© धनश्री दाबके
खऱ्या प्रेमाला कसलंच बंधन नसतं. रंग, रुप, वय, प्रांत, देश, भाषा काहीच त्याच्या आड येत नाही. असंच अगदी खररssखुरं प्रेम करणारे आपले मन्या आणि सोफी.
सगळा ह्रदय टू हृदय मामला.
एकमेकांची भाषा येत नसली तरी हृदये जुळलेली. पण ही जुळलेली हृदय जेव्हा भाषेतून व्यक्त होऊ लागली तेव्हा मात्र बऱ्याच गमतीजमती व्हायला लागल्या.
मातृभाषेवर आणि फक्त मातृभाषेवरच प्रेम करणारा मन्या दिसायला हिरो असला तरी अभ्यासात मात्र जेमतेमच होता.
मातृभाषेवर आणि फक्त मातृभाषेवरच प्रेम करणारा मन्या दिसायला हिरो असला तरी अभ्यासात मात्र जेमतेमच होता.
कसाबसा मन्या चार बुकं शिकला आणि वडलांनी ओळखीने त्याला एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअर्समधे चिकटवला. वडलांच्या शब्दाचा प्रश्न असल्याने मन्याही मन लावून काम करायला लागला.
सुरवातीला जिथे कमी तिथे आम्ही म्हणत अंगावर पडेल ते काम मन्याने चोख पार पाडले.
कधी सेल्समन बन तर कधी आलेल्या मालाचा स्टॉक चेक कर, कधी विकलेल्या मालाचा हिशेब ठेव तर कधी इनव्हेंटरी सांभाळ. अशी अनेक प्रकारची कामं मन्याने शिकून घेतली. प्रामाणिकपणा आणि कष्ट दोन्हींचा कॉम्बो मन्याकडे असल्याने थोड्याच दिवसांत मन्या सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनला.
स्टोअर्सच्या मालकांचा तर एकदम खास आदमी झाला.
अशातच मालकांच्या इंग्लंडला राहाणाऱ्या खास मित्राच्या ओळखीतली सोफी तिच्या पोस्ट ग्रॅजुएशनचा कसलासा रिसर्च करण्यासाठी भारतात आली.
मित्राचेच घर असल्याने सोफीच्या राहाण्याची व्यवस्था मालकांच्या घरीच केली गेली आणि मालकांनी मन्याला तिच्या ड्यूटीवर लावले.
मन्या तिला एअरपोर्टवर आणायला गेला.
मन्या तिला एअरपोर्टवर आणायला गेला.
उंच, शिडशिडीत, गोऱ्या पान आणि बिंधास्त सोफीला बघून मन्याचा कलिजा खल्लास झाला. सोफीला एअरपोर्टवर रिसीव्ह करुन मन्याने मालकांच्या घरी सोडले.
ही आपल्या बस की बात नाही तेव्हा तिच्यापासून चार हात लांबच राहाण्याचा मनोमन निर्णय करुन मन्या घरी आला.
पण बहुतेक मन्याचे मन आणि नशीब दोन दोन्ही एकाच ट्रॅकवर धावत असावेत कारण काहीना काही कारणाने मन्या आणि सोफी एकमेकांच्या समोर येत राहिले आणि विशेष म्हणजे सोफीही मन्याच्या प्रेमात पडली.
पण बहुतेक मन्याचे मन आणि नशीब दोन दोन्ही एकाच ट्रॅकवर धावत असावेत कारण काहीना काही कारणाने मन्या आणि सोफी एकमेकांच्या समोर येत राहिले आणि विशेष म्हणजे सोफीही मन्याच्या प्रेमात पडली.
सोफीच्या संस्कृतीत तर सगळा फक्त हृदयाचाच ( स्वतःच्या) विचार करण्याची प्रथा असल्याने तिनेही फक्त हृदयाचाच कौल घेतला आणि मन्याला इंग्लिश व तिला मराठी येत नाही हा अडसर आपोआपच गळून पडला.
मन्याच्या तोडक्या मोडक्या इंग्लिशमधे संवाद घडू लागले आणि दोघं हळूहळू व्यक्त होऊ लागले.
कधी अभ्यास न आवडणाऱ्या मन्याच्या हातात आता चक्क डिक्शनरी दिसू लागली.
अशातच सोफीचा वाढदिवस आला.
अशातच सोफीचा वाढदिवस आला.
नवीन नवीन प्रेमात पडलेल्या मजनूसाठी लैलाचा वाढदिवस म्हणजे तर सणच. त्यामुळे वाढदिवसाची खबर लागताच मन्या तयारीला लागला.
सोफीच्या नाजूक बोटाला आणि स्वतःच्या खिशाला साजेशी अशी एखादी नाजूकशी डायमंड रिंग घालावी अशी अनिवार इच्छा त्याला झाली.
मन्याने जमलेल्या सेव्हिंग्जचा आढावा घेतला आणि त्यात बसेल अशी रिंगही पाहून ठेवली.
पण सरप्राईज वगैरेच्या भानगडीत न पडता मी तुला वाढदिवसाला डायमंड रिंग देणारे हे त्याने सोफीला सांगितले.
ते ऐकून सोफीला अगदी भरुन आले. हा कित्ती प्रेम करतो आपल्यावर..
त्या आनंदातच सोफी म्हणाली " Oh dear.. really ?"
" हो रिअलीच. happy?" मन्याने विचारले.
" You know darling.. nothing would please me more " सोफी म्हणाली.
" Your wish is my command dear " म्हणून मन्याने त्याच्या इंग्लिश मधल्या प्रगतीची चुणूकही दाखवली.
अतिशय आनंदात सोफी वाढदिवसाच्या तयारीला लागली.
" हो रिअलीच. happy?" मन्याने विचारले.
" You know darling.. nothing would please me more " सोफी म्हणाली.
" Your wish is my command dear " म्हणून मन्याने त्याच्या इंग्लिश मधल्या प्रगतीची चुणूकही दाखवली.
अतिशय आनंदात सोफी वाढदिवसाच्या तयारीला लागली.
मालकांनी सोफीला वाढदिवसाला एकटं वाटू नये म्हणून घरीच एक छोटीशी पार्टी ठेवली.
अर्थातच मन्याला आमंत्रण होतेच.
सोफीने मन्याच्या आवडीच्या स्काय ब्लू कलरचा लेसवाला पार्टी गाऊन घातला होता. नेहमी मोकळे असणारे तिचे केस छानपैकी फ्रेंच रोल मधे बांधले होते.
मन्याचे गिफ्ट आधीच माहित असल्याने सोफीने त्या रिंगला साजेसा असा डायमंडचा नेकलेस आणि इअर रींग्स घातल्या होत्या.
हलकासा मेकअप केलेली आणि खूप आनंदात असलेली सोफी फारच सुंदर दिसत होती.
मन्या अगदी दिलेल्या वेळेवर पार्टीला पोचला.
मग थोड्यावेळाने सोफीने केक कापला. जमलेल्या सगळ्यांनी तिला गिफ्ट्स दिली पण मन्याची काहीच हालचाल नाही.
मस्तपैकी जेवणही झाले. सोफीच्या आवडीचेच पदार्थ जेवणात होते. सगळं प्लॅनप्रमाणे पार पडत होते.
आपले ते मोस्ट प्रेशिअस गिफ्ट मन्या कधी देतोय ह्याची सोफी वाट बघत होती.
कदाचित सगळ्यांसमोर नसेल द्यायची रिंग म्हणून तो थांबला असेल असंही तिला वाटलं.
पण पार्टी संपून लोकं घरी जायला निघाले तसा मन्याही निघाला.
तेव्हा न राहावून सोफीनेच विचारले
" Aren't you forgetting something dear? I cant wait to see my gift."
गिफ्टबद्दल विचारल्यावर मन्या सटपटला.
गिफ्टबद्दल विचारल्यावर मन्या सटपटला.
अरे.. तेव्हा तर ही नथिंग म्हणाली म्हणून काहीच गिफ्ट नाही आणलं आणि आता गिफ्ट दे म्हणतेय.
आता काय करु? गोंधळलेल्या अवस्थेत मन्या म्हणाला " sorry. No gift. तू म्हणालीस ना nothing would please me more. so i got nothing"
मन्याने काढलेल्या nothing would please me more चा हा अनपेक्षित अर्थ ऐकून शेक्सपियरच्या देशातल्या सोफीला काय करावं ते कळेना.
मन्याने काढलेल्या nothing would please me more चा हा अनपेक्षित अर्थ ऐकून शेक्सपियरच्या देशातल्या सोफीला काय करावं ते कळेना.
मी काही नको असं खरोखरीच जरी म्हंटले असतं तरीही ह्याने खरेच असं रिकाम्या हाताने यावे हे तिच्या पचनीच पडत नव्हतं.
मन्याला मात्र अजूनही नक्की काय झालं ह्याचा अंदाज येत नव्हता.
मन्याला मात्र अजूनही नक्की काय झालं ह्याचा अंदाज येत नव्हता.
त्या दिवशी सोफी मला काहीच नको म्हणाली तेव्हा त्याला ती अगदी त्याच्या आईसारखीच वाटली होती.
आई जसं बाबांना मला नको काही गिफ्ट बिफ्ट म्हणते तसंच काहीसं सोफीचं असावं असा त्याने समज करुन घेतला.
आणि आपली निवड कशी योग्य आहे ह्याबद्दल त्याला स्वतःचा अभिमानही वाटला होता.
पण आता तर ही गिफ्ट दे म्हणतेय. शेवटी ह्या बायका सगळ्या सारख्याच. मनात एक आणि बोलतात एक.
अखेर शरणागती पत्करुन सॉरी सॉरी उद्या आपण दोघं जाऊन रिंग घेऊ म्हणत मन्या घरी गेला आणि मन्याने केलेल्या इंग्रजीच्या अनपेक्षित चिरफाडीवर हसत सोफी झोपायला गेली
अखेर शरणागती पत्करुन सॉरी सॉरी उद्या आपण दोघं जाऊन रिंग घेऊ म्हणत मन्या घरी गेला आणि मन्याने केलेल्या इंग्रजीच्या अनपेक्षित चिरफाडीवर हसत सोफी झोपायला गेली
©️ धनश्री दाबके
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
फोटो गुगल वरुन साभार ...