© कांचन सातपुते हिरण्या
"अंकिता, जास्त दगदग करू नकोस. मनुकडे लक्ष दे. मला उद्या सुट्टीच आहे. उद्या मी वाणसामान आणेल सगळं आणि दुपारी वेळेवर जेव. फोन करतोच मी. बाय मनु!"
आईच्या कडेवर असणारं मनु बाळ ऑफिसला निघालेल्या बाबाकडे बघून गोड हसलं..
अंकिता दरवाजा लावणार तेवढ्यात समोरच्या फ्लॅटमधली माधवी बाहेर आली रांगोळी काढायला .
"रोज काढता का रांगोळी ? "
"हो छोटीशी लक्ष्मीची पावलं . किती महिन्याची झाली तुमची मनू ?"
" उद्या सहा महिन्यांची होईल . अहो जाहो नका करू. तुम्हांला माधवीताई म्हटलं तर चालेल का ?"
" हो चालेल की ."
" या ना माधवीताई चहा घ्यायला ."
" नको , पुन्हा केव्हातरी येईन . सकाळी गडबड असते ना खूप ."
पण अंकिताचा आग्रह मोडवेना माधवीला .
"आले हं ."
अंकिता बघत होती , माधवीची बरीच गडबड असते वाटतं सकाळी .
रांगोळीचा डबा आत ठेवून माधवीनं कुलुप लावलं.
अंकिताला नवलच वाटलं .समोर येताना कडी लावली असती तरी चाललं असतं .
पहाटे लवकर उठलेली मनू तिच्या कडेवर झोपली पुन्हा .
तिला बेडवर ठेवून अंकिताने चहा गरम करून आणला .
"बिस्किट घ्या ना ताई ."
" अगं नको . खूप काम पडलीयेत करायची .तू आग्रह केला खूप म्हणून.."
माधवी बोलता बोलता भरभर चहाचे घोट घेत होती .
" तुमचा मुलगा कितवीत ?"
" सोहम ना , सहावीत आहे अगं . तो साडेसहाला जातो . सकाळी स्कूलबस लवकर येते ना आणि त्याचे बाबा तासाभराने निघतात ."
" मग बसा की निवांत . कामं काय होतच राहतील ."
" अगं नको दुपारी येईल कधीतरी . आता निघते ."
माधवी निघालेली पुन्हा वळली .
" छान वाटलं गं अंकिता . खूप दिवसांनी कोणीतरी असं बोललं ."
ती घाईघाईत गेली . अंकिताने तिचं आवरायला घेतलं .
" अशी काय ही गोंधळलेली ?" अंकिताच्या मनात विचार आला , बहुतेक आपण नवीन शेजारी खूप ओळख नाही म्हणून बोलली नसेल जास्त ..
मग सकाळ-संध्याकाळ माधवी समोर दिसली की अंकिता आणि तिचं बोलणं व्हायला लागलं थोडसं .
दोन दिवस बाहेर दिसलीच नाही अंकिताला माधवी . रांगोळीही नव्हती दारात .
तिसऱ्या दिवशी अंकिताला राहवलंच नाही. तिने सकाळची कामं आवरल्यावर मनूला घेतलं आणि समोरच्या दारावरची बेल वाजवली . माधवीने दार उघडलं .
" माधवीताई बरं आहे का ? येऊ का ?"
" ये ना गं अंकिता ."
माधवी खूपच गळाल्यासारखी दिसत होती .
" बस गं चहा करते ."
" नको ताई . दोन दिवस दिसली नाहीस ना , चैन पडेना मला म्हणून बघायला आले . बरं वाटत नाहीये का ? "
"अगं हो थोडी कणकण , पाळीही आलीय ना त्यामुळे .."
" मग हे काय करतीयेस तू ?"
एका सतरंजीवर गव्हाची मोठी रास होती . माधवी निवडायला बसली .
"अगं ही नेहमीचीच कामं दर महिन्याची . घरीच असते ना . दिवसभर हेच करायचं ."
बोलता-बोलता टचकन पाणी आलं तिच्या डोळ्यांत .
" नाहीये अगं घरात ."
अंकिताने तिला घरातून गोळी आणून घ्यायला लावली दूधासोबत .
थोडा वेळ बसून , माधवीला आराम करायला सांगून अंकिता निघाली पण खूप अस्वस्थ झाली ती ..
"अंकिता येतेस का थोडा वेळ बसायला ?"
अंकिताला जरा काम होतं पण आज स्वतःहून माधवीने बोलावलं म्हणून मग तीही गेली .
" कुठून सुरुवात करू कळत नाही पण तुला सांगावसं वाटलं म्हणून.."
आणि पुढचा कितीतरी वेळ माधवी बोलत राहिली अन् अंकिता ऐकत ..
माधवीकडे इंटिरियर डिझायनरची डिग्री होती . शिक्षण पूर्ण झालं लगेच मोहनचं स्थळ आलं .
लग्न ठरताना ,"तू नोकरी केलीस तरी माझी काहीच हरकत नाही असं सांगितलं खरं यांनी .
पण हळूहळू त्यांच्या वागण्यातून जाणवलं त्यांना शिक्षित असलेली बायको हवी होती पण...मी घर सांभाळायला हवं होतं.
वर्षभरात शुभमचा जन्म झाला आणि यांना बरंच वाटलं ,आता ही पूर्ण गुंतली म्हणून माझी इच्छाही मनातच राहिली गं मग .
काही वेगळेपण राहिलंच नाही गं आयुष्यात . दिसताना सुशिक्षित दिसणार्या कुटुंबात आत काय चाललंय बाहेर कोणाला माहित असणार ना ?
आणि या वळणावर आता किती आणि काय वाद घालणार कुणाशी ?
अजून काही वर्षांनी शुभम त्याचं स्वतंत्र आयुष्य जगू लागेल , या माणसाला कशाचा काहीच फरक पडत नाही पण माझं काय ?
सहचारिणीसारखं वागवणं नाही , गृहिणी म्हणावं तर माझं सर्वस्व दिलंय तरीही या माणसाला त्याची जाण नाही ..
माधवी बोलायची थांबली .
" नको ताई , येते आता . खूप वेळ झाला ." डोळ्यातलं पाणी अडवून अंकिता निघाली.
"अंकिता भेटू उद्या सकाळी ." माधवीकडे वळून पाहिलं तेव्हा तिच्या नजरेत खूप काही साठलेलं दिसत होतं अजूनही .
" हो ," म्हणून अंकिता घरी आली.

अंकिताकडे बघून हसली .

अंकिताने मनूला खाली ठेवलं आणि तिच्याजवळ गेली. तिच्या खांद्यावर हात ठेवला तर रडायलाच लागली ती अंकिताच्या गळ्यात पडून ..
" माधवीताई अगं ताप भरलाय केवढा अंगात ? काय चाललंय तुझं हे ? गोळी घेतलीस की नाहीस ?"
" माधवीताई अगं ताप भरलाय केवढा अंगात ? काय चाललंय तुझं हे ? गोळी घेतलीस की नाहीस ?"
" नाहीये अगं घरात ."
अंकिताने तिला घरातून गोळी आणून घ्यायला लावली दूधासोबत .
थोडा वेळ बसून , माधवीला आराम करायला सांगून अंकिता निघाली पण खूप अस्वस्थ झाली ती ..
दुसऱ्या दिवशी सकाळी माधवी रांगोळी काढताना दिसली . अंकिताला बरं वाटलं .
"अंकिता येतेस का थोडा वेळ बसायला ?"
अंकिताला जरा काम होतं पण आज स्वतःहून माधवीने बोलावलं म्हणून मग तीही गेली .
" कुठून सुरुवात करू कळत नाही पण तुला सांगावसं वाटलं म्हणून.."
आणि पुढचा कितीतरी वेळ माधवी बोलत राहिली अन् अंकिता ऐकत ..
माधवीकडे इंटिरियर डिझायनरची डिग्री होती . शिक्षण पूर्ण झालं लगेच मोहनचं स्थळ आलं .
सुशिक्षित स्थळ असल्यामुळे नकार द्यायचं कारणच नव्हतं . सासू-सासरे गावीआणि हे दोघे इकडे शहरात . सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं .
लग्न ठरताना ,"तू नोकरी केलीस तरी माझी काहीच हरकत नाही असं सांगितलं खरं यांनी .
पण हळूहळू त्यांच्या वागण्यातून जाणवलं त्यांना शिक्षित असलेली बायको हवी होती पण...मी घर सांभाळायला हवं होतं.
त्यांचं सगळं जिथल्या तिथं करायचं ..नाश्ता ,जेवण , इस्त्रीचे कपडे , घर नीटनेटकं ठेवणं ..
वर्षभरात शुभमचा जन्म झाला आणि यांना बरंच वाटलं ,आता ही पूर्ण गुंतली म्हणून माझी इच्छाही मनातच राहिली गं मग .
हा एक भाग झाला , पण या माणसाकडे रसिकता नावाची गोष्ट किंचितही नाही गं . स्वभावही खूप तापट .कधी फिरायला नेणं नाही ,सुट्टीतही चार दिवस सासरी ,चार दिवस माहेरी .
काही वेगळेपण राहिलंच नाही गं आयुष्यात . दिसताना सुशिक्षित दिसणार्या कुटुंबात आत काय चाललंय बाहेर कोणाला माहित असणार ना ?
दिसताना सगळं छान , सुखासुखी दिसतं , त्यामुळं सगळ्यांना मीच एकलकोंडी ,माणूसघाणी वाटते .पण माझी घुसमट कोणाला कळणार ?
आणि या वळणावर आता किती आणि काय वाद घालणार कुणाशी ?
अजून काही वर्षांनी शुभम त्याचं स्वतंत्र आयुष्य जगू लागेल , या माणसाला कशाचा काहीच फरक पडत नाही पण माझं काय ?
सहचारिणीसारखं वागवणं नाही , गृहिणी म्हणावं तर माझं सर्वस्व दिलंय तरीही या माणसाला त्याची जाण नाही ..
माधवी बोलायची थांबली .
अंकिताला काहीच सुचत नव्हतं एवढं सगळं ऐकल्यावर कसं समजवायचं माधवीला .
तिची मनू कंटाळून रडायला लागलेली . माधवीचा शुभमही शाळेतून आला .

"अंकिता जेवतेस का गं थोडं ?"
" नको ताई , येते आता . खूप वेळ झाला ." डोळ्यातलं पाणी अडवून अंकिता निघाली.
"अंकिता भेटू उद्या सकाळी ." माधवीकडे वळून पाहिलं तेव्हा तिच्या नजरेत खूप काही साठलेलं दिसत होतं अजूनही .
" हो ," म्हणून अंकिता घरी आली.
"किती फरक माणसा माणसांच्या स्वभावात , वृत्तीत . माझा अमेय मला किती स्वातंत्र्य देतो प्रत्येक गोष्टीत . खऱ्या अर्थाने सहजीव आहोत आम्ही . मग माधवीचं असं का ? काही गोष्टी कधीच बदलणार नाहीत का ? अंकिताचं विचारचक्र थांबतच नव्हतं .
वाचकहो , महिला दिनाच्या दिवशी महिलांवर शुभेच्छांचा पाऊस पडला .असाच एक सुविचारही वाचण्यात आला .
गृह जिचे कायम ऋणी ती गृहिणी . वाचताना किती छान वाटतो पण खरोखर विचार करावा असा ..
© कांचन सातपुते हिरण्या
वाचकहो , महिला दिनाच्या दिवशी महिलांवर शुभेच्छांचा पाऊस पडला .असाच एक सुविचारही वाचण्यात आला .
गृह जिचे कायम ऋणी ती गृहिणी . वाचताना किती छान वाटतो पण खरोखर विचार करावा असा ..
© कांचन सातपुते हिरण्या
सदर कथा लेखिका कांचन सातपुते हिरण्या यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.