सर नाही बाबा


©️ सौ. प्रभा कृष्णा निपाणे






रीमाने एका हातात कॉफीचा मग घेतला. हॉल मध्ये आली, दुसऱ्या हातात मोबाईल धरला.बापरे !

स्मिताचे ११ मिस कॉल . गॅलरीत बसून कॉफी पिणे हा तिचा आवडता छंद.

विचार केला, कॉफीचा घोट घेत लेकीला फोन करावा.

तेवढ्यात पुन्हा रिंग वाजली.

आई !

अग कुठे आहेस ?

अग घरीच आहे !

तुझी आवडती कॉफी आहे वाटते सोबत आणि तो कोपरा. तेव्हाच माझा फोन उचलला नाही !

अग बाळा !

मी माझी आवडती कॉफी बनवायला किचन मध्ये होते आणि चुकून मोबाईल हॉल मध्ये ! सॉरी बच्चा ! का इतके कॉल केले ते तरी सांग !

अग मम्मा माझा रिझल्ट लागला. खूप चांगले मार्क मिळाले. आता तुझ्या लेकीला पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री मिळवण्या पासून कोणीच थांबवू शकत नाही.

मम्मा, मार्क मिळाले त्यावरून नक्की माझा गायनॅकला नंबर लागेल असे वाटते.

काय ?

हो मम्मा !

खूप खूप अभिनंदन बेटा ! कधी येतेस घरी ? मी आज संध्याकाळी हॉस्पिटलला नाही जात .आपण आज छान पार्टी करू या ! कुठेतरी जेवायला जाऊ या का?

मम्मा ! आम्ही आज मित्र मैत्रिणीं मिळून पार्टीला जाणार आहोत. मम्मा उद्या संडे ना! आपण उद्या जाऊ !
मम्मा उद्या नाटक कोणते आहे ते बघ ! तुला नाटक खूप आवडते ना ! मस्त दुपारी नाटक बघू !
मग रात्री जेवून घरी! चालेल न मम्मा !

हो बेटा चालेल! आज मैत्रिणी बरोबर मज्जा कर. उद्या आपण दोघी.

बाय मम्मा!

बाय बेटा!

रीमाने आज हॉस्पिटल मध्ये येणार नाही असे कळवले. पुन्हा एक कप कॉफी बनवली. गॅलरीत येऊन बसली.

गॅलरीत रातराणी बहरली होती. मिटलेल्या पाकळ्याची उमलण्याची धडपड चालली होती. मंद सुगंध हळुहळू पसरत चालला होता.

हळूच एखादी वाऱ्याची झुळूक यायची आणि सुंगध श्वासात भिनत जायचा.

दीर्घ श्वास घेत रीमा आराम खुर्चीला टेकून बसली.

जुन्या आठवणीत हरवून गेली.

असेच त्या दिवशी रीमा आणि ऋषी कॉफी पित होते. असाच रातराणीचा सुगंध दरवळत होता.

रीमाचा हात हातात घेऊन ऋषी म्हणाला, रीमा एका US च्या हॉस्पिटल मधून मला ऑफर आली. दोन वर्षासाठी मला तिकडे बोलावले आहे. खरतर आठ, दहा दिवस झालेत. पण मी अजूनही कुणाला काही सांगितले नाही.

तुला सांगायचे धाडसच होत नव्हते. द्विधा मनस्थिती आहे माझी.

एक मन म्हणते जा !दु सरे म्हणते थांब ! काय करू काही कळत नाही ग!

अरे ऋषी ! मी गरोदर आहे. दोनच महिने झाले. ना मला आईवडील, ना तुला. कुठून बुध्दी झाली आणि त्या बिचाऱ्यांना फिरायला पाठवले. गाडीचा accident  झाला, चौघे जागीच ठार, आपण अनाथ झालो रे !

त्यात तू एकुलता एक. मला एक मोठी बहीण आहे. पण तिचेच खूप व्याप आहेत. अश्या अवस्थेत कोणाची तरी सोबत हवी रे ! त्यात तू म्हणतो दोन वर्षाचा बाँड आहे. येता येणार नाही. आपल बाळ सुध्दा बघायला नसणार तू !
मला डिलिव्हरीच्या वेळी तू सोबत हवा आहेस. अरे इथे किती चांगले चालले तुझे? किती हॉस्पिटलला जातोस ?
Emergency असेल तर तुलाच पहिला कॉल असतो.

पैसा आणि नाव दोन्ही कमवले, अगदी थोड्याच वर्षात. अजून काय हवे ? ते काही नाही, तू जायचे नाही म्हणजे नाही.

ये रीमा अशी काय करते ? अग एक MMBS डॉक्टर तू. आणि अशी घाबरते.

गायनॅक नाही ना रे तुझ्या सारखी.

अग आपले बाळ खूप strong आहे. रीमाच्या पोटावर हात ठेऊन म्हणाला.
रीमा ! आपल्याला जे होईल ते होईल. म्हणजे मुलगा, मुलगी काहीही. पण मी तिला किंवा त्याला गायनॅक करणार.
माझ्यासारखे!

अरे बाळ पोटात आहे, आणि तू आत्ताच काय ठरवतोस ? त्याची काही वेगळीच इच्छा असू शकते.

नाही !

आपले बाळ गायनॅकच होणार!

बर !

ते काळच ठरवेल ! आता पुढे बोल !

रीमा ! तूच सांग ना. काय करू ? ही संधी मला हातची सोडायची नाही ग !

मग जा ना ! मला कशाला विचारतो?

रीमा ! तू परमिशन दिली नाही तर मी जाईन नंक्की, पण रडवेला चेहरा करून!
दिलीस तर हसत !

म्हणजे जाणार हे नक्की आहेसच !

हो !

अश्या संधी नेहमी येत नाही रीमा !

ठीक आहे ऋषी !

जा तू ! पण डिलिव्हरीच्या वेळी जमल्यास नक्की ये.

हे बघ रीमा , मी तुला खोटे आश्वासन देत नाही. दोन वर्ष मला येता येणार नाही हे नक्की .

ठीक आहे जा तू ! हसत जा!

Love 💕 you म्हणून त्याने हलकेच आपले ओठ तिच्या ओठावर टेकवले.

बस आता मस्का ! Love 💕 you ऋषी .

बर कधी निघणार आहे. पंधरा दिवस आहेत बाकी. त्यांनी सर्व व्यवस्था केली. परवा जाऊन बाकी फॉर्म्यालिटीज पूर्ण करायच्या आहेत.

अच्छा तोंडाशी आल्यावर सांगतोय नाही !

तसे नाही ग !

मलाही असे सोडून जातांना जड जाते !

बर !

आता हा विषय बंद.

आहे तोवर एकमेकांना जास्त वेळ देऊ. मी परवा पासून सगळ्या हॉस्पिटलला जाणे बंद करणार आहे .
तसे बोलून आलो मी .

Ok !

मी काय करू ?

तू तुझे रूटीन चालू ठेव. मी थोडी खरेदी, बाकी काम आटोपून घेतो.

मग दोन, तीन दिवस सुट्ट्या घे. एन्जॉय करू!

ओके बॉस !

चला , काहीतरी जेवायला करते. बराच वेळ झाला.

का?

आज मावशी नाही येणार का?

नाही अरे ! तिच्या मुलाला थोडे बरे नाही म्हणाल्या. मीच सकाळी गोळ्या दिल्यात.

मावशी येणार होत्या, मीच म्हणाले, मावशी आज रविवार, तसेही उठणे उशिरा, नाष्टा उशिरा, मग जेवण उशिरा.

रात्री मऊ खिचडी करते.

ये रीमा एक विसरलोच ग. तिकडे गेल्यावर जेवण, बाकी काम माझे मलाच करावे लागेल !
बापरे ! मला तर काहीच करता येत नाही !

रीमा! आज पासून शुभारंभ. आज खिचडी मी करणार. अर्थात बरोबर तू असणार सगळ सांगायला. चल !

खिचडी खात खात , कोणती भाजी कशी करायची, किती आणि काय काय टाकायचे, ओरल ट्रेनिंग चालू झाले.

मध्ये मध्ये चपाती पण करून बघितल्या. शिकला सगळे.

जायचा दिवस उगवला, रीमा एअरपोर्ट वर सोडायला गेली..

नित्य नेमाने इकडची वेळ पाहून कॉल करायचा. व्हिडिओ कॉल करून काय पदार्थ केले ते दाखवायचा. दोन महिने मजेत गेले.

एक दिवस म्हणाला रीमा, अग एक प्रॉब्लेम झाला. माझी कलिग आहे. ती भूलतज्ञ आहे, तिचा राहायचा जरा प्रॉब्लेम झाला तर ती माझ्याकडे राहायला येणार.

हॉस्पिटलच्या मॅडमनी तसे सांगितले.

लग्न झाले का तिचे ?

नाही !

मग एक unmarried मुलगी तू घरी ठेवणार. अरे लोक काय म्हणतील ऋषी ?

वेडी आहेस का?

म्हणजे ?

लोक काय म्हणतील हे बोलायला हा भारत नाही मॅडम !

म्हणजे ?

इथे कोणाचे कोणाकडे लक्ष नसते.

बघ तू ! मला तर हे अजिबात पटलेले नाही . बर , कधी पासून येतेय ती ?

येईल थोड्या वेळात! तिच्या घरी सामान आणायला गेली .

ठीक आहे !

तू सांभाळून राहा !

का?

मी का सांभाळून राहू ! ती काय माझा रेप करणार की काय ?

ऋषी फालतू बडबड बंद कर!

रीमा ! अग तिची व्यवस्था झाली की जाईल ती ! चील यार ! बाय ! good night !

दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कॉल वरून वेगवेगळे पदार्थ दिसत होते. भाजी चपाती खाणारा ऋषी, बर्गर, पिझ्झा, पास्ता, काय काय खात होता कोण जाणे.

एक दोन वेळा बोलले ऋषी आपल्या सवयी नको सोडुस. हे काय जेवण आहे ?

हो ग बाई !

उद्या पासून करतो, असे म्हणायचा पण करत काही नव्हता.

एक दीड महिना झाला, रीमाला जाणवत होते. ऋषी आपल्या पासून काहीतरी लपवत आहे.

रीमाला दोघांवर संशय यायचा. पुन्हा म्हणायची, नाही नाही ! माझा ऋषी त्याच्या करिअर साठी गेला. तो वावगे काही वागणार नाही .

एक दिवस जेवायला बसले, व्हिडिओ कॉल केला. मेरीने एक घास खाल्ला आणि उलट्या करायला लागली.

रीमा थोड्या वेळाने कॉल करतो असे बोलून त्याने कॉल कट केला.

पुन्हा आला नाही.

ती रात्र रीमा ने फक्त विचारात घालवली.

रीमा ने दुसऱ्या दिवशी कॉल केला. ऋषी,कशी आहे ती ?

बरी आहे .

डॉक्टर कडे घेऊन गेला होता. अर्थात तूच डॉक्टर आहेस. मी काय वेड्यासारखी विचारते.

हो !

काय झाले ?

ऋषी गोंधळला.

काही नाही असे बोलून त्याने फोन ठेवला.

ऋषी मात्र खूप अस्वस्थ होता.

ज्या दिवशी त्याच्या हातून चूक घडली, त्या दिवशी पासून त्याचे कशातच लक्ष लागत नव्हत.

मेरी मात्र खूप बिनधास्त होती. ऋषीला म्हणायची तू चिंता करू नको. काही होणार नाही. आणि झाले तरी माझे मी बघून घेणार. तुला काही त्रास होणार नाही.

आणि आज अचानक मेरीला उलट्या झाल्या. ऋषीने तपासले, जसे तपासले तसा म्हणाला, मेरी तुझी date उलटून गेली तरी तू मला का सांगितले नाही ?

अग मी तुला गोळ्या दिल्या असत्या. अजूनही वेळ गेलेली नाही. मेरी तू बाळ abort करायच्या गोळ्या घे. माझी या पासून सुटका कर.

नाही ऋषी, मी असे काही करणार नाही. म्हणूनच मी तुला काही सांगितले नाही.

ऋषी तू काळजी करू नको.

मी या बाळाला जन्म देणार. तुझा आणि त्या बाळाचा काहीच सध नसणार. मी पुन्हा तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही. मी आणि माझे बाळ बस...

मेरी !

सगळ बरोबर ग ! पण माझी बायको तिला काय आणि कसं सांगू ? हे अमेरिका आहे .पण तो आमचा भारत आहे. तिकडे याला व्यभिचार म्हणतात. कोणतीच बायको हे खपवून घेणार नाही. तुला बाळ मिळेल, पण माझी बायको आणि बाळ दोन्ही माझ्यापासून दुरावेल.

ऋषी असे काही होणार नाही. मी रीमा सोबत बोलते.

नको ! तू काही बोलू नको ! मी बघतो काय करायचे ते.

ऋषी, तू तुझ्या बायकोला सांगूनच नको ना !

काय ?

अरे हो ! तिकडे गेलास की सगळे व्यवस्थित होणार. मी आता फक्त एक महिना तुझ्याकडे असणार. नंतर मी जर्मनी ला चालले. पुन्हा कधीच परत येणार नाही.

नाही ! मी रीमाशी खोटे बोलू शकत नाही.

अरे पण जर परिणाम भयंकर होणार असेल तर खोटे बोललेले बरे.

नाही! मी तिचा एकदा विश्वास घात केला, आता पुन्हा नाही. जे होईल ते होईल.

ऋषी आठ दिवस रोज रीमाला सांगायचे ठरवत होता. पण हिम्मत होत नव्हती.

आज धाडस केलेच, हॅलो रीमा !

बोल !

रीमा !

अरे बोल ना !

रीमा !

ऋषी काय झाले?

तुझा आवाज का कापरा झाला आहे?

रीमा ऐकना!

अरे बोल ना ! ऐकतच तर आहे !

बोल काय झाले ?

रीमा ,ती मेरी आहे न. !

हो आहे !

तिचे काय झाले ?

ती ! ती ! ती !

काय झाले ऋषी ?

इतका का घाबरलेला आहे.

रीमा ! ती मेरी! ती गरोदर आहे .माझ्या पासून!

काय ?

हो रीमा ! त्या दिवशी तिला उलट्या झाल्या तेव्हाच समजले. एक दिवस माझ्या हातून चूक झाली.
रीमा पण माझा काहीच दोष नाही. मेरी रोज ड्रिंक घेत होती. तुला माहिती आहे, मी ड्रिंक घेत नाही. त्या दिवशी खूप थंडी होती. हॉस्पिटल मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता. खूप टेन्शन आले होते.

मेरी म्हणाली एक पेग घे.सगळे टेंशन विसरून जाशील.आणि मी ड्रिंक घेतली, एक, दोन, तीन माहित नाही किती प्यायलो ते. त्याच नशेत माझ्या कडून ही चूक झाली. फक्त एकदाच!

रीमा फक्त ऐकत होती.

रीमा प्लीज काहीतरी बोल.

शी ! लाज वाटते मला माझीच.

आता खूप उशीर झाला ऋषी. आज पासून तुझा आणि माझा काहीही सबंध नसणार. येत्या दोन चार दिवसात मी हे शहर सोडून जाते.

रीमा प्लिज असे काही करू नको. इतकी मोठी शिक्षा देऊ नको तुझ्या ऋषीला

माझा निर्णय झाला ऋषी.

कुठे जाणार रीमा ?

त्यात तू गरोदर आहेस. एकटी नाही तू !

माहित आहे !

मी कुठेही जाईन ? पण तुला माझा पत्ता कधीच मिळणार नाही. ठेवते फोन. हे आपले शेवटचे बोलणे. उद्या मी दुसरे सीमकार्ड घेते. जेणेकरून तुझा फोन येणार नाही. बाय ! Good night.Enjoy your life.

ऋषी रीमा ! रीमा! करत होता.

रीमाने फोन कट केला.

तिला सहावा महिना संपत आला होता.

मुंबई सोडून जायचा निर्णय पक्का केला.

लगेच बहिणीला फोन करून सांगितले मी लवकरच तिकडे येते.

ऋषी इथे नाही. खूप ऐकटे ऐकटे वाटते. ताई थोडे दिवस तिकडेच जॉब करते. तिकडेच डीलीव्हरी करते.

लवकर ये आणि जॉब करायची काही गरज नाही. मस्त आराम कर.

ताई, खूप कंटाळा येणार ग घरी.

ठीक आहे, तू ये लवकर .आठ दहा दिवसात सगळे पॅक करून गेली. लवकरच एक जॉब मिळाला.

तिने बहिणीला ऋषी बद्दल गेल्यावर हळूहळू सगळे सांगितले. पुन्हा त्याला माझ्या आयुष्यात स्थान नाही हे सुध्दा स्पष्ट सांगितले.

रीमा लहानपणा पासून खूप स्वाभिमानी होती.

ताई चुकूनही मी इथे राहते हे त्याला कळू देऊ नको.

तुला फोन केला तर सांग मी तिला कॉल करते पण फोन लागत नाही.

तसेही ऋषी आणि भाऊजी दोघे एकमेकांसोबत फारसे बोलत नाही . त्यामुळे तो त्यांना फोन करायची शक्यता कमीच आहे.

ऋषीला ते फारसे आवडत नव्हतेच.

त्यामुळे निभावून गेले सगळे.

नववा महिने पूर्ण झाले. रीमा ने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

दोन महिने रीमा ने कसे बसे काढले.

ताई आता मुंबईला जाते. मी हॉस्पिटलला तसे सांगून आले होते. आठ दिवसापूर्वी फोन केला होता. लवकरात लवकर या म्हणाले. तिथे जवळच पाळणा घर आहे. तिकडे ठवते लेकीला. म्हणजे दुपारी जाऊन दूध पाजता येणार.

ती असे बोलले खरी. पण ती मुंबईला न जाता, औरंगाबादला पोहचली. इकडे आपल्या औंगाबादच्या मैत्रिणीला फोन करून सांगितले होते.

मी येते आहे, आल्यावर सविस्तर बोलू. तिचे लग्न व्हायचे होते. त्यामुळे राहण्याचा तूर्तास काही प्रोब्लेम नव्हता.
विमानाने औरंगाबादला पोहचली. मैत्रिण एअरपोर्ट वर घ्यायला आली होती.

तिला इतके लहान बाळ आहे, ते तिने मैत्रिणीला सांगितले नव्हते. त्यामुळे एकटीच ,सोबत लहान बाळ . काहीच तर्क लागत नव्हता

मनात म्हणाली रीमा बोलली आल्यावर सविस्तर बोलते. सांगेल तिच्या कलाने. आताच तिच्यावर प्रश्नाचा भडिमार नको करायला.

घरी पोहचल्यावर, निता ने चहा केला. रीमाने फ्रेश होऊन चहा घेता घेता नीताला सगळे सांगितले.

रीमा मी कायम तुझ्या सोबत आहे.

पण ?

पण काय निता ?

अग जेमतेम २९ वर्षाची तु,

पुढचे आयुष्य खूप मोठे आहे डियर !

आणि ऋषी म्हणाला न त्याचे आणि मेरीचे काही सबंध नसणार म्हणून.

म्हणून काय मी त्याला माफ करू निता ? माझ्याकडून अशी चूक झाली असती तर त्याने मला माफ केले असते ?

रीमा, मला वाटते स्मिताला तिच्या वडिलांचे प्रेम मिळावे. बाकी काही नाही.

नाही निता. आता मीच तिची आई  मीच तिचा बाबा.

ठीक आहे ! आता पुढे काय ?

इथेच जॉब शोधते.एक भाड्याचे घर घेते. तसे स्वतःचे घर घेण्यासाठी पैसे आहेत माझ्याकडे. पण तूर्तास नाही.

अग माझ्याच हॉस्पिटल मध्ये जॉईन हो ! दोन डॉक्टरची गरज आहे.

हे तर खूप छान होणार निता. शोधाशोध कमी होईल.

तुझा cv दे. मी उद्या देते. त्यात तुझा मोठ्या हॉस्पिटलचां अनुभव आहे. त्यामुळे होईल तुझे काम.

महिन्या भरात रीमाला नीताच्या हॉस्पिटल ला जॉब मिळाला. बाळ लहान असल्यामुळे तिला बऱ्याच सवलती दिल्या गेल्या.

रीमा, तू थोडे दिवस माझ्या घरीच राहा. आपण स्मिताला सांभाळायला एक मावशी ठेऊ. माझ्या ओळखीच्या आहेत त्या. जेवण पण छान बनवतात. मुख्य म्हणजे त्या एकट्याच आहे. त्यामुळे गरज पडली तर त्या आपल्या सोबत सुध्दा राहू शकतात.

निता , ही तर खूप चांगली गोष्ट आहे. आपण त्यांना इथेच राहायला बोलवू.

लीला मावशी तिथेच राहायला आल्या. स्वतःच्या नाती सारखा स्मिताचा सांभाळ करत होत्या.

रीमाला नेहमी एक प्रश्न पडायचा , मोठी झाल्यावर लेक तिच्या बापाचे नाव विचारणार , काय सांगायचे.

आता ठरवले लेकीने मोठे झाल्यावर विचारले तर, योग्य वयात आल्यावर तिला सांगायचे. लग्नाच्या आधी माझ्याकडून एक चूक झाली. त्या नंतर तुझ्या बाबांनी तुझी जबाबदारी नाकारली.

तो इंजिनिअर होता. पण मी एक डॉक्टर होते. तुला असेच सहज शरीरापासून वेगळे करणे मला नाही जमले.

पुढे तो कुठे गेला, काय करतो काहीच माहिती नाही.

एकदा दोनदा तिने विचारायचा प्रयत्न केला. तिला बोलले बाळा योग्य वेळी नक्की सांगेन. त्या आठवणीने मला फक्त त्रास होतो. पुन्हा तो विषय काढू नको.

लेक खूप समजदार, तिने आजवर कधीच तो विषय काढला नाही.

आजी ला मात्र तिने बाबांबद्दल विचारले होते आई सांगत होत्या. त्यांनी सुध्दा तिला तेच सांगितले. जे तिने कधी स्मिताने विचारलेच तर असेच सांगायचे सांगितले होते. तेव्हा स्मिता म्हणाली आजी तीच माझी आई, तीच माझा बाबा.

मला खूप अभिमान वाटतो माझ्या आईचा.

रीमाला ऋषीची आज खूप जास्त आठवण आलेली, कारण त्याची इच्छा होती, आपले बाळ गायनॅक होणार. आणि स्मिताला सुध्दा नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर व्हायचे होते.

पोरगी शेवटी बापावर गेलेली.

रोजचे रूटीन सुरू झाले. स्मिताचा मुंबईला ससून हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ साठी नंबर लागला.

कॉलेज जवळच हॉस्टेल होते.स्मिता चे लेक्चर सुरू झाले, तिथले डीन प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ ऋषी सुधाकर पांडे त्यांना लेक्चरल होते.

दोन वर्ष US ला राहून ऋषी पुन्हा भारतात आला होता. रीमा ने घराची किल्ली सोसायटीच्या सेक्रेटरी कडे देऊन ठेवली होती.

तो अजूनही आपल्या जुन्या घरात. रीमा च्या आठवणी सोबत राहत होता.

गायनॅक करणारे सगळेच विद्यार्थी खुप खुश होते. कारण ऋषी सरांच्या हाताखाली शिकलेला विद्यार्थी एक्स्पर्टच व्हायचा.

हळू हळू स्मिता सरांची खूप लाडकी विद्यार्थिनी झाली. कारण ती अभ्यास, प्रॅक्टिकल सगळे मनापासून करायची.

ऋषीला स्मिता रीमा पांडे म्हणजे नक्की ही आपलीच मुलगी आहे असे वाटायचे. पण थोडेफार कानावर आलेले की तिचे बाबा इंजिनिअर होते. नक्कीच ही दुसरी आहे, नावात फक्त साम्य.

मग तो विचार करायचा,

स्मिता कडे माझे मन सारखे ओढल्या का जाते?

का तिची सतत काळजी वाटते?

एकदा मनात विचार यायचा स्मिताला तिच्या फॅमिली विषयी बोलावे का ?

नको, इतके वर्ष थांबलो अजून काही वर्ष थांबू या. स्मिता कडे विशेष लक्ष देऊ या. ती टॉपर यायलाच पाहिजे. माझ्या सारखी ती सुध्दा प्रसिद्ध डॉक्टर म्हणून नावारूपाला यायला हवी.

परीक्षा जवळ आली की ऋषी ला खूप टेन्शन यायचे .

स्मिता पेपर नीट सोडवेल न !

तिला ते जाणवायचे, म्हणायची सर माझा जवळपास सगळा अभ्यास झाला आहे.

सर तुमची ही विद्यार्थिनी टॉपर येणार. आपल्या गुरूची मान ताठ ठेवणार.

विश्वास आहे मला.

पण काळजी वाटते ग !

माझी लाडकी विद्यार्थिनी नक्की अव्वल यायलाच हवी.

स्मिता मला खात्री आहे. तू या पेशात आपला वेगळा ठसा नक्की उमटवणार.

सर तुमच्या इतका नक्की नाही. नाही ग, तुला माझ्यापेक्षा ही अव्वल बघायचे आहे.

बघता बघता तिचे MD झाले. राज्यात टॉपर आली.कॉलेज ने सत्कार करायचे ठरवले.

तिचा आणि कॉलेजच्या पहिल्या तीन टॉपरचा सत्कार . आठ दिवसांनी सत्काराची तारीख ठरली.

स्मिताने खूप आग्रह करून रीमा ला बोलवून घेतले. सत्कार करायला शिक्षण मंत्री आले होते. ऋषी समोर सोफ्यावर बसला होता.

सर्वात आधी स्मिता चे नाव घेतले. स्मिता स्टेज वर आली.

सत्कारासाठी मंत्री महोदय स्टेजवर आले.

स्मिता म्हणाली, सर माझी एक विनंती आहे. हा पुरस्कार घेताना माझी आई स्टेज वर असावी असे मला वाटते.

मिसेस रीमा पांडे प्लिज स्टेज वर या.

रीमा स्टेज वर आली.

ऋषी आ वासून फक्त बघत राहिला.

भानावर आला, रीमा ! माझी रीमा ! रीमा किती शोधले ग तुला ? कुठे होतीस ?

स्मिताला पाहून मला वाटायचे ती माझी मुलगी असेल का? का सारखे तिचेच विचार डोक्यात असतात. तिच्या स्पर्शात मला वात्सल्य का जाणवते ? इतका आपलेपणा का वाटतो? आज सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले रीमा.
रीमा तू माझे स्वप्न पूर्ण केले. लेकीला गायनॅक करायचे.

ऋषीचे डोळे नकळत पाणावले.

रीमा मला माफ करणार नाही. खूप स्वाभिमानी आहे ती. पण स्मिता, नक्की तिला convince करेल. बाबा म्हणून नक्की माझा स्वीकार करेल.

कार्यक्रम संपला, ऋषीने स्वतःच्या मनावर खूप ताबा ठेवला. स्वतःला रीमा पासून दूर ठेवले.

रीमा दुसऱ्या दिवशी गावी गेली. स्मिता मात्र थांबली होती. अर्थात ऋषीने तिला निरोप दिला होता. थोडे बोलायचे आहे. जायची घाई करू नको.

दुसऱ्या दिवशी स्मिता ऋषी ला भेटायला आली.

सर थांबायला सांगितले, काही महत्वाचे काम?

रीमा चल बाहेर जाऊ, खूप महत्वाचे बोलायचे आहे. दोघे हॉटेल मध्ये गेले.

स्मिता एक विचारू ?

विचारा न सर.

अगदी खर सांगशील.

हो सर !

तुझ्या बाबांचा फोटो वगैरे तू कधी पाहिला का ?

नाही सर !

ते खरच इंजिनिअर होते का ?

मी तरी असेच ऐकले

कुणी सांगितले.

आजीने !

आजी कोण ?

आईची आई !

अच्छा !

तू आईला कधी विचारले नाही का ?

एकदोन वेळा विचारायचा प्रयत्न केला. पण तिला खूप त्रास व्हायचा हा विषय काढला की .

म्हणून मी तिला त्या बद्दल कधीच विचारले नाही.

अजून काय सांगितले, हेच की माझे बाबा इंजिनिअर होते. पण लग्नाच्या आधी दोघांच्या हातून चूक झाली आणि आई गरोदर राहिली. बाबांना हे मान्य नव्हते. ते म्हणाले हे बाळ काढून टाक ! आपण लग्न करू, मगच आपल्याला बाळ होणार. हे बाळ माझे असेल तरी लग्नाच्या आधी हे मला मान्य नाही.

आईचा निर्णय पक्का होता. तिने सांगितले काही झाले तरी हे बाळ मी काढून टाकणार नाही.

मग ते कुठे गेले काही माहिती नाही.

घरी कोण असते. मी, आजी आणि आई.

आजी !

कसं शक्य आहे !

का ?

काय झाले सर ?

रीमा त्या आजी कधीपासून आहेत तुमच्या घरी. मी तर माझ्या जन्मापासून पाहते.

पण तुम्ही आज अचानक इतकी चौकशी का करताय?

कारण ! कारण स्मिता तुझा बाबा कोण आहे तुला माहित आहे ?

कोण आहे सर !

तुम्हाला माहित आहे माझे बाबा !

हो स्मिता !

सर प्लिज मला माझ्या बाबांकडे घेऊन जाल !

नक्की घेऊन जातो. पण मला सांग तुला बाबांना का भेटायचे आहे ?

ज्या व्यक्तीने मला जन्माच्या आधीच नाकारले. माझ्या आईला एकटीला अशा अवस्थेत सोडून गेले. त्या पित्याला जाब विचारायचा आहे सर !

आणि !

आणि काय स्मिता ?

सर !

एकदा त्यांना बाबा म्हणून हाक मारायची आहे !

बाबा म्हणायला माझी जीभ, आणि बाबा बघायला माझे नेत्र आसुसले आहे.

स्मिता तुझे बाबा भेटल्यावर, तुला खरे काय कळल्यावर माफ करशील तुझ्या बाबांना !

ते तर वेळच ठरवेल सर !

मग तू तुझ्या आईला अगदी खरे खरे सांगायला सांग तुझ्या बाबांबद्दल.

सर !

तुम्ही हे काय बोलता !

स्मिता !

तुझा दुर्देवी बाप मी आहे बेटा.

तू स्मिता रीमा ऋषी पांडे. माझी मुलगी आहे. ते सुध्दा आमच्या दोघांच्या प्रेमाचे प्रतीक. तू अनौरस नाही बाळा. आमचे लग्न झाल्यावर दोन वर्षाने तू झाली !

काय ?

हो बेटा!

सर मग तुम्ही कुठे होते?

तुम्ही आईला का सोडले ?

शांतपणे ऐक, मी जे सांगतो त्यातील शब्दनशब्द खरा आहे. हवे तर तू तुझ्या आईला विचार.

मग त्याने आपली सर्व स्टोरी तिला सांगितली. कशा प्रकारे त्याच्या हातून चूक झाली ते सुध्दा सांगितले .

काय ?

हो!

चल आपण माझ्या घरी जाऊ.

मग ते दोघे ऋषी च्या घरी गेले. बेडरूम मध्ये रीमा आणि ऋषीचे खूप वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो होते. मग त्याने लग्नाचा अल्बम दाखवला.

त्याच्या लक्षात आले, म्हणाला स्मिता ह्या बघ तुझ्या दोन्ही आजी आणि हे दोघे आजोबा.

सर ! पण यातली आजी आमच्या घरी नाही. 

नसणार बेटा, ते चौघे एका कार accident मध्ये मरण पावले.

मग ह्या आजी कोण !

तू लहान होती. तुला सांभाळायला ठेवली असेल. त्यांना कुणीच नसेल तर रीमा ने त्यांना सहारा दिला असेल. खूप प्रेमळ आहे तुझी आई

आई, आजीला आईच म्हणते. त्यामुळे मला कधी तसे जाणवले नाही.

बरोबर आहे.

आता तू गावी जा .आजीला विश्वासात घेऊन खरी खरी माहिती घे. मगच रीमाला विचार.

पण सर !

स्मिता !

आता सर नाही !

बाबा म्हणायचे !

तुला काय जाब विचारायचा आहे तो विचार. मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतो.

स्मिता !

खरतर ती मेरी मला म्हणाली होती. ऋषी तू तुझ्या बायकोला या बद्दल काही सांगू नको. मी तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही. त्यामुळे तिला तिकडे काहीही कळणार नाही. पण मी जी चूक केली ती मुद्दाम नाही केली. चुकून सगळे घडले. 

त्यामुळे रीमा मला समजून घेणार असे वाटले. शिवाय तिला सांगितले नसते तर मला कायम अपराध्या सारखे वाटले असते. पण माझ्या सांगण्याचा माझ्या संसारावर विपरीत परिणाम झाला. माझी रीमा आणि माझी मुलगी माझ्या पासून दूर गेली.

पण सर!

बाळा आता तू आम्हा दोघांना एकत्र आणणार, कायमचे.

मी रीमा पासून कधीच दूर नव्हतो. रीमा कायम आठवणीच्या रूपात माझ्या सोबत होती.

हो सर!

आता आईला आणि तुम्हाला एकत्र आणायची जबाबदारी माझी.

सर नाही, बाबा !

हो !

हो !

बाबा!

स्मिता !

बाबा!

तिने बाबा म्हणून त्याला मिठी मारली.

तो आपला हात तिच्या डोक्यावरून फिरवत राहिला.

स्मिता !

बाबा !

बाबा !

स्मिता !

बस इतकेच ऐकू येत होते, आणि दोघांचे आनंदाश्रू ओघळत होते.




©️ सौ. प्रभा कृष्णा निपाणे

सदर कथा लेखिका सौ. प्रभा कृष्णा निपाणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने