©️ सायली पराड कुलकर्णी
शेजारी राहणारी समृद्धी मात्र तिचं हे बोलणं ऐकून खो खो हसू लागली.
मधुलिका अपार्टमेंट मध्ये आज उत्साहाला उधाण आलं होतं. पाचव्या मजल्यावरच्या तेजसचं लग्न होऊन नवी नवरी आज लक्ष्मीच्या पावलांनी घरी आली होती.
तेजस आणि त्याचा संपूर्ण परिवार म्हणजे अक्षरशः जगमित्रचं....! नाती कशी जोडावीत आणि माणसं कशी कमवावीत हे देवधर परिवाराकडुन शिकण्यासारखं....!
तर, मंदाताईंच्या नव्या सूनबाईचा गृहप्रवेश झाला आणि देवधर परिवार सुखाच्या हिंदोळ्यावर डोलू लागला.
फ़ुलांच्या पायघड्या, सजवलेलं घरकुल आणि मनोजोगतं सासर मिळाल्याने देवश्रीसुद्धा भरून पावली होती. त्यात समजूतदार नवरा...! त्यामुळे नव्या नवरीच्या गालावरची लाली अधिकचं दाट झाली होती.
फ़ुलांच्या पायघड्या, सजवलेलं घरकुल आणि मनोजोगतं सासर मिळाल्याने देवश्रीसुद्धा भरून पावली होती. त्यात समजूतदार नवरा...! त्यामुळे नव्या नवरीच्या गालावरची लाली अधिकचं दाट झाली होती.
नव्या नवलाईचे गुलाबी दिवस भरभर पुढे सरकत होते.
नाजूक चणीची तुडतुडी देवश्री घरात नेहमी काहींना काही काम करताना दिसे. घर सजवण्याची नीट नेटकं ठेवण्याची तिला भारी हौस.
नाजूक चणीची तुडतुडी देवश्री घरात नेहमी काहींना काही काम करताना दिसे. घर सजवण्याची नीट नेटकं ठेवण्याची तिला भारी हौस.
टेबलावरच्या फुलदाणीत नेहमी फ्रेश फुलं असली पाहिजेत इथपासून ते देवघरातल्या वाती तुपात भिजवण्यापर्यंत सगळी कामं सासूबाईंच्या हाताखाली राहून तिने शिकून घेतली होती. मुळातचं मृदु आणि शांत स्वभावाच्या देवश्रीला नव्या माणसांशीही जुळवून घेणं कधी अवघड पडलंच नाही.
कमी अवधीतचं तिने सासरच्या मंडळींना आपलंसं केलं होतं. ऑफिस सांभाळून घरच्यांचा योग्य मान राखण्यात देवश्रीनं प्राविण्य मिळवलं आणि संसाराची पहिली पायरी ती यशस्वी झाली.
शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या समृद्धीशी तिची एव्हाना मस्त गट्टी जमली होती. ही समृद्धी खरंतर देवश्रीहुन सात आठ वर्षांनी मोठी होती पण देवश्रीच्या बोलक्या लाघवी स्वभावाची जादू तिच्यावरही चालली.
शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या समृद्धीशी तिची एव्हाना मस्त गट्टी जमली होती. ही समृद्धी खरंतर देवश्रीहुन सात आठ वर्षांनी मोठी होती पण देवश्रीच्या बोलक्या लाघवी स्वभावाची जादू तिच्यावरही चालली.
ताई ताई म्हणून देवश्री तिच्या मागे असे. समृद्धीच्या छोट्या अनुपची तर देवू मावशी अगदी लाडकी झाली होती. सुट्टीच्या दिवशी दोघी मिळून खरेदीला जात, भेळपुरी पाणीपुरी खाऊन निवांत घरी येत.
घरी सासुबाई सुगरण असल्यामुळे तसा तिचा ह्या नव्या स्वयंपाकघराशी डायरेक्ट संबंध अजून तरी आलाच नव्हता. कुठे काकडी चोचून दे, कुठे कणिक मळून दे किंवा अगदीचं कधी तरी भाज्या कोशिंबिरींना फोडण्या दे एवढंचं नव्या स्वयंपाकघराशी तिचं नातं.
काय व्हायचं, सकाळची ऑफिसची घाई गडबड आणि संध्याकाळी घरी येताना होणारा उशीर ह्यामुळे देवश्रीला इच्छा असूनही स्वयंपाक करता येईना.
काय व्हायचं, सकाळची ऑफिसची घाई गडबड आणि संध्याकाळी घरी येताना होणारा उशीर ह्यामुळे देवश्रीला इच्छा असूनही स्वयंपाक करता येईना.
त्यात तिला वाटायचं, आई पहिल्यापासून ह्या स्वयंपाक घरात मुरलेल्या...! आपण नवखे आपल्या हातचं चालेल का त्यांना....त्यामुळे ती तशी लांब लांबचं राहायची.
पण वरची सगळी कामं आणि जेवण झाल्यावर मागचं सगळं ती आनंदानं आवरू लागायची. सासुबाई पण तिच्या कलाने घेत होत्या.
एक दिवस मात्र गंमत झाली, काहीतरी निमित्त निघालं आणि देवश्रीच्या सासू सासऱ्यांना आठवडाभरासाठी गावाला जाणं भाग पडलं. हिने आणि तेजसने सगळं सांभाळू म्हणून त्यांना आश्वस्थ केलं आणि त्यांची पाठवणी झाली.
इकडे देवश्रीने सुरुवातीचे दोन दिवस बेसिक सगळं स्वयंपाकघरात शिजवलं. आपल्याला जमतंय हे पाहून तिचा उत्साह वाढला होता.

रोज नवनवे पदार्थ देवश्री तेजसला करून वाढत होती... रोज फोनवर आई आणि सासूबाईंना ती आपल्या नव्या नवलाईच्या स्वयंपाकाचं इत्यम्भूत वर्णनही तिखटमीठ लावून रंगवून सांगत होती.
तिचा आनंद पाहून दोघी सुखावत होत्या. बघता बघता आठवडा सरला.
तेजस आणि देवश्री अशा अचानकपणे मिळालेल्या एकांतपणाने मनाने अजूनचं जवळ आले होते. पण आता दोघांना आईबाबा परत येण्याची उत्सुकता होती.
रोज फोनवरून देवश्री सासूबाईंना त्यांचं स्वयंपाकघर आठवण काढतंय असं गमतीनं म्हणायची.
देवश्रीची किचनमधली प्रगती आणि उत्साह पाहून तेजसने तिच्या परवानगीनं आईबाबा यायच्या आदल्या संध्याकाळी आपल्या जवळच्या दोन मित्रांना आणि त्याच्या परिवाराला जेवायला यायचं आमंत्रण दिलं.
देवश्रीची किचनमधली प्रगती आणि उत्साह पाहून तेजसने तिच्या परवानगीनं आईबाबा यायच्या आदल्या संध्याकाळी आपल्या जवळच्या दोन मित्रांना आणि त्याच्या परिवाराला जेवायला यायचं आमंत्रण दिलं.
त्यानिमित्तानं सगळ्यांशी देवश्रीशी ओळख होईल आणि आईबाबा घरी नाहीत त्यामुळे सगळ्या समवयस्क मित्रांच्या बोलण्यात खुलेपणा येईल आणि मग देवश्री पण रमेल अशी त्यामागे तेजसची भावना होती.
देवश्रीने पण आनंदानं त्याला होकार दिला.
"सगळे पदार्थ घरीचं करते मला मजा वाटते आहे..." असंही तिनं त्याला सांगितलं. खरंतर हे असं सगळं एकटीने करण्याची ही तिची पहिलीचं वेळ होती.
"सगळे पदार्थ घरीचं करते मला मजा वाटते आहे..." असंही तिनं त्याला सांगितलं. खरंतर हे असं सगळं एकटीने करण्याची ही तिची पहिलीचं वेळ होती.
सासूबाई घरी नव्हत्या पण कमावलेला बऱ्यापैकी अनुभव तीच्या गाठीशी होता. त्यावरचं देवश्रीनं बटाट्याचे पराठे आणि गोडाचा शिरा असं साधंच करायचं तिने ठरवलं होतं.
ठरवल्याप्रमाणे ती तेजसला घेऊन मंडईतून सामान घेऊन आली.
पण थोड्याचं वेळात काहीतरी बिनसलं... आपल्याला एकटीच्यानं हे जमत नाहीये आणि आता वेळही कमी आहे हे लक्षात आल्यावर मात्र आता तिची पाचावर धारण बसली.
स्वयंपाक घरातल्या वस्तू अंगावर येतात का काय असं तिला वाटून गेलं.
जेमतेंम दोन एक तास उरले होते पाहुणे यायला काय करावं असा विचार देवश्रीच्या मनात चालू होता.
एवढ्यात तिला शेजारी राहणाऱ्या समृद्धी ताईची आठवण झाली... "येस...! आत्ता हिचं मला मदत करेल" असं मनाशी म्हणत तिने समृद्धीकडे धाव घेतली.
टिंग टॉंगsssss टिंग टॉंग sssss देवश्री टेन्शनमध्ये येऊन समृध्दीच्या दारावरची बेल भरभरा दाबत होती.
"अगं काय झालं देवू...? तू बरी आहेस ना?" समृद्धीनं आपुलकीनं देवश्रीला विचारलं.
तिच्या ह्या शब्दांनी देवश्रीचं मगाचंपासून धरून ठेवलेलं अवसान गळून पडलं.

तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ती काहींचं बोलत नाही ते पाहून समृद्धी पुढे सरसावली... तिने हाताला आधार देऊन देवश्रीला घरात आणलं... बसवलं. पाणी दिलं. शांत केलं.
"हं आता सांग काय झालं?" आपलेपणाने समृद्धीने विचारलं.
"ताई अगं आज तेजसचे मित्र आणि त्यांच्या बायका जेवायला येणार आहेत. मी स्वयंपाकाचा घाट घातलाय पण मला वाटतं माझ्याकडून भरपूर चूका झाल्यात.
"हं आता सांग काय झालं?" आपलेपणाने समृद्धीने विचारलं.
"ताई अगं आज तेजसचे मित्र आणि त्यांच्या बायका जेवायला येणार आहेत. मी स्वयंपाकाचा घाट घातलाय पण मला वाटतं माझ्याकडून भरपूर चूका झाल्यात.
मी बटाट्याच्या पराठ्यासाठी कुकरला लावलेले बटाटे जास्त शिट्ट्या झाल्यामुळे जवळपास गाळ झालेत गं.
त्यात कुकरमधलं पाणी त्यात मिसळून गेलंय त्यामुळे आता पराठे करणं शक्यचं नाहीये ताई...!
ते बाजूला ठेवून गोडाचा शिरा करायाला घेतला पण त्यात टेन्शनमध्ये जास्त पाणी पडलंय.. आता काय करू सुचत नाहीये. तासाभरात पाहुणे हजर होतील गं...." देवश्री प्रचंड अस्वस्थ झाली होती.
शेजारी राहणारी समृद्धी मात्र तिचं हे बोलणं ऐकून खो खो हसू लागली.
जवळपास बारा वर्षं ती संसारात रमलेली मुरलेली सुगरण होती. समृद्धी हसतचं देवश्रीला घेऊन तिच्या स्वयंपाक घरात आली. "चल पाहूया काही करता येतं का..." म्हणून ओढणी कंबरेला व्यवस्थित खोचून ओट्यापाशी उभी राहिली.
समृद्धीच्या अनुभवी नजरेनं एकदा सगळीकडे पाहिलं. आणि क्षणभर विचार करून ती देवश्रीला म्हणाली ,"चल सुचली भन्नाट आयडिया....! तू असं कर पराठ्यासाठी कणीक भिजवली आहेस नं त्याच्या पोळ्या करायला घे... बाकीचं मी बघते."
तिचं आश्वासक बोलणं ऐकून देवश्रीला हायसं वाटलं. तिने पोळ्या करायला घेतल्या.
तिचं आश्वासक बोलणं ऐकून देवश्रीला हायसं वाटलं. तिने पोळ्या करायला घेतल्या.
इकडे समृद्धीनं गाळ झालेल्या बटाट्याला चांगलं कुस्करून घेतलं. कांदा उभा कापून फोडणीला घातला तो गुलाबी झाल्यावर आलं लसूण पेस्ट, टोमॅटो बारीक चिरून त्यात घातला, फ्लॉवरचे बारीक तुकडे करून त्यात टाकले आणि वरून कुस्करलेला गाळ बटाटा टाकला.
सगळं झाल्यावर मस्त गरम मसाला, कांदा लसूण मसाला, मीठ, तिखट, हळद, पाणी आणि नं विसरता गुळाचा एक बारीकसा खडा घालून रस्सा रटरटून शिजू दिला.
वरून कोथिंबीर भुरभुरली आणि मस्त झाकण ठेवून मंद आचेवर गरम राहण्यासाठी ठेऊन दिला. झकास झणझणीत रस्सा तयार होता.
निम्मी लढाई जिंकलो ते पाहून देवश्रीचा जीव भांड्यात पडला....आता दोघी मैत्रिणींची स्वारी शिऱ्याकडे वळली.
कढईत डोकावून पाहिलं तर शिरा खरोखरचं पाणीदार झाला होता. काय करता येईल ह्याचा विचार करता करता समृद्धीला एक कल्पना सुचली.
कढईत डोकावून पाहिलं तर शिरा खरोखरचं पाणीदार झाला होता. काय करता येईल ह्याचा विचार करता करता समृद्धीला एक कल्पना सुचली.
"देवू, ह्याची खीर केली तर...?" तिच्या ह्या वाक्याने देवश्रीला नं सुटणारं कोडं झटक्यात सुटलं होतं... दोघी लगबगीनं परत नव्या मोहीमेच्या मागे लागल्या. त्यांची गडबड दाराआडून तेजस हळूच बघत होता.
समृद्धीनं देवश्रीला दुधाचं आधण ठेवायला सांगितलं. एकीकडे बदामाचे पिस्त्याचे काप करू लागली.
समृद्धीनं देवश्रीला दुधाचं आधण ठेवायला सांगितलं. एकीकडे बदामाचे पिस्त्याचे काप करू लागली.
दूध उकळल्यावर पातळ झालेल्या शिऱ्यात तिनं गरमगरम दूध घातलं. वरून केशराच्या काड्या, ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर घालून मस्तपैकी खीर उकळून घट्ट करून घेतली. एकीकडे वरण भाताचा कुकर शिट्ट्या मारत होता.
समृद्धी आणि देवश्रीच्या सुग्रास स्वयंपाकाने स्वयंपाकघर दरवळून निघालं होतं.
समृद्धी आणि देवश्रीच्या सुग्रास स्वयंपाकाने स्वयंपाकघर दरवळून निघालं होतं.
मगाचचा प्रॉब्लेम आताशा ती विसरून गेली होती. वरण भात, रस्सा पोळी आणि गोडाची झकास खीर छानसा मेनू समृद्धीच्या अनुभवी हातांमुळे तयार झाला होता. तेही पाहुणे यायच्या अर्धा तास आधीच...!
देवश्री एकदम आनंदून गेली.... आधीचं निरागस निखळ हसू तिच्या चेहऱ्यावर परत विराजलं....
"ताई, थँक्स! मी कधींच तुझी ही मदत विसरणार नाही..." म्हणत समृद्धीला तिने मिठी घातली...
त्या दोघी मैत्रिणींच्या प्रेमानं दरवळलेलं मुरलेलं ते स्वयंपाकघर मनापासून हसलं....
****

वरील कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. अडचणीच्या वेळी मैत्रिणी पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात...स्वयंपाक घरात आलेल्या अडचणीच्या वेळी साथ देणाऱ्या गोड मैत्रिणींची ही चटकदार कथा.... नक्की वाचा.... कथा कशी वाटली जरूर कळवा.
©️ सायली पराड कुलकर्णी
©️ सायली पराड कुलकर्णी