© वैशाली देवरे
"समीर, अरे किती दिवस झाले फिरकला नाहीस घरी.. ..फोनही नाही. "
"बाबा कामानिमित्त जरा बाहेर गावाला अलोय.. तिकडून आलो कि मारतो बघा चक्कर.. "
"हो का??.. तरीच म्हटलं... सूनबाई इतकी बिनधास्त कशी ??"
"म्हणजे??? "
"ये तू, मग बोलू सविस्तर... "
बाबांच्या फोननंतर समीर थोडा चिंतेत पडला..
काय??? बरं झालं असेल ?? समीरा काही बोलली असेल का??? काय केल असेल आता या बयाने... हि पण ना.. डोक्यात जाते राव.. "
तो चिडलाच होता..
जरा फोन करून विचारूनच घेतो..
ती नाही पण मुलं तरी सांगतील काय झालं ते, विचार करण्यात काही अर्थ नाही..
समीरने घरी फोन केला.
फोन बर्याच वेळ वाजत होता कोणी घेतलाच नाही.
शेवटी मुलांच्या लक्षात आलं. बाबांचा फोन असेल.
विरूने पटकन उचलला.."हँलो बाबा"
"हँलो बेटा कसे ??आहात तुम्ही... आई कशी आहे?? फोन आला नाही म्हणून काळजी वाटली मला"
आपण असं विचारलं तर नक्की काय झालं ते लगेच कळणार होतं.
"बाबा आम्ही मजेत आहोत हो. आईला जरा ताप भरला आहे. अहो हो... आजीबाबा आले होते ना ,मग आई त्यांच्यामध्ये व्यस्त होती.
आता झोपली ती.. कालपासून अंगात ताप आहे बाबा आईच्या, तिला वाटलं बर वाटेल पण नाही वाटलं.
आज जाणार होती डाँक्टरकडे तर आजीबाबा आलेत मग थांबली घरीच.
थोडावेळापूर्वीच गेलेत ते परत .आईने सांगितलं रहा दोन तीन दिवस तर नाही राहिलेत ते.. म्हणाले, समीर नाही तो आला कि येतो परत मग आई काही नाही बोलली.
आता तर १०१ टेमप्रेचर आहे आईला. मी गरम पाण्याच्या पट्ट्याच ठेवतो आहे म्हणून फोन घ्यायला उशिर झाला बघा.
...अहो बाबा... आईला चक्कर येते असं आजीला सांगितल तरीही आजीने लक्ष दिलं नाही बघा.
शेवटी आईनेच सारा स्वयंपाक केला.. आता मीच म्हणालो झोप तू भांडे सकाळी घास म्हणून..
तिच्याकडे देऊ का??? पण आत्ताच झोपली हो"
"असू दे काळजी घे मी निघतोय आता उद्या सकाळपर्यंत पोहचेल घरी आलो कि बघतो... तीला नको सांगूस. जाऊ दे..! झोपली ना झोपूच दे..! "
मुलाशी बोलल्यावर समीर जरा विचारातच पडला.
समीराबाबत जरा शंकाच आली त्याला.
समीराने काहीतरी केलं व आईबाबा दुखावले आणि वरून हीच नाटक करते आहे , सोबत मुलांचाही वापर करतेय असंच जाणवत त्याला.
उद्या घरी पोहोचलो कि बघतोच सारं... काही नेम नाही तिचा.
मनाशीच संवाद साधत होता पण.. समीरा काही वादच का घालेल हाही प्रश्न होताच व त्याचं उत्तर समीरला काही मिळत नव्हतं.
पाणी कुठे मुरतय ते कळत नव्हतं..
मुलगा तर खोट नाही बोलणार त्याच्याशी व वडीलही असा
फोन करणार नाहीत.
असंच तर मन म्हणतं होतं.
डोक्यात प्रश्नांचा भडीमार सुरू होता... तसाही तो परतीला निघालाच होता.
इकडे समीरा तापाने फणफणली होती.
मुलं काळजी घेत होती पण तशातच मन नाराज झालं होतं..
सासूसासर्यांच्या आजारपणात सारं करणारी समिरा आज आजारी पडली तर त्याचं त्यांना काही सोयर सुतक नव्हतं.
"मी मदत करते, तू जरा बस असंही म्हणू नये त्या बाईने !.. किंवा सासर्यांनीही बोलू नये?? काय माणसं असतील ही ! निर्दयी !! समीर आला कि सांगते त्याला व मीही आता तसंच वागेल त्यांच्याशी"
समीरा तापात बडबडत होती.
थोड्या वेळाने पहाट होणार होती.. जरा आराम मिळाला होता जीवाला.
तिने रात्रीचा पसारा आवरायला सुरवात केली. मुलंही झोपलेली होती.
आवरत असतानाच दाराची बेल वाजली, बघते तर समीर आलेला होता.
समीराला जरा हायसं वाटलं...काय करणार ! बाई कितीही भक्कम असली तरी आजारपणात तीला दोन शब्द आपुलकीचे हवे असतात..
त्याचीच तर ती भुकी असते.
समीर आल्यावर तिने पाणी दिलं.
समीराचा चेहेरा उतरला होता, गाल लालबुंद झाले होते.. डोळ्यात लाली आली होती...
"समीरा बरी आहेस ना? "
ती मानेनेच "हो "म्हटली पण डोळ्यात पाणी आलं होतं. तीच्या खरेपणाची साक्ष होते ते पाणी.
त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला तर अजूनही ताप होताच..
"अगं असू दे ना? एक दिवस नाही आवरलं तर बिघडत कुठे? "
"अहो रात्रीची भांडी आहेत ..आईबाबा आले होते ना?? मग त्यांच्या आवडीचे करत बसले कधी बेसिन भरलं कळलच नाही बघा.. "
"अगं बरं नव्हतं तर कशाला करत बसायचं?? खिचडी लावायची किंवा बाहेरून मागवायची ना? "
"अहो ते नाही खात ना? बाहेरच ..उलट बाबाच फर्माईश करत होते.. मीच शेवटी वैतागून म्हणाले बाबा अहो मला उभ राहावत नाही. तुम्ही राहा दोन दिवस. बरं वाटलं की सारं करून खायला घालते बघा. मलाही जरा आधार वाटेल""...
"असं...जाऊ दे... आवरून घे आपण डाँक्टर कडे जाऊन येऊ वाटेल बर.. आता मी आलोय ना?.. जेवण आणतो बाहेरून. काही करत बसू नकोस.. "
समीर खरंच गोंधळला होता.
वडलांचा तो फोन व घरची ही परिस्थिती ! दोन्हीमधे तफावत होती.
जन्मभर साथ देणारी बायको खरी की जन्मदाते आईवडील खरे ह्या द्वंद्वात तो अडकला होता.
समीरा जवळपास आठ दिवस आजारी होती पण आईवडिलांनी तिला साधा फोनही केला नव्हता..
इकडे नवरा काळजी घेतोय.. सासूसासर्यांकडे दुर्लक्ष करत समीरा सावरत होती.. व लवकर बरीही झाली..
पुन्हा एक दिवस समीरला वडलांचा फोन आला.
वडलांच्या नाराजीचा सूर आता इतक्या दिवसांनी निवळला असेल असेच समीरला वाटले. पण त्यांचा रोष तसाच होता.
खरंतर समीराचं आजारपण व त्याची कामं ह्यामुळे त्याला आईवडिलांकडे जाणं जमलंच नव्हतं.
आज आँफिसहून तिकडेच जाण्याचं त्याने निश्चित केलं.
समीर घरी पोहचला तसा आईवडिलांनी तक्रारींचा पाढा सुरू केला.
दोघेही फक्त आणि फक्त समिराचीच चूक दाखवत होते... पण कारण वेगळंच होतं.
समीराने त्यांच्या मनासारखा पाहूणचार केला नाही त्यामुळे त्यांचा आपमान झाला असे त्यांचे मत होते..
समीर फक्त ऐकत होता... जन्मदाते ते, कसं खोटं पाडणार त्यांना??
शेवटी तोच म्हणाला, "आईबाबा ती आजारी होती तर तुम्ही थांबायच ना? ..मी घरी नव्हतो तर तुमचा आधार झाला असता.
ती मी नसतांनाही घेते ना तुमची काळजी? पण ती आजारी असून तुम्ही असे आरोप करताय म्हणजे काय बोलणार ह्या स्वभावाला? "
"अरे तू नव्हतास तर कसं राहाणार? तीचे नातेवाईक आहेत ना? ..तुझी आई कसं करणार तीचं?... सासू आहे ती.. तीच्या नातेवाईकांना बोलावायचं ना तिने.. "
समीर आता पुरता संतापला.. "बाबा अहो आपल्या घरची सदस्य आहे ती. माझी बायको आहे. ती तुमचं सारं करते माहेरच्या माणसांच नाही मग त्यांनी का करावं तिचं? "
"अरे आता तुही बोलायला लागलास... परक्या बाईसाठी ...अरे आम्ही वाढवलं तुला. दहा पंधरा वर्षात तीच तुझं सर्वस्व झाली का? आईवडिलांचा अपमान नाही दिसत तुला... "
"बाबा अहो आजारी असतांनाही तिने तुमचा आदरसत्कार केला.. ह्यातच तिच्या मनाचा मोठेपणा जाणवतो व तुमची संकुचित वृत्ती...
अहो बायको आहे ती माझी ! तिचं सर्वस्व सोडून आपल्या घरासाठी धडपडते... कोणी नाराज होणार नाही याची काळजी घेते... तुम्ही आजारी पडलात किंवा आई आजारी पडली तर सारं सोडून मदतीला येते... हे कमी आहे का?...
तरीही तुम्ही तिला परकं समजता?.. बरोबर आहे तुमचं. परकी आहे ती म्हणून तर तुम्ही तीला धीर नाही दिला. ती बरी असती व तुमचे सारे लाड पुरवले असते तर तुम्ही दोन दिवस राहिला असता मी नसतो तरी... बरोबर ना? "
"हो राहिलो असतो... पण अपमान होत असेल तिथे का थांबावं आम्ही ? "आई म्हणाली.
समीरला काय समजायचं ते तो समजला.
पण आपल्या आईवडिलांचे तिच्याबद्दल चे मत त्याने कधीच जाणवू दिले नाही.
समीरा एक दोन महिन्यात सगळं विसरली. शेवटी नवर्याचे जन्मदाते ते.... पण त्यांनी तिला शेवटपर्यंत आपलं मानलंच नाही.
समीरा सारं विसरून परत सासरी सारी करत होती... पण सासूसासरे तीला आपलं मानतच नव्हते... आता तिलाही त्यांच्याकडून मानपान किंवा दोन प्रेमाचे शब्द ऐकण्याची अपेक्षा होती... पण ते घरात घडतच नव्हतं....
सण असो किंवा तिचा वाढदिवस..., एखादा संभारंभ .. काहीही असलं तरी कधीच कौतुक होत नव्हतं तीचं... उलट ती काय विसरली व कुठे चुकली हेच बघितल जात होतं.
समीरलाही आता ते खटकत होतं.
सतत समीरामागे लागणारा, कर्तव्यात कमी पडलीस म्हणून ओरडणारा समीर आता समीराला स्वतःत रम म्हणून सांगू लागला होता.
त्याचे परिवर्तन तिलाही जाणवत होतं. पण का असं झालं असेल ह्याची तीला भनकही नव्हती... पण सुनेच्या कर्तव्यात ती कमी पडतच नव्हती.
"अहो जाऊद्या एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असतो... नाही केलं कौतुक तर काय झालं? व कौतुक केले तर काय बदल घडेल? नका पडू तुम्ही यात" असंच ती सांगत असे..
"शेवटी मी परकी आहे हो..! त्यांच्या साठी ..."
समीरला आता त्याचीही चूक कळली होती.. पण मान मिळायला हवा तीला असंही वाटत होतं.
खरंच ना किती भयानक असतात काही परिवार ! सुनेला कधीच नाही समजून घेत. किती करते ती त्यांच्या साठी पण कमीच वाटत त्यांना. आणि तीची वेळ आली कि मग काढता पाय घेतात.
आजही समाजात सुनेला आपल किती जण मानतात हो..!, काही चांगले लोकही आहेत.. जे सुनेला मुलीपेक्षाही जास्त जपतात. पण काही महाभाग सुनेची आजारपनं असो कि तीच कौतुक असो.. सगळ्याच गोष्टीत पाठीमागे असतात.
सणाला भरपूर खर्च करतील पण घरातील ह्या लक्ष्मीला आनंदी ठेवण्यासाठी एक शंभर रुपयाचे गिफ्टही देत नाहीत... वरून अपेक्षांची भलीमोठी लिस्ट व मुलाच्या संसारात नको इतकी दखल असते..
एखादी समीरासारखी दुर्लक्ष करणारी, अपेक्षा न ठेवणारी सुन असेल तर ठिक नाहीतर... ऐकून न घेणारी, सहन न करणारी सून असली कि मग यांचा इगो जास्तच दुखावतो... पोराचा संसारही तुटतो व हेही बदनाम होतात...
अहो आपलं सारं गणगोत सोडून येणारी सून तुमची लक्ष्मी असते. तिला तुमच्यात सामावून घ्या.
तीही तुमच्या घरातील सदस्य आहे तिलाही मानाने वागवा... ती अजारी पडू शकते हो..! तिला धीर द्या.... आपलेपणाने सारंच गोड होतं.. तीला फक्त आपलेपणा व दोन कौतुकाचे शब्द हवे असतात... मग ती सारं देहभान विसरून तुमच्या घरासाठी वाहुन घेते.... बघा...!
© वैशाली देवरे
सदर कथा लेखिका वैशाली देवरे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
