लहानसहान गोष्टी प्रेमाच्या

©अनुराधा पुष्कर




"अहो , हे काय आज कामावर जायचं नाही का ?"- निर्मला

"नाही ग ,आज ना जायची इच्छाच नाहीये ..."- दिलीप

"का ..? काही होतंय का ? तब्येत बरी आहे न ..."-निर्मला दिलीपरावांच्या डोक्याला हात लावत विचारू लागली.

दिलीप राव चटकन निर्मलाचा हात हातात घेतात ..

"इश्श ,काय हे ? कोण बघितलं तर , ......उशीर होईल हा ..आवरा लवकर .. "-निर्मला बाई लाजतच स्वतःचा हात सोडवत म्हणाल्या ,

"होऊ दे , तस हि आहे कोण बघायला आपल्याला इथे ..ह्या चार भींती ..पाखरं तर केव्हाच उडून गेली ..."-दिलीप

"अहो ,काय झालंय आज तुम्हाला ...रोज आपणच असतो ना, मग आज अचानक पिल्लांची आठवण का ? जा बर कामावर .."-निर्मला.

" काय हे ..मी काय म्हणतोय आणि तू काय कामावर जा ..कामावर जा ..म्हणून मागे लागली आहेस? ...सगळा मूडच खराब केला .."-दिलीप राव उठून तयार व्हायला लागले ..

निर्मला ताई सुद्धा हसतच काम आवरू लागल्या ..

"झालो तयार एकदाचा .. बघ आता ..."-दिलीप थोडासा नाराजीतच ..

"अजून राग गेला नाही वाटत एका माणसाचा .....जाऊ दे मग हा शिरा आता मीच खाऊन टाकते .."-निर्मला ताई थोड्याश्या खट्याळ स्वरातच म्हणाल्या ...दिलीप रावांना शिरा फार आवडायचा .

"ये ,चल आण तो इकडे ..झालोय ना तयार ....आता आण तो इकडे .."-शिऱ्याची बशी निर्मला ताईंच्या हातातून घेत ते खुर्चिवर बसले ....निर्मला ताई हि समोर बसल्या ....

त्यांना खाताना बघून निर्मल ताईंच्या चेहर्यावर समाधानचं हास्य होतं ..

"घे तू पण एक घास घे "-दिलीप रावांनी स्वतःच्या बशीतला एक चमचा शिरा निर्मला ताईंना भरवला आणि दोघे हि हसायला लागले.

दिलीप आणि निर्मला ..लग्नाला तीस एक वर्ष होऊन गेलेली ... दिलीप एका constuction site वर काम पाहायचे ... आणि निर्मला बाई एका जवळच्याच शाळेत काम करत होत्या.

छोट घर होत त्यांचं ,अगदी दोन खोल्यांचं ...त्यांना एक मुलगा होता ...खूप मेहनतीने शिकवलं होत त्याला ...पण त्याला आपल्या गरिबीची लाज वाटू लागली. 

घरात रोजच भांडण व्हायची .... रोज त्याचे खर्च वाढायला लागले ...मौज मज्जा ह्या साठी त्याला पैसा कमी पडू लागला.

वडील आणि मुलामध्ये वादावादी होतच असे ..रोजची कटकट..रोहित नेहमी आपल्या मित्रांसोबत स्वतःची तुलना करत असे.

एक दिवस रोहित ला पार्टीसाठी मित्रांसोबत जायचे होते ,दिलीप राव म्हणाले "अरे रोहित नको इतका खर्च करू आपल्याला परवडणार नाही अश्या पार्ट्या .."

"तुम्हाला कधीच काही परवडणार नाही ...तुमचे अंथरूण नेहमी छोटेच राहणार ....मला आत तुमच्या सोबत राह्याचंच नाही ....."-रोहित खूप रागात होता.

निर्मला बाईंना खूप वाईट वाटले ..तो आपल्या वडीलांना खूप काही बोलला . त्यानंतर वडील आणि मुलगा ह्यांच्यामध्ये संवाद एकदम कमी झाला आणि मग एके दिवशी तो स्वतःच्या मार्गाने चालायला सक्षम झाला आणि गेला घर सोडून.

दोघं नवरा बायकोना खूप वाईट वाटले ...आपण कुठं कमी पडलो हे त्यांना कळतच नव्हते ....काही दिवस असेच नैराश्यात गेले.

बाजूच्या घरात राहणारे जोशी आजी आजोबा हे सगळं बघत होते ...एक दिवस ते दिलीप व निर्मला ला म्हणाले ," अरे दिलीप ,किती दिवस असा उदास राहणार आहे ...ज्याला जायचं आहे तो गेला आता काय त्याच्या मागे आयुष्य भर असं कुढत बसायचं का ?"-आजोबा.

"हो न ,पाखर मोठ्ठी झाली कि त्यांना पंख फुटतातच ..ते आपले पाय पसरून पुढे जाणारच .. आता एकमेकांसाठी जगायचं ....आम्ही नाही का जगत आहोत ..?"-आजी

"हो न काय असत मुलांना जेवढं बांधून ठेवू तेवढं ते उडून जाण्याचा प्रयत्न जास्त करतात ....आणि तसंही त्यांना त्यांची कामे असतात. आपण कशासाठी म्हणून थांबायचं ..चालत राहायचं एकमेकांच्या सोबतीने ......."-आजोबा

दिलीप आणि निर्मलाला खूप गहिवरून आलं ..खूप अश्रू ओघळत होते, दोघांच्या डोळ्यातून... त्या दिवशी ते दोघे खूप रडले पण त्या नंतर नाही.

एक तो दिवस होताआणि एक आजचा दिवसआहे..जाणूनबुजून कधी दिलीपरावांनी मुलाचीआठवण काढली नाही ..तो कुठे असेल ? ,काय करतअसेल ? असा विचार नक्कीच त्यांच्या मनात तरळून जातअसतो ..पण ते निर्मल बाई ना दाखवत नाही आणि निर्मला हि कधी मुलाचं नाव काढत नाही . 

दोघे हि एकमेकांच्या साथीने आयुष्य जगात होते ..एकमेकांना आशा दाखवत होते ,एकमेकांसाठी हसत होते ...

संध्याकाळी दिलीप राव घरी येतात , जरा लवकरच आले होते आज घरी ....निर्मला बाईना यायला अजून अर्धा तास उशीर होता ..त्यांनी मस्तपैकी सगळं आवरून घेतला ...दोघांसाठी गॅस वर चहा टाकला ... आणि गाणं गुणगुणू लागले . 

तेवढ्यात निर्मला बाई आल्या ,
"अहो ,काय हे ?आज लवकर आलात का ? फोन तरी करायचा ..?"-निर्मला बाई .

दिलीप राव निर्मला बाईंच्या दंडाला पकडून त्यांना खुर्चीत बसवतात ..."बस ग तू , घे आज मी चहा बनवला आहे .. आणि हो हे घे भजी ..तुला आवडतात ना "-दिलीप राव चहा आणि भजी टेबल वर ठेवत म्हणाले ,

"अय्या ,आज काय बाई सकाळ पासून चाललंय ..काही कळतच नाहीये .. आणि आता चहा काय.. भजी काय ? काय हो काय झालंय काय तुम्हाला ..?"-निर्मला

"सांगू ...-दिलीप राव

"सांग ना .."-निर्मलाबाईंनी त्यांच्या डोळ्यात बघत विचारलं.

"आज ,फिर तुम पे प्यार आय है ...बेहद और बेमिसाल आया है .."-दिलीपराव चक्क गाणं म्हणू लागले ...

निर्मला बाई लाजून पाणी पाणी झाल्या.

"निरू , इतकी वर्ष तू माझी साथ कधीच सोडली नाही ...माझ्याकडे आधी काहीच नव्हतं ...कसंबसं दोन खोल्यांचं घर घेतलं ...तुझं सगळं आयुष्य गरिबीतच गेलं ..कधी एक साडी सुद्धा तुला घेऊन देऊ शकलो नाही.

आपल्या मुलाच्या गरजा पूर्ण करता करता आपण मागेच राहिलो ...आणि तो ..तो गेला आपल्याला सोडून .."-दिलीप राव भावना विवश होऊन बोलत होते.

निर्मला बाईंनी त्यांच्या तोंडावर हात ठेवला आणि बोलू लागल्या ," अहो कशाला परत त्याच्या आठवणी? ...आपण आहोत न एकमेकांना ,बाकी आपल्याला कोणीही नको ...,तुमची साथ आहे न ,मला बाकी काही नकोय .. "

"तुझ्या नावासारखीच निर्मळ आहेस तू ..म्हणूनच तर मला खुप आवडते ...माझ्यासाठी रोज सकाळपासून रात्री पर्यंत राबते , मला काय हवं नको ते बघते , खरंच माझ्या आयुष्याला पूर्णत्व फक्त तुझ्याचमुळे आहे .. निर्मला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ..अगदी जीवापाड .."-आज दिलीप राव काही बोलायचे थांबत नव्हते ..

"इश्श ,अहो काय हे ? काहीतरीच तुमचं ....प्रेम आहे हे माहित आहे मला ,ते काय सांगायची गोष्ट आहे का ? तुमच्या सहवासातून कळतेच कि ते ..?"-निर्मला बाई खाली बघत लाजत बोलल्या .

"नाही निरू ,इतके दिवस मी कधी हे सांगितलंच नाही पण सांगायला हवे ,तुम्ही बायका सगळं काही प्रेमापोटी करता आणि आम्ही ते तुमचं कर्तव्य समजतो. 

पण असं नाहीये ,तुम्ही तुमचं सगळं आयुष्य आमच्यासाठी बदलता आणि आमच्या रंगात रंगून जाता आणि आम्ही संसाराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता हे विसरून जातो कि आपण हे सगळं आपल्या जोडीदाराच्या साथीमुळे करू शकतो , तेव्हा निरू मी हे तुला सांगायलाच हवे आणि माझं आता ठरलय ,मी आता फक्त तुझ्या साठीच जगणार ..रोज तुला "i love you 'म्हणणार ." दिलीप राव हळूच निर्मला बाईंच्या केस गजरा माळत  बोलले.

निर्मला बाई फक्त बघतच होत्या ,त्यांच्या गालावर सुंदर हास्य होते ," हे आणिक कशासाठी ? आज नक्की आहे तरी काय "-

"तुला आवडतो न ,,आता रोज आणेन .. अग आज valentine day आहे ..कित्येक वर्ष हा दिवस येत होता आणि तसाच निघून जात होता ..पण आता ह्यापुढे रोजच valentine डे .."-दिलीप रावांनी हळूच निर्मला बाईंची हनुवटी हातात घेत म्हणाले .

" अहो , happy valentine डे "-निर्मला बाई लाजतच बोलल्या .

मैत्रिणींनो ,प्रेम हि एक भावना आहे .आणि ती व्यक्त करायलाच हवी ... खरंच खूप लहान लहान गोष्टी असतात ,ज्यात भरभरून प्रेम असत ,त्यासाठी आकाशातील चंद्र तारे च हवं असं नव्हे ,फक्त प्रेमाची साथ महत्वाची असते .. प्रेमाने दिलेल एक गजरा सुद्धा खूप अनमोल असतो , नाही का ?

समाप्त

©अनुराधा पुष्कर


सदर कथा लेखिका अनुराधा पुष्कर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने