फ्रेंड रिक्वेस्ट

©® सौ. प्रतिभा परांजपे.



डोळ्यातल्या पाण्याच्या पडद्या आड दिसणार्‍या त्यांच्या फोटोकडे  उज्वला पहात होती. तेच मिस्किल डोळे ज्यांच्या प्रेमात ती पडली. 

पडली???? नाही– नाही त्याने तिला आपल्या गोड शब्दांच्या जाळ्यात ओढले आणि ती अलगदपणे त्यांच्या डोळ्याच्या खोल डोहात पार बुडून  गेली.


तू मला पाहिल्याबरोबर च आवडली माझे "लव्ह एट फर्स्ट साईट आहे"असे तो वारंवार म्हणायचा.

एकदा तिने विचारले, फर्स्ट साईट? पण आपण कुठे पाहिले मला ?

तुझा फोटो पाहिला ना! फेसबुक वर!

 फोटो ? अरे फोटो फसवे असतात आजकाल कितीतरी ट्रिकी फोटो काढतात ते काही खरे---!

पण तो ऐकतच नसे!

खरं तर तिला त्याचे बोलणे आवडू लागले होते जेव्हा साठ वर्षाच्या प्रकाश ने  55 च्या उज्वला ला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.


तुम्ही फारेन रिटर्न इतके शिकलेले बिझनेस मॅन मी साधी ग्रजुएट. आपण कसं काय मैत्री  संदेश दिला? तिने शंका काढली..

'अस काही गणित नसतं मॅम.' प्रकाशच्या या एका वाक्याने तिला आपलस केलं.

दोघं रोज मेसेंजर वर भेटत! सुरुवातीला तो खूप आदबिने बोलायचा मॅम म्हणायचा.

पण मग हळूहळू तू वर आला तू माझी बेस्ट फ्रेंड म्हणायला लागला.

तिलाही त्याचे बोलणे आवडू लागले.


प्रकाश त्याचा बिझनेस त्याचे घर ,मुलगा  बायको सर्व तिच्याशी प्रामाणिकपणे शेअर करू लागला.
उज्वला ही आपल्या हॉबी  नवरा मुलगा, काम सर्व सांगू लागली.


गुड मॉर्निंग ते गुड नाईट चे फोटो, मेसेजची उधळण होऊ लागली.

हळूहळू राधाकृष्णा चे रोमँटिक फोटो तो तिला पाठवू लागला हळूहळू त्याचे मन तिला कळू लागले सुरुवातीला तिला अवघडले पण येत असे पण मग मन त्याच्यावर विश्वास ठेवू लागले, कुठेतरी त्याला हवा असलेला रोमँटिक संवाद घडू लागला.  

ती त्याची रोज वाट पाहू लागली.


हळूहळू तीही मोकळी होऊ लागली. त्याच्या बोलण्याला त्याला आवडेल असा रिस्पॉन्स देऊ लागली. 

मैत्रीच्या गाडीने ट्रॅक बदलला.

तुझ प्रेम आहे माझ्यावर? त्याने सरळ विचारले!

या प्रश्नाला ती घाबरायची! स्वतःशी कबूल करायला मन  तयार नव्हते. घरात नवरा मुलं असताना?

पण तो अडूनच बसायचा. सांग ना ग तू माझी राधा मी तुझा कोण?


 'काय सांगू रे माझे मलाच कळत नाही !

पण तू एक दिवस जरी आँनलाईन दिसला नाही, तुझा फोन आला नाही की जिवाची तगमग होते, दिवसातून चार वेळा फोन उचलून पाहते.

" यही तो प्यार है" तो उत्साहाने म्हणायचा !

असेच दिवस भुर्रकन उडत चालले होते..


नवीन वर्ष आले तिने त्याला आपल्या भेटीला बरोबर एक वर्ष झाले म्हणून ग्रीटिंग पाठवले. 

त्याने तिला आपल्या फॅमिलीचा फोटो पाठवला. बायको सुंदर आहे. पण मग?

एकदा तो म्हणाला " हा आता तू मला हवी तशी वागते."

 वागते‌?म्हणजे ??

म्हणजे सुरुवातीला तू खूप खडूस होती.

 खडूस होती--? तिला हसू आले.

 खडूस-- मग आता कशी?

अशी म्हणून त्याने ओठाच्या आकाराचे इमोजी पाठवले.

इश्य ति लाजली!

तू शिकवलं रे सगळं ,"तू माझा लव्ह गुरु"उज्वला ने कबूल केले 


मग काय गुरुदक्षिणा देते? प्रकाश ने विचारले.

काय हवं?

"ते दूध तुझ्या त्या घटातले" तो अगदीच बेभान झाला!

हे फार झालं  ,तिने रागावून म्हटले!

तशी नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनु कंपा म्हणत हात जोडलल्या  ईमोजी ची बरसात!...मग तिने लाजून फोन ऑफ केला…


सकाळ पासून तो ऑफलाईन.. असेल कामात .इतक वेड बरोबर नाही– तिने मनाला दटावल!

संध्याकाळी त्याने आपल्या बायको बरोबरचे फोटो पाठवले. आज हाॅटेलात जेवण–मेरेज एनइवर्सरी आहे केक कापताना चे फोटो.

मनातून ती दुखावली पण् तरीही तिने लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

त्याची बायको…. तिने लक्ष देऊन पाहिल छानच आहे मग काय असावं??

रात्री तिने विचारलेच ‘ बायको खूप  सुंदर आहे रे तुझी!!

त्याने नुसते हं.. असे म्हटले!

काय बिनसले तुमचे?’


‘बरच काही, ती आणि मी दोघच घरात पण सेपरेट बेडरूम १२ वर्ष झाली. त्याने आपल्या बेडरूम चा फोटो तिला पाठवला.’

पण् –तुमचे लव मॅरेज आहे! मग?

हो,-- पण सांगेन कधीतरी ! खूप मोठी स्टोरी आहे! म्हणून त्याने विषय बदलला. व इतर खोल्यांचे फोटो तिला पाठवले खूपच नीट नेटक  छान असं घर होतं त्याचं.

त्याला अपसेट पाहून मग तिने विषय बदलला पण त्याचा मूड गेला त्यांनी फोन ऑफ केला…

पण खरे कारण कधीच कळले नाही.


एक दिवस म्हणाला आज तिला दवाखान्यात घेऊन गेलो होतो

कां काय झाले ?

दोन वर्षांपूर्वी तिला कॅन्सर डिटेक्ट झाला होता त्यातुनआता बरी आहे पण मधून मधून चेकअप करता . म्हणून आता मी तिला खूप जपतो. त्याने तिच्या बद्दल असलेल प्रेम व्यक्त केलं.

असेच दिवस जात होते

काही दिवस झाले, उज्वला ला ही बरे नव्हते त्याने प्रेमाने विचारपूस केली, खूप काम पडतं? थकून जातेस का? तिला भरून आल किती काळजी करतो हा दूर असूनही.


कधीकधी  उज्वला आपल्या कामात बिझी मग त्याचा मेसेज…’ आवरल की नाही  ग तुझ?’

किती  वाट पहातो हा! मग तिनं उरलेला वेळ त्याला देऊन टाकला..

त्याचे काम त्याची हुशारी, प्रगती सगळं तो सांगत असे. मधल्या काळात लाॅस झालेला हे ही.त्या नंतर हळूहळू परत जम बसायला लागला त्याचे श्रेय तो तिला देई’

तू माझ्या आयुष्यात आली नी आता सर्व छान ‘..

ती म्हणे– ‘ती तुझी मेहनत,पणअती काम नको करू थोडा आराम हवा.’

‘मला घरी बोर होत, तू ये ना इथे ‘त्याचा आर्जव’

तिला चालेल?काय नातं सांगणार?


“घाबरत नाही मी, खूप सुखात ठेवेन ग तुला..’!

उज्वला ला ठाऊक होते  ती ही या घराची चौकट सोडून जाऊ नाही शकणार, आणि त्याला ही ते महागात पडेल,त्याची प्रतिष्ठा, त्याचे वैवाहिक जीवन सगळंच विस्कटले!’


सगळं समजतं होत पण उमजत नव्हतं,मन त्याच्या कडे धाव घेतच राहिलं… 

मग अस अचानक काय झाले? त्याने काही न सांगता अचानक  तिला ब्लाॅक केलं?

तिला हे समजायला ही दोन तीन दिवस लागले, तिने बरेच वेळा वाट्स एप काॅल ही केले त्याच्या नंबर वर फोन, पण दरवेळी कव्हरेज क्षेत्र च्या बाहेर, रेंज मध्ये नाही हेच ऐकायला मिळाले.

तिला कळेनासे झाले काल तर बोलत होता तेव्हा पुसटशी ही कल्पना दिली नाही? बर वाटत नाही बी.पी वाढलंय तेवढंच बोलला..

तिने काळजी पोटी त्याला झोप आता, औषध घे,आपण उद्या बोलू असा मेसेज टाकला. 

पण् तो उद्या कधीच आला नाही त्याने तिला सोडले,


उज्वला लादुःखा पेक्षा काळजी जास्त वाटू लागली–तब्येत बरी नव्हती, काही कमी जास्त तर? नको रे देवा तो सुखरूप असू दे, भले ही  तो माझ्या पासून दूर असो पण् नीट असो तिने तिच्या इष्ट देवाला प्रार्थना केली..


जसे जसे दिवस जाऊ लागले तिची मनस्थिती बिघडू लागली. ती त्याच्या नंबर वर कॉल करे पण नुसती रिंग वाजे. 

तिकडून काहीच रिस्पॉन्स नाही.


असं का केलं त्यांनी ? सोडायचं होतं, ब्रेकअप हवा होता तर सांगून बोलून बाजूला झाले असते. तिनेही समजून घेतले असते, स्वीकारले असते,  कधी तरी हे घडले च असते. पण हे असं न सांगता?


कुठेतरी आपला वापर केला ही भावना तिला त्रास देत होती. आपणच मूर्ख त्याच्या बोलण्यात अडकलो, 

इतरांकडून अश्या रिलेशनशिप बाबतीत बरेच ऐकले होते पण तो असा नाही ये हा विश्वास होता पण मग?

तिच्यातला त्याचा इंटरेस्ट संपला कि काय, कि नवीन कोणी भेटली?

 तो– त्याला काहीच फरक नाही पडला. असे एक मन म्हणे तर दुसरीकडे मन मानत नसे, नाही तो असा नव्हता ,खूप मनापासून प्रेम केलं तिने. नक्कीच काहीतरी अडचण असेल, तो नाही विसरणार मला, अशी मनाची तिने समजूत काढली..


कारण काहीही असो आता त्या सर्वातून तिला बाहेर पडायचे आहे, येणार्‍या बर्‍याच रात्री त्याच्या आठवणीत जाणार..

त्याला येईल माझी आठवण? इतका निष्ठूर नसावा…

अजुनही मनाला वेडी आशा आहे कधी तरी तो फोन करेल, तिच प्रेम असे हरणार नाही, ह्याचं आशेवर ती आहे…

आता एक नक्की –नवीन फ्रेंड रिक्वेस्ट आली  तर लगेच. डिलीट…


सौ. प्रतिभा परांजपे 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने