© वर्षा पाचारणे
लग्नाला पाच वर्ष झाली आणि अजूनही घरात पाळणा हलला नाही, म्हणून अंजलीला सतत टोमणे ऐकावे लागत होते. खरंतर आई न होण्यात खरंच फक्तं स्त्रीच जबाबदार असते का? पण हे सारं माहीत असूनही अनेकदा स्त्रियाच स्त्रियांना अतिशय विचित्र वागणूक देतात.
काही ठिकाणी तर अजूनही खूप छळ केला जातो. अंजली जरीही सुशिक्षित घरातली सून असली तरीही तिला आता अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं.
कधीही कुठल्या प्रसंगात मुलांचा विषय निघताच तिच्याकडे विचित्र कटाक्ष टाकत बायका स्वतःच्या मुलांचे गोडवे गायला सुरुवात करायच्या.
कधी माहित असूनही, मुद्दाम तिला 'तुम्हाला मुलं नाहीत का?', म्हणून हिणवायच्या.
अंजली आणि मयूरने अनेक डॉक्टरांच्या वाऱ्या केल्या, परंतु डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिच्या केसमध्ये अजून थोडी वाट पहावी लागणार होती.
अंजली आणि मयूरने अनेक डॉक्टरांच्या वाऱ्या केल्या, परंतु डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिच्या केसमध्ये अजून थोडी वाट पहावी लागणार होती.
आता तर मयूरने देखील तिच्याशी थोडंफार बोलणं कमी केलं होतं. जसं काही या सगळ्याला कारणीभूत फक्त तीच होती.
अंजली मनातून खूप खचली होती. परंतु या साऱ्यात ती खंबीरपणे उभी होती ती केवळ एका विश्वासावर की एक ना एक दिवस ती नक्कीच मातृत्व अनुभवेन... या इच्छाशक्तीच्या जोरावर तिने या सार्या प्रकाराकडे आजवर दुर्लक्ष केलं होतं..
लग्न झाल्यानंतर लगेच घरामध्ये नणंदेचं लग्न, दिरांची नुकतीच सुरू झालेली नोकरी, सासू-सासर्यांचे आजारपण, या साऱ्यात मयूर आणि अंजलीला स्वतःसाठी असा निवांत वेळ मिळालाच नव्हता. पावसात भिजणं, फुलं खरेदी करणं, लॉन्ग ड्राईव्हला जाण्याची अंजलीला खूप इच्छा असायची, परंतु या संसाराच्या जबाबदाऱ्या तिला स्वतःसाठी जगू देत नव्हत्या.

ही छोटी छोटीशी स्वप्नं कधीच पूर्ण होत नसल्याचे दुःख आणि त्यात मनाची अशी घालमेल तिला अस्वस्थ करून जायची..
आजही अंजली रिमझिमणारा पाऊस पाहुन मयूरला म्हणाली ,"मयूर आज सगळी कामे झालेली आहेत, तर आपण मस्तपैकी पावसात भिजून मक्याचं कणीस खाऊन येऊयात"... पण मयूरने मात्र झटक्यात तिला नकार देऊन टाकला.
आजही अंजली रिमझिमणारा पाऊस पाहुन मयूरला म्हणाली ,"मयूर आज सगळी कामे झालेली आहेत, तर आपण मस्तपैकी पावसात भिजून मक्याचं कणीस खाऊन येऊयात"... पण मयूरने मात्र झटक्यात तिला नकार देऊन टाकला.
"अगं काम जरी झाली असतील, तरीही बाबांची तब्येत बरी नाही. आईला काय वाटेल आपण असं उगाचच बाहेर पडलो आता तर?"... पण आज मात्र अंजलीचा पारा चढला.
"अरे, तब्येत बरी नाही म्हणजे फक्त डोकं दुखत आहे ना आणि त्यांनी गोळी खाल्ली आहे, मग आपण दहा मिनिटात फक्त बाहेर जाऊन आल्याने असा काय प्रॉब्लेम होणार आहे?"... या वाक्यावर मयूरने तिच्याशी वाद न घालता दोन दिवसांचा अबोला धरला.
अंजलीला वाटलं 'मी अशी काय मोठी चूक केली की, त्याने माझ्याशी बोलणं टाकून दिलं".. 'आपल्या अपेक्षा, इच्छा आपण नवऱ्याकडे तर बोलून दाखवणार ना आणि त्यातही मी कुठे काय मोठा मागितलं होतं?"..
दोन दिवसांनी मयूर स्वतःहूनच तिच्याशी बोलायला लागला. आज ऑफिसवरून येताना त्याने भाजलेलं मक्याचं कणीस आणलं. अंजलीच्या हातात ते कणीस देत तो म्हणाला," हे घ्या मॅडम, आपका हुकुम सरआॅखो पर"...
दोन दिवसांनी मयूर स्वतःहूनच तिच्याशी बोलायला लागला. आज ऑफिसवरून येताना त्याने भाजलेलं मक्याचं कणीस आणलं. अंजलीच्या हातात ते कणीस देत तो म्हणाला," हे घ्या मॅडम, आपका हुकुम सरआॅखो पर"...
अंजलीला मात्र त्याच्या या वागण्यावर कसं रिॲक्ट करावं तेच समजेना. कारण 'जो मका रिमझिम पावसात खाण्यात मजा असते, तो घरात खाण्यात काय येणार, एवढंही त्याला कळत नसेल का?', या विचाराने तिने गुपचुप तो मका हातात घेतला आणि निमूटपणे खिडकीच्या बाहेर बघत खाल्ला.
पण तो खाताना आज सोबतीला पाऊस नव्हता, तर भावनांनी भरलेल्या अश्रूंचा बांध नकळत डोळ्यावाटे बरसू लागला होता.
मयुर फ्रेश होऊन आलेला पाहताच तिने ओढणीचा कोपऱ्याने अलगद डोळ्यातले अश्रू टिपले आणि पुन्हा कामाला लागली..
आता लग्नाची सहावी एनिवर्सरी जवळ आली होती.. आज अंजलीची तब्येत खूप मलूल वाटत होती.. तिला रात्रभर कोरड्या उलट्या होत होत्या.. मयूरला ऑफिसमध्ये महत्वाची मिटींग असल्याने अंजली सासूबाईंनी बरोबर दवाखान्यात गेली. अंजली आता 'आई' होणार होती, ही बातमी डॉक्टरांनी देताच सासूबाईंच्या आणि अंजलीच्या आनंदाला पारावार उरला नाही.

अंजलीला वाटलं एवढी गोड बातमी असूनही आज जर सगळ्यात पहिले ही बातमी ऐकायला आपल्या सोबत मयुर असता, तर किती छान झालं असतं. आजही तो रिमझिमणारा पाऊस तिला एकटेपणाची जाणीव देऊन गेला..
आता घरात आनंद आणि उत्साह भरला होता. अंजलीचे सारे लाड पुरवले जात होते. तिला काय हवं, काय नको याची चोख व्यवस्था घरातली सारी मंडळी करत होती.
आता घरात आनंद आणि उत्साह भरला होता. अंजलीचे सारे लाड पुरवले जात होते. तिला काय हवं, काय नको याची चोख व्यवस्था घरातली सारी मंडळी करत होती.
उन्हाळा सुरू झाल्याने घरात आंब्यांचा घमघमाट सुटला होता. परंतु 'या वर्षी तू काही आंबा खाऊ नकोस', असं घरच्यांनी सांगताच अंजली हिरमुसली, कारण एक वेळेस दुसऱ्या कुठल्याही फळासाठी ती आग्रही नसायची परंतु आंबा म्हणजे तिचा जीव की प्राण.. पण गरम पडेल म्हणून यंदा तो काही तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही.
उन्हाळा संपून पुन्हा पावसाची रिपरिप चालू झाली.
उन्हाळा संपून पुन्हा पावसाची रिपरिप चालू झाली.
अंजलीला वाटलं, 'चला या गरोदरपणाच्या निमित्ताने का होईना, पण आता तरी मयूर आपलं म्हणणं टाळणार नाही'.. म्हणून अंजली लाडात येत मयूरला म्हणाली ,"मयूर बाहेर छान रिमझिम पाऊस पडतोय, आपण बाहेर एक फेरफटका मारून मस्त टपरीवरचा चहा पिऊन येऊ"
तिच हे बोलणे ऐकताच मयूर जोर जोरात हसायला लागला. "वेड लागले की काय तुला?"... "या दिवसात मी असं तुला पावसात भिजायला घेऊन गेलो, तर आई तुझ्या आधी पहिला मला धारेवर धरेल आणि त्यात टपरीवरचा चहा... अगदीच अशक्य"...
"अगं या दिवसात तुला तुझ्यापेक्षा जास्त पोटातल्या बाळाचा विचार करणं खूप गरजेचे आहे".... "एकतर आज किती वर्षांनी आपल्या आयुष्यात हा आनंदाचा दिवस आलाय, मग यासाठी थोडसं सहन करायला नको का गं सोन्या"... असं लाडाने, प्रेमाने, समजावण्याच्या सुरात जरी मयूरने सांगितलं, तरीही अंजलीला मात्र ते मुळीच पटण्यासारखं नव्हतं..
'म्हणजे यंदाचा पावसाळा ही असाच जाणार', या विचाराने ती नाराज झाली.
अंजलीची डिलिव्हरी झाली. तिनं गोंडस मुलीला जन्म दिला.. पावसाळ्यात जन्माला आल्याने तिने त्या मुलीचे नाव 'वर्षा' असे ठेवले... त्या पावसाची आपली हौस निदान लेकिच्या नावावर तरी भागवावी, हा त्या मागचा तिचा हेतू होता..

पावसाळा असल्याने बाळाचे कपडे काही केल्या सुकत नसायचे. सतत शि शु केल्याने सारखे धुतले जाणारे दुपटी लंगोट यांच्या घरभर पताका लटकलेल्या असायच्या.
घरात शिरताच तो एक कुबट, कोंदट वास अगदी अंगावर यायचा. मयूर ऑफिसवरून घरी येतात अंजलीला म्हणाला ,"मशीन मध्ये कपडे धुवून अर्धे सुकल्यानंतर ते पंख्याखाली टाकत जा ना".... "घरात आल्या आल्या अगदी नकोसं होतं त्या दुपट्यांच्या वासाने".....
'आपल्याशी चार शब्द प्रेमाचे बोलावे', अशी अपेक्षा असणाऱ्या अंजलीच्या कानावर त्याची अशी वाक्यं पडताच, तिच्या तळपायाची आग मस्तकात जायची.
एक तर रात्रंदिवस बाळामुळे तिची आता झोप पूर्ण होत नव्हती. सतत भिजलेले कपडे बदलण्यासाठी, दूध पाजण्यासाठी तिला रात्रभर जागंच राहावं लागायचं, आणि त्यात दिवसभरही तिने काम करायला घेतलं की बाळाची रडारड सुरू.
तिला वाटायचं 'हसणार्या बाळाला तर कोणीही खेळवतं पण रडणाऱ्या बाळाला शांत करण्यासाठी मात्र कोणीही धावून येत नाही' या विचाराने तिची चिडचिड वाढायची.
डिलिव्हरीने शरीरातील जणू त्राणच गळून गेल्यासारखं वाटत असतानाच या मानसिक त्रासाने तिची खूप चिडचिड वाढली होती.
आता बाळ एक वर्षाचे झालं. आता कुठे मयूर आज स्वतःहून तिला "आपण बाहेर फिरून येऊया", असं म्हणाला. 'वर्षभराने बाहेर पडायचं', या विचारानेहि ती मोहरुन गेली.
परंतु पुन्हा ते सगळं डायपर, रुमाल, बाळाचे जास्तीचे कपडे आणि बाटलीत दूध वगैरेचं गाठोडं सोबत न्यायचं, म्हटल्यावर तिला घराबाहेर पडणंच नकोसं वाटू लागलं...
"चल की.. आता छान पाऊसही पडतोय आणि माझ्या मित्रांनी जवळच एका रिसॉर्टवर पार्टी करायची ठरवली आहे. छान चार दिवस मजा करून येऊ", असं मयूरने म्हणताच अंजली मात्र त्याच्यावर भडकली.
"जेव्हा मी सुटसुटीत आयुष्य जगत होते, तेव्हा माझ्या खूप अपेक्षा अशाच मरून गेल्या आहेत आणि आता बाळ झाल्यावर त्याच्या सोबत येणाऱ्या सामानाचा लवाजमा गोळा करून बाहेर पडण्याची माझी तरी इच्छा नाही, त्यामुळे तुला कुठे जायचं असेल, तिकडे जा... माझी काही हरकत नाही", असं म्हणत अंजली पुन्हा त्या झोपलेल्या गोड गुलाबी गाठोड्याच्या बाजूला जाऊन त्याला कुशीत घेऊन विसावली.
तो खिडकीतून बरसणारा पाऊस आज जणू तिच्यावर पुन्हा एकदा हसत होता. तिच्या अपूर्ण स्वप्नांचा आज तो पुन्हा एकदा साक्षीदार झाला होता.. पाऊसवेडी ती आज पुन्हा अश्रूधारांमध्ये न्हाऊन निघाली होती.
तो खिडकीतून बरसणारा पाऊस आज जणू तिच्यावर पुन्हा एकदा हसत होता. तिच्या अपूर्ण स्वप्नांचा आज तो पुन्हा एकदा साक्षीदार झाला होता.. पाऊसवेडी ती आज पुन्हा अश्रूधारांमध्ये न्हाऊन निघाली होती.
हवाहवासा पाऊस आज लेकराच्या काळजीपोटी मात्र नकोसा वाटून गेला होता... ते पाऊस वेडी आई आज तिच्या लेकराचे अश्रू भरल्या डोळ्यांनी पटापट पापे घेत होती. मयूर मात्र त्याच्या भूतकाळातल्या चुकांना आठवून खिडकीतून बरसणारा तो पाऊस फक्तं पाहतच राहिला.
समाप्त
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.