परिभाषा प्रेमाची
© स्वामिनी ( अस्मिता ) चौगुले
विभाने सुदेशला whats app वर अनन्याच्या लग्नाची पत्रिका पाठवली आणि अनपेक्षितपणे सुदेशचा फोन विभाला आला तो अनन्याचे अभिनंदन करण्यासाठी विभाने फोन अनन्याकडे दिला .
सुदेश ; " अभिनंदन अनन्या लग्न कधी आहे आणि हे मला विभाने सांगितले का आपल्या या गरीब मित्राला विसरली होय?"
सुदेश अगदी सहजपणे बोलत होता पण अनन्या इकडे त्याला बोलताना अवघडली होती .ती सुदेशशी बोलताना कधी नव्हे ते संकोचत होती .पण आपली स्थिति सुदेशला न कळू देता तिने अभिनंदन स्वीकारले;
अनन्या ; " धन्यवाद सुदेश " एवढेच ती म्हणाली, तिने ना सुदेशला लग्नाला येण्याचा आग्रह केला ना त्याला दुसर काही बोलली.
अनन्या वेगळ्याच विचारात हरवली तिला मनातून अपराधी वाटत होत आणि ती तिच्या हि न कळत दोन वर्षे मागे गेली. तिला सुदेशच्या पहिल्या भेटी पासून सगळ आठवू लागल .
अनन्या एका उच्च मध्यम वर्गीय कुटुंबातील उच्च शिक्षित मुलगी गोल चेहरा ,गोरा रंग,थोडी स्थूल, गालावर छानशी खळी ,आकर्षक व्यक्तिमत्त्व पाहता क्षणी कोण ही प्रेमात पडाव अशी सुंदर!
सुदेश ही दिसायला गोरापान ,घारे डोळे , आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचा एक उच्च शिक्षित तरुण! सुदेश आणि अनन्याची ओळख अनन्याच्या चुलत भावाच्या लग्नात झाली होती दोघेही जवळ पास एकाच वयाचे होते. सुदेश अनन्याच्या भावाचा मित्र होता. सुदेश आणि अनन्याची चांगली मैत्री झाली होती. तसा सुदेश अनन्या चा family friend झाला होता .तो अनन्याच्या घरी काही ना काही कारणाने सतत यायचा अनन्याच्या घरचे वातावरण तसं फ्रि होत त्यामुळे गप्पा मारने whats app वर बोलने रोजचेच होते .
सुदेशचा स्वभाव तसा चेष्टेखोर होता दोघांच हि छान पटायचं. त्यातच सुदेशच्या लग्नासाठी मुलींचा शोध त्याच्या घरच्यांनी सुरु केला होता मग काय अनन्या देखील तिच्या चांगल्या मित्रासाठी मुलगी शोधू लागली.पण सुदेशच्या मनात काही तरी वेगळेच होते.
सुदेश जेव्हा अनन्याच्या घरी यायचा तेंव्हा लग्नावरुन अनन्या त्याला छेडायची चिडवायची.
इतकच काय पण तिने सुदेशसाठी एक स्थळ ही सुचविले होते.पण सुदेश नेहमीच म्हणायचा कि माझ्यासाठी मुलगी इथेच कुठे तरी असेल मग अनन्या त्याला म्हणायची कि कर ना मग लवमॅरेज सुदेश हि काही कमी नव्हता तो म्हणायचा कि मग मला मुली का शोधतेस? ती इथेच आहे .या उत्तरावर अनन्या त्याला मग कर कि लग्न तिच्याशी उगीच आमचा ही वेळ वाचेल अस म्हणायची मग काय सुदेश गप्प बसायचा!
सुदेश बरेंच दिवस अनन्याला भेटला नव्हता किंवा त्याने फोन ही केला नव्हता अनन्याला वाटले कि तो बिझी असेल त्याच्या कामात पण तिच्या भावाने सांगितले कि सुदेश आजारी आहे आणि तो दवखन्यात ॲडमिट आहे. अनन्याने त्याला फोन केला आणि त्याची चौकशी केली तेंव्हा त्याने सांगितले कि त्याला कसली तरी गाठ आली होती. घशाला ती काढली आता मी बरा आहे आणि मला सोडलय आता घरी मी ठिक आहे.मी येईन एक महिन्यात घरी तुला भेटायला.
पण अनन्याचे समाधान झाले नाही ती सुदेशला पाहायला त्याच्या घरी गेली.
सुदेशची तब्बेत खूपच ढासळली होती अनन्या त्याला आराम करायचा सल्ला देवून घरी आली.
सुदेश अनन्याचा संपर्क whats app वर चालुच होता. अनन्या सुदेशकडे एक चांगला मित्र म्हणून पाहत होती पण सुदेशच्या मनात तिच्याबद्दल वेगळ्याच भावना होत्या. सुदेश त्या व्यक्त करु शकत नव्हता कारण त्याला अनन्याची मैत्री गमवायची नव्हती. एक दिवस त्याने हिम्मत करून अनन्या समोर त्याच्या भावना व्यक्त केल्या त्याच प्रेम आहे अस त्याने अनन्याला सांगितले. अनन्यासाठी हा धक्काच होता कारण तिने सुदेश बद्दल असा कधीच विचार केला नव्हता आणि त्याला तशा नजरेतुन कधी पाहिले नव्हते.ती त्याला स्व:ताचा एक चांगला मित्र समजत होती.तिला सुदेशला काय उत्तर द्यावे ते कळत नव्हते म्हणून तिने त्याच्याकडे विचार करायला वेळ मागितला आणि सुदेशने हि तो आनंदाने दिला.
अनन्या विचारात पडली कारण हे तिला अनपेक्षित होत आणि होकार दिला तरी त्यांचे प्रेम घरच्यांकडून स्वीकारले जाईल याची शाश्वती नव्हती. कारण त्यांच्या कास्ट वेगवेगळ्या होत्या पण सुदेश तिला मित्र म्हणून आवडत होता. तिने विचार करायला पंधरा दिवस लावले आणि सुदेशला होकार द्यायला निर्णय घेतला पण लग्न करण्याच्या अटीवर!
इकडे सुदेश बरेच दिवस online नव्हता . अनन्याने त्याला तीचा होकार त्याला फोन करुन कळवला आणि लग्न करण्याची अट हि सांगितली तिला वाटले होते सुदेश लगेच होकार देईल कारण सुदेश ने तिला स्व:ता प्रपोज केल होत पण घडले उलटेच ......
सुदेश अनन्याशी या गोष्टीवर बोलण्यास टाळाटाळ करु लागला. अनन्याला सुदेशच्या वागण्याने आश्चर्य वाटू लागले आणि त्याचा राग ही येऊ लागला.तिला वाटू लागले कि सुदेशला नुसती girl friend हवी त्याला जबाबदारी नको आहे म्हणून ती सुदेशशी खूप भांडली. त्याच्यावर चिडली त्याला वाट्टेल ते बोलली पण सुदेश शांत होता आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता पण अनन्या त्याच काही ऐकून घ्यायला तयार नव्हती. तिला वाटत होत कि सुदेशने तिचा फायदा घ्यायचा प्रयत्न केलाय!
शेवटी अनन्याने सुदेशशी बोलणे बंद केले.
एक महिन्यानंतर अनन्याला विभाकडून कळले की सुदेश पुण्यात राहायला गेलाय. तिला वाटले कि तो पुण्याला कामा निमित्त गेला असेल आणि तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले सुदेश अनन्याला रोज न चुकता मेसेज करत होता. पण अनन्या त्याला प्रति उत्तर देत नव्हती.
असेच चार -पाच महीने गेले.आता सुदेशचे मेसेज ही बंद झाले होते. एक दिवस अनन्याचा भाऊ तिच्या घरी आला. अशाच गप्पा मारता मारता सुदेशचा विषय निघाला. अनन्या त्याचा विषय निघताच गप्प झाली. पण तिचा भाऊ म्हणाला, कि
“तुला सुदेश बद्दल माहिती झाले का?"
खर तर अनन्याला त्याच्या बद्दल काही ऐकायचे नव्हते पण तिला काय हे विचारने भाग होते. म्हणून अनन्या ने तिच्या भावाला विचारले.
“त्याच्या बद्दल काय आता?"
अनन्याचा भाऊ " म्हणजे तुला काहीच माहिती नाही तर!अग तो पुण्यात आहे."
अनन्या ;“माहिती आहे मला!गेला असेल कामा निमित्त मग त्यात काय विशेष!"
अनन्यचा भाऊ; "म्हणजे तुला काहीच माहिती नाही तर! तुला आठवतंय का सुदेशला सात - आठ महिन्यांपूर्वी बरे नव्हते आणि त्याची कसलीशी गाठ शस्त्रक्रिया करुन काढली होती. त्या गाठीचा एक तुकडा तपासणीसाठी पुण्याला पाठविला होता ती गाठ कॅन्सरची निघाली. त्याला घशाचा कॅन्सर झालाय आणि त्याच्या इलाजासाठीच तो पुण्याला गेलाय "
हे ऐकून अनन्याच्या पाया खालची जमीनच सरकली तिला काय बोलावे सुचेना तिला मागचे सगळे आठवू लागले आणि सुदेशच्या वागण्यामागचे कारण कळाले. तिला पहिल्यांदा त्याचा खूप राग आला की एवढी मोठी गोष्ट त्याने तिच्यापासून लपवली आणि पश्चाताप झाला कि आपण त्याला नाही नाही ते बोललो आता तिला स्व:ताचाच राग येऊ लागला कि आपण सुदेश बद्दल एवढा मोठा गैरसमज कसा करुन घेतला पण या सगळ्याचा आता काही उपयोग नव्हता त्या दिवशी अनन्या खूप रडली.
सुदेशला फोन केला. सुदेश तिच्याशी अगदी काही घडलच नाही अस बोलत होता. अनन्या देखील त्याच्याशी तशीच नेहमी सारखी बोलली पण अनन्याने फोन केला त्यामुळे सुदेशला अंदाज आला होता कि तिला सगळे कळले आहे.
अनन्याने सुदेशला विचार करायला वेळ मागितला होता. त्या पंधरा दिवसात सुदेशची गाठ तपासण्यासाठी पुण्याला गेली होती. अनन्याचा होकार मिळण्या आधी एक दिवस आधीच त्याचे रिपोर्ट आले होते आणि कॅन्सरचे निदान झाले होते म्हणूनच सुदेश ने अनन्याला स्व:ता पासून दूर केले होते .
पण या घटनेनंतर अनन्याच्या मनात सुदेश बद्दल आदरयुक्त प्रेम निर्माण झाले होते.
सुदेशने अनन्याच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्या दिवशीनंतर सुदेशने अनन्याशी बोलणे बंद केले होते. अनन्या त्याची चौकशी दुसऱ्याकडून करत होती.
आज सुदेश कित्तेक दिवसांनी अनन्याला बोलला होता .
फोनच्या आवजाने अनन्या भानावर आली आणि तिने तिचे डोळे पुसले आणि फोन उचलला तो तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा होता.
यालाच तर खर प्रेम म्हणतात जे सुदेशने अनन्यावर केले.आपल्या प्रेमाचा भल्यासाठी त्याच प्रेमाचा त्याग करणे म्हणजेच प्रेम .............
एकमेकाबरोबर जगण्यापेक्षा एकमेकांसाठी जगणे म्हणजे प्रेम....
प्रेमाची परिभाषा त्याग आणि समर्पण आहे!
◆◆◆◆समाप्त
तर कशी वाटली कथा जर आवडली तर लाईक व शेअर नक्की करा पण माझ्या नावा सहित आणि कमेंट करायला विसरू नका😊
(सदरचे लेखन कॉपी राईट या कायद्या अंतर्गत येत असून लेखकाच्या नावा शिवाय कोठेही पोस्ट करू नये . साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे)
©swamini (Asmita)chougule
सदर कथा लेखिका स्वामिनी (अस्मिता) चौगुले यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार
