© नीलिमा देशपांडे
"आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्त रंगात न्हाऊन आली, आली माझ्या घरी ही दिवाळी !"
रांगोळीत रंग भरताना निलांबरी गाण गुणगुणत होती...तिला असं खुश आणि समाधानी पाहिलं की निशांतला जगातला सर्वात सुखी नवरा आपणचं आहोत असं वाटून नेहमीच आनंद व्हायचा.
निलांबरी आणि निशांत एकमेकांना अगदी साजेसं जोडपं! एकाची उणीव दुसरा अशी काही भरून काढी की बघणारे नेहमी कौतुक करत त्यांच्या एकमेकांना सावरून घेण्याचं.
कधीही ते त्यांच्या आयुष्यात काही कमी आहे ह्याची तक्रार करणारे नव्हते.
'जे आहे त्यात आणि जे नाही त्या शिवाय' नेहमी हसत खेळत संसार कसा करता येईल आणि किती माफक गरजांवर माणसाला सुखी होता येईल हे खरे तर त्यांच्या कडून शिकण्यासारखं होत.
नवीनच लग्नं झाल्याने हौस मौज त्यांनाही होतीच पण "ऋण काढून सण साजरा करायचा नाही!" ही तिला असलेली शिकवण सासरी तिला खुप उपयोगी पडली.
नोकरीनिमीत्त वर्ष भराच्या लेकराला घेऊन ते नव्या शहरात रहायला आले आणि तुटपुंज्या वस्तूंवर त्यांचा संसार उभा झाला.

कोणतेही मोठे किंवा भारी सामान नसल्याने तिने स्वत:च थोडी भांडी, कपडे, कागद पत्रे आणि पुस्तके असे लागणारे सामान पैक करुन पाठवले होते.
अवघ्या एका लोडींग रिक्षात मावेल इतके सामान असल्याने त्यांनी एका बिल्डिंगमधे वन बीएचके फ्लैट रेंटवर घेतला जो फर्नीशड होता, त्यामूळे बेड आणि कपाट याची बेसिक सोय झाली होतीच....
अजून काय हवे? बस स्वर्ग दोन बोटे उरला होता तिला!
यावरुन आता कल्पना आलीच असेल तुम्हांला या जोडीची!
त्यांना साधारण वर्ष होत आले होते आणि त्या घरातली ती त्यांची पहिली दिवाळी ते साजरी करणार होते.

सासरचे सगळे कैलासमानसरोवर यात्रेला आधीच गेले होते म्हणून तिथे जाऊनही आपण तिघेच असणार असूत तर त्यापेक्षा नव्या शहरात नव्या शेजाऱ्यांसोबत, इथेच आपण दिवाळी साजरी करु असा विचार त्यांनी पक्का केला.
चार दिवसात घाईघाईने जाऊन येण्यापेक्षा बाहेरगावी गेलेले घरचे परतले की सुट्टी घेऊन जाऊ म्हणजे निदान भेटी होतील हा त्यामागचा त्यांचा विचार!
निशांतला ऑफ़िस कडून झिरो बैलेंस सैलरी अकाउंट उघडून मिळाले होते आणि त्याचे घरी आलेले वेलकम कीट उघडून तो वाचत होता.
तो ते वाचताना निलांबरीचे गाणे ऐकून तिचा मूड छान आहे याची त्याला खात्री पटली म्हणून त्याने हळूच तिच्याजवळ विषय काढला...,
"आपण क्रेडिट कार्ड घेवूया का? म्हणजे त्याचे बरेच फायदे असतात !...."
त्याचे वाक्य अर्ध्यावर तोडत,
"नको..s...s...!"

हा निलांबरीचा आवाज आणि त्यापाठोपाठ तिच्या मनातल्या क्रेडिट कार्डच्या सगळ्या भिती, व्याजदर, त्यातून वेळेवर पेमेंट नाही भरले तर होणारे नुकसान ह्या ऐकलेल्या गोष्टींची तिने चिंता व्यक्त केली.
"सध्या आपण जे कमावतो त्यातून आपला खर्च भागून आणि घरी पैसे देऊन आपण उरलेले भविष्यासाठी वाचवू शकतो पण कार्ड घेतले की सतत पैसे नसले तरी आणि गरज नसली तरी खरेदी करायची चुकीची सवय लागेल आपल्याला आणि शेवटी हे कर्जच ना! त्यापेक्षा नको आपल्याला असे काही !"
हे सारे बोलत तिने त्याला, आपल्याला कार्ड नको असे तिचे ठाम मत सांगितले.

त्यावर त्याचेही मत होते ते त्याने बोलून दाखवले....
" मला तुझ्या मनातली भिती समजते पण आता दोन वर्षे एकमेकांना ओळखतो आहोत आपण. न मला कुठले व्यसन, ना तुला विनाकारण खरेदीची हौस ! बळजबरीने कधी काही तुझ्यासाठी घेऊ म्हणून तुला ठरवले तरी तुझा प्रश्न उभा असतो.
"Is it need base or want base?"
आणि मग अनेकदा आपली लिस्ट अर्धी कट करण्यातच संपून जाते.

मला तुझा समजूतदार पणा आवडतो आणि त्यामूळे कधी कार्ड घेतले तरी त्याचा दुरपयोग होणार नाही ह्याची मला खात्री आहे.
त्यामूळे फक्त तिकीट बुकींग वगैरे सारख्या अगदीच गरजेच्या ठिकाणी आपण ते वापरु शकतो यासाठी एकदा अप्लाई करावे अशी माझी इच्छा होती म्हणून मी ते केले होते आणि थोड्या वेळाने त्यांचा Executive home verification ला येणार आहे"
"ठीक आहे...तू घरी बोलावले आहेस तर येवू दे पण नाही मिळाले कार्ड तरी मी खुश आहे" म्हणत निलांबरी रांगोळी संपवत उठली.

ठरल्याप्रमाणे Executive आला आणि खुर्चीवर बसत त्याने घरभर नजर फिरवली आणि चौकशी सुरु केली. त्यांच्यासाठी पाणी घेवून आलेल्या तिला
"फ्रिजमधले पाणी मिळेल का?" अशी त्याने विनंती केली.

निशांत आणि निलांबरी दोघेही कधीच फ्रिजमधले पाणी पीत नसतं आणि इथे तर त्यांनी तो विकतही घेतला नसल्याने निलांबरीने त्यांना प्रामाणिकपणे तसे सांगितले.
" सॉरी आम्ही गरज नसल्याने अजून फ्रिज घेतला नाही आणि घेतला असता तरी पाणी कधीच ठेवले नसते. गेली अनेक वर्षे आम्हांला साधे पाणी पिण्याची सवय आहे आणि आरोग्यासाठी ती चांगली असल्याने आम्ही तीच सवय मुलालाही लावत आहोत."
मुलाचं नाव घेताच त्याचे कान टवकारले आणि तो आईजवळ जावून काहीतरी विचारु लागताच, Executive ने निशांतला विचारले,
" ह्याला टिव्ही लावून देता का आत असेल रूममधे तर म्हणजे आपल्याला फॉर्म भरता येईल शांततेत? "
निशांतला हसू आले. "अहो इतक्या लहान मुलाला काय दाखवणार टिव्ही? आम्ही दोघेही दिवसभर नोकरी साठी बाहेर असतो आणि आमचे लेकरू पाळणाघरात ! त्यामूळे कधी टिव्ही बघायला वेळच नाही.

आम्ही अजून टिव्ही घेतला नाही आणि कदाचित लवकर घेऊत असे वाटत नाही कारण आम्हांला तो वेळ सध्या तरी एकमेकांना आणि मुलाला दयायचा आहे. निलांबरी MBA करते आहे त्यामूळे तिला तिचा वेळ अभ्यासासाठी वापरायचा असतो.."
आज कुणाला सांगितले तर विश्वास बसणार नाही पण माणसाच्या गरजा वेगळ्या असू शकतात, किंवा चांगल्या सवयी असल्याने कुणी एखादी गोष्ट घरात विकत घेत नसेल तर रीपेमेंटची खात्री पटण्यासाठी बैंक बैलेंस किंवा इतर चौकशी न करता, executive ने सरळ तोंडावर भरलेला फॉर्म कैंसल केला.

2005 च्या दरम्यान क्रेडिट कार्ड हे तुम्ही बंद घरात दिवसभर कुणी घरी नसले तरी गरजेसाठी नव्हे पण क्रेडिट कार्ड मिळवण्याकरता देखावा उभा करता आला तर मिळत होते.
शेजारी राहत असलेल्या हेमंतला हे समजल्यावर त्याने त्याच्या बँकेतल्या मित्राला हा मुद्दा सांगून, पटवून देऊन दिवाळीत निशांत आणि निलांबरीला त्यांचे पहिले क्रेडिट कार्ड मिळवून दिले.
गेली कित्येक वर्षं ते क्रेडिट कार्ड अजुनही निशांत आणि निलांबरी दिवाळीत लक्ष्मीपूजनाला बाहेर काढतात आणि इतर मौल्यवान वस्तू बरोबर पुजा करुन परत ठेवतात.

समाधानी मने आणि आनंदी संसारात लक्ष्मी आणि सरस्वती प्रसन्न असल्यावर त्यांना अशा अनेक कार्डच्या आता ऑफ़र आल्या तरी ते घेण्याची गरज भासत नाही.
© नीलिमा देशपांडे
सदर कथा लेखिका नीलिमा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.