© सौ. प्रभा कृष्णा निपाणे
राहुल आणि सोनी नवीन कॉम्प्लेक्स मध्ये राहायला आले. खूप मोठी सोसायटी होती. जेमतेम दोन बिल्डिंग तयार झाल्या होत्या. अजून सात बिल्डिंग पूर्ण व्हायच्या होत्या. काही मजुर तिथेच राहत होते. काही आपापल्या घरी जात होतो.
जोरात काम चालू होते. सोनी दिसायला खूप सुंदर होती. सर्व काम करणारे मजुर सोनी कडे कुतूहलाने बघायचे.
कारण ती होतीच तशी. सर्वांसोबत जमेल तसे बोलायची. काका, मामा, मावशी, काकु... प्रत्येकाला नाव दिले होते.
छोटी मुलं पण तिच्याकडे बघुन गोड हसायची. ती नाहीच काही तर एक smile तरी त्यांना द्यायचीच.
एक मुलगी मात्र बिल्डिंगच्या मागच्या भिंती आड लपायची . ताई!!! अशी हाक मारायची आणि पुन्हा लपून बसायची. घाई घाईत सोनी तिला लांबूनच बघायची आणि टाटा करून निघून जायची.
एक दिवस सोनी लवकर आवरले म्हणून घराबाहेर पडली. ही मुलगी भिंती आड लपायला जात असतांना सोनीने तिला पकडले.
नाव काय ग तुझे ?
ती लाजून म्हणाली गौरी!
अग लपून का टाटा करते ? ताई मला तसेच आवडते !
हो का ?
हो!
एक सांगु !
गौरी, मला पण तू खूप आवडते !
खरच ताई !
अगदी खर !
म्हणूनच आज मुद्दाम तुला भेटायला लवकर निघाले.
सोनीने गौरीची पापी घेतली. गौरी आपला गाल कुरवाळत,
ताई ! माझी ताई !
करत तिथून पळाली.
ताई ! मला इथून लपून टाटा करायला आवडते. मी हळूच बाहेर येणार, मगच टाटा करणार.
गौरी लपून बाहेर येत सोनीला टाटा करत राहिली.
पगार झाला त्या दिवशी सोनी खूप सारे चॉकलेट घेऊन आली आणि त्या सर्व मुलांना वाटली. मुले सुध्दा ताई, ताई करत तिच्या भोवती गोळा झाले.
असेच सात आठ महिने गेले. सोनीला पंधरा दिवसांसाठी ट्रेनिंगला अमेरिकेला जायचे होते. तिने नेहमी प्रमाणे सर्व मुलांना चॉकलेट आणले. सर्वांना चॉकलेट दिले. मुलांना सांगितले आता मी परवा अमेरिकेला म्हणजे खूप लांब जाणार आहे. तिथे खूप छान चॉकलेट मिळतात. मी तुम्हाला खूप सारे चॉकलेट घेऊ येणार. पंधरा दिवस मला तुमची खूप आठवण येणार.
मुलं म्हणाली, ताई आम्हाला पण तुझी खूप आठवण येणार. ताई तु लवकर येशिल ?
गौरी तिला बिलगुन म्हणाली ताई तू नको जावू ग ! मला तुझी खूप आठवण येणार !
मग मी बिल्डिंगच्या मागे लपून ताई म्हणून कुणाला हाक मारू?
मग मला टाटा कोण करणार?
ताई !
मला नको ते तिकडचे चॉकलेट !
मला तू हवी आहे !
ताई नको जाऊ ना ग !
सोनी म्हणाली, हे बघ गौरी बाळा, जर मी तिकडे गेले नाही तर मला नोकरी वरून काढून टाकणार. मग माझ्या गौरीला चॉकलेट , छान छान फ्रॉक कोण आणणार?
निष्पाप गौरी म्हणाली, ताई तू मला फ्रॉक पण आणणार. हो राजा. खूप सारे चॉकलेट आणि फ्रॉक पण.
गौरीने आपल्या खांद्यावर फाटलेल्या फ्रॉक वर हात ठेवला.
म्हणाली, ताई जा तू !
मी रोज सकाळी बिल्डिंगच्या मागे लपून तुला टाटा करणारच.
तू नसली तरीही !
हो बाळा !
मी सुध्दा तिकडून तुला हात हलवुन टाटा करणार !
इथे नसले तरीही!
सोनी दोन दिवसाने अमेरिकेला गेली.
जातांना नवऱ्याला सांगुन गेली. राहुल जाता येता जरा या मुलाकडे लक्ष देत जा !
खूप प्रेमळ आहेत ही लोक!
थोडा वेळ काढत जा रे!
काय सारखं काम काम तुझ ?
चार पाच दिवस झाले असतील, राहुलला ताप आला. त्याच्या एका मित्राने त्याला घरी आणून सोडले. गौरीने हे पाहिले. लगोलग ती त्यांच्या मागे गेली. दारा पर्यंत जाऊन राहुलला बघून आली. तशीच धावत घरी गेली. आईला सांगितले आई , राहुल दादाला काहीतरी होते. त्याचा मित्र त्याला हात घरून घरी घेऊन येतांना पाहिले मी. त्याच्या मागे मागे मी त्याच्या घरा पर्यंत जाऊन आले .पण मी छोटी ना !
मग घरात कशी जाणार ? आई, बाबा तुम्ही दोघे जाऊन बघा.
दादाला काय झाले ?
सोनी ताई पण इथे नाही ! मग दादाची काळजी कोण घेणार ?
आई म्हणाली, बाळा आपण गरीब माणसे त्यांच्या घरी कसे जाणार.

गौरी हट्टाला पेटली . तुम्ही जायचे म्हणजे जायचे !
आई गरीब लोकांनी श्रीमंत लोकांकडे जायचे नसते का ?
मग ते लोक अडचणीत असेल तरी सुध्दा !
मग ताई का आम्हाला जवळ घेते ?
का चॉकलेट देते ?
का सगळ्यांवर इतके प्रेम करते ?
मग तिने पण आपण गरीब म्हणून प्रेम नको करायला!
बोल ना आई!
आई ! अस काही नाही ग!
आई ! आई ! तू एकदा राहुल दादाला बघून ये .
जेवला की नाही ते पण विचार !
अग पण !
ते काही नाही !
तुम्ही दोघांनी जायचे म्हणजे जायचे!
अरे बाळा ! आम्ही असे त्यांच्या घरी गेलेलो त्यांना आवडले नाही तर ?
त्यांनी आमचा अपमान केला तर ?
नाही करणार आई !
राहुल दादा खूप प्रेमळ आहे. चार दिवसांपूर्वी मला म्हणाला होता, खूप गोड मुलगी आहे तू !
आई राहुल दादाने माझ्या गालाची पापी घेतली.
म्हणाला तुझ्या सोनी ताईची आठवण येते !
मी हो म्हणाले !
तर म्हणाला, मला पण येते !
लवकरच येणार तुझी सोनी ताई .
आई ! खूप चांगला आहे राहुल दादा !
आई, बाबा तुम्ही जा ना !
माझी शपथ आहे !
एकदाच बघून या !
मग मी पुन्हा नाही हट्ट करणार.
गौरी ने आई, बाबांचा हात धरला आणि त्यांना ओढत ओढत राहुलच्या घराकडे नेऊ लागली.
जातो आम्ही, सोड आता ! असे म्हणताच गौरी गोड हसली. आईच्या गालावर आपले ओठ टेकवले. आई तू खूप छान आहे असे म्हणून मिठी मारली.
शेवटी सगळा धीर एकवटून गौरीच्या आईने राहुलच्या घराची बेल वाजवली. राहुल तापाने फणफणत होता. कसे बसे दार उघडले. तो म्हणाला, कोण आपण ?
मी !!!
मी !!!!
गौरीची आई !
अच्छा ती छोटी मुलगी गौरी तिची आई होय !
हो!!!
हो!!!!
काकु, तुम्हाला काही काम आहे का माझ्याशी ?
काही हवे आहे का ?
गौरीची आई म्हणाली, नाही !!! नाही !!!
काहीच काम नाही. तुमची तब्येत बरी नाही हे गौरी कडून समजले. ती ऐकायला तयारच नाही. सारखी राहुल दादाला बघून ये म्हणून तगादा लावला. आले शेवटी.
हो ! थोडे बरे नाही वाटत! साहेब तुम्हाला खूप ताप आहे असे तुमच्या चेहऱ्यावरून दिसते. तिने त्यांच्या कपाळावर आपला हात ठेवला. अंग खूप तापले होते. राहुल घरात जायला निघाला, त्या राहुलच्या मागे घरात गेल्या. बाथरूम मध्ये जाऊन एका मग मध्ये पाणी घेतले. बेसिन जवळ नॅपकिन होती ती घेतली. ओली करून ती राहुलच्या डोक्यावर ठेवली. थोड्या वेळात ताप उतरला.
भीत भीत विचारले, साहेब काही खाल्ले का ?
नाही काकु !
खिचडी करणार होतो. पण उभेच राहवत नव्हते.
साहेब मी देऊ का करून ?
काय ?
तुम्हाला चालणार असेल तरच ?
काकु चालणार का म्हणून काय विचारता ?
आम्ही गरीब माणसे ! दिवसभर मातीत पडलेले असतो.
काकु मातीशीच नात घट्ट असायला हव.
काकु मी आणि सोनी सुध्दा गरीब घरातून आहे !
आम्ही दोघे शेजारी शेजारी राहत होतो .आमचे दोघांचे आईवडील ऊसतोड मजूर होते. कुठे कुठे फिरत असायचे. आमचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून आम्ही आजीकडे राहायचो. दोघेही हुशार होतो.
शिकलो नोकरी लागली, चार पैसे मिळाले. पाय मात्र त्या मातीशी घट्ट रुजवून ठेवले. उगाच सोनी तुम्हा सर्वांना इतका मान देत नाही .
तिने तर तुमच्या प्रत्येकाशी नाते जोडले. मला इतका वेळ मिळत नाही इतकंच.
काकु तुम्ही बिनधास्त खिचडी बनवा. मस्त फोडणीची करा. जरा झणझणीतच करा !
तोंडाला चवच नाही !
मी काय म्हणतो, काकु खिचडी
जरा जास्तच करा!
तुम्ही तिघे पण इथेच जेवा ! गौरीला पण घेऊन या.
नाही साहेब, आम्ही तुमच्या पुढे नाही जेवू शकणार. तुमच्या पुरतीच करते.
डाळ तांदूळ कुठे आहे ते सांगा . काकु ओट्या खाली पिठाचा, तांदूळचा आणि डाळीचा पण डबा आहे.
साहेब नक्की करू न खिचडी, तुम्हाला चालेल न माझ्या हातचे जेवण.
राहुल म्हणाला काकु असे का विचारता सारखे सारखे ?
का नाही चालणार ?
शेवटी तुम्ही सुध्दा माणूसच आहात !
गरीब आहात म्हणून काय झालं ?
माणुसकी किती ठासून भरली आहे. एका श्रमंतलाही लाजवेल अशी.
काकु करा तुम्ही खिचडी, खूप भूक लागली. दुपारी पण जेवलो नाही.
गौरीच्या आईने खिचडी करून गरम गरम राहुलला खाऊ घातली. औषध देवून दोघे घरी आले. गौरीला सांगितले, ती खूप खूष झाली.
जेवणं आटोपली . गौरीच्या बाबाने राहुलला फोन केला. म्हणाला, साहेब तुम्हाला चालणार असेल तर मी येऊ का रातच्याला सोबतीला. मी घरून हात्रून पांघरून घेऊन येतो.
राहुल म्हणाला, गौरीचे बाबा मी खरच ठीक आहे. तसे काही वाटले तर नक्की फोन करतो. झोपा तुम्ही निवांत.
दुसऱ्या दिवशी गौरीच्या आईने कामावर सुट्टी घेतली. राहुलला सकाळी चहा करून दिला, मग नाष्टा, दुपारी जेवण. पुन्हा पाच वाजता चहा आणि रात्रीचे जेवण.
बोलता बोलता राहुल म्हणाला, काकु तुमची गौरी खूप गोड आहे !
का कोण जाणे, पण त्यांना पहिल्यांदा गौरी बद्दल राहुलला सांगावेसे वाटले.
त्या म्हणाल्या साहेब खर सांगु !
गौरी आमची मुलगी नाही !
काय ?
होय साहेब !
मग कोण आहे ती ?
साहेब आम्ही याच मालकाचे नागपूरला काम चालू होते . तिथे काम करत होतो. गौरीचे बाबा सुपरवायझर होते. त्यांना गाडीचा खूप शौक होता. पावसाळ्याचे दिवस होते. असेच एकदा गाडीवर गौरीची आई आणि ते फिरायला गेले. गौरी जेमतेम सहा महिन्याची होती. कसा कोण जाणे, त्यांच्या गाडीवरचा ताबा सुटला. गाडी समोरच्या ट्रेकवर आदळली. जबरदस्त अपघात झाला. दोघे नवरा बायको जागीच ठार झाले. गौरी मात्र जीवंत राहिली.
म्हणतात न "देव तारी त्याला कोण मारी "तसेच काहीसे गौरीच्या बाबतीत घडले. खर तर गौरी खूप दूरवर फेकल्या गेली होती. पण जिथे पडली तिथे रस्त्याच्या कडेला मऊशार गवत वाढले होते. गौरीला साधे खरचटले सुध्दा नाही.
त्या दिवशी गौरी अनाथ झाली.
तिच्या आईबाबांना जवळचे असे कुणीच नव्हते.
सगळ्यांना प्रश्न पडला आता या लहान बाळाचे काय ?
तिची आई लहानपणापासून तिला आमच्या घरी आणून ठेवायची.आम्हा दोघांना ती छान ओळखायची. तासनतास खेळत राहायची.
मग आम्ही दोघांनी तिला आमच्या पदरात घेतली. आम्ही दत्तक पत्र नाही केल काही सुचत नव्हतं मग मालकाला सांगून ते गाव सोडले. इकडे आलो. मी मला स्वतःचे मुल होऊ दिले नाही. तीच आता आमची मुलगी.
काय ?
हो साहेब !
अजून गौरीला यातले काही माहित नाही. वेळ आल्यावर नक्की सांगू. तिला घेऊन आम्ही ते गाव सोडून इथे आलो. पाच वर्ष झाले.
इथे गौरी आमची मुलगी नाही हे कुणालाही ठाऊक नाही.
राहुल म्हणाला, काकु ! तुम्ही खरच खूप महान आहात.
नाही साहेब, एका अनाथ लेकराचे मायबाप झालो.आम्ही खरे भाग्यवंत.
सोनीला राहुलने इकडची सर्व हकीकत सांगितली. आपल्या पश्चात ही मजुर लोक आपल्या नवऱ्याची सर्वतोपरी काळजी घेतात. ती त्यामुळे थोडी निश्चित झाली. त्यात गौरी बद्दल कळले. तिला तिच्या आईबाबा बद्दल अजूनच आदर वाटायला लागला. दोनच दिवसात राहुल बरा झाला.
सोनी पण परत आली. बोलल्या प्रमाणे तिने मुलांसाठी खूप सारे चॉकलेट आणले.
सोनी गौरीच्या घरी गेली. गौरी आणि तिच्या आईबाबाचे आभार मानायला. गौरीला एक छानसा फ्रॉक तिने आणला होता. लगेच तिला घालायला दिला.
गौरी फ्रॉक घालून तिला ताई म्हणून नाचू लागली. ताई ! माझी सोनी ताई ! असे म्हणून तिला बिलगली.
नकळत दोन थेंब सोनीच्या डोळ्यातून ओघळले.
गौरी म्हणाली, ताई तू रडतेस ?
नाही बाळा !
ताई !
नको रडू !
राहुल दादा ठीक झाला आपला !
हो राजा !
तु आहेस ना !
मग राहुल दादाला काहीच होणार नाही !
किती काळजी घेतली तु राहुल दादाची ?
असेच दिवस जात होते. गौरीची आई आणि बाबा काम करत असताना परांची बांधली त्यावर चढले होते. टोपले भरून रेती सिमेंट एक एकाच्या हातातून वर पास होत होते. सगळे खाली उतरले सर्वात शेवटी गौरीचे आईबाबा उतरत होते.
कसे काय ?
कोण जाणे ?
परांची तुटली !
जवळ जवळ तीस फुटांवरून दोघे नवराबायको खाली कोसळले.
गौरीचे बाबा जागेवरच गेले. आईला admit केले. मेंदूला मार लागल्यामुळे आत रक्तस्त्राव होत होता. दोन तासात त्यांनी पण आपला प्राण सोडला.
गौरी पुन्हा अनाथ झाली.
सोनी आणि राहुल दोघेही गौरीला घेऊन हॉस्पिटलला आले होते.
गौरीच्या आताच्या आईचा भाऊ, बहिण ,आई तसेच तिच्या बाबांचे भाऊ, बहिणी सर्व आले होते.
मरते वेळी गौरीच्या आईने आपल्या लेकीचा हात सोनी च्या हाती दिला आणि आपला प्राण सोडला होता.
दोघांचा अंत्यविधी सोबतच केला. गौरीच्या आईचे आणि बाबांचे नातेवाईक आता गौरी वरून चर्चा करू लागले.
काय करायचे या गौरीचे? कोणती अवदसा सुचली या दोघांना आणि या पोरीला पदरात घेतले ?
आता हीची जबाबदारी कोण घेणार ?
प्रत्येकाने गौरीची जबाबदारी झटकून टाकली.
राहुल आणि सोनी हे सगळे बोलणे ऐकत होते. राहुल गौरीला घेऊन पुढे आला. म्हणाला गौरीची चिंता करू नका. आम्ही दोघे तिचा सांभाळ करू. आज पासून गौरी आमची जबाबदारी.
सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मरते वेळी गौरीच्या आईने आपल्या लेकीचा हात सोनी च्या हाती दिला आणि आपला प्राण सोडला होता. त्यांना नक्की हेच म्हणायचे असेल सोनी ! माझ्या गौरीला सांभाळ.
हो ना राहुल !
खरच असेच त्यांच्या मनात असावे. म्हणूनच कदाचित इतर मुलांपेक्षा तुला गौरीचा जास्त लळा होता.
ऋणानुबंध असावे काही मागच्या जन्माचे. हो ना राहुल !
हो सोनी !
राहुल आणि सोनी त्यांच्या नातेवाईक यांना घेऊन पोलीस स्टेशनला गेले. गौरीची सगळी हकीकत सांगितली. पोलिसांनी सुध्दा नकळत डोळ्याच्या कडा पुसल्या.
इन्स्पेक्टर म्हणाले किती परीक्षा पाहतो देव या निष्पाप बाळाची कोण जाणे. ?
एक नव्हे तर दोन दोन आईवडील हिरावून घेतले नियतीने या पोरी पासून.
बरे झाले तुम्ही देवदूत बनुन आलात तिच्या आयुष्यात. लवकरच तुम्हाला गौरी दत्तक मिळेल. तोपर्यंत गौरी तुमच्याच सोबत राहील.
सगळे दत्तक सोपस्कार झाले. गौरीला घेऊन सोनी आणि राहुल घरी आले. सोनीने लगेच आठ दिवस सुट्टीचा मेल ऑफिसला पाठवला. राहुल ने सुध्दा तीन दिवसाच्या सुट्टी घेतल्या.
गौरीला घेऊन त्यांनी तिच्या आईचे सर्व विधी तिसऱ्या दिवशी उरकले होते.
जबाबदारी नको म्हणून सगळे नातेवाईक त्याच दिवशी परत गेले होते.
राहुलने त्याच्या आईला फोन करून ताबडतोब बोलवून घेतले. गोरी बद्दल त्यांचा निर्णय त्यांना सांगितला. सुरवातीला त्या नकोच म्हणत होत्या. पण राहुलने जेव्हा गौरीच्या आई बद्दल त्याच्या आईला सांगितले तेव्हा त्या माउलीला सुध्दा पाझर फुटला.
गौरीचा पायगुण, लगेच सोनीला सुध्दा दिवस गेले.
पण गौरीला इथे करमत नव्हते.
सारखी म्हणायची ताई मला माझ्या आईबाबा कडे जायचे.
म्हणायची , ताई तू आणि राहुल दादा खूप चांगले आहे. पण मला माझे आईबाबा हवे आहेत!
ताई ! मला माझ्या आईबाबा कडे नेऊन दे. सगळे बोलतात ते देवाघरी गेले.
ताई !
मला पण सोड ना देवा घरी ! सोनीला गौरीला कसे समजावून सांगु काहीच समजत नव्हते.
ती गौरीला म्हणाली गौरी , तुला आम्ही तुझ्या आईबाबांना कडे नाही सोडू शकत राजा !
ते खूप दूर गेले, ढगात ! तिथुन तारा होऊन तुला बघतात!
ते बघ दोन तारे दिसतात न ते तुझे आईबाबा !
बघ तुझ्याकडे बघून दुःखी झाले !
का ताई ?
कारण तू त्यांची आठवण काढून रडतेस न !
म्हणून !
गौरीने आपले डोळे पुसले ! म्हणाली आई बाबा तुम्ही नका दुःखी होऊ. मी आहे ताई जवळ !
तुम्ही बघताय न !
मी आता रडणार पण नाही !
गुणी बाळ आमचे!
असे म्हणून सोनीने गौरीला जवळ घेतले.
हे बघ बाळा, आता राहुल दादा तुझे बाबा, आणि मी तुझी सोनी ताई आजपासून तुझी "आई "
तु आजपासून आम्हाला "आईबाबा" म्हणायचे. ही राहुल दादाची आई म्हणजे तुझी आजी.
हो अजून एक, तुला एकटीला कंटाळा येतो ना !
मग सोनीने गौरीचा हात आपल्या पोटावर ठेवला म्हणाली, बघ लवकरच तुला खेळायला एक छोटीशी बहिण किंवा भाऊ येणार. मग आमची गौरी त्याच्या सोबत खूप खेळणार.
आपण सगळे खूप मज्जा करणार. छोट्या बाळाला घेऊन गौरी फिरायला जाणार. त्याची पापी घेणार. आमची गौरी मग ताई होणार !
खरच ताई !
हो राजा!
ताई मी आईला बोलायची मला पण भाऊ पाहिजे. पण आईने कधीच ऐकले नाही.
पण ताई, मी तुला ताईच बोलणार
आई नाही !
आणि हा राहुल दादा !
ताई ! तू आता आपल्याकडे येणाऱ्या छोट्या बाळाची आई! आणि मी, त्या छोट्या बाळाची ताई !
तू कशी माझी ताई !
अगदी तशी !
तुझ्या सारखी प्रेमळ ताई!
सोनीने डोळ्यातले अश्रू पुसले.
गौरी ने सुध्दा आपले डोळे पुसले. सोनी ताई , राहुल दादा म्हणत त्या
दोघांना तिने घट्ट मिठी मारली. कधीही दूर न होण्यासाठी.
समाप्त......

सदर कथा लेखिका सौ. प्रभा कृष्णा निपाणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...