© वर्षा पाचारणे
आपल्या बोलण्यामुळे समोरच्याला किती त्रास होत असेल, किती वेळा मन दुखावले जात असेल, याची काही फिकीर आत्याबाईंना नसायची.. त्यामुळे सकाळपासून जो तोंडाचा पट्टा चालू असायचा ते रात्री झोपेपर्यंत.
"हद्द झाली आता... अगं, नवीन माणसं, नवीन घर असलं, म्हणून काय झालं? चहा मागितला, तर काय नुसतं उकळलेलं पाणी दिलं"... "ना नीट चहा पावडर टाकली, ना साखरेचा पत्ता... आणि दूध काय माहेराहून आणायला सांगितले होते का काय? तेव्हा असा काळाढूस चहा दिलाय तो".... आतेसासूबाईंनी लग्नाला दोनच दिवस झालेल्या मुक्ताला फैलावर घेतले..
त्यांच्या धारदार आवाजाने मुक्ताच्या डोळ्यात टचकन पाणी आलं... ती सॉरी म्हणून 'पुन्हा चहा ठेऊ का? म्हणाली...
आतेसासूबाईंना वादाला कारण हवंच होतं... त्या लगेच सुरूच झाल्या.... म्हणाल्या," हो हो, आली परत चहा करणारी.... अन् हा केलेला चहा काय तुझ्या बापाला पाजायचा का?" आता मात्र मुक्ताच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागले.
मुक्ता आणि शेखरच्या लग्नासाठी आतेसासूबाई गावावरून महिनाभरासाठी राहायला आल्या होत्या.. त्यात शेखरची आई आत्यांच्या खूप पुढे पुढे करत असल्याने त्या दोघींचे अगदी छान जमायचे.. कारणं 'आत्या म्हणेल ती पूर्व दिशा' असे समीकरण शेखरच्या आईने पाळले होते..
दुसऱ्या दिवशी सकाळी शेखरच्या आईनेच आत्याला चहा, नाश्ता करून दिला.

त्यावर आत्याने शेखरच्या आईला चांगलीच ताकीद दिली की, "तू अशी सुनेची बाजू सावरत बसशील, तर एक दिवस लेक आणि सून तुझ्या डोक्यावर मिर्या वाटतील. आजपासून सगळी काम सुनेची सुनेला करू देत. तू सासूच्या रुबाबात जग".. असे म्हणून आते सासूबाईंनी घरातलं वातावरण दुषित करायला सुरुवात केली.
सगळी कामे आटोपल्यावर मुक्ता मॉप घेऊन फरशी पुसायला लागली, त्यावर आत्तेसासूबाई कपाळावर हात मारत म्हणाल्या, "बाई, बाई, बाई ,हद्द झाली आता,' साधी फरशी पुसता येत नाही... अगं आम्ही रोज पहाटे पाच वाजता उठून, अंगणात सडा शिंपण करून, साऱ्या घरादाराचा स्वयंपाक उरकून, नदीवर धुणं धुवायला जायचो आणि आज कालच्या मुली, काय तर हे हातात दांडकं घेऊन फरशी पुसतायेत.. ठेव तो दांडका बाजूला आणि घे हातात कपडा आणि पुस सगळी फरशी कोपऱ्या कोपऱ्यातून".
बिचारी मुक्ता.... काही न बोलता तिने मॉप बाजूला ठेवला आणि बादलीत पाणी घेऊन कपड्याने ती फरशी पुसू लागली.... आता ती लवकर सुकावी म्हणून तिने पंखा सुरु केला.
तितक्यात सासूबाई खेकसल्या.. "खबरदार, पंखा लावशील तर... तसेच मग पाण्याचे डाग सुकतील, मग काय पुन्हा दिवसभर तेच तेच पुसत बसणार आहेस का?"... नुकतंच लग्न झालेल्या मुक्ताला संसारात असंही काही ऐकून घ्यावं लागतं, याची नव्याने जाणीव होत होती.
खरंतर माहेरी टापटीप काम करणारी म्हणून मुक्ताचे खूप कौतुक व्हायचे. त्यामुळे आज तिला अशा प्रसंगांना सामोरे जाताना खूपच त्रास व्हायचा. आपल्याला काहीच येत नाही, ही भावना तिच्या मनात बळावत चालली होती
जेवताना कधी चपात्या कडक झाल्या, कधी भाजीत मीठ नाही, कधी भाजी खारट झाली, असं म्हणून सासूबाई आणि आत्तेसासूबाई तिच्या उगाच चुका काढू लागल्या.
जेवताना कधी चपात्या कडक झाल्या, कधी भाजीत मीठ नाही, कधी भाजी खारट झाली, असं म्हणून सासूबाई आणि आत्तेसासूबाई तिच्या उगाच चुका काढू लागल्या.
त्यामुळे आपल्याला काहीच येत नाही, आपण सारखं चुकत आहोत या भावनेने मुक्ताला हरल्यासारखा वाटायला लागलं... बरं, माहेरी यातले काही प्रकार सांगावेत, तर आई-बाबांना उगाच काळजी वाटत राहील, म्हणून मुक्ता गपगुमान सगळा त्रास सहन करत होती.
फक्त शेखरला ती या गोष्टी सांगू शकत होती.. शेखर तिला म्हणायचा," अगं, आत्या महिन्याभरासाठी आली आहे, तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. महिन्याभराने ती निघून जाईल आणि तुझी नोकरीही पुन्हा सुरू झाली, की तुला या अशा प्रकारांना सामोरे जाण्याचा प्रश्नच येणार नाही"
त्याच्या या बोलण्याचा आधार वाटून मुक्ताला हायसं वाटायचं... एम बीए झालेली मुक्ता, जणू काही एखादी घरातील मोलकरीण असल्यासारखी सकाळपासून रात्री अकरा साडेअकरा पर्यंत राबत होती... पण कौतुक तर सोडाच, तिच्या नशिबी केवळ टोमणे आले होते.
महिन्याभराने आत्तेसासुबाई गावी जायला निघाल्या... शेखरच्या आईने त्यांना रव्याचे लाडू, चकल्या असे काही पदार्थ करून डब्यात दिले आणि म्हणाल्या," वंस, प्रवासात काही बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा, मी हे करून दिले ते खा.. असे म्हणून त्यांनी आत्याला हळदकुंकू लावून नमस्कार केला.

इतका वेळ आत्यापासून जरा अंतर राखून असलेली मुक्ता, त्यांच्या पाया पडू लागली. तितक्यात त्या तिच्या अंगावर खेकासल्या.."तुझ्या आईने तुला काही वळण लावलेले दिसत नाही, निदान सासूचे बघून तरी काही वळण लावून घे स्वतःला"... असे म्हणून जाता जाता ही त्या मुक्ताला टोमणा मारून गेल्या.
दुसऱ्या दिवशी मुक्ताचे ऑफिसमध्ये एक महत्त्वाचे प्रेझेंटेशन होते. एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर ती प्रोजेक्ट हेड म्हणून काम करत होती.
दुसऱ्या दिवशी मुक्ताचे ऑफिसमध्ये एक महत्त्वाचे प्रेझेंटेशन होते. एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर ती प्रोजेक्ट हेड म्हणून काम करत होती.
आज सकाळपासून तिने झटपट कामं उरकून स्वतःची तयारी केली. आज पहिल्यांदाच खूप दिवसांनी ती स्वतःला आरशात न्याहाळत होती..
गेला महिनाभर जणू काही फुकटची मोलकरीण असल्याप्रमाणे तिची अवस्था झाली होती. कशीतरी गुंडाळलेली साडी, डोक्यावर केसांचा अंबाडा, कपाळावर मोठी टिकली आणि आत्तेसासूबाईंना आवडतील अशा हातभर काचेच्या बांगड्या...
त्यामुळे आज सुंदर गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, मोकळे सोडलेले केस आणि हातात एक नाजूक ब्रेसलेट तिचा वेगळाच आत्मविश्वास वाढवत होते.
शेखर तिला बाईकवरुन ऑफिसच्या जवळ सोडून आला आणि जाताना तिला 'बेस्ट लक' म्हणाला. त्यावर एक छान स्मितहास्य करत मुक्ता ऑफिसकडे वळली.
आज जवळपास महिन्याभराने ती ऑफिसला आली होती. ऑफिसमधले सारेजण तिची उत्सुकतेने वाट पाहत होते. मैत्रिणी तिच्या लग्नानंतर बदललेल्या सौंदर्याचे कौतुक करत होत्या.
आज जवळपास महिन्याभराने ती ऑफिसला आली होती. ऑफिसमधले सारेजण तिची उत्सुकतेने वाट पाहत होते. मैत्रिणी तिच्या लग्नानंतर बदललेल्या सौंदर्याचे कौतुक करत होत्या.
'घरचे कसे आहेत, नवरा कसा आहे? म्हणून विचारपूस करत होत्या.. मुक्ताने आनंदी चेहऱ्याने सासरचे खूप कौतुक केले. कुणाला कल्पनाही नसेल की मुक्ताने महिनाभरात किती टोमणे ऐकले होते, किती घुसमट सहन केली होती, कितीतरी वेळा तिच्या आईबाबांचा उद्धार करण्यात आला होता.
पण ते सारे विसरून ती प्रेझेंटेशनच्या तयारीला लागली. दुपारी प्रेझेंटेशन संपल्यावर तिला हायसं वाटलं.
तिचे खूप कौतुक केले होते आॅफिसमध्ये. त्या प्रेझेन्टेशनमुळे दुसरे नवीन प्रोजेक्ट तिला मिळणार होते.
आज मुक्ता खूप खुश होती तिने ऑफिस सुटताना आईला फोन केला. महिनाभराने मुक्ताचा आवाज ऐकून आईला गहिवरले. "कशी आहेस गं बाळा?, सासरी सगळे ठीक आहे ना?" म्हणत आई भावूक झाली.
"मागच्या आठवड्यात तुझ्या सासरी फोन केला होता, तर तुझ्या आत्तेसासूबाईंनी मला दम दिला की,' लेकीच्या संसारात तिच्या आई बापाने जास्त लक्ष घालू नये, लेक परक्याचे धन असते, हे लक्षात ठेवावे' आणि लेकीला पहिलं मूल होइपर्यंत आई बापाने तिच्या घरचे पाणीही पिऊ नये', अशी आमची रीत आहे' असे त्यांनी सुनावले. त्यामुळे पुन्हा फोन करण्याचं माझं धाडसच झालं नाही गं... पण जीव सारखा तुटत होता की माझी मुक्ता तिथं नेटान सारं काही निभावून तर नेईल ना?"
पण फोनवर एकाही शब्दाची तक्रार न करता मुक्ताने आई-बाबांची, माहिची विचारपूस केली आणि फोन ठेवला. डोळ्यातल्या अश्रूंना रुमालाने टिपले आणि घरचा रस्ता धरला.
मनात विचार घोळत होते की,"एखादी गोष्ट एखाद्या मुलीला येत नसेल किंवा समोरच्याच्या म्हणण्यानुसार जमत नसेल, म्हणून त्या मुलीला काहीच येत नाही असे ठरवून का मोकळी होतात लोकं?
आज ऑफिसमध्ये माझ्या शिक्षणामुळे माझे कौतुक होत आहे. बरं, घरची कामंही मी व्यवस्थित करते, तरीही मला अशी वागणूक का? मी नवीन आहे म्हणून? की मी परक्या घरातून येऊन या घरातली होऊ पाहते म्हणून?
एक दिवस मुक्ताच्या सासूबाईंनी मुक्ता कामावरून आल्यावर तिला सांगितले," येत्या गुरुवारी आपल्याला गावी जायचे आहे, तशी तू पंधरा दिवसांची रजा घे. शेखरलाही मी रजा घ्यायला सांगितले आहे".
एक दिवस मुक्ताच्या सासूबाईंनी मुक्ता कामावरून आल्यावर तिला सांगितले," येत्या गुरुवारी आपल्याला गावी जायचे आहे, तशी तू पंधरा दिवसांची रजा घे. शेखरलाही मी रजा घ्यायला सांगितले आहे".
गावी जायच्या विचाराने मुक्ताच्या हातापायातील अवसानंच गळाले. पुन्हा तेच टोमणे, तिच घुसमट, तेच अपराध्यासारखं घाबरून वागणं, तिला नकोसं झालं होतं... पण पर्याय नव्हता. जावं तर लागणारच होतं..
तिने कामावर रजा घेतली. घरी येऊन बॅग भरली. बॅगमध्ये साड्या, बांगड्या, टिकल्या, मोठे मंगळसूत्र या साऱ्या गोष्टी न चुकता भरले.
गुरुवारचा दिवस उजाडला. शेखर, आईबाबा, मुक्ता गावी पोहोचले.
गुरुवारचा दिवस उजाडला. शेखर, आईबाबा, मुक्ता गावी पोहोचले.
अंगणात आत्तेसासुबाई दोन चार बायकांबरोबर गप्पा मारत बसल्या होत्या. शेखरच्या आईला बघून त्यांनी तिच्या चेहऱ्यावरून बोटं मोडत म्हणाल्या,"आली गं बाई माझी, तुलाच काय ती माझी काळजी... कशी आहेस? बरी आहेस ना? म्हणत एक विचित्र कटाक्ष मुक्ताकडे टाकला आणि म्हणाल्या," तुला सुट्टी मिळाली कामावरून, का मला घाबरून आलीस की सासूबाई काय बोलते का म्हणून? आणि गळ्यात काय ती चैन अडकवली.. दोन चार काळे मणी असले म्हणजे तुम्हांला वाटतं मंगळसूत्र घातलं, अगं लग्नात चांगलं पाच तोळ्यांचे मंगळसूत्र घातले ना आम्ही तुला? का ते तिजोरीची धन म्हणून ठेवायचे?
त्यांचे बोलणे ऐकून मुक्ता गांगरली तिने पटकन बॅगेतून मंगळसूत्र काढले आणि गळ्यात घातले. ती हातपाय धुण्यासाठी मागच्या दारी जाणार तितक्यात सासूबाई ओरडल्या, "आल्यावर घरातल्या मोठ्या माणसांच्या पाया पडायला काय लाज वाटते का? अगं त्यांचे आशीर्वाद तुम्हाला तारुन नेतील... नाहीतर लग्नाला चार-पाच महिने झाले तरी कसली गोड बातमी नाही का काही नाही"
आता मात्र मुक्ताचा चेहरा पडला. जमलेल्या साऱ्या बायकांना नमस्कार केला आणि ती घरात गेली. स्वयंपाक घरात आत्तेसासूबाईंची सून 'सगुणा' स्वयंपाक करत होती. एवढ्या लोकांचा स्वयंपाक करण्याची तिला सवय होती.
सगुणाही शिकलेली असली, तरी लग्नानंतर नोकरी सोडून गृहीणी बनली होती. ही तिची स्वतःची आवड होती. तिचा स्वतःचा निर्णय होता. पण एवढे सारे कष्ट करूनही सासूबाई सतत तिला टोमणे मारायच्या.
तो त्यांचा स्वभाव होता. त्यात सगुणा शांत होती. त्यामुळे सासूबाई काहीही बोलल्या तरी ती ऐकून न ऐकल्यासारखे करत असे.. तिच्या लग्नालाही जवळपास पाच सहा वर्ष झाली होती, पण मुल होत नाही म्हणून सासुबाई लेकाच्या दुसर्या लग्नाच्या गप्पा झोडत बसायच्या..
आपल्या बोलण्यामुळे समोरच्याला किती त्रास होत असेल, किती वेळा मन दुखावले जात असेल, याची काही फिकीर आत्याबाईंना नसायची.. त्यामुळे सकाळपासून जो तोंडाचा पट्टा चालू असायचा ते रात्री झोपेपर्यंत.
त्यात शेखरची आई सोबतीला असल्याने, त्यांनी उन्हाळ्याचे वाळवण करायला सुरुवात केली आणि मुद्दाम मुक्ताला म्हणाल्या," ये, आम्हाला मदत कर. तुझ्या आईने तर काही शिकवलेच नसेल, पण आमच्याकडून जरा चालीरीती, काही पदार्थ शिकून घ्यायचा प्रयत्न कर"... मुक्ता गपगुमान त्यांच्या तिथे जाऊन बसली.
आत्तेसासूबाईंनी तिला पापड लाटायला सांगितले. पण तिने कितीही चांगला पापड लाटला तरी त्या तिला म्हणायच्या, "आपल्याला काही पुऱ्या नाही करायच्या, पापड कसा एकदम कागदासारखा असला पाहिजे."
बिचारी मुक्ता... आपल्याला आता पंधरा दिवस ऐकूनच घ्यावे लागणार आहे, या विचाराने शांत राहिली.
एक दिवस सगुणा आणि मुक्ता गप्पा मारत असताना मुक्ताने सगुणाला विचारले," तुला सासूबाई एवढ्या बोलतात तुला कधीच वाईट वाटत नाही का गं? बोल ना... मूल नसणे म्हणजे हा काय स्त्रीचा अपराध आहे का? सतत घालून पाडून बोलायचं, पण समोरच्याला त्याचा किती त्रास होतोय याचा विचार का नाही करत या?

त्यावर सगुणा हसली आणि म्हणाली," मुक्ता, तू पण शिकलेली आहेस, अन् मी पण शिकलेली आहे... पण कधीकधी शिकूनही अशिक्षित असल्याचं नाटक करावं लागतं, कारण त्यामध्ये कुठेतरी आपल्या जवळच्या माणसाशी आपण जोडले गेलेलो असतो.
खरं पहाता आम्ही खूप दवाखान्यांच्या वाऱ्या केल्या पण सगळीकडचे रिपोर्ट सारखेच.. दोष माझ्यात नाही, तर आमच्या यांच्यात आहे.. असं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलं... "पण म्हणून मी त्यांना सोडून जाऊ शकत नाही, कारण केवळ त्यांच्या प्रेमाखातर आणि माय लेकांमध्ये ताटातूट नको, म्हणून आम्ही एकत्र राहत आहोत." तिचं बोलणं ऐकून मुक्ता हळहळली...
तिने ठरवलं की एक दिवस आत्तेसासूबाईंना त्यांची चूक दाखवून द्यायची.. तिने दवाखान्याचे रिपोर्ट त्यांना दाखवले आणि म्हणाली," सतत दुसऱ्याच्या मुलींना दोषी धरण्यापेक्षा कधीतरी दोष आपल्या मुलातही असू शकतो, याची जाणीव ठेवा.. आज तुमचे लेक स्वभावाने चांगले, प्रेमळ आहेत, म्हणून त्यांच्या बायका हे सगळे सहन करत आहेत. नाहीतर संसाराची घडी विस्कटायला वेळ लागला नसता."

इतके दिवस शांत असलेल्या मुक्ताचा हा असा अवतार पाहून आत्याबाई खरंतर मनातून खजील झाल्या. जरी त्यांनी स्वतःची चूक मान्य केली नाही तरी, त्यानंतर त्या कधीही मुक्ताला किंवा सगुणाला टोमणे मारायच्या भानगडीत पडल्या नाहीत..
एरवी सगुणाला पाळी आली की तिच्या हातचे बनवलेले जेवण न खाता, सासूबाई स्वतः स्वयंपाक करून खायच्या. पण वयोमानानुसार आता त्यांना ते शक्य नसल्याने, त्यांनी स्वतःच्या अनिष्ट चालीरीतींवर थोडा लगाम लावला, अन् गपचूप सगुणाच्या हातचे जेवण खाऊ लागल्या.

एरवी मूल होत नाही म्हणून वांझ म्हणून हिणावणाऱ्या सगुणाला, न अडवता ओटीभरणाला पाठवू लागल्या.
गावाकडची मुक्ताची एक भेट खूप काही बदल करून गेली. एक तर तिच्या स्वतःसाठी आणि दुसरे म्हणजे सगुणासाठी... आता जेव्हा कधी गावी जायची वेळे येते, तेव्हा मुक्ताला नव्हे तर आत्तेसासूबाईंना खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी असतात.
लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीसाठी तिथली माणसं, घर सारंच काही नवीन असतं.. पण अशाच वेळी तिला न डगमगवता, तिच्यामागे खंबीरपणे उभे राहून जर तिची साथ दिली, तर कुठल्याही मुलीसाठी सासर हे सासर न राहता, तिचे दुसरे माहेरच होईल.

आईवडिलांनी प्रत्येक मुलीला चांगलीच शिकवण दिलेली असते. क्वचित प्रसंगी काही ठिकाणी मुलीचे आई-वडील मुलीच्या संसारात गरजेपेक्षा जास्त लुडबुड करत असतीलही, पण म्हणून प्रत्येक मुलीला त्याच पारड्यात तोलुन, तिचा छळ करणे किंवा तिच्या आई वडिलांचा उद्धार करणे ही गोष्ट मुळीच योग्य नाही.
एखादी गोष्ट आपल्या पद्धतीने नाही झाली, म्हणून ती चुकीची आहे हे समजणं नक्कीच चुकीचं आहे. नसेल येत शहरातील मुलींना गावी आल्यावर चुलीवर स्वयंपाक बनवणं, नसेल येत नदीवर जाऊन कपडे धुणं, नसतील येत वाळवणाचे पदार्थ, पारंपरिक पदार्थ... पण त्या शिकण्याचा प्रयत्न नक्कीच करतात. फक्त कायम मुलींना दोष न देता, किमान एकदा त्या गोष्टी न टोमणे मारता शिकवल्या तर किमान बदल नक्कीच होईल...
अनेकदा आयुष्यात लग्नानंतर जे अनुभव येतात, ते मांडण्याचा हा प्रयत्न... अनुभव खरे, फक्त नावात बदल असलेली ही एक कथा ...
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.