© वर्षा पाचारणे.
रविवार असूनदेखील तिला इतक्या वर्षांच्या सवयीमुळे लवकरच जाग आली... तिने खोलीमधून बाहेर येऊन बघितले तर अमित सोफ्यावरच झोपला होता..
तिच्या शरीराकडून यंत्रवत चाललेली साफसफाई मात्र मनात इतके वर्ष दबा धरून बसलेली ही घुसमटलेल्या आयुष्याची जळमटं साफ करू शकत नव्हती.
रोहिणीच्या मनात आज जणू फुलपाखरं उडत होती... लग्नाला जवळपास बारा वर्ष पूर्ण झाली होती. पण अजूनही घरात नवऱ्यासोबत निवांत बसून गप्पा माराव्यात, छान रमत-गमत काम करत वेळ घालवावा, थोडं स्वतःसाठी जगावं असं कधीच घडलं नव्हतं.
कारण घरात सासू सासरे, रोहिणी, तिचा नवरा अमित आणि दोन गोंडस मुलं माही आणि मिहीर एवढं कुटुंब होतं.
मुळात कामसु असलेल्या रोहिणीला सासूबाई सतत कामाला जुंपून ठेवायच्या.. सकाळी सहाच्या ठोक्याला उठणारी रोहिणी रात्री अकरा वाजता अंग टेकायची.
मुळात कामसु असलेल्या रोहिणीला सासूबाई सतत कामाला जुंपून ठेवायच्या.. सकाळी सहाच्या ठोक्याला उठणारी रोहिणी रात्री अकरा वाजता अंग टेकायची.
तिलाही वाटायचं, 'कधीतरी सुट्टीच्या दिवशी जवळपासच्या बागेत फेरफटका मारून यावा, कधी निवांतपणे आईकडे चार दिवस राहून यावे, कधीतरी नाश्त्याला हलकंफुलकं करून किंवा बाहेरून काहीतरी खायला मागवावं'... 'पण छे!'..
सासूबाईंच्या सतत सूचना देण्याच्या स्वभावाने ती खूप वैतागायची. 'मी करत असलेल्या कामात, सतत हे असं कर, तसं कर, सांगण्यात यांना काय मोठं कौतुक वाटतं?' असं ती मनातल्या मनात म्हणायची.
सासूबाईंच्या सतत सूचना देण्याच्या स्वभावाने ती खूप वैतागायची. 'मी करत असलेल्या कामात, सतत हे असं कर, तसं कर, सांगण्यात यांना काय मोठं कौतुक वाटतं?' असं ती मनातल्या मनात म्हणायची.
परंतु तिने कधीही सासूबाईंना उलट उत्तर मात्र दिलं नाही. रोहिणी घर झाडून घ्यायला लागली की सासूबाई म्हणायच्या, 'अगं टेबल खालून नीट झाडून घे हं, तिथे पण कचरा असतो'.
फरशी पुसायला घेतली की म्हणायच्या, 'लगेच पंख्याचे बटन सुरु करू नको, नाहीतर त्या पाण्याचे तसेच डाग राहतील फरशीवर'.
हिने कोबीची भाजी करायला घेतली की त्या मेथी कर म्हणणार... हिने वरण-भात करायचं ठरवलं की त्या रस्सा भाजी कर म्हणणार.
हिने नवऱ्याला फिकट गुलाबी रंगाचा शर्ट ऑफिसला जाताना घालायला दिला, की "अरे, तो तुला चांगला नाही दिसत", असं म्हणत त्या स्वतःहून अमितला दुसरा शर्ट काढून देणार.
या साऱ्या न दिसणाऱ्या त्रासामुळे इतकं काम करूनही रोहिणीचं त्या कधीच कौतुक करत नव्हत्या. उलट केलेल्या कामात सतत चुका काढत, त्या किती पटकन काम संपवून मोकळ्या होतात, हे दाखवण्याचा त्यांचा स्वभाव होता..
या साऱ्या न दिसणाऱ्या त्रासामुळे इतकं काम करूनही रोहिणीचं त्या कधीच कौतुक करत नव्हत्या. उलट केलेल्या कामात सतत चुका काढत, त्या किती पटकन काम संपवून मोकळ्या होतात, हे दाखवण्याचा त्यांचा स्वभाव होता..
काही दिवसांनी गावी शेतीची कामे सुरू झाल्याने त्यांना काही दिवसांसाठी गावी राहावं लागणार होतं... मुलांना देखील ऑनलाइन शाळा असल्याने मुलं आजी-आजोबां बरोबर गावी जाणार होती.
रोहिणी मनातून खूप खुश झाली होती... 'जे बारा वर्षात करता आलं नव्हतं, त्या साऱ्या गोष्टी मी आठ दिवसात करून घेईल', या विचारात तिचं मन कुठल्या कुठे जाऊन पोहोचलं होतं.
लग्नानंतर तिच्या वाट्याला निवांत असे क्षण कधीच आले नव्हते.. साधं माहेरी जायचं म्हटलं, तरीही सासू-सासर्यांनी परवानगी दिल्यानंतरच एखादा दिवस ती माहेरी जाऊन यायची.
लग्नानंतर तिच्या वाट्याला निवांत असे क्षण कधीच आले नव्हते.. साधं माहेरी जायचं म्हटलं, तरीही सासू-सासर्यांनी परवानगी दिल्यानंतरच एखादा दिवस ती माहेरी जाऊन यायची.
इतर वेळी घरात प्रत्येक कामात लुडबुड करणाऱ्या सासूबाई अशावेळी मात्र 'मला आता काही कामं झेपत नाही', म्हणून अनेकदा रोहिणी माहेरी जायचं म्हणताच अचानकच कशा आजारी पडायच्या?' हा तिला पडलेला गहन प्रश्न असायचा.
यावर तिने अनेकदा केवळ अमितने आपल्याला कधीतरी स्वतः होऊन माहेरी पाठवावं म्हणून त्याच्याशी चर्चा करून पाहिली. परंतु आई-वडिलांना विचारल्याशिवाय कुठलीच गोष्ट न करणारा हा 'आधुनिक राम' काही केल्या स्वतःचे निर्णय स्वतः घेतच नव्हता..
शनिवारची सकाळ उजाडली... सासू-सासरे आणि मुलं गावी जाण्यासाठी निघाले.
शनिवारची सकाळ उजाडली... सासू-सासरे आणि मुलं गावी जाण्यासाठी निघाले.
जाताना सासूबाईंनी मात्र ढीगभर सूचनांची यादी तिच्यासमोर वाचून दाखवली... जणूकाही रोहिणी आता नवी नवरीच असल्यासारखं त्या तिला घर नीट सांभाळण्याची सूचना देत होत्या.
आणि फायनली त्यांची गाडी गेटमधून बाहेर पडताच रोहिणीने सुटकेचा निश्वास टाकला.. अमित देखील त्या दिवशी छान मूड मध्ये होता.. दुपारी जेवण उशीर झाल्याने तिने रात्री डाळ खिचडी करण्याचे ठरवले.
आणि फायनली त्यांची गाडी गेटमधून बाहेर पडताच रोहिणीने सुटकेचा निश्वास टाकला.. अमित देखील त्या दिवशी छान मूड मध्ये होता.. दुपारी जेवण उशीर झाल्याने तिने रात्री डाळ खिचडी करण्याचे ठरवले.
इतरवेळी आवडीने खिचडी खाणारा अमित मात्र जेवण समोर येताच अगदी जीवावर आल्यासारखा खिचडी संपवू लागला... त्याच्या मूड गेलेल्या चेहर्याकडे पाहून रोहिणी म्हणाली, "काय हो, काय झालं?"... "जेवण आवडलं नाही का तुम्हाला?"
त्यावर अगदी वैतागलेल्या स्वरात अमित म्हणाला ,"अगं खिचडी भाताने माझं काही पोट भरत नाही... पण ठिक आहे", असं म्हणत त्याने पुन्हा अगदी कसंतरीच तोंड करत तो भात संपवला.
रात्री काम आवरून रोहिणी मस्तपैकी छान मूडमध्ये बेडरूममध्ये आली... अमितने तिच्याबरोबर रात्री उशिरापर्यंत गप्पा माराव्यात, अशी अपेक्षा असलेली रोहिणी टीव्हीवर चित्रपट बघण्यात मग्न झालेल्या अमित जवळ जाऊन बसली.

तिने त्याच्याबरोबर गप्पा मारायला सुरुवात करताच अमित मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करत, "थांब गं थोडावेळ"... " एक तर कितीतरी दिवसांनी बाजूला मुलांचा गोंगाट नाही, कितीतरी वर्षात असा निवांत वेळच मिळाला नाही मला.... आज तरी निदान निवांतपणे टिव्ही बघणार मी रात्रभर.
तशीही उद्या सुट्टी आहे रविवारची.त्यामुळे उद्या उशिरा उठलं, तरी चालणार आहे... तू पण जाऊन झोप जा आता", असं म्हणत अमितने तिच्या मूडचा सत्यानाश करून टाकला.
रोहिणी गाल फुगवून बेडरूममध्ये झोपायला निघून गेली..
रविवार असूनदेखील तिला इतक्या वर्षांच्या सवयीमुळे लवकरच जाग आली... तिने खोलीमधून बाहेर येऊन बघितले तर अमित सोफ्यावरच झोपला होता..
आज सुट्टीचा दिवस म्हणून इतक्या वर्षात जे जमलं नाही, तो मॉर्निंग वॉक करण्यासाठी म्हणून तिने छानपैकी गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी आणलेला टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालून ती अमितला उठवायला आली.
"अहो, चला ना.. आज घरातही कोणी नाही... आपण पण मस्त मॉर्निंग वॉकला जाऊन येऊ", असं म्हणत तिने अमितला आवाज दिला.
रात्री उशिरा झोपलेला अमित दुसर्या कुशीवर वळत, 'झोपू दे ना अजून', असं म्हणत पुन्हा चादर ओढून झोपून गेला..
आता मात्र मिळालेल्या वेळेचा फायदा घेऊन अमितची वाट न पाहता रोहिणी आज पहिल्यांदाच मॉर्निंग वॉकला गेली.
आता मात्र मिळालेल्या वेळेचा फायदा घेऊन अमितची वाट न पाहता रोहिणी आज पहिल्यांदाच मॉर्निंग वॉकला गेली.
तिला वाटेत कॉलनीतल्या गोरे मावशी भेटल्या... "अरे वा! रोहिणी आज सासू नाही, तर टी शर्ट आणि पॅंट का लगेच?" असे त्यांनी विचारताच रोहिणी मात्र कसनुसं हसली.
गोरे मावशी म्हणजे रोहिणीच्या सासूची अगदी जिवश्च कंठश्च मैत्रीण... 'आता सासूबाई घरी आल्यानंतर गोरे मावशी आपल्या टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्टचे भांडे फोडणार', हे रोहिणीने मनातल्या मनात ओळखलं होतं.
रस्त्यात आणखी कोणी ओळखीचे भेटू नये या विचाराने ती अर्ध्या रस्त्यातूनच पुन्हा माघारी फिरली..
रोज काय उपीट, पोहे, इडली, करत स्वयंपाक घरातच दिवस घालवायचा, म्हणून आज तिने येता-येता ब्रेड आणला.. 'छान पैकी चहा आणि ब्रेड बटर खावं' असा विचार करत ती घरी आली.
रोज काय उपीट, पोहे, इडली, करत स्वयंपाक घरातच दिवस घालवायचा, म्हणून आज तिने येता-येता ब्रेड आणला.. 'छान पैकी चहा आणि ब्रेड बटर खावं' असा विचार करत ती घरी आली.
अमित नुकताच उठून पेपर वाचत बसला होता.. तिने दोघांसाठी चहा ठेवत ब्रेड बटर घेऊन आली..
"अहो, चला पटकन नाष्टा करून घेऊ... म्हणजे मग बाकीची कामं करायला मोकळं", असं म्हणत रोहिणीने अमित समोर प्लेट पकडली.
"अरे यार!"... "काय गं रोहिणी?"... "तू खा, तुला खायचा तर चहा-ब्रेड, पण मला मस्त पोहे कर गं गरमा-गरम"... असं म्हणत अमित पुन्हा पेपर मध्ये तोंड खुपसून बसला.

बिचारी रोहिणी! निमूटपणे स्वयंपाक घरात गेली आणि डोळ्यातल्या अश्रूंना कांदा चिरण्याच्या बहाण्याने वाट मोकळी करून दिली..
मग तिचा दिवस पुन्हा इतके वर्ष घालवलेल्या दिवसांप्रमाणेच कामात व्यस्त गेला. निवांतपणे रमत-गमत काम करण्याची व्याख्याच जणू ती आज पुन्हा एकदा विसरून गेली होती..
मग तिचा दिवस पुन्हा इतके वर्ष घालवलेल्या दिवसांप्रमाणेच कामात व्यस्त गेला. निवांतपणे रमत-गमत काम करण्याची व्याख्याच जणू ती आज पुन्हा एकदा विसरून गेली होती..
मग तिचे चार पाच दिवस पुन्हा असेच आधीच्या रटाळवाण्या वर्षांसारखेच निघून गेले.. आता पुन्हा पुढचा शनिवार आला की सासू-सासरे आणि मुलं घरी परत येणार होती...
दुपारी सासूबाईंचा अमितला फोन आला... "काय रे अमित, झालं का जेवण?" असं सासूबाईंनी अमितला विचारताच तो 'हो' म्हणाला... "काय मग, काय खाल्लं?", हा रोज फोनवर न चुकता विचारला जाणारा प्रश्न आजही सासूबाईंनी विचारलाच.
"अगं काही नाही, रोजचंच भाजी चपाती", असं म्हणत अमितने आईला गावावरून येताना पाट्यावर वाटलेली लसणाची चटणी बनवून आणायला सांगितली.

"अगं आई, तुझ्या हातची भाकरी आणि लसणाची चटणी म्हणजे अहाहा! स्वर्गसुख"... असं म्हणत "आई तू आल्यावर पहिलं झणझणीत कालवण आणि भाकरी असा मस्त बेत कर", असं सांगायला अमित विसरला नाही..
सासूबाई घरात नसताना रोहिणीने रोजच त्याला चमचमीत, त्याला हवे असतात तसेच पदार्थ खाऊ घातले होते.. तरीही नवऱ्याने आईकडे अशी फर्माईश सोडल्यावर, मग मात्र रोहिणी मनातून नाराज झाली...
"रोहिणी, आता रविवारी आई घरी येईल हं... त्याआधी सगळी साफसफाई करायला हवी, नाहीतर सणसुद येऊन सुद्धा साफसफाई झाली नाही, म्हणून पुन्हा आई काही बोलली, तर मग मात्र मला सांगू नकोस", असं अमितने म्हणताच रोहिणीचा पारा चढला.
"नाही तरी तुम्हाला सांगून तरी कुठे काय फरक पडतो?"... "इतके वर्ष जेव्हा आई मला बोलत असतात, तेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसता, नाहीतर ऑफिसला निघायच्या घाईत असता"... "आठ दिवस तुमची आई घरात काय नाही, तुम्ही मात्र त्यांची पुरेपूर जागा घेतली आहे"...
"वाटलं होतं, या आठ दिवसात निवांत उठून मनाला हवं तसं जगुन घेईल... पण छे!".. काही सुखं ही नशिबातंच असावी लागतात"...
तिच्या या बोलण्यावर अमित देखील भडकला... "अगं आई बोलते, म्हणजे ती काही उगाच बोलते का तुला?"... "इतके वर्षाचा अनुभव आहे तिचा संसाराचा... मग तिच्या डोळ्यासमोर कुठे काही चुकलं, कुठे कमी-जास्त दिसलं, तर ती बोलणारच ना".

"आणि मगाशी आईला चटणी करून आण म्हटलं, तर तुझा एवढा का पारा चढला?"... "अगं आई घरात नाही, त्या दिवसापासून ते मुळमुळीत पदार्थ खाऊन माझ्या अगदी तोंडाची चव गेली आहे ...म्हणून वाटलं मला तिला सांगावसं, त्यात बिघडलं कुठं?", असं म्हणत पुन्हा अमितची अरेरावी सुरू झाली.
"अहो पण आई घरात असतात, तेव्हा देखील स्वयंपाक मीच करत असते ना?... त्या फक्त स्वयंपाकघरात माझ्यावर देखरेख ठेवत मला सूचना करत असतात.
"अहो पण आई घरात असतात, तेव्हा देखील स्वयंपाक मीच करत असते ना?... त्या फक्त स्वयंपाकघरात माझ्यावर देखरेख ठेवत मला सूचना करत असतात.
मी केलेल्या जेवणालाच, त्यावेळी मात्र तुम्ही चाटून पुसून फस्त करता... जणु काही ते जेवण मी नाही, आईनेच बनवलेलं असतं"...
तितक्यात दारावरची बेल वाजली... रोहिणीने दार उघडताच दारात नणंद बाई हजर.
"अगं काय सांगू तुला वहिनी, आई गावाला गेल्यापासून तिचे चार फोन झाले मला... अमितला गोड शिरा घेऊन जा म्हणून"... "शेवटी आज वेळात वेळ काढून आले बघ"... असं म्हणत नणंद बाईंनी तो गोड शिऱ्याचा डबा अमितच्या हाती सोपवला..

अमितने देखील पटकन जाऊन स्वयंपाक घरातून चमचा घेऊन त्या शिर्याचे तोंडभरून कौतुक करत सगळा शिरा चट्टामट्टा करत फस्त केला..
इतके वर्षात आपल्या हातचे काही पदार्थ कौतुक न करणारा नवरा आई आणि बहिणीच्या पदार्थांवर मात्र स्तुतीसुमने उधळत असतो हे वर्षानुवर्ष पाहिलेल्या रोहिणीच्या नकळत डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
नणंद बाई जायला निघताच अमित म्हणाला," अगं ताई, आज तसंही ऑफिसचं काहीच काम नाही, तुला वेळ असेल तर आपण तिघे जण मस्तपैकी मॉलमध्ये चक्कर जाऊन येऊ"...
आठ दिवसांपासून जवळपासच्या बागेत तरी निवांत दोघांनीच कुठेतरी फेरफटका मारायला जावं, अशी अपेक्षा असणारी रोहिणी मात्र नवऱ्याचा मॉल मध्ये जाण्याचा बेत ऐकताच निमुटपणे स्वयंपाक घरात निघून गेली.
आठ दिवसांपासून जवळपासच्या बागेत तरी निवांत दोघांनीच कुठेतरी फेरफटका मारायला जावं, अशी अपेक्षा असणारी रोहिणी मात्र नवऱ्याचा मॉल मध्ये जाण्याचा बेत ऐकताच निमुटपणे स्वयंपाक घरात निघून गेली.
'मला घरातली साफसफाई करायची आहे', असे सांगत तिने बाहेर जाणं टाळलं...
तिच्या शरीराकडून यंत्रवत चाललेली साफसफाई मात्र मनात इतके वर्ष दबा धरून बसलेली ही घुसमटलेल्या आयुष्याची जळमटं साफ करू शकत नव्हती.
'मिळालेल्या एकांताचा उपभोग घ्यावा', अशा विचारात असलेली रोहिणी 'पुन्हा असा एकांत मिळूच नये', असं मनातल्या मनात म्हणत होती.
सतत जणू सासुची सावली बनून राहिलेल्या नवऱ्याबरोबर एकांतात घालवलेल्या त्या बंदिस्त, घुसमटलेल्या आठ दिवसांपेक्षा, आपल्या चिमुरड्या लेकरांबरोबर घालवलेले खेळीमेळीचे इतके वर्षांमधले दिवस आठवून तिचं मन आज नकळत म्हणून गेलं,' सासु घरात असो वा नसो, नवरा भासे सासू समान'...
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.