© धनश्री दाबके

"May i come in mam?" रीटाने विचारलं.
सकाळी सकाळी HR मॅनेजरला केबीनमधे पाहून अदितीच्या पोटात गोळा आला. पण तो सराईतपणे लपवत चेहऱ्यावर एक प्रसन्न्न स्माईल देत अदितीने " Yes रीटा.. Come in please.." म्हणत तिचं स्वागत केलं.
"सॉरी मॅम, I know you are busy पण मला तुमच्याकडे यावंच लागलं. कारण तुमच्या टीममधली ती अनिता आहे ना तिने आज तिसऱ्यांदा तिचं डाटा मॅनेजमेन्ट सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग कॅन्सल केलंय. तेही लास्ट मिनिटला.
म्हणजे आता कोणी सब्टीट्यूटही ॲरेंज होणार नाही आणि एक सीट वाया जाणार. मॅम आपल्या कंपनीने ह्या नव्या सॉफ्टवेअरमधे आणि इव्हन त्यासाठी लागणाऱ्या ट्रेनिंगमधे किती पैसे ओतले आहेत त्याची कल्पना तुम्हाला आहेच.
आपण एंप्लॉयीजसाठी इतकं करतो पण त्यांना त्यांची जराही कदर नाही. इतर वेळेला HR च्या नावाने प्रमोशन्स आणि इंक्रीमेंट्ससाठी बोंबा मारणारे हे एंप्लॉयीज नविन काही शिकायची वेळ येताच अशी टाळाटाळ करतात.
प्रत्येक डाटा अनॅलिस्टने हे सॉफ्टवेअर वापरायलाच हवे अशी कंपनीची पॉलिसी आहे ज्यासाठी हे ट्रेनिंग गरजेचं आहे आणि ही अनिता दरवेळी अशी टांग देऊन मला ट्रबलमधे टाकते.
एकतर ट्रेनिंग टारगेट मिस होते आणि असं ऐनवेळी कोणी आलं नाही की माझे बॉस मला झापतात ते वेगळंच. So i need your help mam. You please arrange someone in her place or have a word with my boss"
रीटाचे बोलणे ऐकून अदितीने तिच्या असिस्टंटला म्हणजे प्रमोदला कॉल केला आणि टीमधल्या कोणाला तरी अनिताच्या जागी ट्रेनिंगला पाठवायची व्यवस्था केली.
रीटाचे बोलणे ऐकून अदितीने तिच्या असिस्टंटला म्हणजे प्रमोदला कॉल केला आणि टीमधल्या कोणाला तरी अनिताच्या जागी ट्रेनिंगला पाठवायची व्यवस्था केली.
इतरवेळी अगदी शांतपणे काम करणारा प्रमोदही आज अनितावर वैतागलेला अदितीला जाणवलं. अनिताची रिप्लेसमेंट मिळाल्याने रीटा अदितीला थॅक्यु म्हणून निघून गेली.
ही आजची वेळ तर सावरून घेतली पण ही अनिता का बरं अशी टाळाटाळ करत असावी हा विचार अदितीला स्वस्थ बसू देईना.
ही आजची वेळ तर सावरून घेतली पण ही अनिता का बरं अशी टाळाटाळ करत असावी हा विचार अदितीला स्वस्थ बसू देईना.
गेल्या तीन वर्षांपासून अदिती ही टीम सांभाळत होती. सगळ्यांना चांगलं ओळखत होती. रोज आठ आठ तास एकत्र काम करणारे टीम मधले सगळेच प्रोफेशनली आणि पर्सनलीही एकमेकांशी खुप छान कनेक्ट झालेले होते.
सगळेजण हसून खेळून मस्त मजेत काम करायचे. एकत्र डबे खायचे. चेष्टा मस्करी करायचे. त्यातल्या त्यात ही अनिताच जरा शांत आणि थोडी अलूफ राहायची.
नवऱ्याने दुसऱ्या कोणासाठी तरी तिच्याशी फारकत घेतल्याने अनिता तिच्या मुलासोबत एकटीच राहायची. त्यात तिच्या मुलाला थोडा अस्थमाचाही त्रास व्हायचा. त्याचीही तिला खूप काळजी घ्यावी लागायची.
नवऱ्याने दुसऱ्या कोणासाठी तरी तिच्याशी फारकत घेतल्याने अनिता तिच्या मुलासोबत एकटीच राहायची. त्यात तिच्या मुलाला थोडा अस्थमाचाही त्रास व्हायचा. त्याचीही तिला खूप काळजी घ्यावी लागायची.
अनिता तशी कामात चोख आणि हुशार होती पण स्वतःहून पुढे येऊन कधीच कुठली जबाबदारी घ्यायची नाही. जे आहे ते काम करण्याकडेच तिला कल असायचा. जरा कुठली मोठी किंवा वेगळी जबाबदारी तिच्यावर टाकली की ती कमालीची डिस्टर्ब व्हायची.
हल्लीच्या जगात सिंगल पॅरेंट असलेल्या अनिताला किती चॅलेंजेस पार करावी लागत असतील याची कल्पना असल्याने अदिती नेहमीच अनिताला सांभाळून घ्यायची.
हल्लीच्या जगात सिंगल पॅरेंट असलेल्या अनिताला किती चॅलेंजेस पार करावी लागत असतील याची कल्पना असल्याने अदिती नेहमीच अनिताला सांभाळून घ्यायची.
पण तरीही कधीकधी ही अनिता, तिच्या मुलाच्या आजाराचा, सिंगल पॅरेंट असण्याचा ढालीसारखा वापर करून स्वतःची नवीन गोष्टी शिकण्याबद्दलची भिती लपवते की काय अशी शंका अदितीला यायची.
आजही अनिताने प्रमोदला मुलाबद्दलच काहीतरी कारण दिले होते. आता अनिता आली की तिच्याशी बोलायलाच हवं. जर निव्वळ हे ट्रेनिंग नको म्हणून ती आज आली नसेल तर ती उद्या येईलच. असा विचार करून अदिती पुढच्या मिटींगला गेली.
पण दुपारी लंच अवरला अदितीला अनिता तिच्या टेबलवर दिसली. अरे ही तर आजच आली की. म्हणजे हीने खरंच ट्रेनिंग टाळण्यासाठी हाफ डे टाकला असावा फक्त.
"अरे..अनिता? तू आलीस? सकाळी कुठे होतीस?" अदितीने अनिताकडे रोखून बघत विचारलं.
अदितीला असं अचानक समोर पाहून अनिता गोंधळली, " आज हाफ डे टाकावा लागला मॅम. मी प्रमोदला कळवलं होतं"
"हो.. कळलं मला. काय झालं आज? कुणाल बरा आहे ना? कुणालच नाव आहे ना तुझ्या लेकाचं?"
"हो मॅम, कुणालच. त्यालाच थोडं बरं नव्हतं" अनिता चाचरत म्हणाली.
"मग आता बराय तो ?"
"हो मॅम, आता बराय म्हणून आले. किती रजा घेणार ना.. त्याचं सारखं सारखं काहीनाकाही सुरुच असतं."
"हम्म्म .. बरं झालं त्याला बरं वाटलं ते.. पण खरंच त्याला बरं नव्हतं की तुला? नाही म्हणजे आज ट्रेनिंग होतं ना तुझं? त्यामुळे मला वाटलं तुझ्या फोबियाने डोकं वर काढलं की काय?" अदितीने अनिताच्या डोळ्यांत पाहात इतक्या कॉनिडन्सने विचारलं की अनिताने काहीच न बोलता मान खाली घातली.
"चल आज आपण माझ्या केबिनमध्ये जेवू" म्हणत अदिती पुढे निघाली आणि " ह्यांना कसं काय माझ्या फोबियाबद्दल कळलं याचा विचार करत अनिता तिच्यामागे केबिनमध्ये गेली.
आज हिला बोलतं करायचंच म्हणून अदितीने डायरेक्ट विषयाला हात घातला.
"मी जे म्हणाले ते चुकीचं नाहीये ना अनिता? तुला कुठल्याही नव्या गोष्टीची भिती वाटते ना? आत तुला वाटेल की मला कसं कळलं पण ह्यात काही रॉकेट सायन्स नाही अनिता.

मी गेले तीन वर्ष तुला बघतेय आणि गेली अनेक वर्ष मी इतक्या लोकांबरोबर काम केलंय की मला त वरून ताकभात ओळखता येतो.
काही लोकं मुळातच कामचुकार असतात. तू तशी नक्कीच नाहीस. पण जरा काही नवं समोर आलं की बिचकतेस आणि ते शिकण्यातल्या आनंदापेक्षा मनातल्या भीतीला जास्त कुरवाळत तिलाच वरचढ ठरवतेस.
अगं जास्तीत जास्त काय होईल? तुला एखादी गोष्ट पहिल्यांदा जमणार नाही, चुकशील,धडपडशील पण त्यातून मार्गही काढायला शिकशीलच की."
"अगदी बरोबर ओळखलत मॅम. काही नवं समोर आलं की मी घाबरते. कारण लहानपणापासूनच मी जेव्हा जेव्हा पहिल्यांदा काही नवीन गोष्ट करतांना चुकले, कमी पडले तेव्हा तेव्हा मला अगं ठीक आहे, पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा जमेल तुला असं म्हणून हिम्मत देणारं कोणी मिळालंच नाही.

माझे आईवडील, बहीणभावंडं या सगळ्यांनीच 'हिला काही जमतचं नाही' असा शिक्का माझ्यावर मारला. त्यामुळे रोजचं रूटीन सोडून मी काही नवं करायच्या भानगडीतच पडले नाही.
सुदैवाने शाळेत शिकवलेलं सगळं पहिल्यांदाच डोक्यात शिरायचं आणि मी पास व्हायचे. नाकासमोरचं सरळ साधं जीवन जगायचं हेच ध्येय होतं माझं. कधी वाट वाकडी करून कुठलं अवघड वळण मी घेतलंच नाही.
नवराही तुला काही जमणार नाही म्हणणाराच मिळाला. सतत मला दुय्यम ठरवत आला. पण त्याची बहीण मात्र मला समजून घ्यायची.
समवयस्क असल्याने असेल कदाचित पण माझी तिच्याशी चांगली मैत्री झाली. आयुष्यात जो काही आधार आहे तो फक्त तिचाच आहे. तिच्या भावाने मला दूर लोटलं तरी ती मात्र आजही माझ्यासोबत आहे.
ती आधीपासूनच मला धीर द्यायची पण नवऱ्याने प्रतारणा केल्यावर मात्र ती माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. त्यालाही तिने खूप समजावलं पण काही उपयोग झाला नाही. आणि मलाही त्याने विश्वासघात केल्यानंतर त्याच्याबरोबर जगायची इच्छा उरली नाही.
मग तिनेच या ऑफिसमध्ये तिच्या सासऱ्यांकरवे शब्द टाकून मला चिकटवले. लहान कुणालला सांभाळायची सोय करून दिली.
सुरवातीला माझ्यासोबत राहून माझं बस्तान बसवून दिलं आणि माझ्या आयुष्याची घडी विस्कटू न देता सावरली.
आजही ती आणि तिचे मिस्टर माझ्या प्रत्येक अडीअडणचीला धावून येतात. पण त्यांना किती त्रास द्यायचा ह्यालाही काही मर्यादा आहेतच ना मॅम.
म्हणूनच आता मला माझ्या या नोकरीत माझ्याकडून काही चूक होऊ नये असं वाटतं. कुणालची जबाबदारी आहे माझ्यावर आणि त्यामुळेच ही नोकरी प्राणांहूनही प्रिय आहे मला.
आत्तापर्यंत जसं नीट सुरु आहे तसंच राहावं बस इतकीच अपेक्षा आहे माझी. मला नको आहे ते ट्रेनिंग, प्रोग्रेस, प्रमोशन वगैरे. मी आहे तशीच ठीक आहे."
"अगं अनिता.. मला तुझी भीती समजू शकते. पण म्हणजे तू कधीच कुठला बदल आनंदाने स्वीकारणारच नाहीस का?" अदिती म्हणाली.
" मॅम, नव्या गोष्टी शिकण्याची गरज मला समजते पण काही नवं समोर आलं की मी सतत माझ्यातल्या या न्यूनगंडाशी झगडत राहाते. आणि आत्ता नकोच पुढच्यावेळी पाहू म्हणून आजचे मरण उद्यावर ढकलते. म्हणूनच आज हाफ डे टाकला मी."
"आज तुला मी सांभाळून घेतलं अनिता. पण असं दरवेळी करणं मला शक्य होणार नाही. जी नोकरी तुझ्यासा सर्वस्व आहे तिच्यासाठीच हे नवं सॉफ्टवेअर तुला शिकावंच लागणारे.

अजून किती दिवस अशी कुणालच्या आजारपणाची ढाल समोर करून तू स्वतःची भीती लपवू शकशील? आज ना उद्या तुला हे ट्रेनिंग घ्यावचं लागेल ना.
भीत भीत का होईना पण तू तुझ्या आयुष्यातला एवढा मोठा बदल स्वीकारलासच ना. तेव्हा तुझी नणंद होती तशीच आज मी आहे तुझ्यासोबत.
जर तुला काही अडचण आली, नाही काही समजलं पहिल्यांदा, तरी हरकत नाही. आपण तुला दोनदा पाठवू."
"दोनदा? मॅम रीटा म्हणत होती की खूप खर्चिक आहे हे ट्रेनिंग."
"तू त्याचा विचार करू नको. तू फक्त नवं काहीतरी करण्याची तयारी दाखव. बाकी कॉस्ट वगैरेचं मी बघून घेईन.
"दोनदा? मॅम रीटा म्हणत होती की खूप खर्चिक आहे हे ट्रेनिंग."
"तू त्याचा विचार करू नको. तू फक्त नवं काहीतरी करण्याची तयारी दाखव. बाकी कॉस्ट वगैरेचं मी बघून घेईन.
बरं झालं निदान आजतरी माझ्याशी मोकळेपणाने बोललीस. नक्की दुखणं कळलं तरच रामबाण इलाज करता येतो ना.. मी आहे इथे बसलेली तुझ्याकरता. तेव्हा निश्चिंत राहा"
अदितीने इतका पाठिंबा दिल्यानंतर अनिता विचारात पडली आणि कल करे सो आज या विचाराने म्हणाली, "मॅम.. रीटाला सांगता का ..मला आजच थोडावेळ तिथे जाऊन बसता येईल का? म्हणजे मला थोडा कॉंफिडंस येईल."
"There you are.. हो चालेल ना....का नाही? मी सांगते रीटाला. जाऊन बस थोडावेळ. बघ कसं वाटतय तुला..न जाणो उद्या तूच पहिली expert होशील आणि हे नवं सॉफ्टवेअर इतरांनाही शिकवशील."
अदितीने असं म्हणताच अनिताचा चेहरा उजळला आणि ती जेवण आटोपून ट्रेनिंगसाठी निघाली.
आज एका स्त्रीच्या भक्कम आधारामुळे दुसरी स्त्री तिच्या न्यूनगंडावर मात करण्यासाठी आनंदाने सज्ज झाली होती.
*****
आजकालच्या स्पर्धात्मक युगात कधी कधी एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढतांना आपण कुठेतरी कमी पडू की काय अशी भिती प्रत्येकाला वाटते.

आपल्यातल्या एखाद्या कमतरतेमुळे आपण मुलांचे संगोपन नीट करू शकू का या विचाराने नवे पाऊल उचलायला घाबरणारी एक आई मग मुलांच्या गरजांचीच ढाल करत स्वतःला त्यामागे लपवते. तिच्या आजूबाजूचे लोकही मग तुला काय जमणार? म्हणून मागे खेचायला तयारच असतात.
पण त्यातलीच एखादी अदिती अशीही असते जी आपल्या सहकारी स्त्रीयांना भक्कम आधाराची ढाल देऊन त्यांच्यातल्या उणीवांना दूर करण्याची संधी देते.
पण त्यातलीच एखादी अदिती अशीही असते जी आपल्या सहकारी स्त्रीयांना भक्कम आधाराची ढाल देऊन त्यांच्यातल्या उणीवांना दूर करण्याची संधी देते.
शेवटी एक स्त्रीच स्त्रीला सर्वतोपरी मदत करून पुढे घेऊन जाऊ शकते. नाही का? तुम्हाला काय वाटतं??
© धनश्री दाबके
© धनश्री दाबके
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...