© वर्षा पाचारणे.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
सुमन आणि तिचा भाऊ शाळेतून घरी आले, तेव्हा आई डोक्याला हात लावून बसली होती... बाबांनी केलेल्या कर्जाचा बोजा वाढत चालला होता. त्यातच आज कर्ज घेऊन पैसे परत न केल्याने बाबांना मारहाण करण्यात आली होती..
बाबांनी आईला 'आपण रात्रीच हे गाव सोडून निघून जाऊ', असं सांगताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली..
'गाव सोडून निघून जायचं?'.. 'मुलांच्या शाळेचे काय?'... 'राहायचं कुठं?, खायचं काय?, जगायचं कसं?', असे शेकडो प्रश्न डोक्याचा भुगा करत होते.
"हे गाव सोडून दिलं, म्हणून प्रश्न मिटणार आहेत का आपले?... दारूपायी असलेली तात्पुरती नोकरी देखील तुम्ही सोडून बसलात.

घरखर्च चालवता यावा यासाठी प्रत्येक वेळेस मित्रांकडून कर्जाऊ पैसे घेतले... आलेल्या पैशातला निम्मा पैसा तर दारूवर उडवला.
आणि तुमच्या या चुकीची शिक्षा म्हणून आज लेकरांची अशी फरपट करू पाहताय".. असं म्हणत आई ढसाढसा रडू लागली.
पदरात दोन मुलं असताना नवऱ्याला असलेले दारूचे व्यसन आता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले होते, की 'एक वेळेस जेवण नाही दिले तरी चालेल, पण दारू द्या', अशी त्याची अवस्था झाली होती..
पदरात दोन मुलं असताना नवऱ्याला असलेले दारूचे व्यसन आता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले होते, की 'एक वेळेस जेवण नाही दिले तरी चालेल, पण दारू द्या', अशी त्याची अवस्था झाली होती..
दारूच्या नशेत तर्र होऊन कधी गटारांच्या बाजूला, कधी एखाद्या बंद दुकानाच्या बाजूला पडलेला नवरा पाहून कांताला मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे.
शुद्धीत नसलेल्या नवऱ्याला आधार देत घरी नेताना, त्यापेक्षा मेलेलं बरं असं तिला वाटून जायचं.
कधी कधी तर आत्महत्या करण्याचा विचार देखील यायचा, पण 'आपल्या आत्महत्या करण्याने लेकरांचं आयुष्य नरक बनवण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही', या विचाराने मन खंबीर करत ती पुन्हा मोठ्या जिद्दीने आला दिवस ढकलत होती..
आणि त्यात आज अशी बाबांना झालेली मारहाण पाहून तर ती मनातून अतिशय घाबरली होती.
आणि त्यात आज अशी बाबांना झालेली मारहाण पाहून तर ती मनातून अतिशय घाबरली होती.
"उद्या पैसे दिले नाही म्हणून नवऱ्याला मारहाण करून कोणी एकटी बाई बघून आपल्यासोबत काही भलतं सलतं केलं तर काय होईल?', या विचाराने तिच्या मनाचा थरकाप व्हायचा..
नवऱ्याला सोडून निघून जायचा विचार देखील अनेक वेळा येऊनही 'मुलांना आयुष्यात दोन्ही पालकांचं प्रेम हव असतं', या विचाराने पुन्हा मन मारत जगणं सुरू व्हायचं.
खरंतर वडिलांचे प्रेम मुलांना कधीच मिळालं नव्हतं, कारण मुले शाळेत जायची तेव्हा दारूच्या नशेत तर्र असलेला नवरा गाढ झोपलेला असायचा आणि रात्री नवरा घरी यायचा तेव्हा मुलं दमून भागून, अभ्यास करून झोपी गेलेली असायची.
'आपले वडील दारू पितात', याची मुलांनाही लाज वाटायची.. पण इलाज काही चालत नव्हता.
आज रात्री रमेश तात्पुरत्या सामानासह बायको मुलांना घेऊन गाव सोडून निघाला.. राहतं घर देखील भाड्याचं असल्याने, आता त्या गावात स्वतःचं असं काहीच शिल्लक राहिलं नव्हतं..
आज रात्री रमेश तात्पुरत्या सामानासह बायको मुलांना घेऊन गाव सोडून निघाला.. राहतं घर देखील भाड्याचं असल्याने, आता त्या गावात स्वतःचं असं काहीच शिल्लक राहिलं नव्हतं..
'गाव सोडून इतक्या लांब निघून जायचं, की कर्जाच्या पैशासाठी शोधत येणाऱ्या लोकांना आपण सापडू शकणार नाही', असा विचार त्याने आधीच केला होता..
रात्रीच्या अंधारात गावाबाहेर पडल्याने कोणाला काहीच कळणार नव्हतं.. रमेश बायकामुलांना घेऊन मुख्य रस्त्यावर पोहोचला तिथे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हात करत तो लिफ्ट मागु लागला..
रात्री दोन अडीचच्या सुमारास टेम्पो वाल्याने त्यांना लिफ्ट दिली... गाडी सोलापूरच्या दिशेने धावू लागली..
धास्तावलेली लेकरं आणि भविष्याची काळजी असलेली कांता निमुटपणे टेम्पोला टेकून बसली होती
धास्तावलेली लेकरं आणि भविष्याची काळजी असलेली कांता निमुटपणे टेम्पोला टेकून बसली होती
नवऱ्यासोबत एकही शब्द बोलायची इच्छा नसलेली कांता लेकरांसाठी मात्र तो नेईल तिथे जायला तयार होती.. पहाटेपर्यंत गाडी सोलापूर जवळच्या एका खेड्यात पोहोचली.. तिथे मध्येच उतरून रमेश आणि बायका मुलांची पायपीट सुरू झाली..
सकाळचा सूर्योदय एका अनोळखी गावात झाला होता. नाव-गाव माहीत नसलेल्या त्या ठिकाणी कुठे थांबावं, हे कळत नव्हतं... समोर उभ्या असलेल्या वडापावच्या गाडीवर थांबून रमेशने सगळ्यांसाठी खायला घेतलं.
सकाळचा सूर्योदय एका अनोळखी गावात झाला होता. नाव-गाव माहीत नसलेल्या त्या ठिकाणी कुठे थांबावं, हे कळत नव्हतं... समोर उभ्या असलेल्या वडापावच्या गाडीवर थांबून रमेशने सगळ्यांसाठी खायला घेतलं.
रात्री गाव सोडायचं असल्याने उपाशीच असलेली मुलं देखील भुकेली होती.. वडापाव खाऊन, आता पुढे काय? असा प्रश्न भेडसावणारा होता...
रमेशच्या ओळखीतले एक गृहस्थ त्याच गावात राहत असल्याने रमेशने त्यांना राहण्याची काही सोय होईल का? असे विचारताच गावात तर कोणी खोली भाड्याने देईल असे वाटत नाही... आणि द्यायला तयार झालेच तरी तुम्हाला दर महिना वेळेला पैसे द्यायला जमेल असे वाटत नाही... असे त्यांनी सांगताच 'मला कुठल्याही खोपटातही जागा चालेल', असं म्हणत रमेश त्यांना विनंती करू लागला.
'अरे, तुझं ठीक आहे.. पण वहिनी, मुलं कुठे राहतील', त्यांनी असं म्हणत रमेश पुन्हा म्हणाला ,"त्यांचं काही म्हणणं नाही.. चालेल त्यांनाही... फक्त तुम्ही अगदी कशीही असली तरी जागा दाखवा"

रमेशने असे म्हणताच ते सद्गृहस्थ मदतीच्या उद्देशाने गावातीलच एका पडक्या खोलीत रमेशला घेऊन गेले..
'तुमची परिस्थिती पाहता खरंच वाईट वाटते, पण सध्या तरी बिना पैशाशिवाय एकच जागा शिल्लक आहे', असं म्हणत त्या पडक्या खोलीत राहण्याशिवाय आता पर्याय दिसत नसल्याने कांता देखील तयार झाली.
खूप वर्षांपूर्वी एक आजीबाई तिथे राहत होती. परंतु आता तिची मुलं शहरात असल्याने त्या खोलीच्या डागडुजीची किंवा तिथे येऊन राहण्याची त्यांना कधी गरज पडली नव्हती, त्यामुळे अनेकदा ती खोली दारुड्या लोकांकडून बसण्यासाठी हमखास अड्डा म्हणून वापरली जायची...
त्या घराचं दारंही अगदी धक्का देताच पडेल, अशा पद्धतीचं होतं... त्या खोलीत कोणीतरी राहायला आलंय, हे कळताच येणारे-जाणाऱ्यांची नजर आता तिथे पडू लागली होती..
त्या घराचं दारंही अगदी धक्का देताच पडेल, अशा पद्धतीचं होतं... त्या खोलीत कोणीतरी राहायला आलंय, हे कळताच येणारे-जाणाऱ्यांची नजर आता तिथे पडू लागली होती..
सुमन पंधरा सोळा वर्षाची होती. घरात संडास बाथरूमची सोय नसल्याने सकाळी लवकर उठून शौचाला जाण्यासाठी बादली भरून पाणी घेऊन तिला लांब कुठेतरी आडोसा शोधावा लागायचा..
सूर्योदय व्हायच्या आधी तिला तिचे प्रातर्विधी उरकून बसावे लागायचे.. शाळा शिकण्यासाठी पैसा नसल्याने तिला अर्धवट शिक्षण सोडावं लागणार आहेत... पण जवळच एक सरकारी योजना चालू असल्याने तिथे शिवण क्लास सुरू असल्याने ती तिथे जाऊ लागली.
गावात एक नवीन मुलगी आली असल्याचे समजताच टुकार मुलांचे लक्ष मात्र नकळत पणे तिकडे जाऊ लागले.. कांता आणि सुमन सकाळी लवकर उठून घराच्या बाजूच्या कोपऱ्यात एक पडदा लावून तिथे आंघोळ करू लागल्या.
गावात एक नवीन मुलगी आली असल्याचे समजताच टुकार मुलांचे लक्ष मात्र नकळत पणे तिकडे जाऊ लागले.. कांता आणि सुमन सकाळी लवकर उठून घराच्या बाजूच्या कोपऱ्यात एक पडदा लावून तिथे आंघोळ करू लागल्या.
रमेश देखील बाजूच्याच गावात वॉचमनची नोकरी मिळाल्याने रात्री घरी नसायचा. सकाळी घरी आल्यानंतर साधारण दुपारपर्यंत झोपून जायचा.
तेवढ्या वेळात कांताने एका शाळेत साफसफाईची नोकरी मिळवली होती. त्यासाठी कांताला रोज सकाळी लवकर उठून कामावर जाणे गरजेचे असायचं.
कांता साधारणपणे सहा वाजता घर सोडायची.. त्याआधी अंघोळ वगैरे उरकून जायचे असल्याने, तिचा दिवस साधारणपणे पहाटे साडेचार वाजता सुरू व्हायचा... अंघोळ करून मुलांसाठी जेवण बनवून ती कामावर निघून जायची...
आई कामावर गेली, की सुमन पटकन आंघोळ करून घ्यायची... पण आजकाल तिला आंघोळ करत असताना हळूच कोणीतरी आपल्याकडे पाहते की काय असे वाटू लागले... ती मनातून धास्तावली... तिने हळूच पडद्या बाहेर डोकावून पाहिले... दोन-तीन टुकार मुलं तिच्याकडे वाकून पाहत होती..

सुमन पटकन कपडे घालून घरात पळून आली.. दुपारी आई घरी आल्यानंतर तिने हा प्रकार आईला सांगितला... 'शेवटी ज्याची भीती होती तेच होऊ लागले', असे म्हणत कांताने लेकीला निर्धास्त राहायला सांगितलं..
कांताने संध्याकाळपर्यंत पडद्याच्या ऐवजी तिथे एक पत्रा बसवून घेतला... 'आता उद्यापासून तु मी जायच्या आधीच आंघोळ करत जा', असं सांगून ती कामाला लागली.
पण मनातली विचारांची चक्र काही केल्या कमी होत नव्हती.. 'वयात आलेली पोर... या सगळ्या प्रकरणामुळे तिची काय अवस्था होत असेल?', हे आई जाणून होती...
आता सुमनचा दिवस आईच्याही आधी सुरू होऊ लागला..आलेल्या परिस्थितीला सामोरे जाताना होणारी ही घालमेल सहन होणारी नव्हती.
आता सुमनचा दिवस आईच्याही आधी सुरू होऊ लागला..आलेल्या परिस्थितीला सामोरे जाताना होणारी ही घालमेल सहन होणारी नव्हती.
एक दोन दिवस बरे गेल्यानंतर आता मात्र एक दोन दारुडे ती शौचाला गेल्यानंतर सुद्धा तिच्या मागून जाऊन लपुन छपुन तिच्याकडे बघत आहेत, हे तिला जाणवले... त्यामुळे तर मग मात्र तिला जगणंच नकोसं वाटू लागलं.
परिस्थितीमुळे उद्भवलेले हे संकट पेलताना लाज बाजूला सारता येत नव्हती... एखाद्याच्या परिस्थितीचा अशा विकृतपणे फायदा घेणारी मंडळी आज प्रथमच तिच्या नजरेस पडत होती...
'आता हे गाव सोडून दुसरीकडे कुठेही गेलो, तरीही तीच अवस्था होणार', या विचाराने आई देखील खचली होती.. आई-बाबां मध्ये आता रोज भांडण होऊ लागलं होतं..
"तुम्ही केलेल्या कर्जाच्या बोजामुळे आज लेकरांवर अशी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली आहे ",असे म्हणत आई बाबांना बडबड करत होती...
"माझ्यामुळे सगळं होतंय? मग मीच मरून जातो', हे दरवेळेसचे ठरलेले शेवटचे वाक्य बोलून बाबा मात्र पुन्हा दारूच्या बाटली सोबत दुःख हलकी करायला मोकळे असायचे... शेवटी आता कधी तरी खंबीर व्हायलाच हवं, या विचाराने आईने एक युक्ती आखली...
आज तिने कामावर सुट्टी घेतली होती.. "सुमन, तू रोज सकाळच्या प्रमाणे तुझे प्रातर्विधी उरकून घे.. आज कोण तुझ्या मागे येते आणि तुझ्याकडं बघतंय, हे मी पण बघतेच", असं म्हणत तिने सुमनला पाण्याची बादली भरून दिली.

पुन्हा त्या झाडामागे दडून आपल्याकडे कोणी पाहत असेल, या विचाराने शौचाला जायचं म्हटलं तरीही सुमनच्या पोटात गोळा यायचा. रोजचं मरण जगताना ती तिळतिळ तुटत होती.
'साधी शौचालयासारखी जीवनावश्यक गोष्टही आपल्या नशिबात नाही', या विचाराने तिला गहिवरून यायचं..
या विचारात असतानाच ती कावरीबावरी होऊन चालू लागली... पण आज तिथे तिच्याकडे कोणी बघत नव्हतं.. आई मात्र तिच्या मागे जाऊन हळूच आधीच जवळपासच दडून बसली होती..
या विचारात असतानाच ती कावरीबावरी होऊन चालू लागली... पण आज तिथे तिच्याकडे कोणी बघत नव्हतं.. आई मात्र तिच्या मागे जाऊन हळूच आधीच जवळपासच दडून बसली होती..
सुमन घरी आली आणि आंघोळीसाठी गेली.. रोजच्याप्रमाणे टुकार मुलं हळूच पत्र्या मागून सुमन कडे वाकून पाहू लागली.. अंग चोरत सुमन दुसरीकडे तोंड करून उभी होती.
तितक्यात कांता मागुन आली आणि तिने काठीने त्या मुलांना बडव बडव बडवलं... अचानक मिळालेला मार जोरदार पद्धतीने बसल्याने मुलं विव्हळत पळून गेली... बरं घरी जाऊन तक्रार करावी, तर कशाची करणार या विचाराने ती मुलं कोणाला काही सांगूही शकणार नव्हती...
त्या दिवसापासून सुमनचं आयुष्य मात्र बिनधास्त झालं... आता तिच्यावर पडणाऱ्या वाकड्या नजरा आपोआप बंद झाल्या होत्या...
त्या दिवसापासून सुमनचं आयुष्य मात्र बिनधास्त झालं... आता तिच्यावर पडणाऱ्या वाकड्या नजरा आपोआप बंद झाल्या होत्या...
आपल्या आईमधला वेळप्रसंगी असलेला हा खंबीरपणे सुमनला जगण्याच्या लढाईत येणार्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद देत होता..
आईबरोबर राहून सुमन देखील भविष्यात तेवढ्याच खंबीरपणे वागू लागली.
सुमनचा भाऊ सरकारी शाळेत शिकत असल्याने सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्याने एका सुताराच्या हाताखाली काम करत थोड्या वर्षांनी स्वतःचं छोटसं फर्निचरचं दुकान सुरू केलं..
सुरुवातीची वर्षे सोडली, तर नंतर धंद्यात बसलेला जम संपूर्ण घराची परिस्थिती बदलण्यासाठी कारणीभूत ठरला.
सुमनचं लग्न झालं.. भावाने दिवस रात्र मेहनत करून कमावलेल्या पैशांने घर उभारल्याने आता तिच्याकडे लग्नानंतर हक्काचं माहेरचं घर होत.
दरम्यान दारुमुळे बाबांचं निधन झालं... आईने शाळेतील साफसफाईची नोकरी अगदी उतार वयापर्यंत केली.
दरम्यान दारुमुळे बाबांचं निधन झालं... आईने शाळेतील साफसफाईची नोकरी अगदी उतार वयापर्यंत केली.
थकलेल्या देहापेक्षा आयुष्यातल्या लढाईने थकलेलं तिचं मन आता कुठे लेकाची प्रगती पाहून सुखाच्या झोक्यावर विसावत होतं... सुखाने सासरी नांदणारी लेक पाहून तृप्त होत होतं..
जगण्याच्या लढाईत स्वतःची काहीही चूक नसताना, निराशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रसंगातून, सुमन समाजातल्या विकृतींपासून वाचली होती, ती केवळ आईच्या खंबीर आधारामुळेच...
आज मागे वळून पाहताना वेळप्रसंगी खंबीर, खमकी आणि तितक्याच ताकदीने जबाबदाऱ्या झेलत, कांता खऱ्या अर्थाने जगण्याची लढाई जिंकली होती.
© वर्षा पाचारणे.
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...