© वर्षा पाचारणे
"मनीषा, अगं किती वेळा सांगितलं तुला... रस्त्यातून येताना जाताना असं त्या लिंबू मिरची वरून ओलांडून यायचे नाही म्हणून.... प्रत्येक गोष्ट दहादा सांगावी लागेल का तुला? दहावीच्या इयत्तेत शिकणाऱ्या मनीषाला आई रोज शाळेतून येता जाता असं समजवायची... परंतु मग आईला चिडवण्यासाठी म्हणून मनीषा मुद्दामच आईचं लक्ष जाईल असं लिंबू मिरचीला पायाने किक मारत किंवा अगदी मनातल्या मनात ठरवून ओलांडून जायची...
पण अशातही तिने आपले प्रश्न विचारणे काही सोडले नाही.. "आई समजा तू माझी दृष्ट काढली नाही, तर भूत येऊन माझ्या मानेवर बसेल का गं?"... "आई, ती बाई काय म्हणाली, मला बाहेरची बाधा होईल.. म्हणजे अचानक रात्रीचे माझे काय केस वगैरे उभे राहतील की काय?".. असे म्हणत घाबरल्याचे नाटक करत ती जोरजोरात हसू लागली...
आज जेवण आटोपून रात्री आई बाबा आणि मनीषा झोपले. मनीषा तिच्या खोलीत जाऊन झोपल्यानंतर थोड्याच वेळात आईला दारावरती धाडधाड आवाज येऊ लागला.. मनीषा आतून हमसून हमसून रडत आहे, असं तिला वाटू लागलं.
"आई, रोज तेच तेच सांगण्यापेक्षा त्या प्रश्नाचे उत्तर दे ना, कि जर हे लिंबू-मिरची ओलांडलं तर नक्की होतं काय?"...
तिच्या बोलण्यावर आई संताप व्यक्त करणार, इतक्यात मागून ती लिंबू मिरची विकणारी महिला आली आणि म्हणाली ,"पोरी असले प्रश्न इचारू नये.. त्याला वलांडून जाऊ नको... लय वंगाळ असतं ते"... एखाद्या दिवशी बाधा झाली म्हणजे कळंल"... तिच्या अशा बोलण्याने आई मात्र कासावीस झाली. आईने मनिषाच्या हाताला धरून पटापट घरचा रस्ता धरला.
दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेतून येताना तीच बाई त्याच ठिकाणी लिंबू मिरची घेऊन उभी होती.. मनीषा आणि तिच्या आईला लांबूनच येताना पाहून तिने काल पाहिलेला त्यांच्या चेहरा बरोबर ओळखला.
दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेतून येताना तीच बाई त्याच ठिकाणी लिंबू मिरची घेऊन उभी होती.. मनीषा आणि तिच्या आईला लांबूनच येताना पाहून तिने काल पाहिलेला त्यांच्या चेहरा बरोबर ओळखला.
मनीषाच्या आईच्या चेहऱ्यावर अस्वस्थता अगदी साफ दिसून येत होती. त्या दोघी तिच्या जवळून जात असताना त्या बाईने मात्र अगदी ओळख असल्याप्रमाणे आवाज दिला... "ताई, म्या रोज बघते... तुम्ही तुमच्या लेकराला लई जपता... पण ही आज कालची पोरं या बाहेरच्या बाधा, भूता खेताला ना मानणारी... पर आज तुम्ही दुर्लक्ष करू नका... आज अमावस्या हाय. लेकरावर लिंबू-मिरची ववाळून टाका... म्हणजे काय जी बाधा झाली असंल, ती तिथल्या तिथं निपटून जाईल"... पण तिचं हे बोलणं ऐकून आज आईने मनीषाचा हात धरून पुढे जाण्यापेक्षा मनीषाने आईला पटापट पुढे ओढत नेलं...
"काय करावं या मुलीचं?"... 'त्या बाईच्या बोलण्याने मनात विचारांची कालवाकालव वाढत चालली आहे'... 'हजारदा सांगितले या मुलीला, किमान विश्वास नसेल तर विचित्र वागू तरी नकोस, परंतु नाही'... 'ही मुलं म्हणजे शिकलेली... जुने विचार थोडीच पटतात त्यांना'.. म्हणत आईची मनातल्या मनात स्वत:शीच बडबड सुरू होती..

अशातच संध्याकाळी मनीषाला थोडा ताप आला. आईने तिची दृष्ट काढली. खरतर दुष्ट काढण्याला सुद्धा मनीषाने विरोधच केला होता, परंतु तापामुळे अंगात कणकण आल्यामुळे आई बरोबर वाद घालण्यापेक्षा तिने शांत बसणे पसंत केले.
पण अशातही तिने आपले प्रश्न विचारणे काही सोडले नाही.. "आई समजा तू माझी दृष्ट काढली नाही, तर भूत येऊन माझ्या मानेवर बसेल का गं?"... "आई, ती बाई काय म्हणाली, मला बाहेरची बाधा होईल.. म्हणजे अचानक रात्रीचे माझे काय केस वगैरे उभे राहतील की काय?".. असे म्हणत घाबरल्याचे नाटक करत ती जोरजोरात हसू लागली...
याला कारणंही तसंच होतं... कारण आई दारात आलेल्या कुठल्याही भोंदू बाबावर लगेच विश्वास ठेवायची. मग दर अमावस्या-पौर्णिमेला गाडीला लिंबू मिरची बांधण असो किंवा घरावरून एखादं लिंबू फेकून द्यायचं कधी घराच्या कोपऱ्यात अंगारा फुंकणं असो, किंवा मग कोणाची नजर लागू नये म्हणून काळी बाहुली लटकवणं असो... भुताखेतांच्या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवणारी आई अतिशय हळवी आणि घाबरट होती..
तिच्या अश्या वागण्यामुळे कधीकधी मनिषा तिला गमतीने आई ऐवजी 'ओ भोंदूबाई', म्हणूनही आवाज द्यायची... एक दिवस तर एका साधूने असाच अंदाज लावत तिला सांगितलं ,"बाई तुला एकच लेकरू आहे, पण त्याला बाहेरची बाधा होणार"... "त्याचा आत्ताच काही उपाय करायचा असेल, तर मला १०१ रुपये, लिंबू मिरच्या आणि हळद कुंकू दे, मी ताबडतोब बंदोबस्त करतो"..
असं म्हणताच आईनेही लगेच घाबरून त्याला सगळ सामान देत ,"बाबा, माझ्या लेकराच्या मागची ईडा पिडा जाऊदे", असं म्हणत नमस्कार केला. ते पाहून मात्र मनीषाने डोक्यावर हात मारला... दहावीत शिकणारी पोर पण कदाचित आईपेक्षा माणसं ओळखणं जास्त जमायचं तिला.
आज जेवण आटोपून रात्री आई बाबा आणि मनीषा झोपले. मनीषा तिच्या खोलीत जाऊन झोपल्यानंतर थोड्याच वेळात आईला दारावरती धाडधाड आवाज येऊ लागला.. मनीषा आतून हमसून हमसून रडत आहे, असं तिला वाटू लागलं.
मनीषा आतुन जोर जोरात किंचाळत होती... "आई मला मला वाचव, दार उघड"... असं म्हणत कधी अगदी विक्राळ हसल्याचा आवाज येत होता, तर कधी किंचाळून रडण्याचा आवाज येत होता... आई-बाबांनी दारावर थाप देत ,"बाळा, दार उघड.. मनू दार उघड", म्हणून खूप वेळा आवाज दिला, पण आतले ते हसण्या रडण्याचे आवाज काही केल्या बंद होईना.. आणि मग अचानक थोड्यावेळाने मनीषाने रडत येत आतून दार उघडले आणि आईच्या गळ्यात पडली..
ती घाबरून थरथरत होती... 'आई, आई, एवढेच शब्द तिच्या तोंडातून येत होते.. आता फार काही विचारण्यापेक्षा मनीषाला शांत झोपू द्यावे, म्हणून आई-बाबांनी तिला आपल्यासोबत रूममध्ये नेले... आईने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत ,"काहीच नाही होणार बेटा, मी आहे ना"... असं म्हणत तिला गोंजारले. थोड्याच वेळात मनीषाला शांत झोप लागली...
दुसऱ्या दिवशी आईने मनीषाला विचारले ,"बाळा, रात्री तू एवढी रडत का होतीस? तुला वाईट स्वप्न पडलं होतं का? आणि आम्ही आवाज देत होतो तेव्हा तू दार का नाही उघडलं?"..
दुसऱ्या दिवशी आईने मनीषाला विचारले ,"बाळा, रात्री तू एवढी रडत का होतीस? तुला वाईट स्वप्न पडलं होतं का? आणि आम्ही आवाज देत होतो तेव्हा तू दार का नाही उघडलं?"..
त्यावर मात्र मनीषा म्हणाली ,"मी कशाला रडू? मी तर निवांत झोपले होते".. तिच्या या उत्तरावर आई मात्र हादरून गेली.. 'म्हणजे काल रात्री जे काही घडलं, त्यातलं मनीषाला काहीच आठवलं नाही'... आईने बाबांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले...
मुलीच्या मनावर उगाच आणखी दडपण नको या विचाराने बाबांनी देखील हसत विषयाला बगल दिली... परंतु मनीषा तिच्या खोलीत गेल्यानंतर आई-बाबा मात्र अस्वस्थ झाले..
'आज शाळेत जाताना चालत न जाता, गाडीवर जाऊ' असं म्हणत आईने आज पासून मनीषाला गाडीवर सोडण्याचा पर्याय निवडला..
'आज शाळेत जाताना चालत न जाता, गाडीवर जाऊ' असं म्हणत आईने आज पासून मनीषाला गाडीवर सोडण्याचा पर्याय निवडला..
शाळा सुटल्यावर मनीषा आईला म्हणाली "अगं आई, तू आज उगाच गाडी आणली, आता तुझी लिंबू-मिरचीवाली फ्रेंड नाही भेटणार ना तुला"... असं म्हणत मनीषा पुन्हा जोरजोरात हसू लागली... पण आज मात्र आई काहीच बोलली नाही... दोघीजणी रस्त्याने जाताना आईची नजर मात्र लिंबू मिरची वाली बाई बसते तिथे होती... पण आज ती बाई दिसलीच नाही... 'अरेच्या एरवी इथेच घुटमळत असलेली बाई आज मात्र गायब कशी?'.... विचारांच्या तंद्रीत आई एक शब्दही मनीषा बरोबर न बोलता तिला घेऊन घरी आली...
'हे बघ मनीषा यंदा दहावीचा वर्ष आहे, अभ्यासावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे', असं म्हणत आईने मनीषाचं वेळापत्रक ठरवलं.. कुठल्या वेळेत काय करायचं, याचं सगळं नियोजन झाल्यानंतर ते वेळापत्रक आईने मनीषाच्या खोलीत भिंतीवर चिटकवलं... रोज रात्री जेवण झाल्यानंतर थोड्या गप्पा टप्पा मारून लवकरच झोपून जायचा नियम ठरला...

'आज जेवण झाल्यानंतर गप्पा नको मारायला', असं म्हणत मनू कुठल्यातरी तंद्रीत शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली. आईला ही गोष्ट खूप खटकली.. एरव्ही आई बाबां बरोबर तासन-तास गप्पा मारण्यासाठी उत्सुक असलेली मनीषा आज मात्र अशी का निघून गेली? या विचाराने आईला कालची रात्र आठवली... आईला त्या विचारानेच दरदरून घाम फुटला..
"मनीषा बाळा आज पासून तू आमच्या बरोबर झोपशील का?", असे विचारताच मनीषा म्हणाली, "आई, आता त्या वेळापत्रकाचे तुझे म्हणणे मी ऐकले आहे, त्यामुळे आता उगाच आणखी नियम लावू नकोस"...
मग बाबांनी आईकडे पाहत म्हटले ,"अगं, आजकाल मुलांना प्रायव्हसी लागते आणि तू अशी सतत तिला हे करू नको, ते करू नको, म्हणून बंधनं लादू नकोस"... आता मात्र बाप-लेकीची एकजूट झाल्यानंतर आईने तो विषय तिथेच थांबवला...
रात्री साधारण बाराला पाच मिनिटं कमी असताना आईला कसल्यातरी आवाजाने जाग आली... मनीषाच्या खोलीतून कसलातरी धूर बाहेर येतोय, हे तिला जाणवले... आईने लगेच बाबांना हलवून हलवून उठवलं... अहो, ते बघा मनूच्या रूम मधून धूर येताना दिसत आहे... आईने पुन्हा दरवाजावर धाड धाड वाजवत मनिषाला आवाज दिला... पण आज मात्र आतून वेगळेच आवाज येत होते... 'माझ्या नादी लागू नको,... मला कोंबडं दे... मला इथे राहू दे... तुम्ही सगळे या घरातून निघून जा... असं म्हणत पुन्हा कालच्या रात्री सारखे हसण्याचे आणि रडण्याचे आवाज येऊ लागले... परंतु आज फक्त मनिषाचा आवाज येत नव्हता, तर तिच्या खोलीत वेगळ्याच कोणाचा तरी आवाज येत होता... आधीच अंधश्रद्धेवर अफाट श्रद्धा असलेली आई आता मात्र मनिषाला बाहेरची बाधा झाली, ही खूणगाठ मनाशी बांधून मटकन खालीच बसली...
दुसऱ्या दिवशी सकाळी आईने मनिषाला सांगितले ,"बाळा, आज तू शाळेत जाऊ नकोस... आज आपल्याला एका ठिकाणी जाऊन यायचे आहे... त्यावर कुठे जायचे आहे? हा प्रश्न मात्र विचारू नकोस"... आता आईने अशी दम वजा समजावण्याची भाषा केल्यानंतर मनिषाकडे काहीच पर्याय उरला नव्हता...

आई तिला आज त्या मिरची वाल्या बाईच्या नेहमीच्या ठिकाणी घेऊन गेली.. पण तिथे ती न दिसल्याने आजूबाजूला चौकशी केल्यानंतर समजले की ती एका पडक्या घरातल्या साधूची सेवा करत असते... 'तो भोंदुबाबा भूत पिशाच्च बाधा दूर करण्यात अगदी पटाईत आहे', असे समजताच क्षणाचाही विलंब न लावता मनिषाची आई तिला घेऊन भोंदू बाबाकडे गेली.
भोंदू बाबाच्या त्या पडक्या घरात अगरबत्ती आणि धुपाचा वास आणि धूर कोंडून राहिला होता... अंधाऱ्या खोलीमध्ये सगळीकडे त्या धुराने वातावरण अगदी भीतीदायक बनले होते.
भोंदू बाबाच्या त्या पडक्या घरात अगरबत्ती आणि धुपाचा वास आणि धूर कोंडून राहिला होता... अंधाऱ्या खोलीमध्ये सगळीकडे त्या धुराने वातावरण अगदी भीतीदायक बनले होते.
दोन खोल्यांच्या त्या पडक्या घरात एका ठिकाणी पडदा लावून आतल्या बाजूने भोंदूबाबा कोणाचे तरी भूत उतरवत बसला होता... पडद्याच्या आतून विचित्र अस्पष्ट दमलेल्या आवाजातील रडणं ऐकू येत होतं... तो सारा प्रकार पाहून मनिषा आणि आई दोघेही घाबरल्या...
'आपल्या लेकराला घेऊन अशा ठिकाणी आपण उगाच आलो', या विचारात असतानाच पडद्यामागून भोंदूबाबाने आईला आणि मनिषाला इशाऱ्याने बोलावले. ती पडद्यामागची आधीची भूत बाधित व्यक्ती अगदी हलक अवस्थेत घराबाहेर पडली...
मनिषाकडे आणि आईकडे पाहात भोंदू बाबा म्हणाला ,"बच्चा, तुझे भरोसा नही ना... लेकिन आखे बंद करके बैठ .. माता जी आप चींता मत करो, बच्ची बिलकुल ठीक हो जायेगी"... आणि मग त्यानी त्याचा तो मोरपिसांचा जुडगा मनीषाच्या डोक्यावरती दोन-तीन वेळा आपटला... कसलेतरी अंगारे मनिषाच्या दिशेने आणि इतर चारी दिशांना फुंकर मारत एक ताईत तिच्या गळ्यात बांधण्यासाठी आईकडे दिला.
एका छोट्याशा कागदाच्या पुडीत अंगारा भरून ती पुडी आईकडे देत तो म्हणाला ,"माताजी, अपने घर मे चारो तरफ फुंककर ये ताबीज इसे पहना दे ना"...
तिथून घाईघाईने परत येताना आईच्या मनात मात्र हजार विचार येत होते... 'माझ्या लेकराने काय कोणाचं वाकडं केलं, तेव्हा तिला अशी बाधा व्हावी'... मनिषासाठी आता आईने दर दिवसाआड उपवास करायचे ठरवले होते..
तिथून घाईघाईने परत येताना आईच्या मनात मात्र हजार विचार येत होते... 'माझ्या लेकराने काय कोणाचं वाकडं केलं, तेव्हा तिला अशी बाधा व्हावी'... मनिषासाठी आता आईने दर दिवसाआड उपवास करायचे ठरवले होते..
आज आता मनिषाला शांत झोप येईल, या विचारात आईलाही गाढ झोप लागली. पण रोजच्या प्रमाणे बारा वाजता आईला नकळत जाग आली... पाहते तो काय! मनिषाच्या रूमच्या बाहेर लिंबू मिरच्या पडलेल्या... आईने हळूच दार उघडून पाहिले तर मनिषाचे केस विस्कटलेले होते आणि तिच्या कपाळावर काळा बुक्का आणि त्यावर कुंकवाच्या लाल खुणा दिसत होत्या... दिवसेंदिवस होत जाणारा हा भयानक प्रकार पाहून आईला यावर काय उपाय करावा, हे मात्र सुचत नव्हते...
शाळेत जाऊन येईपर्यंत मनिषाचं वागणं अगदी व्यवस्थित असायचं. संध्याकाळी अभ्यासही उत्तम प्रकारे करायची, परंतु मग रात्री असं का व्हावं? हे मात्र आता आईला कळत नव्हतं..
शाळेत जाऊन येईपर्यंत मनिषाचं वागणं अगदी व्यवस्थित असायचं. संध्याकाळी अभ्यासही उत्तम प्रकारे करायची, परंतु मग रात्री असं का व्हावं? हे मात्र आता आईला कळत नव्हतं..
पण एवढं सगळं होऊनही बाबा अतिशय शांत होते... त्यांच्या शांततेची देखील आता आईला भीती वाटू लागली होती. 'माझ्या हसत्या खेळत्या घराला कुणाची नजर लागली?', असं म्हणत आई आता सतत देवाजवळ प्रार्थना करू लागली होती.
'आपण हे घरच विकून दुसरीकडे कुठेतरी राहायला जाऊ', असा मनिषाची आई आता हट्ट करू लागली. "वेड लागलं आहे का तुला?... माझी नोकरी आहे, मनूची शाळा आहे" असे म्हणत बाबा आज पहिल्यांदाच आईवर थोडे ओरडले.
'आपण हे घरच विकून दुसरीकडे कुठेतरी राहायला जाऊ', असा मनिषाची आई आता हट्ट करू लागली. "वेड लागलं आहे का तुला?... माझी नोकरी आहे, मनूची शाळा आहे" असे म्हणत बाबा आज पहिल्यांदाच आईवर थोडे ओरडले.
"अहो, मग या मुलीचं असं वागणं बघून तुम्ही एवढे शांत कसे बसू शकता? तुम्हाला लेकीची काहीच काळजी नाही का? तुमचं ते वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे मला काही कळत नाही... परंतु ही मुलगी ना ऐकायला तयार, ना दृष्ट काढून घ्यायला तयार... सगळ्या गोष्टी चिडून सोडून द्यायच्या असा तुमच्या दोघांचा स्वभाव... इथे माझ्या मताला काही किंमत आहे की नाही?"... पण आईने असे म्हणताच मग बाबांनी देखील आज मनातली सारी जळमटं एकाच वेळी बाहेर काढायचे ठरवले.
"तुझ्या मताचा आदर, म्हणुनच ती मुलगी त्या भोंदुबाबा कडे आली"... "काय झाले त्याने?... वेळे परी वेळ गेला आणि नको ते उद्योग घरात घेऊन आलीस"... "कधी लिंबू-मिरची वाल्या बाईला शोधत तिचा पत्ता विचारत जातेस, तर कधी मनूला भूत बाधा झाली असे समजत अघोरी विकृतीला खतपाणी घालतेस"... बाबांच्या अशा बोलण्याने आईच्या डोळ्यात पाणी तरळलं..
'लेकीच्या काळजीपोटी केलेले माझे प्रयत्न म्हणजे माझा मूर्खपणा ठरला, असं म्हणायचं तुम्हाला', असे म्हणत डोळ्याला पदर लावून आई स्वयंपाक घरात निघून गेली.
"आज अमावस्या आहे. पण आज कुठल्याही प्रकारची लिंबू-मिरची, काळ्या बाहुल्या, ओरडण्याचे आवाज, येणार नाहीत, याची गॅरंटी मी देतो तुला", असे म्हणत बाबांनी आईच्या खांद्यावर थोपटले...
"आज अमावस्या आहे. पण आज कुठल्याही प्रकारची लिंबू-मिरची, काळ्या बाहुल्या, ओरडण्याचे आवाज, येणार नाहीत, याची गॅरंटी मी देतो तुला", असे म्हणत बाबांनी आईच्या खांद्यावर थोपटले...
"म्हणजे काय करणार आहात तुम्ही?"... "तुम्हाला कुठला नवीन उपाय सापडला आहे का?"... "खरंच! किती बरं होईल जर माझ्या लेकराची या सार्यातून सुटका झाली तर".... आता नक्की काय करून घरात अचानक आलेल्या या अघोरी संकटांना बाबा थांबवणार?" या विचारात आई दिवसभर गढून गेली होती..
पुन्हा रात्री बारा वाजण्याची आई अगदी मनापासून वाट बघत होती. तितक्यात मनुच्या खोलीच्या दाराखालून एक कागद बाहेर आला.. तो कोरा कागद बघून आईला काहीच सुचेना मग आतून एक विचित्र आवाज आला.... 'हा कागद मेणबत्ती वर पकड आणि त्यावर लिहिलेले वाच', हे ऐकून आता मात्र आई दचकली..

पुन्हा आतून मनिषाच्या हसण्याचा आणि रडण्याचा तोच जीवघेणा आवाज येऊ लागला... बाहेर आईच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले होते... दारावर थाप मारली तर आतून दार उघडत नव्हते.. बाबा फक्त सुन्न अवस्थेत बसून होते..
आईने पटकन जाऊन मेणबत्ती आणली आणि तो कोरा कागद मेणबत्तीच्या थोडा वर पकडताच यावर काही अक्षरं उमटली.. 'आज पासून तुझ्या मुलीच्या शरीरातला आमचा वावर सोडून जात आहोत, परंतु तू यापुढे कुठल्याही भोंदूगिरीवर विश्वास ठेवत आमच्या अस्तित्वाला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केलास, तर मात्र आम्ही तुझ्या घरी परत येऊ' असं त्यावर लिहिलेलं बघताच आईने दाराकडे बघत हात जोडले आणि म्हणाली ,"तुम्ही जे कोणी आ,हे मला माफ करा... परंतु यापुढे मी भोंदू बाबा किंवा तसल्या इतर कुठल्याही उपायावर विश्वास ठेवणार नाही... फक्त मला माझी लेक पुन्हा हसत खेळत जगताना बघायची आहे", असं म्हणून आई मटकन खाली बसली आणि हमसून हमसून रडू लागली...
त्या दिवसानंतर मात्र कधीच मनिषाच्या वागण्यात कुठल्याही प्रकारचा विचित्र बदल जाणवला नाही किंवा तिच्या खोलीतून कसलेही आवाज किंवा लिंबू मिरच्या किंवा तत्सम प्रकार आढळले नाहीत.. त्यामुळे आई देखील मनातून निर्धास्त होती.

महिन्याभरानंतर असंच आई आणि मनिषा अंगणात गप्पा मारत असताना, तीच आधीची लिंबू मिरची वाली बाई आली... तिला पाहताच आई निमूट पणे आतमध्ये घरात जाऊ लागली..
पण तितक्यात त्या बाईने आवाज दिला ,"ताई तुमची लेक लय गुणाची बघा... आधी मी आणि माझा नवरा कसाबसा मोडका तोडका संसार जगवण्यासाठी, कधी लिंबू-मिरची विकून, तर कधी भोंदूगिरी करून दिवस काढत होतो".. पण तुमच्या लेकीने माझे डोळे उघडले बघा"... "एवढीशी पोर! पण लय समज आहे तिला"...
असं म्हणताच मनीषा तिच्याकडे गेली आणि टाळी देत म्हणाली ,"अगं, आपलं सिक्रेट ठेवणार होतो ना आपण".. त्यावर ती बाई म्हणाली ,"अगं पोरी, ते शिक्रेट का काय, मला कळत नाय बघ... पण तू आणि तुझ्या बानी माझ्यासाठी जे केलं ते तुझ्या आईला बी कळू दे की"... आता मात्र आई दोघींकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागले..
मग मनीषा हसत आईला म्हणाली," मागे एकदा तो भोंदू बाबा घरी येऊन गेला आणि तुझं सारं वागणं बदललं".. "माझ्या काळजी पोटी तू त्याला पैसे तर देऊन बसलीस, पण त्यानंतर दर अमावस्या-पौर्णिमेला लिंबू मिरचीचं खूळ तुझ्या डोक्यात आलं"... सुरुवातीला त्या प्रकाराकडे बाबांनी आणि मी दुर्लक्ष केलं, परंतु एक दिवस आमच्या शाळेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक विज्ञान आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून सांगण्यासाठी आले होते.

त्यात भोंदू बाबा, त्यांचे प्रयोग कसे हातचलाखीने दाखवतात, याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली... त्यात जळता कापूर जिभेवर ठेवणे, नारळातून रिबिन बाहेर काढणे, कोऱ्या कागदावर अक्षरे उमटवणे, हे सारे प्रकार आम्हाला दाखवण्यात आले होते... 'अशा भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी तुमच्या सारख्या चिमुरड्यांची देखील कधी क्वचित प्रसंगी मदत होऊ शकते', या त्यांच्या वाक्यावर मला अगदी घरातल्या घरातच प्रयोग करण्याची संधी मिळाली.
कारण तुझी भुताखेतांच्या गोष्टींवर असलेली अपार श्रद्धा... आणि तुझं ते बदललेले वागणं खरंतर मला त्रासदायक वाटत होतं... मग मी बाबांच्या मदतीने तुझा डोक्यातील खूळ घालवण्यासाठी काही दिवस मला खूप त्रास होत असल्याची नाटक केले.. माझ्या बेडरूम मधून इतरांचे येणारे आवाज म्हणजे मी व्हिडिओ कॉल वर माझ्या मित्र-मैत्रिणींना तिकडून विचित्र आवाज काढायला सांगायचे... त्यात तु ज्या भोंदू बाबाकडे मला घेऊन गेली होतीस, तो या लिंबू-मिरची वालीचा नवरा आहे, हे जेव्हा मला कळलं, तेव्हा बाबांनी तिला हजार रुपये दिले आणि हे असो लिंबू मिरची विकण्यापेक्षा दुसरा काहीतरी काम धंदा कर असं समजावलं.. त्या दिवसापासून ती लिंबू मिरचीच विकते, पण एक 'भाजीवाली' म्हणून".... आता मात्र ती बाई आणि मनीषा एकमेकींना टाळी देत जोर जोरात हसल्या.
"व्हय ताई, आणि या धंद्यात पैसे पण चांगले मिळतात'.. "तुमच्या साहेबांनी माझ्या नवऱ्याला बी एका ठिकाणी मजुरीच्या कामाला लावलाय... तवा धरनं आता पैशाची चणचण नाय भासत बघा"... एवढं बोलून ती लिंबू मिरची वाली आज दहा-बारा लिंबू आणि चांगल्या अर्धा किलो मिरच्या आईला देऊन गेली.. आणि जाताना म्हणाली देखील की ताई हे लिंब खाण्यापिण्यासाठी वापरा, लई चांगले गुण असतात लिंबात हे मला साहेबांनी समजावलं" असं म्हणत मनिषाला डोळा मारत ती लिंबू-मिरची आली हसत निघून गेली..
अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांनीच जीवनाचा एक नवा मार्ग निवडलेला पाहून, आपण किती बुरसटलेल्या विचारांना मध्ये जगत होतो, याची आईला देखील जाणीव झाली. 'महिनाभर ठरलेल्या जागी न दिसणारी लिंबू-मिरची वाली बाई, दुसरा कुठला तरी व्यवसायही करत असेल', असा विचार न येता, आपण मात्र आपल्या लेकीला भूतबाधा झाली समजून त्या विकृतीमध्ये अडकत चाललो होतो', या विचाराने आईला स्वतःचीच चीड येत होती...
पण सुरु झालेला हा सावल्यांचा खेळ अशाप्रकारे संपल्याने फक्त आईचीच अंधश्रद्धे बद्दलची मतं बदलली नाहीत तर एक जोडपं देखील चांगल्या मार्गाला लागलं होतं... 'अनेकांना त्यांचे संसार भूतबाधेने पछाडलेत', असं सांगण्याची वाट पाहणाऱ्या या जोडप्याला, आता मात्र कष्टाने, मेहनतीने जगण्याच्या विचाराने, पछाडलं होतं... एक कहाणी सुफळ संपूर्ण झाली होती.

© वर्षा पाचारणे.
सदर कथा काल्पनिक असून अंधश्रद्धा पसरवण्याचा कुठलाही हेतू नाही.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
Tags
relationships
अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज होऊन गेली आहे.. कथा/कविता तसेच दृकश्राव्य माध्यमे वापरून जनजागृती करणे गरजेचे झाले..तुम्ही कथेतून अंधश्रद्धेवर लिखाण केले त्याबद्दल अभिनंदन...
उत्तर द्याहटवाkharay... thank you so much
हटवा