© आर्या पाटील
अस्मि नावाप्रमाणेच अस्मानी सौंदर्याची आणि आधुनिक विचारांची नवविवाहिता. अगदी सहा महिन्यांपूर्वी अमेय बरोबर कोर्ट मॅरेज करत तिने लग्नाचा अवास्तव खर्च टाळला..
"आलास का बाळकृष्णा. तुझ्याशिवाय माझी देवपूजाच अपूर्ण बघ.." म्हणत आजी पहिल्यांदा छोट्या अमेयचा गालगुच्चा घ्यायची मग त्याच्या ओंजळीतली फुलं..
देवघरातील साऱ्या मूर्तींची आरास मखमाली कापडावर सजलेली असायची.. सुरवात स्नानापासून व्हायची.. एकएका मूर्तीला आंजारत गोंजारत आजी न्हाहू घालायची.. सुती केशरी वस्त्राने ओलेत्या मूर्ती कोरड्या केल्या जायच्या.. हळुवार हातांनी श्रध्देने उगाळलेलं चंदन आजी मायेने मूर्तीवर सजवायची..
लग्नाला सहा महिने झाले आणि घरून महिनाभरासाठी गावी येण्याचं बोलावणं आलं.. अजून एकदाही नातसुनेचं तोंड आजीने पाहिलं नव्हतं..
पहिल्यांदाच नवं जोडपं घरी आलं म्हणून अमेयच्या आईने त्यांच औक्षण केलं.. अस्मिला पटत नव्हतच पण त्याचं मनही मोडायचं नव्हतं त्यामुळे न पटूनही तिने सारं पटून घेतलं..
अस्मि मॉडर्न असली तरी हळवी आणि बोलकी होती.. घरच्यांच्या गोड सुरात ती लवकरच मिसळली.. आजी तिची सख्खी मैत्रिण बनली त्या काही दिवसांत... दोघांचे लाड पुरवितांना आजीलाही आनंद मिळत होता.
वय होऊनही आजीने देवपूजेचा आपला सोहळा सोडला नव्हता.. रोजच अस्मिची सकाळ आजीचा गोड आवाज कानावर पडून होऊ लागली.. अमेय तर लहानपण अनुभवत होता जणू..
आजींनी साऱ्यांना तिची ओळख करून दिली.. त्या गरिब बायका हात जोडत तिला नमस्कार करित होत्या.. किती आनंदी दिसत होत्या त्या..
आजीने तिला हळदीकुंकवाचा करंडा घेण्याची खूण केली. कधीही देवघरात पाऊल न ठेवलेल्या अस्मिने आज देवघराचं सौंदर्य अगदी जवळून अनुभवलं.. त्या देवघराचंही आणि आजीच्या मनातल्या देवघराचंही..
साऱ्यांनी भरभरून आशिर्वाद दिला अस्मिला. त्यांच्या आशिर्वादाने अस्मिलाही मानसिक समाधान मिळाले..
" काय मग.. आवडली का आमची देवपूजा..?" आजी हळूच म्हणाल्या..
" आजी हिच खरी देवपूजा.. खूप आवडली.." त्यांच्या गळ्यात पडत ती म्हणाली.
" कसं आहे अस्मि.. देव माणसातच आहे हे शाश्वत सत्य आहे पण त्याचबरोबर ही जाणिव करून देणारं शुद्ध मन देवपूजेतूनच भेटतं बघ.
अमेय गालात हसला. आजीसाठी का होईना पण अस्मि देवघरात शिरणार या सारखा मोठा सोहळा तो कोणता.. त्याने फुलांची परडी भरली.. टी शर्टात फुलांना वेचणार तोच तिने पदराची ओंजळ पुढ्यात करत त्यात फुले वेचली..

तिच्या घरचेही मॉडर्न विचारांचे त्यामुळे त्यांनीही आडकाठी घातली नाही. मात्र अमेयच्या घरी कोर्ट मॅरेजची ही आधुनिक पद्धत फारशी रुचली नाही. पण मुलाच्या आनंदासाठी दिली त्यांनीही परवानगी.
आई वडिलांची एकुलती एक अस्मि तिचे आभाळही त्या तिघांपुरतेच मर्यादित राहिले. त्यामुळे माणसांचा गोतावळा, त्यांचा सहवास, भावनांची देवाणघेवाण यांच्याशी फारशी तोंडओळख नव्हती तिची.
याविरुद्ध अमेय.. ठाण्यापासून तीस एक किलोमीटर असलेल्या निसर्गदत्त गावात त्याचे बालपण गेले.. घरी एकत्र कुटुंब पद्धती त्यामुळे पक्का माणंसाळलेला तो नात्यागोत्यांच्या बाबतीत फारच भावनिक.
घराचा भक्कम आधार असलेल्या आजीचा त्याला लहानपणापासून खूप लळा...साऱ्या भावंडांमध्ये तो आजीचा सर्वात लाडका. आजीची देवपूजा हा तर त्याचा जिव्हाळ्याचा विषय.
सकाळची देवपूजा असो वा संध्याकाळची...त्याची स्वारी तयार होऊन हात जोडून आजीच्या बाजूला बसलेली मिळायची..
त्यांनी वाड्याच्या परसात नानाविध फुलझाडे लावली होती. त्या टुमदार वाड्याला अस्सल सौंदर्य बहाल करायची ती बागायत. जास्वंद, वेगवेगळ्या रंगाचे गुलाब, सदाफुली, जाई जुई, अबोली, मोगरा, शेवंती, प्राजक्त अन् रातराणीही फुललेली असायची बागेत..दुर्व्याचा गालिचा डोळ्यांना हिरवी भूरळ घालायचा... सकाळी परडीभर फुले वेचूनही मन भरायचं नाही अमेयचं.. आजीच्या देवपूजेला फुले कमी पडू नयेत म्हणून शर्टाची ओंजळ अलगद फुलांनी भरून तो देवघरात पोहचायचा.
"आलास का बाळकृष्णा. तुझ्याशिवाय माझी देवपूजाच अपूर्ण बघ.." म्हणत आजी पहिल्यांदा छोट्या अमेयचा गालगुच्चा घ्यायची मग त्याच्या ओंजळीतली फुलं..
आजीचं देवघर म्हणजे तिच्या हक्काचं श्रध्दास्थान.. किती आरास त्या देवघराची आणि त्यातील तिच्या देवांची.. मध्यभागी असलेली तांब्याची गणेशमूर्ती.. त्याबाजूला शंकराची पिंडी.. तांब्याची लक्ष्मी माता, पाळण्यावर पहुडलेला चांदीचा बाळकृष्ण, जोडीला पितळेची अन्नपूर्णाही...
जणू तिच्या देवघरात आकाशातील स्वर्गच अवतरलेला असायचा... सोवळे पाळत देवांचे सोहळे साजरे करण्यात तिला खूप आवडे.. एकाकीपणाचा विसर पडे.. आजोबा गेल्यानंतर तिच्या जगण्याला शाश्वत ठेवण्याचं काम देवपूजेनं तर केलं होतं.
देवघरातील साऱ्या मूर्तींची आरास मखमाली कापडावर सजलेली असायची.. सुरवात स्नानापासून व्हायची.. एकएका मूर्तीला आंजारत गोंजारत आजी न्हाहू घालायची.. सुती केशरी वस्त्राने ओलेत्या मूर्ती कोरड्या केल्या जायच्या.. हळुवार हातांनी श्रध्देने उगाळलेलं चंदन आजी मायेने मूर्तीवर सजवायची..
देवांना त्याच्या आवडीनुसार परडीतील फुले वाहिली जायची.. दुर्व्यांच्या जुड्या अन् जास्वंदीने गणपती बाप्पा खुश व्हायचे तर बेलाचे पान शंकराच्या पिंडीवर अर्पिली जायचे.. शेवंतीची आरास लक्ष्मी मातेचं रुप खुलवायची..
देवघरातील निरांजन आणि आजीला तिच्या कन्यादानात मिळालेली तांब्याची मोठी समई प्रज्वलित झाल्यावर देवघर प्रकाशाचं दान घेऊन खुलून जायचं
डोळ्यांना भरती यायची ते असीम सौंदर्य पाहून.. अगरबत्तीच्या मंदधुंद सुंगधाने श्वासही तजेलदार बनायचा.. सकाळी वक्रतुंड महाकायचे आजीचे गोड स्वर वाड्याला मंदिराचे रुप द्यायचे..
आजीच्या जोडीला छोटा अमेयही या साग्रसंगित सोहळ्याचा चिमुकला साक्षीदार व्हायचा.. दिवेलागणीला पुन्हा हेच देवघर घरातील चिमुकल्यांच्या शुंभकरोती आणि मारुतीस्तोत्राने दुमदुमून निघायचे..
रोजच सोहळा असायचा घरात.. आजीच्या तालमीखाली सारीच नातवंड गणपतीस्तोत्र, मारुतीस्तोत्र, मनाचे श्लोक, रामरक्षा यासांरख्या मनाला नवसंजिवनी देणाऱ्या ठेव्यांना आत्मसात करायची..
थोडक्यात अमेय हा माणसांच्या बाबतीत, सहवासाच्या बाबतीत एकूणच आठवणींच्या बाबतीत गर्भश्रीमंत होता.. याउलट अस्मि.. पक्की नास्तिक.. मूर्तीपूजेला तिचा कडकडून विरोध..
तिच्या मते देव माणसांत असतो मातीच्या मूर्तीत नाही.. माणुसकी जपणे म्हणजे खरी देवपूजा असं तिचं ठाम मत.. गरजूंना मदत करणे हे तिचे श्रध्दास्थान..
ठाण्याच्या त्यांच्या घरातही देवपूजेचा सारा सोहळा अमेय साजरा करायचा.
सकाळची दिवाबत्ती वा संध्याकाळची दिवेलागण सहा महिन्यांत एकदाही अस्मिने केली नसेल.. अमेयने या बाबतीत तिच्यावर जबरदस्तीही केली नाही. शेवटी प्रत्येक माणूस वेगळा आणि त्याचे श्रध्दास्थानही..वेगळ्या विचारांचे ते गुण्यागोविदांत राजाराणीचा संसार अनुभवत होते..
लग्नाला सहा महिने झाले आणि घरून महिनाभरासाठी गावी येण्याचं बोलावणं आलं.. अजून एकदाही नातसुनेचं तोंड आजीने पाहिलं नव्हतं..
तिचा आग्रह अमेयलाही नाही टाळता आला आणि गावी जाण्याचा प्लॅन निश्चित झाला..
" मी गावी येईन पण तिथल्या रुढी परंपरा माझ्याने पाळल्या जाणार नाही.. आणि कोणतीही पूजा मग ती सत्यनारायणाचीही का असेना माझा तिला ठाम विरोध असेल.. याची कल्पना घरी देऊन ठेव म्हणजे वडिलधाऱ्यांचा माझ्याकडून अपमान होणार नाही.." तिने आधीच आपली नास्तिक भूमिका स्पष्टपणे मांडली..
त्यानेही आढेवेढे न घेता घरी आधीच कल्पना देऊन ठेवली.. घरची मंडळी साधी होती.. ज्याला त्याला त्याच्या स्वत: च्या इच्छेने,आवडीने जगण्याचा अधिकार आहे मग तो घरचा मुलगा असो वा सुन हा वारसा वंशपरंपरागत त्यांच्या खानदानात चालत आला होता.. त्यामुळे अस्मिच्या निर्णयाला मान देण्याचं त्यांनी ठरवलं..

ठरल्याप्रमाणे दोघेही गावी येऊन पोहचले.
"अस्मि, तुला पटत नाही हे मला मान्य आहे पण माझ्या घरचे खासकरून आजी खूप श्रध्दाळू आहे.. त्यांच्या श्रध्देला धक्का लागेल असे तु काहीच वागणार नाही अशी आशा आहे.." गाडीतून घरापर्यंतचा रस्ता अमेयने घरच्यांची श्रद्धा जपत पार केला..
अस्मिनेही होकारार्थी मान हलवत त्याच्या निर्णयाचे स्वागत केले..
"अस्मि, तुला पटत नाही हे मला मान्य आहे पण माझ्या घरचे खासकरून आजी खूप श्रध्दाळू आहे.. त्यांच्या श्रध्देला धक्का लागेल असे तु काहीच वागणार नाही अशी आशा आहे.." गाडीतून घरापर्यंतचा रस्ता अमेयने घरच्यांची श्रद्धा जपत पार केला..
अस्मिनेही होकारार्थी मान हलवत त्याच्या निर्णयाचे स्वागत केले..
पहिल्यांदाच नवं जोडपं घरी आलं म्हणून अमेयच्या आईने त्यांच औक्षण केलं.. अस्मिला पटत नव्हतच पण त्याचं मनही मोडायचं नव्हतं त्यामुळे न पटूनही तिने सारं पटून घेतलं..
आपल्या नातवाची अन् नातसुनेची दृष्ट काढत आजीने दोघांना उराशी कवटाळलं.. आज पहिल्यांदा आजीची ऊब भरभरून अनुभवली अस्मिने.
अस्मि मॉडर्न असली तरी हळवी आणि बोलकी होती.. घरच्यांच्या गोड सुरात ती लवकरच मिसळली.. आजी तिची सख्खी मैत्रिण बनली त्या काही दिवसांत... दोघांचे लाड पुरवितांना आजीलाही आनंद मिळत होता.
वय होऊनही आजीने देवपूजेचा आपला सोहळा सोडला नव्हता.. रोजच अस्मिची सकाळ आजीचा गोड आवाज कानावर पडून होऊ लागली.. अमेय तर लहानपण अनुभवत होता जणू..
परडीभर फुले वेचता वेचता टी शर्टच्या ओंजळीत फुले भरून आणून तो पुन्हा लहानगा झाला.. तिच आजी आणि तिची तिच साग्रसंगित देवपूजा त्याला आजही भारावून जात होती..
आजही नेहमीप्रमाणे पूजा झाल्यावर अमेय आजीला घेऊन गणपतीच्या मंदिरात गेला.. यथायोग्य दर्शन झाल्यावर परतीच्या वेळेस आजीने झाडाच्या चौथऱ्याचा आसरा घेतला..
"बाळा, नशिबवान आहेस.. अस्मि खूपच समजूतदार आहे.. गुणाची शोधलीस माझी नातसून.." नातसुनेचं कौतुक करत आजी म्हणाली..
" गुणाची तर आहे.. मला वाटलच होतं तुला ती नक्की आवडेल.. खूप साधी आणि सोज्वळ आहे ती.. पण माझ्यासारखी देवभोळी नाही.." म्हणत देवाच्या बाबतीत तिचा नास्तिक स्वभाव त्याने आजीसमोर उलगडला.
" ती करते तिही देवपूजाचं रे बाळा.. आपण मानसिक शांतीसाठी देवपूजा करतो तर ती मानसिक समाधानासाठी गरजूंना मदत करत देवपूजाच करते रे.." समजावत आजी म्हणाल्या..
त्यानेही होकारार्थी मान हलवली पण कुठेतरी तिनेही आजीसारखं आपल्या देवघराचा लक्ष्मी बनून ताबा घ्यावा असं त्याला राहून राहून वाटायचं. आजीच्या नजरेतून त्याची इच्छा सुटली नाही.
दुसऱ्या दिवशी मात्र नेहमीप्रमाणे देवपूजा झाल्यावर आजीने अस्मिला आवाज दिला.. आजी म्हणजे तिच्या जिव्हाळ्याचा विषय ती ही धावतच जवळ आली..
" अस्मि माझं एक काम आहे करशील का गं..?" तिला प्रेमाने विचारत आजी म्हणाली.
" आजी, विचारता का..? हक्काने सांगा..." ती ही तेवढ्याच आपुलकीने म्हणाली.
" संध्याकाळी मी काही बायकांना बोलावलं आहे हळदी कुंकवासाठी.. सगळी तयारी अमेयच्या आईने केली आहे पण नेमकं संध्याकाळी तिला बाहेर जायचं आहे.. मला एकटीला कार्यक्रम झेपणार नाही गं.. वय झालय.. मला मदत करशील.." आजी म्हणाली.
" पण आजी मला हे नाही पटत.. देवपूजेला माझा विरोध आहे.." आढेवेढे घेत ती म्हणाली.
" विरोध देवपूजेला आहे पण ही काही सत्यनारायणाची पूजा नाही.. फक्त हळदीकुंकवाचा कार्यक्रम आहे.. आणि आजीसाठी एवढंही करणार नाहीस.." तिला भावनिक करत आजी म्हणाली..
शेवटी आजीचा आग्रह कसा मोडणार ना.. मग झाली तयार तिही.. संध्याकाळ झाली आणि तयार होऊन ती खाली आली..
खाली व्हरांड्यात त्यांच्या शेतमळ्यावर काम करणाऱ्या गरिब बायका सजून धजून बसल्या होत्या.. आजी प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करित होती.. समोरचं दृश्य पाहून अस्मि ही भावनिक झाली..

त्यांच्या वाट्याला असे सोहळे कमीच पण आजी मात्र दरवर्षी न चुकता त्यांना हक्काचा सोहळा अनुभवू द्यायच्या हे कळल्यावर आजीचा अभिमान वाटला तिला.
आजीने तिला हळदीकुंकवाचा करंडा घेण्याची खूण केली. कधीही देवघरात पाऊल न ठेवलेल्या अस्मिने आज देवघराचं सौंदर्य अगदी जवळून अनुभवलं.. त्या देवघराचंही आणि आजीच्या मनातल्या देवघराचंही..
हळदी कुंकू लावून त्या गरिब महिलांची तिने मानस पूजा केली जणू..
आजींनी सगळ्यांसाठी साड्या आणल्या होत्या.. अस्मिने साडी आणि नारळाने त्यांची ओटी भरली.. त्यांच्या साग्रसंगित जेवणाची सोयही केली होती इतकेच नव्हे तर मुलाबाळांसाठी पार्सल जेवणही दिलं..
साऱ्यांनी भरभरून आशिर्वाद दिला अस्मिला. त्यांच्या आशिर्वादाने अस्मिलाही मानसिक समाधान मिळाले..
" काय मग.. आवडली का आमची देवपूजा..?" आजी हळूच म्हणाल्या..
" आजी हिच खरी देवपूजा.. खूप आवडली.." त्यांच्या गळ्यात पडत ती म्हणाली.
" कसं आहे अस्मि.. देव माणसातच आहे हे शाश्वत सत्य आहे पण त्याचबरोबर ही जाणिव करून देणारं शुद्ध मन देवपूजेतूनच भेटतं बघ.
मूर्तीपूजा हा श्रध्देचा भाग आहे.. मन समाधानी आणि सात्विक बनतं.. सकाळच्या वातावरणातील सकारात्मकता देवपूजेने आणखी व्यापक बनते म्हणून करायची मूर्तीपूजा..
मनाला नवचेतना देणारी मूर्तीपूजा ही मानसिक आनंदाच एक शाश्वत मूळ आहे बघ.. चिंतेने ग्रस्त मनाला देवपूजेने नवी उभारी मिळते, दु:खाने वेढलेल्या मनाला देवपूजेने सुखी राहण्याचं बळ मिळतं, संसाराच्या रहाटगाडग्यात गुंतलेल्या मनाला देवपूजेने शांती मिळते... बाकी काही नाही गं..
खरा देव माणसातच आहे याचा मी ही पुरस्कार करते त्यामुळे व्रत, वैकल्यांपेक्षा गरजूंना दानधर्म करण्याकडे माझाही कल आहे.. पण देवपूजा हा सगळ्याच भावनांचा गाभा आहे.. मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही पण लाडकी नात म्हणून मानसिक आनंदाची कवाडं खुलं करणारी देवपूजेची चावी तुला हक्काने देईन.. बाकी निर्णय तुझा.." म्हणत आजींनी तिला नवी दृष्टी दिली..
तिला विशेष पटलं नाही पण मानसिक आनंदासाठी तिने देवपूजेचा मार्ग खुला करून घेतला..

दुसऱ्या दिवशी सकाळी परसात फुले वेचणाऱ्या अमेयला अस्मिला पाहून आश्चर्य वाटले..
" मी स्वप्नात तर नाही ना.." म्हणत त्याने स्वत: ला चिमटा काढला.
" आजीसाठी करते आहे.." म्हणत तिनेही सुरक्षित पावित्रा घेतला..
" मी स्वप्नात तर नाही ना.." म्हणत त्याने स्वत: ला चिमटा काढला.
" आजीसाठी करते आहे.." म्हणत तिनेही सुरक्षित पावित्रा घेतला..
अमेय गालात हसला. आजीसाठी का होईना पण अस्मि देवघरात शिरणार या सारखा मोठा सोहळा तो कोणता.. त्याने फुलांची परडी भरली.. टी शर्टात फुलांना वेचणार तोच तिने पदराची ओंजळ पुढ्यात करत त्यात फुले वेचली..
त्यांना जोडीने देवघरात पाहून देवघरातील देवमंडळीही खुदकन गालात हसली..
© आर्या पाटील
© आर्या पाटील