मकरंद

© वैदेही जोशी





"आपण थोडस सरकता का? मी बसू शकेन.." खिडकीजवळ बसलेल्या तरुणाला अंकिता म्हणाली..

"हो...या..."

आपली हातातली बँग एस. टी रँक मधे ठेवत ..अंकिता त्या तरुणाच्या शेजारी बसली..

तो खिडकीतून बाहेर बघत बसला .

अंकिता डोळे मिटून अंग सावरुन बसली..चुकुन ही स्पर्श होणार नाही याची काळजी घेत.. तो ही नीट आवरुन सावरून बसला होता.

" बरं दिसतय ध्यान...मनातच विचार करत हसत अंकिता म्हणाली.

मंद परफ्युमचा वास मोहक होता..अंगावरचा शर्ट त्याला मस्त दिसत होता. हे खरयं!!

मधेच हळुच डोळे उघडून बघत होती..तेव्हाही तो खिडकीतून बाहेर बघत होता..आपण ही खिडकीतून बाहेर बघावं म्हणून तीने नजर वळवली.

नकळत त्याचा चेहरा दिसत होता..गव्हाळ गोरा रंग..बारीक कोरलेली दाढी....भुवयांच्या मधे बारीक खूण होती कसली तरी...नाक एकदम सरळ..तरतरीत...

वा...छान ..देखणा आहे..सहप्रवासी...सहजसुलभतेन मनात येऊन गेल..

आपण चोरुन बघतोय हे त्याच्या लक्षात येऊ नये म्हणून तीने पटकन डोळे मिटले.


पण...दिवसाचा प्रवास असं कितीवेळ उगीच डोळे मिटून रहाणार.

बरं प्रवासही जवळचा नव्हता..किमान 6/7 तास तरी..गाडीत एकत्र बसाव लागणारच होतं..आणि असं मान अवघडून किती वेळ बसायच? 

आणि खरतरं इतका हँडसम तरुण बरोबर असताना असं...???

अंकिताने हळूच जीभ चावली..

इतक्यात तो म्हणाला.." तुम्ही कुठे उतरणार?"

ती हसली.."लास्ट स्टॉप"

किती नालायक आहे..आता बसले न मी गाडीत...मग उतरणार काय लगेच? खत्रुड..
मनातच तोंड वेंगाडत अंकिता म्हणाली

"तुम्ही? तीने प्रतिप्रश्न केला..

"मी ...अजून तिकीट काढले नाही.. कंडक्टर आला की काढेन.." तो हसत म्हणाला

हं..माझं रिझर्व्हेशन आहे.." अंकिता म्हणाली.

मग तुम्ही खिडकिची सीट का नाही मागून घेतली? त्याने विचारले..

खरतरं...साधारण..हो...पण मला वारा सहन होत नाही.. म्हणून.. अंकिता म्हणाली...

तस तो हसला...

का? हसलात का?

मला वारा खूप लागतो...तो म्हणाला..

हं...तेवढ्यात कंडक्टर आला..त्याने ही लास्ट ...ठाणा.. असं सांगितले.

अंकिता उगीच मनातून खूष झाली..चला..म्हणजे अजून कुणी शेजारी बसायला येणार नाही.

हा च असेल शेवट पर्यंत.. बर वाटलं...तीच ही रिझर्व्हेशन तपासून तीला परत करून कंडक्टर पुढे सरकला.

तिकिटाचे सगळे सोपस्कार झाले..आणि जो तो आपल्या आपल्या सीटवर राजा सारखा विराजमान झाला...

खरच आहे न....एस टी म्हणजे एक स्वतंत्र राज्य असतं..एकूण 52 राजे आपापल्या सिंहासनावर विराजमान असतात.

काही राजे दाटीवाटीने..कुरबूर करत..किंवा.. न बोलता बसतात.

पण दोन जणांच्या सिंहासनावर बसणारे राजे मात्र ...आपण जणूकाही....××××× अशा आविर्भावात असतात.

मधेच येऊन कुणी जरा थोडं सरकता का? असं म्हटलं तर आयुष्य भराची पूंजी मागितल्यासारखं बघून..कधी..कृतज्ञतेने..तर कधी उपकार केल्याच्या भावनेने..सीट...म्हणजेच आपलं सिंहासन वाटून घेतात.

असो..प्रत्येक सिंहासनावर वेगवेगळे राजे राज्य करतात हे खरं.

अंकिता आपल्या सिंहासनाची कक्षा मर्यादित करुन शेजारच्या तरुणाकडे पाहत होती.

.इतक्यात त्याने खिशातून च्यूईंगमच्या गोळ्या काढल्या..आणि त्यातली एक अंकिताला देत म्हणाला...काही तरी चघळत बसलं कि बरं असतं..

तुम्हाला आवडते ना?
 
अंकिताला खरतर नको..म्हणता आलं असतं पण बोलायला काही तरी विषय हवाच होता.. सुरुवात तरी होऊ दे..म्हणून हसून ती गोळी घेत ती म्हणाली..हो..मस्त वाटतं...

गाडी आपल्या ठरलेल्या मार्गाप्रमाणे नीट जात होती.

ड्रायव्हर योग्य गतीने ठरलेले स्टॉप घेतघेत पुढं चालला होता... 

गंमतीचा भाग ...पण या 52 राजांची धुरा मात्र या एकमेव वझीराच्या हातात होती...आणि त्याच्यावर विश्वास ठेवून हे सारे जण आपापला कालावधी पुर्ण करत होते..

अर्थात शक्यतो लांब पल्याच्या गाड्यांचे प्रवासी शेवटपर्यंत जाणारेच असतात...त्यामुळे वझीराचा साथीदार.. सेनापती.. म्हणजे कंटक्टर त्याच्या बरोबर असलेल्या केबीन म्हणजे त्याच्या खास सिंहासनावर बसून सारं लिखापढी करत असतो.

अंकिताने च्युईंगम चघळतच त्याला विचारले...तुम्ही नाशिकचे का? नाही... गाडीत सुरुवातीपासून आहात म्हणून विचारले...

त्याने गालातल्या गालात हसत म्हटलं..." नाही.. नागपूरचा..माझ्या आत्तेभावाच लग्न होतं म्हणून आलो होतो..एकटाच..मुंबईत..म्हणजे ठाणा नौपाडा ला रहातो सध्या..बाकी कुटुंब तिकडे नागपूर ला असते..आणि.. हो..तुम्ही मला मकरंद म्हटलत तरी चालेल..
 
अच्छा... मकरंद नाव आहे का? कुठल्या फुलाचा आहे..काय माहित? अंकिता मनात म्हणाली..
हो का...वा मस्त नाव आहे...काही तरी बोलायच म्हणून.. पटकन बोलून गेली.

माझं अंकिता..अंकिता सरदेशमुख...मी ही ठाण्याला माझ्या मावसबहिणीकडे चालले आहे..

जॉब च काही काम होतं का बघू...म्हणून बोलवयल तीने...खरतर त्याने विचारल नव्हतं..पण आपलं...सहज.....म्हणत अंकिताने बोलून टाकलं.
.
खरतर त्याने यावर काही बोलावं असं तीला वाटत होतं..पण तो गप्प खिडकीतून बाहेर बघत बसला
.
" माठ आहे नुस्ता...एवढी तरुण छान मुलगी शेजारी बसलीय...तर हा खिडकीतून बाहेर बघतोय...मी काही लग्नाची मागणी घालत नाही..."

अंकिताने डोळे मिटून घेतले..आणि आता नवीन शहरात जाऊन काय काय करावं लागेल...कसं होईल..विचार करत राहिली.. 

थोडावेळ गेला आणि तीला बारीक आवाजात कुणीतरी गाणं गुणगुणतय असं ऐकू आलं..म्हणून डोळे किलकिले करुन तीने बघितलं..तर मकरंदच गाणं म्हणत होता..डोळे मिटुन ते ती ऐकू लागली.

..हं...म्हणजे गाणं बीण आवडत तर...
असू...दे...मला काय करायचं म्हणा..असा विचार चालू होता..तेवढ्यात कंडक्टर म्हणाला.. गाडी थांबेल दहा मिनिटे...
हात तुझी...आत्ताच थांबायला हवं होतं?

सगळेजण भराभरा उठून उतरू लागले..मकरंद ही खाली उतरून गेला..

अंकिताला असं मधेच उतरुन जाणं पसंत नव्हतं...पण बसूनबसून पाय मोडून आले होते..एक चार पावलं मोकळी करुन यावं म्हणून ती ही उतरली.

.खाली उतरून एका बाजुला उभी राहून कुणाच काय चाललय ते बघत बसली..इतक्यात " अंकिता...अंकिता..अशी हाक ऐकली म्हणून तीने माग पाहिलं.मकरंद हातात कणीस धरुन..तुला हवं का? असं विचारत होता...

हो..चालेल..तीने हातानेच खुण करुन त्याला सांगितले.. तो मागेवळून कणीसवाली कडे गेला..

पंधरा मिनिट झाली..आणि सगळे पुन्हा भराभरा आपल्या जागेवर बसले..

कणीस गरमगरम होतं..त्यामुळे सावकाश खावं लागत होतं.

.ते तसच खात ती दोघ सीटवर बसली.. गाडी पुन्हा मार्गस्थ झाली...

आता दोघ ही छान गप्पा मारू लागले..

एकमेकांचा परिचय जास्त झाला की भीड चेपते..तसच काहीस झालं...

गाडी व बाहेरच वारं..दोन्हीचं मस्त वातावरण तयार झालं...आणि दोघं ही डोळे मिटुन शांत टेकुन बसली..

.थोड्यावेळाने अंकिताच्या लक्षात आलं..की झोपेत त्याची मान आपल्या खांद्यावर कलंडतेय...
बोलावं तर ते आता चुकीचे वाटेल...नाही बोलावं तर ..मनाला उगीचच बोच..

संस्कारांच्या बाईपणाच्या तराजूत ते बसेना...असू दे...असं म्हणत तीही डोळे मिटून बसली..

थोड्यावेळाने हीच कृती उलटी झाली..अंकिताचे डोके त्याच्या दंडावर विलसले...पण त्याने ही तीला उठवलं नाही..

थोड्यावेळाने स्टाँप आला म्हणून गाडी थांबली..अन् अंकिता जागी झाली..तीच तीलाच कसं तरी वाटू लागलं...

त्याच्याकडे बघत ती..सॉरी म्हणणार...इतक्यात तो म्हणाला..." आयुष्याच्या अशा प्रवासात असे अनेक प्रसंग येतील..कधी कुणाचा कुणाला आधार घ्यावा लागेल नाही सांगता येणार..वय..शिक्षण ..संस्कार आणि वर्तन आपल्याला आपली ओळख देते..पण म्हणून दरवेळी त्याच तराजूत आपण आपल्याला तोलू नये..आपण पुन्हा आयुष्यात कधी भेटू..न भेटू..काय माहित..पण जो वेळ..तास आपण आता एकमेकांच्या सहवासात घालवणार...तो वेळ त्रासाचा..रागाचा..कल्पेनील दुनियेचा हवा,, असं नाही ना?

कधी कधी असही जगावं मुक्त... कारण दरवेळी असच कायमच्या प्रसंगात..प्रवासात घडेल असंनाही.. किंबहुना नाहीच..

आपण किती प्रवास करतो..नेहमी कुठं शेजारी असा भेटतो...आपण ही कुणाला तरी..किंवा आपल्याला कुणीतरी..नको असणारे असू शकतो.

नेहमी .बंधनाच्या..संयमाच्या बेड्या आपल्या मनावर बाळगत असतोच.. निरपेक्ष कृती ..स्पर्श फार कमी वेळा होते..हो नं? हा प्रवास अशा साऱ्या गोष्टी ंनी भरुन गेला कि तो आठवणीत नेहमीच आनंद देईल..

अंकिता..त्याच्याकडे बघतच राहिली...सुरुवातीपासून ज्याला त्याच्या दिसण्यावरून शोधण्याचा ..समजण्याचा प्रयत्न करतेय मी...आणि हा बिलंदर....

तीला खूप खूपबरं वाटलं..कारण आता नंतरचे राहीलेले दोन तास निश्चिंत मनाने आठवणीचा कप्पा भरण्यात जाणार होते हे नक्की...

पुढे मागे खरच तो भेटेल की नाही माहित नाही.. पण आत्ता चे त्याचे तीचे क्षण मात्र ती गोळा करुन ठेवणार होती....त्याच्या नावा प्रमाणे....

डोळे मिटून.हळूच पुटपुटली" मकरंद"!!!


© वैदेही जोशी


सदर कथा लेखिका वैदेही जोशी यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने सदर कथा ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने