©अनुराधा पुष्कर
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
अजय आणि नीता दोघेही नोकरी करत होते ..दोघांचे लव्ह मॅरेज होते ...घरच्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता त्यामुळे हसी खुशीने लग्न पार पडलं होते.
नीताच्या घरी मोकळं वातावरण होत..ती , तिचा भाऊ आणि आई वडिल असा छोटा परिवार होता . अजय कडे तो, त्याची आई, वडिलअसे रहात होते. त्यांच्या लग्नाला दोन्ही घरांची संमती होती .काही नातेवाईक होते जे जुन्या विचाराचे होते पण त्यांची पर्वा कोण करतंय?
नीता सगळं काम आवरून ऑफिसला जायची .सुमन ताई म्हणजे नीताच्या सासूबाई समंजस होत्या. मृदु स्वभावाच्या होत्या.
त्यांना माहित होतं कि शहरात दोघांना कमवावं लागतं आणि संसाराचा गाडा ओढावा लागतो. त्यामुळे त्या कधी नीताला नोकरीबद्दल बोलत नसत.
त्यांनी त्यांच्या मुलाला ही छान संस्कार दिले होते ..तो स्वावलंबी होता ..त्याला माहित होते कि एका बाईच्या यातना काय असतात ..सुमन् ताईंनी त्याला हे शिकवले होते कि एक बाई जेव्हा घर सोडून येते तेव्हा ती काय काय त्याग करते.
लग्नानंतर एक मुलगी कश्याप्रकारे बदलते ह्याची हि जाणीव अजय ला होती ..तो आपल्या आईची जितकी काळजी घ्यायचाातितकीच तो नीताची हि घ्यायचा.
आजही दोघे दमून आले होते ..त्यांना माहित नव्हते कि घरी वासंती मावशी आल्या आहेत ते ..वासंती मावशी म्हणजे सुमनताईंच्या मोठ्या बहिणाबाई ..स्वभावाने कडक,स्वतःच्या सुनेला एकदम धाकात ठेवणाऱ्या, त्यांना नेहमी वाटे की सुमन ने सुनेला जरा जास्तच मोकळीक दिली आहे.
त्यांना सुमनताईंच्या घरातील मोकळं वातावरण जरा खटकत असे ..त्या बर्याचदा फोनवर किंवा सुमन ताईंना भेटल्यावर उगीच सल्ले देत असत पण सुमन ताई लक्ष देत नव्हत्या. आज त्या सहज म्हणून सुमन ताईनं कडे आल्या होत्या. त्या दोघी सुमन ताईंच्या रूम मध्ये बसल्या होत्या ..
"ए अजय ,जरा चहा बनवतोस का ? मला बनवायचं कंटाळा आला आहे आज ."- नीता ने विचारले . अजय आणि निता आत मध्ये येत होते आणि घरात आल्यावर चावी दाराच्या मागे लावत निताने विचारले ,तस अजय ने मान डोलावली आणि हात पाय धुवून चहा बनवायला गेला .
"ए अजय ,जरा चहा बनवतोस का ? मला बनवायचं कंटाळा आला आहे आज ."- नीता ने विचारले . अजय आणि निता आत मध्ये येत होते आणि घरात आल्यावर चावी दाराच्या मागे लावत निताने विचारले ,तस अजय ने मान डोलावली आणि हात पाय धुवून चहा बनवायला गेला .
तिकडून घरी आलेल्या मावस सासूबाई हे बघत होत्या . त्यांनी सहजच विषय काढला आणि त्या नीताच्या सासूबाईशी बोलू लागल्या. "बर का ग सुमन ,आज काल सगळं अवघड झालाय बघ ,अग जिकडे पाहावं तिकडे सुना सुद्धा नोकरी करतात आणि त्यांना घरच काम नको असते ,जरा काही झालं कि लगेच नवर्यांना हुकूम सोडतात अरे हे काम कर ,ते काम कर .आमच्या शेजारी सुद्धा असेच एक जोडपे राहते .
दोघेही जातात कामाला आणि मग काय ती मुलगी सगळं करून घेते नवऱ्याकडून बाहेरून आले कि तिचा नवरा च चहा बनवतो ,कधी कधी तर जेवण हि बनवतो.
मागच्या रविवारी सुट्टी होती म्हणून मी त्या दोघांना घरी केलेलं लोणचं द्यायला गेले , बघितले तर काय तो बाबा घराची साफ सफाई करत होता. बायकोला अगदी डोक्यावर चढवून ठेवलं आहे .बाई ,बाई बाई ,आमच्यावेळेस नव्हता हो असं .ह्यांना तर आजही चहा पाणी हातात लागत . बाकीचं तर दूरच राहील .तुला सांगते सुमी ,आज कालच्या मुली म्हणजे ना नुसत्या आयात खाऊ झाल्या बघ, बाहेर जाऊन कमवतात तर घरातली कामे करायला कमी पणा येतो ह्यांना आणि मुलांचं तर काय विचारूच नको .लग्नाआधी आई ने थोडं काही काम सांगितले तर लगेच नाक मुरडतात आणि बाहेर काम आहे म्हणून निघून जातात ,आणि तीच मुलं लग्न- नंतर जोरू का गुलाम होऊन बसतात .."वासंती मावशी बोलत होत्या .
त्यावर सासूबाई म्हणाल्या "अग ताई ,असं नसते आपल्याला काय माहित त्यांच्या घरची परिस्थिती .?".
एव्हाना नीता आणि अजय ला कळलं होत कि मावशी आल्या आहेत ...अजयचा चहा बनवून होईपर्यंत नीता फ्रेश होऊन तिथे आली आणि अजय हि चहा घेऊन आला.
"काय म्हणता मावशी कश्या आहात?"-नीता
"मी बरी आहे हो .अजूनही सगळं आपल्या हाताने करते .."-मावशी .
एव्हाना नीता आणि अजय ला कळलं होत कि मावशी आल्या आहेत ...अजयचा चहा बनवून होईपर्यंत नीता फ्रेश होऊन तिथे आली आणि अजय हि चहा घेऊन आला.
"काय म्हणता मावशी कश्या आहात?"-नीता
"मी बरी आहे हो .अजूनही सगळं आपल्या हाताने करते .."-मावशी .
सुमन ताई गालातच हसत होत्या ...त्यानं महित होत कि आज पुन्हा एकदा वासंती ताईंचा आणि नीता चा एखादा एपिसोड बघायला मिळणार आहे ते ..जेव्हापासून नीता च लग्न झालं होत तेव्हापासून बरयाचदा नीताचे आणि त्यांचे खटके उडालेले होते ..
नीता सरळ बोलणारी होती तिला पाठीमागे बोलणारे लोक आवडत नव्हते ....सुमन ताईचं आणि वासंती मावशीच संभाषण नीता आणि अजय दोघांनाही ऐकलं होतं.
मग नीता म्हणाली " मावशी ,वाईट वाटून घेऊन नका पण तुम्ही जे बोलत होता ते तुमच्या नजरेतून ,पण जर एखाद्या नवऱ्याने बायकोला मदत केली तर काय बिघडले? संसार दोघांचा असतो ,घर दोघांचं असते तर मग घरातली कामे हि दोघांची च असतात, नाही का ?
मग नीता म्हणाली " मावशी ,वाईट वाटून घेऊन नका पण तुम्ही जे बोलत होता ते तुमच्या नजरेतून ,पण जर एखाद्या नवऱ्याने बायकोला मदत केली तर काय बिघडले? संसार दोघांचा असतो ,घर दोघांचं असते तर मग घरातली कामे हि दोघांची च असतात, नाही का ?
तुमच्या बाजूला जे जोडपे राहते त्यांचच बोलायचं झालं तर मी म्हणेन कि ते दोघे हि बाहेर जातात आणि पैसा कमवतात ती सुद्धा दमून जात असेल ,त्याने केला चहा तर कुठे बिघडले आणि सुट्टीच्या दिवशी अनेक काम असतात त्यात जर त्याने साफ सफाई केली तर त्यात कमीपणा तो काय ?
तुमच्यावेळेस असं नव्हतं किंवा तुमचा नवरा तुम्हाला मदत करत नाही म्हणून आता जे मुलं मदत करतात ते चुकीचे कस काय ठरू शकत ? खर म्हणजे जेव्हा नवरा बायको हे दोघेही घरासाठी काही करतात तेव्हा त्यांच्यातलं प्रेम वाढायला मदत होते ,ते एकमेकांचा आदर करतात आणि आपली पुढची पिढी देखील त्यातून बरेच काही शिकते ना?
मुलांसमोर जर नवरा नेहमी आपल्या बायकोवर हुकूम सोडत असेल तर पुढे चालून ती मुलं त्यांच्या आईवर फक्त हुकूमच चालवतात आणि बायकोवर सुद्धा तेच प्रयोग करतात ..पण ह्यातून हि साखळी अशीच चालू राहते आणि समजा बायको माहेरी गेलेली असली,किंवा तिला बरे नसेल तर आणि जर नवऱ्याला स्वयंपाक किंवा साधा चहा सुद्धा करता येत नसेल तर त्याची काय अवस्था होईल?
त्याला साधा चहा नाश्ता सुद्धा येत नसेल तर बायको किंवा आई विना उपाशी मरेल तो ..आजकाल बाहेर सगळं मिळत पण त्या पैसे हि तितकेच मोजावे लागतात .
आज काल धावपळीचं जग आहे ,दोघांनी बाहेर पडून पैसे कमावणे आवश्यक आहे ,घरात मोठे कोणी नसते मग अश्यावेळी जर घरातल्या पुरुषाला काही करता येत असेल तर ते त्याच्यासाठीही उपयोगीच आहे ना ?
हे तर झालं नोकरी करणारी महिलांविषयी पण ज्या स्त्रिया नोकरी करत नाही ,ज्या घरी राहून सगळ्या जाबदाऱ्या पार पाडतात त्यांना हि कधीतरी मदतीची गरज असते, त्या काय फक्त घर काम करण्यासाठी म्हणून लग्न करून येत नाही ..हो ना ..आणि नवऱ्याने जरासं काही बायकोच ऐकलं किंवा काम केलं तर तो काही लगेच जोरू का गुलाम होत नाही.
संसाराची दोन्ही चाके बरोबरीने चालली तरच संसार सुखाचा आणि सुरळीत होतो ..असं माझं तरी मत आहे .मावशी माझं काही चूकल असेल तर माफ करा मी फक्त माझं मत मांडत होते .." नीता एवढं बोली आणि मावशी फक्त ऐकतच होत्या.
खरंच आहे ना मैत्रिणींनो ,घर बनवण्यासाठी किंवा ते उभं करण्यासाठी दोघांनी मेहनत घेतली तर काय चुकीचं आहे ? दोघांचे हात जेव्हा एखाद्या गोष्टीला लागतात तेव्हा ती गोष्ट छान बनते आणि त्यातूनच दोघांचं नातं हि फुलतं..... जेव्हा एखादा व्यक्ती बाहेरच्या देशात जातो तेव्हासुद्धा त्याला हि गोष्ट खूप उपयोगी पडते ..तिथे तर फक्त नवरा बायकोच असतात एकमेकांच्या मदतीला .. मग इथे सुद्धा आपण तस अनुकरण केलं तर बिघडलं कुठे ?
खरंच आहे ना मैत्रिणींनो ,घर बनवण्यासाठी किंवा ते उभं करण्यासाठी दोघांनी मेहनत घेतली तर काय चुकीचं आहे ? दोघांचे हात जेव्हा एखाद्या गोष्टीला लागतात तेव्हा ती गोष्ट छान बनते आणि त्यातूनच दोघांचं नातं हि फुलतं..... जेव्हा एखादा व्यक्ती बाहेरच्या देशात जातो तेव्हासुद्धा त्याला हि गोष्ट खूप उपयोगी पडते ..तिथे तर फक्त नवरा बायकोच असतात एकमेकांच्या मदतीला .. मग इथे सुद्धा आपण तस अनुकरण केलं तर बिघडलं कुठे ?
दोघे जेव्हा नोकरीला जातात तेव्हा त्या दोघंना एकमेकांसाठी असं कितीसा वेळ मिळत असेल नाही का .. तेच जर ते दोघे मिळून काम करत असतील घरी आल्यावर हि तर त्यातून त्यांचे प्रेमच वाढीला लागेल नाही का ?आणि काम हि पटापट उरकतील.
नवऱ्याने बायोकच्या मुठीत असंन किंवा बायकोने नवर्याच्या मुठीत असान हे चुकीचं विधान आहे....दोघांनी एकमेकांच्या सहवासत असंन आणि एकमेकांच्या साथीनं संसार फुलवणं हे बरोबर आहे... काय पटतंय ना ?
©अनुराधा पुष्कर
सदर कथा लेखिका अनुराधा पुष्कर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.