© धनश्री दाबके
"आई तुझं नवीन venture स्टेटस वर टाकलं आणि लगेच बघ enquiries यायलाही लागल्या. यंदाची दिवाळी आपल्याला शुभच शुभ आहे." सिद्धी शिवांगीचा फोन बघत बघत म्हणाली.
"अगं तुला म्हंटलं होतं ना, की जरा थांब अजून. सुरवात तर होऊ देत, मग कर ते स्टेटस अपडेट. पण तुम्हा हल्लीच्या मुलांना जराही दम निघत नाही. जरा काही झालं की ते त्या स्टेटसमधे झळकलचं पाहिजे का?" शिवांगी वैतागली.
"मग ? पाहिजेच झळकलं. अगं आजकाल लोकं लगेच स्टेटस पाहातात. मेसेजेस पाठवून लोकांच्या गळ्यात पडण्यापेक्षा हे स्टेटस अपडेट बरं पडतं.
कोणाला त्रास न देता आपल्या बिझनेसची माहिती देण्याचा सोपा मार्ग आहे हा" सिद्धी मार्केटिंगचे फंडे देत होती आणि शिवांगीचं whatsapp अभिनंदनाच्या मेसेजेसनी गुणगुणत होतं.
शिवांगीला शाळेत असल्यापासून वेगवेगळी हस्ताक्षरं जमवायचा छंद होता. शाळेत कोणा मैत्रीणीचे छान अक्षर पाहिले की लगेच शिवांगी तिच्या वहीत काहीतरी लिही म्हणून त्या मैत्रीणीच्या मागे लागयची.
शिवांगीला शाळेत असल्यापासून वेगवेगळी हस्ताक्षरं जमवायचा छंद होता. शाळेत कोणा मैत्रीणीचे छान अक्षर पाहिले की लगेच शिवांगी तिच्या वहीत काहीतरी लिही म्हणून त्या मैत्रीणीच्या मागे लागयची.
काहीजणी लगेच लिहायच्या तर काही टाळाटाळ करायच्या पण शिवांगी प्रयत्न सोडायची नाही. तिच्या हस्ताक्षर कलेक्शनच्या वहीत बऱ्याच शिक्षकांचेही अक्षर कोरले गेले होते. लिखाणाच्या शेवटी प्रत्येकाला शिवांगी नाव लिहून सही करायला सांगायची.
सुरवातीला फक्त हौस म्हणून जमवलेली हस्ताक्षरं नंतर मोठी झाल्यावर जेव्हा ती वाचायची तेव्हा त्या अक्षरामधून ते लिहिणारी व्यक्तीच आपल्याशी बोलतेय असं तिला वाटायचं.
मग ती त्या व्यक्तीचे वागणे, बोलणे किंवा विचार करायची पद्धत हे सगळे हस्ताक्षराशी जुळवून पहायची.
अक्षरांची वळणे शिवांगीला ते लिहिणाऱ्याचे गुणदोष उलगडून दाखवत तिला अजूनच त्या अक्षर परिक्षणात गुंतवायची. शिवांगी तिचे ठोकताळे मैत्रीणींशी बोलून पडताळूनही पहायची आणि ते बऱ्याचदा बरोबर यायचे.
त्यामुळे शिवांगीचा उत्साह अजून वाढायचा. शाळेतल्या मैत्रीणींनंतर मग मामा, मावशी, काका ह्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांच्या हस्ताक्षराशी त्यांच्या स्वभावाचे सूर जुळवल्यानंतर शिवांगीची ह्या छंदात अधिकाधिक प्रगती होत गेली.
माणसाच्या अक्षरावरून त्याचे गुणदोष व एकंदरीत स्वभाव आपण ओळखू शकतो ह्याची तिला खात्री झाली. पण तिची ही प्रगती फक्त एक छंद म्हणूनच राहिली.
शिवांगी शाळा, कॉलेजची डीग्री, लग्न, संसार, घर, मातृत्व ह्या एकेक पायऱ्या चढत गेली आणि तिचा हा छंद आयुष्याच्या शर्यतीत मागे पडला.
बऱ्याच वर्षांनी जेव्हा लेक तिची पहिली अक्षरं गिरवु लागली तेव्हा शिवांगीच्या ह्या छंदाने परत डोकं वर काढलं आणि ती सिद्धीचे अक्षर तिच्यातल्या गुणांशी पडताळून पाहु लागली.
बऱ्याच वर्षांनी जेव्हा लेक तिची पहिली अक्षरं गिरवु लागली तेव्हा शिवांगीच्या ह्या छंदाने परत डोकं वर काढलं आणि ती सिद्धीचे अक्षर तिच्यातल्या गुणांशी पडताळून पाहु लागली.
सिद्धीच्या अक्षरात एक लयबद्धता होती ज्याचा अर्थ ती मानसिकदृष्ट्या स्थिर होती. चंचलपणा तिच्या स्वभावात नव्हता. आणि तिच्या अक्षरांचे वळणही कलात्मक होते जे तिच्यातली creativity दर्शवत होते.
सिद्धी जशी मोठी होत गेली तसा शिवांगीला त्याचा प्रत्यय येऊ लागला. सिद्धीचे निबंधलेखन अतिशय उत्तम होते. तशीच चित्रकलाही.
नववीत शिकत असतांना सिद्धीने एकदा अभ्यास पूर्ण करण्यासाठी तिच्या वर्गातल्या मैत्रीणीची, शरयूची वही घरी आणली. सिद्धी अभ्यास करत असतांना शिवांगीची नजर सहज शरयूच्या अक्षरावर गेली.
शरयूचे अक्षर अतिशय विस्कळीत आणि तुटक होते. वेळेनुसार अक्षराची वळणं बदलतही होती. शिवांगीला वाटले ही मुलगी चंचल आहे. तसच निराशावादीही आहे. प्रत्येक गोष्टीत तिला असफलताच दिसत असावी बहुतेक.
म्हणून तिने सिद्धीला शरयू अभ्यासात कशी आहे ते विचारले.
सिद्धी म्हणाली " आई शरयू हुशार आहे पण परीक्षांना फार घाबरते. येत असलेली उत्तरं सुध्दा अति ताणामुळे विसरते. तिला आत्तापासूनच दहावीचे इतके टेंशन आहे की तिच्या आईबाबांनी तिच्यासाठी वेगवेगळ्या ट्यूशन्स चालू केल्यात. पण तरीही ती relaxed नाहीये. सतत तणावात असते."
शिवांगीने मग शरयूच्या आईला फोन केला. शरयूबद्दल, तिच्या अभ्यासाबद्दल विचारले. आणि तिच्या अक्षरावरुन केलेला तिच्या स्वभावाचा, गुणदोषांचा ॲनालिसीसही सांगितला.
शिवांगीने मग शरयूच्या आईला फोन केला. शरयूबद्दल, तिच्या अभ्यासाबद्दल विचारले. आणि तिच्या अक्षरावरुन केलेला तिच्या स्वभावाचा, गुणदोषांचा ॲनालिसीसही सांगितला.
शिवांगीची ऑबझर्वेशन्स ऐकून शरयूची आई एकदम चाट पडली. "तुम्ही कसं हो अगदी बरोबर ओळखलत? खरच आमच्या शरयूला कॉंफिडंसची फार गरज आहे. अत्ताशी दहावीत आहे तरी ती इतकी टेंशन घेतेय. पुढे तर अजून किती परीक्षा, स्पर्धांना तोंड द्यायचय. तुम्ही जरा तिच्याशी बोलाल का? आणि जमलं तर तिला अक्षर सुधारण्यासाठी काही टीप्स पण द्याल का? "
शिवांगीने विचार केला प्रयत्न करुन बघूयात आणि तिने शरयूला भेटायला बोलावले. शरयूशी गप्पा मारत मारत तिला बोलते केले.
शिवांगीचा अंदाज बरोबर निघाला. तिने शरयूच्या मनातल्या स्वतःवरच्या अविश्वासाला मोकळी वाट करुन दिली आणि मग अगदी सहजगत्या तिला तिच्या लिहिण्याच्या पद्धतीत थोडे बदल सुचवले.
ते बदल केल्यामुळे होऊ शकणारा परिणाम सांगितला व बदल केल्याने तुझा कॉंफिडंस वाढेल, भीती कमी होईल असा विश्वासही दिला.
शरयूनेही मग प्रयत्नपूर्वक स्वतःच्या अक्षरात चिकाटीने बदल केला आणि आत्मविश्वासाने भरपूर अभ्यासही केला. तिला दहावीच्या परीक्षेत खरोखरीच उत्तम मार्क्स मिळाले.
आपल्या सल्ल्यामुळे शरयूमध्ये झालेल्या चांगल्या बदलाने शिवांगीला फार आनंद झाला आणि स्वतःवरचा विश्वासही वाढला.
तिच्या या यशाने तिचा नवरा शरद पण खूप खुश झाला आणि त्याने शिवांगीला पुढचा मार्ग दाखवला.
"तुझा हा छंद फक्त फावल्या वेळातला उद्योग किंवा फक्त आवड म्हणून जपण्यापुरता न ठेवता त्याच्याकडे एक व्यवसाय म्हणून बघ.
तुझ्या कलेचा इतरांना त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी फायदा होईल आणि तुलाही स्वतःची अशी एक नवीन ओळख मिळेल. पण हे वाटते तेवढे सोपे नाही. त्याकरता तुझ्याकडे या विषयातले सखोल ज्ञान आणि recognized qualification सुद्धा हवे. तेव्हा मनावर घे आणि लगेच कामाला लाग आणि graphology चा डिप्लोमा करता येईल असे रेप्युटेड कॉलेज शोधून काढ. ह्या डिप्लोमासाठी लागणार्या requirements ही बघ."
"बरोबर आहे तुझं. पण इतक्या वर्षांनंतर आता परत कॉलेज आणि अभ्यास वगैरे मला जमेल का रे? आणि व्यवसाय वगैरेचा तर आपल्या दोघांनाही काही अनुभवही नाहीये. कशाला उगीच या भानगडीत पडायचं?" शिवांगी म्हणाली.
"अगं प्रत्येकच गोष्ट कधी ना कधीतरी पहिल्यांदाच असते ना आपल्यासाठी? तुझ्या या कला कौशल्याच्या निमित्ताने आपणही करून बघू ना व्यवसाय. मी आहे ना तुझ्याबरोबर मग झालं तर. पुढचं पुढे. तू आधी graphology शिकून तर घे."
शरदने एवढा पाठिंबा दिल्यावर मग शिवानीनेही graphology चांगलीच मनावर घेतली. तिच्याच शहरात असलेल्या एका चांगली institute शोधून तिथे अॅडमिशन घेतली आणि मेहनतीने डिप्लोमा पूर्ण केला.
डिप्लोमाची पहिली पायरी पार केल्यावर शरद आणि सिद्धी दोघानींही मग graphologist शिवांगीचा स्वत:चा बिझनेस चालू कर म्हणून पिच्छा पुरवला आणि शिवांगीने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तिच्या बिझनेसला सुरूवात केली.
शिवांगीचा लहानपणाचा छंद व त्यातून मिळणारा आनंद आज फक्त तिच्यापुरता मर्यादित न राहाता इतरांनाही आनंद देण्यासाठी सज्ज झाला.
आजची ही दिवाळी पहाट शिवांगीला स्वतःची एक नवीन ओळख मिळवून देत झाली.
© धनश्री दाबके
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.