प्रीत ( भाग 1 )
सौ. प्रभा निपाणे
दवाखान्याच्या गेटजवळ प्रचंड गर्दी जमली होती. कारण सुध्दा तसेच होते. सोमय्या कॉलेजचां S. K. नावाचा एक मुलगा Jupiter हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. अंकिता सुध्दा त्या गर्दीचा एक भाग होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. प्रत्येक जण S.K. ला बरे वाटावे म्हणून प्रार्थना करत होते.
इतक्या एक गाडी हॉस्पिटलच्या गेट जवळ येऊन थांबली. ड्रायव्हर खाली उतरला, त्याने गेट उघडायची वाट न पाहताच एक रुबाबदार मध्यम वयाची व्यक्ती गाडीतून खाली उतरलेली. ड्रायव्हरने दरवाजा बंद केला. दोघे घाईघाईने चालू लागले, तेव्हढ्यात अंकिताची ड्रायव्हर सोबत टक्कर झाली. तिने वर पहिले.
एकदम म्हणाली,
बाबा तुम्ही !
इथे !
बाबा सुध्दा तेच म्हणाले ! अंकिता !
तू इथे कशी ?
बाबा, माझ्या कॉलेजच्या मित्राचा accident झाला त्यालच घेऊन आलो आम्ही सगळे.
नाव काय त्याचे ?
S .K.
अच्छा !
माझ्या साहेबांच्या मुलाचा पण आजच accident झाला. ते समोर गेले ते माझे साहेब.
बर तुम्ही तुमच्या मित्राला लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करा.
आणि हो !
माझ्या साहेबांच्या मुलाला सुध्दा लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करा ?
प्रार्थनेत खूप ताकत असते !
हो बाबा !
इतके बोलून ते भरभर त्यांच्या मागे चालू लागले.
तिचे हो बाबा ! हे स्वर सुद्धा त्यांच्या कानपर्यंत पोहचले नाही.
डॉक्टरांनी त्यांना केबिन मध्ये बोलावले. त्यांच्या मुलाचा हात फॅक्चर झाला होता आणि पायाला सुध्दा खूप लागले होते. दोन ऑपरेशन करायचे होते. सगळे चेकप करून झाले होते. सगळ्या फॉर्म्यालिटी पूर्ण करून, ऑपरेशनची तयारी सुरू होती. तेवढ्यात त्या मुलाची आई देखिल तिथे पोहचली. सगळे जमलेले त्याचे मित्र S.K.च्या ऑपरेशन साठी धडपडत होते. ब्लड देण्यासाठी कित्येक जण तयार होते.
डॉक्टरांनी सिस्टरला सांगितले, बाहेर मुलं थांबली आहे. त्यांना सांगा तुम्ही आता घरी गेलात तरी चालेल. त्या मुलाचे आईवडील आलेत. तुम्ही चिंता करू नका. पण कुणीही जाग्यावरून हलायला तयार नव्हते.
तेवढ्यात अंकिताला, तिचे बाबा एका स्त्रीला हाताला धरून आणतांना दिसले. ते अंकिता जवळ आले, म्हणाले बेटा ह्या माझ्या मालकीण बाई !
यांच्याच मुलाचा आज accident झाला.
आत्ता ताबडतोब दोन ऑपरेशन करायचे आहे. थोडे तिला बाजूला घेऊन म्हणाले.
स्वराज त्यांचा एकुलता एक मुलगा, त्यामुळे त्या खूप खचून गेल्या आहे. त्यांची मुलगी अमेरिकेला असते. तूर्तास तिला काही सांगितले नाही. तु या काकूंची काळजी घे.
बाबा ! तुम्ही नका काळजी करू. तुम्ही तुमच्या सरांना सांभाळा. त्यांना सुध्दा खूप मानसिक धक्का बसला असणार !
हो बेटा !
अंकिता त्यांचा हात हातात घेऊन बसली. S.K. चा एक मित्र जवळ येऊन म्हणाला . S.K. ला ऑपरेशन थिएटर मध्ये नेले आहे. त्याचे आईबाबा आलेत असे कळले. आता आपल्याला कुणाला भेटू देणार नाही. मुख्य म्हणजे आम्हाला आत्ताच कळले . आपला हा S.K . एका श्रीमंत घरचा मुलगा आहे.
सगळेच एकसुरात म्हणाले काय???
हो !
S.K. म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती कैलास कक्कर यांचा मुलगा स्वराज !
काय ?
हो मित्रांनो !
तरीच हा आपल्याला कधीच त्याचे पूर्ण नाव सांगत नव्हता.
अंकीता जवळ बसलेल्या स्त्रीने डोळे पुसले.
म्हणाल्या तुम्ही सगळे S.K. ला दवाखान्यात घेऊन आलात !
हो काकु !
आम्हा सगळ्याचा तो खूप लाडका आहे.
असे काय आहे तुमच्या त्या S.K. त?
एकेक जण त्याच्या विषयी बोलू लागले.
स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ, गरीबावर अत्यंत प्रेम, कुणाची फी भर, कुणाचे क्लास चे पैसे भर, कुणाला वह्या पुस्तक दे. त्याचे काहीना काही उद्दोग चालू असतात.
आम्ही त्याला विचारायचो काय रे बापाच्या भरोष्यावर करतो का सगळा खर्च ?
म्हणायचा हा खर्च मी बापाच्या भरवशावर नाही करत. मी सुट्टीच्या दिवशी एका कंपनीत काम करतो. शिवाय माझे बाबा एका कंपनीत चांगल्या पोस्ट वर आहे. ते मला पॉकेट मनी देतात . मी ते स्वतःसाठी खर्च न करता समाजासाठी उपयोगी आणतो.
साधा एक कप चहा प्यायचा तरी तो विचार करतो.
बापरे ! सहा रुपयाला cutting !
नकोच तो बाहेरचा चहा प्यायला !
घरी जाऊन मस्त आईच्या हातचा अद्रक वाला चहा प्यायचा. सगळा शीण दूर होतो.
इतकेच नाही काकु, तो
ते पैसे साठवून गरिबांची मदत करतोच. शिवाय आदिवासी पाड्यावर जाऊन , मुलांना आर्थिक मदत करून, त्या मुलांना सगणंकाचे पण ज्ञानदान करतो.
कॉलेज मध्ये पाहिले पाच सहा दिवस तो एका महागड्या गाडीतून कॉलेज मध्ये येत होता. इतका श्रीमंत मुलगा त्यामुळे तो गर्विष्ठच असावा हा कॉलेज मध्ये प्रत्येकाचा समज झाला. त्याच्या बरोबर आम्ही कुणी बोलतच नव्हतो.
मग तो एक पल्सर घेऊन येऊ लागला. तो सांगत होता. ती महागडी गाडी माझ्या मित्राची होती. तो सातआठ दिवस बाहेरगावी गेला. माझी गाडी यायची होती. तो म्हणाला, तोवर ही घेऊन जा. असे बोलून त्याने आमचे मन जिंकून घेतले.
काय ?
सगळे एक सुरात म्हणाले हो काकु !
दुःखाचे अश्रू थांबून त्यांच्या डोळ्यात आपल्या मुलाचे कर्तुत्व ऐकून आनंदाश्रू तरळले होते.
डोळे पुसत त्या म्हणाल्या. मुलांनो खूप खूप धन्यवाद तुम्ही S.K. ला ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन आलात.
हा तुमचा S.K. म्हणजेच माझा,
प्रसिद्ध उद्योगपती कैलास कक्कर यांचा एकुलता एक मुलगा स्वराज
काय ?
होय!
अंकिता ताडकन उभी राहिली !
सगळे अवाक होऊन त्याच्या आईकडे पाहत होते.
सगळ्यांना प्रश्न पडला. इतक्या श्रीमंतांचा मुलगा इतका साधा कसा ?
त्याची आई अश्रू पुसत सांगत होती. तो अगदी त्याच्या वडिलांवर गेला.
तो वडिलांना म्हणायचा बाबा !
मला ही महागडी गाडी नको. माझ्याशी कोणी बोलत सुध्दा नाही.
पण हो !
श्रीमंत बापाची मस्तवाल पोरं माझ्या मागे पुढे फिरत असतात.
बाबा ! आपल्या कडील कोणतीच गाडी मला कॉलेजला जायला योग्य वाटत नाही.
बाबा ! मला एक साधी पल्सर घेऊन द्या.
अरे ! पण तुला आम्ही देतोय. मग तुला काय प्रॉब्लेम. आम्हाला वाटत आमच्या मुलाला सर्व मिळावं !
तेव्हा तो म्हणाला होता,
हो ना बाबा !
मग तुम्ही का नाही उपभोग घेतला या सर्व गोष्टीचा.
आजी सांगत असायची, तुझे बाबा फार मेहनती आणि हुशार.खरतर त्या वेळी शिक्षणाला इतके महत्व नव्हतेच. पण तुझे बाबा खूप शिकले. ते MBA का काय केले? मग आपल्या धंद्यात लक्ष घातले. आधीच उंचीवर असलेला धंदा अजून उंचीवर नेऊन ठेवला. पण रहण्यातला साधेपणा काही सोडला नाही. म्हणायचा आई बाबा तुम्ही माझे आदर्श आहातच. पण मला इन्फोसिस चे मालक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती हे दोन आदर्श डोळ्यासमोर असतात. किती साधी राहणी त्या लोकांची. साधी कॉटन ची साडी घालून त्यांच्या विचाराने आणि कृतीने सुधाताई सारखी व्यक्ती खूप श्रीमंत वाटतात. इतका कोणत्याच बाबतीत मी श्रीमंत नाही. पण कृतीत आणायचा प्रयत्न नक्की करतो.
तुम्ही सुध्दा साधीच गाडी वापरली. तुमच्या बाबांनी पण तुम्हाला अशीच महागडी गाडी घेऊन दिली होती. पण तुम्ही त्या गाडीला हात सुध्दा लावला नाही.
त्याने सुध्दा तसेच केले .एक नवीन साधी पल्सर घेतली.
त्याने आपली श्रीमंत ही ओळख कुणालाच सांगितली नव्हती.
स्वराज कैलास कक्कर. हे पूर्ण नाव तो कॉलेज मध्ये काय कुठेच, कधीच सांगत नव्हता.
बिझिनेस ग्रुप मध्ये कैलास हे नाव खूप प्रसिद्ध होते.
एकदा त्याच्या बाबांना तुमच्या कॉलेज मध्ये बोलावले. त्याने निक्षून सांगितले माझ्या बद्दल काहीच सांगायचे नाही. असा हा तुमचा S.K.
सगळ्यांना S.K. चां खूप अभिमान वाटला. सगळे आपापल्या घरी गेले . अंकिता मात्र थांबली होती. कारण S.K. आता तिच्या बाबांच्या साहेबांचा मुलगा होता. त्याच्या आईची जबाबदारी तिच्यावर होती.
चार तासाने डॉक्टर येऊन म्हणाले. काही काळजी करू नका. तो आऊट ऑफ डेंजर आहे. शिवाय ऑपरेशन सक्सेस झाले. दोन तासाने तो पूर्ण शुध्दीवर येईल.
अंकिता ने चार कप कॉफी आणली. S.K. चे आईबाबा, तिचे बाबा आणि ती. गरम गरम कॉफी प्यायले. थोडी तरतरी आली.
मग ती वडिलांना म्हणाली, बाबा , काका काकूंच्या जेवणाचे काय ?
अरे हो बेटा मी घरी जाऊन डबा घेऊन येतो.
सगुणा बाईंना फोन करून सांगतो जेवण बनवायला. बाबा यात बराच वेळ जाणार. आपले घर जवळच आहे. मी आईला सांगते करून ठेवायला. शिवाय आता संध्याकाळी ट्रॅफिक पण असते. किती वेळ जाणार त्यात ?
दोघांचे बोलणे ऐकत असलेले कक्कर साहेब म्हणाले, खरच नको बेटा. जेवायची इच्छाच नाही.
काका असे म्हणून कसे चालेल ! आता आमचा S.K. म्हणजेच स्वराज ठीक आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमची आणि काकूंची काळजी घ्यायची.
ते काही नाही मी घरून डबा घेऊन येते. ठीक आहे, तू काही आता ऐकणार नाही. दिनेश तू गाडी घेऊन जा बरोबर. साहेब जवळच घर आहे ती पट्कन जाईल रिक्षाने. नाही दिनेश तू गाडी काढ आणि लवकर ये.
ठीक आहे साहेब , असे म्हणून त्याने गाडी काढली. तोवर अंकिता ने आईला एकडील सर्व हकीकत सांगितली आणि जेवणा बद्दल सांगितले. खरतर इतक्या मोठ्या लोकांना जेवण द्यायचे अंकिताची आई जरा गोंधळलीच. लगेच स्वतःला सावरून कामाला लागली. अंकिता येई पर्यंत त्यांनी वरण, भात, बटाटा भाजी, चपाती आणि कोशिंबीर असे साधे जेवण बनवून ठेवले.
ती आल्यावर गरम गरम चपाती करून डबा भरून दिला. इतक्या मोठ्या लोकांना डबा द्यायचा, तिने घरातले चहा साखरेचा डबा रिकामा केला, भाजी , वरण भरले. एका डब्यात भात, आणि एका पांढऱ्याशुभ्र कापडात चपात्या गुंडाळून डबा दिला.
गरम गरम जेऊन दोघांनाही छान तरतरी आली. अंकिता रिक्षाने घरी गेली. तिचे बाबा त्यांच्या सोबत थांबले. जरा वेळाने डॉक्टर म्हणाले. आता सगळ्यांनी थांबायची गरज नाही. कुणीतरी एकजण थांबा.
अंकिताचे बाबा म्हणाले साहेब मी तुम्हाला घरी सोडतो. तुम्ही दोघे घरी जाऊन आराम करा. मी थांबतो स्वराज बाबा जवळ. नाही दिनेश तू मॅडम ला घरी सोड आणि तू घरी जा. मी थांबतो हॉस्पिटलला.
अंकिता चे बाबा पुन्हा थबकले, म्हणाले साहेब मॅडम एकट्या कश्या थांबतील घरी. त्यांच्या जवळ कुणीतरी थांबायला पाहिजे. तुम्ही जा गाडी घेऊन मी थांबतो स्वराज बाबा जवळ.
कुणीच ऐकायला तयार नव्हते. शेवटी अंकिताचे बाबा म्हणाले. मॅडम आपण माझ्या घरी जाऊ, अंकिताला तुमच्या सोबत राहायला घेऊन जाऊ. म्हणजे तिकडे मी आणि इकडे साहेब निश्चिंत असतील.
अरे हो दिनेश, तू उत्तम मार्ग सुचवला. तश्या ही त्या एकट्या कधीच राहिल्या नाही. घाबरतात.
तसाच घरी फोन लावला. अंकिताला सांगितले तुला स्वराज बाबाच्या आईला सोबतीला त्यांच्या घरी जायचे आहे. लवकर जेवून तयार हो.
सुरवातीला ती गोंधळली, इतक्या मोठ्या लोकांकडे आपण कसे राहणार. जातांना ती आपले अंथरूण पांघरूण घरून घेऊन गेली.
दोघी घरी पोहचल्या watchmen ने गेट उघडले.
स्वराजच्या आई खूप थकल्या होत्या. अंकिता त्यांना म्हणाली काकु तुम्ही फ्रेश व्हा !
किचन कुठे आहे ते सांगा. मी तुम्हाला दूध गरम करून देते. ते घेऊन मगच झोपा.
नको अंकिता खरच इच्छाच नाही ग. ते काही नाही , काकु थोडे दूध घ्यायचे म्हणजे घ्यायचे.
आमच्या S.K. ची देखभाल करायला तुम्ही तंदुरस्त असायला हव्या की नको?
त्या हसल्या, म्हणाल्या आण बाई एकदाचे !
घेते पिवून !
त्या शिवाय का तू गप्प बसणार ?
आज नाही का ?
जेवण आणले म्हणजे आणलेच !
ती सुध्दा हसली . त्यांना दूध प्यायला दिले.
तिची चुळबूळ सुरू झाली. आता झोपायचे कुठे आणि कसे ?
माझी कळकट मळकट चादर कशी काढू ?
कुठे टाकू. ?
तेवढ्यात स्वराजच्या आई म्हणाल्या, अग हे काय ?
तुला झोपायचे नाही का ?
हो काकु !
कुठे झोपायचे हाच विचार करत होते.
काकु मी तुमच्या बेडरूम शेजारी बाहेर झोपते.
काय?
वेडी बिडी झाली की काय ?
ते काही नाही , इतका मोठा बेड आहे, चार लोक झोपले तरी लहान पडणार नाही. तू इथे माझ्या बाजूला झोप.
काकु मी तुमच्या कॉटच्या बाजूला चादर घालून झोपते.
नाही ! नाही !
अंकिता मला एकटीला सवय नाही झोपायची. बाजूला कोणीतरी हवेच. ते काही नाही. तु माझ्या शेजारी झोप.
अंग चोरून अंकिता त्यांच्या शेजारी झोपली. त्या झोपेत सारख्या दचकत होत्या. स्वराज !!!!!
स्वराज!!!!
माझा स्वराज !!!!
असे म्हणत पुन्हा दचकायच्या.
अंकिता जवळ गेली. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांना थोपटत राहिली. त्या शांत झोपल्या .
अंकिता मात्र या कुटुंबाचे निरीक्षण करत जागीच होती. असेही लोक असतात, जी गरीबांना इतकी इज्जत देतात.
खरतर तिचे बाबा त्यांच्या कडे कामाला लागून दीड दोन महिनेच झाले होते. त्यांच्या आधीच्या ड्रायव्हरने नोकरी सोडायच्या आधी मालकाला शब्द दिला होता. साहेब तुम्हाला विश्वासातला ड्रायव्हर आणून देतो. मगच मी माझा बोरा बिस्तरा घेऊन गावी जातो. एक दिवस ते रघु काका सकाळी सकाळी आमच्या घरी आले. बाबांना सांगितले चार दिवसात तुला तिकडे ड्रायव्हर म्हणून काम सुरू करायचे आहे. इथल्या पेक्षा पगार चांगला आहे. शिवाय तुझ्या या मालकाला पाहिले मी. कशी मस्ती आहे ते. कधीच गरीबाला मान देत नाही. मित्रा तु इथे नोकरी केली तर आपण सुध्दा माणूस आहो हे नव्याने कळेल.
मी माझ्या साहेबा पेक्षा जराच मोठा आहे. मला आज पर्यंत रघु अशी हाक मारलेली आठवत नाही. रघु दादा म्हणतात.
चार वर्ष झाले, मालकीण बाई या रघुला राखी बांधते. राखीची ओवाळणी माझ्या कडुन फक्त काचेच्या बांगड्या घेते. पहिल्या वेळी त्यांनी मला सांगितले रघु उद्या रक्षाबंधन आहे. हो बाई साहेब , माहित आहे.
मग बहिण येते की नाही राखी बांधायला ?
नाही बाईसाहेब !
गावी असते !
पोस्टाने कधी पाठवते !
कधी नाही !
खूप गरीब आहे !
सोय लागली तर पाठवते.
मग मी देवाला राखी आणतो. त्यातली एक तिच्या नावाने बांधून घेतो.
बाईसाहेब मी तिला मनी ऑर्डर मात्र नक्की करतो. त्याने ती काचेच्या बांगड्या घेते. म्हणते रघु ह्या बांगड्यांची किणकिण मला माझ्या माहेरच्या अंगणात घेऊन जाते.
सासरी असले तरी ह्या हातभर बांगड्या मायेची ऊब देते.
तुला नाही कळणार रे रघु !
आजवर मी माझा नेम मोडला नाही आणि तिने बांगड्या घेण्याचा.
तेव्हा पासून माझ्या मालकीण बाई माझ्या कडुन काचेच्या बांगड्या ची ओवाळणी घेते. वर्षभर त्याच बांगड्या घालते. म्हणतात रघु तुला बहिण तरी आहे. पण मला भाऊ नाही. आम्ही दोघी बहिनीच.
अश्या ह्या माझ्या मालकीण बाई.
अंकिताला आता सगळे आठवायला लागले. बाबा पण नेहमी सांगतात त्यांच्या बद्दल.
नवीन मालक त्यांना दिनेश म्हणतात. कधी कधी दिनेश राव म्हणून हाक मारतात. कधी खांद्यावर हात ठेऊन आपले पणाची जाणिव करून देतात.
कधी जबरदस्ती ने अगदी त्यांच्या समोर डायनिंग टेबल वर जेवायला बसवतात. एवढेच नाही तर आग्रहाने वाढतात. त्यांची बायको पण तेवढीच प्रेमळ.
बाबा सांगत होते. एकदा मॅडम मंदिरात गेलेल्या . यायला उशीर झाला . स्वयंपाक करणाऱ्या बाई पण यायच्या होत्या . तर त्यांनी स्वतः चहा केला आणि बाबांना पण आग्रहाने प्यायला दिला इतका साधेपणा . बाबा म्हणतात अशीही माणसे असतात यावर विश्वास नव्हता. पण माझ्या साहेबांकडे बघून विश्वास पटला. कधी तरी
वाटते हा माणसाच्या रुपातला देवदूत असावा.
क्रमशः
पुढील भागात....
सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
📝माझी लेखणी