© वैष्णवी कुलकर्णी
पूर्वाचं छान चौकोनी कुटुंब, नवरा केदार आणि दोन गोड मुलं अवनी आणि अंबर. अवनी होती १० वी मध्ये तर अंबर ८ वी मध्ये.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

एमबीए केलेला केदार एका कंपनीत मॅनेजर होता तर एम. कॉम असलेली पूर्वा घर आणि मुलांसाठी नोकरी न करता घरीच शिकवण्या घ्यायची.
आज पूर्वाने घरातली सगळी कपाटं आवरायला काढली होती. मुलांचं कपाट आवरून झाल्यानंतर ती आपल्या बेडरूमकडे वळली. तिने तिचा वॉर्डरोब उघडला आणि तिच्या दृष्टीस पडला तो त्यांचा फॅमिली अल्बम.
अंबर - ए आई, तुला जायचं असेल तर जा पण आम्हाला आधी जेवायला वाढ, खूप भूक लागली आहे, मी येतो फ्रेश होऊन. जेवायला काय बनवलं आहे आज तू ?
पूर्वा - अरे हो हो, किती प्रश्न विचारणार आहात एकच वेळेस? नुकतेच आलात ना ? पटकन फ्रेश व्हा. तुमची आवडती पावभाजी केली आहे आज आणि अवनी, आज तू जेवण गरम कर आणि दोघांची पानं वाढून दोघे जेवून घ्या.
दोघेही पुन्हा आश्चर्यचकित झाले. इतक्या वर्षांत आईने असं कधीच केलं नव्हतं. आपण फ्रेश होऊन येईपर्यंत आपली पानं वाढलेली असायची टेबलवर.. आणि आज ? काय झालंय आज आईला ?
अंबर - आई , अगं तू असं का बोलते आहेस , काय झालंय तुला आणि चालली कुठे आहेस तू ते सांगितलंच नाहीस अजून..
पूर्वा - मी कुठेही जात नाहीये. जा , फ्रेश व्हा आणि जेवून घ्या पटकन.
संभ्रमातच दोन्ही मुलांनी आवरून जेवून घेतलं. त्यांचं आटोपल्यावर पूर्वा घरातल्या बागेत आली. बागेतल्या फुलांना तिने प्रेमाने कुरवाळलं, त्यांचा स्वर्गीय सुगंध आपल्या प्रत्येक श्वासात भरून घेतला.
केदार - हो मग! खरंच पूर्वा, आपल्या या छोट्याशा संसारात तू साखरेसारखी विरघळून गेलीस, स्वतःचं अस्तित्व तू माझ्यात लीन केलंस, केवळ मला आवडते तसंच नटत आलीस पण आज स्वतःला तू दिलेला वेळ, तुझं नव्याने बहरून आलेलं तुझं असं अस्तित्व खरंच अमूल्य आहे. मी तर आज पुन्हा नव्याने तुमच्या प्रेमात पडलोय राणीसरकार !
अंबर - आणि मी पण ! आई, तू नेहमी अशीच हसरी आणि प्रसन्न राहत जा आणि तू तशीच राहशील याची जबाबदारी आजपासून माझी.
पूर्वा - केदार, खरं सांगू ? स्त्रीचं आयुष्य देखील या फुलांसारखच असतं, स्वतः उमलून दुसऱ्यांना सुगंध देणारं. एक स्त्री जेव्हा पत्नी, सून, आई या भूमिकांत शिरते तेव्हा ती स्वतःचं अस्तित्व जपायचं असतं हे देखील विसरून जाते.
अवनी - आई, खरंच आज दृष्ट काढायला हवी तुझी इतकी चार्मिंग दिसते आहेस तू आणि तुला सदैव अशीच हसरी ठेवण्याची जबाबदारी फक्त अंबरची नाही तर आमच्या तिघांचीही आहे. आण तुझा तो मोबाईल, आपण छान फोटो काढू तुझे.
आणि मग या तिघांनीही पूर्वाचे तिला आवडतात तशाच वेगवेगळ्या अदांमध्ये भरपूर फोटो काढले.
पूर्वाला आज अतीव समाधान मिळत होते. पहिले म्हणजे स्वतः साठी अवघे जग विसरून मनाप्रमाणे सजल्याचे , केवळ पूर्वा म्हणून जगल्याचे आणि दुसरे म्हणजे तिचं जग असणाऱ्या या तिघांनी तिच्या साजशृंगाराचा , तिने केवळ स्वतः ला दिलेल्या वेळेचा आणि आज केवळ पूर्वा म्हणून तिचं अस्तित्व जपणाऱ्या तिचा मान ठेवल्याचे..
© वैष्णवी कुलकर्णी
मुलं सकाळी ७:४५ ला जी शाळेत जायची ती दुपारी २ ला घरी परतायची आणि केदार सकाळी ९ लाच ऑफिससाठी बाहेर पडायचा तो संध्याकाळी ६ ला यायचा.
त्यामुळे २ वाजेपर्यंतचा वेळ ती घरातली कामं करणे, भाजीपाला आणणे यामध्ये घालवायची आणि ४ ते संध्याकाळी ६:३० पर्यंत शिकवण्या घ्यायची.
पुन्हा रात्रीचा स्वयंपाक आणि जेवणं उरकून दुसऱ्या दिवसाला सामोरी जाण्यासाठी बेत रचत निद्राधीन व्हायची. वर्षानुवर्षे तिची हीच दिनचर्या सुरू होती.
त्यात बदल म्हणजे उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ४-८ दिवस चौघे एखाद्या रम्य ठिकाणी विसाव्यासाठी जायचे तेवढाच.
आज पूर्वाने घरातली सगळी कपाटं आवरायला काढली होती. मुलांचं कपाट आवरून झाल्यानंतर ती आपल्या बेडरूमकडे वळली. तिने तिचा वॉर्डरोब उघडला आणि तिच्या दृष्टीस पडला तो त्यांचा फॅमिली अल्बम.
तिने अलवारपणे त्यावरून हात फिरवला आणि तो बाजूला काढून ठेवला. कपाट आवरून झाल्यानंतर ती फ्रेश होऊन अल्बम बघण्यात गुंगली.
लग्न झाल्यापासून ते आतापर्यंतच्या सगळ्या गोड आठवणी त्या अल्बममध्ये होत्या. हा आपल्या पहिल्या मंगळागौरीला काढलेला आपला आणि केदारचा फोटो, हा अवनीच्या बारशाच्या वेळेसचा, हा अंबरच्या पहिल्या वाढदिवसाचा.

एक ना अनेक स्मृती होत्या त्यात... प्रत्येक सामोऱ्या येणाऱ्या फोटोवर पूर्वाचं विचारचक्र सुरू होतं. प्रत्येक फोटोमध्ये केदार तिच्यासोबत होता.
आयुष्यातल्या गोड स्मृतींना उजाळा दिल्यानंतर पूर्वाला निराळीच तरतरी आली आणि एक विचार देखील... स्वतःसाठी. आज तिने मनाशी काहीतरी निश्चय केला होता. काय होता तो निश्चय?
पूर्वा आजतागायत फक्त कुठल्या ना कुठल्या सण समारंभ किंवा लग्नकार्य यासाठीच साजशृंगार करत आली होती. कधी मुलांचे वाढदिवस, कधी नवऱ्याची आवड तर कधी नातेवाईकांसाठी. पण या सगळ्यात होती ती फक्त एक पत्नी, आई किंवा सून. पूर्वा कुठे होती?

ती या सगळ्या नात्यांच्या मागे दडून बसली होती, स्वतःचं अस्तित्व विलीन करून, स्वतःची केवळ पूर्वा असलेली ओळख स्वाहा करून.
परंतु आज या छायाचित्रांच्या माध्यमातून, त्यांनी घातलेल्या हाकेमधून पूर्वा जागृत झाली होती आणि आज ती केवळ स्वतःसाठी जगणार होती, स्वतःला शृंगरणार होती.
दुपारचे १२ वाजले होते. तिने पटापट उर्वरित कामं आवरली, जेवण केले आणि शिकवणीच्या मुलांच्या घरी फोन करून आज वैयक्तिक कारणास्तव सुट्टी देत असल्याचे सांगितले.

आज शिकवण्या नाहीत म्हटल्यानंतर तिला जरा हायसे वाटले. कपाटातल्या तिच्या कप्प्यातून तिने सिल्कची सुंदर अशी लाल रंगाची साडी बाहेर काढली.
"लग्नानंतर आपल्या पहिल्या वाढदिवसाला ही साडी केदारने आणली होती. किती सुंदर पद्धतीने साजरा झाला होता त्या वर्षीचा वाढदिवस! "
एकवार उराशी कवटाळून तिने ती साडी नेसायला घेतली. त्यावर मॅचींग बांगड्यांनी हातांना शृंगारले. मोत्यांच्या टपोऱ्या माळेने तिची मयुरासमान नाजुक मान अजूनच खुलून आली.

मुळातच हिरण्याक्षी असलेल्या पूर्वाने बारीक रेघेचे काजळ डोळ्यांच्या सीमेत आखले आणि हलक्या पेस्टल शेडची लिपस्टिक ओठांवर चढवली. घरच्या बागेतल्या मोग-याचा भरगच्च गजरा लांबसडक केसांवर माळला आणि इतक्या वर्षांनंतर निवांपणे केवळ स्वतःसाठीच सजलेल्या, मोहरलेल्या स्वतःला पाहून पूर्वा कमालीची लाजली.
तितक्यात दारावरची बेल वाजली. २ वाजले होते आणि तिची दोन्ही पिल्लं आली होती. पूर्वाने दार उघडले. एरवी गाऊन मधल्या टिपिकल अवतारात राहणाऱ्या आणि आज नखशिखांत सजलेल्या आपल्या आईला बघून अवनी आणि अंबर दोघेही अवाक झाले.

आत येता येता ते म्हणाले ,
अवनी - आई, तू कुठे बाहेर चालली आहेस का इतकी सजून धजून ?
अवनी - आई, तू कुठे बाहेर चालली आहेस का इतकी सजून धजून ?
अंबर - ए आई, तुला जायचं असेल तर जा पण आम्हाला आधी जेवायला वाढ, खूप भूक लागली आहे, मी येतो फ्रेश होऊन. जेवायला काय बनवलं आहे आज तू ?
पूर्वा - अरे हो हो, किती प्रश्न विचारणार आहात एकच वेळेस? नुकतेच आलात ना ? पटकन फ्रेश व्हा. तुमची आवडती पावभाजी केली आहे आज आणि अवनी, आज तू जेवण गरम कर आणि दोघांची पानं वाढून दोघे जेवून घ्या.
दोघेही पुन्हा आश्चर्यचकित झाले. इतक्या वर्षांत आईने असं कधीच केलं नव्हतं. आपण फ्रेश होऊन येईपर्यंत आपली पानं वाढलेली असायची टेबलवर.. आणि आज ? काय झालंय आज आईला ?
अंबर - आई , अगं तू असं का बोलते आहेस , काय झालंय तुला आणि चालली कुठे आहेस तू ते सांगितलंच नाहीस अजून..
पूर्वा - मी कुठेही जात नाहीये. जा , फ्रेश व्हा आणि जेवून घ्या पटकन.
संभ्रमातच दोन्ही मुलांनी आवरून जेवून घेतलं. त्यांचं आटोपल्यावर पूर्वा घरातल्या बागेत आली. बागेतल्या फुलांना तिने प्रेमाने कुरवाळलं, त्यांचा स्वर्गीय सुगंध आपल्या प्रत्येक श्वासात भरून घेतला.
आपल्या फुलांसोबत ती आपल्या नवीन रूपाला मोबाईलमध्ये बद्ध करत होती, निरनिराळ्या अदांमध्ये. अवनी आणि अंबर दोघेही आज आईचं हे नवीनच रूप अनुभवत होते.
तेवढ्यात केदार देखील आपल्याजवळच्या चावीने घराचं दार उघडून आत आला. ऑफिसमध्ये जास्त काम नसल्याने आज तो लवकर घरी आला होता.
अवनीने गुपचूप त्याला पूर्वाच्या नवीन रूपाचं दर्शन घडवलं अन् तो देखील स्तब्ध होऊन, आज केवळ पूर्वा म्हणून वावरणाऱ्या तिला न्याहाळत तिथेच उभा राहिला.
आपल्या व्यापात गुरफटलेल्या तिघांनाही पूर्वाकडे, तिच्या आंतरिक सौंदर्याकडे नकळत दुर्लक्ष केल्याचे वाईट वाटत होते. मुक्त अवखळ बागडणाऱ्या फुलपाखराप्रमाणे ती आपल्या बागेत संचारत होती. अवनी, अंबर आणि केदार तिच्याजवळ गेले.
केदार - पूर्वा, कसली सुंदर दिसतेस गं तू आज ! कातील.. आय हाय मैं मरजावा...
पूर्वा - इश्श! केदार , अरे मुलं मोठी झालीत आता, काय हे ?
अवनी - आई, आम्ही आजपर्यंत केवळ वयानेच मोठे होतो पण आज तुला केवळ स्वतःसाठी इतका छान शृंगार केलेला पाहून खऱ्या अर्थाने वैचारिक मोठेपण आम्हाला मिळालं आहे.
आजतागायत तू केवळ आपल्या घरातल्या सण समारंभासाठी आणि आम्ही सांगू तसं सजत होतीस, त्यात रमत होतीस होतीस पण आज? आज तू केवळ तू आहेस, स्वतःला वेळ देणारी, स्वतःत रमणारी आणि आजची तू नेहमीच्या तुझ्या रुपांपेक्षा आम्हाला जास्त भावली आहेस. हो ना बाबा?
केदार - हो मग! खरंच पूर्वा, आपल्या या छोट्याशा संसारात तू साखरेसारखी विरघळून गेलीस, स्वतःचं अस्तित्व तू माझ्यात लीन केलंस, केवळ मला आवडते तसंच नटत आलीस पण आज स्वतःला तू दिलेला वेळ, तुझं नव्याने बहरून आलेलं तुझं असं अस्तित्व खरंच अमूल्य आहे. मी तर आज पुन्हा नव्याने तुमच्या प्रेमात पडलोय राणीसरकार !
अंबर - आणि मी पण ! आई, तू नेहमी अशीच हसरी आणि प्रसन्न राहत जा आणि तू तशीच राहशील याची जबाबदारी आजपासून माझी.
पूर्वा - केदार, खरं सांगू ? स्त्रीचं आयुष्य देखील या फुलांसारखच असतं, स्वतः उमलून दुसऱ्यांना सुगंध देणारं. एक स्त्री जेव्हा पत्नी, सून, आई या भूमिकांत शिरते तेव्हा ती स्वतःचं अस्तित्व जपायचं असतं हे देखील विसरून जाते.
समोरच्याला आवडेल अशा रूपांत ती सदैव समोर येत असते. कधी पतीच्या तर कधी मुलांच्या चॉईसप्रमाणे स्वतःला सजवत असते. पण आज आपल्या जुन्या स्मृतींना अल्बममधून मिळालेला उजाळा मला माझ्या अस्तित्वाची नव्याने ओळख देऊन गेला आणि मला मी गवसले.
नव्याने गवसलेले मी आज केवळ पूर्वा म्हणून सजले, बागडले आणि दुधात साखर म्हणजे तुम्हा तिघांनाही माझं स्वत:साठी वेळ काढणं मनापासून पटलं आणि त्याचा सन्मान केलात तुम्ही तिघांनी.
अवनी - आई, खरंच आज दृष्ट काढायला हवी तुझी इतकी चार्मिंग दिसते आहेस तू आणि तुला सदैव अशीच हसरी ठेवण्याची जबाबदारी फक्त अंबरची नाही तर आमच्या तिघांचीही आहे. आण तुझा तो मोबाईल, आपण छान फोटो काढू तुझे.
आणि मग या तिघांनीही पूर्वाचे तिला आवडतात तशाच वेगवेगळ्या अदांमध्ये भरपूर फोटो काढले.
फुलांचा सुगंध घेणारी पूर्वा, आपले दोन्ही बाहु पसरून क्षितीज कवेत घेणारी पूर्वा, कुठे लाजरी पूर्वा तर कधी स्वतः वरचा आत्मविश्वास चेहऱ्यावर झळकत असलेली पूर्वा. असंख्य प्रतिमा तिच्या मोबाईल मध्ये आणि मन: स्मृतीत बद्ध झाल्या.
आज नव्याने तिच्या प्रेमात पडलेल्या केदारने खूप दिवसानंतर या नव्या पूर्वाला आणि आपल्या लेकरांना डिनर ची ट्रीट दिली आणि ती सुद्धा पूर्वाच्या आवडत्या रेस्टॉरंट मध्ये. आणि तिघांनी मिळून पूर्वाला दिलं एक वचन , तिला जपण्याचं , तिच्या सजण्याचा सन्मान करण्याचं.
आज नव्याने तिच्या प्रेमात पडलेल्या केदारने खूप दिवसानंतर या नव्या पूर्वाला आणि आपल्या लेकरांना डिनर ची ट्रीट दिली आणि ती सुद्धा पूर्वाच्या आवडत्या रेस्टॉरंट मध्ये. आणि तिघांनी मिळून पूर्वाला दिलं एक वचन , तिला जपण्याचं , तिच्या सजण्याचा सन्मान करण्याचं.
पूर्वाला आज अतीव समाधान मिळत होते. पहिले म्हणजे स्वतः साठी अवघे जग विसरून मनाप्रमाणे सजल्याचे , केवळ पूर्वा म्हणून जगल्याचे आणि दुसरे म्हणजे तिचं जग असणाऱ्या या तिघांनी तिच्या साजशृंगाराचा , तिने केवळ स्वतः ला दिलेल्या वेळेचा आणि आज केवळ पूर्वा म्हणून तिचं अस्तित्व जपणाऱ्या तिचा मान ठेवल्याचे..
© वैष्णवी कुलकर्णी
सदर कथा लेखिका वैष्णवी कुलकर्णी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..