अपराध वेड्या मनाचा (भाग २)



© पल्लवी घोडके-अष्टेकर.

रिया आता हळूहळू तिच्याही नकळत निशांतच्या सहवासात रमू लागली होती. 

त्यांच्या बॉस आणि एम्प्लॉयी नात्याचे रूपांतर मैत्रीत कधी झाले तिला कळलंच नाही.

बऱ्याच दिवसात तिने तिच्या लाडक्या अल्पुला, अलोकचे तिच्याकडे लक्ष नसते किंवा तो सारखा कामात असतो वगैरे काहीही सांगितले नव्हते. 

चाळीशी जवळ आल्याने आपली चिडचिड होते हा तिचा गैरसमजही आता दूर झाला होता. ती घरातही उत्साहाने काम करत होती.

आर्याचा अभ्यास, सासू-सासऱ्यांचा सगळं काही अगदी आनंदात करत. नोकरांवरही आता ती चिडत नसे. 

तिच्यातले पॉझिटिव्ह बदल सर्वांनाच दिसू लागले होते.रियाच्या सासूबाईंनी तर डॉक्टर अल्पनाला हे बोलूनही दाखवले होते.

रियाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला सुट्टी देणे सहज शक्‍य होतं. पण का कुणास ठाऊक तिला नेहमीचच सगळं नको होतं. 

आलोकने व तिने दरवर्षीप्रमाणे कुठल्यातरी पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला जाणे, घड्याळ बघत-बघत कामाचे फोन अटेंड करत जेवणे आणि ठरलेल्याच गोष्टी करणे. तिला या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आला होता.

आज तिला केबिनमध्ये पाहताच निशांत नेहमीप्रमाणे अदबीने उठला व "Happy Birthday beautiful lady!" म्हणत त्याने तिचे प्रेमाने अभिवादन केले त्याचबरोबर Chocolates व फुलांचा बुके त्याने तिच्यापुढे धरला.

"हे काय? Chocolates? Thank you, पण माझं काय Chocolates खाण्याचं वय आहे का?" तिने खट्याळपणे प्रश्न विचारला.

"Chocolates खायला वय आणि दात दोन्हीही लागत नाही,ते चघळूनही खाता येतात." त्याने नेहमीप्रमाणे मिश्किलपणे डोळे मिचकावत मस्करी केली. 

त्यावर ते दोघेही खळखळून हसले.

आज दुपारी site visit च्या निमित्ताने निशांतने रियाला चक्क surprise lunch साठी नेले.

"आज माझ्याकडून Birthday girl ला treat….."त्याचं वाक्य मध्येच तोडत, "Birthday girl?" रियाने प्रश्न केला. 

"हो प्रत्येक स्त्री मध्ये एक 'Innocent girl' असते,असं माझी आजी म्हणते" तो हसत बोलला.

रियाला त्याचे compliments, pampering आवडू लागले होते. 

तिनेच सतत इतरांची काळजी घ्यायची,सगळ्यांना pamper करायचं, सगळ्यांचे मन राखून त्यांना हवं नको ते पाहायचं. या सगळ्यापेक्षा निशांत बरोबर घालवलेला वेळ तिला सुखावून जात होता.

काम असूनही कामाचा थकवा वाटत नव्हता. त्याचे जोक्स, रियाच्या पेहरावातील बारीकसारीक गोष्टींची त्याच्याकडून घेतली जाणारी दखल, तिला मोहून टाकत होती. ती नव्या उत्साहाने जीवन अगदी भरभरून जगू लागली.

तिच्यातला हा बदल तिच्या लाडक्या bestee अल्पना पासून कसा लपून राहिल? निशांतचा विषय निघाला की रियाच्या चेहऱ्यावर वेगळ्या तेजाची झलक अल्पुला दिसू लागली.

भावनेच्या भरात रिया कडून काही चूक झाली तर तिला आयुष्यभर अपराधी वाटू नये असे अल्पनाला मनापासून वाटे. 

तिला एकदा वाटलेही, रियाला परिस्थितीची जाणीव करून द्यावी, तू वाहवत चाललीस हे तिला सांगावं.

पण पुन्हा मनात विचार आला, तीला ज्या गोष्टी घरातून मिळत नाही त्या इतर कुणाकडून मिळत असेल आणि त्यात ती आनंदी असेल तर तिचा आनंद आपण का हीरावून घ्यावा? घरात जसं प्रत्येकाला तिचं attention हवं असतं, तसं तिलाही कुणाचतरी हवं असेल ना?

रियाला साडीत पाहिले की हे "Wow,Sexy!" हे निशांतचे शब्द नेहमीच तिच्या कानावर पडे,आणि विशेष म्हणजे त्याचा तिला कधी राग येत नसे.

शेवटी तो दिवस उजाडला निशांतचे ६ महिने संपून त्याला परत चंदीगढला जायचे होते.

त्यानिमित्ताने ऑफिस मध्ये सगळ्यांनी त्याच्यासाठी एक पार्टी ठेवली होती. पार्टीनंतर संध्याकाळी कॉफीला घरी ये म्हणून निशांतने रियाला आग्रह केला रिया ही उत्साहाने निशांत साठी गिफ्ट घेऊन सुंदर कॉफी कलर ची साडी घालून गेली होती.

रिया गाडीतून उतरली,अतिशय सुंदर साडी, स्वच्छ गोरी त्वचा, डार्क लिपस्टिक,काळेभोर डोळे,ब्राऊन कलर चे थोडेसे कलीऀ केस, स्लीवलेस ब्लाऊज, एका हातात वॉच आणि दुसऱ्या हातात सोन्याचे ब्रेसलेट. 

ती अतिशय मादक दिसत होती. तिला पाहताच कुणाच्याही हृदयाचा ठोका चुकेल.

निशांत तिला पाहतच राहिला ती जवळ आली आणि निशांतने कसेबसे स्वतःच्या हृदयाच्या ठोक्यावर नियंत्रण मिळवले. 

त्याला तिच्याबद्दल वाटणाऱ्या भावना त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होत्या. विशेष म्हणजे रियालाही त्या कळत होत्या. 

कॉफी घेतांना दोघांनीही खूप गप्पा मारल्या. निशांतने रियाचे भरभरून कौतुक केले त्यात ती खूपच सुखावली होती.

दुसऱ्या दिवशी तब्येत ठीक नसल्याचा बहाणा करून रिया ऑफिसला गेली नाही. 

रियातील होणारा बदल आता आलोकलाही जाणवू लागला होता. 

रिया दिवसेंदिवस आणखीच सुंदर दिसू लागली होती. तिच्यात एक नवीन चैतन्य त्याला भासू लागले होते.

ह्या विषयावर तो अल्पनाशीही बोलला होता.तेव्हा त्याचं तिच्याकडे होत असलेले दुर्लक्ष व तिला त्याच्याकडून असलेल्या अपेक्षांबद्दल अल्पना अलोकशी बोलली होती. त्याने तेव्हा मान्य केलं नसलं तरी त्याला त्याची चूक कळली होती.

रियाची तब्येत ठीक नव्हती म्हणून त्याने तीला आराम करायला सांगून अल्पनाला बोलावून घेतले होते. 

खरेतर तब्येत ठीक नसल्याचा फक्त बहाणा होता, तिला आज ऑफिसला जायचा मूड नव्हता.

रियाने आलोकला बळेच ऑफिसला पाठवले होते अल्पनाला रियाच्या चेहऱ्यावरचा glow बघून काय कळायचे ते कळाले 

" So madam,how was your day?" तिने बोलायला सुरुवात केली.

रियालाही तिच्या प्रश्नाचा कल कळाला होता पण काय react व्हावं हे न कळून ती शांत राहिली.

"आज ऑफिसला का नाही गेलीस?" -अल्पना.

रियाने अल्पना कडे पाहिले व नंतर नजर चोरुन ती बोलू लागली, 
"Do you know, काल मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले असते,पण तो माझ्या जवळ आला तेव्हा मी त्याला 'तुझा इरादा काय आहे?' असा प्रश्न करताच तो काय म्हणाला माहितीये?"

अल्पु तिच्याकडे भुवया वर करून पाहू लागली.

"त्याने मलाच प्रतिप्रश्न केला,'तुला काय हवाय?' पहिल्यांदा कोणीतरी मला असे विचारले,कि मला काय हवय!"

"मग, तू काय म्हणालीस?"-अल्पना.

"मग मी लाजून काहीच बोलले नाही,आणि माझ्याही नकळत…." रियाच्या डोळ्यात लाज आनंद व समाधान सगळंच आज पहिल्यांदाच अल्पुने अनुभवलं. पण ते क्षणिकच होतं.

" पण…... आता मला अलोकशी प्रतारणा झाल्याने अपराधी वाटत आहे." रिया चाचरत बोलली.

"अपराध?" -अल्पना.

"हो मनाचा अपराध…...मला तो मोहाचा क्षण टाळायला हवा होता,पण मी तो टाळू शकले नाही म्हणून अपराधी वाटतय मला." - रिया.

"Humm……. म्हणजे त्या अनेक बायका ज्यांना आपल्याला नेमकं काय हवंय तेच कळत नसतं,स्त्री ही नवऱ्याने त्याला हवी तशी उपभोगण्याची वस्तू आहे,तिला तिच्या स्वतःच्या काहीच भावना,इच्छा नसतात, असं वाटणाऱ्या बायका आणि तुझ्यात काहीच फरक राहिला नसता.हो ना?" रियाने आश्चर्याने अल्पना कडे पाहिले.

अल्पना हसून म्हणाली, "at least तुला तुझ्या आयुष्यात काय हवय हे तरी निशांत मुळे कळालं. मी म्हणत नाही ही चूक वारंवार किंवा प्रत्येक स्त्रीने करायला हवी पण निदान जे झालं त्याबद्दल मनात guilt तरी ठेवू नकोस. तुझ्याकडून जे अनावधानाने घडलं त्याला अपराध न मानता मनापासून accept कर." तिचे वाक्य पूर्ण होताच रियाने अल्पुला मिठी मारली.तिच्या मनावरचं दडपण आता कमी झालं होतं.

अलोकला लवकर घरी आलेलं पाहून अल्पनाने काढता पाय घेतला.

आज बर्‍याच दिवसांनी अलोक व रियाने टेरेसवर कॉफी पितांना मनमोकळ्या गप्पा मारल्या.

इतक्या सुंदर बायकोला गृहीत धरल्याबद्दल व तिच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याबद्दल अलोकला मनापासून अपराधी वाटत होतं.


टीप:
रियाकडून जे घडलं ते योग्य की अयोग्य ह्या वादात न पडता,आनंदी राहणं हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे,तिच्या कलागुणांची कदर,सौंदर्याची जाणीव व्हावी यासाठी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात निशांतचे येणे गरजेचे नाही. Even,निशांत सारखा पुरुष आपल्या बायकोच्या आयुष्यात येऊ नये यासाठी प्रत्येक नवऱ्याने प्रयत्न करायला हवा. तुम्हाला काय वाटतं? हे सांगायला विसरू नका!


©® पल्लवी घोडके-अष्टेकर.


सदर कथा लेखिका पल्लवी घोडके-अष्टेकर यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने सदर कथा ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. तसं त्यांचं संमतीपत्र आमच्याकडे आहे याची नोंद घ्यावी. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.









टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने