© वर्षा पाचारणे
मितालीच्या नोकरीची पुन्हा एकदा सुरुवात झाली. पाळणाघरात मुलाला सोडून जाताना मितालीच्या मनाला खूप यातना व्हायच्या.
पाचवीत गेल्यावरही टीव्ही बघता बघता मुलगा लवकर जेवत नाही, म्हणून मिताली स्वतः त्याला हाताने खाऊ घालत होती.
"आज खूप दमलंय माझं लेकरू", असं म्हणत त्याचा अनेकदा गृहपाठ करून देत होती.. 'आज डब्यात दिलेली भाजी जास्त आवडत नाही ना तुला', असे म्हणत शाळेत जाताना त्याला वेगळा खाऊ घेऊन देत होती.
"अगं आई, काही होत नाही. तू उगाच काळजी करते", असे म्हणत तो पुन्हा धूम ठोकायचा.
मिहिरने मोठ्या कौतुकाने ध्रुवला कराटे क्लासमध्ये पाठवले.. पण आपल्या मुलाला लागेल, दुखापत होईल असे वाटून आईने क्लासला पाठवणे टाळले. तरी मिहीरने अनेकदा तिला समजवायचा प्रयत्न केला की , 'त्याला कणखर बनू दे, आपल्या पंखाखाली असा तो किती वर्ष वावरणार?',.. पण छे! आई ऐकेल तर शप्पथ!..
वर्षामागून वर्ष सरत होती.. ध्रुव आता दहावीत गेला होता.. स्वतःची कामे स्वतः करावी ही शिकवण कधीच न मिळाल्याने तो प्रत्येक गोष्टीत आईवर अवलंबून राहत होता.
ध्रुव अकरावीला गेला, तरीही आई मात्र त्याला तो लहान असल्याप्रमाणेच वागणूक देत होती. 'तिकडे जाऊ नको, तू पडशील, असं करू नको, तुला लागेल', अशा सूचना देत होती. नुकतंच बाहेरचं जग अनुभवू लागलेल्या ध्रुवला मात्र या साऱ्याची आता लाज वाटू लागली होती.
'आपल्या आईच्या अती काळजी आणि लाडाने आपली खिल्ली उडवली गेली', ही गोष्ट ध्रुवच्या मनाला फार लागली. एक दिवस घरी आल्यावर त्याने आईला ही गोष्ट सांगताच पुन्हा आईचे काळजीचे स्वर सुरू "अरे, तू वाईट नको वाटून घेऊ.. मी आपली रोजच्या सवयीप्रमाणे बोलून गेले. हवे तर उद्या तुझे मित्र आले की मी बोलेल त्यांच्याशी या विषयात".
आईने असे म्हणताच, आधीच वैतागलेला ध्रुव आणखीनच त्रासला. तितक्यात बाबा ऑफीस मधून घरी आले.
"पण बाबा, मला तशी संधीच मिळाली नाही. सतत मला गोंजारून, काळजी घेऊन जपताना, मी मात्र माझं बालपण जगलोच नाही.. आजवर ना कधी पडलो, ना कधी लागून खरचटून घेतलं.. कधी शाळेच्या सहलीला गेलो नाही, की कधी एकटा सायकलवर मित्रांकडे गेलो नाही.
"कॉलेजला मित्रासोबत जाताना हळूहळू मी त्याची गाडी चालवायला शिकलो.. म्हटलं होतं एक दिवस तुम्हाला गाडीवर डबल सीट नेऊन सरप्राईज देईल.
बाबांनी आईच्या खांद्यावर हात ठेवत तिला समजावण्याचा प्रयत्न केला, "हे बघ मिताली, शांत हो. तो खरंच तर बोलतोय. अगं मोठ्या झाडाच्या सावलीत छोटी झाडं किती काळ जगणार.. सूर्यप्रकाश मिळाला नाही तर ती मरूनच जाणार, एवढी साधी गोष्ट आहे.
"ध्रुवच्या जन्मानंतर नोकरी सोडण्याचा घेतलेला निर्णय हा तुझ्या करिअरच्या दृष्टीने खरंतर फार अवघड होता. त्यावेळीही मी तुला तो निर्णय घेताना खूप वेळा विचार कर ,असा सल्ला दिला होता.
"मी माझी नोकरी सोडली.. कोणासाठी?... याच्यासाठी"... "तो आजारी असताना मी दिवस रात्र याच्या उशाशी बसून राहायचे.. कोणासाठी?.. असं म्हणत आपलाच मुद्दा बरोबर आहे हे सांगण्याचा ती प्रयत्न करत होती.
"म्हणजे आता तू त्याच्यासाठी केलेल्या गोष्टींचा हिशोब मांडणार आहेस का?... अगं आई वडिलांचं कर्तव्यच असतं मुलांची काळजी घेणं.. पण त्या काळजीचा अतिरेक झाला, तर त्या मुलांचं आयुष्य फुलण्याऐवजी गुदमरू लागतं, याचीही जाणीव ठेवणं तेवढंच गरजेचं असतं.
"अहो, पण मी हे सारं त्याच्या भल्यासाठीच केलं ना.. आजवर कुठल्याही गोष्टीची त्याला कमतरता भासू दिली नाही. इतके वर्ष अगदी आईशिवाय त्याचं पानही हलत नव्हतं आणि आता कॉलेजला जायला लागल्यावर, त्याला जणू शिंग फुटली वाटतं", असं म्हणत आई तावातावाने बोलू लागली.
"लहान असताना माझी कामं तू करतेस, यामुळे मला छानच वाटायचं.. कारण त्यामुळे मला कुठलीच गोष्ट करायला लागत नव्हती. पण आता बाहेरचं जग बघताना, मी किती चुकीच्या पद्धतीने जगत होतो, हे मला जाणवू लागलं..
जणू हातातोंडाशी आलेला घास अचानक हिरावला जातो की काय, या भावनेने आईला देखील स्वतःची चूक कळली.. "यापुढे तुझ्या निर्णयामध्ये आम्ही केवळ आमचं मत देऊ, पण निर्णय सर्वस्वी तुझा असेल.
ध्रुव येऊन आईला बिलगला.. "आई मला माझी जबाबदारी स्वीकारायची आहे. तुला आणि बाबांना आनंदी बघायचं आहे. मला माझ्या पायांवर खंबीरपणे उभं राहायचं आहे.. त्यासाठी बाबा आणि तू माझ्या पाठीशी असणं खूप गरजेचं आहे.
गहिवरलेले बाबा ध्रुवकडे आले आणि स्वतःचे अश्रु पुसत, उसनं हसु आणत म्हणाले ,"अरे, रडतोस काय असा?"...
"बी अ मॅन ब्रो"... "आणि हि घे गाडीची चावी.. संध्याकाळी आईला डबलसीट घेऊन सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन ये.
"तुम्ही का म्हणून बसणार?.. डबल सीट तर मीच बसणार त्याच्या मागे गाडीवर... अजून त्याची बायको येईपर्यंत ती जागा माझ्यासाठीच राखीव आहे", असं म्हणत आईदेखील खळखळून हसली.
प्रेमाच्या अतिरेकाने मुलगा गमावण्याची दुर्दैवी उद्ध्वस्तता नशिबी येण्यापासून हे हसतं खेळतं कुटुंब वाचलं होतं.. अन् पुन्हा एकदा सुखात न्हाऊन निघालं होतं..
वाचकहो, मुलांना वाढवताना त्यांची काळजी घेणं जितकं गरजेचं तितकंच काळजीचा अतिरेक होऊ नये याकडेही लक्ष देणं आवश्यक असतं.. कारण प्रत्येक वेळेस मुलं आपल्या आधारावर जगली तर बाहेरच्या जगात वावरताना आधीच गमावलेल्या आत्मविश्वासामुळे, आणि आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याचे सामर्थ्य नसल्याने भविष्याच्या वाटेवर भरकटायला वेळ लागणार नाही.
© वर्षा पाचारणे.
केवळ चार महिन्याचं आहे बाळ'. घरातून बाहेर पडताना खरंच पाऊलच पडू शकत नाही माझं. आठ दिवसांनी कामावर जायचं आहे, या विचाराने दिवसभर डोळे पाणावतात. काय करू?.. सोडू का मी हा जॉब? की आणखी थोडी सुट्टी वाढवून घेऊ?' या विचारात मितालीची दिवसभर घुसमट सुरू होती.
आता सध्या तरी तिची आई जवळ असल्याने तिला कुठल्याही गोष्टीचा तसा फारसा त्रास जाणवत नव्हता. परंतु आईलाही गावी शेतीची कामे असल्याने पुन्हा गावी जाणे गरजेचे होते.
मितालीच्या नोकरीची पुन्हा एकदा सुरुवात झाली. पाळणाघरात मुलाला सोडून जाताना मितालीच्या मनाला खूप यातना व्हायच्या.
अनेकदा ऑफिसमध्ये उशिरा पोहोचणे, संध्याकाळी ऑफिसमधून लवकर निघणे, या गोष्टीमुळे तिला अनेकदा सक्त ताकीद दिली गेली. परिणामी तिला नोकरी सोडावी लागली.
'आता आपण आपला सारा वेळ केवळ मुलालाच द्यायचा', या विचाराने तिने नोकरी करण्याचा विचार मनातून कायमचा काढून टाकला.
दिवसामागून दिवस सरत होते. तिच्या मुलाला म्हणजेच ध्रुवला जेवताना स्वतःच्या हाताने खायची अजिबात सवय नव्हती. तो खात नाही हे पाहून मितालीही सगळी कामे बाजूला ठेवून त्याला जेवण भरवायची. अतिप्रेमाने ध्रुव मात्र अतिशय हट्टी होत चालला होता.
'एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे', अशा स्वभावाने अनेकदा तो रडून गोंधळ घालून प्रसंगी खाणे-पिणे सोडून ती गोष्ट मिळवायचा. प्रेमाचा आणि लाडाचा अतिरेक झाल्याने ध्रुव बिघडत चालला होता.
आपल्या मुलाला कुठलीही गोष्ट कमी पडू नये, याकरता अनेकदा अशक्य अशा गोष्टीही मिताली त्याला मिळवून देत असे.. ध्रुव आता चौथीत गेला होता. बुद्धीने हुशार असुनही पण आळशीपणा अंगात मुरल्याने शाळेतूनही त्याच्या अनेकदा तक्रारी येऊ लागल्या होत्या.

मितालीचा नवरा मिहीरने मात्र 'आता ही गोष्ट गंभीरपणे घेण्याची वेळ आली आहे', असे तिला समजावले. पण 'बाबा ओरडले, तरी आई आपली बाजू घेणारच', ही गोष्ट ध्रुवने चांगलीच हेरली असल्याने त्याला बाबांच्या ओरडण्याचे काहीच भय राहिले नव्हते.
पाचवीत गेल्यावरही टीव्ही बघता बघता मुलगा लवकर जेवत नाही, म्हणून मिताली स्वतः त्याला हाताने खाऊ घालत होती.
"आज खूप दमलंय माझं लेकरू", असं म्हणत त्याचा अनेकदा गृहपाठ करून देत होती.. 'आज डब्यात दिलेली भाजी जास्त आवडत नाही ना तुला', असे म्हणत शाळेत जाताना त्याला वेगळा खाऊ घेऊन देत होती.
सगळ्या भाज्या खाव्यात ही शिकवण देण्यापेक्षा, ती नको त्या सवयी नकळतपणे लावत होती. या सार्या प्रकाराने गोष्टींची किंमत कळणं तर दूरच, परंतु एक प्रकारचा आळस आणि निष्काळजीपणा ध्रुवमध्ये वाढू लागला होता..
साधं बागेत खेळताना आपला मुलगा पडेल, त्याला लागेल, म्हणत आईची सतत त्याच्यामागे धावाधाव सुरू असे. ध्रुवला मात्र मोकळेपणाने खेळण्यात मजा यायची.
"अगं आई, काही होत नाही. तू उगाच काळजी करते", असे म्हणत तो पुन्हा धूम ठोकायचा.
मिहिरने मोठ्या कौतुकाने ध्रुवला कराटे क्लासमध्ये पाठवले.. पण आपल्या मुलाला लागेल, दुखापत होईल असे वाटून आईने क्लासला पाठवणे टाळले. तरी मिहीरने अनेकदा तिला समजवायचा प्रयत्न केला की , 'त्याला कणखर बनू दे, आपल्या पंखाखाली असा तो किती वर्ष वावरणार?',.. पण छे! आई ऐकेल तर शप्पथ!..
शाळेत जाताना आपल्या मुलाला दप्तराचे ओझे झेपणार नाही, या विचाराने त्याचे दप्तर आईच्या खांद्याला लटकलेले असे. त्यावर मैत्रिणी किंवा मिहिर काही बोलायला गेला, की हिचे उत्तर ठरलेले 'या वह्या पुस्तकांचे ओझे आजकाल एवढे वाढले, की मलाच आजकाल खांदेदुखीचा त्रास सुरू झालाय, तर या मुलांची काय गत?' असे म्हणत तिचं वागणं जैसे थे.
वर्षामागून वर्ष सरत होती.. ध्रुव आता दहावीत गेला होता.. स्वतःची कामे स्वतः करावी ही शिकवण कधीच न मिळाल्याने तो प्रत्येक गोष्टीत आईवर अवलंबून राहत होता.
आंघोळ करून आल्यावर टॉवेल इतरत्र फेकला, तरी आई घर आवरताना आपल्या वस्तू जागेवर ठेवणारच आहे, ही गोष्ट त्याला माहीत होती.
त्यामुळेच स्वतः काही करण्यापेक्षा सगळी कामं आईकडून करून घ्यायची त्याला सवय लागली होती.. इतकेच काय तर दात घासण्यापूर्वी त्याच्या ब्रशवर टूथपेस्ट देण्याचे कामंही मितालीलाच करावे लागत होते. मिताली या साऱ्यालाच प्रेम, काळजी समजत होती.
ध्रुव अकरावीला गेला, तरीही आई मात्र त्याला तो लहान असल्याप्रमाणेच वागणूक देत होती. 'तिकडे जाऊ नको, तू पडशील, असं करू नको, तुला लागेल', अशा सूचना देत होती. नुकतंच बाहेरचं जग अनुभवू लागलेल्या ध्रुवला मात्र या साऱ्याची आता लाज वाटू लागली होती.
एक दिवस असेच ध्रुवचे कॉलेजचे मित्र त्याच्या घरी आले होते. थोड्या गप्पा मारून, मजा मस्ती करून त्यांचा बाहेर जाण्याचा प्लॅन ठरला.. ध्रुव पण बाहेर जाण्यासाठी तयार झाला.
आता ते सारेच निघणार, तितक्यात आई त्याला घरातील रोजच्या सवयीप्रमाणे म्हणाली,' बाहेर जाण्याआधी सू ला जाऊन ये'.. एवढ्या मोठ्या मुलाला आईने दिलेला हा सल्ला मात्र मित्रांमध्ये टिंगलीचा विषय ठरला. आता रोज कॉलेजमध्ये मुलं त्याला या विषयावरून चिडवू लागली.
'आपल्या आईच्या अती काळजी आणि लाडाने आपली खिल्ली उडवली गेली', ही गोष्ट ध्रुवच्या मनाला फार लागली. एक दिवस घरी आल्यावर त्याने आईला ही गोष्ट सांगताच पुन्हा आईचे काळजीचे स्वर सुरू "अरे, तू वाईट नको वाटून घेऊ.. मी आपली रोजच्या सवयीप्रमाणे बोलून गेले. हवे तर उद्या तुझे मित्र आले की मी बोलेल त्यांच्याशी या विषयात".
आईने असे म्हणताच, आधीच वैतागलेला ध्रुव आणखीनच त्रासला. तितक्यात बाबा ऑफीस मधून घरी आले.
या दोघांचा संवाद त्यांच्या कानावर पडला असल्याने ते स्वतःशीच हसले आणि म्हणाले ,"काळजी वाटते बाबा तुझ्या आईला तुझी. तुला फुलासारखं जपताना ती कुठे चुकते, हेच तिला जाणवत नाहीये पण". "आमच्या लहानपणी आमचे आई वडील मुलं कशी खंबीरपणे स्वतः साऱ्या गोष्टी शिकतील, याकडे लक्ष द्यायचे.. तेही दुरून.. वेळप्रसंगी सावरायला तेही तत्परतेने हजर असायचेच की.
पण प्रत्येक पायरीवर नव्हे, तर अगदी गरज पडेल तेव्हाच.. त्यामुळेच तर पोहणे, झाडावर चढणे, वेळप्रसंगी इतरांना मदत करणे, इतकेच काय स्वतः मेहनत करून नोकरी धंद्यात उत्तम जम बसवणे, या गोष्टी आमच्या आम्हीच शिकलो की".
"पण बाबा, मला तशी संधीच मिळाली नाही. सतत मला गोंजारून, काळजी घेऊन जपताना, मी मात्र माझं बालपण जगलोच नाही.. आजवर ना कधी पडलो, ना कधी लागून खरचटून घेतलं.. कधी शाळेच्या सहलीला गेलो नाही, की कधी एकटा सायकलवर मित्रांकडे गेलो नाही.
कॉलेजला गेल्यानंतर पहिल्यांदा मी एकट्याने दुकानात गेलो. रोड क्रॉस करणं असू दे, किंवा अगदी आपण मॉलमध्ये फिरायला गेलो, तरीही आजही आई माझा हात घट्ट पकडून ठेवते.. तिला दुखवायला नको, म्हणून मी कधी काही बोललो नाही. परंतु तिच्या या अवाजवी काळजीचा मला खूप मानसिक त्रास होतोय बाबा"
"कॉलेजला मित्रासोबत जाताना हळूहळू मी त्याची गाडी चालवायला शिकलो.. म्हटलं होतं एक दिवस तुम्हाला गाडीवर डबल सीट नेऊन सरप्राईज देईल.
त्याच मित्राचे बाबा स्विमिंग कोच असल्याने त्यांनी मला गेल्या वर्षभरात स्विमिंग शिकवले, तेही केवळ त्यांचा मुलगा माझा मित्र आहे म्हणून कुठल्याही फी शिवाय.
या साऱ्या गोष्टी मला तुम्हाला दाखवून द्यायच्या होत्या. मलाही तुमच्या डोळ्यातला माझ्याबद्दलचा अभिमान पाहायचा होता"... परंतु आपला मुलगा अजूनही लहानच आहे, अशी ठाम समजूत करत आईने मात्र पावलापावलावर माझ्या पायातलं असलं नसलेलं बळ घालवलं.
मित्रमैत्रिणी हसतात माझ्यावर... 'आईच कुक्कुलं बाळ', म्हणून माझी थट्टा केली जाते.. वीsssट आलाय मला या साऱ्याचा".. इतर मित्रांच्या आया त्यांच्याशी मैत्रिणीसारख्या वागतात..
त्यातल्या अनेक मित्रांच्या आया नोकरी करणाऱ्या आहेत.. त्यामुळे स्वतःच्या मुलांना पुरेसा वेळ देता आला नाही, तरी प्रत्येक वेळेस मुलांना खंबीरपणे परिस्थिती कशी हाताळता येईल हे त्यांनी योग्य रीतीने शिकवलं आहे आणि म्हणूनच आज तीच मुलं माझ्यापेक्षा अव्वल ठरत आहेत..
कमी वयात आई वडिलांचा आधार बनत आहेत आणि मी मात्र आजही तुमच्याच आधारावर जगतोय.. एखाद्या बांडगुळासारखा..
सुदृढ अपंगत्व मिळाल्यासारखं नाही जगायचं मला... माझे हात पाय धडधाकट असूनही दुसऱ्याच्या आधारावर जगताना माझ्या मनाला होणार्या यातना का नाही दिसत आई तुला?.. त्याच्या तोंडून असे हे शब्द ऐकताना आईचे डोळे पाझरत होते.
सुदृढ अपंगत्व मिळाल्यासारखं नाही जगायचं मला... माझे हात पाय धडधाकट असूनही दुसऱ्याच्या आधारावर जगताना माझ्या मनाला होणार्या यातना का नाही दिसत आई तुला?.. त्याच्या तोंडून असे हे शब्द ऐकताना आईचे डोळे पाझरत होते.
बाबांनी आईच्या खांद्यावर हात ठेवत तिला समजावण्याचा प्रयत्न केला, "हे बघ मिताली, शांत हो. तो खरंच तर बोलतोय. अगं मोठ्या झाडाच्या सावलीत छोटी झाडं किती काळ जगणार.. सूर्यप्रकाश मिळाला नाही तर ती मरूनच जाणार, एवढी साधी गोष्ट आहे.
अंड्यातून पिल्लू बाहेरच निघालं नाही, तर ते आतल्या आत गुदमरून मरणार किंवा त्या अंड्याला कोणीतरी आपल्या गरजेसाठी फस्त करणार, हे ठरलेलंच असतं.
तसंच मुलांना एका ठराविक मर्यादेपर्यंत आपल्या आधाराखाली वाढवणं अगदी योग्य आहे आणि ते गरजेचंही आहे, पण त्यांच्यातली स्वतःची क्षमताच जर जागृत झाली नाही, तर बाहेरच्या जगात वावरताना ती मुलं हरलेली दिसतात.. मुलांचं पडणं, धडपडणं , खेळता खेळता शरीराला झालेल्या जखमा, लहानपणापासून छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारं व्यवहारज्ञान, मित्रमंडळींसोबत केलेली मज्जा मस्ती हेच तर बालपण असतं.. केवळ अति प्रेमापोटी, काळजीपोटी ध्रुवचं हे बालपणच नकळत कुठेतरी हरवलं गेलंय"..
"ध्रुवच्या जन्मानंतर नोकरी सोडण्याचा घेतलेला निर्णय हा तुझ्या करिअरच्या दृष्टीने खरंतर फार अवघड होता. त्यावेळीही मी तुला तो निर्णय घेताना खूप वेळा विचार कर ,असा सल्ला दिला होता.
तुझ्या पगाराची आपल्या संसाराला गरज नसली, तरीही नोकरी करून तुझ्या शिक्षणाचा नक्कीच उपयोग होईल, हाच त्यामागचा हेतू होता. गृहिणी पद स्वीकारलं, तोही तू स्वतःहून घेतलेला निर्णय होता. मीही त्या निर्णयाचा मान राखला.
पण नंतर ध्रुव जसा मोठा होऊ लागला, तू त्याच्या प्रत्येक पावलावर त्याची ढाल बनून उभी राहू लागली. येणारं संकट त्यांच्यापर्यंत पोहोचूच नये, अशी अपेक्षा करत सतत त्याचं सुरक्षा कवच असल्यासारखी वावरू लागली.
वेळ कधीही कुणासाठीही थांबत नाही. आज ध्रुव मोठा झालाय.. काही वर्षांनी तो नोकरीसाठी दुसऱ्या शहरात राहायला जाईल, त्याचं लग्न होईल, त्याची हक्काची जोडीदार त्याला मिळेल, त्यावेळी त्याच्या आणि तुझ्या नात्यात येणारं थोडं अंतर हे मात्र तुला मान्य करावंच लागेल.. नाहीतर त्याची भविष्याची स्वप्नं पूर्ण व्हायच्या आधीच संपुष्टात यायला वेळ लागणार नाही..
"म्हणजे..? म्हणजे त्याला वाढवण्यात, घडवण्यात माझी चूक झाली, असं तुम्हाला म्हणायचं का?", मिताली आक्रस्ताळेपणाने बोलली.. आज पहिल्यांदाच तिच्यातला राग व्यक्त झाला होता.
"म्हणजे..? म्हणजे त्याला वाढवण्यात, घडवण्यात माझी चूक झाली, असं तुम्हाला म्हणायचं का?", मिताली आक्रस्ताळेपणाने बोलली.. आज पहिल्यांदाच तिच्यातला राग व्यक्त झाला होता.
"मी माझी नोकरी सोडली.. कोणासाठी?... याच्यासाठी"... "तो आजारी असताना मी दिवस रात्र याच्या उशाशी बसून राहायचे.. कोणासाठी?.. असं म्हणत आपलाच मुद्दा बरोबर आहे हे सांगण्याचा ती प्रयत्न करत होती.
"म्हणजे आता तू त्याच्यासाठी केलेल्या गोष्टींचा हिशोब मांडणार आहेस का?... अगं आई वडिलांचं कर्तव्यच असतं मुलांची काळजी घेणं.. पण त्या काळजीचा अतिरेक झाला, तर त्या मुलांचं आयुष्य फुलण्याऐवजी गुदमरू लागतं, याचीही जाणीव ठेवणं तेवढंच गरजेचं असतं.
मुलं चुकली तर हक्काने कान उघडणी करावी, पण त्यांनी सतत आपल्याच म्हणण्याप्रमाणे वागावे, ही अपेक्षा करणं चुकीचं आहे ना गं"..
"अहो, पण मी हे सारं त्याच्या भल्यासाठीच केलं ना.. आजवर कुठल्याही गोष्टीची त्याला कमतरता भासू दिली नाही. इतके वर्ष अगदी आईशिवाय त्याचं पानही हलत नव्हतं आणि आता कॉलेजला जायला लागल्यावर, त्याला जणू शिंग फुटली वाटतं", असं म्हणत आई तावातावाने बोलू लागली.
"लहान असताना माझी कामं तू करतेस, यामुळे मला छानच वाटायचं.. कारण त्यामुळे मला कुठलीच गोष्ट करायला लागत नव्हती. पण आता बाहेरचं जग बघताना, मी किती चुकीच्या पद्धतीने जगत होतो, हे मला जाणवू लागलं..
मुलं आई वडिलांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी किती खेड्यापाड्यातून शहरात येतात. कोणीही सोबत नसताना मेहनतीने उदरनिर्वाह करून शिकताना या मुलांना मी जेव्हा पाहतो, तेव्हा मी स्वतःला नशीबवान नाही तर कमनशिबी समजतो.
कारण या मुलांच्या मनगटात त्यांच्या पालकांनी अशी एक ताकद दिली आहे ज्या जोरावर ते कुठल्याही परिस्थितीत अगदी खंबीरपणे जगतात. स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व निर्माण करतात.
पण तुझ्या या काळजीच्या ओझ्याखाली दबून घुसमट होते माझी.. यापेक्षा मला जगायचंच नाही", असं म्हणत ध्रुव धावत बिल्डिंगच्या गच्चीवर गेला.. आई-बाबाही त्याच्या मागे धावले..
"बाळा, थांब. यापुढे मी तुझी कायम साथ देईल... आयुष्यात तू खंबीरपणे जगशील, ही मी खात्री देतो तुला"... असं म्हणत बाबांनी धावत जाऊन ध्रुवला घट्ट मिठी मारली.
"बाळा, थांब. यापुढे मी तुझी कायम साथ देईल... आयुष्यात तू खंबीरपणे जगशील, ही मी खात्री देतो तुला"... असं म्हणत बाबांनी धावत जाऊन ध्रुवला घट्ट मिठी मारली.
जणू हातातोंडाशी आलेला घास अचानक हिरावला जातो की काय, या भावनेने आईला देखील स्वतःची चूक कळली.. "यापुढे तुझ्या निर्णयामध्ये आम्ही केवळ आमचं मत देऊ, पण निर्णय सर्वस्वी तुझा असेल.
चांगल्या वाईटाची जाणीव करून द्यायचं काम आम्ही करू, पण होणाऱ्या परिणामांची जबाबदारी यापुढे तू नक्कीच पेलू शकशील, याची आज मला खात्री पटली"... असं म्हणून आई ढसाढसा रडू लागली.
ध्रुव येऊन आईला बिलगला.. "आई मला माझी जबाबदारी स्वीकारायची आहे. तुला आणि बाबांना आनंदी बघायचं आहे. मला माझ्या पायांवर खंबीरपणे उभं राहायचं आहे.. त्यासाठी बाबा आणि तू माझ्या पाठीशी असणं खूप गरजेचं आहे.
तुमच्या आशीर्वादाशिवाय माझ्या कुठल्याही यशाला अर्थ नसेल.. फक्त माझ्या हरवलेल्या वाटा मला शोधू दे. धडपडू दे.. लागू दे.. अपयश पचवू दे.. पण हरूनही मनगटात असलेली ताकद दाखवण्याची संधी तरी मिळू दे".. असं म्हणत तो ओंजळीत तोंड खुपसून रडू लागला.
गहिवरलेले बाबा ध्रुवकडे आले आणि स्वतःचे अश्रु पुसत, उसनं हसु आणत म्हणाले ,"अरे, रडतोस काय असा?"...
"बी अ मॅन ब्रो"... "आणि हि घे गाडीची चावी.. संध्याकाळी आईला डबलसीट घेऊन सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन ये.
म्हणजे आपला लेक किती छान गाडी चालवतो हे तिलाही कळेल बरं का.. आणि तिला भीती वाटत असेल तुझ्या गाडीवर डबलसीट बसायची, तर मी मात्र रेडी आहे बरं का"... बाबा ध्रुवच्या पाठीवर थोपटत म्हणाले.