगून तो ऑफिसला निघून गेला. ठरल्याप्रमाणे नविका सहा वाजता कॅफेमध्ये पोहोचली तर आधीच विद्यांक, रामकृष्णन आणि गायत्री तिच्या आधी कॅफेमध्ये हजर होते. चौघे ही एका टेबलवर बसले. विद्यांकने नविकाची आणि नविकाला त्या दोघांची ओळख करून दिली. इकडच्या इकडच्या गप्पा रंगल्या चौघांनी कॉफी घेतली आणि विद्यांक फोन आला म्हणून तर रामा वॉशरूमला जातो म्हणून निघून गेले.आता गायत्रीने तिच्या प्रोफेशन प्रमाणे नाविका हँडेल करायला सुरुवात केली. तिचा विश्वास संपादन केला आणि तिच्याकडून तिच्या मनात असलेले दुःख आणि सल काढून घेतली. नविकाला ही इतक्या दिवसांनी तीच मन कोणासमोर तरी मोकळं करून बरं वाटले.विद्यांक आला आणि नविका आणि तो घरी निघून आले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऑफिस नंतर ठरल्या प्रमाणे तो गायत्रीच्या क्लिनिकमध्ये गेला.
गायत्री,“ विद्यांक तुम्हाला अंदाजा सही था!नविका डिप्रेशन के शुरुवाती दैर से गुजर रही हैं! तुमने सही समय पर उसे मुझसे मिलवाकर बहुत सही फैसला किया। अगर कुछ दिनों तक वो और इसी तरह चुप रहती तो वो पूरी तरह से खुद ही में खो जाती और हम कुछ नही कर पाते। आगे जाकर वो खुदकुशी जैसा कदम भी उठा सकती हैं लेकिन अब हम उसे संभाल लेंगे।”त्या गंभीर होत म्हणाल्या.
विद्यांक,“ क्या? भाभी आपकी बाते सुनकर मुझे निवि की और भी चिंता हो रही हैं। लेकिन सब कुछ ठीक होने के बावजूद वो डिप्रेशन में कैसे चली गई? क्या बात हैं जो उसे इतना परेशान कर रही हैं?” तो काळजीने बोलत होता
गायत्री,“ चिंता मत करो! तुम्हे पता हैं! नविका एक writer हैं! She was writing for a website! उसके बहुत सारी कहानियाँ फेमस हैं सोशल मिडिया पर उसके लाखो फैन्स हैं! उसी तरह उसके बहुत सारे whs up ग्रुप भी हैं! जहा उसके बहुत सारे दोस्त है! लेकिन शादी के बाद उसने सब कुछ छोड़ दिया! जिस तरह इंसान की फिजिकल, मेंटल जरूरते होती है उसी तरह उसकी कुछ बौद्धिक जरुरते भी होती है ! नविका की बौद्धिक जरूरत पूरी नही हो पा रही हैं! उसे लिखने से खुशी मिलती थी! वो खुशी कही खो गई है इसी वजह से वो उदास और डिप्रेस्ड हैं!” तिने सांगितले.
विद्यांक,“लेकिन उसने इस बारे में मुझे कभी कुछ नहीं कहा इतनी बड़ी बात मुझसे छुपाई लेकिन क्यों?”त्याने विचारले.
गायत्री,“ डर की वजह से उसे डर था कि तुम्हे उसका लिखना पसंद नहीं आएगा इसी लिए! इस डर की जड़े उसके बचपन और माँ की जिंदगी से जुड़ी हैं!”त्या म्हणाल्या
विद्यांक,“ लेकिन मुझे उसका लिखना पसंद न आने की कोई बात ही नहीं! मैं होता कौन हूँ उसे रोकनेवाला निवि मेरी पत्नी हैं गुलाम नहीं! उसे जिस काम से खुशी मिलती हैं उसमें मेरी भी तो खुशी हैं!” तो म्हणाला
गायत्री,“ तुम्हे इसी बात का यकीन उसे दिलाना होगा! उसके दिमाग में जो बचपन की बुरी यादें है उससे और उसकी जो तुम्हारे बारे में जो गलत फैमि हैं उसे दूर करना होगा उसका विश्वास जितना होगा। तुम उससे बात करो लेकिन ये सब मैंने तुम्हें बताया हैं ये मत बताना। उसे यकीन दिलाओ की वो जो चाहे काम कर सकती हैं तुम्हे कोई ऐतराज नहीं।फिर समझा बुझाकर मेरे पास लेकर आओ उसे प्रोपर ट्रीटमेंट की जरूरत हैं। जो बस पाँच-छह महीने की होगी।”त्यांनी सविस्तर सांगितले.
विद्यांक,“ ठीक हैं। दो तीन दिन में मैं लेकर आता हूँ निवि को!”असं म्हणून तो गेला.
★★★★
घरी गेल्यावर विद्यांकने नविका समोर तिच्या लेखनाचा विषय कसा काढावा आणि तिच्या मनात लहानपणापासूनची अशी कोणती भीती आहे त्यामुळे तिने तिचा इतका चांगला गुण त्याच्या पासून लपवला हे जाणून घेण्यासाठी सविस्तर विचार केला. नविकाने स्वयंपाक केला दोघे ही जेवले. विद्यांक बेडरूममध्ये मोबाईलवर नविकाचे fb प्रोफाइल पाहत होता तिने लिहलेल्या कथा, कविता, लेख वाचून त्याला आश्चर्य वाटत होते. त्याने तिने शेअर केलेल्या लिंकवरून ती लिहीत होती त्या वेबसाईटवर ही फेरफटका मारला तर त्याला आणखीन मोठा आश्चर्याचा धक्का बसला कारण तिथे तिचे लाखो वाचक त्यांच्या सुंदर कमेंट होत्या.त्याला वाटले की आपण गेल्या एक वर्षा पासून ज्या नविका बरोबर राहतो तिला अजून पुरते ओळखलेच नाही. किती सुंदर लिहिते ही किती टॅलेंटेड आहे आपली बायको पण हे टॅलेंट एका भीती पाई वाया चालले आहे आणि याचाच परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. तो हा सगळा विचार करत होता आणि नविका त्याच्या जवळ येऊन बसली तरी विद्यांकचे तिच्याकडे लक्ष नव्हते. ते पाहून नविका म्हणाली.
नविका,“ काय विदू काय पाहतो आहेस इतकं त्या मोबाईमध्ये?”
विद्यांक,“ अग तुझं fb प्रोफाईल पाहत होत तर नवीनच शोध लागला की मला!तू कथा,कविता,लेख लिहतेस आणि मला सांगितले ही नाहीस! किती फॅन्स आहेत तुझ्या लिखाणाचे बाप रे आणि एक-दोन कथा वाचल्या मी किती सुंदर लेखन शैली आहे तुझी!” तो तोंड भरून कौतुक करत म्हणाला.
तशी नविका पहिल्यांदा घाबरली पण त्याने केलेले कौतुक ऐकून थोडी खुश ही झाली.तिच्या चेहऱ्यावरचे संमिश्र भाव विद्यांक टिपत होता.
नविका,“ हुंम लिहीत होते आधी आता नाही लिहीत!”ती उदासपणे म्हणाली.
विद्यांक,“ मग आता कर की सुरवात पुन्हा लिहायला सुंदर लिहितेस की तू आणि मला का नाही सांगितलेस की तू लेखिका आहेस ते?” तो तोंड फुगवून म्हणाला.
नविका,“ तुला चालेल मी लिहलेले?” तिने आशाळभूतपणे आणि जरा घाबरत विचारले.
विद्यांक,“ अग असं काय विचारतेस? आणि घाबरतेस काय ग निवी? तू माझी बायको आहेस गुलाम नाही तुला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ती गोष्ट तू करावीस तू एक स्वतंत्र व्यक्ती आहेस निवी आणि तुला व्यक्ती स्वतंत्र आहे तुझी आवड जोपासण्याचे! इतकी उच्च शिक्षित असून हा प्रश्न तू मला विचारतेस याच गोष्टीचे आश्चर्य वाटते मला! तू माझ्या पासून तुझा इतका छान गुण लपवलास आणि लग्न झाल्यापासून काहीच लिहल नाहीस याचे खरं तर दुःख होतंय मला! तुझा माझ्यावर इतका ही विश्वास नाही का ग? मी तुला अडवेन असं का वाटले तुला?” तो नाराजीने बोलत होता. हे ऐकून नविकाने त्याचा हात धरला आणि ती स्वतःचे अश्रू डोळ्यातच थोपवत बोलू लागली.
नविका,“ खरं तर मी घाबरले होते कारण मला वाटले तुला मी लेखन केलेले आवडणार नाही कारण मी ज्या वातावरणात वाढले तिथे मुलींना असले काही करण्याची परवानगी नाही माझे fb अकाउंट आहे आणि मी लिहिते हे सुद्धा आई सोडून घरात कोणाला माहीत नाही!” ती म्हणाली.
विद्यांक,“ म्हणजे?काय म्हणायचे आहे तुला?” त्याने आश्चर्याने विचारले.
नविका,“ मुळात आमच्या घरात व्यक्ती स्वातंत्र्य हा शब्दच माहीत नाही खास करून स्त्रीया आणि मुलींच्या बाबतीत! त्यात लेखन, गायन, नृत्य असली कोणतीच कला आमच्यात स्त्रीने जोपासलेली चालत नाही. स्त्री ही फक्त घरात काम करणारी मशीन आणि रात्री पुरुषाला शय्या सुख देणारी वस्तू तसेच मुलाला जन्म देणारे यंत्र इतकीच काय ती तिची ओळख!” हे बोलताना तिच्या डोळ्यातुन अश्रुधारा वाहत होत्या.
विद्यांक,“ काय बोलतेस तू? तुझे बाबा किती सुशिक्षित वाटतात ग! आणि मग तू इतकं शिक्षण अशा वातावरणात घेतलास कसं?” त्याने तिचे डोळे पुसत विचारले.
नविका,“ दुरून पाहणाऱ्या लोकांना असेच वाटते की माझे बाबा सुशिक्षित आणि पुढारलेल्या विचारांचे आहेत पण त्यांचा मुखवटा आहे तो! घरात त्यांचे वेगळे रूप आहे जे खूप बीभत्स आहे. आता माझ्या शिक्षणाचे म्हणशील तर ते फक्त माझ्या आईमुळे झाले. तिने आग्रहाने आणि बाबांचा विरोध पत्करून मला उच्च शिक्षित केले!” ती सुस्कारा सोडत म्हणाली.
विद्यांक,“ हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे निवी!” तो म्हणाला.
नविका,“ मग तुला काहीच माहीत नाही अजून! माझी आई गायनात विशारद आहे. ती खूप सुंदर गाते. तिला घरात संगीताचा क्लास सुरू करायचा होता पण बाबांनी तिला कधीच तसं करू दिल नाही इतकच काय आम्ही लहान होतो तेंव्हा आई गाण्याचा रियाज करायला बसली तर बाबांनी तिचा तंबोरा तोडला होता. त्या दिवशी आई खूप रडली आणि परत तिने कधीच गाणे गायले नाही. मन मारून जगत राहिली ती आणि ते पाहूनच मी मोठी होत गेले. माझ्या मनावर ही गोष्ट बिंबली की लग्नानंतर स्त्रीने तिचे छंद तिचे अस्तित्व विसरायचे असते म्हणून मी लेखन सोडून दिले. खरं तर मला लिखाणातून खूप आनंद मिळतो. पैसे जास्त नसले मिळत तरी माझ्या फुटकळ गरजा त्या पैशातुन भागत होत्या. सगळ्यात महत्वाचे मानसिक समाधान मिळते मला! लेखकांचे खूप सारे whs up ग्रुप आहेत तिथे साहित्याचे विविध प्रकार शिकवले जातात. खूप साऱ्या स्पर्धा असतात ऑन लाईन त्यात मला ही पुरस्कार मिळाले आहेत. पण तो माझा भूतकाळ आहे आता मी तुझी बायको आहे तू म्हणशील तस मी वागणे भाग आहे म्हणून तेव्हाच मी लेखन सोडून दिलं. कदाचित तुला नाही आवडणार हे सगळं माझ्या बाबांसारखं!” ती उदासपणे म्हणाली.
या अशा नविकाच्या बोलण्याचा आणि तिच्या कुटुंबाबद्दल ऐकून खरं तर विद्यांकला त्रास होत होता. त्याने तिला जवळ घेतले आणि तो बोलू लागला.
विद्यांक,“तू वेडी आहेस का निवी? अग तू माझी बायको आहेस गुलाम नाहीस.जसा मी मशिन्समध्ये रमतो तशी तू शब्दात रमतेस! मशिन्स माझे विश्व आहे पण तू तुझ्या शब्दांनी नवीन विश्व निर्माण करतेस! खरं तर तुझे बाबा तुझ्या आईच्या बाबतीत खूप चुकीचे वागले. स्त्री ही पुरुषाची गुलाम नसते तर ती त्याची सहचारिणी असते. आता जग खूप बदलले आहे निवी आणि जगा बरोबर लोकांचे विचार आणि मानसिकता सुध्दा! प्रत्येक पुरुष तुझ्या बाबांसारखा नसतो. तुला लेखनातून आनंद मिळतो तर तू आवश्य कर कारण तुझ्या आनंदात माझा आनंद आहे.तू खुश तर मी खुश कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे! आणि हो तू तुझे साहित्यिकांचे सगळे ग्रुप जॉईन करते आहेस आणि लेखनाला ही सुरवात करते आहे. मला तर वाटत तू लेखनाकडे छंद म्हणून न पाहता प्रोफेशन म्हणून पहा खरंच तू उत्तम लेखिका आणि कवयित्री आहेस आणि मला तर आवडेल बाबा एका प्रतिथ यश लेखिकेचा नवरा म्हणून मिरवायला I am proud to be your husband! तो हसून म्हणाला.
हे सगळं ऐकून नविकाची खळी खुलली आणि ती म्हणाली.
नविका,“ खरंच तुला आवडेल मी लेखन केलेलं?” तिने खुश होऊन विचारले.
विद्यांक,“ तेच तेच काय विचारतेस ग! आवडेल आणि हो मी तुझा पहिला वाचक आणि समीक्षक ही मीच असेन!” तो हसून म्हणाला.
नविका,“thanks!” ती त्याचा हात धरून भावूक होत म्हणाली.
विद्यांक,“ ते आणि कशासाठी? अग मी तुला काहीच दिलेलं नाही. इथून पुढे लक्षात ठेव निवी एक व्यक्ती म्हणून तू स्वतंत्र आहेस तुला ज्यातुन आनंद मिळतो त्या सगळ्या गोष्टी तू करू शकतेस मला न विचारता आणि लक्षात ठेव मी तुझ्या कायम पाठीशी आहे तुझ्या प्रत्येक निर्णयात आणि तुझ्या प्रत्येक यश आणि अपयशात ही you are not only my life partner but also my life.मी मघाशी तुला म्हणालो आणि आता ही सांगतोय निवी तू खुश असशील तर मी खुश असेन! तू इतके महिने स्वतःला इतका त्रास करून घेण्यापेक्षा मी तुला किती वेळा विचारले तेव्हाच सांगायला हवं होतंस!” तो गंभीर होत म्हणाला.
नविका,“ sorry ना!” ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवत म्हणाली.
विद्यांक,“ आणि हो उद्या आपण गायत्री भाभी कडे जात आहोत she is phycologist and you need some help! कारण तू डिप्रेशनमध्ये गेली आहेस जास्त नाही पण पाच सहा महिने ट्रीटमेंट घ्यावी लागेल तुला कदाचित त्यापेक्षा कमीच कारण तुझ्या डिप्रेशनवरचे औषध तर सापडले आहे ना आणि काय ग नुसतं sorry!” तो लटक्या रागाने म्हणाला.
नविका,“ मी खूप लकी आहे तुझ्या सारखा लाईफ पार्टनर मिळाला मला!बरं उद्या जाऊ आपण गायत्री भाभी कडे आणि sorry नाही तर बरंच काही आहे हो I love you!” असं म्हणून तिने त्याला घट्ट मिठी मारली.
आपल्या समाजात अजून ही स्त्री स्वातंत्र्य हा विषय खूप गौण मनाला जातो स्त्रीला तिचे व्यक्ती स्वातंत्र्य दिले जाईलच असे नाही. बऱ्याच वेळा स्त्रीला लग्नानंतर तिचे छंद -आवडीनिवडी यांना तिलांजली द्यावी लागते आणि स्त्री जगत राहते मन मारून एखाद्या गुलामा सारखी! आता जग बदलत आहे समाज बदलत आहे पण अजून ही खूप बदल अपेक्षित आहेत.
©® स्वामिनी(अस्मिता) चौगुले
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
