©® सौ.दिपमाला अहिरे.
"तुला काय कमी आहे? प्रशांत ची इच्छा नसेल तर तो नाही करणार काम, बंगला, गाडी सर्व काही आहे त्याचं .त्याला काय गरज काम करण्याची?" स्वाती प्रशांत ला पुन्हा पुन्हा मुलीला घेऊन माहेरी जाण्याची धमकी द्यायची.
"अगं सुनबाई जरा आमचं ही म्हणणं ऐकून घे. एवढ्या तावातावाने निर्णय घ्यायचे नसतात. जरा शांत डोक्याने विचार कर" स्वातीच्या सासुबाई तिला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या.
पण ती मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत बॅगेत कपडे भरत होती.
मुलगी इशाला कडेवर घेऊन, दुसऱ्या हातात बॅग घेऊन ती कुणाशीही काही न बोलता सरळ रुमच्या बाहेर निघते. तिच्या मागे मागे सासु ही जाते.
बाहेर हॉलमध्ये सासरे आणि नवरा प्रशांत बसलेले असतात. सासु तिच्या विनवण्या करत होती.
हे पाहून प्रशांत आपल्या आईला आडवत बोलतो, "जाऊ दे आई तिला. कशाला तिच्या विनवण्या करते आहेस तु? घर सोडून जाण्याचा निर्णय तिचा आहे ना? आपण सांगितले का तिला घरातुन जायला.केवढा माज आहे तिला बघितलं का तिच्या एवढ्याशा छोट्याशा नौकरीचा? नको अडवु तिला जाऊ दे . येईल आपोआप परत.हौस फिटली की."
स्वाती हातातली बॅग खाली ठेवते प्रशांत कडे वळते आणि बोलते " मला नौकरीचा माज नाही. पण तुम्हांला तेवढी छोटीशी नौकरी तरी आहे का? याचा विचार करा वर तोंड करून बोलायला काहीच वाटत नाही का तुम्हांला?"
सासरे ताडकन उभे राहतात आणि स्वातीला बोलतात "जरा तोंड सांभाळून बोल सुनबाई. विसरु नको कसाही असला तरी नवरा आहे तो तुझा. आणि हे काय लावलय तुम्ही? जरा काही झालं की, माहेरी जाण्याची धमकी देतात.

बाई माणसाला शोभतं का असं वागणं??
पदरात एक मुलगी आहे तिचा तरी विचार करायला हवा की नको? मी म्हणतो काय कमी आहे तुला ? सर्व तर वेळेवर मिळतं ना? बरं तुला नौकरी करायची आहे.ती पण मोकळीक तर दिली आहे तुला.अजुन काय केलं पाहिजे?"
स्वातीला आता काय बोलावे तेच सुचत नव्हते.पण गेली पाच वर्षे तडजोड केल्यानंतर आज मोठ्या हिंमतीने हा निर्णय घेतला होत आणि आता तिला त्या निर्णयावर ठाम रहायचे होते. म्हणुन मोठ्या हिंमतीने तिने सासऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.
"तुम्ही बोलताय त्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत बाबा, मुलगी आहे मला एक. तिचा तरी विचार करायला हवा मी? पण मीच का तुमच्या मुलाने एक बाप म्हणून नको का विचार करायला तिच्या भविष्याचा,आयुष्याचा तिच्या शिक्षणाचा? दरवेळी तुम्ही मला हेच तर सांगुन अडवतात आणि मुलाच्या चुकांवर पांघरूण घालतात.

पण असं किती दिवस चालणार आहे? तुम्ही काय आयुष्यभर तुमच्या मुलासाठी आणि नातीसाठी राहणार आहात का? कधीतरी तुमच्या मुलाला त्याची जबाबदारी घ्यावी लागेलच ना? पण नाही तुमची चुकी नाही, चुकी तर आमची आहे! माझ्या वडिलांची आहे, माझी आहे.
जे तुमच्या वरवर दिसणाऱ्या भपकेबाज पणाला आंम्ही भुललो. वास्तव काही वेगळेच असेल हे वाटले नव्हते आम्हाला. बड्या घराचा पोकळ वासा असेल असा कधी विचारही केला नाही आंम्ही. आणि तुमच्या कडे पाहून माझ्या आईवडिलांनी माझं लग्न तुमच्या घरात करुन दिले. हिच चुकी झाली आमची."
प्रशांत स्वाती ला मध्ये मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करत होता पण स्वाती आज कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

"बाबा आता जेव्हा प्रशांत काही काम करतील त्यांचे स्वतः चे घर घेतल्यानंतर आंम्हाला घ्यायला येतील .तेव्हाच मी परत येईन.!"
एवढे बोलून स्वाती मुलीला घेऊन तेव्हाच्या तेव्हा घरातुन निघुन आपल्या माहेरी गेली.
ती माहेरी येणार आहे याची कल्पना आईवडिलांना आधीच होती. म्हणुन तिला कुणीही काहीही विचारले नाही. पण वडिलांना आपल्या मुलीच्या भविष्याची काळजी लागली होती.
स्वाती तेवढीच खंबीर होती. पुढे काय करावे,कसे करावे हे तिने आधीच ठरवून ठेवले होते.
रात्री ईशा जेवण करून झोपली होती. स्वाती तिच्या निरागस चेहऱ्याकडे पहात होती आणि आपल्या भुतकाळात हरवुन गेली.
स्वाती स्वतः बी.टेक.इंजिनीअर. लहान पणापासून अभ्यासात हुशार होती.आयुष्यात काही तरी चांगले करण्याची इच्छा होती तिची म्हणून मध्यमवर्गीय घरातील असुनही आपल्या हुशारीच्या आणि बुद्धीच्या जोरावर तिने इंजिनिअरिंग करुन ती एका इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून नौकरी करत होती.
भविष्या विषयी तिचे स्वतः चे असे ठाम विचार, निर्णय आणि महत्वकांक्षा होत्या. म्हणुन तिने आपल्या वडिलांना सांगुन दिले होते की, माझ्या साठी लग्नाला मुलगा पहाल तर तोही माझ्या सारखा खंबीर, महत्वाकांक्षी असला पाहिजे.
याच गोष्टीचा विचार करुन वडिलांनी सुद्धा स्वाती साठी तसा मुलगा आणि परीवार शोधला होता. त्यांचा एक शाळेतला मित्र होता. शामराव स्वतः क्लास वन अधिकारी होता. त्यांंचा मुलगा प्रशांत कॉम्प्युटर इंजिनियर होता.

शामरावांचे समाजात मोठे नाव होते.प्रशांत त्यांचा एकुलता एक मुलगा.घरदार परीवार सर्व काही एकदम परफेक्ट. स्वातीला पहायला आले तेव्हाच शामरावांनी सांगुन टाकले "हे बघ स्वाती बेटा तुला आमच्या घरात पुर्ण स्वातंत्र्य असेल.तुला काय शिकायचं,कुठे नौकरी करायची, तुझ्या आयुष्याचे सर्व निर्णय तु स्वतः तुझ्या मर्जीने घेऊ शकतेस.आपल्या घरातुन तुला पुर्ण पाठींबा असेल." हेच तर हवे होते स्वातीला.
अशाच पुढारलेल्या विचारांचे लोकं आणि घर. म्हणून स्वातीनेही लगेच लग्नाला होकार दिला.
एका महिन्याच्या आत स्वाती प्रशांतचे लग्न झाले.
प्रशांत स्वतः एका चांगल्या मल्टी नॅशनल कंपनीत इंजिनिअर होता. पण ही त्याची गेल्या वर्षभरात तिसरी नोकरी होती. त्याचा स्वभाव जरा विचित्र होता.
अधिकाऱ्याचा मुलगा असल्याने तो स्वतःला एखादा राजकुमार समजायचा. त्यामुळे कुणीही ,काहीही बोलले तर त्याला सहन व्हायचे नाही. कुणी काही काम सांगितले तरी त्याला आवडत नसे.

वडिलांनीही त्याला लहान पणापासून खुपच लाडावुन ठेवले होते.
ऑफिस मध्ये वेळेवर न जाणे, उशीरा पर्यंत झोपुन राहणें, कामाकडे दुर्लक्ष करणे, जास्तीत जास्त सुट्ट्या घेणे.या सर्व सवयींमुळे त्याचा कुठलाही जॉब जास्त दिवस टिकत नसे.

स्वाती ला या गोष्टी लग्न झाल्यावर समजल्या आणि सुरवातीपासूनच ती या सर्व वाईट सवयी सोडण्यासाठी प्रशांतच्या मागे लागली. पण दरवेळी शामराव प्रशांत चे वडील तिला शांत बसवुन देत.
अशातच लग्नाला दोन वर्षे झाली.स्वाती प्रशांतला मुलगी झाली. ती एक वर्षांची झाली. पण तरीही प्रशांत च्या वागण्यात कुठेही काहीही बदल दिसत नव्हता.

शेवटी स्वातीला ज्या गोष्टीची भिती होती तेच झाले. प्रशांत चा जॉब गेला. त्याला सरळ कामावरून हाकलून दिले.पण प्रशांत ला आणि त्याच्या आईवडिलांना या गोष्टीचा काही फरक पडला नाही.
जवळ जवळ एक वर्ष प्रशांत काहीही काम न करता फक्त घरी बसुन होता. खाणं, पिणं, मित्रांसोबत पार्ट्या करणं त्याचे आयुष्य मजेत जात होते. पण स्वातीला ही गोष्ट अजिबात पटत नव्हती. जेव्हा जेव्हा ती प्रशांत ला बोलायला जायची तेव्हा त्याचे वडील मध्ये यायचे.
"तुला काय कमी आहे? प्रशांत ची इच्छा नसेल तर तो नाही करणार काम, बंगला, गाडी सर्व काही आहे त्याचं .त्याला काय गरज काम करण्याची?" स्वाती प्रशांत ला पुन्हा पुन्हा मुलीला घेऊन माहेरी जाण्याची धमकी द्यायची.
कमीत कमी त्यामुळे तरी तो सुधारले असे तिला वाटायचे.पण त्या गोष्टीचा ही प्रशांतला काही फरक पडत नसे. अशातच पाच वर्षे निघून गेले.
आता स्वातीची सहनशक्ती संपली होती.तिला असा नवरा नको होता.जो फक्त बापाच्या पैशावर आयुष्य जगतो आणि आपल्या बायको मुलीलाही जगवतो.
ज्याचं काही भविष्य नाही,की, भविष्या विषयी,मुलीविषयी काहीही महत्वकांक्षा, विचार नाही.
तिने एका अधिकाऱ्याच्या कॉम्प्युटर इंजिनियर मुलाशी लग्न केले होते.या अपेक्षेने की,तोही त्यांच्या वडिलांप्रमाणे समाजात स्वतःची ओळख निर्माण करेल.तेही स्वतः च्या बळावर पण वास्तवात मात्र काही तरी वेगळीच निघाली. या बड्या घरचा असा पोकळ वासा असेल असे तिला कधीच वाटले नव्हते!!

समाप्त
(वरील कथा आणि कथेतील पात्रे पुर्णपणे काल्पनिक आहेत.तरी कुणाच्या आयुष्याशी मिळता जुळता प्रसंग असेल तर केवळ योगायोग समजावा.)
©® सौ.दिपमाला अहिरे.
(वरील कथा आणि कथेतील पात्रे पुर्णपणे काल्पनिक आहेत.तरी कुणाच्या आयुष्याशी मिळता जुळता प्रसंग असेल तर केवळ योगायोग समजावा.)
©® सौ.दिपमाला अहिरे.
सदर कथा लेखिका सौ.दिपमाला अहिरे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा