© धनश्री दाबके
दोन्ही हातातल्या पिशव्या सांभाळत सुलेखाने तिची रोजची ५७ नंबरची बस पकडली. रोज ह्याच बसने येत जात असल्याने या रूटवरचे सगळे बस कंडक्टर ओळखीचे झालेले होते.
आजही त्यातलेच एक ओळखीचे काका ड्यूटीवर होते. सुलेखाला पाहून ते टिकीट द्यायला तिच्याकडे आले.
"आज लेट झाला मॅडम? " म्हणत त्यांनी तिचे रोजचे तिकीट तिच्यासमोर धरले.
"हो, खरेदीला गेले होते ना.. म्हणून आज उशीर" त्यांच्या हातावर पैसे ठेवत सुलेखा म्हणाली.
"बरं बरं.. चांगलय.." म्हणत ते तिला तिकीट देऊन पुढे जाऊन बसले.
नेहमीची ऑफिसची सुटायची वेळ टळून गेल्याने बस बऱ्यापैकी रिकामी होती. त्यामुळे हातातल्या सगळ्या पिशव्या व्यवस्थित सेट करत सुलेखा एका सीटवर एकटीच अगदी आरामात बसली.
खरंतर आज सकाळपासून प्रत्येक गोष्ट अगदी सुलेखाला व्हायला हवी तशी झाली होती. बॅंकेत कस्टमर्सची नेहमी इतकी खूप गर्दी नव्हती. बॉस चांगल्या मूडमधे असल्याने त्यांनी तिला निघता निघता कुठल्याही कामात अडकवले नव्हते.

सासूबाईंनी केलेलं वांग्याचं भरीत खूप छान झालं असल्यामुळे तिने डबाही मस्त चवीने व मजेत खाल्ला होता. आणि मुख्य म्हणजे चार दिवसांपासून ठरवलेला मैत्रीणींबरोबरचा खरेदीचा बेत, एकीनेही शेवटच्या क्षणाला टांग न दिल्यामुळे, ठरवल्यानुसार उत्तम पार पडला होता.
आज सुलेखा तिच्या ऑफिसमधे काम कारणाऱ्या रश्मी, सुवर्णा आणि काळे बाई या तीघीं बरोबर सेंचुरीच्या फॅक्टरी आऊटलेट मधे खरेदीला गेली होती.

तिथे मानसून सेल लागला होता आणि सगळ्याच तिथे जाण्यात इंटरेस्टेड होत्या. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून ठरवून प्रत्येकीने आपापल्या घरच्यांना मॅनेज करून आज वेळ काढला होता.
सुलेखाने स्वतःसाठी ड्रेस मटेरियल्स, लेकींसाठी टॉप्स, सुधीरसाठी त्याच्या आवडीच्या रंगाचा शर्ट, सासऱ्यांना घरी घालायला लागतात तसे सॉफ्ट कॉटनचे पांढरे हाफ शर्ट्स आणि सासूबाईंसाठी साडी अशी भरगच्च खरेदी केली होती.
खरेदीनंतर चौघींनी मस्त मजेत पाणीपुरीसुद्धा खाल्ली होती. म्हणजे थोडक्यात अगदी मनाजोगता दिवस गेला होता.
पण तरीही व्हायला हवा तितका आनंद काही होत नव्हता. इतकं एंजॉय करूनही का बरं हे असं ऑफ वाटतंय आपल्याला? विचार करता करता सुलेखाने पर्स मधून मोबाईल काढून पाहिला.

पण सुधीरचा काहीच मेसेज आलेला नव्हता. सुलेखाने मगाशी पाठवलेला पाणीपुरी खातांनाचा फोटोही त्याने पाहिला नव्हता.
हा, हेच हेच ते, माझा मूड ऑफ होण्याचे कारण. ह्या सुधीरला काही पडलेलंच नाहीये माझं..लेट होणारे माहित असलं तरी काय झालं? कुठे आहे, काय करतेय ते विचारायला नको का? फक्त माझाच फोन वाजत नव्हता.
बाकी तिघींच्या घरच्यांना सारखी त्यांची तहान लागत होती. नाहीतर माझ्या घरचे? सगळे मजेत.. मी असले काय आणि नसले काय काही फरकच पडत नाही यांना.
रश्मीचं तर नुकतंच लग्न झालंय.. त्यामुळे तिच्या नवऱ्याला तिला फोन न करणं परवडणारं नव्हतंच.. कुठे जाईल तो बायकोची चौकशी न करून? सुधीरही तर तेव्हा असाच सारखा सुलु सुलु करत माझ्या मागे असायचा.. त्यामुळे रश्मी आणि रश्मीपतीचं गुलुगुलु समजू शकतं.
पण सुवर्णा .. तिचाही लेक दर अर्ध्या तासाने तिला फोन करून हे कुठाय ते कुठाय विचारत होता..तिला धड काही बघताही आलं नाही बिचारीला..

वैतागली होती त्या सारख्या येणाऱ्या कॉल्समुळे.. अगदी इतकं सारखं नको पण एकदातरी आई कुठे आहे ते विचारता येतं की नाही.. पण नाही... घरी असल्यावर प्रत्येक मिनिटाला आई आई करणाऱ्या या दोन्ही महामायांना आज मी नाहीये तर माझी जराही आठवण आली नाही.
आणि काळे बाई? त्यांच्याकडे तर ते दोघंच असतात.. आता मुला सुनांनी स्वतंत्र संसार थाटलेत त्यांच्या. तेही अगदी दूरवर.. पण तरी अजूनही मिस्टर काळे बायको बायको करत असतात.
म्हणूनच ह्या काळे बाई नेहमी आनंदी असतात.. बरोबरच आहे म्हणा.. ज्या बाईची ओंजळ नवऱ्याच्या प्रेमाने इतकी ओतप्रेत भरलेली आहे.. ती नेहमी आनंदातच असणार ना..
नाहीतर सुधीर.. नाहीतरी सुधीर कधी तसा फारसा बोलतच नाही.. सदैव ऑफिसच्या विचारात असतो.. अरसिक नुसता..
परत सुलेखाने मोबाईल उघडून पाहिला पण नाही एकही कॉल नाही की मेसेज नाही.. जाऊ दे..
आता थोड्या वेळात घरी पोचेनच. गेल्यावरही काही फारसं चांगलं वातावरण नसेलच.. नेहमीप्रमाणे सासूबाईंच डोकं चढलं असेल.. आज मी नसल्याने त्यांना संध्याकाळी बाहेर पडता आलं नसेल.

संध्याकाळीही मुलींकडे बघावं लागणार म्हंटलं की त्यांचा ताल बिघडलाच पाहिजे. ऑफिसच्या वेळात मुलींना बघायला त्यांना काही प्रॉब्लेम नसतो.. पण ऑफिस व्यतिरिक्त मी जरा कुठे गेले अगदी सुधीरबरोबर जरी गेले तरीही त्यांना राग येतो..
मग दोन तीन दिवसांची डोकेदुखी आणि अबोला.. सासरे बुबा चांगले आहेत तसे. खूप समजून घेतात.. दिवसभर घरात मदत करतात, मुलींच करतात.
पण ह्या मुली भांडायला लागल्या की त्यांचाही तोल जातो आणि चिडून ते मुलींना ओरडले की घर चिडचिड, आरडाओरड आणि रडारडीने भरून जातं.. त्यावेळी असं वाटतं कशाला गेलो आपण मुलींना सोडून बाहेर..
मुळातच माणसाच्या मनाला स्वतःला बिचारे करून टाकायची आवड असते. सुधीरने फोन न केल्याने नाराज झालेल्या सुलेखाचंही तेच झालं आणि तिला सगळ्यांच्या चांगल्या बाजूंचा विसर पडून फक्त दुर्गुणच आठवायला लागले

आणि मी किती राब राब राबते पण ह्या कोणालाच माझी किमंतच कशी नाही वगैरे वगैरे विचारांच्या आवर्तनात ती पार आता आपल्याला जमेल तितकंच करायचं, घरात कोणाकडून कसली अपेक्षाच ठेवायची नाही वगैरेच्या विरक्ती पर्यंत जाऊन पोचली..
थोड्याच वेळात तिचा स्टॉप आला आणि सुलेखा बसमधून उतरली.

पाच मिनिटे चालून गेल्यावर घरी पोचली.. पण त्या पाच मिनिटांतही मनातल्या ओझ्याने अगदी रडवेली झाली..
पिशव्यांचं लोढणं वागवत, हाशहुश करत तिसऱ्या मजल्यावर पोचली तर घरातून धाकटीच्या ओरडण्याचा आवाज येत होता.. "बाबा आईला फोन लावा ना.. ती कधी येणार?"
सुधीर तिला समजावत होता.. "सोनू ..तुला किती वेळा तेच तेच सांगायचं? एक दिवस आई तिच्या मैत्रीणींबरोबर गेलीये की नाही.. मग तिला त्रास नाही द्यायचा... येतच असेल आता.. रडू नको..काय पाहिजे तुला? मला सांग.. मी देतो. आज मी एक गम्मत केलीये की नाही सगळ्यांसाठी.. तुला आवडते ना? मग? आता आई आली की खाऊया सगळे. जा बघ ताई काय करतीये? आजीसाठी बाम शोधतेय का बघ जा"
तेवढ्यात सासरे म्हणाले " अरे पण सुधीर एकदा फोन लावून विचार तर सुलेखा कुठपर्यंत आली आहे ते ? बस मिळाली का तिला?"
"अहो, बाबा ती येणार हो सांगितलेल्या वेळेत. उशीर होणार असता तर तिने कळवलंच असतं. या बाबतीत ती कधीच चुकत नाही. आपल्या सगळ्यांसाठी भरपूर खरेदी करून मॅडम येतच असतील आता"
सुधीरचे हे समजूतीचे बोलणे ऐकून सुलेखाला वाटलं ' सुधीरचा किती विश्वास आहे आपल्यावर..डीस्टर्ब करायला नको करायला म्हणून त्याने फोन नाही केला आणि मी काय काय विचार करत होते उगीचच'
परत तिचे डोळे भरून आले. ते पुसून तिने बेल वाजवली..
सुधीर दार उघडून तिच्या हातातल्या पिशव्या घेत म्हणाला "आलीस? मी आत्ताच बाबांना म्हणत होतो की तू येतच असशील आता."
सुलेखा आत आली तर घरभर सुधीर स्पेशल नूडल्सचा छान वास पसरला होता. धाकटी लेक धावत येऊन तिला बिलगत म्हाणाली " आई आई बाबांनी आज नूडल्स केल्या आहेत. तुझ्यासाठी जेवायला थांबलोय आम्ही.. चल ना लवकर."
"हो ग बाळा आलेच" म्हणत सुलेखा आत गेली. जाता जाता बेडरूममधे डोकावली तर मोठी लेक आजीचं डोकं दाबत बसली होती. हा अंदाज मात्र बरोब्बर ठरला या विचाराने सुलेखाला हसू आले.
बाथरूममधे जाऊन तोंडावर मारायला ओंजळीत पाणी घेतले तेव्हा तिला मगाशी मनात आलेला विचार आठवला..

काळे बाईंसारखीच माझीही ओंजळ सुधीरच्या विश्वासाने, प्रेमाने, मुलींच्या चिवचिवाटाच्या आनंदाने, सासूसासऱ्यांच्या भक्कम आधाराने अगदी काठोकाठ भरलेली आहे. हे मन पण ना उगीचच कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींवरून वेडेपणा करत राहाते. पण घरी आलं की लगेच शहाण्या बाळासारखं ट्रॅकवर येते.
फ्रेश होऊन सुलेखा सगळ्यांबरोबर सुधीरच्या हातच्या गरमागरम नूडल्स खायला बसली आणि बेचैनीने भरलेली मनाची ओंजळ क्षणात रिकामी होत पुन्हा नेहमीच्या प्रसन्नतेने भरली.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.