© कल्याणी पाठक (वृषाली काटे)
"आई गंss अगं आई गंss" सुमन प्रसव वेदनांनी कण्हू लागली तशी तिची सासू तिच्यावर वसकन् ओरडली.
"काय झालं वं तुले येवढं बोंबलायले! तू तं अशी बोंबलून राह्यली जशी पयल्यांदाच बायतीण होनार हायेस!
सासूच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला तसा सुमननं तिने ओठ दातांखाली गच्च दाबून धरले.

दात रूतून तिच्या ओठांतून रक्त येऊ लागलं.. सगळं अंग घामानं भिजलं.
तिची तडफड होऊ लागली अन् तिने विव्हळत जमिनीवर लोळण घेतली.
अनु, मनू आणि सूनु तिच्या अनुक्रमे सहा, चार आणि दोन वर्षांच्या तीनही लेकी भेदरून आईच्या ह्या बिकट अवस्थेकडे बघत काय करावं हे न समजून तशाच दारात उभ्या होत्या.
"ए पोट्ट्याई हो.. तुमचं का काम हाय इथं? चला पया!" सुमनच्या सासूनं तिघी नातींना तिथून घालवून दिलं अन् शेजारच्या मुलाला सदूला वर्दी द्यायला धाडलं.
सदू उर्फ सदानंद आणि सुमन ह्यांचं आठ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. सदू लोकांच्या शेतात मजुरी करायचा.

त्याचा बाप लहानपणीच गेला अन् सदूची शाळा दुसऱ्या वर्गात असतानाच सुटली. त्यामुळे सदूला अक्षर ओळख जेमतेमच होती.
सदूच्या आईने मजूरी करून त्याला मोठं केलं अन् शेजारच्या गावातील सुमनशी सोयरिक जुळवून आणली.
सुमनच्या घरी देखील अठरा विश्वे दारिद्रय.. अन् त्यात सुमन सहा भावंडांच्या पाठीवर झालेलं सातवं अपत्य!

त्यामुळे माहेरी सुमनचे बेताचेच लाड झाले. बारा वर्षांची असताना सुमन एका घरी आजींना सोबत म्हणून दिवसभर राहू लागली.
त्या आजी शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका होत्या. त्यांच्या पुढाकाराने सुमन रात्र शाळेत जाऊ लागली.

आजींकडून चांगल्या चुंगल्या गोष्टी शिकू लागली. पौष्टिक अन्न खाऊ लागली अन् आजींच्या नातींचे जुने पण चांगले असलेले कपडे वापरू लागली.
आजींनी सुमनला शुद्ध बोलण्याची सवय लावली होती. अन् तिला देखील शुद्ध भाषेत बोलायला आवडत असे. सुमनच्या आईबापाला मात्र सुमन आता 'नाकापेक्षा मोती जड' वाटू लागली होती.

म्हणूनच त्यांनी अवघ्या सतराव्या वर्षी तिचं लग्न जेमतेम अक्षर ओळख असलेल्या अन् मोलमजुरी करणाऱ्या सदूशी लावून दिलं.
सदू आणि त्याची आई नुसते अशिक्षित नव्हे तर जुनाट विचारांचे होते. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा सुमनने गोड बातमी दिली तेव्हा दोघांनीही तिच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली.. "आपल्याले पोरगं पाह्यजे."
"आत्याबाई, पोरगं पोरगी असं काही नसते हो!" सुमननं सासूला जीव तोडून सांगायचा प्रयत्न केला. "लेकरू हे लेकरूच असते.. ते धडधाकट असलं की झालं!"
सदानं सुमनला सासूशी बोलताना ऐकलं आणि तो सरळ सुमनच्या अंगावर धावून गेला..
तिघांच्या भांडणाचा आवाज ऐकून शेजारी धावून आले आणि त्यांनी सुमनची सदाच्या तावडीतून सुटका केली.
पहिल्या बाळंतपणासाठी सुमन माहेरी गेली आणि तिला पहिली मुलगी झाली. सदा आणि त्याची आई बाळाला पाहायला आले खरे.. पण त्यांच्या चेहऱ्यावरून मुलगी झाल्याची नाराजी काही लपली नाही.
दुसऱ्या खेपेला मात्र सासूने सुमनला मुलगा व्हावा म्हणून अंगारेधुपारे सुरू केले.

कुठून तरी मंतरलेला ताईत आणून दिला.. स्वतः सोमवारचे उपास धरले अन् सुमनला सोसवत नसतानाही उपवास धरायला लावले.
दुसऱ्या खेपेला मुलगाच होईल अशी खात्री असलेल्या माय लेकांच्या भ्रमाचा भोपळा मनू ह्या दुसऱ्या मुलीच्या जन्माने फुटला.
माय लेक आता सुमनशी फारच फटकून वागू लागले. सुमनला पूर्वी महिन्यातून एखाद्या वेळी पडणारा मार आता आठवड्यातून एकदा पडू लागला.. अन् अशातच तिसऱ्या बाळाची चाहूल लागली.
"डागदरीण बाई, जर ह्या येळी पोरगं असेल तरच ठीवा.. न्हायतर काढून टाका." सुमनच्या सासूनं काहीही आडपडदा न ठेवता डॉक्टरीण बाईना सुचवलं..
"व्हय.. आई बरूबर बोलतीया.. हातावरचं प्वॉट आमचं.. तीन लेकरं सांभाळणं व्हायचं नाई!" सदानं आईचीच 'री' ओढली.
"अहो, तुम्हाला एवढं समजतंय तर आधीच काळजी घ्यायची ना! तिला वीस आठवडे होऊन गेलेत.. आता काहीच करता येणार नाही.

अन् तसंही गर्भ परीक्षण आणि स्त्री लिंगाचा गर्भपात कायदेशीर गुन्हा आहे!" डॉक्टर मॅडमनी समजावून सांगितलं.. पण सदाला काही ते समजलं नाही.
"आमचं लेकरू.. आमी ठीवू नायतर काढू! सरकारले काय करा लागते?" दोघा मायलेकांची चर्चा ऐकून सुमन डोक्यावर हात मारून घेई.
तिसरी मुलगीच झाल्याचा निरोप आला तर सुमनला आणि तिच्या बाळाला बघायला कुणीच गेलं नाही.

दवाखाना सरकारी असला तरी तिथे काही ना काही पैसे भरावे लागणारच. पण सदा दवाखान्यात फिरकला पण नाही.
शेवटी तिने तिथल्या नर्सच्या हातापाया पडून आपल्या लग्नातल्या चांदीच्या तोरड्या विकून दवाखान्याची फी भरली अन् बाळाला घेऊन घरी आली.
सुमनच्या वाट्याला आता रोजचा मार अन् रोजची उपासमार येऊ लागली.

तिनं कित्येकदा जीव द्यायचा विचार केला.. पण तिच्या चिमुकल्या मुलींचा विचार तिच्या मरणाच्या विचारावर मात करून जाई. आपल्या माघारी आपल्या मुलींना थारा नाही हे ती पक्कं जाणून होती.
सदानं पुन्हा एकदा बाळासाठी तगादा लावला आणि सुमन हादरलीच. "आता नको हो! मागच्या बाळंतपणात खूप त्रास झालाय.. आता बाळंतपण नको!" तिनं अजीजीनं नवऱ्याला सांगून बघितलं पण तो बधला नाही.
"आधीच तीन पोरींचा खर्च आहे.. त्यात आणखी खर्च कशाला? नकोच पुन्हा बाळंतपण!" तिनं सासूला युक्तीनं सांगितलं तर सासू उखडलीच..
"तुह्याच्यानं होत आसल तर पाय.. न्हायतर मी माह्या पोराचं दुसरं लगीन लावतो!" सासूनं तोफगोळा डागला आणि सुमनला सपशेल शरणागती पत्करावी लागली.
एकतर अवघ्या चार वर्षांत झालेल्या तीन बाळंतपणांनी ती पार खिळखिळी झाली होती.. शिवाय लहान लेकरांचं करताना ती घरातच अडकून पडली. ygoogle = window.adsbygoogle || []).push({});

जर खरंच सासूने नवऱ्याचं दुसरं लग्न लावलं तर आपले हाल कुत्रा देखील खाणार नाही ह्याची तिला जाणीव झाली अन् ती चवथ्या गर्भारपणाच्या दिव्याला सामोरी गेली.
ह्यावेळी सासूच्या अंगाऱ्याधुपाऱ्यांचा वेग वाढला होता.. अन् पोरगाच व्हायला पाहिजे म्हणून दबाव देखील!
अशातच आज सुमनला प्रसूतीकळा सुरू झाल्या अन् सुमनच्या सासूने आपल्या मुलाला.. सदाला शेतात बोलावणं पाठवलं.
"ह्या बारीनं आपल्याला पोरगाच पाह्यजे.. पोरगी झाली तर तुला अन् तिला घरी घिऊन जाणार न्हाई!" सरकारी दवाखान्यात जनरल वॉर्ड मध्ये सुमनला बेडवर झोपवता झोपवता सदानं सुनावलं.
"ए, काय गडबड आहे? धमकी देताय का बायकोला? पोलिसला बोलावू का?" रात्रपाळीच्या नर्सने दोघा नवरा बायकोचं बोलणं ऐकून आवाज वाढवला तसा सदा पळाला.

पण जातानाची त्याची जळजळीत नजर सुमनला बरंच काही सांगून गेली.
"काय झालं वो ताई?" शेजारच्या आवाजाच्या दिशेनं सुमननं वळून बघितलं तर बाजूच्या बेडशी दोन तिशीच्या महिला उभ्या होत्या.
"माही भैन हाय.. कळा सुरू झाल्यात.. म्हून लेबर रूमला नेलया.." त्यातल्या एका महिलेनं दिलखुलास माहिती देत सुमनचं मन जिंकून घेतलं.
"तुमच्या नातलग बाईला मुलगा झालाय! मॅडमनी तुम्हाला बोलावलंय!" नर्स घाईघाईनं सांगून गेली.. अन् तिच्या पाठोपाठ एक बाई पण निघून गेली.
शेजारच्या बेड वरील बाईला मुलगा झाला म्हटल्यावर सुमनच्या भावनांचा बांध फुटला.. तिनं रडत रडत आपली कर्मकहाणी त्या बाईला सांगून टाकली.
बाजूच्या बेडवर बाळंतीण आणि बाळाला आणून ठेवलं आणि सुमनला लेबर रूम मध्ये घेऊन गेले. कळा देऊन देऊन सुमन थकून गेली होती.. तिला ग्लानी आली अन् ती जवळपास बेशुद्ध झाली.. प्रसूती झाल्याचं तिला कळलंच नाही.
रात्री उशीरा तिला अर्धवट शुद्ध आली तेव्हा ती जनरल वॉर्ड मधल्या तिच्या बेडवर होती अन् त्या बेडला लटकलेल्या पाळण्यात बाळ गाढ झोपलं होतं.
"पुन्हा मुलगीच झालीय तुम्हाला!" सुमनला कानात कुणीतरी कुजबुजल्याचा भास झाला. तिनं महत्प्रयासाने डोळे उघडले.. ती मघाचीच बाई तिच्या कानाशी कुजबुजत होती.
त्या अर्धवट शुद्धीत देखील सुमनला ब्रम्हांड आठवलं.. सासू आणि नवरा आता आपल्याला घरात घेणार नाहीत.

आपल्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावून देतील.. आपलं काय होईल.. आपल्या तीन पोरींचं.. नव्हे चार पोरींचं काय होईल?" विचारांनी सुमनला गरगरू लागलं.
"मी काय म्हणतो, आमचा पोरगा तुम्ही ठीवून घ्या.. अन् तुमची पोरगी आमाला देऊन टाका.. कुणाला कानाचा कोन बी कळणार न्हाई!" ती बाई पुन्हा कुजबुजली.
अर्धवट शुद्धीत देखील सुमनच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. पोरगा झाला म्हटल्यावर सगळ्या समस्या सुटतील.. अन् ती बाई स्वतः पोरीला न्यायला तयार आहे म्हणजे पोरीचे हाल नक्कीच करणार नाही."
सुमननं डोळे तारवटून बघितलं.. बाईच्या अंगावर बऱ्यापैकी पण भडक रंगाची साडी होती.. आणि नाकात चमकी.. कानात मोठे डूल.. गळ्यात ठसठशीत सर होता आणि हातात जाडजूड बांगड्या!
'बाई पैसेवाली दिसते.. आपल्या जवळ आपल्या पोरीला धड ना खायला मिळणार ना ल्यायला! हिच्या घरी आपली पोरगी नीट राहील!' सुमननं स्वगत म्हटलं पण ते त्या बाईला जणू ऐकू गेलं असावं.
तिनं लागलीच घाईघाईनं बाळांची अदलाबदल केली. "बाई, पण त्या सिस्टरला सकाळी कळलं तर?" त्या अवघड परिस्थितीत देखील सुमनची बुद्धी शाबूत होती.
"ते मी बघल.. तुमी बिनघोर राहा!" त्या बाईने दिलासा दिला अन् सुमनचा डोळा लागला.
"झोप झाली का? बाळाला पाजायला घ्या बघू!" एक वेगळीच सिस्टर सुमन जवळ येऊन तिला उठवत होती.

'बहुधा कालच्या सिस्टर ची ड्यूटी संपली असावी.. अन् तिच्या जागी ही नवी नर्स आली असावी.' सुमनच्या मनात आलं.. अन् तिनं बाळाला जवळ घेतलं.
बाळानं 'सू' केली होती.. म्हणून तिनं गुंडाळलेलं दुपटं बाजूला केलं.. अन् तिला तो मध्यरात्रीचा संवाद आठवला. "ती 'देवी' माझ्या पदरात मुलाचं 'दान' टाकून गेली!' सुमननं मनाशीच म्हटलं.. अन् तिला पान्हा फुटला खरा.. पण जणू तिच्या पान्ह्याला तिच्या रक्ताची.. तिच्या हाडामासाच्या गोळ्याची ओढ वाटू लागली.
"मला फक्त एकदा माझ्या मुलीला दूध पाजू द्या!" सुमननं बाजूच्या बेडकडे वळत म्हटलं.. अन् ती दचकलीच.. तिथे कुणीच नव्हतं..
"सिस्टर.. सिस्टर.. ह्या बाजूच्या बेडवर होत्या त्या ताई कुठे आहेत?" सुमननं अधीरपणे विचारलं.
"कोण ह्या इथल्या बायका?" सिस्टरनं आश्चर्यानं विचारलं.. "तुम्ही का त्यांची चौकशी करताय?"
"अं..अं..अं.. काही नाही.. काल ओळख झाली होती म्हणून विचारलं.." सुमनला नेमकं काय कारण सांगावं हे सुचेना!
"अहो, त्या बायका आहेत धंदा करणाऱ्या वेश्या आहे.. आजूबाजूच्या गावांतून येतात.. अन् पोट सोडवून रात्रीतून निघून जातात.. " नर्स पुढे बोलत होती.. पण सुमनला काहीच ऐकू येत नव्हतं..
'म्हणूनच त्या बायकांना मुलगा नको होता.. मुलगीच हवी होती..' सुमन आता खरोखरीची शुद्धीवर आली होती.
'ती बाई आपली मुलगी घेऊन गेली.. ती काही वर्षांनी तिला धंद्याला बसवणार..' सुमनचं डोकं उलटसुलट विचारांनी भणभणू लागलं.

"मला त्या बाईचा पत्ता सांगा.. मला जायचंय तिथे माझ्या बाळाला आणायला.." सुमननं आक्रोश करण्याचा प्रयत्न केला पण तिचे शब्द तोंडातच विरले.
"नेमक्या राहतात कुठे ह्या बाया? मला पत्ता द्या ना?" सुमननं प्रत्यक्षात संयम राखत विचारलं.
"छे! त्यांचा पत्ता कोण विचारेल? नाही माहीत मला.. आणि तुम्ही पण विचारू नका! गरीब असलो तरी कष्टकरी माणसं आपण!

असल्या घाणेरड्या बायकांशी संबंधच नको मला.. आणि तुम्ही देखील ठेवू नका!" नर्स बोलली अन् शेजारच्या बेडजवळ निघून गेली.
सुमनला तिच्या नवऱ्याचा आणि सासूचा आवाज ऐकू आला.. त्यांना कुठून तरी मुलगा झाल्याचा निरोप मिळाला असावा.

वंशाला दिवा मिळाला म्हणून दोघंही खूष होते.. सासू पोराची अलाबला घेत होती.. मुके घेत होती. सदा देखील कौतुकानं सुमन कडे बघत होता.. तिला 'घरी चल' म्हणत होता..
सुमनचं मन मात्र पश्चात्तापाने आणि डोळे आसवांनी भरून आले होते.. अन् अश्रूंच्या आड तिचे डोळे आयुष्यभर तिच्या लेकीचा शोध घेणार होते.
© कल्याणी पाठक (वृषाली काटे)
सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा