© वर्षा पाचारणे.
कॉलेजचे दिवस म्हणजे अगदी सप्तरंगी. गार्गी नुकतीच अकरावीला गेली. मध्यम वर्गीय कुटुंबातील गार्गी जरा डॅशिंग स्वभावाची होती. बेधडक स्वभाव, चंचलपणा, आणि तिच्या देहबोलीमुळे ती सहज कोणाच्याही पटकन नजरेत भरायची. आई-वडील दोघेही नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असायचे.
त्यामुळे साधारण आठवीत असल्यापासूनच गार्गीकडे स्वतःचा मोबाईल होता.. वेळप्रसंगी आई-बाबांबरोबर संपर्क साधता यावा, याकरता तिला एक छोटासा, साधा मोबाईल देण्यात आला होता. परंतु दहावीत असताना वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून गार्गीने हट्टाने स्मार्ट फोन मागून घेतला.
दहावीत तो मोबाईल हातात मिळताच तिने स्वतःचे सोशल मीडियावर अकाउंट ओपन केले. अल्लडच वय ते! सोशल मीडियावर आता सहज मैत्रीची लिस्ट वाढू लागली होती. भरपूर मोठं फ्रेंड सर्कल बनवण्याच्या नादात समोरची व्यक्ती खरंच मैत्री करण्याच्या लायकीची आहे की नाही, हे समजण्याचं कदाचित ते वय नव्हतं.
रात्री-अपरात्री उठून मेसेजेस चेक करणं, कोणी ऑनलाईन आहे की नाही हे तपासणे, हे आता तिचं रुटीन झालं होतं. मुळातच अभ्यासात जेमतेम असलेल्या गार्गीला अभ्यासाचा जास्तीत ताण नको, या विचाराने आई-बाबाही तिच्या कलेने वागत होते.
एकुलती एक असलेली गार्गी त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त हट्टी होत चालली होती. पण आपली मुलगी फटकळ स्वभावाची असल्याने कुठल्याही मुलाच्या बोलण्याला ती भुलणार नाही, असा आई बाबांचा ठाम विश्वास होता.
जेमतेम ५५ टक्के मार्क मिळवून गार्गी दहावी पास झाली. घरापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला. आता ती गाडी घेण्यासाठी बाबांकडे हट्ट करू लागली, परंतु 'आपण थोड्या दिवसांनी तुला गाडी घेऊयात', अशी समजूत काढत बाबांनी तो विषय पुढे ढकलला.

कॉलेज सुरू होऊन नुकताच महिना झाला होता. वर्गातील एकमेकांशी आता साऱ्यांचीच चांगली ओळख झाली होती. कॉलेजमध्ये राहुल नावाचा गार्गी पेक्षा सिनिअर असलेला मुलगा सतत तिच्या अवती भोवती फिरू लागला. टवाळखोर म्हणून फेमस असलेला राहुल सतत वेगवेगळ्या मुलीं बरोबर फिरताना दिसायचा. राहुलच्या एका मित्राने गार्गी बरोबर ओळख काढत तिच्याशी मैत्री केली.
आता मित्राकडून ,'राहुल किती चांगला आहे', याचं गुणगान ऐकताना गार्गी अगदी भारावून जायची. घरची श्रीमंती, गाड्या, खिशात हवा तेवढा पैसा, आणि मुलींच्या गळ्यातला ताईत असं राहुलचं वर्णन ऐकताच, का कोण जाणे, पण गार्गी देखील मनातून त्याच्याशी मैत्री करण्यासाठी आतुर झाली होती. आणि अशातच एक दिवस त्या मित्राबरोबर राहुल स्वतः गार्गीकडे ओळख वाढवण्यासाठी आला..
राहुलला समोर बघताच गार्गीच्या मनात फुलपाखरं उडू लागली. तिच्या हृदयाची धडधड वाढली. अंगावर रोमांच उभे राहिले. त्याच्याशी नजरानजर होताच 'हाच आपलं पहिलं प्रेम', असं वाटून ती मनोमन लाजली. बेधडक असलेली गार्गी अशी लाजलेली पाहून, राहुलला जास्त काही बोलण्याची गरज पडली नाही..

हळूहळू ओळख वाढत गेली. आता गार्गी आणि राहुल दोघेही एकमेकांना रोज भेटत होते. कधी लेक्चर बंक करून मॉल्समध्ये फिरून यायचे, तर कधी मुव्ही बघायला जायचे, कधी बीच वर जाऊन तासन-तास गप्पा मारायचे..
राहुल बरोबर दिवस आनंदात गेल्याने घरी आल्यावर देखील ती खुशी गार्गी चेहऱ्यावर दिसायची. "काय गार्गी बाई, आजकाल खूप खुश दिसत आहात तुम्ही... काही विशेष घडले का कॉलेजमध्ये?"... असं आईने विचारताच गार्गी म्हणायची ,"अगं, विशेष कसलं! रोजचेच लेक्चर्स, बोरिंग सिल्याबस आणि तोच तासाभराचा प्रवास"... "यात कसलं आलंय विशेष".. हे सारं ती सर्रासपणे खोटं बोलायची.

तरीही एक दिवस आईने तिला विचारलं, "गार्गी, कॉलेजमध्ये कुठल्याही मुलाबरोबर मैत्री करताना जरा सांभाळून... तुझा स्वभाव चंचल असल्याने समोरचा मुलगा मैत्रीला प्रेम समजून बसला तर फार अवघड होऊन बसतं... आणि तसंही पुढचं वर्ष बारावीचे असल्याने यंदापासूनच तू थोडी तयारी कर".. "दहावीत असताना आम्ही तुला अभ्यासाविषयी कधीच टेन्शन येऊ दिलं नाही, परंतु आता पुढच्या दृष्टीने थोडा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे"....
"आई, सारखं नको ना गं लेक्चर देऊस.. आधीच कॉलेजमध्ये दिवसभर देखील आम्ही ते लेक्चर्सच ऐकत असतो आणि घरी आले की तू पुन्हा सुरू होते".. असं म्हणत वाकडे तोंड करत गार्गी पुस्तक उघडून तोंड फुरगटून बसली. आपण उगाचच गार्गीला बोललो या विचाराने आईलाही वाईट वाटले.
'खरंच नसेल तिच्या मनात कोणी मुलगा', असा विचार करत आईने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली ,"बाळा, तुझं हे अल्लड होय आहे, या वयात सहाजिकच कोणीतरी आवडतं... पण नंतर समजतं, की ते फक्त आकर्षण होतं.. म्हणून सांगावसं वाटलं'. 'पण तू मात्र तुझ्या बोलण्याने समोरच्याला पळवून लावशील, याची खात्री आहे मला', म्हणून आई हसली आणि मग तिच्या बोलण्याने रुसलेली गार्गीदेखील खळखळून हसू लागली.. "हो, माझं तोंड म्हणजे बंदुक आहे... माझ्यासमोर कोणी आलं की कधी या तोंडातून गोळी सुटेल, काही सांगता येत नाही"... असं म्हणत गार्गीने आईला टाळी दिली... क्षणात वातावरण हलकंफुलकं झालं.
एक दिवस राहुल आणि गार्गी कॉलेजच्या कट्ट्यावर मित्र-मैत्रिणींसोबत बसलेले असताना राहुलने अचानक गुडघ्यावर बसत गार्गी समोर लाल गुलाबाचे फुल पकडलं आणि म्हणाला, "गार्गी, आयुष्यात मैत्रिणी खूप भेटल्या परंतु जवळचं कुणी वाटलंच नाही"... "आयुष्यात हक्काची माणसं खूप भेटली, पण माझ्यावर हक्क गाजवणारं कोणी भेटलं नाही"... "या माझ्या एकाकी असलेल्या मनाला तुझ्या प्रेमाची साथ देशील?"... त्याच्या अशा फिल्मी प्रपोजने सगळेच मित्र-मैत्रिणी गार्गीकडे बघू लागले.

'आता राहुलचं काही खरं नाही', असं वाटून सगळेच शांत झाले. 'राहुलच्या गालावर चपराक बसणार', या विचारात सारेच असताना, गार्गीने मात्र क्षणाचाही विलंब न लावता त्याला मिठी मारत 'हो' असं उत्तर देऊन टाकले.
आपल्या या मित्र-मैत्रिणीची लव्ह स्टोरी फुलू लागल्याने मित्रांनीही पार्टीसाठी तगादा लावला... राहुलने सगळ्यांनाच एका मोठ्या हॉटेलमध्ये नेत जंगी पार्टी दिली... 'आपल्या प्रेमाचं सेलिब्रेशन एवढ्या आलिशान हॉटेलमध्ये होतंय', या विचाराने गार्गीलाही आपण कोणीतरी सेलिब्रिटी असल्याचं भासू लागलं..
आता दोघांचाही होकार असल्याने गार्गी अगदी कधीही राहुल म्हणेल तिकडे त्याच्याबरोबर जायला तयार असायची. हळूहळू त्या नकळत्या वयात शारीरिक जवळिकीसाठी गार्गी आतुर होऊ लागली. त्याच्या एका स्पर्शाने ती मोहरून जायची. त्याने तिचं कौतुक केल्यावर तिला आभाळंही ठेंगणं वाटायचं..

एक दिवस राहुल आणि गार्गी राहुलच्या मित्राच्या फ्लॅटवर निवांतपणे वेळ घालवण्यासाठी गेले. 'फ्लॅटमध्ये कोणीच नाहीये', हे माहीत होताच गार्गी मात्र घाबरण्याऐवजी मनातून अतिशय खुश झाली होती. राहुलने तिला विचारलं ,"गार्गी, मी काहीही मागितलं तरी तू देशील का गं?".. यावर लाजत गार्गी म्हणाली ,"अरे, मी तुझीच तर आहे".... "तेरे लिये तो अपनी जान हाजीर है जानू"l... असं म्हणत गार्गीने त्याला घट्ट मिठी मारली.
आणि ती शारीरिक जवळीक वाढत शेवटी ती पूर्णपणे वहावत गेली. भानावर आल्यावरही 'आपण काही चूक केली आहे', असं गार्गीला मुळीच वाटलं नाही.
आता अश्या एकांतातल्या भेटीगाठी वाढू लागल्या होत्या. बघता बघता अकरावीच वर्ष संपून बारावीचं वर्ष सुरू झालं होतं. एक दिवस मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने सगळ्या मुली पार्टीसाठी तिच्या घरी जमणार आहेत, असं सांगून आईची परवानगी घेऊन गार्गी घराबाहेर पडली.

'रात्री यायला किमान दहा वाजतील', असं सांगताच आईने तिच्याकडे मैत्रिणीचा फोन नंबर मागितला. परंतु 'तुला काही वाटलं, तर माझ्या फोनवर फोन कर ना', असं सांगत गार्गी घाईघाईने घराबाहेर पडली देखील... 'या मुलीची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत', अशी धास्ती आईला वाटली, परंतु ऑफिसला जायच्या गडबडीत असल्याने आईने देखील पटापट काम करायला घेतली.
इकडे गार्गी राहुल बरोबर एका लॉजमध्ये पोहोचली. अवैध देहविक्री चाललेल्या त्या लॉजमध्ये अचानक पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये अनेक चांगल्या घरातल्या मुली सापडल्या. पोलीस येणार हे कळताच राहुल मात्र 'आपल्यासाठी काही खायला आणि पाण्याची बॉटल घेऊन येतो', असं सांगत पसार झाला.

इकडे राहुल येईपर्यंत गार्गीने बॅगेत आणलेले, त्याला आवडतील असे कपडे घालून त्याची वाट पाहत रूम मध्ये बसली. ती किती चुकीच्या मार्गाने वागत आहे, याची काहीच चिंता तिला पडलेली नव्हती.. पोलिसांच्या छाप्यात सापडलेली गार्गी पोलीस स्टेशनला पोहोचली.
पोलीस स्टेशन वरून फोन जाताच आई-बाबा तडक काम सोडून तिथे पोहोचले. आपल्या मुलीने केलेल्या कृत्यामुळे कुठेही तोंड दाखवायची जागा शिल्लक राहिली नव्हती. पोलिस स्टेशन मधून घरी येताच पुन्हा राहुलला न भेटण्याचे वचन आईने तिच्याकडून घेतले.. 'आपल्या मुलीच्या अशा चुकीच्या वागण्याला आपणही तितकेच जबाबदार आहोत', असं समजून आईने तडक नोकरीचा राजीनामा दिला.
आता आई स्वतः गार्गीला कॉलेजमध्ये गाडीवरून घेऊन जात होती. गार्गीचं राहुल वरचं प्रेम मात्र तिला काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हतं. "अगं गार्गी, त्यादिवशी मी पुन्हा रूमवर आलो, तेव्हा तू दिसली नाहीस... आणि जर मी पोलिस स्टेशनला आलो असतो तर आपण दोघं असं चोरून-लपून का होईना पण पुन्हा कधीही भेटू शकलो नसतो", असं सांगत राहुलने पुन्हा तिची समजूत घातली.
एक दिवस कॉलेज सुटायच्या आधी एक लेक्चर बंक करून गार्गीने कायमचं राहुल बरोबर पळून जाण्याचा निर्णय घेतला.
एक दिवस कॉलेज सुटायच्या आधी एक लेक्चर बंक करून गार्गीने कायमचं राहुल बरोबर पळून जाण्याचा निर्णय घेतला.
आता मात्र मजा मस्ती करत केलेले प्रेम खऱ्या अर्थाने निभावण्याची वेळ येताच राहुल गांगरला. त्याने तिला 'जवळच्या मंदिरात जाऊन आपण लग्न करू', असं म्हणतात गार्गी देखील खुश झाली. मंदिरा बाहेरच्या तळ्याजवळ गार्गी आणि राहुल एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसलेली असताना शेजारीपाजाऱ्यांनी अनेकदा पाहिले होते.
परवा दिवशीचा पोलीस स्टेशनचा प्रकारही कितीही झाकून ठेवायचा म्हटला, तरीही आजूबाजूला कळलाच होता. 'गार्गी वाईट चालीची मुलगी असल्याची' बातमी सगळीकडे पसरली होती. 'मंदिरात नेऊन सिनेमात दाखवल्याप्रमाणे फक्त कपाळाला कुंकू लावलं म्हणजे लग्न झालं', असे समजणारी गार्गी अजूनही प्रेमाच्या धुंदीत होती.
रोज आई कॉलेजला ने आण करत असूनही कॉलेजच्या मधल्या तासांमध्ये गार्गी मात्र तिला हवं तसंच वागत होती.. आईला संशय येऊ नये म्हणून पुन्हा कॉलेज सुटायच्या वेळेला मात्र न चुकता कॉलेजमध्ये हजर असायची.
दिवसा मागे दिवस सरत होते.. बोल बोल म्हणता कॉलेज शेवटचं वर्ष संपलं. 'आता आपण कसे भेटायचं?' या विचारात असतानाच एक दिवस गार्गी आणि राहूल पुन्हा एका जवळच्याच मित्राच्या फ्लॅटवर भेटले. पण या वेळेस मात्र आईची तिच्यावर करडी नजर असल्याने आईने वेळीच जाऊन तिला फरफटत घरी आणले.
आईचा चढलेला आवाज आणि रडणारी गार्गी पाहून येणाऱ्या जाणाऱ्यांनी, शेजारी-पाजाऱ्यांनी जे काही समजायचे ते समजले. गार्गीचे शिक्षणही पूर्ण झाल्याने, तिचे लग्न लावून द्यायचे, असा ठाम निर्धार करत आईने स्थळं बघायला सुरुवात केली.

"माझे राहुल बरोबर लग्न झाले आहे", असे म्हणत तिने गळफास लावून घ्यायचा प्रयत्न केला.. कसंबसं त्या दिवशीही आईने तिचा तो प्रयत्न हाणून पाडला. लग्नासाठी कोणी एक मुलगा बघायला येणार आहे हे कळताच मात्र गार्गीने घरातून पळ काढला. राहुलला भेटून आज आपण काय तो सोक्षमोक्ष लावायचा, या विचारात ती राहुलने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचली.
माझं सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालंय गार्गी... आपल्यात प्रेमापेक्षा आकर्षण होतं फक्त... कॉलेज संपल्यानंतर माझं तुझ्यावर प्रेम नाही हे मला जाणवलं.. पण तू मात्र अशी हट्टाला पेटलेले होतीस.. म्हणून मी इतके दिवस ही गोष्ट तुझ्या पासून लपवून ठेवली..
माझ्या घरच्यांच्या सांगण्यावरून मी सहा महिन्यापूर्वी लग्न केलं", असं राहुलने सांगताच गार्गीला चक्कर यायचीच बाकी राहिली. घरातून निघताना "मी कायमच हे घर सोडून चालले आहे", अशी लिहिलेली चिठ्ठी तिच्या डोळ्यासमोर नाचू लागली. 'आतापर्यंत ती चिठ्ठी आईने वाचली असेल तर?'... 'आता मी ना घरी जाऊ शकते, ना कधीही राहुलची होऊ शकते', या विचाराने गार्गी आल्या पावली परत पळत सुटली. राहुलने आपल्याला फसवलं या भावनेने ती आतून पूर्णपणे खचली होती.
गार्गी विचारातच घरी परतली. आईने अजून पर्यंत चिठ्ठी वाचली नव्हती... परंतु गार्गी मात्र घरात आले आले सतत रडत होती.. तिने रडत रडत आईला घडलेली हकीगत सांगितली आणि एका क्षणात गार्गीने देवासमोरचा दिवा हातात घेतला आणि तो पेटता दिवा ड्रेसला लावला. आगीच्या ज्वाळा उसळल्या. आई बाबा आणि शेजाऱ्यांनी पटकन ती आग विझवत ऍम्ब्युलन्स बोलवून घाईघाईने गार्गीला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले.

गार्गी चे केस पूर्णपणे जळाले होते. अत्यंत गंभीररीत्या भाजल्याने तिच्या वाचण्याची शक्यता खूप कमी होती. दिसायला अतिशय देखणी असलेली गार्गी क्षणार्धात विद्रुप बनली होती.
डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर गार्गीचा जीव तर वाचला, परंतु तिची वाचा कायमची गेली होती. चेहऱ्यावर आणि संपूर्ण अंगावर भाजल्याच्या जखमा होत्या.. कालांतराने त्या जखमा भरल्या गेल्या, परंतु तिने वाचा मात्र कायमची गमावली होती.

फसगत झालेल्या प्रेमापोटी तिने अख्खं आयुष्य उध्वस्त करून घेतलं होतं. आता घरात दिवसभर एका कोपऱ्यात बसून अश्रू ढाळत बसणं, एवढंच काय ते उरलं होतं. तिच्या या सार्या प्रकारची बातमी राहुल पर्यंत कधीच पोहोचली होती, परंतु आपला आणि गार्गीचा कधी काळी कुठल्याही प्रकारचा संबंध होता, याकडे मात्र त्याने साफ दुर्लक्ष केलं.
तिच्या या प्रकाराला तो किती गंभीररित्या जबाबदार होता, हे त्याने सहजपणे नाकारलं होतं. तो त्याच्या सुखी संसारात मग्न झाला होता. राहुलच्या विरोधात तक्रार करायला निघालेल्या बाबांना मात्र गार्गीने अडवलं आणि म्हणाली ,"बाबा, त्याने मला फसवलं... पण माझं आजही त्याच्यावर तितकंच प्रेम आहे".. माझ्या या अवस्थेला त्याच्यापेक्षा जास्त मी जबाबदार आहे".. कारण स्वतःला संपवण्याचा निर्णय माझा मी घेतला होता"..
तिच्या कायम अशा अविचारी वागण्यानेच खरं पाहता आज तिची ही अवस्था होऊन बसली होती. एकामागे एक येणार्या संकटांनी होरपळून निघालेल्या आई-बाबांना मात्र जगणंच नकोसं होऊन बसलं होतं. कायम मानाने जगता दिला आई बाबांना ,'मुलीकडे लक्ष दिलं नाही', म्हणत समाजाने त्यांच्या यातनांमध्ये आणखी भर घेतली होती.
गार्गीचे बाबा तिची ही अवस्था बघून खचून गेले होते. समाजात तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. ऐन पंचविशीतल्या मुलीची इतकी दयनीय अवस्था पाहून काळीज पिळवटून जायचं...
गार्गीचे बाबा तिची ही अवस्था बघून खचून गेले होते. समाजात तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. ऐन पंचविशीतल्या मुलीची इतकी दयनीय अवस्था पाहून काळीज पिळवटून जायचं...
जवळपास तीन वर्षानंतर आज गार्गी पहिल्यांदा आरशासमोर उभी राहिली होती. इतक्या वर्षात विद्रूपतेला घाबरून आजपर्यंत तिने आरशाचा सामना केला नव्हता. स्वतःचं ते काळवंडलेलं रूप पाहून मोठ्याने हंबरडा फोडत तिचं मन आज आतल्या आत आक्रंदत होतं... 'काय होतीस तू आणि काय झालीस तू', असं म्हणत तो मूक हंबरडा किती जीवघेणा होता, हे फक्त तीच जाणत होती.
अल्लड वयातल्या त्या अक्षम्य चुकीची शिक्षा यापुढे तिला आयुष्यभर भोगायची होती. समाजात झालेल्या बदनामीमुळे यापुढेही आयुष्यात तिला जोडीदार मिळण्याची शक्यताही दुरापास्त झाली होती... उरला होता तो फक्त काळाकुट्ट भूतकाळ...
वाचकहो, अल्लड वयात अनेक मुलं-मुली अशा आकर्षणाला प्रेम समजतात. आणि त्या आभासी प्रेमापोटी स्वतःच्या जिवाचं बरं-वाईट करून घेण्याची नसती डेरिंग करतात. अन् मग कधी असं जीवघेणं जगणं अनेकांच्या वाट्याला येतं, तर कधीकधी अनेकदा जीव गमावल्याच्याही घटना आपण पाहतो. परंतु ज्यावेळी आई-वडील आपल्या भल्यासाठी झटत असतात, तेव्हा मात्र डोळ्यावर प्रेमाची ही असली झापडं पांघरलेली असतात.. आपल्या डोळ्यासमोर मुलांनी जीव गमावताना पाहून, त्या आई-बापाच्या काळजाची अवस्था मात्र दयनीय असते. अशा प्रसंगाने फक्त एक आयुष्यच नव्हे, तर अख्ख कुटुंब उद्ध्वस्त होतं... आणि मग उरतात त्या फक्त भयावह आठवणी.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...