© वर्षा पाचारणे.
"मृणाल, तू कोण कुठली मुलगी आणि माझ्या नितीनचा हात धरून या घरात घुसली. त्याचा हट्ट म्हणून तुला आम्ही सून म्हणून स्वीकारली, पण आमच्या मनात मात्र तू कायम परकीच राहशील... त्याला जातीपातीचा विसर पडला असेल, पण म्हणून आम्ही आमची तत्त्व सोडली नाहीत.. तू या घरात आहेस ती नितीनची बायको म्हणून... पण म्हणून सुनेच्या नात्याने आमच्या कुठल्याही विषयात लुडबुड केलेली आम्हाला चालणार नाही"... असं भल मोठ्ठं लेक्चर देत नितीनच्या आईने मृणालला नको तसे ऐकवले.
अशी टोमणेबाजी आता रोज तिच्या नशिबी होती.. सासुबाईंचे असे बोलणे ऐकताना ती नकळत भूतकाळात जाऊन डोकवायची.
मृणाल एका छोट्याश्या खेड्यात लहानाची मोठी झालेली मुलगी. गाई म्हशींचे दूध काढणे, शेणाने जमीन सारवणे, शेतात आई आबांना मदत करणे, आणि मस्त स्वच्छंदी जगणं असे तिचे लग्नाआधीचं आयुष्य होतं.
मृणाल एका छोट्याश्या खेड्यात लहानाची मोठी झालेली मुलगी. गाई म्हशींचे दूध काढणे, शेणाने जमीन सारवणे, शेतात आई आबांना मदत करणे, आणि मस्त स्वच्छंदी जगणं असे तिचे लग्नाआधीचं आयुष्य होतं.
तिच्या दोन खोल्यांच्या छोट्याश्या घरासमोर तिने स्वतः छान तुळशवृंदावन बनवले होते. रोज सकाळी तुळशीला पाणी घालून, हात जोडून एक सुंदर भजन म्हणत तिची सकाळ अगदी प्रसन्न व्हायची.
तिच्याच गावात नितीनचा कॉलेजचा मित्र राहत होता. एक दिवस सारेच मित्र पावसाळी सहलीच्या निमित्ताने त्या मित्राच्या गावी गेले होते. त्या दिवशी असाच गावात फेरफटका मारताना नितीनला दोन वेण्या घातलेली, साध्याच पण उठावदार रंगाच्या पंजाबी ड्रेसमधली, आणि डोळे मिटून हात जोडून तुळशी समोर उभी असलेली मृणाल नजरेस पडली.
पहिल्या भेटीतच बघताक्षणी प्रेम व्हावं अशी काहीशी अवस्था नितीनची झाली. दोन दिवसाच्या त्या गावातील मुक्कामात नितीनने किमान सात आठ वेळा तिच्या घराच्या आजूबाजूला चकरा मारल्या असतील..
पुन्हा महिन्याभराने असंच भटकंतीसाठी त्याने त्याच गावी जायचं ठरवलं.. मित्राला त्याने गावातील 'ती' मुलगी मला मनापासून आवडली असं सांगताच त्याचा मित्र अमित म्हणाला," भावड्या, तुला मृणाल आवडली तरी काय करणार.. ती अतिशय साध्या आणि सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. तुझ्यासारख्या श्रीमंताच्या घरी ती सून म्हणून कधीच पटणार नाही".. तरीही नितीनने घरी जाऊन आईला आणि वहिनीला ही गोष्ट सांगितली...

घरातल्यांनी मुलगी बघण्याआधीच छोट्याशा खेड्यातील मुलगी म्हणून तिला गावंढळ ठरवत लगेच नकार दर्शवला. "एक दोनदा त्या गावात जाऊन त्या मुलीला पाहिलंस काय आणि लगेच तिच्या प्रेमात पडलास काय! हे फक्त आकर्षण असतं नितीन... संसार करण्यासाठी फक्त आकर्षण पुरेसं नसतं".. असं म्हणत आईने नितीनचा विचार बदलण्याचा खूप प्रयत्न केला.
"पण अगं आई, अमितने आणि त्याच्या आईबाबांनी ती मुलगी स्वभावाने, संस्कारांनी खूप चांगली आहे, असे सांगितले आहे मला'...
'छोट्या खेड्यातली असूनही शिकलेली आहे ती... आणि शिवाय दिसायलाही छान आहे. याहून वेगळं तुला आणखी काय हवंय?'.. असं म्हणत नितीन आपली बाजू मांडत होता.
तरीही आई काही केल्या तयार होईना.. शेवटी खूप विनवण्या करून देखील आई ऐकत नाही म्हणून नितीन काही महिने शांत राहिला.
त्याला आता उत्तम पगाराची नोकरी मिळाली होती. नोकरीत वर्षभरात मिळालेल्या बढतीनंतर त्याने गावी जाऊन मृणालच्या आई-बाबांशी बोलण्याचा निर्णय घेतला.
शहरातील नितीनला आपल्या मुलीला मागणी घालायला आलेलं बघताच मृणालच्या आई-वडिलांना आनंद झाला. पण मग बोलण्या बोलण्यात दोन्ही घरची जात वेगवेगळी आहे, हे कळताच मृणालचे बाबा लग्नाला नकार देऊन मोकळे झाले.
शहरातील नितीनला आपल्या मुलीला मागणी घालायला आलेलं बघताच मृणालच्या आई-वडिलांना आनंद झाला. पण मग बोलण्या बोलण्यात दोन्ही घरची जात वेगवेगळी आहे, हे कळताच मृणालचे बाबा लग्नाला नकार देऊन मोकळे झाले.
खरंतर त्यांना मनापासून नितीन आवडला होता, परंतु आधीच वेगवेगळ्या जाती आणि त्यात श्रीमंताचं पोर म्हटल्यावर हे लग्न जुळणारच नाही, अशी त्यांची खात्री होती. मृणाललाही त्या दिवशी बघताक्षणी नितीन आवडून गेला. आई-बाबांनी कसेही करून संमती द्यावी, अशी ती मनोमन रोज तुळशीकडे प्रार्थना करत होती.
एक दिवस असंच डोळे झाकून तिच्या मनातली प्रार्थना तुळशीपुढे पुटपुटत असताना ते बाबांनी ऐकलं.. आपली लेक त्या मुलाबरोबर लग्न करण्यासाठी मनातल्या मनात झुरत आहे, हे ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं. ते मृणालला म्हणाले,"बाळा तुझी इच्छा असेल तर मी एकदा त्यांच्या घरी जाऊन बोलून बघतो".. पण एवढ्या मोठ्या श्रीमंताच्या घरी आपल्या वडिलांनी लग्नासाठी जोडे झिजवावे, असं मृणालला मुळीच वाटत नव्हतं. तिने बाबांना जाण्यासाठी नकार दिला. आता तिच्या मनातले दुःख ती मनातंच कुरवाळणार होती.
काही दिवसांनी नितीन पुन्हा मृणालच्या आई बाबांना भेटायला आला.. यावेळी नितीनची आईदेखील त्याच्यासोबत होती. नितीनच्या आईच्या मनात मृणाल बद्दल खरेतर कडवट भावना असूनही लेकाच्या आनंदासाठी त्यांनी हे लग्न पार पाडलं.

लग्न होऊन मृणाल देशमुखांची सुन झाली. घरी लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. आई-बाबा देखील लेकीच्या घरी पहिल्यांदाच आले होते. दारात पाय, घरात पाय तोच नितीनची आई मृणालच्या आईला बाजूला घेत म्हणाली,"हे पहा, आम्हाला हे लग्न मान्य नसलं, तरी आमचा लेक हट्टालाच पेटला आहे म्हटल्यावर आमचा नाईलाज झाला आहे. केवळ त्याच्या हट्टापायी मी या लग्नाला होकार दिला आहे. परंतु ती सून म्हणून आम्हाला कधीही मान्य नव्हती. त्यांचं असं बोलणं ऐकताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली.
'आपली लेक खरंच या घरात सुखी राहील ना?' या विचाराने त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी तरळलं.. त्यांचं बोललो मृणालच्याही कानावर पडलं होतं.. तिने आई-बाबांना निरोप देताना डोळे पुसत सांगितलं ,"आई, हे बघ.. इथे माझी पाठराखीण आहेच की".… आईला तिच्या बोलण्यातला काहीच अर्थ कळेना.
आईने 'कोण' म्हणून विचारण्याआधीच मृणालने तुळशी वृंदावनातील तुळशीकडे बोट दाखवले. 'तिच्याकडे काही मागितलं आणि तिने मला दिलं नाही, असं आज पर्यंत झालं नाही'.. 'मग या घराच्या सुखाबरोबरच, मी माझ्या संसाराचे सुख देखील तिच्याकडेच मागणार आहे'. आता मात्र मायलेकींचा डोळे नकळत पाझरु लागले होते..
त्यानंतर आयुष्यात प्रत्येक वेळी 'तू आमच्या जातीची नाहीस, तू गरीब घरातली आहेस, म्हणून नितीनची आई आणि वहिनी तिला कायम हिणावत राहिल्या. परंतु त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मृणालने मात्र कधीही उलट उत्तर म्हणून दिले नाही. एक दिवस अपघातात नितीनचा मोठा भाऊ मृत्युमुखी पडला. सारं घर दुःखाने कोसळलं.. तो धक्का सहन न होता सासऱ्यांना देखील हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

घरात नुसती शोककळा पसरली होती. अशातच सारा दोष मृणालला देत आता या दोघीही जणी तिचं जगणं नकोसं करून सोडत होत्या. 'तूच अपशकुनी पायाची आहेस, म्हणून भरल्या घराचं असं वाटोळं झालं', असं म्हणत तिला पदोपदी दुखावत होत्या...
मृणाल मात्र त्यांचं दुःख समजून घेत, रोज तुळशीकडे त्यांच्या आरोग्याची आणि सुखाची प्रार्थना करत होती. काही दिवसांनी नितीनला देखील नोकरीनिमित्त वर्षभरासाठी दुबईला जावं लागणार होतं.
मृणाल मात्र त्यांचं दुःख समजून घेत, रोज तुळशीकडे त्यांच्या आरोग्याची आणि सुखाची प्रार्थना करत होती. काही दिवसांनी नितीनला देखील नोकरीनिमित्त वर्षभरासाठी दुबईला जावं लागणार होतं.
मृणालला आपल्या सोबत नेण्याची त्याची खूप इच्छा होती, परंतु मृणालने मात्र इथेच थांबत आई आणि वहिनीची काळजी घेण्याचं त्याला आश्वासन दिलं... 'संकटात आपल्या माणसांना एकटं सोडून जाण्याची माझी वृत्ती नाही', असं म्हणत तिने साऱ्या घराचा भार सांभाळण्याची तयारी दाखवली. 'आपल्यामागे आई आणि वहिनी मृणालचा खूप छळ करतील' या विचाराने त्याने शंभर वेळा मृणालला सोबत येण्याचा आग्रह केला, परंतु ती मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती..
मृणालने साऱ्या घराची जबाबदारी पेलत स्वतःचा शिवणकाम व्यवसाय सुरू केला.. चार-पाच महिन्यातच चांगला जम बसल्याने, तिने घरातच एका खोलीत तिचे बुटीक सुरू केले. उत्तम प्रतिसाद मिळत गेला.. तिचं असं कर्तबगारीनं वागणं पाहून नितीनच्या आईचेही तिच्याबद्दलचे ग्रह बदलले.

वहिनींना तर ती अगदी मोठ्या बहिणीप्रमाणे जीव लावत असल्याने त्यांच्याही मनातील तिच्याविषयीचं विनाकारण असलेलं किल्मिष दूर झालं.
त्या अंगणातल्या तुळशीने लहानपणापासून दिलेली साथ, कदाचित सासरीही अगदी तशीच सांभाळली असावी.. परक्या जातीची म्हणून हिणवली गेलेली मृणाल आता खऱ्या अर्थाने त्या अंगणातली तुळस बनून घराला प्रसन्न ठेवत होती.
जाती तर माणसाने बनवल्या आहेत, परंतु जातीपातीच्या बंधना पलीकडे जात माणसाने माणूसपण जपलं, तर कुठलीही नाती बहरायला वेळ लागणार नाही. मृणालच्या सुखी संसाराला पाहून आता अंगणातली तुळसही नव्याने बहरू लागली होती. जातीपेक्षा मनं जपणारी ही पर जातीची 'मंजिरी' कायमची सासरच्या अंगणात विसावली होती.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...