© नीलिमा देशपांडे
साधारण पणे सर्वसामान्य सगळया मुलींची जशी स्वप्नं असतात होणाऱ्या जोडीदारा बाबत, तशीच होती तिची पण अपेक्षा जेंव्हा तिचे त्याच्याशी लग्नं ठरले तेंव्हा.
लग्नाचं बंधनं पाळणे किंवा प्रेमाने सर्वांना आपलेसे करण्याची धडपड करणे हे सहसा मुली करताना दिसतात सासरी. पण ती नशीबवान होती. त्या दोघांच्या जोडीत ते बंधन त्या दोघांनी पण निभावून नेलं होतं.

तिच्या पाठोपाठ तो ही सासरी सगळ्यांच्या मनात घर करून राहिला. दोन्ही घरी ते सगळं सुरळीत चाललं आहे याची काळजी घेत.
लग्नानंतर एकंमेकांना फारसा वेळ देता आला नाही. लेकरू झाल्यावर तर ते दोघे आपआपल्या कर्तव्यात आणखीच गुरफटुन गेले. ती लेकरात आणि तो कामात.

एकदा तो त्याच्या काही कामासाठी बाहेर गावी चालला होता तेव्हा तिने " मला सोबत घेऊन चल. गेली बरेच महीने मी घरात आहे...बाळ लहान आहे म्हणून”...अशी विनवणी केली आणि ती गेली छोट्या बाळाला घेऊन त्याच्या सोबत!
सकाळी जाऊन लगेच रात्री परत येणार असल्याने आधी तो नकोच म्हणतं होता तिला; पंण तिच्या हट्टा पुढे शेवटी तो झुकला आणि ते दोघे गेले बाळासह गाडीने पहाटेच पुण्याला.
दिवसभरात जमतील तितकी सारी कामं संपवून संध्याकाळी ते ठरल्या प्रमाणे परत माघारी यायला निघाले.

मे महिन्याच्या ऐन उन्हाळ्यातही तो दिवस वेगळा उजाडला होता...की दिवसाचा शेवट वेगळा करणारं होता माहित नाही पण वातावरणात झालेला तो एकदम बदल पाहून सर्वांना धक्काच बसला होता.
"भुक लागली आहे आपण काही खायला थांबू शकतो का? या तिच्या प्रश्नाला उत्तर देत तो म्हणाला... "आता आधीच रहदारीतं अडकलो आहोत त्यातून बाहेर बघ किती अंधार पडला आहे पाच वाजताच. या रहदारीतन सुटतो आधी. शहरा बाहेर पडल्यावर बघू एखादं चांगलं हॉटेल ...तसं थोडं थांबू शकत असशील तर पुढे एक खुप छान हॉटेल आहे 'स्माइल स्टोन' नावाचं, आपण तिथेच थांबूत. "
तिने देखील होकार दिला. आणि ते निघाले त्यांच्या लेकरासोबत....प्रवास सुरु होता आणि गप्पाही!

अचानक खुप अंधारुन आले इतके की पावसाळा आहे की काय असे वाटत होते. ऐन संध्याकाळी दाट काळा अंधार झाला. रात्र झाली नसल्याने रस्त्यांवर लाईट अजून सुरु झाले नव्हते.
बाळाला मांडी वर झोपवत आणि बाहेर पडणारा पाऊस बघत ती लेकराच्या आणि त्यांच्या भविष्याची स्वप्न पहात होती. अंधारुन आल्याने तो पण न बोलता लक्ष देऊन गाडी चालवत होता.
मधेच कधी तिला झोप लागली हे तिलाही कळल नाही.....आणि अचानक गाडी थांबली…. नव्हे आदळली ! स्माइल स्टोन समोर रस्त्यात मधेच उभ्या असलेल्या एका ट्रकवर !
पाऊस वाढल्याने थोडी रहदारी कमी झाली म्हणून ट्रक ड्राइवरने गाडी रस्त्याच्या कडेला लावण्याचे कष्ट न घेता मधेच उभी केली अचानकच ! आणि उडी मारुन तो पळाला हॉटेलच्या दिशेनं.

बाहेर काळोख पडला होता त्यामुळे नीट दिसत नव्हते आणि वाहत्या रस्त्यात अचानक समोर ट्रक उभा राहिलला!.....त्याने खुप प्रयत्न केला करकचून ब्रेक दाबण्याचा आणि कार थांबवण्याचा.......पण शेवटी त्याची कार आदळलीच समोरच्या ट्रकवर!
सारं काही इतक्या क्षणार्धात झालं की काही समजण्याच्या आत आणि तिला सावध करण्याआधी तो स्टीयरिंग कडे हिसका बसून झुकला गेला. ती सीट खालीच्या लेगस्पेस मधे फेकली गेली आणि तिच्या मांडीवरुन लेकरू वर उडाले.

त्याच्या डोळ्यांत वेदना उमटली पण सावरत त्याने आधी लेकरू झेलून घेतलं. त्याने रडणाऱ्या लेकराला जवळ घेत पाहिलं...कपाळाला टेंगूळ आले आणि नाकाला खरचटलेल होते. जोरात आवाज झाल्याने आणि असे आपटले गेल्याने घाबरुन बाळ रडू लागले.
तो प्रचंड मोठा आवाज एकून आसपासचे आणि हॉटेलच्या आतील लोक बाहेर धावतच कार जवळ आले. समोरचा भाग चकनाचूर झालेली कार पाहून सगळे हादरले पण त्याला आणि त्याच्या हातात असलेल्या लहान मुलांला सुखरुप पाहून आनंदी झाले.

त्यांनी लेकराला शांत करण्यासाठी एका कडे सोपवले. ती अजुनही गाडीच्या डैशबोर्ड आणि सीटमधे असलेल्या लेगस्पेस मधे अडकून पडलेली आहे कळताच सगळ्यानी मदत करत तिला बाहेर काढ़ले.
वरवर पाहता जखमा दिसत नव्हत्या पण तिला उचलून ठेवत असताना ती जोरात ओरडली डाव्या पायाला हात लागताच. पण कळणार कसं? ती बेशुद्ध होती.

तिला शुद्धीवर आणण्यासाठी कुणीतरी तिला कॉफी पाजली आणि त्याला आश्चर्य वाटले, कॉफीच्या वासाने दूर पळून जाणारी ही आज मोठा कप भरून कॉफी प्यायली..! त्याला आठवले एकदा ती म्हणाली होती,
" डोक्यावर परिणाम झाला आणि वेडी झाले तर कधी कदाचीत पीईल मी कॉफी...नॉर्मल असताना नाही. "
तो क्षण होता जेंव्हा तो लग्नं बंधनात नव्हे तर तिच्या प्रेमात किती अडकला आहे हे स्पष्ट दिसून आले.

एकिकडे लेकरू आणि दुसरी कडे ती..निस्तेज, बेशुध्द !
हॉटेलवर आणखी दोन जण होते त्यांनी हॉस्पिटल पर्यत लिफ्ट देण्याचा मोठेपणा दाखवला. रस्त्यात कुठे मोठे हॉस्पिटल नव्हते आणि ते त्यांच्या शहरातील होते.

त्यामुळे तिला लिफ्ट मिळालेल्या दुसऱ्या गाडीत ठेवताना त्याच्या डोळ्यांतून कृतद्न्यतेने अश्रूं वाहत होते. ती वर वर ठीक आहे असं वाटलं तरी ती अजुनही बेशुद्धच होती.
आणि ती त्या अवस्थेतही काही सेकंद शुद्धीवर आल्यावर एकच प्रश्न विचारत होती
" बाळ कसं आहे? आपण मागे का बसलोय? आपली गाडी कोण चालवत आहे?" पण तो काय उत्तर देतो ते ऐकण्याआधीच तिची शुद्ध हरपली जायची.

परत काही वेळाने तेच प्रश्न !...आणि तिची बेशुद्धी.. हा क्रम चालू राहिला.
सगळ्या पुढच्या व्यवस्था मोबाइल फोनवर करत आणि एकिकडे बाळाला शांत करत तो देवाला प्रार्थना करीत होता तिला सुरक्षित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून नीट घरी नेता येऊ दे.

सगळ्या रस्त्यात ती तोच तोच प्रश्न विचारत राहीली आणि तो काळजीत पडला हिची मेमरी ठीक आहे ना? नशीबाने मेमरी ठीक होती पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर समजलेल्या अनेक काळजीत टाकणाऱ्या बाबींवर त्याने हिमतीने तोंड दिले.
तिचे कमरेचे हाड मोडले होते. डाव्या पायाला रक्ताचा पुरवठा करणारी मेन व्हेंन तुटली होती आणि खुप रक्त वाहिले होते.

अपेन्डस ला मार लागून ते फुटण्याच्या बेतात होते. ऑपरेशन करावं तर तिच बीपी एकदम लो झालेलं...डॉक्टर सुद्धा निर्णय घेऊ शकत नव्हते, रिस्क घ्यावी की नाही? शेवटी त्यांनी फॉर्म वर सह्या घेतल्या आणि झुंजत तिला वाचवली.
“अनेक ऑपरेशन झाल्याने आणि कंबरेचे हाड मोडले असल्याने प्लास्टर करता येणार नाही. ती अंथरुणाला खिळणार आहे आणि कायम अशीच अवस्था राहणार आहे याची कल्पना आधीच देऊन डॉक्टरांनी तिला वाचवाले होते, त्याच्या सह्या घेतल्या होत्या संमती साठी..” हे लक्षात आलं आणि तरीही तो धिराने उभा राहिला.

लेकरासाठी आई होऊन जगला रात्री आणि दिवसा! आणि तिची सुद्धा माय होऊन त्याने तिला धीर दिला !
त्याने तिला जगवली आणि नुसती जगवली नाही तर हिंमत दिली परत ऊभं राहण्याची तिच्या पायांवर आणि आयुष्यात पण!

सव्वा वर्षाच्या बाळाला त्याने आई आणि बाप या दोघांची माया आणि प्रेम देत सांभाळल. तिला खुप हिमतीची गरज होती ती त्याने दिली.
ती पण जिद्दी होती...असं अंथरुणावर निश्चल पडून समोर त्याचे आणि लेकराचे होणारे हाल तिला बघवत नव्हते. "नॉमल चेकअप साठी पण अम्बुलन्स मधून आडवे होऊन जायचे हे तिला पटत नव्हते. हे सगळं कधी बदलणार? मला परत कधी चालता येईल ? यावर तिला दुर्दैवाने फारच वाईट उत्तरं मिळाले, " की तिने ते विसरुन जावं कारण ती कधीही उठून पण बसू शकणार नाही. तेंव्हा चालणे तर तिने विसरुन जावं."
तिने "मना पासून आभारी आहे. मी असं जगण्या पेक्षा मरणं पसंत करेल...मला फक्त धीर देणारे शब्द हवे होते. पण आता मी जिद्दीने प्रयत्न करुन माझ्या पायांवर परत उभी राहिल आणि जो पर्यत स्वतःच्या बळावर एकटी चालू शकत नाही तोवर परत चेक अप साठी पण येणार नाही तुमच्या संमोर !"
ती त्या त्वेशातच रडत पण मनाशी काही ठरवूनच बाहेर पडली.
लहान मुले चालायला लागली की जसे हजारदा खाली पडतात तसे ती चालत होती घरात. एका भिंती पासून रुम मधल्या दुसऱ्या टोकाला जायचे तर तिला तासभर लागायचा. कारण डाव्या पायाची तूटलेली नस ऑपरेशनमध्ये बंद केली होती म्हणून त्या पायावर खुप सूज होती.

कमरचे हाड खाली वर झाल्याने तिच्या दोन्ही पायांत उंची मधे फरक पडला होता. ते खाली वर होते. शिवाय रक्त पुरवठा नसल्याने तो पाय अधू आणि कमकुवत झाला होता.
दोन्ही हातात डावा पाय उचलून ती पुढे ठेवायची पण उजवा पाय उचलला की डाव्या पायावर सारा भार पडून ती खाली कोसळत असे. मग उठून ऊभं रहाणे एक दिव्य अनुभव असायचा!

प्रयत्न चालू ठेवून ती अखेरीस उभी राहिली आणि चालू पण लागली. काही महीने लागले या सगळ्याला पण एकटीने ती मग जाऊन भेटली त्या डॉक्टरला. त्यांचे आभार मानले कारण त्यांच्या बोलण्यामुळे तिचा निर्धार वाढला होता आणि आज ती चालू शकत होती.
डॉक्टरांनी आश्चर्याने आणि अभिमानाने तिला स्वतः दारा पर्यत आणून सोडले निघताना आणि बाहेर जमलेल्या सर्वांना शुभेच्छा द्यायला लावल्या तिला!
तो तर होताच सोबत सतत आणि म्हणून पुढेही प्रयत्न करत ती आज चालते, फिरते अगदी पळते सुद्धा ! व्यवस्थित पणे नोकरी करते आणि घर सांभळते.

आजही पुण्याला जायचे असले की 'स्माईल स्टोन' समोर गाडी रस्त्याच्या कडेला उभी करुन ती आत जाते. थोडं थांबून मनोमन त्या रात्री मदत केलेल्या सगळ्यांचे आभार मानते आणि मिळालेल्या नव्या आयुष्याची सुरुवात 'स्माइल स्टोन' हॉटेल कडे बघत आणि चेहर्यावर हसू आणत "स्माईल देत नी सेल्फी घेत परत परत करते अनेकदा त्याच्या सोबत !!"
© नीलिमा देशपांडे
सदर कथा लेखिका नीलिमा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.