© समीर अविनाश पंचधारी
पांढरा स्वच्छ सदरा, पांढरे धोतर नेसलेले मोतिलाल आज स्मशानातल्या बाकावर दुःखी बसले होते मोतिलाल काहीच दिवसात वयाची शंभरी पूर्ण करणार होते. बारीक पांढरी मिशी, जाडसर नाक, कृष शरीरयष्टी असलेले मोतिलाल आपल्या मुलाकडे बघत होते. त्यांचा मोठा मुलगा अंत्यविधी करायला बसला होता.
अंत्यविधीला मोजकेच लोक येऊ शकले होते कारण सर्व शहर विषाणूसंसर्गामुळे बंदिस्त होतं. लोकांना परवान्याशिवाय बाहेर पडण्यास मनाई होती. त्यांची दोन मुले, परिवारातील इतर काही माणसे आणि मित्र शेजारी अशी जेमतेम दहा पंधरा डोकी होती.
विधी संपत आले. तितक्यात त्यांना जाणवले कि त्यांच्याकडे कोणीतरी रोखून बघतय. भास असेल असं समजून मोतिलालनी दुर्लक्ष्य केले. पण तितक्यात ती व्यक्ती त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. आणि खो खो हसत म्हणाली "काय मोतिलालजी ओळखलंत का?" त्याला बघून मोतिलाल शहारलेच. कारण तो पंधरा दिवसांपूर्वी मृत्यू झालेला शेजारी नारायण होता. नारायणाचा मृत्यूदेखील त्याच विषाणू संसर्गाने झाला होता. "काय तुमची पण विकेट पडली का? खीS खीS". होय मृत्यू मोतिलालांचाच झाला होता!
"आता काय इकडेच बसणार कि येणार माझ्याबरोबर?" नारायणाने विचारले "नाही म्हणजे माझे तुमच्याकडे एक काम देखील आहे."
"आता कसले काम नारायणा?" मोतिलालनी विचारले
"सांगतो सगळं सांगतो. पण जरा नदीकाठी जाऊन बोलायचे का?"
नाहीतरी पुढे काही घडेपर्यंत मोतिलालना तरी काय करायचे होते त्यात ओळखीचे माणूस(?) भेटल्याने त्यांना पण जरा हायसे वाटले होते. त्यांनी मान आणि हात हलवून त्यांची सहमती दाखवली. "मग धरा हात" असं म्हणून नारायणानेच त्यांचा हात पकडला. दुसऱ्या क्षणी ते दोघेही जमिनीवरून काही इंचावर तरंगत झपाट्याने पुढे जाऊ लागले. सुरवातीला मोतिलालना तोल जातोय असे वाटले पण तसे होत नाही हे कळल्यावर त्यांना मजा वाटली. काही क्षणातच ते स्मशानाबाहेर पडले आणि नारायणाने उंच जायला सुरवात केली. आता त्यांना शहराचे विहंगम दृश्य दिसत होते. मोतिलालनी इतक्या उंचावरून पहिल्यांदाच शहर बघितले होते. त्यांना खाली शंकराचे मंदिर, शेजारील नदी, त्यावरचा पूल, सगळं कस वेगळच भासत होतं.
इतक्यात नारायण खाली उतरू लागला. नदीकाठी एका जागी त्या दोघांचे "लँडिंग" झाले.
"नारायणा मला बरेच प्रश्न पडले आहेत." मोतिलाल म्हणाले.
"मला माहित नाही कि मला तुमच्या किती प्रश्नांची उत्तर देता येतील पण विचारा तुम्ही"
"नारायणा मृत्यू होऊनही आपण अजूनही इकडेच कसे?" ”आपण अतृप्तात्मे आहोत शेठजी. आपण अजूनही इकडे आहोत कारण आपल्या मनातली निदान एकतरी तीव्र इच्छा बाकी आहे. बघा विचार करून तुमचीहि कुठलीतरी तीव्र इच्छा असेलच."
"हो कि शंभरी ओलांडण्याची फारफार इच्छा होती माझी. इच्छा कसली प्रचंड विश्वास होता. पण आता तर ती पूर्ण होणारच नाही म्हणजे आपण इकडेच लटकणार?"
"बघा जेव्हढं मला कळतं त्यानुसार सांगतो. इच्छा पूर्ण होणार नसेल किंवा आता ती पूर्ण करावीशी वाटत नसेल व त्यामुळे आपल्या मनाची शांती झाली कि आपल्याला मुक्ती मिळते. पण ते नसेल तर तुम्ही अश्या गोष्टी करू शकता कि ज्यामुळे तुम्हाला शांती मिळेल."
"म्हणजे काय? " मोतिलालनी विचारले. नारायण हसून म्हणाला "अगदी बरोबर प्रश्न. आज मला हा प्रश्न चौदाव्या माणसाने चुकलो आत्म्याने विचारलाय. अहो म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबातल्या, मित्रांमधल्या किंवा इतर कोणासाठी काहीही करून जर शांती मिळणार असेल तर ते. किंवा अगदी कोणाचे वाईट करायचे असेल तर तसं करण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. तसे होईलच कि नाही याची शाश्वती नाही. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते प्रयत्न करून तुम्हाला शांती मिळणे आवश्यक आहे. ते जर का झाले कि तुम्ही इथून छू आणि पुढच्या आयुष्यात रुजू. बोला तुम्हाला काय करायचे आहे? खीS खीS खीS ".
मोतिलालनी त्यांच्या घरातल्यांना जे काही द्यायचे होते ते आयुष्यभर कमावून दिलेच होते. मग आता कोणाचे काय भले करायचे?
"नाहीरे नारायणा काहीच अस नाही कि ज्यामुळे मला शांती मिळेल. मी अतृप्त आहे कारण मला वयाची शंभरी पूर्ण करायची होती" नारायण त्यांच्याकडे रोखून बघत म्हणाला "पण जर का तुमच्या मृत्यूला मूलभूतपणे कारणीभूत ठरलेल्या समुदायाला आपण शिक्षा करू शकलो तर तुम्हाला शांती मिळेल का?" मोतीलालांचे डोळे चमकले आणि ते म्हणाले "नक्कीच पण कसे?"
"त्यासाठी तर मी तुम्हाला इकडे आणलंय. थोडक्यात सांगतो. जगभरात या विषाणूचे थैमान एका देशातल्या एकाधिकारशाही पक्षामुळे झालंय. बरोबर? ".
"हो बरोबर मी पण तसच वाचलंय." मोतिलाल उद्गारले
"आता ते मुद्दाम असो व निष्काळजीपणाने, हा गुन्हाच आहे. म्हणुनच या विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्या जगातल्या अनेक अतृप्तात्म्यांनी त्या पक्षाच्या लोकांविरुद्ध युद्ध पुकारले आहे. त्यात मी देखील आहे आणि माझ्या कमांडरने मला इतर आत्म्यांना भरती करून घ्यायचे काम दिले आहे. बोला आहात का तयार? "
"हो पण मी या वयात... " मोतीलालांचे वाक्य नारायणाच्या सात मजली हास्याने अर्धवटच राहिले. "अहो आत्म्याला का वय असतं? तुम्ही आता मनात येईल ते करू शकता."
"खरंच?" "नाहीतर मघाशी आपण उडत कसे काय आलो? तुम्ही माझा हात धरला नव्हता तर फक्त माझ्याबरोबर होता. उडत तुम्ही स्वतःच होता. तुम्ही तयार असाल तर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल आणि मग नक्की काय करायचंय हे समजावलं जाईल."
"होय आहे माझी तयारी" मोतिलाल निर्धाराने म्हणाले.
हे ऐकून नारायणाने जवळच्या झाडीकडे बघून हाताने खूण केली आणि त्यातून एक तरुण बाहेर आला.
"हा अभिषेक, हा तुम्हाला योग्य जागी घेऊन जाईल. तिकडे गेल्यावर तुम्हाला सर्व सांगण्यात येईलच."
अभिषेक मोतिलालांकडे पाहून फक्त "चला" असे म्हणाला आणि दोघांनी उड्डाण केले. पुन्हा मोतिलाल वरून दिसणारा परिसर बघण्यात रममाण झाले. त्यांच्या उडण्याचा वेग जसा वाढला तशी ओळखीची ठिकाणे मागे पडत गेली. काही मिनिटातच खाली घनदाट जंगल दिसू लागले. अभिषेक खुणेची जागा ओळखून खाली उतरू लागला. खाली असलेल्या घनदाट झाडीच्या आत जसे ते शिरले तसे प्रकाश कमी होऊ लागला. जमिनीजवळ आल्यावर समोरचे दृश्य बघून मोतिलाल हादरलेच. त्यांना समोर हजारो नसतील तर निदान शेकड्याने आत्मे दिसत होते.
अभिषेक त्या गर्दीत एका विशिष्ट आत्म्याला शोधत होता. त्याची गाठ पडताच अभिषेकने त्यांना सांगितले "नारायणाने पाठवलंय यांना". मग मोतिलालांकडे बघून म्हणाला "हे कर्नल रमेश बाबू, हे इकडचे प्रशिक्षण आणि पुढील योजनेची माहिती तुम्हाला देतील". असं बोलून अभिषेकने त्यांचा निरोप घेतला.
"या. इकडे आपले प्रशिक्षण शिबीर आहे. आज अजून काही आत्मे येणे बाकी आहे. त्यामुळे थोडा वेळ थांबावे लागेल. तोपर्यंत तुम्ही इतरांशी ओळख करून घ्या" कर्नल म्हणाले.
"ठीक आहे" असं म्हणून मोतिलाल त्या घोळक्यात मिसळले. जमा झालेल्यांमध्ये वेगवेगळ्या वयाचे आत्मे होते. पण सगळ्यात मोठे मोतिलालच होते. त्यांच्या मधील काहींशी बोलल्यावर समजले कि हे सर्वजण देशाच्या कानाकोपऱ्यातून आले होते. असाच थोडा वेळ गेल्यावर त्यांचे लक्ष रमेश बाबूंच्या आवाजाकडे गेले.
रमेश बाबू सर्वांपेक्षा थोडे उंचीवर तरंगून बोलत होते. "नमस्कार. तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांसाठी चांगला नसला तरी आपण सर्व समदुःखी आहोत. पुढील काही दिवसात या योजनेमुळे आपल्या सर्वांना शांती मिळेल अशी आशा करतो "
सर्वजण रमेशबाबूंचे बोलणे लक्ष्य देऊन ऐकत होते. "तुम्हा सगळ्यांना बरेच प्रश्न पडले असतील तर सर्वसाधारणपणे आम्हाला आत्ता पर्यंत माहित असलेल्या शंकांची उत्तरे देऊन मी सुरवात करतो. सर्वात आधी आपण आपल्या देशाच्या मध्यभागी असलेल्या अभयारण्यात आहोत. मानवी जीवनापासून थोडे दूर राहून प्रशिक्षण करावे यासाठी हि मध्यवर्ती जागा शोधली आहे. आपण आत्ता अंदाजे हजारजण म्हणजे एक रेजिमेंट आहोत. अश्याच अनेक रेजिमेंट आसपासच्या जंगलात प्रशिक्षण घेत आहेत. तुम्ही सर्वजण देशाच्या वेगवेळ्या भागातून आला आहात पण तुम्हाला एकमेकांची भाषा समजते कारण जरी तुम्हाला वाटतंय कि तुम्ही तुमच्या जिवंत असतानाच्या भाषेत बोलताय पण खरतर तुम्ही आत्मिक भाषेत बोलत आहात. तसच तुम्ही एकमेकांना तुमच्या शेवटच्या स्मृतीसारखे दिसत आहात. म्हणजे मरणापूर्वी तुम्ही स्वतःला जसे दिसत होतात तसे. आता तुम्हाला सर्वांना हे माहित आहे कि तुम्हाला उडता येते. पण तुम्हाला अजूनही बरेच काहीं करता येऊ शकते. ते कसे करायचे याचे प्रशिक्षण काहीच वेळात तुम्हाला सुरु करण्यात येईल. महत्वाचे म्हणजे आता आपल्याला शरीराचे ओझे नसल्याने तहान भूक व वेळ याचे काहीच बंधन नाही. त्यामुळे तुम्ही गोष्टी फार लवकर आत्मसात करून घेऊ शकता. म्हणुनच आपले हे प्रशिक्षण फक्त दोन दिवसाचे असणार आहे. त्यानंतर योग्य वेळ आल्यावर तुम्हाला मोहिमेवर पाठवले जाईल. तुम्ही सर्वजण इथे आलात कारण तुम्ही त्या देशाच्या एकाधिकारशाहीला धडा शिकवण्याची इच्छा दाखवलीत. आणि आपली योजना हि याच ध्येयावर आधारित आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल कि याची सुरवात त्याच देशातील काही अतृप्तात्म्यांनी केलीय. पुढे जाऊन त्यांच्याच सहयोगाने आपल्याला हि मोहीम पार पडायची आहे"
आत्तापर्यंत बऱ्याच लोकांच्या शंकांचे समाधान झाले होते. कर्नल पुढे बोलू लागले. "आत्म्यांना म्हणजे आपल्याला मूलभूतपणे उडणे, स्वतःचे रूप बदलणे, माहित असलेल्या ठिकाणी क्षणार्धात पोहोचणे अश्या गोष्टी येतच असतात. पण त्याचा अधिक सराव या ठिकाणी करून घेतला जाईल. त्याबरोबरच काही विशेष विद्या शिकवल्या जातील. त्यात वस्तू हलवणे, नाहीश्या करणे, पाडणे, माणसास स्पर्श करणे, त्यांच्या मेंदुत कुजबुज करणे. झाडांची सळसळ करणे, वाऱ्याचा विशिष्ठ आवाज करणे अश्या विविध विद्या आहेत. त्यांचे प्रशिक्षण वेळ वाचवण्यासाठी वेगवेगळ्या गटांना दिले जाणार आहे. म्हणजे काही गटांना वस्तुशास्त्र, काहींना मानवशास्त्र. काहींना निसर्गशास्त्र शिकवले जाणार आहे. एक लक्ष्यात घ्या या प्रकारचा प्रयत्न पूर्वी कधीच झालेला नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी काहीशे आत्म्यांन्नी अश्या गोष्टी करून मित्र राष्ट्रांचे पारडे जड केले होते. पण या वेळी युद्ध न करताच ते जिंकण्याची गरज सर्व जगाला आहे. आपणहि या जगातच परत अवतरणार आहोत त्यामुळे आपल्या पुढील जन्मासाठी सुद्धा आपला प्रयत्न हा शंभर टक्के असला पाहिजे.
अजुन एक, आपल्या योजनेचा निकाल काहीही असो तुम्हाला त्या नंतर पुढच्या जन्मात जावेच लागेल कारण तुम्ही शिकलेल्या या विद्या मानवी जीवनासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे प्रतिकुल निकाल आला तरी सर्वांच्या भल्यासाठी आपल्याला स्वतःची मनःशांती करून घेणे गरजेचे आहे. चला प्रशिक्षण सुरु करूया"
लागलीच प्रशिक्षक पुढे आले. त्यांनी सगळ्यांचे वेगवेगळे गट तयार केले आणि प्रशिक्षण सुरु झाले. प्रशिक्षणात कर्नलनी सांगितलेल्या गोष्टी तर होत्याच पण झाडांमधुन, दगडांमधून आरपार जाणे, अग्नी प्रज्वलित करणे, दगड हलवणे आणि जमिनीत कंपन निर्माण करणे या गोष्टी देखील होत्या.
मोतिलाल मानवशास्त्र प्रशिक्षणात होते. त्यांच्या गटाला जवळच्या गावात नेऊन प्रशिक्षण दिले गेले. त्यात मानवी मेंदूत कुजबुज करून गोंधळवणे, भ्रमित करणे, संमोहित करून आपल्याला हवे ते काम करून घेणे अश्या गोष्टी होत्या. मोतिलाल त्यांच्या गटात अव्वल आले. अश्या प्रत्येक गटातल्या अव्वल आलेल्या काही आत्म्यांना अजून एका शास्त्राचे प्रशिक्षण देण्यात आले. मोतिलालनी स्वतः वस्तुशात्र निवडून त्यात प्रशिक्षण घेतले. यात दोन दिवस चटकन गेले.
तिसरा दिवस उगवण्याच्या आधी अचानक तिथे त्या देशातील माणसांसारखे दिसणारे आठ दहा आत्मे आले. कर्नल त्यांना ओळखत असल्याने ते पुढे जाऊन त्यांना भेटले.
त्यांची अल्प चर्चा झाल्यावर कर्नलनी सगळ्या प्रशिक्षणार्थींना बोलावुन म्हणाले "मित्रांनो तुमचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे आणि योजनेचि सुरवात करायची वेळ पण आली आहे. हे आहेत कर्नल सुंग आणि त्यांचे सहकारी. आपल्या आणि त्यांच्या देशातल्या पीडित आत्म्यांनी मिळून हि योजना तयार केली होती. त्यात सुंग पण होते. तुम्ही आता यांच्याबरोबर त्या देशात जा आणि आपापले कौशल्य पणाला लावा. कोणाला काय करायचे ते तिकडे गेल्यावर सांगण्यात येईल. मला इथे थांबून पुढची टीम तयार करायची आहे. जर अतिरिक्त कुमकेची गरज पडली तर त्यांना पाठवता येईल. पण जर तुम्ही यशस्वी झालात तर कदाचित आपण परत भेटणार नाही. त्यामुळे हि आपली शेवटची भेट समजून मी आणि माझे सहकारी तुमचा निरोप घेतो. यशस्वी व्हा."
सर्वानी रमेशबाबुंचा निरोप घेतला आणि सुंग यांनी सांगितल्याप्रमाणे एकमेकांचे हात धरून रिंगण तयार केले. सुंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यातल्या काही जणांचे हात धरले होते. सुंग यांनी डोळे मिटून काही पुटपुटायला सुरवात केली आणि क्षणार्धात आजूबाजूचे चित्र बदलले. आता ते एका बर्फाळ पर्वताच्या पठारावर उभे होते. लांब लांबपर्यंत फक्त पर्वत दिसत होते. काही हिमाच्छादित तर काही बोडके. "हाच तो प्रदेश जो १९५० साली त्या देशाने आपल्या कब्जात करून घेतला होता" मोतिलालांच्या शेजारील आत्म्याने म्हटले. आजूबाजूला बऱ्याच मोठ्या भागात वेगवेगळ्या देशांचे आत्मे दिसत होते. कमीत कमी लाख दोन लाख आत्मे होते. योजनेची चक्र जोरात फिरायला लागल्याचे मोतिलालांच्या लक्षात आले.
एवढ्यात सगळ्यांचे लक्ष्य वर एका प्रतिमेकडे गेले. त्या प्रतिमेत बाराजण विविध देशांच्या लष्कराच्या वेशात दिसत होते. त्यातल्या मोतिलालांच्या देशातील अधिकाऱ्याने बोलायला सुरवात केली "मित्रहो, मी जनरल जयंत. आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. वेळ थोडा आहे म्हणून मी लगेच तुम्हाला योजनेबद्दल माहिती देतो. पण आपण माझ्याबरोबर उपस्थित इतर अधिकाऱ्यांचे देखील आभार मानले पाहिजे. विशेषकरून यात त्याच देशातले अधिकारी पण आहेत ज्यांना आवाज उठवल्याने कपटाने मारण्यात आले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीशिवाय हि योजना करणे अशक्य होते." जनरलनी इतर अधिकाऱ्यांचे मान वाकवून आभार मानले.
"या मोहिमेची अंमलबजावणी इतक्या लवकर करावी लागेल असे वाटले नव्हते पण नवीन माहितीनुसार मोहीम पुढील दोन दिवसात पार पडणे आवश्यक आहे. या मोहिमेचा मूळ हेतू हा कमीत कमी मनुष्य हानी करून पक्षाच्या एकाधिकारशाहीला संपवण्याचा आहे. त्यासाठी देशाच्या आतुनच उद्रेक घडवुन सत्तापालट करणे गरजेचे आहे. परंतु असे केले तर राज्यकर्ते त्यांच्या लष्कराचा वापर करण्यासाठी पुढे मागे बघणार नाहीत. आणि हे तिकडच्या जनतेला माहित असल्याने जनता असे करायला धजावत नव्हती. परंतु मागील एका महिन्यात आपल्या आधीच्या काही आत्म्यांनी जनतेत क्रांती करण्याचे धाडस उत्पन्न केले आहे. एका ठिणगीची आवश्यकता आहे कि जनता रस्तावर उतरेल. पण त्यावेळी राज्यकर्त्यांनी लष्कराचा वापर करू नये म्हणून आपण लष्कराला निकामी करणे गरजेचे आहे. तुमचे काम लष्कराला निकामी करण्याचे आहे. उद्या पक्षाच्या काँग्रेसचे अधिवेशन आहे त्यात ते काही कायदेबदल करणार आहेत ज्यामुळे त्यांना जनतेची अधिक पिळवणुक करता येणार आहे. त्यामुळे राजधानीतल्या आत्म्यांना आम्ही जनतेला क्रांतीसाठी रस्त्यांवर आणायला सांगितले आहे. पण त्यांच्यावर लष्कर घातले जाऊ नये म्हणुन तुम्ही पुढील गोष्टी करणे गरजेचे आहे. त्यांचे काही लष्कर बर्फाळ प्रदेशात आहे तिथे हिमस्खलन करून तिकडच्या जास्तीत जास्त युद्ध सामुग्रीला निकामी करायचे. त्यांची दहा महत्वाची इंधन भान्डारे स्फोटात उडवून लावायची. दोन मोठ्ठे वीजप्रकल्प आहेत जे ऐंशी टक्के वीजनिर्मिती करतात. हे धरणांवर बांधलेले आहेत त्यातील फक्त वीजनिर्मिती प्रकल्प बंद पाडायचे. त्यामुळे त्यांच्या अनेक मोबाईल टॉवर्स, दूरध्वनी केंद्रे, रडार व लष्करी इमारतींची वीज खंडित होईल. तसेच विविध ठिकाणांचे पुल उध्वस्त करायचे आहेत. हे सर्व जर आपण व्यवस्थितपणे पार पडले तर पुढच्या काही दिवसात जनता तिकडची सत्ता उलथवून लावेल. पुढे काय करायचे ते आपण त्यांच्यावर सोडु." सगळ्यांना हे डावपेच आवडले होते. त्याची अंमलबजावणी करायला ते उत्सुक झाले होते.
जयंत पुढे म्हणाले "तुम्हाला तुमच्या शास्त्रानुसार वेगवेगळ्या गटात विभागले जाईल. प्रत्येक गटाला त्यांच्या मोहिमेच्या ठिकाणी आधीच्या टीम मधील आत्मे घेऊन जातील. ज्यांना एकापेक्षा जास्त शास्त्र येतात त्यांना एक गटात ठेवून अतिरिक्त कुमकेसारखे वापरण्यात येईल. हे सर्व घडत असतांना आम्ही राजधानीतल्या घडामोडींवर लक्ष ठेवायला तिथे उपस्थित असु. प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पडली तर विजय नक्कीच आपला होईल "
असे म्हणुन जयंतांनी तिथे उपस्थित काही आत्म्यांना खुण केली. तसे त्यांनी कारवाईस सुरवात केली. आत्म्यांचे गट पाडले गेले आणि त्यांना त्यांच्या मोहिमेच्या ठिकाणी नेण्यास सुरवात केली. मोतिलालना अतिरिक्त तुकडीत टाकले आणि त्यांच्या तुकडीची रवानगी राजधानीत केली गेली.
पहाट झाली होती आणि आत्म्यांचा पहिला हल्ला वीजनिर्मिती केंद्रांवर झाला. तिकडचे टर्बाइन्स आत्म्यांनी उध्वस्त करून टाकले. देशातील काही भागांची सोडून सर्व भागाची वीज गेली. मोबाईल टॉवर्स, दूरध्वनी केंद्रे बंद पडली. त्यामुळे बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यातच इंधन गोदामांना प्रचंड आग लागून स्फोट झाले. लष्कराच्या गाड्या, विमाने यांना आता त्यांच्या छावण्यांमध्ये असलेल्या इंधनावर समाधान मानावे लागणार होते. मोक्याच्या ठिकाणी आत्म्यांनी जमिनीत कंपन निर्माण करून भूस्खलन व हिमस्खलन केले. त्यामुळे सेनेचे रणगाडे, चिलखती गाड्या त्यात अडकल्या. काही गटांनी विविध ठिकाणचे पूल उध्वस्त केले. त्यामुळे सेनेची हालचाल करणे अशक्य होणार होते. सर्व योजना सुरळीत पार पडत होत्या. क्रांतीसाठी पोषक वातावरण तयार होत होते.
राजधानीत या सर्व गोष्टींचा अजून पत्ता नव्हता. राजधानीची वीज शाबूत असल्याने त्यांना शंका देखील आली नाही. त्यातच राजधानीत अधिवेशनाची तयारी सुरु झाली. देशातील ठिकठिकाणचे प्रतिनिधी काँग्रेस सभागृहात यायला सुरवात झाली. जयंत आणि त्यांचे सहकारी देखील तिकडे पोहोचले होते. त्यांना मोहीमा फत्ते झाल्याच्या बातम्या कळवल्या गेल्या होत्या. आता शेवटचा घाव घालण्याची वेळ आली होती.
राजधानीच्या विविध भागात आंदोलने सकाळी लवकरच सुरु झाली होती. लोकं लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरली आणि आता आंदोलने काँग्रेस सभागृहाच्या दिशेने पुढे सरकु लागली. तोपर्यन्त अध्यक्ष देखील सभागृहात दाखल झाले होते. त्यांना आंदोलनाच्या बातम्या माहित होत्या. परंतु सर्व लोक सभागृहाच्या दिशेने येत आहेत हे कळल्यावर त्यांनी राजधानीच्या संरक्षणासाठी तिथे उपस्थित असलेल्या फौजेला पाचारण केले व अतिरिक्त फौज मागवुन ठेवायला संरक्षण मंत्र्यांना सांगितले.
राजधानीतल्या फौजेने जमावाला सभागृहापासून अर्धा किलोमीटर दूर रोखुन धरले होते. पण जमाव हिंसक बनत चालला होता. त्याला रोखणे आवश्यक होते. अध्यक्षांनी अतिरिक्त फौजेबद्दल संरक्षण मंत्र्यांना विचारले तर संपर्क होत नाहीये असे कळले. आता अधिवेशन बरखास्त करणे म्हणजे जनतेसमोर गुढगे टेकण्यासारखे होते त्यामुळे संपर्क होईपर्यंत वाट बघू असे म्हणत त्यांनी अधिवेशन दोन तासांनी पुढे ढकलले. तेव्हढ्यात सभागृहाचा एक कर्मचारी धावत आला आणि अध्यक्षांच्या कानात काहीतरी कुजबुजला. ते ऐकून अध्यक्ष्यांचा चेहरा काळजीने ग्रासला. त्यांनी बाकी सर्व सभासदांना सभागृहातच बसायला सांगून सर्व मंत्र्यांना आपल्या बरोबर यायला सांगितले.
जयंत हे सगळे बघत होते. त्यांनी लगेच त्यांच्या सहकाऱ्यांपैकी काही जणांना अध्यक्षांच्या मागे पाठवले. अध्यक्ष आणि मंत्री एका खोलीत गेले. ती टेलिग्राफ रुम होती. तिकडची टेलिग्राफ मशिन्स आलेले संदेश ओकत होती. मशीन समोर बसलेल्या एका कर्मचाऱ्याने एकेक संदेश वाचायला सुरवात केली. ते संदेश देशाच्या विविध भागातून येत होते. वीजकेंद्रे बंद पडल्याचे, पूल पडल्याचे, इंधन साठे उध्वस्त झाल्याचे तसेच सेनेचे दळणवळ बंद झाल्याचे ते संदेश होते. ते ऐकून अध्यक्ष आणि मंत्री गोंधळून गेले.
सर्वांचे असे मत झाले कि हा नक्कीच पाश्चात्य देशांचा डाव आहे. अचानक अध्यक्ष धावले आणि जवळच्या एका खोलीत जाऊन तिकडच्या हॉटलाईन वर बोलायला सुरवात केली. त्यांच्या मागोमाग जयंत यांचा एक सहकारी पण गेला आणि त्यांचे फोन वरील बोलणे ऐकू लागला. बाकी सहकारी मंत्र्यांच्या बरोबर थांबले. काहीच मिनिटांत अध्यक्षांचे बोलणे ऐकणारा तो सहकारी विजेच्या वेगाने जयंत यांच्याकडे पोहोचला.
त्याने जे काही सांगितले ते ऐकून जयंत चमकले. अध्यक्षांनी तो फोन दक्षिण सीमेला लागुन असलेल्या त्यांच्या मित्र देशाच्या हुकुमशहांना केला होता. अध्यक्षांनी हुकुमशहांना त्यांच्याकडची सर्व अण्वस्त्रे विविध देशांवर डागण्याचा आदेश दिला होता. जयंत यांना सर्व योजना फिस्कटणार असे वाटू लागले होते. हि शक्यता आपण लक्षात घेतली नाही म्हणुन त्यांना स्वतःचा राग आला. आता काही मिनिटातच अण्वस्त्रे डागली जाणार होती आणि अपरिमित मनुष्यहानी होणार होती.
त्यांनी राजधानीत असलेल्या अतिरिक्त टीमला बोलवायला सांगितले. काही सेकंदातच टीम येऊन हजर झाली. त्यांनी टीम लीडरला सूचना द्यायला सुरवात केली. मोहीम फार जलद गतीने करणे आवश्यक होते. त्या भागाची कोणाला माहिती नसल्याने उडत जायला काही मिनटे लागणार होती. सूचना संपताच सर्व टीम दक्षिणेकडे निघाली. टीम लीडरने टीमचे दोन गट केले. एक गट घेऊन तो स्वतः अण्वस्त्रे नियंत्रित करणाऱ्या उपग्रहाला उद्धवस्त करणार होता. दुसरी टीम मोतिलाल यांच्या हवाली करून त्यांना अण्वस्त्र सोडणाऱ्या स्टेशन्सना उध्वस्त करायला पाठवले.
पहिली टीम उपग्रहांच्या दिशेने अत्यंत वेगाने निघाली आणि मोतिलाल दक्षिणेकडे खुणा शोधत जात होते. काहीच वेळात सांगितलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर मोतिलालनी सहकाऱ्यांना जलद गतिने खाली उतरायचे आदेश दिले. तेवढ्यात त्यांना एका ठिकाणावरुन पांढरा धूर येतांना दिसला. त्यांना पोहोचायला उशीर झाला होता. पहिले अण्वस्त्र सुटले होते. झपाट्याने वर येत ते अण्वस्त्र त्यांच्या जवळून वर निघाले. मोतिलालांनी त्वरित बाकीच्या सहकाऱ्यांना मोहीम पूर्ण करायला सांगुन स्वतः अण्वस्त्राच्या मागे निघाले. मोतिलालांनी प्रचंड वेग पकडला आणि अण्वस्त्राला गाठले. ध्वनीच्या वेगाने निघालेल्या त्या अण्वस्त्राला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू लागले. पण हे सगळे जमिनीवरील दगड हलवण्याइतके सोप्पे नव्हते. अण्वस्त्राची ताकद प्रचंड होती एकट्या आत्म्याला ते करणे शक्य नव्हते. मोतिलालांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण अण्वस्त्र काही नियंत्रणात येत नव्हते. आणि अचानक अण्वस्त्र दिशाहीन भरकटू लागले. पहिल्या टीमने उपग्रह उद्धवस्त केला होता. अण्वस्त्र कधी वर, कधी खाली तर कधी स्वतःभोवती गिरक्या घेऊ लागले. त्याबरोबर मोतिलाल देखील इकडे तिकडे भिरकावले जात होते. पण त्यांनी आपली पकड मजबूत ठेवली होती.
आता अण्वस्त्राचे काही भाग खिळखिळे व्हायला सुरवात झाली होती. आणि अचानक अण्वस्त्राच्या सर्वात पुढे असलेला आण्विक बॉम्ब निखळुन भिरकावला गेला. ते पाहुन मोतिलालना धस्स झाले पण तो दक्षिण समुद्राच्या दिशेने जात असलेला बघुन लगेच हायसं वाटलं. आता फक्त क्षेपणास्त्र राहिलं होत पण ते देखील शहराचा एखादा भाग किंवा इमारत उध्वस्त करू शकणार होतं. त्यातच मोतिलालना जाणवले कि वजन बरेच कमी झाल्याने त्यांचे क्षेपणास्त्रावर बरेच नियंत्रण आले होते. त्यावर त्यांना एक कल्पना सुचली.
इकडे दोन्हीही टीम आपापले काम करून परत आल्या होत्या. दुसऱ्या टीमने एक अण्वस्त्र सुटले आहे आणि मोतिलाल त्याच्या मागे गेले आहेत असे सांगितले. अण्वस्त्र सुटल्याचे ऐकून जयंतांना काळजी वाटली. एव्हढ्यात बाहेर काहीतरी गोंधळ सुरु झाला. बाहेरचे सुरक्षा कर्मचारी आकाशात बघत सैरावैरा धावत होते. जयंत बाहेर येऊन वर बघू लागले. तेच अण्वस्त्र निखळलेले क्षेपणास्त्र त्यांच्याच दिशेने येत होते. त्यांची आंनदाने टाळीच वाजली. क्षणार्धात ते जवळ आले आणि जयंतना विजयी उन्मादाने हसणारे मोतिलाल त्यावर उभे असलेले दिसले.
समाप्त.

©® समीर अविनाश पंचधारी
सदर कथा लेखक समीर अविनाश पंचधारी यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव आहेत. त्यांच्या पुर्वपरवानगी शिवाय शेअर करु नये. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...