© नीलिमा देशपांडे
"आई बाबा, तुम्ही दोघे आज पटकन आवरत का नाहीत रोजच्या सारखं? आंघोळ करून लवकर तयार व्हा ना, आपल्याला जायचं आहे. उशीर झाला तर तिथे केक कटिंग होवून जाईल. मला ते बघायचं आहे. खुप मज्जा येते त्यात. मला मागच्या वेळी बघायला नाही मिळाली ती मजा. आवरा पटकन ! उठा....उठा आधी तुम्ही!!"
आम्हांला काही कळण्याइतका वेळ देईल तो अथर्व कसला ? त्याची स्वत:शीच इतकी बडबड चाललेली होती की त्याचं शंका विचारणं आणि बोलणं थांबल्या शिवाय आम्हांला काही उलगडा होणार नव्हता की, नेमकं कुठे जायचं म्हणतोय हा!
2 ऑक्टोबरला गांधी जयंती ची सुट्टी असल्यामुळे आम्ही दोघेही घरातच होतो आणि सुट्टीचा सदुपयोग करावा या उद्देशाने घरात साफ सफाई करावी असं आम्ही ठरवलं होतं. त्याच्या पुढच्याच आठवड्यात सुरू होणाऱ्या नवरात्रा निमित्त घर आधीच साफ झालेलं बरं हा विचार डोक्यात ठेवून आम्ही सकाळीच उठून कामाला लागलो. आमचा सगळा पसारा काढून झाला आणि तेवढ्यात डोळे चोळत बाहेर आलेला अथर्व आधी तर त्याला
"रोजच्या सारखं लवकर का नाही उठवलं?"
यावरून भुणभुण करत होता.

"कशाला लवकर उठायचं होत तुला? सुट्टी आहे ना आज म्हणून तर आम्ही पण हे काम काढल" असं सांगितल्यावर.....
"आपल्या सगळ्यांना वाढदिवसासाठी जायचं आहे त्यामुळे आजही लवकर उठणे आणि तयार होणे किती गरजेचे आहे..." हे तो आम्हाला पटवून देत होता.

आधी वाटले याने स्वप्न पाहिले असेल आणि ते आठवून हा बाहेर जायचे म्हणतोय.
"संध्याकाळी जावू आपण"...
त्याला शांत करण्याचा एकच उपाय तो म्हणजे आधी त्याला "हो" म्हणा, मग बोला. त्यामूळे तो नीट ऐकतो आणि नीट ऐकले की त्याला आपल्या गोष्टी पटतात आणि खुपदा ज्या गोष्टीचा हट्ट चालला असेल ती तो स्वत:च रद्द करतो. मला वेळ मिळावा म्हणून सर्वात आधी त्याला त्याच्या बाबांसोबत आंघोळीला पाठवून देण्याचे मी ठरवले.

म्हणजे तोपर्यंत निदान कोणाचा वाढदिवस आहे हे आपण विसरलो असूत तर शांततेत आठवता येईल आणि काढलेला पसारा निदान बाजूला सरकवून थोडाफार खाण्यापिण्याचं काही करता येईल या विचाराने मी त्याला आधी जे म्हणतोय त्यासाठी 'होकार' देत सचिनवर ती ज बाबदारी टाकत आंघोळीला पिटाळलं आणि किचनकडे वळले.
माझ्याकडे त्या दोघांची आंघोळ होईपर्यंत थोडा वेळ आहे अशा भ्रमात मी असतानाच दुसऱ्या मिनिटाला टॉवेल गुंडाळलेला अथर्व बाबांनी बाथरूमच्या बाहेर माझ्याकडे पाठवला.
"आज एवढ्या लवकर कशी काय अंघोळ आटोपली? एकमेकांवर पाणी उडवत तुम्ही दोघे एक दूसऱ्याला अंघोळ घालता आणि मग आवाज द्यावा लागतो तेव्हा बाहेर येता! मग आज काय घाई आहे ?"
हे विचारल्याल्यावर मला सचिन कडून समजले,
"फारच घाई आहे त्याला, त्यामुळे आज बाबांसोबत खेळण नकोय आणि आंघोळ पण अगदी घाईघाईत करून हवी होती. पुढच्या दुसऱ्या मिनिटाला मी पण बाहेर येतोय आणि तुलाही दोनच मिनिट मिळणार आहेत...आपण शिकवलेले शब्द आपल्यावरच प्रयोग करणे चालू आहे त्यामुळे तयार हो लवकर. कोणीतरी खास मित्र दिसतोय ज्याच्या वाढदिवसाला आपल्याला जायचंय. गिफ्ट काय द्यायचे ते काढून ठेव आणि पत्ता पण विचार त्याला मित्राचा? कुठे राहतो, घर माहिती आहे का? तोवर आलोच मी"
मला हे सांगून सचिन बाथरुममधे शिरला. अंघोळीच्या वेळी सचिन त्याच्याशी काही बोलेल आणि त्याला विचारून घेईल, तोपर्यंत मी किचनमधे काही खाण्याचे बनवेल असं मला वाटत होतं पण शेवटी ती जबाबदारी माझ्याच मजबूत खांद्यांवर येऊन पडली.

मग अथर्वला तयार करता करता आधी तर हे समजण्याचा प्रयत्न केला की 'केक' म्हणजे काय आहे ? हे त्याला नक्की माहिती आहे का? आपण कधी घरी केक आणलेला नाही. या शहरात अजून नवीनच आहोत त्यामुळे फारशी ओळख झाली नाही आणि कधी कोणाच्या वाढदिवसाला गेलेलो नाही. मग त्याला केक काय हे कुठून समजले?
बोलताना समजलं की, त्याच्या मित्राचा परवा वाढदिवस झाला. त्याच्या घरी त्याने केक कट केला होता. केकचा छोटा पीस तो शाळेत त्यादिवशी डब्यात खाऊ म्हणून घेऊन आला होता आणि अथर्व सोबत त्याने तो शेअर केला. वाढदिवसाच्या गमतीजमती रंगीत फुगे, गिफ्ट पेक्षाही खूप जास्त कुतूहल असलेला मोठा डोरेमॉनचा केक आणला गेला होता आणि कुणाचाही वाढदिवस असला की सगळे हे त्यांच्या घरी हे आणतातच ही सगळी माहिती त्याला मित्राकडून समजली होती.
आता 'डोरेमोन कोण?' हे त्यावेळी अथर्वला फारसं समजलं नसणार कारण तोपर्यंत आम्ही टीव्ही घेतलेला नव्हता. पण आपण खातोय त्यापेक्षा खुsssप मोठा पोळीपेक्षा सुद्धा मोठा असतो केक, हे त्याला कळले होते आणि त्या चवीची चटक त्याच्या जिभेला पहिल्याच घासात लागली असावी.

आम्ही आमच्या परीने चॉकलेट, केक अशा गोष्टींपासून त्याला दूर ठेवण्याचा अडीच वर्षे प्रयत्न केला होता. अडीच वर्षाचा झाल्यावर नर्सरीत त्याची ऍडमिशन घेतली तेव्हा आता हळूहळू त्याला या गोष्टी समजायला लागतील अशी आम्ही मानसिक तयारी देखील ठेवली होती
तो शाळेत जायला लागल्यापासून घरी आल्यावर त्याच्याशी भरपूर गप्पा व्हायचा तो स्वतः अखंड बडबड करत शाळेत आणि दिवसभर पाळणाघरात काय झाले हे सांगण्यात गुंतलेला असायचा. त्याच्या गोष्टी ऐकता ऐकता मी घरातली कामं उरकायचे.

कधी बोलण्याच्या नादात खेळणीच्या मागे तो दुसर्या खोलीत निघून जायचा आणि तसाच बोलत-बोलत परत यायचा.अशाच एखाद्या दिवशी त्याने कदाचित "केक पाहिला आणि खाल्ला" हे सांगितले असावे जे मी ऐकू शकले नसेल. अर्थवला केक कसा माहिती झाला? हे समजल्यानंतर एक मिशन तर पूर्ण झालं होतं. त्यामुळे आता कुठल्या मित्राकडे वाढदिवसाला जायचे आहे ही माहिती मिळवण्याचे दुसरे मिशन सचिन वर सोपवून मी स्वतः तयार व्हायला गेले.
गाडी चालवताना बाबांना रस्ता सांगत, पुढे जाताना अथर्वचा उत्साह आणि आनंद त्याच्या आवाजात जाणवत होता. गाडी त्याच्या शाळेकडे जात आहे हे कळत असूनही तिथे जाण्या शिवाय पर्याय नव्हता. शाळा आणि पाळणाघर एकच असल्याने कदाचित सुट्टी असली तरी कुणी पालक थोडावेळ मुलाला सोडायला आले असतील असे वाटून बाहेर आलेल्या मीना मॅडमला, आम्हांला पाहून आश्चर्य वाटले कारण आम्ही तयार होवून हातात गिफ्ट घेवून त्यांच्या दारात उभे होते.
"अथर्वने आम्हांला आज वाढदिवस आहे आणि त्यासाठी त्याला केक कट होण्याआधी लवकर पोहचायचे आहे हे सांगून इथे आणले आहे...नेमका कुणाचा वाढदिवस आहे? याची काही कल्पना नाही त्यामूळे आम्ही त्याने रस्ता सांगितल्या प्रमाणे इथे आलो आहोत...आज तुमच्या मुलीचा 'परी दीदीचा' वाढदिवस आहे का? "
हे ऐकून मीना मॅडमला खदखदून हसू आले आणि त्यांनी दिलेले उत्तर ऐकून आम्हांलाही....
छोट्या मुलांना उदया सुट्टी आहे सांगितले की ते खुश होतात.

अथर्वने मला, "उद्या नेमकी कशाची सुट्टी आहे? आणि आई बाबांना सुट्टी नसेल तर मी पाळणाघरात येवू शकतो का?" विचारलं होत. 2 ऑक्टोबरची सहसा सर्वांना गांधी जयंतीची सुट्टी असते पण तसे सांगितले तर याला कळेल का? आणि याचे प्रश्न सुरु होतील म्हणून मी त्याला सोपे करुन सांगितले की,
"उदया गांधीजींचा वाढदिवस आहे त्यामूळे शाळेला सुट्टी आहे." हयाने तरी मला विचारलं की "त्यांचा वाढदिवस शाळेत होतो का?" मोठी मुले ट्यूशनला आली की भाषण करतात, हार घालतात त्यामुळे मी याला "हो" होतो साजरा सांगितले होते....
मी समजावते त्याला. आमची परीदीदी हॉस्टेलमधून नुकतीच घरी परतली आहे म्हणून आम्ही केक आणलेलाच होता. अर्थवमुळे आज आपण गांधीजींचा वाढदिवस केक कट करुन साजरा करावा असे मलाही वाटते हे सांगेपर्यंत केक बाहेर आणला गेला आणि परीदीदी सोबत अथर्वने केक कट केल्यावर एकदाची केकची मिस्ट्री गांधीजींच्या वाढदिवसाची होती हे आठवून परत सगळे हसले.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
Tags
relationships