© वर्षा पाचारणे
आता नुकतीच राधिकाच्या घरी एक गोड बातमी समजली होती. एक नवखी चाहूल लागली होती... मृणालताई तर नातवाचे लाड करण्यासाठी आसुसल्या होत्या.
राधिका..,. मृणालताईंची मुलगी. मृणालताईंनी तिचं लग्न अगदी थाटामाटात करून दिलं होतं. कशा- कशाची म्हणून हौस बाकी ठेवली नव्हती. त्यांना जावईही तसाच गुणी मिळाला होता.
मृणालचे सुरूवातीचे सगळे सण मृणालताईंनी अगदी हौसेने साजरे केले होते. तिला हवं नको ते सारं काही घेऊन दिलं होतं. लेकीबरोबर जावयाचेही खूप लाड होत होते.
एकुलती एक असल्याने तशीही राधिका लहानपणापासूनच लाडाकोडात वाढलेली होती, पण हट्टी मात्र नव्हती. तिच्यावर मृणालताईंनी चांगले संस्कार केले होते.
चांगल्या वाईटाची जाणीव तिला पहिल्यापासूनच होती .त्यात सासरही तिला चांगले मिळाल्याने सारेच आनंदात होते. राधिकाच्या नवऱ्याला म्हणजेच मिहीरला आई नव्हती, त्यामुळे मृणालताई त्याचे अगदी स्वतःच्या लेकाप्रमाणे लाड करायच्या.
मिहीरही राधिकाच्या आईमध्ये स्वतःची आई शोधायचा. बोल बोल म्हणता राधिकाच्या लग्नाला कधी सहा महिने झाले कळले देखील नाही.
आता नुकतीच राधिकाच्या घरी एक गोड बातमी समजली होती. एक नवखी चाहूल लागली होती... मृणालताई तर नातवाचे लाड करण्यासाठी आसुसल्या होत्या.
कधी एकदा राधिका बाळंतपणासाठी येते आणि मी तिचं कोडकौतुक करते असं त्यांना झालं होतं. त्यांनी तर आत्तापासूनच बाळासाठी टोपडी विणायला घेतली होती. लोकरीचे विणकाम करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हतं.
आता राधिकाला सातवा महिना लागला होता. तिने विचार केला,' आता आई एवढं म्हणतेच आहे, तर तिकडे जाऊन डोहाळेजेवण होईल आणि मग डिलेवरी पण तिकडेच होईल'.
आता राधिकाला सातवा महिना लागला होता. तिने विचार केला,' आता आई एवढं म्हणतेच आहे, तर तिकडे जाऊन डोहाळेजेवण होईल आणि मग डिलेवरी पण तिकडेच होईल'.
पण तिच्या मनात मिहीरची काळजी होती. त्याचे जेवणाचे कसे होईल? तो काय खाईल? या सार्या विचाराने तिने ठरवलं की,' मी आईकडे जाण्यापेक्षा, आईलाच इकडे बोलावून घेते.
मग इथेच डोहाळे जेवण करू आणि बाळंतपण इकडेच होईल. शिवाय मिहीरही सोबत असेल.. म्हणून तिने तसं आईला कळवलं. आईला लेकीची काळजी समजली. तिने ठरवलं की ,'ठीक आहे ,जसं राधिकाला योग्य वाटेल तसंच करूया'.
आज सकाळपासूनच मृणालताईंची खूप गडबड सुरू होती. लेकीकडे न्यायच्या सामानाची बॅग पूर्ण भरून झाली ,तरी त्यांनी ती बॅग चार वेळा तपासली होती... कारण एखादी गोष्ट चुकून राहून गेली तर त्यांच्या मनाला रुखरुख लागली असती.
आज सकाळपासूनच मृणालताईंची खूप गडबड सुरू होती. लेकीकडे न्यायच्या सामानाची बॅग पूर्ण भरून झाली ,तरी त्यांनी ती बॅग चार वेळा तपासली होती... कारण एखादी गोष्ट चुकून राहून गेली तर त्यांच्या मनाला रुखरुख लागली असती.
त्यावर राधिकाचे बाबा त्यांची चेष्टा करत होते,"किती वेळा बॅग तपासते आहेस? जर काही राहिलं असेल, तर मी आहेच की द्यायला आणि आपला मिहीर काही कमी करणार नाही, हो... काही गोष्ट लागली तर त्याला सांग. तो अगदी अर्ध्या रात्रीत आणून देईल.
त्यावर मृणालताई म्हणाल्या," हो ,हो... तसा माझा जावई भला आहे, हो"... आणि दोघेही मनमुराद हसले. घराला कुलूप लावून राधिकाचे आई-बाबा सगळ्या बॅग गाडीत ठेवून निघाले.
प्रवास लांबचा होता, त्यामुळे निघताना त्यांनी राधिकाला तसे कळवले की,' आम्ही आत्ता सकाळी निघालो तरी रात्री पोहोचू'. राधिका आतुरतेने वाट पाहत होती... आई-बाबा येणार म्हणून ती आज भलतीच खुश होती.
शेवटी बाळंतपणात लेकीसाठी आईपेक्षा दुसरी जवळची व्यक्ती कोण असणार.
राधिकाने रात्रीचे जेवण तयार केले आणि आई-बाबा आल्यावर एकत्र जेवू असं मिहीरला सांगितलं. मिहीरनेही त्यांच्या आवडीचे व्हॅनिला आईस्क्रीम आणले होते आणि दोघे मिळून आई बाबांची वाट पाहत बसले होते.
राधिकाने रात्रीचे जेवण तयार केले आणि आई-बाबा आल्यावर एकत्र जेवू असं मिहीरला सांगितलं. मिहीरनेही त्यांच्या आवडीचे व्हॅनिला आईस्क्रीम आणले होते आणि दोघे मिळून आई बाबांची वाट पाहत बसले होते.
तितक्यात एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. खरंतर नंबर बाबांचा होता, पण फोनवरच्या व्यक्तीचा आवाज अनोळखी होता..
तो माणूस फक्त,' अपघात झाला आहे आणि त्या गाडीजवळ हा फोन मिळाला आहे,'असं म्हणाला.
त्या मनुष्याने कुठे अॅक्सीडेंट झाला ते सांगितलं आणि पत्ता सांगितला..... मिहीरला तर काही सुचेनासे झाले. बरं, आता राधिकाला हे सांगितले तर तिला हा धक्का असह्य होईल, म्हणून तो म्हणाला," मला एक महत्वाचं काम आहे तेवढं करून येतो, तू जेवून घे"
त्याच्या हावभावांवरून राधिकाला काहीतरी लपवतोय असं जाणवलं. तिने त्याचा हात हातात घेतला आणि विचारले," मिहीर, खरं सांग.. कोणाचा फोन होता? आणि काय झालं?.....
मिहीरच्या डोळ्यात इतका वेळ दाटलेलं पाणी आता घळाघळा वाहू लागलं. तो म्हणाला,"अगं, कसं सांगू तुला? आई-बाबांचा अॅक्सीडेंट झालाय.
राधिकाच्या पायाखालची तर जमीनच सरकली.... ती मटकन खाली बसली. डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखं झालं. कसे असतील आई-बाबा? त्यांना काही झालं तर नसेल ना?
कधी बघायला मिळेल मला त्यांना? कधी भेटायला मिळेल ? असे असंख्य प्रश्न तिच्या मनात गोंधळ घालत होते.
मिहीरही एका मित्रासोबत घटनास्थळी पोहोचला. पाहिले तर होत्याचे नव्हते झाले होते.. गाडीचा चक्काचूर झाला होता.
आई बाबा जागीच मृत्यू पावले होते त्याने कसेबसे स्वतःला सावरले.. आता घरी जाऊन राधिकाला काय सांगू? या विचाराने तो गांगरून गेला होता.
तिकडे राधिका बरोबर शेजारच्या मावशी घरी थांबल्या होत्या. मिहीरला होणारा उशीर आणि एकंदर त्याचा काहीही न आलेला निरोप यावरून राधिका काय समजायचे ते समजून गेली.
तिकडे राधिका बरोबर शेजारच्या मावशी घरी थांबल्या होत्या. मिहीरला होणारा उशीर आणि एकंदर त्याचा काहीही न आलेला निरोप यावरून राधिका काय समजायचे ते समजून गेली.
ती आईच्या प्रेमाला पारखी झाली होती. ज्या उंबरठ्यावर आज ती उभी होती, तिथे सगळ्यात जास्त तिच्या आईची गरज तिला होती... पण नियतीने असा काही घाला घातला होता की एका बाळाची आई होताना, आता ती स्वतःच्या आई पासून कायमची दुरावली होती.
मिहिर दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आला.
मिहिर दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आला.
त्याचा उतरलेला चेहरा आणि डोळ्यातले पाणी बघून राधिका त्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली,"मिहीर, कुठे आहेत रे माझे आई- बाबा? तू म्हणाला होतास ना, घेऊन येतो... का नाही आलास रे मग?..
मिहीर मटकन खाली बसला आणि म्हणाला," राधिका, ते दोघं आपल्याला कायमचे सोडून गेलेत गं....' मी लहानपणापासून आईची माया कधी अनुभवली नव्हती, पण आपलं लग्न झाल्यानंतर तुझ्या आईच्या रूपाने, मला माझी आई मिळाली होती.. पण देवाने आज तिलाही माझ्यापासून हिरावून नेले'.. आणि तो ढसाढसा रडू लागला.
कसाबसा महिना निघून गेला. आज राधिकाच्या पोटात थोडं दुखत होतं.
कसाबसा महिना निघून गेला. आज राधिकाच्या पोटात थोडं दुखत होतं.
तिने मिहीरला लवकर घरी बोलावून घेतलं आणि दोघेजण दवाखान्यात गेले. दवाखान्यात अॅडमिट झाल्यानंतर दुपारी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
आता राधिका आणि मिहीर दोघेही खूप खुश होते.. त्यांच्यावर आलेल्या दुःखावर या बाळामुळे थोडी फुंकर घातली गेली होती.
आता बाळामध्ये राधिका स्वतःचं मन रमवत होती... आई-बाबांना विसरणं शक्य नसलं, तरीही तिचा पूर्ण दिवस बाळामध्ये जात असल्याने, ती थोडी दुःखातून सावरली होती..
आता तिच्या बाळाचा पहिला वाढदिवस येणार होता. तिला राहून राहून आईची आठवण येत होती.
किती हौसेने करणार होती सगळं माझ्या बाळाचं... नातवंडांची किती हौस होती तिला.... अंगाई गीत म्हणणार होती... कडेवर घेऊन गावभर फेरफटका मारणार, अशी कितीतरी स्वप्न होती तिची.... बाबाही घोडा घोडा बनून नातवंडांसाठी घरभर फिरणार, असं कितीतरी वेळा बोलून दाखवायचे,.... पण क्षणात सगळी स्वप्न विरली होती .
आज जवळजवळ आठ- नऊ महिन्यांनी राधिका माहेरी गेली होती. इतके दिवस बंद असलेलं घर अगदी धुळीने पूर्ण माखलेलं होतं.
आज जवळजवळ आठ- नऊ महिन्यांनी राधिका माहेरी गेली होती. इतके दिवस बंद असलेलं घर अगदी धुळीने पूर्ण माखलेलं होतं.
तरीसुद्धा त्यात आईच्या आठवणींचा दरवळ भरून राहिला होता. तिने बाळाला मिहीरकडे सोपवून सगळ्या घराची साफसफाई केली.
हळूहळू एकेक खोली साफ करताना तिच्या आई-बाबांबरोबरच्या अनेक आठवणी जाग्या होत होत्या.
तिचे लक्ष खिडकीकडे गेले. आईने स्वतःच्या साडीचे किती सुंदर पडदे शिवून घेतले होते! त्यावर स्वतःच्या हाताने बारीक नक्षीकाम केले होते.
जुनी साडी इतकी सुंदर पद्धतीने वापरून, कुणी त्याचा असाही वापर करू शकतो, हे आईच्या कलाकुसरीवरून दिसून येत होतं.
स्वयंपाक घराची साफसफाई केल्यानंतर तिला डब्यांमधून डिंक,खारिक, अळीव हे सगळे बाळंतपणासाठी लागणार्या लाडवांचे सामान भरून ठेवलेले दिसले. किती तयारी केली होती आईने पण अपघातात हे असं काही होऊन जाईल हे कधी कोणीतरी विचार केला असेल का?
लेकीची हौसमौज पुरवायची, म्हणून तिने जे काही केलं होतं, ते सगळं अर्ध्यावरच राहून गेलं होतं.
राधिकाने बेडरूम साफ करायला घेतली.. बघितलं, तर आईने कपाटात कपडे अगदी व्यवस्थित घड्या करून ठेवले होते... त्यातही तिच्या साड्यांचं तिने योग्य वर्गीकरण केलं होतं.
म्हणजे काठपदराच्या साड्या एका खणात, सुती साड्या एका खणात, घरात रोज वापरायच्या साड्या एका खणात,... किती सुंदररित्या ठेवलं होतं ते सारं तिनं!
कपाटाच्या एका कप्प्यात तिला आईने शिवलेले साडीचे झबले, टोपडे आणि लंगोट दिसले.... त्याच्या शेजारी स्वतःच्या सुती साडीची दुपटी आणि दोन छोट्या छोट्या गोधड्या बाळासाठी शिवून ठेवल्या होत्या.
ते सारे पाहून राधिकाच्या डोळ्यात पाणी तरळलं.
तिने पाहिलं, एक पानाच्या आकाराचं सुंदरसं दुपटं, आईने तिच्या हिरव्या रंगाच्या साडीचं शिवून ठेवलं होतं.. त्याला बाजूनी सुरेख अशी सोनेरी रंगाची लेस लावली होती..., आणि पोपटाच्या आकाराची कुंची शिवली होती... तेही त्याच हिरव्या रंगाच्या साडीचे शिवले होते, म्हणजे तिने एकाच साडीमध्ये किती विविधता दाखवून वेगवेगळे कपडे बाळासाठी शिवून ठेवले होते.
पुन्हा स्वतःच्या घरी जाताना, राधिकाने ते सारे बाळासाठी शिवलेले कपडे बॅगमध्ये घेतले आणि अजून आईच्या दोन-चार साड्या घेऊन ती निघाली.
पुन्हा स्वतःच्या घरी जाताना, राधिकाने ते सारे बाळासाठी शिवलेले कपडे बॅगमध्ये घेतले आणि अजून आईच्या दोन-चार साड्या घेऊन ती निघाली.
मुळात स्वतः फॅशन डिझाईनर असलेली राधिका अजून खूप काही नवीन गोष्टी शिवण्याच्या विचारात होती. तिच्या बाळाचा पहिला वाढदिवस उद्यावर येऊन ठेपला होता.
राधिकाने आज आईने शिवलेले कपडे सुंदररित्या एका कोपर्यात लावून ठेवले आणि जणू काही त्याचं प्रदर्शन लावावं अशा पद्धतीने त्याची मांडणी केली होती.
वाढदिवसाचा दिवस उजाडला. सर्व पाहुणे मंडळी आली आणि आल्या आल्या प्रत्येकाचं लक्ष त्या सुंदर इवल्या-इवल्या कपड्यांकडे आकर्षित होत होतं.
प्रत्येक जण, हे सारे कपडे कुठून आणले? कुणी शिवले? म्हणून राधिकाला आवर्जून विचारत होते.
राधिकाचा कंठ दाटून येत होता... आज आई असती, तर तिला किती आनंद झाला असता! पण आज जरी ती आपल्यासोबत नसेल, तरीही तिच्या या साड्यांमुळे ती कायम आपल्या सोबत असेल ही एक आशा राधिकाच्या मनाला सुखावत होती.... शेवटी आईची माया, ती आईची माया असते.
मातृत्व अनुभवताना राधिकाला खूप अनुभव येत होते, पण आई नसल्याची खंत कमी होत नव्हती.
मातृत्व अनुभवताना राधिकाला खूप अनुभव येत होते, पण आई नसल्याची खंत कमी होत नव्हती.
तिने इतके वर्ष फक्त पंजाबी ड्रेस आणि जीन्स, टी-शर्ट असेच कपडे घातले होते. पण एक दिवस तिच्या मनात विचार आला, कि आज आई नसली, तरीही तिच्या साडीच्या रुपाने आपल्याला एक उबदार स्पर्श अनुभवता येतो..
त्या दिवसापासून राधिकाने स्वतः दररोज साडी नेसणे पसंत केले. आता तिची लेक तिच्या पदराला धरून घरभर फिरत असते... जेवण झाल्यावर हात धुऊन त्याच पदराला हात पुसत असते... रात्री झोपताना तोच पदर तोंडावर घेऊन झोपत असते.... कधी राधिका बरोबर खेळताना बुवा आला, म्हणून तोच पदर डोळ्यांसमोर धरत असते.... तिचं बालपण अनुभवताना कुठेतरी राधिका स्वतःच्या आईबरोबर जगलेल्या भूतकाळातल्या आठवणींना उजाळा देत होती.
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.