मी सौभाग्यपती

©अनुराधा पुष्कर





"गुड मॉर्निंग .."-राजेश

"गुड मॉर्निंग ,किती वाजले .."-सुनीता

"७ वाजले आहेत सकाळचे ...."-राजेश

"काय ?अरे बाप रे ..उशीर झाला आज ..किती कामं आहेत .."-सुनीता उठून आवरायला जाणार तेवढ्यात राजेश तिचा हात पकडतो.

"काय झालं ?"-सुनीता दचकून

"थांब ,बैस जरा इथे .."-राजेश

"तिला काहीच कळत नाही.

"अहो काय होतंय का तुम्हाला ? ..आधीच उशीर झालाय ..बैस काय बैस ?"-सुनीता

"होऊ दे एखाद्या दिवशी ...रोज काय पळापळ करायची ..घड्याळाचे काटे पळतील तस एक एक मिनिट तुझं हि चालूच असत काहीना काही ..स्वतःला विसरून ह्या घरासाठी ,घरातल्या लोकांसाठी किती करतेस तू ?"-राजेश खूप भरभरून बोलत होते.

"अहो ,त्यात काय एवढ मी नाही तर दुसरं कोणी करणार आहे का ?"-सुनीता

"नाही सुनीता .तूच करणार हे जरी बरोबर असल तरी ..तुला हि मन आहे ,इच्छा आहे ...तुलाही स्वतःसाठी वेळ द्यायची गरज आहे .. आज चहा मी बनवणार आहे ."-राजेश .

एवढं बोलून राजेश स्वयंपाक घरात जाऊन सगळ्यांसाठी चहा बनवायला घेतो.

सुनीता सगळं आवरून किचन मध्ये येते ....तोपर्यंत चहा बनलेला असतो ..राजेश आई वडिलांना ,सुनीता ला चहा देतो आणि मुलाला दूध बनवून देतो.

"अरे व्वा ,काय आज खास.. राजेश ,चहा तू बनवलाय .."-सासरे ..सुनीताचे

" हो न काही कळत च नाहीये ..."-सुनीता


"काही नाही बाबा ..असच ...तुम्हाला माहित आहे आई ने तुमच्यासाठी ,माझ्यासाठी किती काही केलाय पण आपण कधीच तिला कौतुकाचे दोन शब्द हि नाही दिले ..आज सुनितासुद्धा हेच सगळं करतेय पण मी आजपर्यंत कधीच तिला बोललो नाही ...आज मी ठरवलं आहे बोलायचच .."-राजेश बोलत होता .

तो खूप भावुक झाला होता ...

"अहो काय करताय ? तुम्ही नाही काही बोललात तरी मला कळतात तुमच्या भावना आणि मी आपल्या घरासाठीच करतेय न ...तुम्ही पण बाहेर काम करून येताच न ..आपण दोघे म्हणजे दोन चाक ह्या संसाराचे ..त्यात काय बोलायचे ?"-सुनीता

"नाही सुनीता थांब ..दोन चाक आहोत म्हणून माझ्या गतीने ,माझ्या सोबतीने तू चालत आलीस ,मी सुद्धा तुझा विचार करायला हवा. 

तुला माहित आहे विजय. त्याने त्याच्या बायकोला कधीच सांगितले नाही कि त्याचे किती प्रेम आहे तिच्यावर आणि आज ती मृत्यशी झुंज देतेय ..मला ती वेळ येऊ द्यायची नाही.

आम्ही नवरे नेहमी म्हणतो बोलायची काय गरज ,आमच्या कृतीतून तुम्हाला कळत असेल पण तस नाही.. लग्नानंतर तू तुझं सगळं काही बदललं,माझ्या रंगात रंगून गेली.

आपल्या मुलाच्या जन्मावेळी अनंत यातना भोगल्या ,ह्या कोरोनाच्या काळात पूर्ण घराचा ताण तुझ्यावर पडला पण तू भक्कम उभी राहिलीस .......आणि वेळप्रसंगी माझा जीव वाचवण्यासाठी सावित्री सुद्धा बनली ..खरंच तुम्ही बायका देवीचंच रूप आहात. शक्तीच स्थान आहात.

सुनीता माझ्या जगण्याला फक्त तुझ्याच मुळे अर्थ आहे...तू नेहमी म्हणतेस न कि तू सौभाग्यवती आहे म्हणून आज मी म्हणतोय कि तुझ्या, माझ्या आयुष्यात येण्याने मी सौभाग्यपती झालोय !..thank you ...अँड लव्ह you ..."-राजेश भरभरून बोलत होता.

राजेश च बोलणं ऐकून सुनीता ला काय बोलावं काहीच कळत नव्हतं ..राजेशची आई आणि सुनीता दोघीही एकमेकींकडे बघू लागल्या.

"राजेश मला तुझा अभिमान आहे . खुप कमी जण असतात जे मोकळं बोलतात. नवरा बायको च्या नात्यात अहंकार नकोच पण तो असतो त्यामुळेच तर नाती तुटतात. 

आपण बायकोसाठी साडी आणतो, गजरा आणतो म्हणजे आपल प्रेम आहे..... पण एवढंच पुरेस नसतं. ह्यासागळ्यापेक्षा प्रेमाचे दोन शब्द कधीतरी बोललो तर ते खुप आहे.

आम्ही मुली आमचं घर सोडून दुसऱ्याच्या घराला आपलस करतो त्यालाच आपल मानतो आणि ते नात नवऱ्यामुळे जोडलं जातं,...आज तू तुझ्या मुलांपुढे सुद्धा एक आदर्श ठेवलास ....खरंच छान केले .बर वाटलं "-राजेश ची आई.

"राजेश ची आई ...राजेश खरं बोलला ..राजेश तुम्ही आजकालची मुलं लगेच सगळं काही बोलू शकता पण आमच्यावेळी असं नव्हत ...आमची लग्न सुद्धा घरचे मोठे लोक ठरवायचे ..आम्ही फक्त बोहल्यावर सांगितलेल्या वेळी सांगतील तसे उभे राहायचो ..

बऱ्याचदा आम्हाला हि दिसायचं कि आमची आई तुमच्या आईशी कशी वागतेय ते पण तोंडातून शब्दही काढू शकत नव्हतो. त्या वेळी मोठ्यांसमोर बोलण्याची पद्धतच नव्हती. 

जे आपल्या आई नि केलं ते आणि तसंच आपली बायकोने केलं तर काय मोठं वेगळ केल, तिचंच काम आहे अशी आमची समजूत. स्वयंपाक घरात जाऊन कधी पाण्याचा ग्लास हि घेतला नाही स्वतःच्या हाताने ..आम्ही गाव सोडलं आणि तुमच्यासाठी म्हणून शहरात आलो ...

तेव्हा कुठे थोडंफार फरक जाणवायला लागला ...गावाकडे सगळं काही मिळून मिसळून होऊन जात पण इथे शहरात एकट्याने बरच काही करावं लागत ..त्यामुळे दोघांना मिळून एकमेकांन छोटी छोटी मदत करावीच लागते ...हे आम्हीही शिकलो ...

पण तुमच्या आईच कौतुक मात्र कधी केलं नाही असो, तेव्हा नाही जमलं ते आता करू ...."-राजेश चे वडील बोलत होते आणि ते खुर्चीतून उठून सविता कडे म्हणजे राजेशच्या आईकडे गेले आणि बोलू लागले ,

"सविता तुम्ही आमची खूप साथ दिली ...कधीही कुरबुर केली नाही ...वाटेल ते काम केलं ,येणारे जाणारे ,रोजच्या पाहुण्यांचे उठ बस हे सगळं बघून तुम्ही मुलानांही नीट वळण लावले ..कधी माझ्यापर्यंत काहीच येऊ दिले नाही ....आज आपलं घर तुमच्यामुळं उभं आहे ...

आपली मुलं तुमच्या दिलेल्या संस्कारांमुळेच मोठी झाली ...एक घर समृद्ध होत ते बाईच्या त्यागामुळे ,तिच्या चेहऱ्यावरील हास्यामुळे आणि समर्पणामुळे ......"राजेशचे वडील बोलत होते आणि सविता बाईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते .

खूपच भावनिक क्षण होते ते ....दोन मिनिटांची शांती होती ..

"चला तर मग ह्या आनंदाच्या क्षणासाठी खास श्रीखंड पुरीचा बेत करते आज .."-सुनीता उठून जाऊ लागली तेवढ्यात सासरे म्हणाले,
"सुनबाई ,आम्ही पण मदत करणार बर का ? आमच्या सौभाग्यवतींसाठी काहीतरी बनवूच आज ..."-सासरे बुवा सविता बाईंकडे बघत म्हणले .....आणि सगळे मनमुराद हसले ....सगळे मिळून आज स्वयंपाकघरात काम करत होते.


खरंच ,आपल्या मनात बरच काही असत पण आपण ते बोलून दाखवत नाही ,पण कधी कधी आपले दोन शब्द खूप मोलाचे असतात ..आज च्या ह्या काळात पुढचा क्षण कसा येईल माहित नाही ..त्यामुळे आपल्याला जर कोणाचे आभार मानायचे असतील .कौतुक करायचे असेल तर ती योग्य वेळ हीच आहे ..कदाचित पुढे अशी वेळ,अशी व्यक्ती मिळेल न मिळेल.

समाप्त

©अनुराधा पुष्कर


सदर कथा लेखिका अनुराधा पुष्कर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने