©️ सायली पराड कुलकर्णी.
"हॅलो पोचलीस का गं व्यवस्थित? प्रवासात त्रास नाही नं झाला काही? निवांतपणे राहा गं इथली काळजी अजिबात करू नकोस आणि हं आमची आठवण आली की फोन मात्र नक्की कर हं मनु.... चल ठेवते गं." म्हणत मानसीच्या सासूबाईंनी फोन ठेवला.
मानसीला बरं वाटलं.
"चला बरं झालं सासरी गेली तरी मूळ स्वभाव बदलला नाही आपल्या मनूचा.
इतक्यात दरवाज्यावर टकटक झाली. कोण आहे पाहायला मनू उठली. पाहते तो शेजारची पूजा दारात उभी.
"अगं पूजा... कधी आलीस...?" म्हणत मनू आनंदाने तिच्या गळ्यात पडली.
"कशी आहेस मनू अगं? नवरा काय म्हणतोय तुझा? आणि काय गं मनू, काय हा तुझा अवतार...? असा हा कॉटनचा पंजाबी ड्रेस आणि कपाळावर लाल टिकली, गळ्यात हे टिपिकल वाट्यामणी असलेलं मंगळसूत्र...! काकूबाई झालेयस तू अगदी..." पूजा खिदळत म्हणाली.
"अगं पुण्यात राहतेस ना तू...? आशा आधुनिक काळात हे असले कसले कपडे वापरतेस वेडे...आणि हे मंगळसूत्र! आजकाल कोणी घालतं का?
तिला मधेच तोडत मानसी म्हणाली, " अगं पूजा जरा थांब किती रोष तुझा ह्या सगळ्यावर... शांत हो पाहू. आईनं मस्त चहा टाकलाय तो घेऊया आणि चल गच्चीत बसून बोलूया निवांत..." मोकळ्या स्वभावाची मानसी बोलली.
"अगं हेचं की, तू जीन्स टॉप्स किंवा स्कर्ट घालायचं सोडून हे कसले आजीबाई स्टाईल पंजाबी ड्रेस वापरते आहेस! तुझ्या घरची परिस्थिती उत्तम आहे . मग तुला प्रॉब्लेम काय आहे मॉडर्न राहायला...? सासुबाई नकार देतात की काय...?" पूजाने चहाचा कप ओठाला लावत विचारलं.
"अगं अगं काय बोलतेस पूजा मला आणि जाच...? आत्ताचं माझ्या सासूबाईंचा फोन येऊन गेला अगदी निहारचा फोन यायच्या आधी त्यांचा आला.
"आणि खरंतर ना पिढ्या बदलल्या की विचारात पण फरक पडणारचं की पूजा...! मंगळसूत्र म्हणजे माझ्या सासूबाईंना सौभाग्याचे प्रतीक वाटते, माझ्या आईला वाटतं मंगळसूत्र घालुन आपण आपल्या संस्कृतीचं प्रतिनिधीत्व करतो आहोत आणि मला मात्र मंगळसूत्र एक दागिना म्हणून खूप आवडतं म्हणून मी ते वापरते.
"हे बघ पूजा, मला एव्हढचं वाटतं तू आपल्या संस्कृतीला उगीचचं झुगारून चुकीच्या गोष्टींचं समर्थन आणि प्रदर्शन करते आहेस. तू माझी जिवलग मैत्रीण आहेस म्हणून केवळ मी तुला हे बोलू शकले.
मानसीला बरं वाटलं.
लग्नाला दोन वर्ष झाली तरी नव्या नवरीसारखे जपणारे सासू सासरे, निर्मळ मनाचा नवरा आणि साधं पण सुंदर मनमिळाऊ सासर मिळाण्यानी ती स्वतःच्या नशिबावर भलतीचं खुश झाली.
उन्हाळ्याच्या सुट्टीत आठवडाभराची रजा टाकून मानसी माहेरी कोकणात आली होती.
आल्या आल्या आईच्या गळ्यात पडून "चहा टाक गं मस्त आलं घालून तुझ्या स्टाईलने" म्हणत सोफ्यावर जवळपास आडवीचं झाली.
आपल्या लेकीच्यातला अवखळपणा अजूनही असाचं आहे हे पाहून मनूची आजी आणि आई मनोमन आनंदल्या.
"चला बरं झालं सासरी गेली तरी मूळ स्वभाव बदलला नाही आपल्या मनूचा.
म्हणजे तिकडची माणसं हिला समजून घेत असतील.आणि आपली पोर म्हणजे तर शंभर नंबरी सोनं आहेचं की... एकंदरीत सुखी आहे म्हणायची सासरी..." आजी आणि आई एकमेकींत कुजबुजल्या.
इतक्यात दरवाज्यावर टकटक झाली. कोण आहे पाहायला मनू उठली. पाहते तो शेजारची पूजा दारात उभी.
"अगं पूजा... कधी आलीस...?" म्हणत मनू आनंदाने तिच्या गळ्यात पडली.
पूजा म्हणजे मनूची लहानपणीपासूनची जिवलग मैत्रीण. अगदी शेजारच्या घरात राहणारी. लहानपणी दोघी शाळेत एकत्र जायच्या. खाणंपिणं सगळं एकत्र.
पुढे शिक्षणासाठी मानसी पुण्याला गेली आणि दोघींची ताटातूट झाली. तरी फोनवर दोघी संपर्कात होत्या.
वर्षं लोटली इकडे पुजाचं लग्न तिच्या आईवडिलांनी जवळच्या शहरातल्या नामवंत पैसेवाल्या व्यापाऱ्याशी लावून दिलं. आणि मानसीचं लग्न पाटणकरांनी पुण्यातल्याचं जोशी कुटूंबातल्या सधन पण हुशार स्वावलंबी मुलाशी धुमधडाक्यात लावून दिलं.
आज एवढया वर्षांनी दोघी जिवलग मैत्रीणी माहेरच्या अंगणात भेटत होत्या.
दोघींनाही किती बोलू आणि किती नको असं होऊन गेलं होतं.
"कशी आहेस मनू अगं? नवरा काय म्हणतोय तुझा? आणि काय गं मनू, काय हा तुझा अवतार...? असा हा कॉटनचा पंजाबी ड्रेस आणि कपाळावर लाल टिकली, गळ्यात हे टिपिकल वाट्यामणी असलेलं मंगळसूत्र...! काकूबाई झालेयस तू अगदी..." पूजा खिदळत म्हणाली.
"अगं पुण्यात राहतेस ना तू...? आशा आधुनिक काळात हे असले कसले कपडे वापरतेस वेडे...आणि हे मंगळसूत्र! आजकाल कोणी घालतं का?
माझ्याकडे बघ. मी इकडे आपल्या गावाच्या जवळचं राहते. म्हणजे तशी आमची हवेली आहे पण तरीही बघ ना मी किती मॉडर्न आजच्या काळातल्या चालू फॅशन प्रमाणे रहाते.
नविननवीन फॅशनचे ड्रेस माझं रूप अजून खुलवत असतात. आणि मला काय वाटतं मनू.. आपण बायकांनीचं का बरं घालायचं हे मंगळसूत्र? मला तर बाई लोडणं वाटतं ते... आऊट ऑफ फॅशन!" पूजा एका दमात बोलत होती.
तिला मधेच तोडत मानसी म्हणाली, " अगं पूजा जरा थांब किती रोष तुझा ह्या सगळ्यावर... शांत हो पाहू. आईनं मस्त चहा टाकलाय तो घेऊया आणि चल गच्चीत बसून बोलूया निवांत..." मोकळ्या स्वभावाची मानसी बोलली.
दोघी मैत्रिणी घराच्या गच्चीवर आल्या.
पूजाच्या मनात बऱ्याचं दिवसांचं काहीतरी साचलेलं आहे हे एव्हाना मानसीच्या लक्षात आलं होतं. तिच्या भावनांना ठेच नं लागू देता तिच्या मनातला हा गुंता सोडवता आला पाहिजे म्हणून मानसी तिला एकांतात घेऊन आली होती.
"हं तर काय म्हणत होतीस पूजा" मानसीने विषयाला हात घातला.
"हं तर काय म्हणत होतीस पूजा" मानसीने विषयाला हात घातला.
"अगं हेचं की, तू जीन्स टॉप्स किंवा स्कर्ट घालायचं सोडून हे कसले आजीबाई स्टाईल पंजाबी ड्रेस वापरते आहेस! तुझ्या घरची परिस्थिती उत्तम आहे . मग तुला प्रॉब्लेम काय आहे मॉडर्न राहायला...? सासुबाई नकार देतात की काय...?" पूजाने चहाचा कप ओठाला लावत विचारलं.
"अगं अगं काय बोलतेस पूजा मला आणि जाच...? आत्ताचं माझ्या सासूबाईंचा फोन येऊन गेला अगदी निहारचा फोन यायच्या आधी त्यांचा आला.
व्यवस्थित पोहोचलीस काय असं काळजीने फोनवर विचारत होत्या. त्या कशाला बरं मला जाच करतील??
आम्ही चौघे आनंदाने एका छताखाली राहतो. दोघी मिळून स्वयंपाक करतो आणि मंगळसूत्राचं म्हंटशील तर माझं लग्नातलं मंगळसूत्र मोठं होतं.
रोज वापरायला नको वाटेल आणि चोरीला जायचाही धोका, म्हणून लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सासूबाईंनीचं हे नाजूक सुंदर मंगळसूत्र मला भेट दिलं.
आणि खरं सांगू का पूजा, ही टिकली किंवा हे मंगळसूत्र घातलं नाहीतरी मला निहार किंवा सासु सासरे काही म्हणणार नाहीत गं पण त्यांना मनात कुठेतरी वाईट वाटेल. त्यांचं मन दुखावेल.
आम्ही चौघे एकमेकांना जपतो. एकमेकांना काय वाटेल काय आवडेल ह्याचा नेहमी विचार करतो.
आणि अगं त्यांनाही माहिती आहे हल्लीच्या सुनांना मोठं मंगळसूत्र घालायला आवडत नाही म्हणून तर हा सारा खटाटोप...! " मानसी हसत हसत बोलली.
"आणि खरंतर ना पिढ्या बदलल्या की विचारात पण फरक पडणारचं की पूजा...! मंगळसूत्र म्हणजे माझ्या सासूबाईंना सौभाग्याचे प्रतीक वाटते, माझ्या आईला वाटतं मंगळसूत्र घालुन आपण आपल्या संस्कृतीचं प्रतिनिधीत्व करतो आहोत आणि मला मात्र मंगळसूत्र एक दागिना म्हणून खूप आवडतं म्हणून मी ते वापरते.
त्यात माझ्या आणि निहारच्या प्रेमाच्या आठवणीही गुंतलेल्या आहेतचं की...जसं परदेशी लोकं लग्न झाल्यावर अंगठी कायम वापरतात तसं आपल्याकडे ही पध्दत असावी...." मानसी समजुतीच्या स्वरात बोलली.
आता पुजाचा ह्या सगळ्याप्रति असलेला मगाचंचा आविर्भाव जरा बदलला होता. तिनेही ह्या सगळ्याकडे पारदर्शी नजरेने पाहायचं ठरवलं.
आता पुजाचा ह्या सगळ्याप्रति असलेला मगाचंचा आविर्भाव जरा बदलला होता. तिनेही ह्या सगळ्याकडे पारदर्शी नजरेने पाहायचं ठरवलं.
"हे बघ पूजा, मला एव्हढचं वाटतं तू आपल्या संस्कृतीला उगीचचं झुगारून चुकीच्या गोष्टींचं समर्थन आणि प्रदर्शन करते आहेस. तू माझी जिवलग मैत्रीण आहेस म्हणून केवळ मी तुला हे बोलू शकले.
आपण आधुनिक काळातल्या स्त्रिया आहोत मान्य आहे. पण आपल्याचं संस्कृतीचं अनुकरण आता परदेशातले लोकंही करू लागले आहेत.
तुझ्या नजरेत मी मागासलेल्या विचारांची, काकूबाई मुलगी असेनही पण मला छोटिशी का होईना पण टिकली लावणं, मंगळसूत्र घालणं हे सगळं पवित्र आणि प्रेमाचं बंधन वाटतं.
शेवटी कोणत्याही विवाहित स्त्रीने मंगळसूत्र घालायचं की नाही तो सर्वस्वी निर्णय तिचाचं आहे. पण ते घालणाऱ्या स्त्रिया विचारांनी मागासवर्गीय हे तू सरसकट ठरवलंस ते मला पटलं नाही." मानसी भरभरून बोलत होती.
आता पूजालाही आपल्या विचाराची लाज वाटू लागली. आपल्याचं वयाच्या मैत्रिणीच्या ठायी असणारा समजूतदारपणा, दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची वृत्ती आणि स्वभावात निरागसता असूनही तिच्या विचारात असणारी खंबीरता आज पूजाला खूप काही शिकवून गेली.
©️ सायली पराड कुलकर्णी.
©️ सायली पराड कुलकर्णी.
सदर कथा लेखिका सायली पराड कुलकर्णी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.