© राधिका कुलकर्णी
नेहमीप्रमाणेच आजही रोजच्या वेळी जाग आली.हवेत जरा जास्तच गारठा पडलेला होता.इतक्या थंडीत उठायची मला खरेतर मुळीचच ईच्छा नव्हती पण काय करणार...लोक काय म्हणतील…!!?? ह्या एका प्रश्नापूढे मनातल्या इच्छांवर पाणी सोडून जे नको तेच करावे लागते..
मला नेहमी प्रश्न पडतो …"लोक लोक म्हणजे नेमकं काेण आणि हे लोक का ठरवतात आपण कसे वागायचे ते??"
कुठुन येतात हे लोक नको त्यावेळी नको ते बोलायला…??
हे सो कॉल्ड लोक काय म्हणतील म्हणत आपण कितीतरी न पचणाऱ्या,न रूचणाऱ्या आणि खिशाला न परवडणाऱ्या गोष्टी करत असतो…
लोक काय म्हणतील म्हणत कर्ज काढून लग्न होतात...का…? तर लोक काय म्हणतील…!
व्यसनी हरामखोर नवरा असला तरीही बाई त्याच्या बरोबर मूकपणे सर्व त्रास सहन करत आयुष्य काढते..
का…? तर, लोक काय म्हणतील.
लवकर लग्न केलं नाही तर लोक काय म्हणतील..
वय उलटून गेले लग्न नाही केले ...तर लोक काय म्हणतील.
लग्न वेळेत झाले पण मूल लवकर नाही झाले तरी लोक काय म्हणतील आणि एका मागोमाग खूप मुले झाली तरीही लोक काय म्हणतील..
अशा एक ना अनेक गोष्टी आहेत ज्या आपण फक्त लोक काय म्हणतील ह्या प्रश्नातुन सुटकाऱ्याकरता करतो.
म्हणजे थोडक्यात काय तर ह्या जगात प्रत्येकाचा प्रवास लोक काय म्हणतील पासुन सुरू होऊन लोक काय म्हणतील ह्या प्रश्नांनीच संपतो.
लोक आपल्याला कसेही वागले तरी बोलणार हे नक्की…!!!
असोऽऽऽऽऽ…..तर मी काय सांगत होते..
हे असेय..आजकाल वयोमानानूसार नाऽऽऽ मला असेच विसरायला होतेय.
सांगायचे एक असते अन् बोलता बोलता विषय असा काही भरकटतो की काय सांगायचे होते हेच विसरायला होते…
हंऽऽ….आठवले..आठवले…..
तर मी काय सांगत होते की मलाही असेच गारठ्याच्या थंडीत मस्त दुलईत गुरफटून पडावे वाटते किंवा उठल्यावरही लगेच कामाला न लागता शेकोटीशी शेक घेत मस्त घट्ट दुधाच्या चहाचा आरामात आस्वाद घ्यावासा वाटते पण असे सगळे स्वप्नातही घडले तरी पुष्कळ झाले.माझ्यासाठी तर हे स्वप्नही परवडणारे नाही.. कारण मी नवविवाहीता नं.लग्न करून सासरी पन्नास माणसांच्या राबत्यात येऊन पडलेली.त्यामुळे त्या आरवणाऱ्या कोंबड्याच्याही आधी मला उठावे लागे.घराची साफसफाई,आंगण,सडा,सारवण झालेच तर पाण्याचा बंब तापवून स्नानाची तयारी करून ठेवणे,चूल पोतेरं करून सासूबाईंचे आन्हिक उरकेपर्यंत त्यांना पहिला गरमागरम चहा हातात नाही दिला तर मग माझी काही खैर नसायची.त्या एका चूकीसाठी दिवसभर मी त्यांचे तुणतुणे ऐकत कामं करायची.
नवऱ्याला रात्र संपून दिवस उजाडला तरी मी जवळ असावीशी वाटायचे तर सासूला मी भल्या पहाटे उठलेली दिसायला हवी असायची.
भरल्या घरात प्रत्येकाचा डोळा असायचा माझ्यावर.मला माडीवरून खाली उतरायला जरा जरी उशीर झाला तरी जावा डोळे रोखून बघायच्या आणि सासूचे कान भरायच्या.

त्यांना तर काय तेवढेच निमित्त पुरे असायचे त्यांचा अखंड हरीनाम सप्ताह सुरू करायला.आणि मग त्या दिवशी जावांची चंगळ असायची कारण सासुच्या तडाख्यातून एक दिवस का होईना त्यांची सुटका झालेली असायची नाऽऽ...बरं हे सगळे कुणाला सांगायची सोय नाही.
नवऱ्याला सांगावे तर तोच एरवी इतका अरेरावी करणारा जाशील गं पाच मिनिट उशीरा म्हणत अडवणारा पण सासऱ्यांची एक हाक आणि दुसऱ्या मिनिटाला हे पडवीत हजर.
तेव्हा सासऱ्यांसमोर इकडच्या स्वारीचे तोंड उघडायची सुद्धा हिंम्मत व्हायची नाही तिकडे माझी बाजू कसली घेताएत की माझ्यामुळे हिला उशीर झाला....अंह्ऽऽऽ..असले काहीही होत नसे.उलट मूग गिळून शांत उभे रहात मामंजींपूढे.
सासूबाईं स्वत: कडक शिस्तीच्या त्यामूळे डोळ्यात तेल घालून सगळ्यांवर नजर.त्यात मी नवखी म्हणून चूकाही व्हायच्या.मग काय माझी एक चूक आणि त्यांची टकळी दिवसभर चालू राहणार.आता तर मला त्यांच्या बोलण्याचीही इतकी सवय जडली होती की त्या बोलल्या नाहीत की माझ्या कामाला गतीच येत नसे.
आमचे घर म्हणजे मोठ्ठा पसारा.रोजचा पन्नास माणसांचा स्वैपाक.सासू सासरे,चूलत सासु सासरे,दीर जावा सख्खे चूलत असा मोठ्ठा परिवार.
सगळ्यांवर हुकुमत गाजवायची सासुबाईंची सवय कारण ऐकणारी दहा माणसे घरात असत.त्यांच्यापूढे उणा शब्द बोलायची कुणाची टाप नव्हती.
हळुहळू इस्टेटीत वाटे पडत गेले तसे घरातली लोकही दूर होत गेली.आधी चूलत घर वाटे घेऊन वेगळे झाले मग सख्खे दीर जावाही आपापले वाटे घेऊन वेगळे झाले.
मग राहीलो फक्त आम्ही तिघेच सासू मी आणि नवरा.सासरेही मधल्या काळात निवर्तले.
आता भरल्या घरातुन तिन माणसांच्या घरात सासूबाईंचे मन रमेना.पूर्वीपासुन हुकुमत गाजवायच्या सवयीने सासूबाईंना आजही करमत नसे.पूर्वी ऐकुन घेणारी माणसे जास्त होती पण आता घरात कोणीच नसल्याने आपली सत्ता गाजवायची हौस त्या माझ्यावर तोंडसुख घेऊन भागवत असत.

त्यात मला मूलबाळ झाले नाही त्यामुळे वंशाला दिवा देत नाही म्हणून माझा सततचा पाणउतारा करायच्या..सतत सततच्या कटकटीने एक दिवस इतकी वैतागले की मागच्या अंगणातल्या धतूराच्या झाडाचा रस काढून तो पिऊन जीवन संपवायचा मी निर्णय घेतला.
कसे कोण जाणे सासूबाईंना माझी हालचाल कळली. त्यांनी लेकरागत पोटाशी घेऊन खूप रडल्या.
"असा स्वत:ला संपवायचा विचार सुद्धा मनात आणायचा नाही पोरी.."
पोरी हा शब्द त्यांच्या तोंडून ऐकुन मी ही स्तिमित झाले.एरवी सतत तोंडाचा दांडपट्टा अखंड चालू ठेवणारी,,मूल होत नाही म्हणून मूलाला दुसरे लग्न कर सांगणारी ही बाई आज मला कुशीत घेऊन एवढे प्रेम का दाखवतेय? हे मला न सुटणारे कोडेच होते.
मी पण वैतागून म्हणाले,"अम्मा, मी तुमची वंशवेल वाढवली नाही म्हणुन रोज तुम्ही मला अखंड शिव्याशाप देत असता.मग आता मला वाचवण्यासाठी का आलात??"
सांगा ना मी जगून तरी काय करू?"
त्यावर अम्मा जे बोलल्या ते ऐकुन तर मी थक्कच झाले...त्या म्हणाल्या,"अगं मैनेऽऽ,तूला मूल होत नाही म्हणुन मी दिवसरात्र तूला घालून पाडून बोलते,तूझा पाणउतारा करते पण हे सगळे मी करते त्यालाही एक कारण आहे…."
मी ही चकित मुद्रेने विचारले,"काय कारण आहे अम्मा?"
त्यावर माझ्या तोंडावरून हात फिरवत म्हणाल्या,"उभ्या पंचक्रोशीत माझ्या सूनेला कोणी बोल लावलेला मला खपणार नाही.दुसरे बाहेरचे लोक तूला उणंदूणं बोलू नये म्हणुन मीच तूला सतत बोलत राहते म्हणजे बाकीचे लोक तूला सहानुभूतीने बघतील.बाकी बाहेरच्यांच्या नजरेत भलेही मी वाईट सासू म्हणलेले चालेल पण तूझ्यावर कोणी शिंतोडा उडवू नये म्हणुन मी असे करते गं पोरी…"
म्हणजे इकडेही पून्हा लोक काय म्हणतील हीच चिंता…
ते काहीही असो पण त्यांच्या सतत टकळीसारख्या चालणाऱ्या तोंडामागे इतकी माया लपलीय हे मला त्या दिवशी कळलं.
मग त्या दिवसापासुन मला त्यांच्या कुठल्याच बोलण्याचे काहीच वाटेनासे झाले.उलट माझे काही चुकले की त्या बोलतात म्हणुन मी मूद्दाम चूका करून त्यांना बोलायला भाग पाडायची.त्यात माझी सर्व कामे पटापट निपटून निघायची आणि त्यांच्या मनात कुणावर तरी सत्ता गाजवायची सुप्त इच्छाही पूरी व्हायची.ह्यात आमच्या दोघींचाही फायदा होता.त्यांना कुणावर तरी तोंडसुख घेतल्याने बरे वाटायचे तर मला त्यांच्या बरे वाटण्यात बरे वाटायचे.
शेवटी शेवटी तर त्या खोलीत बसुनही हे केले का ते केले का विचारून तोंड वाजवत रहायच्या.
आजही मला चहा बनवायला जरा उशीरच झाला..दिवसाचा पहिला चहा वेळेत नाही मिळाला तर तेवढे कारण पुरेसे असे दिवसभर तोंड वाजवायला.मी ही घाईघाईतच जरा कमी गोडाचा चहा बनवला.चहा त्यांना मिठ्ठ गोड लागायचा.चुकुनही कमी गोडाचा चहा बनला तर माझ्या सात पिढ्याच्या दारीद्र्याचा पाढा वाचल्या शिवाय रहात नसत त्या.एकदा त्या सुरू झाल्या की इंजिनला जसे वंगण दिले की ते लवकर काम करते तसे मला ती उर्जा दिवसभर काम करायला उत्साह द्यायची.एवढ्या खटल्याच्या घरात राहून आता एकदम तीन माणसांच्या घरात त्यामुळे त्या बोलत असल्या की घरात खूप माणसे राहतात असा भास निर्माण व्हायचा.
तसेच नेहमीप्रमाणे आज पहाटचा पहिला चहा द्यायला मी मुद्दामच वेळ लावला.आश्चर्य ह्या गोष्टीचे वाटत होते की रोज सगळे आन्हिक आवरून चहाची वाट बघणाऱ्या अम्मा आज अजुनही आवाज दिल्या नव्हत्या चहासाठी..की ओरडल्याही नाहीत.
दिवसाचा पहिला चहा एकत्र घेणे हा कित्येक वर्षांचा जणू अलिखित नियमच होता आमच्या दोघीतला.पण आज मात्र त्यांनीच तो नियम धाब्यावर बसवून चक्क अंथरूणातच पडलेल्या होत्या.मला त्यांची सासू होण्याची इच्छा आज इतकी दाटुन आली होती की मी नियम मोडले की तुम्ही बोलता वाट्टेल तसे पण तुम्ही नियम मोडलात तर तुम्हाला कोण बोलणार आता…? पण संयम राखत मी चहाचा कप बाजूच्या फळीवर टेकवत त्यांना उठवायला गेले तर अंग गार पडलेले.
माझ्या काळजाचा ठोकाच चुकला.मनातली शंका खोटी ठरू देत अशी प्रार्थना करत मी घाईघाईनेच यजमानांना आवाज दिला.सकाळी सकाळी माझ्या हाकांनी तेही घाबरून खाली आले.अम्मांच्या अंगाला स्पर्श करताच त्यांचाही चेहरा भेदरला.डॉक्टरांना बोलावले तर अम्मांची प्राणज्योत पहाटेच तासभरापूर्वी मालवली होती.
त्या दिवशी मी खऱ्या अर्थाने पोरकी झाले.अम्मा गेल्यानंतर त्या घरात फक्त माझेच राज्य होते.
आता मी अम्मांची जागा घेतली आणि दिवस रात्र नवऱ्यावर तोंडसूख घेऊ लागले.
तुमच्यामधे दोष असुनही अहोरात्र तुमच्या आईची मूक्ताफळे मी सहन केली मला मूल होत नाही म्हणून हे एक कारण पुरेसे होते मला राग राग करायला आणि त्यांनी निमूटपणे ऐकुन घ्यायला.अखेरीस त्यांचीही सहनशक्ती संपली आणि तेही मला ह्या घरात एकटे टाकून निघून गेले.आता तर काय माझ्या एकटीचाच कारभार होता.वाट्टेल तसे वागले,कधीही उठले,कधीही झोपले तरी मला बोलणारं कोण होतं..पण नाही..शरीराला लागलेली इतक्या वर्षांची सवय सुटतेय थोडीच.त्यात "लोक काय म्हणतील?" हा गहन प्रश्न होताच..बाईला काय चळ लागला का? नवरा गेला की दिला ताळतंत्र सोडून……
ह्या ह्या..लोकांमुळेच मग रोज पहाटे उठावे लागायचे.सगळी कामे अगदी तशाच क्रमवारीत व्हायची जसा पायंडा सासूबाईंनी पाडून दिला होता.
पण आताशा नाही हो होत दगदग वयानूसार..
पहाटे नकोसे वाटते उठायला..सडासारवण करायला..गारठा सहनच होत नाही.हातापायातून वांब येतात.कंबरेत चमक उठते उठायला गेले की.
आजही हवेत खूपच गारठा होता.उठायची मूळीच इच्छा नव्हती तरीही पांघरूण झटकून उठलेच.तळहातांकडे बघुन कराग्रे वसते…. म्हणुन झाले तसे तेच हात डोळ्यांपासुन संपूर्ण चेहऱ्यावरून फिरवत केसांवर फिरवून नमस्कार करतच मी उठले हात जमिनीला टेकवून उठायचा प्रयत्न करताना कंबरेत कळ उठणार ह्या नेहमीच्या सवयीनेच तोंड आंबट कडवट झाले पण काय आश्चर्य..आज अजिबात कंबरेत कळ उठली नाही.स्थूल शरीरामूळे आजकाल झाडणे जमायचे नाही पण आज माझे मलाच इतके ताजेतवाने वाटत होते की पटकन उठून मी कोपऱ्यातला फडा उचलला आणि आंगण झाडायला सुरवात केली.एरवी दोन फडे फिरवले की पाठीत कळ उठायची.हाताला रग लागायची पण आज मात्र ह्यातले काहीच झाले नाही.
एकाएकी माझ्यात नवयौवन संचारल्यागत मी पटापट सगळे आंगण झाडून साफ केले.सडा सारवण,दारात रांगोळीच घालत होते की शेजारच्या रखमा काकीचा जोरजोरात ओरडाआरडा कानावर पडला.
ह्या रख्माकाकीला एकूलती एक सून सूमा.बिचारी निमूटपणे सगळे काम करत असे.अशातच तिला मूलगा झाला होता.लेकरू तान्हं होतं त्यात अंगावर पिणारं,आईची कूस जरा जरी बदलली तरी त्याला समजायचं.मग ते रडायचे.बिचारी सूमा लेकराला निजवायला हातातले काम टाकून पळायची.

रोज नित्य नियमाने बरोबर पहाटे सहाच्या ठोक्याला ती आंगण झाडायला यायला अन् लेकरू रडायला एकच गाठ पडायची.सहाच्या आत सडा सारवण झाले नाही की रख्मा काकीच्या मस्तकाची शीर तटतटा तडतडायला लागायची आणि मग जो तिच्या जिभेचा दांडपट्टा चालायचा तो दिवसभर...बिचारी सूमा गरीबाघरची,माहेरचा आधार नसलेली त्यामुळे ती सगळे निमूट सहन करत काम करत रहायची.
रख्माकाकी ही रागाभरात धूतलेलेच कपडे पून्हा पाण्यात बुचकळून तिला धुवायला लावायची.मूद्दाम तांब्या पितळ्यांच्या भांड्यांचा ढीग लावायची घासायला.एका मागे एक सूमाची कामे संपूच नये आणि तिला मूलाच्या नावाखाली खोलीत आराम करायला जाताच येऊ नये म्हणून रख्मा काकी मुद्दाम दूष्टपणा करायच्या.
कित्येकदा बिचारी सूमा रडत रडत काहीतरी द्याय-घ्यायचे निमित्त करून माझ्याकडे यायची पण रख्माकाकी एक मिनिटभर तिला बसू देईल तर शप्पथ.दावणीला बांधलेल्या गूरागत तिला चोवीस तास घाण्याला जुपलेल्या बैलागत कामाला लावायची.
आजही झाडता झाडताच सूमा लेकराच्या रडण्याचा आवाज ऐकून पळतच तिच्या खोलीकडे गेली.आजही आता बोलणी खाणार बिचारी..मनात विचार आला तसे वाईटही वाटले अन् बिचारीची दयाही आली.रोज वाटे तिला काहीतरी मदत करावी पण मनात असुनही शरीर कुठे साथ देई..पण आज मात्र माझे मलाच कळत नव्हते काय झालेय.माझ्या सगळ्या वेदना संपून अचानक नवतारूण्य आल्यागत मी फुदकत होते.
वाटले बघुया तरी प्रयत्न करून जमले तर करू नाही तर सोडून देऊ..मग काय हळुच रख्माच्या अंगणात गेले.फडा हातात घेऊन झपझप सगळे झाडून घेतले.इतके मोठे परस झाडूनही शरीराला जराही वेदना, ठणका किंवा थकवा जाणवला नाही.मग काय हुरूप येऊन तिचे मागचे अंगणही झाडायला सुरू केले.झाडता झाडता नकळत मी सूमाच्या खोलीजवळ पोहोचले.
नवरा बायकोतला अांबट/गोड संवाद कानी पडला आणि मी तिथेच थबकले जरावेळ.
सूमाचा नवरा सूमाला मिठीत घेत म्हणत होता,"तूला फक्त आता मूलाचीच काळजी उरलीय नाही गं.कधी मला पण असे प्रेमाने जवळ घे की."
तसे म्हणतच त्याने तिला आपल्या जवळ ओढले त्याबरोबर लेकराच्या तोंडातून स्तनाग्रे सुटून दूधाची धार उडाली.लेकराने मोठ्ठा गळा काढला तसे ती पून्हा नवऱ्याच्या मिठीला दूर सारत लेकराला पाजू लागली.लेकराला पाजता पाजताच ती लाडीकपणे नवऱ्याला म्हणाली,"होऽऽ तुम्हाला काय जाते तक्रार करायला.तिकडे तुमची आई बघा दोन मिनिट इकडे आले की कसे घर डोक्यावर घेते.तुम्हाला बरे सकाळी सकाळी प्रेम सुचतेय."
त्यावर नवऱ्याने काही न बोलताच तिला कंबरेत हात घालुन आपल्या दिशेने आेढले.
"अहोऽऽ नको नाऽऽ सोडा नाऽऽ" असे करत करत त्याचीं प्रेमाची भट्टी सकाळी सकाळीच फुलली.
त्यांच्यातले ते प्रेमळ संवाद ऐकुन मलाही क्षणभर आमचे लग्नानंतरचे दिवस आठवले.नवऱ्याला मला रात्र संपून दिवस उजाडला तरी सोडायचे नसायचे अन् तिकडे माझ्या सासवा,जावा माझ्यावर डोळे रोखून बसलेल्याच असायच्या.कधी मी उशीर करतेय माडीवरून खाली यायला अन् कधी त्या माझ्यावर तोंडसूख घेताएत.अगदी रख्माकाकी सारखेच दिवसभर तोंड चालू रहायचे.

निदान आज एक दिवस तरी सूमाला नवऱ्या बरोबर थोडावेळ घालवायला मिळू दे.म्हणुन मी हलक्या हातानेच काम उरकले.मागचे आंगणही साफ केले.कोपरान् कोपरा झाडून लख्ख केला.सडा झाला रांगोळी झाली.सगळे काम इतके पटकन उरकले की अजून काय करावे विचार करत सहज विहीरीवर लक्ष गेले.
पाणी भरायचे दिसत होते.रांजण माठ अन् पाण्याचा हौद सकाळी एकदा संध्याकाळी एकदा भरावा लागायचा.निदान आत्ताचे तरी काम जमतेय का करून बघू.आताशा असली पाणी शेंदायची अवजड कामे मलाही जमत नसत पण आज इतकी कामे करूनही थकवा जाणवला नाही तर हेही करून पहायची खुमखूमी आली.
मग काय गेले विहीरीशी.सोडला पोहरा अन् बघता बघता पाण्याचा अख्खा हौद भरून काढला की.माझे मलाच आश्चर्य वाटत होते.आज आपल्याला झालेय तरी काय..कोणता ब्रम्हसमंध तर अंगात नाही ना शिरला!!!इतके काम एखाद्या शोडषेला लाजवेल अशा दिमाखात मी केलेय.चला जाऊद्या देवाचीच कृपा म्हणायची.
आता निघावे नाहीतर रख्मा काकीने मला पाहिले तर सूमाची काही खैर नाही मला तर मला सूमालाही फैलावर घेईल.बिचारीला कधी नव्हे ते नवऱ्यासोबत चार प्रेमाचे क्षण मिळताहेत तर मिळू देत.त्यात आपल्यामूळे मिठाचा खडा नको पडायला.
अगोऽऽबाई सूमाच येतीय की..बापरे तिने नको पहायला मला ..खूप वाईट वाटेल मी काम केले पाहून.नकोऽऽऽ नकोऽऽऽ निघुयात लवकर.
फाटक ओलांडून घरी आले.आमच्या ओवरीतून मी सूमाची मज्जा बघत होते.आंगण लख्ख झाडून सडा रांगोळीही झालेली पाहून ती चकीतही झाली.रख्माकाकीच्या खोलीत डोकावली.ती ही शांत पहुडलेली.मग हे काम केले कोणी…??
बर जाऊदे.आधीच उशीर झालाय पाणी तरी भरू.सूमा मागल्या परसात गेली तिकडेही पाण्याचा हौद भरलेला..आंगण सडा लख्ख आवरलेले पाहून तिची तर बोबडीच वळली.हा कोणता भूताटकीचा प्रकार तर नाही नाऽऽऽ….तशीच ती पुढच्या अंगणात आली.
सहज निरीक्षण केल्यावर तिच्या लक्षात आले की मैना काकींच्या दारातली आणि आपल्या दारातली रांगोळी सारखीच आहे आज...म्हणजे हे काम मैना काकींनी केलेय???? पण आताशा तब्येतीमूळे त्यांना तर हातात फडाही धरता येत नाही त्या कशा करतील हे काम??
पण आज मैना मावशी दिसत का नाही कुठं?ह्या वेळ पर्यंत तर त्यांचे स्नान उरकून त्या बाहेर स्तोत्र पठण करत असतात.काहीतरी गडबड नक्की आहे.इकडे मैनाबाई ओवरीतल्या खांबा आडून सूमाची त्रेधा पाहून मनाशीच खुसखुसताहेत.सूमाने घातलेली उलटी चोळीही त्यांच्या नजरेतून सुटली नाही.पण आता हेच जर तिच्या सासूने पाहीले तर ती किती आकांततांडव करेल.आता तिला कसे सांगावे???इतक्या खाणाखूणा करतेय पण वेंधळी माझ्याकडे पाहिल तर शप्पथ..!!
अगोबाईऽऽऽ..ही तर आपल्याकडेच येतेय की.पटकन अंथरूणावर जाऊन निजूया म्हणजे तिला आपला संशय नाही येणार...का इथेच आडोशाला लपून बसू..बघुया सूमा काय करतेय आपल्याला अंथरूणात नाही पाहून..
तेवढ्यात सूमा मैनाबाईंच्या दारात आली.
मैना काकीऽऽऽ अहो मैना काकीऽऽ अहो किती वाजलेत,अजून कशा दार नाही उघडत तुम्ही?इकडे मैना काकी हसताएत.,"वेडी गं वेडी..अग् मी तर कधीचीच उठलेय.बघ की सडा रांगोळी सगळे उरकलेय मी..दिसत नाही का तूला..?
सूमाने दार ढकलले.तसे ते हलकेच उघडले.सूमा आत गेली.तिच्या पाठोपाठ मैनाबाईही आत गेल्या.
समोरचे दृश्य बघून सूमा तर सूमा मैनाबाईंनाही कापरं भरलं…
त्यांचा स्वत:चाच देह अंथरूणावर निश्चल अवस्थेत पडलेला होता.
सूमा माझ्या नित्राण देहाला हलवत आश्रु ढाळत होती.
मैनाकाकी जाता जाताही मला मदतच करून गेलात ना..किती हो माया करता ह्या पोरक्या जीवावर..
नाहीतर मीऽऽऽ….सासू काय म्हणेल,लोक काय म्हणतील हा विचार करून त्यांना घाबरून कधी तुमच्या आंगणात बोटभर रांगोळीही नाही आेढली...सूमा पश्चात्तापाचे आश्रु सांडत तिथेच माझ्या कलेवराशी बसून होती.
मी पण आज स्वत:साठी म्हणजेच तिथे निपचित पडलेल्या मैनाबाईसाठी दोन समाधानाचे आश्रु ढाळले…
निदान आयुष्यात एक तरी प्रेमाची व्यक्ती मी कमावली जी माझ्या प्रेतावर प्रेमाचे दोन खरे आश्रु सांडेल आणि म्हणेल का गेलात तूम्ही इतक्या लवकर….
का गेलात….????(लोक काय म्हणतील ह्याची पर्वा न करता…..)
~~~~~~~~~~~~~(समाप्त)~~~~~~~~~~~~~~~~~~
©®राधिका कुलकर्णी.
मित्रहो आपण प्रत्येकजण विशेषत: स्त्रीया लोक काय म्हणतील ह्या प्रश्नांनी वेढलेल्या असतात.
त्याला उद्देशुन थोडेसे उपहासात्मक लिखाण करण्या हेतुने ही कथुली लिहायचा छोटासा प्रयत्न
स्त्री मनाचे चित्र विचित्र मनोव्यापार उलगडणारी एक काल्पनिक कथा...मैनाबाईच्या आयुष्यातील अनेक स्थित्यंतराची एक हलकी फुलकी भावस्पर्शी कथा..
कशी वाटली हे जरूर कळवा..
लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.

*****
सदर कथा लेखिका राधिका कुलकर्णी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल साभार
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल साभार

What people will say..truly awesome..
उत्तर द्याहटवाThank you
हटवा