© उज्वला सबनवीस
५-२० ची लोकल धाडधाड गेली , ध्रुपदाने भरकन उठु़न चुलीवर चहाचं आधण ठेवलं, काराभा-याला अन लेकरांना उठवायला पाहिजे . तिच्या आवाजाने
कारभारी उठला, न बोलता कालचा शिळा पाव चहात बचकन बुडवून आवाज करत खात संपवला .अन आपली भंगारची हातगाडी उचलुन निघुन गेला .हा असाच ,घराशी काहीच संबंधं नाही ,असं वागायचा .ध्रुपदाने एक निश्वास सोडला ,आपल्या कामाकडे वळली.
"सावळ्या,ए सावळ्या उठ रे लेकरा ,सोबती येतील बघ तुझे ." तिने सावळ्याला ,आपल्या मोठ्या मुलाला आवाज दिला.
सावळ्याने कुस बदलली, अन पुन्हा झोपला .त्याचं रोजचं सुंदर स्वप्न ऐन भरात आलं होतं, ते त्याला पुर्ण पाह्यचं होतं. तो स्वप्नात पुन्हा रमला . सुरेख युनिफाँर्म ,चकाचक बुट, लाल रंगाचं दप्तर घेउन तो ऐटीत शाळेत चालला होता.
त्याची शाळा जवळ जवळ येत होती , आता तो शाळेच्या फाटकातुन आत जाणार ,तेवढ्यात,
"सावळ्या चल रे लवकर आम्ही आलो पन ,ऊठला का न्हाय अजुन ,ते,शेठनं कालचं कच-यात सापडलेलं भंगार घेउन बोलवलय ." सुभान्याचा कर्कश्श आवाज आला तसं सावळ्याचं , सुरेख स्वप्न भंगलं. तो झटकन उठला, खसंखसं तोंड धुतलं कळकट चहा पीला . आपलं पोतं खांद्यावर घेतलं आणि संवगड्यात मिसळला .हेच त्याचं प्राक्तन होतं अन रोजचा दिनक्रम होता.
मित्रांचा चिवचिवाट सुरु होता. समोरुन लाल रंगाची शाळेची बस येत होती ,सावळ्या मोहरला,अनिमिष नजरेने बस कडे पाह्यला लागला.
" हे बग येडं ,बगत बसलाय बस कडे, अरं गड्या आपल्यासाठी नाय रे ती बस, हे पोतं अन दोन पाय हेच आपलं . अन किती दिस झुरशील रं साळत जान्यासाठी , आठरा एकोणीस वर्साचा घोडा झाला तू आता विसर रं ते सपान".सुभान्या कळवळुन बोलला.
सावळ्या मात्र भान हरपुन बस कडे बघतच होता. त्याला खुप शिकायचं होतं. पण माय न सांगुन टाकलं आपल्याला हे जमनार नाय. चौथी पत्तुर शिकला लिवा वाचायला येतय न्हवं बस तर मंग .आता तू आपलं पोतं उचलायचं अन गप गुमान कचरा येचायचा.
सावळ्याला हे मान्य नव्हतं ,त्याला शाळा शिकायचीच होती. तो मित्रांपेक्षा शुद्ध बोलायचा .त्याला आपल्या या फुटक्या नशीबाचा फार राग यायचा . अन त्या शाळेत जाणा-या,मुलांचा, छान छान कपडे घालुन आँफिस मधे जाणा-या लोकांचा पण फार राग यायचा, प्रचंड असुया वाटायची. तो माय जवळ खुप कुरकुर करायचा. या असल्या आपल्या फुटक्या नशिबाची. माय त्याची हर प्रकाराने समजुत काढायची.
"अरं असं कुनावर जळुन आपलं नशिब बदलणार हाय कारं बाबा. काढ बरं, तू डोस्क्यातुन ती साळा ,अन ती बस, ती शिरमंत मान्सं."माय आपला खरबरीत हात त्याच्या तोंडावर फिरवत म्हणायची..आताही त्याचं तेच धुमसणं सुरु होतं .ध्रुपदाने कसंबसं त्याला समजावलं. जा बरं बाळ्याला बग जरा , असं म्हणत त्याला बाहेर ढकललं.
सावळ्या उठला अन आपल्या लहान भावंडात रमला. ध्रुपदा पाणावल्या डोळ्याने त्याच्या कडे बघत राहिली. मनाने लय चांगला हाय माजा सावळ्या. पन हे साळचं खुय काय जात न्हाय बापा याच्या डोस्क्यातुन. भावंडांवर,मित्रांवर माया करतो. पन ते चकाचक लोक पायले की काय होते त्याले त का मालुम बापा .कसं व्हायचं या पोराचं. ध्रुपदाला माया दाटुन आली सावळ्या बद्दल. तिने निश्वास सोडला अन कामाला लागली.
"आज टेशनवर जाउ ,काय सावळ्या का म्हंतो ,लय दिस झाले गेलो नाय अपुन .जादा कचरा भेटते ,मजा बी करु.ते बाकीचे यार बी भेटतीन".सुभान्या खुशीत बोलला.
स्टेशन माणसांनी फुललं होतं. गर्दीत काही जास्त प्लॅस्टिक भेटेना. तसे ते सगळे बाहेर पडले , अन ट्रॅकच्या बाजुने चालायला लागले. लोकल येत होत्या, सावळ्याला थोड्याफार बाॅटल, अन काय काय मिळालं. दुस-या वस्तीतले मुलं पण होते आज. दंगामस्ती सुरू होती. धाडधाड एक लोकल आली. एकाने दगड उचलला अन मारला लोकल वर . सगळे जोरजोरात हसायला लागले. मस्ती आता पुर्ण त्यांच्या अंगात भिनली होती. सुभान्या,ह-या आता सगळेच येणा-या लोकलवर दगडं मारत होते , अन लपत होते. त्यांचा हा जिवघेणा खेळ रंगात आला.
आधी सावळ्या चुप होता .तेवढ्यात आणखीन एक लोकल आली , दारात चकाचक कपडे घातलेली लोक उभे होते. सावळ्या अस्वस्थ झाला.
पण सावळ्या कोणाचच ऐकत नव्हता . ना माय बाचं ना सोबत्यांचं. सगळ्यांनीच त्याच्यापुढे हात टेकले. आता सावळ्याला एकच ध्यास होता , त्या गावाला जाण्या साठी पैसे गोळा करणे , अन रात्री त्या करुण,घायाळ डोळ्यात डुंबत जाणे.
सावळ्या त्या पत्त्या प्रमाणे तिच्या घरा समोर उभा होता .ते एक छोटसं पण टुमदार घर होतं .त्याने त्यातल्या त्यात बरे कपडे घातले होते , पण तरीही त्या घरासमोर ते विसंगतच दिसत होते. तो हिंमत करुन फाटकातुन आत गेला .एक थोडे प्रोढ व्यक्ति बाहेर आले ,तिचे वडिल असावे.
"मला शुभ्राला भेटायचं आहे". सावळ्याने शक्य तितकं शुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी भकास नजरेने सावळ्या कडे बघितलं. ते काहीच बोलले नाही.
तो परत परत त्यांच्याकडे जात राहिला. गयावया करत राहिला. एक दिवस शेवटी ते मानले, अन सावळ्या तिच्या पलंगासमोर उभा राह्यला. डोळ्यातल्या पाण्याने ती त्याला दिसत नव्हती, त्याने आपल्या.कळकट शर्टाच्या बाहीने डोळे पुसले, अन तिच्या कडे एकटक बघत राह्यला. ते टप्पोरे,घायाळ,काळे डोळे बंदं होते. तो हळुवार तिथे बसला.
"शुभ्रा ,तू मले वळखत नाही, अन मी तुले .तू शेवटचं ज्याले पाह्यलं तो मी हाय . मले तुझी मना पासुन माफी मागाची हाय .मी तो दगड का मारला मले ठाव नाही पन आता माह्या जीवाची तगमग होउन राह्यली , हे मात्र मले ठाव हाय . मले एक डाव माफी कर . यापुढे सावळ्याला बोलवेना. आई,बाबा पण गहिवरले. आई रागाने काही बोलणार तोच बाबांनी डोळ्यानीच त्यांना समजावले.
"बाळ आमचं दुःखं तर आभाळा एवढं आहे ,पण तुही तितकाच होरपळतोय हे ही मला कळतय. ती तुला क्षमा करायच्या अवस्थेत येईल की नाही मला माहित नाही, आम्हीही मना पासुन तुला माफ करु शकु का , मला माहित नाही, तुझा आता अश्वत्थामा झालाय .

ते स्वप्न,ती हतबलता ,नशीब सगळं त्याच्या अंगावर धावुन आलं. त्याने तिरमिरीत मोठा दगड उचलला , अन येणा-या डब्यावर जीव खाउन फेकला .
दारात एक मुलगी उभी होती , स्टेशन जवळ येत चाललं होतं. दगड तिच्या डोक्यात जोरात बसला . तिने एकदम घायाळ नजरेने, व्याकुळ होत बाहेर पाह्यलं .तिच्या नजरेत करुण भाव उमटले, माझी काय चुक आहे.? तिचे टपोरे डोळे रोखून ती आपल्या कडे बघतेय, असं सावळ्याला वाटत असतांनाच , ती धाडकन खाली पडली.
एकच कल्ला हल्ला झाला .आता मात्र सावळ्या घाबरला, कावराबावरा झाला. त्याला हे अपेक्षित नव्हतं.
सवंगड्यांनी पोबारा केला .सुभान्या जोरजोरात सावळ्याला ओढत होता ,पण सावळ्या जमीनीला खिळुन उभा होता. त्याला काहीच सुचत नव्हतं. ते करुण डोळे ,..त्याची घालमेल होत होती .
आता तिथे गर्दी जमली, हा पण गर्दीत घुसला, संमिश्र आवाज येत होते , बेशुद्ध झालीय पोरगी , दवाखान्यात न्यायला पाहिजे, बघा समोरच आहे दवाखाना.
दोन चार लोकांनी उचललं .कोणीतरी अँबुलन्स बोलावली..त्यात त्या मुलीला टाकलं, अँबुलन्स भरधाव निघाली ,तसा सावळ्याही तिच्या मागे धावायला लागला.
आपल्या हातुन खुप मोठा अपराध घडला. त्याला काही सुचत नव्हते. जीवाची नुसती काहिली होत होती. तो जीव खाउन धावत होता . दवाखान्यात तिला आत नेले.
सावळ्या आपल्या कळकट शर्टाच्या बाहीला डोळे ,नाक पुसत तिथेच उभा राह्यला. त्याला आत कोणी जाउ देइना. त्याची अस्वस्थतता वाढली. थोड्या वेळाने कोणीतरी बोललं ,तिच्या डोक्याला जबरदस्त मार बसलाय, ती बेशुद्ध आहे, केंव्हा शुद्धीवर येईल काय माहित बिचारी.

सावळ्या एकदम कोलमडला. हे असं काही घडेल असं त्याला वाटलच नाही. त्याला काही सुचेना ,पाय ओढत तो घराकडे निघाला.
ध्रुपदा वाटच बघत होती . सोबत्यांनी सगळी कहाणी सांगितलीच होती. तिने गुमान त्याला जेवायला वाढलं . पण आज सावळ्याला जेवणही जात नव्हतं . ते करुण टप्पोरे डोळे त्याचा पिच्छा सोडत नव्हते .हे आपल्या हातुन काय घडलं. त्याची तगमग वाढली . कसाबसा तो अंथरुणावर पडला. आज त्याला ते सुंदर स्वप्न पण दिसत नव्हतं. फक्त तिचे घायाळ डोळे दिसत होते.
सकाळी तो लवकरच उठला ,कसातरी थोडा कचरा गोळा केला, पण लक्ष लागत नव्हतं . तिचे डोळे आपला पाठलाग करतायत असच वाटत राह्यलं .

त्याला सुचेना . तो पुन्हा दवाखान्यात गेला .तिथे नुसती गर्दी. हा वेड्या सारखा तिला शोधत होता . स्टाफ त्याला हाडहुड करत होते, पण त्याने चिकाटी सोडली नाही .
शेवटी एका खोलीत त्याला ती दिसली. नाका तोंडात नळ्या घातलेली. त्याला गुदमरल्या सारखं झालं. एक जोरात हुंदका त्याने दिला. तिथे असलेल्यांनी चमकुन मागे बघितलं .तसा तो घायाळ मनाने अन जड पावलाने निघाला. तिथुन दोन मुली पण बाहेर पडल्या.
"किती लागलय शुभ्राला, काल व्हँलेंटाईन डे होता न ग, ती सागरसाठी गुलाबाचं फुल घेउन चालली होती ग .तो पण देणारच होता हिला. पण सगळच अर्धवट राह्यलं. आईबाबा येतायत तिचे आज."त्या तिच्या मैत्रिणी आपसात बोलत होत्या.
सावळ्याच्या कानावर सगळं आलं. त्याची घालमेल वाढली. शुभ्रा,,किती सुंदर नाव आहे तिचं, आनंदात होती ,गुलाबाला पण मुकली . हे सगळं माझ्यामुळे झालं .त्याची तगमग वाढली.

ती शुद्धीवर आली, की मी माफी मागेन मगच माझी काहिली थांबेल. त्याने शर्टाच्या बाहीने डोळे पुसले .नळावर पाणी पिला , पण त्याची तगमग थांबत नव्हती.
आता त्याला एकच उद्योग होता ,भरकन कचरा गोळा करायचा अन दवाखाना गाठायचा ,लांबुन तिच्या कडे एकटक बघत राह्यचं, तिची क्षमा मागण्यासाठी . ती कधी शुद्धीवर येते याची वाट पाह्यची.

आता तिथल्या नर्सना तो ओळखीचा झाला होता. सुरवातीला त्या येउ देत नव्हत्या पण हा काही उपद्रवी नाही हे कळल्यावर , त्या काही बोलायच्या नाही. एक नर्स मात्र थोडी रागाने याच्या कडे बघायची. तिच शुभ्राची जास्त काळजी घ्यायची.
त्या दिवशी तो नेहमी प्रमाणे दवाखान्यात गेला ,तिच्या खोलीच्या बाहेर उभा राह्यला . पण आत कोणी दुसरच होतं.

त्याच्या पाया खालची जमीनच सरकली. तो वेड्या सारखा धावत सुटला ,ती कुठे गेली, कोणी सांगायला तयार नाही. ती नेहमीची नर्स दिसेना. तो घाबरा घुबरा झाला.काय झालं असेल तिचं, या विचाराने त्याचा धीर सुटला. शर्टाला डोळे पुसत तो वेड्या सारखा फिरायला लागला.
शेवटी ती नर्स दिसली.तो अडखळत बोलला "१२ नंबर खोलीतली पेशंट कुठे गेली"?ती काय सांगेल या विचारानेच त्याचा थरकाप होत होता .त्याने आधाराला दार धरुन ठेवले.
"घेउन गेले तिचे आई वडिल तिला .कोमात गेली ,.कधीच शुद्धीवर येणार नाही आता ती . कायम अंथरुणावर, पण तू का रे एवढी चौकशी करतो, चल जा,मला कामं आहेत".ती भराभर चालत निघुन गेली.

आपलं रडु आवरत सावळ्या तिथेच खाली बसला .माझ्या माफीचं काय, आता मी तिला कसं भेटु, त्याला तडफडल्या सारखं होत होतं. ती त्याच्या मनात काट्या सारखी रुतुन बसली होती.
भेलकांडत तो दवाखान्याच्या बाहेर आला आता त्याच्या नाकातुन डोळ्यातुन अविरत पाणी येत होतं .आतुन पिळवटुन येत होतं . तगमग वाढली होती.

आता ती कधीच शुद्वीवर येणार नाही ,मला पुन्हा कधीच दिसणार नाही, माफीही मागता येणार नाही. या कल्पनेने तो घाबराघुबरा झाला .म्या माफी मांगनारच व्हतो. मले नाय मांगता आली माफी .असा मनाशी बडबडतच पायरी वरच फतकल मारुन बसला अन ओक्सा बोक्शी रडायला लागला .सगळं गमावुन बसल्या सारखा .
भेलकांडल्या सारखा तो घरी आला.ध्रुपदा, त्याचे मित्र त्याला परोपरीने समजावत होते .झालं ते वाईट झालं,विसर आता ते काय करु शकतो. त्याचं एकच म्हणणं होतं,मला तिची माफी मागायची आहे.
"अरं पन ते कसं होइन रं आता ,ती बेसुद हाय नव्ह,अन गावकडं पन गेली .कुटं सोधाचं रं आपुन तिला,माह्या लेकरा,विसर रं आता ,ते सारं .मानसात ये पोरा".ध्रुपदा कळवळुन बोलली .पण सावळ्या त्या घायाळ डोळ्यात खोल डुबत चालला होता.
तो दुस-या दिवशी पुन्हा दवाखान्यात गेला ,त्या नर्सला शोधलं, मला पत्ता द्या म्हणाला तिचा, तिने धुडकावुन लावलं,पण हा फारच गयावया करायला लागला ,मला भेटायचच हाय तिला , तिची माफी मागाची हाय .एवढच बोलत राहिला. नर्स दाद देत नव्हती, हा जायचं थांबवत नव्हता..तिच्या ओळखीतलीच होती ती .
"तिला दगड मारणारा तुच आहेस हे ओळखलय मी,अन तुला पश्चात्ताप झालाय हे ही मला कळलय". असं रडत,रडत म्हणत पत्त्याचा कागद याच्या हातात कोंबत ती निघुन गेली. अन विश्व हातात आल्या सारखा सावळ्या हरखला. त्याच्या तप्त मनावर शिडकावा झाला.
"कुट हाय बाबा हे गाव, तू कसा जानार रं तिथं , अन पैका हाय का आपल्या जवळ" ध्रुपदा काळजीत बोलली.
"बराबर हाय मायचं म्हननं, लेकरा सोड रं हा हेका". कधी नव्हे तो कारभारी बोलला तसा ध्रपदाला आधार वाटला.
भेलकांडल्या सारखा तो घरी आला.ध्रुपदा, त्याचे मित्र त्याला परोपरीने समजावत होते .झालं ते वाईट झालं,विसर आता ते काय करु शकतो. त्याचं एकच म्हणणं होतं,मला तिची माफी मागायची आहे.
"अरं पन ते कसं होइन रं आता ,ती बेसुद हाय नव्ह,अन गावकडं पन गेली .कुटं सोधाचं रं आपुन तिला,माह्या लेकरा,विसर रं आता ,ते सारं .मानसात ये पोरा".ध्रुपदा कळवळुन बोलली .पण सावळ्या त्या घायाळ डोळ्यात खोल डुबत चालला होता.
तो दुस-या दिवशी पुन्हा दवाखान्यात गेला ,त्या नर्सला शोधलं, मला पत्ता द्या म्हणाला तिचा, तिने धुडकावुन लावलं,पण हा फारच गयावया करायला लागला ,मला भेटायचच हाय तिला , तिची माफी मागाची हाय .एवढच बोलत राहिला. नर्स दाद देत नव्हती, हा जायचं थांबवत नव्हता..तिच्या ओळखीतलीच होती ती .
"तिला दगड मारणारा तुच आहेस हे ओळखलय मी,अन तुला पश्चात्ताप झालाय हे ही मला कळलय". असं रडत,रडत म्हणत पत्त्याचा कागद याच्या हातात कोंबत ती निघुन गेली. अन विश्व हातात आल्या सारखा सावळ्या हरखला. त्याच्या तप्त मनावर शिडकावा झाला.
"कुट हाय बाबा हे गाव, तू कसा जानार रं तिथं , अन पैका हाय का आपल्या जवळ" ध्रुपदा काळजीत बोलली.
"बराबर हाय मायचं म्हननं, लेकरा सोड रं हा हेका". कधी नव्हे तो कारभारी बोलला तसा ध्रपदाला आधार वाटला.
पण सावळ्या कोणाचच ऐकत नव्हता . ना माय बाचं ना सोबत्यांचं. सगळ्यांनीच त्याच्यापुढे हात टेकले. आता सावळ्याला एकच ध्यास होता , त्या गावाला जाण्या साठी पैसे गोळा करणे , अन रात्री त्या करुण,घायाळ डोळ्यात डुंबत जाणे.
सावळ्या त्या पत्त्या प्रमाणे तिच्या घरा समोर उभा होता .ते एक छोटसं पण टुमदार घर होतं .त्याने त्यातल्या त्यात बरे कपडे घातले होते , पण तरीही त्या घरासमोर ते विसंगतच दिसत होते. तो हिंमत करुन फाटकातुन आत गेला .एक थोडे प्रोढ व्यक्ति बाहेर आले ,तिचे वडिल असावे.
"मला शुभ्राला भेटायचं आहे". सावळ्याने शक्य तितकं शुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी भकास नजरेने सावळ्या कडे बघितलं. ते काहीच बोलले नाही.
सावळ्याने हिंमत करुन आपल्या येण्याचं खरं कारण सांगितलं ,मला कसही करुन तिची माफी मागायची आहे, असं तो कळवळुन म्हणत राहिला ,ते निर्विकारपणे ऐकत होते. कोणत्याही क्षणी ते रडायला लागतील असं त्याला वाटलं, अन तो अजुनच अपराधीपणाच्या छायेत गेला.
"तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची?". तिची आई आतुन येत तावातावाने म्हणाली, त्यांनी सगळं ऐकलं होतं. चल चालता हो, त्या एकदम अंगावर धावुन आल्या. वडिलांनी कसंतरी सावरलं, अन खांदे पाडुन ते दोघं आत गेले अन दरवाजा बंदं झाला.
सावळ्या निराश मनाने बाहेर आला. त्याला असं रिकामं घरी परत जायचं नव्हतं. तिला एकदा तरी बघायचच होतं.
"तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची?". तिची आई आतुन येत तावातावाने म्हणाली, त्यांनी सगळं ऐकलं होतं. चल चालता हो, त्या एकदम अंगावर धावुन आल्या. वडिलांनी कसंतरी सावरलं, अन खांदे पाडुन ते दोघं आत गेले अन दरवाजा बंदं झाला.
सावळ्या निराश मनाने बाहेर आला. त्याला असं रिकामं घरी परत जायचं नव्हतं. तिला एकदा तरी बघायचच होतं.
तो परत परत त्यांच्याकडे जात राहिला. गयावया करत राहिला. एक दिवस शेवटी ते मानले, अन सावळ्या तिच्या पलंगासमोर उभा राह्यला. डोळ्यातल्या पाण्याने ती त्याला दिसत नव्हती, त्याने आपल्या.कळकट शर्टाच्या बाहीने डोळे पुसले, अन तिच्या कडे एकटक बघत राह्यला. ते टप्पोरे,घायाळ,काळे डोळे बंदं होते. तो हळुवार तिथे बसला.
"शुभ्रा ,तू मले वळखत नाही, अन मी तुले .तू शेवटचं ज्याले पाह्यलं तो मी हाय . मले तुझी मना पासुन माफी मागाची हाय .मी तो दगड का मारला मले ठाव नाही पन आता माह्या जीवाची तगमग होउन राह्यली , हे मात्र मले ठाव हाय . मले एक डाव माफी कर . यापुढे सावळ्याला बोलवेना. आई,बाबा पण गहिवरले. आई रागाने काही बोलणार तोच बाबांनी डोळ्यानीच त्यांना समजावले.
"बाळ आमचं दुःखं तर आभाळा एवढं आहे ,पण तुही तितकाच होरपळतोय हे ही मला कळतय. ती तुला क्षमा करायच्या अवस्थेत येईल की नाही मला माहित नाही, आम्हीही मना पासुन तुला माफ करु शकु का , मला माहित नाही, तुझा आता अश्वत्थामा झालाय .
तो कधीचा ,आपली भळभळती जखम सांभाळतोय. कितीही तेल टाका ती भरुन येत नाही, तो फिरतच राहतो, आपली जखम सांभाळत .तुलाही आता ही तुझ्या मनाला झालेली जखम आणि अपराधीपणाचा सल घेउनच जगावं लागेल , त्याला काही इलाज नाही .देव तुला ताकद देवो .मी एवढच करु शकतो तुझ्या साठी".बाबा सावळ्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले.
सावळ्याच्या काना पर्यंत काही पोचलं, काही त्याला समजलं नाही. अश्वत्थामा वगैरे काहीही त्याला माहित नव्हतं. त्याला ते माहित करुन घ्यायचं पण नव्हतं .
तो एकटक तिच्या कडे बघत राह्यला ,त्याने खिशातुन थोडं सुकलेलं गुलाबाचं फुल काढलं , अन तिच्या हातावर हात ठेवुन तो हमसुन हमसुन रडायला लागला.

सदर कथा लेखिका उज्वला सबनवीस यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
Tags
socialmarathi
मनाला भावणारी कथा....👍👍🙏🙏
उत्तर द्याहटवाThanks a lot
हटवा