वेगळं प्रेम


© स्वामिनी(अस्मिता) चौगुले




त्याने तिला कॉलेजच्या पहिल्याच दिवशी पाहिले.
तिला पाहून त्याचे हृदय मात्र हरवलेले.

तिच्या मागे मग मजनू तो बनला.
मागे पुढे तिच्या भ्रमरा परी फिरू लागला.

माझं खरं प्रेम आहे परी-परीने तिला पटवू लागला.
तिचा मात्र त्याला नकार ठरलेला.

ती म्हणे त्याला तू तर एक भ्रमर आणि मी फुल.
करशील मधूरसपान आणि जाशील तू दूर!

त्याचे उत्तर माझं आहे प्रेम तुझ्यावर खरं 
माझ्या गळ्यात असेल तुझाच सुर!

याच हो-नाहीत वर्ष गेले सुरून.
नाही म्हणता म्हणता तिचं ही मन त्याच्यावर जडू लागले..
तिला तर कळेच ना हे काय घडू लागले.

शेवटी दोघांचे ही जुळलेच सूर!
एकमेकांना पाहून धडधडू लागले दोघांचे ही उर!

जमलीच पहा राघुमैनेची जोडी!
दोघांना ही लागली एकमेकांची गोडी!

कॉलेजचे दिवस होते गोडी गुलाबीचे.
एकमेकांन सवे सुख स्वप्ने पाहण्याचे.

त्याचा आणि तिचा गुंतला होता एकमेकांन मध्ये जीव!
पण वेळ कधी करत नाही कोणाची ही कीव!

कॉलेजचे दिवस भुरकन उडून गेले.
मग स्वप्नांच्या दुनियेतून दोघे खऱ्या जगात उतरले.

ती होतीच त्याच्या पेक्षा स्मार्ट नी हुशार!
म्हणून तर मिळाली ना तिला नोकरी लगेच थोड्याच प्रयत्नात!

तो मात्र नोकरीसाठी उंबरे झिजवू लागला.
पण नोकरी काही त्याला कुठेच मिळेना.

दोघे जेव्हा भेटायचे तेंव्हा तो तिच्यावर चिडू लागला.
स्वतःचे फस्ट्रेशन तिच्यावर काढू लागला.

ती बापाडी निमूटपणे ऐकून घेई
काय करणार बिचारी जीव जडला होता त्याच्या पाई!

एक दिवस तिला तो भेटला.
आणि माझ्या कडून सगळं संपले म्हणून निघून गेला!

ती बिचारी खूप रडली
पण तो परत येईल ही आशा नाही तिने सोडली!

एक दिवस त्याचा तिला मेसेज आला मी गाव सोडतो म्हणून तो सांगून गेला.
पण तिने तरी आशा नाही सोडली येईल परतून तो असे ती बोलली.

तिकडे तो नव्या शहरात गेला आणि शहरा बरोबर त्याचे नशीब ही बदलले.
कमी पगाराची का असेना त्याला नोकरीला लावले.

पण त्याच्या मनातून तिची आठवण नाही गेली.
त्याला वाटे कधी तिला फोन करावा!
पण मन कच खाई ती विसरली असेल आपल्याला!

असेच दिवस पंख लावून उडून गेले
त्याला गाव सोडून पाच वर्षे उलटून गेले.

आई वडिलांनी लावला त्याला लग्नकर म्हणून तगादा.
शेवटी त्याने केले लग्न आणि संसार थाटला.

हळू हळू तो ही संसारात रमू लागला.
तो तिच्या आठवणीत मात्र झुरत राहिला.

पण ती ही रमली असेल संसारात तो मनाची समजून घाली.
अशीच संसारात बरीच वर्षे सरली!
त्याच्या संसार वेलीवर दोन गोंडस फुले उमलली!
आता त्याने पन्नाशी पार केली.
संसार गाडा ओढताना तिच्या बद्दलची हूर हूर विरली!

एक दिवस त्याचा जुना मित्र त्याला शोधत आला.
त्याला अपार आनंद झाला पाहून मित्राला!

मित्र मात्र होता भलताच घाईत.
चल आपल्याला निघावे लागेल आहे फ्लाईट!

त्याने चकित होऊन विचारले कुठे जायचे इतके तातडीत!
मित्र म्हणाला घडू नये ते घडले आहे.
तुझ्यासाठी कोणाचा तरी जीव घुटमळतो आहे

अजाणतेपणी तो म्हणाला कोण असणार माझे तिथे जीव कोणाचा घुटमळनार आहे!
मित्र उत्तराला अरे किती स्वार्थी आहेस तू तिला किती सहज विसरलास!

तिने मात्र तुझ्या प्रेमात अख्खे आयुष्य वेचले!
तू मात्र तिला वळून एकदा ही नाही पाहिले!

तिने मात्र तुझ्या प्रेमाचा दिवा हृदयात तेवत ठेवला!
आज पर्यंत ती एकटीच जगत राहिली.

आता मात्र ती खूप आहे रे खंगली!
आता तिला कॅन्सरने आहे गाठली!
तिची शेवटची इच्छा आहे तुला एकदा भेटायची!

हे सगळं ऐकून तो खाली बसला.
मोठं मोठयाने पश्चातापाणे रडू लागला.
आपण किती चुकलो याचा त्याला अंदाज आला.

पण आता कोणत्याच गोष्टींचा काहीच उपयोग नव्हता.
हातून आता वेळ निघून गेला होता.

मित्र म्हणाला सावर स्वतःला!
वेळ कमी आहे निघायचे आहे आपल्याला!

मित्र आणि तो पोहचले दवाखान्यात.
तिच्या रूम बाहेर तो मात्र थबकला.
त्याचे हृदय लागले खूप धडधडायला.
 
हळूच त्याने रूम मध्ये डोकावले.
तर पाहून तिचा चेहरा उष्ण अश्रु वाहू लागले.

इतकी सुंदर ती तिची रया गेलेली.
आजाराने तिची कांती पूर्ण बदलेली.

तो हळूच तिच्या रूम मध्ये गेला
चाहूल लागताच त्याची तिने डोळे उघडले

त्याला पाहून ती थोडंस हसली तिच्या निश्तेज डोळ्यात वेगळीच चमक त्याने पाहिली.

तो तिच्या जवळ जाऊन बसला.
तिचा हात हातात घेऊन तो रडू लागला.

ती मात्र त्याला डोळे भरून पाहत होती.
अनेक वर्षांची तिची तहान भागवून घेत होती.

त्याला तिने हातानेच जवळ बसायला लावले.
त्याच्या मांडीवर तिने तिचे डोके ठेवले.

तो मात्र नुसता रडत होता.
अश्रूंनी त्याच्या तिचे गाल भिजवत होता.

ती काही वेळातच शांत झाली.
त्याच्या मांडीवर तिची प्राणज्योत मालवली.

तो मात्र त्या नंतर वेडापिसा झाला.
जगण्यात त्याला आता रस नाही राहिला.
तिची समाधी त्याने त्याच्या अंगणात बांधली.
रोज तिथे बसून तिची माफी मागितली.

जगणे त्याचे आता ओझे झाले.
पण जबाबदारीने कुटूंबाच्या त्याने शरीर ओढले.

मन त्याचे कधीच तिच्या बरोबर निघून गेले.
आता फक्त शरीर मात्र बाकी उरले.

कुटुंबासाठी तो सात वर्षे जगला 
एक एक दिवस त्याने रडून रडून काढला.

एक दिवस मुलगा आला आनंदाची बातमी घेऊन.
बाबा मला नोकरी मिळाली सांगू तो लागला!
त्याला मात्र या गोष्टीचा भलताच आनंद झाला.

त्याला आज मुक्तीचा मार्ग दिसू लागला.
तो गुलाबाचे फुल घेऊन तिच्या समाधीपाशी गेला.
तिच्या समाधीवर त्याने त्याचा जीव सोडला.

तो गेला स्वर्गात!
पाहतो तर काय ती हसत उभी होती स्वागताला!
ती त्याला म्हणाली किती रे वाट तुझी पाहिली!
आता मी तुझ्यासाठी दुसरा जन्म घ्यायला मोकळी झाली!

त्याच दिवशी एकाच वेळी जन्म दोघांनी घेतला!
त्याने आणि तिने प्रेमाचा नवीन डाव मांडला!

( एक हटके प्रयत्न म्हणून ही काव्यात्मक कथा लिहिण्याचा घाट! आवडली का कथा? आणि जमली का नक्की सांगा)
(सदरचे लेखन कॉपी राईट या कायद्या अंतर्गत येत असून लेखकाच्या नावा शिवाय कोठेही पोस्ट करू नये . साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे)

© स्वामिनी(अस्मिता) चौगुले


सदर कथा लेखिका स्वामिनी (अस्मिता) चौगुले यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार









































टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने