© कविता अमित सुरासे
केमिकल इंजिनियर असलेल्या संभवने एका मोठ्या केमिकल फॅक्टरी मध्ये आपल्या करियरची १० वर्षे काम केलं आणि त्यातच त्याला श्वसनाच्या व्याधी झाल्या.
संज्योतचे शिक्षण बी कॉम. राहणारी पुण्यात. आई, बाबा शिक्षक त्यामुळे तिलाही फारशी माहिती नव्हती.
संज्योतने अर्ध्या शेतात पारंपारिक बियाणाची लागवड केली हि भाजी ऑरगॅनिक म्हणून ऑनलाईन विकण्याचा तिचा मानस होता . आणि बाकी अडीच एकर मध्ये कोबी, गाजर, फ्लॉवर , गवार,कांदे , वांगी , हिरव्या मिरच्या अशी विभागवार फळभाज्यांची लागवड करून घेतली .
संभवला बरोबर घेऊन काही वेळ चर्चा केली लॉक डाऊन मधून शेतीची कामे वगळली होती.
" फार्म फ्रेश व्हेजिटेबल्स .... तुमच्या दारात..... कमीतकमी खरेदी ५०० रुपये "
दिलेल्या क्रमांकावर २४ तास आधी ऑर्डर करा . ऑर्डर करण्याची वेळ सायंकाळी चार ते सहा. रोख किंवा ऑन लाईन पेमेन्ट.
( गवार , भेंडी, कांदे , बटाटे , फ्लॉवर , कोबी, शिमला मिरची,गावठी वांगे, गावठी वाल, लाल भोपळा प्रत्येकी ८० रुपये किलो .
हिरवी मिरची लवंगी आणि गाजर प्रत्येकी ९० रुपये किलो कांद्याची पात, मेथी , पालक , पुदिना ( एक जुडी ) ४० रुपये.)
मजूर येऊन शेतीची इतर कामे करत होते अजूनही एकहि ऑर्डर आली नव्हती जाहिरात देऊन २ आठवडे उलटून गेले होते.
डॉक्टरांनी त्याला ताबडतोब हे काम बंद करायला सांगितले. आणि कमी प्रदूषणाच्या ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला.
पाच वर्षाचा आकाश आणि बायको संज्योत याना घेऊन तो पुण्यावरून त्याच्या गावी जुन्नर मध्ये आला.
शिवरायांच्या जन्माने पावन झालेल्या ह्या भूमीला वेगळ्या ओळखीची गरज नाही.
वडिलोपार्जित घरात जिथे त्याला पूर्वी मान सन्मान मिळत होता ह्यावेळी मात्र मोठा भाऊ वाहिनी इतकेच काय त्यांची लेकरेहि याना विचारत नव्हती ह्यांचे इथे कायम राहायला येणे त्यांना पचलेच नव्हते.
"तुझं ऐकून गुंतवणूक म्हणून हि जी पाच एकर जमीन आपण घेतली होती त्यातच आपण काहीतरी करू " संभव म्हणाला . संज्योत फक्त हसली .
"तुझं ऐकून गुंतवणूक म्हणून हि जी पाच एकर जमीन आपण घेतली होती त्यातच आपण काहीतरी करू " संभव म्हणाला . संज्योत फक्त हसली .
नुकतीच दिवाळी उलटली होती संभव चा मित्र ज्याचा नर्सरीचा आणि बी, बियाणे खतांचा उद्योग होता त्याने संभवला नोकरी दिली.
महिन्याकाठी लाखो रुपये कमावणारा संभव आता काही हजारांसाठी त्याच्या मित्राकडे काम करत होता.
गरज असे नाही पण रिकामं बसून काय करणार ? शेतीचीहि जेमतेम माहिती म्हणून त्याने हि नोकरी स्वीकारली होती.
संज्योतचे शिक्षण बी कॉम. राहणारी पुण्यात. आई, बाबा शिक्षक त्यामुळे तिलाही फारशी माहिती नव्हती.
आजूबाजूला हिरवाई आणि आपला मधलाच वाळलेल्या गवताचा पाच एकरचा पट्टा बघून तिला काहीतरी सुचले .आणि संभवला फोन करून तिने कल्पना सांगितली.
संभव जरा साशंकच होता पण नेहमीप्रमाणे त्याने तिचे ऐकायचे हे ठरवले आणि तिला संमती दिली. आणि वेगाने घडामोडी घडायला सुरवात झाली.
सगळ्यात आधी संज्योतने पुण्याचा फ्लॅट रिकामा करून शेताजवळच्या एका चाळीत दोन रूम घेतले आणि तिथे शिफ्ट झाली. पुण्याचा फ्लॅट भाड्याने दिला.
पाणी शोधण्याचे यंत्र बोलवले त्यात पाच एकर मध्ये तीन ठिकाणी भरपूर पाण्याचे अनुमान निघाले.
पूर्ण शेत साफ करून तात्पुरत्या दोन बोरवेलचे काम करून घेतले.
विहिरीचेही काम सुरु झाले त्याला आणखी पाच सहा महिने जाणार होतेच.
आता संभव आणि संज्योत पोहोचले कोंभाळण्याला तालुका अकोले जिल्हा अहमदनगर " सिड मदर" राहिबाईंच्या कडे आपल्या पारंपरिक बी बियाणे आणि शेंद्रीय शेतीचे धडे घ्यायला .
संज्योतने अर्ध्या शेतात पारंपारिक बियाणाची लागवड केली हि भाजी ऑरगॅनिक म्हणून ऑनलाईन विकण्याचा तिचा मानस होता . आणि बाकी अडीच एकर मध्ये कोबी, गाजर, फ्लॉवर , गवार,कांदे , वांगी , हिरव्या मिरच्या अशी विभागवार फळभाज्यांची लागवड करून घेतली .
हि सगळे कामे मोलमजुरीने करणाऱ्या बायका होत्या. बाजूला एकट्याच राहणाऱ्या वयस्कर आजींनाही तिने जीव लावला होता त्यामुळे त्याही त्या शेतीकामाची देखरेख करत आणि संज्योतला मदत करत .
डिसेंबरच्या सुरवातीला सुरु झालेले हे काम. मार्च पर्यंत माल हातात यायला लागला .
शेत बहरत होती आणि संज्योतने निदान ह्यावर्षी तरी लोकल व्यापाऱ्यांना अडीच एकर मधला माल देऊ असे ठरवले होते पण जगभरात पसरलेला कोरोना नावाचा विषाणू भारतात आला आणि मार्च मध्ये पीक काढणीच्या वेळीच लॉकडाउन झाले .
ऑनलाईन पोर्टल बंद झाले ज्या व्यापाऱ्यांशी तिने पुरवठ्यासाठी बोलणे केले होते त्याचाही नाईलाज झाला .
संज्योत अक्षरशः रडकुंडीला आली सगळे आर्थिक संचित पणाला लावून तिने हे पीक घेतले होते आणि आता हे अनपेक्षित संकट उभे राहिले तिच्यावरच नाही तर संपूर्ण गावावर.
संध्याकाळ झाली होती देवाला दिवा लावून तिने घरातील जिजाऊंच्या छायाचित्राकडे पहिले आणि एक बारीक हसू तिच्या चेहऱ्यावर पसरले .
आम्ही जिजाऊच्या मुली……जशा तलवारीच्या आण्या…..
असे गुणगुणत तिने आपल्या बाबांना फोन लावला एक जाहिरात तयार करून पुण्यात फेसबुक, व्हाट्सअप वर सगळीकडे फिरवायला सांगितली.
संध्याकाळ झाली होती देवाला दिवा लावून तिने घरातील जिजाऊंच्या छायाचित्राकडे पहिले आणि एक बारीक हसू तिच्या चेहऱ्यावर पसरले .
आम्ही जिजाऊच्या मुली……जशा तलवारीच्या आण्या…..
असे गुणगुणत तिने आपल्या बाबांना फोन लावला एक जाहिरात तयार करून पुण्यात फेसबुक, व्हाट्सअप वर सगळीकडे फिरवायला सांगितली.
संभवला बरोबर घेऊन काही वेळ चर्चा केली लॉक डाऊन मधून शेतीची कामे वगळली होती.
तिने पुढील आठवड्यात मजुरांना कामासाठी सांगून ठेवले.
माल काढण्यासाठी आणलेली गोणपटे होती घरात स्वस्त पडतात म्हणून एकत्र पाचशे घेतली होती ती कापून त्याच्या पिशव्या बनवायला सुरवात केली आठवड्याभरात हे काम झाले .
पुण्यात जाहिरात बऱ्यापैकी पसंतीस उतरली चौकशीचे फोन येऊन गेले .
" फार्म फ्रेश व्हेजिटेबल्स .... तुमच्या दारात..... कमीतकमी खरेदी ५०० रुपये "
दिलेल्या क्रमांकावर २४ तास आधी ऑर्डर करा . ऑर्डर करण्याची वेळ सायंकाळी चार ते सहा. रोख किंवा ऑन लाईन पेमेन्ट.
( गवार , भेंडी, कांदे , बटाटे , फ्लॉवर , कोबी, शिमला मिरची,गावठी वांगे, गावठी वाल, लाल भोपळा प्रत्येकी ८० रुपये किलो .
हिरवी मिरची लवंगी आणि गाजर प्रत्येकी ९० रुपये किलो कांद्याची पात, मेथी , पालक , पुदिना ( एक जुडी ) ४० रुपये.)
मजूर येऊन शेतीची इतर कामे करत होते अजूनही एकहि ऑर्डर आली नव्हती जाहिरात देऊन २ आठवडे उलटून गेले होते.
ऑरगॅनिक प्रोडकॅटसाठी तिने छापायला दिलेले स्टीकर्स ,बॅग्स सारे काही डीलर कडे तयार होते . पण डिलिव्हरी शक्य नव्हती लॉक डाउन असल्यामुळे .
आजही तिने देवापुढे दिवा लावला आणि जिजाऊंच्या फोटोपुढे नतमस्तक झाली .
आजही तिने देवापुढे दिवा लावला आणि जिजाऊंच्या फोटोपुढे नतमस्तक झाली .
संभवने तिला चेष्टेनेच तिला विचारले " काय ग जिजाऊंनी स्वराज्य व्हावे म्हणून जिवाचे रान केले तू काय करणार आहेस ?"
तिने एका क्षणात बाणेदारपणे उत्तर दिले "मी बळीराज्याच राज्य यावं म्हणून जिवाचे रान करणार आहे आणि हि सुरवात आहे " .
दुसऱ्या दिवशी चार वाजता फोन वाजू लागला आणि मग एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु झाले फोन ऑर्डरचे पहिल्या दिवशी आठ ऑर्डर्स .
दुसऱ्या दिवशी चार वाजता फोन वाजू लागला आणि मग एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु झाले फोन ऑर्डरचे पहिल्या दिवशी आठ ऑर्डर्स .
सहा वाजता ऑर्डर प्रमाणे मजुरांनी भाजीपाला काढला साफ केला आणि गोणपाटाच्या पिशव्यामध्ये भरून वरतून पत्ता आणि नावाचे लेबल लावले तेही हस्तलिखित .
संभवने त्याच्या मित्राच्या गड्याला हाताशी धरून पहाटे पुण्याला प्रयाण केले दोन तासात पुणे पण सगळे पोहोचवून यायला दुपारचे तीन वाजले .
संभवने त्याच्या मित्राच्या गड्याला हाताशी धरून पहाटे पुण्याला प्रयाण केले दोन तासात पुणे पण सगळे पोहोचवून यायला दुपारचे तीन वाजले .
चार हजार आणि आठ ऑर्डर हि खूप मोठी गोष्ट नव्हती.
पण रोज सुमारे दहा ते बारा ऑर्डर आठवड्याने रिपीट ऑर्डर वाढलेला रिस्पॉन्स हे सुखावणारे आताचे चित्र आहे.
तिला विचारून आता बाकीचे गावातले शेतकरी शेतमाल लावतात म्हणजे त्यानाही फायदा होतो .
जून च्या पहिल्या आठवड्यात आजूबाजूच्या गावचे काही शेतकरी पण सामील झाले आणि आता हि चळवळ झाली.
जुन्नरच भौगोलिक महत्व पाहता माळशेज मार्गे कल्याण डोंबिवली ठाणे ह्या मुंबईच्या उपनगरात हि सेवा सुरु केली गेली.
हा पसारा सांभाळणारी संजू म्हणजेच संज्योत हि त्या गावात सगळ्यांची लाडकी झाली.
आता व्यापारी रिकामे परत जातात आणि शेतकरी गिर्हाईकापर्यंत पोहोचतो आहे .
भाज्यांबरोबरच रेडिमेड बाजरी, गहू, ज्वारी, तांदूळ ह्या पिठाची पण मागणी होते आहे.
काही महिला बचत गट हाताशी घेऊन नियोजनबद्ध कारभार करण्याचा तिचा विचार आहे कटाक्षाने सगळ्या महिलांना रोजगार मिळावा हा प्रयत्न असणार आहे .
अर्थात हे सारे चालू असताना तिची आर्थिक गणिते अजूनही किचकट आहेत .
काही महिला बचत गट हाताशी घेऊन नियोजनबद्ध कारभार करण्याचा तिचा विचार आहे कटाक्षाने सगळ्या महिलांना रोजगार मिळावा हा प्रयत्न असणार आहे .
अर्थात हे सारे चालू असताना तिची आर्थिक गणिते अजूनही किचकट आहेत .
अंगावरचे स्त्रीधन आणि पुण्यातले घर इतकीच मिळकत शिल्लक आहे तरीही कोणत्याही शेत मजुराचा किंवा शेतकऱ्याचा मोबदला वेळेवर दिला जातो.
सगळे खर्च मार्गी लावून जे उरते तेच ती स्वतःजवळ ठेवते.
हळू हळू परिस्थिती निवळेल . सर्व पूर्ववत होईल तरीही हा उपक्रम चालू असावा असा सगळ्यांचा प्रयत्न आहे .
ह्या सगळ्यामुळे संभवचा भाव मात्र गावात खूप वधारला आहे तो मात्र मित्रांना आपुलकीचा सल्ला देतो " बायकोचे ऐकायला हवे .... "
©® कविता अमित सुरासे
ता.क. ही कथा जेव्हा सत्यात येईल तेव्हा खरेच बळीराजाचे राज्य येईल.

सदर कथा लेखिका कविता अमित सुरासे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.