© वर्षा पाचारणे
"मुलीचे लग्न लावून दिलं... आता तुमची जबाबदारी संपली"... असं म्हणून आज निहारिकाच्या सासूबाईंनी तिच्या आई-वडिलांना नको तशी बडबड केली.. "यापुढे तुम्ही माझ्या दारात पाऊल ठेवायचं नाही", असं म्हणत अक्षरशः निहारिकाच्या सासूने दाराकडे हात दाखवत तिच्या आई-बाबांना बाहेरचा रस्ता दाखवला.
आपली आणि आपल्या लेकीची तसूभरही चूक नसून, लेकीच्या संसारासाठी आई बाबा इतका वेळ निमूटपणे सारं काही ऐकून घेत होते.
'काही चूक झाली असेल, तर आम्हाला बोल लावा... परंतु आमच्या लेकराला मात्र जीवापाड जपा', असं काकुळतीला येत बाबांनी विहीणबाई पुढे हात जोडले.
परंतु मग आणखी बोलण्यातला जोर वाढवत, त्या सो कॉल्ड सुशिक्षित म्हणवणाऱ्या सासूबाईंनी शिव्यांची लाखोली वहायला सुरुवात केली.
त्यांचं असं गलिच्छ बोलणं निहारीकेला सहन न झाल्याने ती आई बाबांना म्हणाली ,"बाबा, तुम्ही आणि आई आत्ता प्लीज घरी जा.. आणि मला पोहोचल्यावर फोन करा... माझ्या नशिबात जे आहे ते झेलण्यासाठी आता मला समर्थ व्हावंच लागेल".. आई-बाबांच्या पाया पडत निहारिकाने साश्रुनयनांनी त्यांना निरोप दिला.
आई-बाबा घराबाहेर पडताच सासूबाईंनी धाडकन दरवाजा आपटला.
एवढा सगळा विचित्र प्रकार करूनही मात्र सासुबाईंचे मन भरले नाही.. त्यांनी लगेच लेकीला फोन लावत घडला वृत्तांत तिखट मीठ लावून हसून सांगायला सुरुवात केली. ते पाहून मात्र निहारिकाच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

कधीही चकार शब्द न बोलणारी निहारिका आता मात्र चवताळून उठली. लग्नाला जेमतेम वर्षच झालेल्या निहारिकाने वर्षभर सासूबाईंची नको तशी बडबड ऐकून घेतली होती. घरामध्ये जरा कुठे खुट्ट होताच, लगेच तिच्या आई-वडिलांचा उद्धार व्हायचा.
सुबोधने तिची बाजू घेताच ,'तू तर काय बायकोच्या ताटाखालचे मांजर झाला आहेस', असं म्हणत स्वतःच्याच लेकाची लायकी काढण्यात सासूबाईंना कोण जाणे कुठला आनंद मिळत होता.
पण वडीलधाऱ्यांना उलटून बोलायचं नाही, ही शिकवण असलेली निहारिका सारं काही निमूटपणे ऐकून घेत होती.. कदाचित तिच्या शांत राहण्यामुळेच तिच्यावर आणि आई-बाबांवर आजचा अपमान सहन करायची वेळ आली होती.
"आज मी त्यांची चांगलीच खरडपट्टी करून त्यांना हुसकून लावले आहे" हे वाक्य सासूबाईंच्या तोंडातून बाहेर पडताच निहारिकाने फोन हिसकावून घेतला आणि म्हणाली ,"एवढी हौस असेल तर माझ्याशी बोलायचं.. यापुढे माझ्या आई-वडिलांना एकही शब्द बोललेले मला चालणार नाही"

आपल्या आईला भावजय असे चिडून बोलते हे समजताच पुढच्या अर्ध्या तासात नणंद घरी हजर झाली.. "तू माझ्या आईला असं बोलूच कसे शकते?", म्हणत सासू आणि नणंद दोघीही कांगावा करू लागल्या.
आज मात्र निहारिकाने या सगळ्या प्रकारात स्वतःची बाजू खंबीरपणे मांडण्याचा निर्णय घेतला होता. "जेव्हा तुमची आई मला बोलते, तेव्हा मात्र तुम्ही काहीच बोलत नाही आणि आज मात्र धावत पळत आईची बाजू घेण्यासाठी आलात",.. असं निहारिकाने आपल्या लेकीला म्हणताच सासूने चिडून तातडीने सुबोधला फोन लावत घरी बोलावले.. वर्षभरात असे अनेक वेळा वेळी-अवेळी सुबोधला फोन करून सासुबाई भडकावत होत्या..
पण यावेळी मात्र निहारिका मनातून दुखावली गेली होती. "माझ्या चुकांसाठी मला जबाबदार धरावे.. जो काही राग काढायचा तर माझ्यावर काढायचा, परंतु माझ्या आई वडिलांना असं घरातून हाकलून देण्याचा तुमचा काय संबंध?"
पण यावेळी मात्र निहारिका मनातून दुखावली गेली होती. "माझ्या चुकांसाठी मला जबाबदार धरावे.. जो काही राग काढायचा तर माझ्यावर काढायचा, परंतु माझ्या आई वडिलांना असं घरातून हाकलून देण्याचा तुमचा काय संबंध?"
असं निहारिकाने म्हणताच सासूबाईंनी अख्खं घर डोक्यावर घेतलं.. 'हे घर माझं आहे... इथे कोणी यावं, कोणी जावं, हा माझा प्रश्न आहे... आणि एवढंच जर तुला दुःख झालं असेल, तर नवऱ्याला घेऊन माझ्या घरातून चालतं व्हायचं'... असं म्हणत त्यांनी सुबोध आणि निहारिका दोघांनाही धारेवर धरले.
रात्रीचे नऊ वाजले तरीही घरातली वादावादी मात्र संपता संपत नव्हती. जेवण खाणाचा तपास नव्हता.
सासू-सुनांच्या संबंधातली तेढ दिवसेंदिवस वाढत चालली होती.. "बघ सुबोध, तुझी बायको मला उलट बोलते", असं म्हणत सासुबाई लेकाला सुद्धा नको तशी बडबड करू लागल्या.
सुबोधला तर जणू जगणं नकोसं झालं होतं आणि आज शेवटी त्याच्याही सहनशक्तीचा अंत झाला होता.
"दर दिवसाला तुमची कटकट... ऑफिसमध्ये गेलो की तासाभरात आईचा फोन ठरलेला... तुझ्या बायकोने असं केलं... तुझ्या बायकोने तसं केलं म्हणत सतत मागे कटकट करायची.. घरी आलं की दोघींची तोंडं दोन दिशांना, रात्री बेडरूममध्ये गेलं की निहारिका तोंड पाडून बसलेली.... तुमच्या या अशा वागण्याने मला जगणं नकोस झालंय"

'एकाच घरात राहून दोन वेगळ्या चुली झाल्यात'... 'माझ्यावर जास्त हक्क कोणाचा? यासाठी जणू तुमच्यात उंदरा मांजराची शर्यत लागलेली असते'.... 'अरे! मी पण माणूसच आहे'... 'दिवसभर कामाने थकून संध्याकाळी घरी यावं, तर तुमची ही कटकट.... या सगळ्या कटकटीतून मोकळं व्हायचं असेल, तर मीच हे घर सोडून जातो कायमचं',... असं म्हणत सुबोध पायात चपला अडकून धाडकन दार आपटत घराबाहेर पडला.
निहारिका हमसून हमसून रडत त्याच्यामागे पळत होती. सुबोध काही केल्या ऐकायला तयार नव्हता. सासुबाई घरात बसल्या बसल्या आता मात्र अश्रू ढाळत होत्या. आत्ताही त्यांना स्वतःची चूक मान्य नव्हतीच, पण लेक असा घर सोडून गेलेला पाहून त्यांचा जीव कासावीस होऊ लागला.
'सुनेने घर तोडलं', म्हणत अजुनही तोंडाचा पट्टा सुरू होता.. वैतागून निघालेला सुबोध अचानक भरधाव ट्रक समोर आला आणि जागीच सगळं थांबावं, तसं सगळं शांत झालं... रक्ताची जोरदार चिळकांडी उडाली... त्याच्या हाताला पकडून ओढायला गेलेली निहारिका देखील ट्रकच्या धडकेने लांब फेकली गेली.
लोकांनी पटकन त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दहा-बारा दिवसानंतर सुबोध थोडाफार ठीक झाला, परंतु अजूनही निहारिकाने मात्र डोळे उघडले नव्हते.
लोकांनी पटकन त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दहा-बारा दिवसानंतर सुबोध थोडाफार ठीक झाला, परंतु अजूनही निहारिकाने मात्र डोळे उघडले नव्हते.
इतके दिवस बेशुद्ध असलेली आपली लेक पाहून आई बाबा जिवंतपणीच मेल्यासारखे झाले होते. निहारिकाची सासू आणि आई-बाबा समोरा समोर असूनही एकमेकांच्या नजरेला नजर देत नव्हते.
सुबोध सतत 'निहारिका कशी आहे?', म्हणून चौकशी करत होता... ती बेशुद्ध आहे असे कळताच आपल्यामुळेच आज तिची ही अवस्था झाली आहे या विचाराने तो तीळ तीळ तुटत होता..
सुबोधने आईबरोबर अबोला धरला होता. तिच्या सततच्या कटकटीमुळे आज तो आणि त्याची निहारिका या अवस्थेवर येऊन पडले होते.
सुबोधने आईबरोबर अबोला धरला होता. तिच्या सततच्या कटकटीमुळे आज तो आणि त्याची निहारिका या अवस्थेवर येऊन पडले होते.
आज आई-बाबांनी हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या गणपती समोर हात जोडत मनोमन प्रार्थना केली ,"आमचं आयुष्य तिला मिळू दे ,पण आमच्या लेकराला वाचव.. यापुढे तिचा संसार वाचण्यापेक्षा ,तिचं आयुष्य आनंदी होण्यासाठी आम्ही वाटेल ते करू... तिला पुन्हा आयुष्यभर सांभाळण्याची आमची ताकद आहे... परंतु तिला या मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढ", एवढं बोलत बाबा मटकन खाली बसले... त्यांना सावरणारी आईदेखील तितकीच हतबल झाली होती.
हे सार लांबून बघत असताना मात्र आज कुठे सुबोधच्या आईला स्वतःच्या विनाकारण तापट स्वभावाची लाज वाटली.
हे सार लांबून बघत असताना मात्र आज कुठे सुबोधच्या आईला स्वतःच्या विनाकारण तापट स्वभावाची लाज वाटली.
सुनेवर दबाव असावा असं समजत कायम सुनेला परकं समजणार्या सुबोधच्या आईने आज तिच्या आई बाबांची हात जोडून माफी मागितली.. "तुम्ही माफी मागावी अशी आमची कधीही इच्छा नव्हती.. फक्त आमची लेक सुखाने नांदावी, एवढीच काय ती आमची अपेक्षा... पण आज मात्र ती अशी नि:शब्द पडून राहिलेली बघताना आम्ही माणसं ओळखायलं चुकलो, असंच पदोपदी जाणवते"
त्यांचा असं बोलणं सुरू असतानाच सुबोध धावत आईबाबांकडे आला आणि म्हणाला ,"आईबाबा, माझी निहारिका... माझी निहारिका... त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. आनंदाने तोंडातून शब्द फुटत नव्हते. सारेजण आयसीयू कडे धावले.

निहारिकाला शुद्ध आली होती. एवढ्या दिवसांनी शुद्धीवर येताच तिने सगळ्यात पहिलं नाव सुबोधचं घेतलं होतं. सुबोध, मला सोडून नको जाऊस'.. हे एकच वाक्य ती अर्धवट शुद्धीत बरळत होती.
डॉक्टरांया परवानगीने सुबोध आयसीयू मध्ये गेला. निहारिकाचा हात हातात घेत म्हणाला ,"यापुढे आपल्या दोघांच्या नात्यात कुठलाही अडथळा येणार नाही.. मला तू हवी आहेस निहारिका... सततच्या कटकटींपासून दूर जात आपण आपला वेगळा संसार थाटू.. पण तू मात्र आता लवकरात लवकर बरं व्हायचं हं... असं म्हणत तिच्या हातांवर आपले ओठ टेकवत सुबोधने निहारिकाचे अश्रू पुसले.
दोन महिने हॉस्पिटलमध्ये काढल्यानंतर आज तिला डिस्चार्ज मिळणार होता. आई बाबा तिला आरामासाठी माहेरी घेऊन जायला आतुर झाले होते.
दोन महिने हॉस्पिटलमध्ये काढल्यानंतर आज तिला डिस्चार्ज मिळणार होता. आई बाबा तिला आरामासाठी माहेरी घेऊन जायला आतुर झाले होते.
हॉस्पिटलच्या वॉर्डच्या बाहेर सासुबाई एका कोपऱ्यात उभं राहून अपराधी भावनेने निहारिकाकडे पहात होत्या. पण इतरत्र कुठेही न नेता आज सुबोधने एक भाडेतत्त्वावर मित्राचा फ्लॅट घेतला होता.
निहारिका ला चालण्यासाठी आधार देत सुबोध रिक्षामध्ये बसवून घरी घेऊन गेला. स्वत:च्या घर डोक्यावर घेण्याने आणि सुनेवर विनाकारण अंकुश लावण्यामुळे सासूबाईंनी स्वतःच्या मुलाला गमावले होते.
सुनेला सतत घालून पडून बोलताना कधीतरी तिच्याही सहनशक्तीचा अंत होऊन मग स्वतःची बाजू मांडण्यासाठी कधीतरी तीही उलट बोलूच शकते.. मग ते ऐकण्याचीही मानसिक तयारी ठेवावी... 'सून म्हणजे मुलगीच असते', असं केवळ म्हणण्यापेक्षा तिला पोटच्या लेकीप्रमाणे जीव लावला, तर कुठलीही सासू 'सासू' न राहता सूनेची हक्काची मैत्रीण आणि जीव लावणारी आई बनल्या शिवाय राहणार नाही..
© वर्षा पाचारणे.
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.