© वर्षा पाचारणे
"तायडे, आज संध्याकाळी गावातल्या पाटलाकडं बांगड्या भरायला जायचंय. सांच्याला येताना जरा उशीर व्हईल... तवर तू सैपाक पाण्याचं काय असंल ते बघून घे... अण्णा येतीलच तवर घरी... आठ साडेआठ पर्यंत येईन मी", असं म्हणत मंजी कपडे धुवायला बाजूच्या ओढ्यावर निघून गेली.
मंजी... गावातली कासारीण... मंजीची सासू याआधी अनेक वर्ष गावात बांगड्या भरायचा व्यवसाय करत होती.. गावात कुणाचंही लग्न असलं, तरीही मंजीच्या सासूला बोलावणं असायचंच..

नवरीच्या चूड्यापासून येणाऱ्या जाणाऱ्या बायकांच्या आणि छोट्या छोट्या करवल्यांच्या हातातही बांगड्या भरण्याचं काम करताना मध्येच काहीतरी गमतीशीर गाणी गुणगुणायची तिच्या सासूला सवयच होती. बायकांना देखील तिच्या या विनोदी स्वभावामुळे मजा वाटायची...
मंजीची सासू वयोमानाप्रमाणे थकल्यामुळे आता तिला घरोघरी जाऊन बांगड्या भरणं शक्य नव्हतं... सुरुवातीला केवळ मंजीला सोबत म्हणून नेणारी मंजीची सासू आता नवरा गेल्यापासून घरातलं सारंकाही सांभाळत होती आणि सासूच्या हाताखाली बांगड्या भरायला शिकलेली मंजी आता सराईताप्रमाणे लग्नांमध्ये कुणाच्याही हाताला काच न लागता बांगड्या भरून देण्याचे काम करत होती.
मंजीचा नवरा एका मुकादमाच्या हाताखाली रस्त्यावरचं गवत काढणं, गटारी साफ करणं ही काम करायचा... मंजी, तिचा नवरा सहादू, सासू आणि मंजीची लेक चंदा गावच्या ओढ्याच्या बाजूच्या चाळीतल्या दहा बाय दहाच्या खोलीत राहायचे.

एकुलत्या एक लेकीसाठी जास्त काही करता येणार नसलं, तरी तिच्या लग्नाची हौस मात्र मंजीला जबरदस्त होती.. इतरांच्या लग्नात आया लेकींसाठी जीव ओवाळून टाकतात, लागल तेवढ्या वस्तू खरेदी करून देतात, लेकीला काय हवं नको ते कमी पडायला नको म्हणून जिवाचं रान करतात, तसं सारं काही मंजीलाही करायचं होतं.
त्यासाठी येणाऱ्या पैशातून कवडी रेवडी बाजूला साठवत तिने चिरीमिरी करत दीड-दोन तोळे सोनं जमवून ठेवलं होतं.
"मंजे, आज सांच्याला घरला ये बरं का बांगड्या भरायला.. लेकीचं लगीन हाय परवा.. तुला सांगून तशीच पुढं बायकांना बोलवायला जाते"... असं म्हणत पाटलांची वैशाली लेकीच्या लग्नाचं निमंत्रण देऊन निघून गेली.
'चला, आज तरी चार पैसे पदरी पडणार', असं म्हणत मंजीने घरातल्या कामांची पटापट आवराआवर करून लेकीवर संध्याकाळची स्वयंपाकाची जबाबदारी टाकुन म्हातारीकडं लक्ष ठेवायला सांगितलं.

वयोमानामुळे आज-काल म्हातारीला गरगरल्यासारखं होऊन अंगात कणकण जाणवू लागली होती... त्यामुळे वेळच्यावेळी खाणं पिणं देऊन थोडा आराम केला की तेवढेच तिच्या जीवाला जरा बरं वाटायचं.
मंजी एखाद्या लहान लेकराप्रमाणे सासूची काळजी घ्यायची.
"मंजे, रातच्याला जरा जपून ये.. रस्त्याला चोरा चिलटांचं भ्या वाढलंय... तशी तु खमकी हायेस, पण जरा काम लवकर उरकून ये"... म्हातारीची काळजी शब्दांतून व्यक्त होत होती...
"तुम्ही काय बी काळजी करू नका... म्या ही गेली अन् हि आली".. असं म्हणत मंजीने सासूच्या अंगावर गोधडी टाकली... नवरीचा चुडा, इतर बायकांच्या हाताच्या गाळ्याप्रमाणे बांगड्या, म्हाताऱ्यांसाठी अंजिरी, तपकिरी रंगाच्या बांगड्या, चिमुरड्यांसाठी काचेच्या हिरव्या आणि चंदेरी सोनेरी बांगड्या असं सारं एका मोठ्या थैलीत घेऊन मेंदीचे दीड दोन डझन कोन दुसऱ्या कप्प्यात टाकून ती निघाली.

बांगड्यां बरोबर मेहंदी, नेलपेंट असलं सामान देखील ती आजकाल घेऊन जात होती.... एकाला एक जोडून सामान असलं, की पैसा पण थोडा जास्त मिळत असल्याने तिने आजकाल ही शक्कल लढवली होती.
संध्याकाळी चार वाजता मंजी पाटलांच्या वाड्यावर पोहोचली... एकीकडे हळद दळायचं काम सुरू होतं... बांगड्या भरण्यासाठी वाड्यावर सगळेच मंजीची आतुरतेने वाट पाहत होते.

मंजी वाड्याच्या दारातून आत शिरताच चिल्यापिल्यांनी किलकिलाट केला.. 'कासारीण आलीssss, कासारीण आलीssss', म्हणत वाड्यातल्या मालकीणबाई पर्यंत बातमी पोहोचली.
हळद दळणाऱ्या बायकांच्या जवळच एका कोपऱ्यात मंजीसाठी सतरंजी टाकून पाटलीण बाईने तिची व्यवस्था केली. मंजीसाठी एक फक्कड चहा आणून, तिने "बांगड्यांचा जो काही हिशोब होईल तो लिहून ठेव", असे सांगितले. चहाच्या घोटाने मंजीला जरा तरतरी आली.
"चला गं, आया बायांनो, कोण बसतंय पहिलं बांगड्या भराया? असं म्हणत सासूच्या स्टाईलमध्ये तिने गाणी गुणगुणायला सुरुवात केली.

'पहिली जी बसती, तिनी उखाणा घ्यायला लागतोय', असं म्हणत तिनं वरमाईलाच बसायचा आग्रह केला.
"अगं, मी काय घरचीच आहे... या पाहण्या रावळ्यांचं आधी होऊ दे, मग मी बसेल"... असं म्हणत पाटलीण बाईने एकेका बाईला बोलवून चांगल्या हातभर बांगड्या घालण्याचा आग्रह केला... सगळं काम पूर्ण होईपर्यंत रात्रीचे आठ वाजलेच.

पुन्हा शिल्लक राहिलेल्या बांगड्या थैलीत भरून, फुटलेल्या बांगड्यांच्या काचा गोळा करून मंजी पाटलीणबाईंकडून पैसे घेऊन नवरीला आशीर्वाद देऊन घराकडे निघाली.
अंधारा कोंधाराची तरातरा चालत मंजी घरी पोहोचली... ती येईपर्यंत तायडीने स्वयंपाक करून ठेवला होता.. जास्त पैसे मिळाल्याने मंजी देखील खुश होती..
"बरंका तायडे, त्या वैशालीने लेकीला असा काय भारी मोरपंखी रंगाचा शालू घेतलाय... म्याबी तुझ्या लग्नात तसाच शालू घेणार हाय बघ तुला", असं म्हणत मिळालेल्या पैशातले थोडे पैसे काढून तिने एका छोट्या बटव्यात ठेवून दिले.
एक दिवस मंजीचा नवरा रस्त्यावरचं गवत, काटे कुटे साफ करत असताना मुकादम त्याच्यावर विनाकारण खवळला... "ए म्हाताऱ्या, नसंल काम करायचं तर सांग.. उद्यापासून घरी बसायचं", असं म्हणत त्याने 'आजच्या दिवसाचा पगार मिळणार नाही', असं सांगत सहादूला घरी जायला सांगितलं..
"साहेब, काहीतरी पायाला डसल्यासारखं वाटलं"... असं म्हणून सहादू मटकन खाली बसला...
"काय डसलं बिसलं नाय... ही तुमच्या लोकांची नाटकं असतात, काम नको करायला म्हणून", असं म्हणत मुकादमाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो निघून गेला..
थोड्यावेळाने सहादू लंगडत लंगडत घरी आला.. त्याच्या अंगात सणकून ताप भरला होता.. मंजीने त्याला लगेच गावातल्या सरकारी दवाखान्यात नेलं..
"डॉक्टर साहेब, कायतरी पायाला डसल्यासारखं वाटलं.. गवतात साप बिप होता का काय, ते दिसलं नाय".... एवढं बोलून सहादू धाडकन जमिनीवर कोसळला.. त्याचं अंग थरथरत होतं... जीव तळमळत होता.. अशातच दोन मिनिटाच्या या प्रकारात त्याचा जीवघेणा अंत झाला.

मंजी जागच्याजागी धाडकन कोसळली... नवऱ्याचा हा असा अंत पाहून तिची शुद्ध हरपली... डॉक्टरांनी पाणी शिंपडून, तिला हलवून थोडे भानावर आणले.. पण समोर नवऱ्याचं असं निष्प्राण शरीर पाहून तिचं मन मात्र काही केल्या शुद्धीवर येण्यास तयार नव्हतं.
गावात बातमी पोहोचली... 'मंजी कासारणीचा नवरा गेला', हे समजताच सारा गाव लोटला... या धक्क्यातून सावरायला तिला दोन-चार महिने लागले... पण मागे राहिलेल्या म्हातारीसाठी आणि पोटच्या लेकीसाठी कष्ट करणं गरजेचं होतं.

दुःख बाजूला सारून तिने नव्या जोमाने कष्ट करण्याची तयारी दाखवली... पण आता गावात सण-समारंभ असलं तरीही मंजी कासारणीकडे बांगड्या भरण्यासाठी होणारी गर्दी कमी नव्हे, तर बंदच झाली होती.
'विधवेकडून कशा बांगड्या भरून घ्यायच्या?', हा गावातला समज मोडीत आणण्यास ती असमर्थ होती... 'ही परिस्थिती अशीच राहिली तर मरायची वेळ येईल', हे जाणून तिने आठवडी बाजारात एक दिवस गोणपाटावर बांगड्या मांडून त्या विकण्याचा प्रयत्न करून पाहिला... परंतु तिथेही लोकांचा तसाच प्रतिसाद मिळाल्याने आता मात्र तिच्या विचारांची गर्दी वाढत चालली होती.
'हा असाच प्रकार चालू राहिला तर जगायचं कसं?'..... उपाशी मरायची वेळ यायच्या आधी काहीतरी हात पाय हलवायलाच लागणार होते.
आठवडी बाजारातून घरी येताना तिने मनाशी एक निश्चय केला.. 'उद्यापासून दुसऱ्या गावात जाऊन बांगड्या विकून बघुयात', या विचाराने तिने दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सारे सामान थैलीत भरून चंदिला म्हातारीकडं लक्ष देण्यासाठी सांगितलं आणि ती एसटी स्टँडवर पोहोचली.

गावातली लोकं केवळ आता गप्पा मारण्यापूरती ओळख दाखवत होती.. पण लग्नसमारंभात मात्र मंजीला आधी सारखं स्थान नव्हतं... 'नवरा वारला त्यात तिची काय चूक?'.... 'नवरा वारला म्हणून जगणं सोडायचं का?', असे अनेक प्रश्न तिच्या मनात पिंगा घालत होते.
लोकांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करत घेतलेल्या निर्णयाशी ठाम राहत तीने एसटी पकडली.. बाजूच्या गावात जाऊन तिने रस्त्याच्या कडेला सतरंजीवर आपलं तात्पुरतं दुकान थाटलं... येणाऱ्या जाणाऱ्या बायका बांगड्यांची किंमत विचारून निघून जात होत्या.. 'पहिलाच दिवस असल्याने लगेच गिऱ्हाईक येईल अशी आशा करणे चुकीचे', या विचाराने ती दिवसभर उन्हातान्हात बसून राहिली.
तितक्यात बाजूने जाणाऱ्या दोन म्हाताऱ्यांचं बोलणं तिच्या कानावर पडलं..
"बया, ही तर विधवा दिसती"... "पोटापाण्यासाठी धंदा करायचा म्हनलं तरी घालणारीनं हिच्याकडून बांगड्या घालून घेतल्या पाहिजेत ना"... असं म्हणत तिच्या रिकाम्या गळ्याकडे आणि पांढऱ्या फट्ट कपाळाकडे एक वक्रदृष्टी टाकत त्या म्हाताऱ्या निघून गेल्या.
'म्हणजे आज पासून हा जीवघेणा प्रवास यापुढेही सहन करावा लागणारच का काय?', या विचारात तिनं सामानाची पुन्हा एकदा बांधाबांध केली. एसटी स्टँडपर्यंत चालत जाताना तिच्या मनात शेकडो विचार येत होते..

लेकीच्या लग्नाची किती स्वप्नं बघितली होती... म्हातारीला या वयात तरी चांगलं चुंगलं करून खायला घालीन, सुखात ठेवीन असा विचार होता... म्हातारपणात नवऱ्याबरोबर निवांत जगणं अनुभवता येईल, ही सारी स्वप्नं धुळीला मिळाली होती.
जगण्याची लढाई एकटीने लढावी लागेल, असा कधीही विचारही न केलेली मंजी एसटी स्टँडवर येऊन शून्यात नजर लावून एका बाकड्यावर बसली.. पोटात अन्नाचा कणंही नव्हता अन् डोक्यात विचारांचा भुंगा स्वस्थ बसू देत नव्हता... 'परिस्थितीचे काळे ढग जणू चारी बाजूंनी दाटलेत', असं वाटत होतं.
मंजीच्या डोळ्यासमोरून गावाकडे जाणार्या दोन एसटी आल्या आणि निघूनही गेल्या तरीही तिचं लक्ष नव्हतं.. घरी गेल्यावर आपल्या वाटेकडे आशेने डोळे लावून बसलेली लेक तिला डोळ्यासमोर दिसू लागली.

आपल्या काळजीपोटी थकलेली म्हातारी अजूनही कासाविस असेल, हे तिला मनातून जाणवत होतं... मोडकळीला आलेलं घर यंदाचा पाऊस झेलू शकणार नव्हतं, हे ती जाणून होती.
यंदा तरी लेकीचं लग्न व्हायलाच पाहिजे, नाहीतर वय वाढत जाईल, हे तिलाच नव्हे तर समाजालाही आता दिसू लागलं होतं. न सुटणाऱ्या समस्यांवर काय तोडगा काढावा, हे मात्र सूचता सुचत नव्हतं..
मग मात्र मंजीने मनातल्या मनात काहीतरी ठरवलं... 'उद्यापासून मी पुन्हा याच गावात बांगड्या विकण्यासाठी येईल, पण गळ्यात हयात नसलेल्या नवर्याच्या नावाची पोत , आणि टिकली लावून'.. या विचारात गर्दीने तुडुंब भरलेल्या एसटीत मंजी चढली आणि एका क्षणात डोक्यातली विचारांची गर्दी नाहीशी झाली.

एसटीतून उतरून आता घराकडे पावलं तरातरा निघाली होती... दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तिने बांगड्या, नेलपेंट असं सारं सामान भरलं आणि एसटी स्टँडवर पोचली. दुसऱ्या गावात गेल्यावर खाली उतरायच्या आधीच तिने गळ्यात काळ्या मण्याची पोत आणि कपाळाला हळद कुंकवाची बोटं टेकवली.
सकाळचे नऊ- साडेनऊ झाले होते... आज त्या गावचा आठवडी बाजार भरला होता.. मंजीने सगळं सामान गोणपाटावर मांडलं... दुपारपर्यंत बऱ्यापैकी नेल पेंट, मेहंदीचे कोन विकले गेले होते.

तिच्याकडच्या हिरव्या, रंगीत काचेच्या बांगड्या बघून बायका गर्दी करू लागल्या होत्या... मंजी आपल्या गोड बोलण्याने, आणि ती किती वर्ष हा धंदा करते, हे सांगत बोलबच्चनगिरीने बायकांना बांगड्या घेण्यासाठी भाग पाडत होती.
बायका भावात खळखळ करणार, हे माहीत असल्याने, आधीच दोन रुपये जास्त सांगून मग दोन रुपये किंमत कमी केल्याचं दाखवत तिने आज बर्यापैकी मिळकत केली होती.
सूर्यास्ताच्या वेळेस मावळत्या सूर्याला नमस्कार करून मंजीने आपलं सारं सामान पुन्हा एकदा पिशवीत भरलं आणि आज मोठ्या खुशीने ती एसटी स्टँडकडे निघाली... स्टॅन्डवर पोहोचताच एसटी आल्याने ती घाईघाईने एसटीत चढली..
एसटीतून उतरून तरातरा पुन्हा तिची पावलं आज खुशीत घराकडे वळली... 'अशाच प्रकारे जर रोज थोडा तरी धंदा झाला, तरी लेकीसाठी बघितलेली सगळीच स्वप्नं सत्यात उतरतील', याची आता तिला थोडी तरी आशा वाटू लागली होती.

मोठ्या खुशीत तिने घरात पाऊल ठेवलं.. सुनेची काळजीने वाट पाहत बसलेली म्हातारी थरथरत्या पावलांनी पुढे आली.. मंजीच्या कपाळाला लागलेलं कुंकू आणि गळ्यातली काळी पोत लपून राहिली नाही.
'एसटीत बसल्यावर या दोन्ही वस्तू परत पिशवीत ठेवेल', असे ठरवलेली मंजी घाईघाईत एसटीत चढल्याने गळ्यातली पोत काढायची विसरूनच गेली...
"तू हातपाय धू, तवर मी तुझ्यासाठी चहा ठेवते", असं सांगायला आलेली चंदा अर्धवट बोलणं थांबवत आईकडे पाहातच राहिली.

"काय गं चंदे, असं भूत बघितल्या वानी काय बघतीया... अगं आज लय बांगड्या विकल्यात... आज लय महिन्यांनी आपल्या बटव्यात परत एकदा तुझ्या लग्नासाठीचे पैशे साठवून ठेवणार हाये बघ"... असं म्हणत मंजी हातपाय धुवायला मोरीत शिरली.
भिंतीवर लटकलेल्या आरश्याकडे नजर जाताच ती मनातून ओशाळली... 'हे काय केलं मी?... म्हातारी आणि चंदी माझ्याबद्दल काय विचार करत असल... मी गळ्यातली पोत आणि हे कुंकू आधीच पुसायला पाहिजे होतं... एसटीच्या नादात कशी विसरले मी?'... या विचाराने तिला अपराध्यासारखे वाटून गेलं.
तिने घाई घाईने गळ्यातली पोत काढून पिशवीत टाकली. तोंड धुताना कपाळावरचं कुंकू खसाखसा धुवून टाकलं... पण तिचं मन मात्र स्वतःलाच खात होतं... 'काय वाटलं असल म्हातारीला?...

तिचा लेक गेल्यानंतर 'मी कुणाच्या नावाचं कुंकू लावलं?, असं जर तिने विचारलं तर'... खरं तर काहीही चूक नसताना ओढवलेल्या परिस्थितीमुळे उचलावं लागलेलं पाऊल देखील तिला आज स्वस्थ बसू देत नव्हतं.
चंदीने आईसाठी गरमागरम चहा आणला... म्हातारी थरथरत्या पावलांनी येऊन सुनेजवळ बसली.. 'म्हातारी आता काही आपल्याला बोलल्याशिवाय सोडत नाही', या विचाराने मंजी आधीच रडू लागली..
तिला रडताना पाहून म्हातारीने मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिच्या डोळ्यातलं पाणी पुसून म्हातारी म्हणाली "अगं जगण्याची लढाई लढायची असल तर असंच तुझ्यासारखं खमकं असाया लागतय बघ... लोक काय म्हणतील, काय नावं ठेवतील हा इचार करत बसलं तर जगणं अवघड होऊन बसतंय".
"पैसं कमवण्यासाठी चाललेली तुझी धडपड म्या लय दिवस बघते... आपल्या गावात आता धंदा राहिला नाय... दुसऱ्या गावात गेलं तरी बायकांच्या नजरा खायला उठतात... त्यावर तू चालवलेली ही शक्कल नक्कीच ही परिस्थिती दूर करल बघ.
तुझा सासरा गेला तेव्हा माझी बी हीच अवस्था झाली होती... लग्नसमारंभात बांगड्या भरायला तर सोड पण साधं कुठल्या कार्यक्रमाला पण बोलवायला बायका टाळाटाळ करायच्या.
पण तवा माझ्या सोबतीला तू होती.. तू सवाष्ण असल्यानं आपला धंदा तवा कसाबसा चालून गेला.. सहादू गेला नसता, तर तुझ्या एकटीवर घराचा गाडा चालवायची येळच आली नसती.
पण आज तु ज्या हिमतीनं लेकीसाठी आन् माझ्यासाठी जिवाचं रान करतीया, ते मला दिसत न्हाय असं वाटलं व्हय गं".. असं म्हणत रडणाऱ्या मंजीचे अश्रू पुसत म्हातारीनं तिला थोपटलं..
आपल्या आईची अशीही एक खंबीर बाजू आज चंदीसमोर आल्याने तिला आईचा अभिमानच वाटत होता... 'आपण काही चुकलो', अशी थोड्या वेळापूर्वी असलेली मंजीच्या मनातील भावना कुठल्याकुठे गळून पडली होती... उलट या जगण्याच्या लढाईत सोन्यासारखी लेक आणि जीवापाड जपणाऱ्या सासूच्या रुपातला आईसारखा भक्कम आधार असल्याने तिला येणाऱ्या दिवसासाठी नवी ऊर्जाच मिळाली होती.
उद्यापासून नव्या उमेदीने लढून ती या जगण्याच्या लढाईत यशस्वी ठरणार होती...
वाचकहो, कुठल्याही स्त्रीवर जेव्हा संकट येतं, तेव्हा ती डगमगली तरीही पुन्हा त्या संकटाशी चार हात करण्याची ताकद तिच्यात मुळातच असते... वाईट फक्त एकाच गोष्टीचं की तिच्या या लढाईत समाज मात्र कायम तिच्या विरोधात उभा ठाकलेला असतो... विधवा बायकांना मिळणारी समाजातील वागणूक हे खरंतर मागासलेल्या विचारांचं लक्षण असलं, तरीही आजही बऱ्याच अंशी ते मागास विचार तग धरून टिकून आहेत हीच एक खंत...

© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.