© सौ. प्राजक्ता पाटील
गौतमी अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेली. गौतमीला दोन भाऊ होते. आई ही नेहमी आजारी असायची. वडीलही दुसऱ्यांच्या शेतावर मोलमजुरीचे काम करायचे.
तिला तिची स्वप्नं पूर्ण झालेली स्पष्ट दिसत होतं. मावशी काका आणि तिची मुलं सगळेच खुश असायचे गौतमीची प्रगती पाहून.
एवढेच नव्हे तर वर्गातील पहिला क्रमांक कधीच सुटला नव्हता. आता गौतमी सातवीत होती. आठवीची स्कॉलरशीप तिला मिळवायची होती, म्हणून ती उन्हाळ्यात गावी जाणं नकोच म्हणायची.

गौतमी मात्र अतिशय हुशार आणि देखणी ते म्हणतात ना, "चिखलात कमळ उगवते." अगदी अशीच सर्वगुणसंपन्न सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी घरात कितीही अडचणी असल्या, तरी तिचा अभ्यास हा पूर्णच असायचाच. अक्षर ही मोत्यासारखं पाहातच राहावे असे वाटायचे.
शिक्षकांची ही आवडती विद्यार्थिनी. त्यातल्यात्यात शिंदे मॅडमचा दिवस गौतमी पासून सुरू व्हायचा आणि शेवटही गौतमीच करायची. म्हणजे शिंदे मॅडम घरातली छोटी-मोठी कामं गौतमीला सांगायच्या.

शाळेच्या वेळेनंतर गौतमी शिंदे मॅडमचा भाजीपाला आणून देणे, धान्य दळून आणणे, त्यांच्या मुलांना सांभाळणे ची कामे अगदी मन लावून करत असे. मॅडम ही अगदी त्यांच्याच मुलांसारखं प्रत्येक गोष्टीत गौतमीची मदत करायच्या.
तिच्या आईच्या दवाखान्यासाठी लागणारे पैसे, भावाला शिक्षणासाठी मदत लागणार असेल तर मॅडम स्वतःहून पुढे असायच्या.
त्यांना त्या कोवळ्या जीवाची खूप कीव वाटायची. कितीही नको म्हटले तरी गौतमीला स्वतःहून मॅडमच्या सोबत राहणे आवडायचं. त्यांच्या घरातील संस्कारी वातावरण, सगळे कसे आनंदी असायचे.

गौतमी म्हणायची, "मॅडम आपल्याला जर आनंदी, समाधानी जीवन जगायचे असेल तर त्याचा पाया शिक्षणच आहे ना हो!" शिकले की आपल्याला मान मिळतो ना समाजात.
मॅडमना खूप आश्चर्य वाटायचं! काही मुलांना घरात वातावरण असतं, आर्थिक परिस्थिती चांगली असूनही त्यांच्या मागे लागावं लागतं, 'अभ्यास कर' म्हणून पण हे एवढ्या वयात कोणी न सांगता गौतमीला आपोआप कसं सुचतं?
मॅडम म्हणाल्या, "तू विचारलंच आहेस तर सांगते, "हो आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायलाच हवं. आई शिकलेली असेल तर कुटुंबाचा विकास होतोच, कुटुंब सुधारलं की, समाजाच्या प्रगतीला आपला हातभार लागू शकतो बरं का !"
पाचवीत शिकत असणाऱ्या गौतमीने मॅडमचा आदर्श तिच्या मनात तयार केला होता. काहिही झालं तरी आपण शिकायचंय! हे तिचे ध्येय होते. तिने मॅडमच्या घरातील गोष्टीची खूप पुस्तक वाचली होती.

त्यामुळे जीवनात संघर्ष असेल तरच ती व्यक्ती इतिहास घडवते हे तिला अगदी पटलं होतं. अगदी "शिवाजी महाराजांपासून... टोकियोमध्ये वेटलिफ्टिंग मध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणारी मीराबाई चानू सगळ्यांचा आदर्श तिच्या डोळ्यासमोर होता....."
गौतमीचे ध्येय ठरलेलेच होते. पण आयुष्यात आपण जे ठरवतो ते त्याच वेळी होईल की नाही हे आपल्या हातात नसत. अचानकच शिंदे मॅडमची बदली खूप लांब झाली, उन्हाळ्याच्या सुट्ट्यातच मॅडमनी सामान शिफ्ट केलं.

त्यांनी गौतमीची चौकशीही केली, पण गौतमी तिच्या मावशीच्या गावाला पुढील शिक्षणासाठी गेली अस त्यांना समजलं. तिथे सुद्धा ती खूप मन लावून अभ्यास करायची.
गौतमीच्या मावशीचं गाव हे तालुक्याचं गाव असल्यामुळे गौतमीला येणाऱ्या प्रत्येक अडचणीचं, शंकेचं निरसन व्हायचं, मावशी ही तिचा खूप लाड करायची.
विज्ञान प्रदर्शन असो, वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा किंवा एकपात्री नाट्यप्रयोग. तालुका, जिल्हा, नव्हे तर राज्य पातळीपर्यंतच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन गौतमीचा क्रमांक ठरलेला असायचा. किती जवळ होत ना सगळं... आता माघार नव्हतीच.... पुढेच जायचंच होतं गौतमीला...
विज्ञान प्रदर्शन असो, वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा किंवा एकपात्री नाट्यप्रयोग. तालुका, जिल्हा, नव्हे तर राज्य पातळीपर्यंतच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन गौतमीचा क्रमांक ठरलेला असायचा. किती जवळ होत ना सगळं... आता माघार नव्हतीच.... पुढेच जायचंच होतं गौतमीला...
तिला तिची स्वप्नं पूर्ण झालेली स्पष्ट दिसत होतं. मावशी काका आणि तिची मुलं सगळेच खुश असायचे गौतमीची प्रगती पाहून.
एवढेच नव्हे तर वर्गातील पहिला क्रमांक कधीच सुटला नव्हता. आता गौतमी सातवीत होती. आठवीची स्कॉलरशीप तिला मिळवायची होती, म्हणून ती उन्हाळ्यात गावी जाणं नकोच म्हणायची.
मी इथेच अभ्यास करेन, असं सांगून 'अभ्यास एके अभ्यास' असं हे तिच ठरलेलंच. मावशीने ही परवानगी दिली. अचानक एके दिवशी आलेला फोन गौतमीला किती दूर घेऊन गेला तिच्या स्वप्नापासून....
तिच्या आईची तब्येत खूपच बिघडली होती, आता तिच्या आईला अंथरूणावरून उठणही अवघड झाल, म्हणून वडिलांनी सगळ्यांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून, गौतमीला गावी बोलावून घेतलं. एवढ्या नाईलाजानं अक्षरशः 'देवाने का अशी परीक्षा घेतली' असं काहीस समजून गौतमी गावी परत आली...
'हे ही दिवस जातील....' या विचाराने गौतमीने आपल्या आईची सेवा करणं, घरातील सर्व काम आटोपून वाचन, लेखन करन सुरूच ठेवल. वडील म्हणायचे, "आता याचा काय उपयोग गौतमी?"

गौतमी म्हणायची, "बाबा, तुम्हाला नाही माहित शिक्षण कधीच वाया जात नाही आज ना, उद्या मला फायदा नक्की होईल.."
"बर बाई कर.." असे म्हणून वडील तिथून निघून जायचे.
आता शेजारचे लोक बोलू लागले," मुलगी मोठी झाली, आता लग्नाचं बघा." आणि स्वयंपाक पाण्याची अडचण होत असेल, तर सुनपण आणा एकाच मांडवात दोन लग्न केली तर खर्चही वाचेल...
गौतमीला स्थळ आलं, आणि पसंतीही मिळाली. गौतमीला बाबांनी विचारलं,"तुला हे स्थळ पसंत आहे ना!"

गौतमीने एकंदर परिस्थितीचा अंदाज घेऊन, "हो, म्हटलं. गौतमीला लग्न करून ,आपली स्वप्न पूर्ण होतील असं नक्कीच वाटलं. कारण स्वतःच्या पत्नीला शिक्षित करण्यासाठी त्रास सहन करणारे ज्योतिबा फुले तिने अभ्यासले होते....
थाटात लग्न झालं. गौतमी सासरी गेल्यावर मजेत होती. एके दिवशी जेव्हा गौतमी तिच्या पतीसोबत बाहेर गेली, तिथे तिला शिंदे मॅडम दिसल्या. त्यांना पाहून दोघींच्याही डोळ्यात पाणीच आले.

तू लग्न केलंस? असं म्हणून मॅडमनी तिला मिठी मारली तिचा नवरा आश्चर्याने पाहत होता.
तो म्हणाला, "काय झालं मॅडम??" मॅडमनी दोघांनाही गाडीत बसायला सांगितलं. दोघे गाडीत बसल्यावर तिघे मिळून मॅडमच्या घरी गेले.
मॅडमनी अतिशय जपून ठेवलेला त्यांचा भूतकाळ त्यांना दाखवण्यासाठी बाहेर आणला. त्या गौतमीचं कौतुक किती करत होत्या हे त्यांच्या त्यांनाच कळत नव्हतं. आणि गौतमी तशीच होती कौतुक करण्यासारखी.
सकाळपासून आलेले दोघे सायंकाळी जाताना, गौतमीच्या नवर्याने मात्र मॅडमला वचन दिले, तो गौतमीचे स्वप्न नक्की पूर्ण करेल आणि त्याच दिवशी त्याने गौतमीचे कॉलेजात अॅडमिशन केले.

गौतमीने तिच्या नवऱ्याचे खूप आभार मानले. गौतमी बारावी सायन्स मध्ये कॉलेजात पहिली आली. एंट्रन्स पास करून तिला एम. बी. बी. एस. साठी मुंबईचे कॉलेज मिळाले. एम.बी.बी.एस. करण्यासाठी मुंबईला पोहोचली. नवऱ्याचा तर सपोर्ट होताच, पण मॅडमचीही साथ भक्कम होती.
गौतमी ने चार वर्ष मेहनतीने यश मिळवले. पुढे एम. डी. ची एंट्रन्स देऊन ती सर्जन झाली. गौतमीला तिच्या नवऱ्याचे किती आभार मानावे हेच कळत नव्हतं.

तिने तिच्या नवऱ्याला सुरुवातीला दुसऱ्या डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करणार आहे हे सांगितलं. तेव्हा गौतमीच्या नवऱ्याने मॅडमनी शहरात असलेल्या त्यांच्या जागेवर हॉस्पिटलची उभारणी करून ठेवली होती हे गौतमीला सांगितलं. दोघांनीही मॅडमची भेट घेतली.
गौतमी स्वतःला भाग्यवान समजत होती, दवाखान्याच्या उद्घाटनाच्या दिवशी मॅडम गौतमीला म्हणाल्या, "गौतमी हॉस्पिटल लहान आहे, पण तू मिळवलेले ज्ञान खूप महान आहे आणि माझी खात्री आहे तू तुझ्या ज्ञानाने रुग्णांची योग्य सेवा करून स्वतः च आणि हॉस्पिटलचे नाव खुप मोठं करशील.."

गौतमीने मॅडमचे आशीर्वाद मागून रुग्णांना योग्य सेवा देण्याच आश्वासन दिले. आज खरोखर जीवनातील हे फुललेले आनंदी क्षण गौतमीची ओंजळ समाधानाने भरत होते.
© सौ. प्राजक्ता पाटील
सदर कथा लेखिका सौ. प्राजक्ता पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.