हर किसी को नही मिलता यहाँ प्यार जिंदगी में........
निशा,निकिता, दोघी तासंतास निखिलबद्दल बोलत,त्याचे लूक्स, त्याचा अभ्यास, त्याची गाणी.. चर्चा करत...एकमेकींना ठाऊक होते की दोघीनाही तो आवडतो...
आणि एके दिवशी निखील त्यांच्या ग्रुप मध्ये सामील झाला... निशा आणि निकीताला तर आभाळच ठेंगणे वाटू लागले होते त्याच्या सामील होण्याने...
निखीलसुद्धा त्यांच्या ग्रुपमध्ये चांगलाच रमला....
निशा, निकीता दोघींना निखीलशी किती बोलू आणि किती नको व्हायचे पण निकिता थोडी लाजरी असल्याने मागे मागे राहायची... पण निशा कधी सहज किंवा कधी इशाऱ्यांनी निखीलला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करायची...
पण अबोल, शांत, लाजऱ्या निकिता कडे निखील जास्त आकर्षित झाला......तिच्या शांत आणि सालस स्वभावाने त्याला ती आवडू लागली..आणि शेवटच्या वर्षी त्याने निरोप समारंभात तेच गाणे म्हटले आणि नंतर निकिताला प्रपोजही केले सर्वांच्या समोर....
आकस्मिकपणे पुढ्यात आलेले सुख पाहून निकिता हरखुन गेली पण निशाला या प्रसंगाने खूप
वाईट वाटणार हे तिला माहितीच होते...
जोवर निखीलने आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती तोवर दोघी मैत्रिणीचे गुळपीठ होते पण निकिताच्या आयुष्यात निखील बॉयफ्रेंड म्हणून येणार म्हटल्याबरोबर निशाचा चांगलाच जळफळाट झाला आणि तिने तात्काळ निकिताशी असलेले संबंध तोडून टाकले.....
निकिताला कळत नव्हतं की यात तिची काय चूक आहे.....
एकीकडे जो खूप आवडतो त्याच्याशी प्रेमाचे धागे बांधायला मिळणार होते तर दुसरीकडे मैत्रीचे धागे उसवले गेले होते...
निशाला समजावण्याचा निखील आणि निकिता दोघांनी प्रयत्न केला पण निशाने आता त्यांच्याशी बोलणे टाकले.....ते कायमचे....
कॉलेज संपले.. दोघी उत्तम मार्कांनी पास झाल्या... निशाला एका मल्टी नॅशनल कंपनीत जॉब ही मिळाला...
दोघींच्या वाटा एकदम वेगळ्या झाल्या...
पण निशा मनात कडवटपणा ठेवुनच निघून गेली... निखील आपल्या आयुष्यात यायला पाहिजे होता... निकिता मुळे तो माझा झाला नाही या विचाराने ती मनोमन निकीताचा मत्सर करायची......
निखील आणि निकीताचे प्रेम पुढे बहरले आणि तिनेक वर्षात ते घरच्यांच्या संमतीने विवाहबद्धही झाले.....
निकिताने निशाला लग्नाचे आमंत्रण स्वतः येऊन दिले होते पण निशाच्या मनातला जळफळाट अजून सरलाच नव्हता...ती गेली नाही आणि आपला नंबरसुद्धा बदलून टाकला.....
निशाला...निखील निकीताचे सोशल मीडियावर कधी फोटो दिसायचे...
बघता बघता अनेक वर्षे लोटली...
निशाला तिचा अनुरूप जोडीदार मिळाला नचिकेतच्या रूपात... आणि ती मागचं सगळं काही विसरून संसारात रमली...
पण मध्येच कधी काही खास गाणी ऐकली की मागच्या आठवणी उफाळून यायच्या आणि निकीताबद्दलचा मत्सर दाटून यायचा निशाच्या मनात.....
आणि आज तिच्या हातात कॉलेजच्या रियूनियन च्या समारंभाचे पत्र पडले होते... जवळपास पंधरा वर्षांनी सर्व बॅचचे विद्यार्थी एकत्र जमा होणार होते...
हर किसी को नाही मिलता यहाँ प्यार जिंदगी में...
क्षणभर ती जुन्या काळात हरवली...
निशाने सगळीकडे पाहिले अगदी उत्साहाचे वातावरण होते..
निशाने चाचरत विचारले... कशी आहेस आणि निखील कुठे आहे??
तेवढ्यात एका मैत्रिणीने निशाचा हात जोरात दाबला....
पदरी दोन वर्षाचे मुल होते म्हणून जगावं लागलं मला... नाहीतर कदाचित मी ही गेले असते त्याच्या पाठोपाठ....
निशा निशब्द होऊन ऐकत होती.... एका क्षणाला तिलाही गदगदून रडू आले....
निशाला आज स्वतःच्या वागण्याची आणि मनात आकस धरून बसण्याची मनोमन लाज वाटत होती...
जिचा एवढी वर्षे मत्सर केला ती मैत्रीण किती यातनामयी आयुष्य जगत होती या विचारांनी निशा कासावीस झाली.... आणि तिने तीव्र असोशीने निकीताला मिठीत घेतले...कधीही अंतर न देण्यासाठी........
© अस्मिता देशपांडे
सुंदर सजावट केलेल्या सभागृहात, आज फायनल इयरच्या मुलांच्या निरोप समारंभ झोकात साजरा होत होता आणि समारंभाचे प्रमुख आकर्षण होता फायनल इयरला असलेला निखील.... आणि त्याची सदाबहार गाणी.
प्रेक्षक वर्गात बसलेल्या दोघी, निकिता आणि निशा देहभान हरपून ते गाणं जणू पीत होत्या...
निखीलचा आवाज होताच तसा... धुंद करणारा, वेडावणारा... आणि निखील दिसायला सुद्धा तसाच... सणसणीत उंची, भारदस्त देहयष्टी, सावळा, स्मार्ट, तरतरीत, बोलण्यात अगदी मिठास असलेला... कॉलेजच्या बहुतांश मुलींचा पहिला क्रश होता निखील...

निशा आणि निकिता निखीलच्या नंतरच्या बॅचच्या होत्या...निकिता गोरी, गुलाबी, शेलाट्या बांध्याची,अबोल, शांत तर निशा होती सावळी, स्मार्ट,बडबडी, फसफसलेल्या सोड्यासारखी बिनधास्त.... दोघीची मैत्री जमली होती कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनची!!!
पहिल्यांदा कॉलेजच्या स्नेह संमेलनात दोघीनी निखीलचे गाणे ऐकले... अन दोघींचे जणू चित्त चोरीला गेले... दोघींचे मन एकाच वेळी निखीलवर जडले... पण निखीलला याची काही खबर नव्हती... तो होता एक स्वछंदी, स्वतःच्या मस्तीत जगणारा, गाण्यावर भरभरून प्रेम करणारा तरुण...
पहिल्यांदा कॉलेजच्या स्नेह संमेलनात दोघीनी निखीलचे गाणे ऐकले... अन दोघींचे जणू चित्त चोरीला गेले... दोघींचे मन एकाच वेळी निखीलवर जडले... पण निखीलला याची काही खबर नव्हती... तो होता एक स्वछंदी, स्वतःच्या मस्तीत जगणारा, गाण्यावर भरभरून प्रेम करणारा तरुण...
निशा,निकिता, दोघी तासंतास निखिलबद्दल बोलत,त्याचे लूक्स, त्याचा अभ्यास, त्याची गाणी.. चर्चा करत...एकमेकींना ठाऊक होते की दोघीनाही तो आवडतो...
आणि एके दिवशी निखील त्यांच्या ग्रुप मध्ये सामील झाला... निशा आणि निकीताला तर आभाळच ठेंगणे वाटू लागले होते त्याच्या सामील होण्याने...
निखीलसुद्धा त्यांच्या ग्रुपमध्ये चांगलाच रमला....
निशा, निकीता दोघींना निखीलशी किती बोलू आणि किती नको व्हायचे पण निकिता थोडी लाजरी असल्याने मागे मागे राहायची... पण निशा कधी सहज किंवा कधी इशाऱ्यांनी निखीलला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करायची...
पण अबोल, शांत, लाजऱ्या निकिता कडे निखील जास्त आकर्षित झाला......तिच्या शांत आणि सालस स्वभावाने त्याला ती आवडू लागली..आणि शेवटच्या वर्षी त्याने निरोप समारंभात तेच गाणे म्हटले आणि नंतर निकिताला प्रपोजही केले सर्वांच्या समोर....
सगळेच अवाक झाले निखीलचा स्टॅन्ड पाहून....
निकिताला तर स्वर्ग दोनच बोटे उरला....
पण निशा च्या मनात मात्र मत्सराची पहिली ठिणगी पेटली....
आकस्मिकपणे पुढ्यात आलेले सुख पाहून निकिता हरखुन गेली पण निशाला या प्रसंगाने खूप
वाईट वाटणार हे तिला माहितीच होते...
जोवर निखीलने आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती तोवर दोघी मैत्रिणीचे गुळपीठ होते पण निकिताच्या आयुष्यात निखील बॉयफ्रेंड म्हणून येणार म्हटल्याबरोबर निशाचा चांगलाच जळफळाट झाला आणि तिने तात्काळ निकिताशी असलेले संबंध तोडून टाकले.....
निकिताला कळत नव्हतं की यात तिची काय चूक आहे.....
एकीकडे जो खूप आवडतो त्याच्याशी प्रेमाचे धागे बांधायला मिळणार होते तर दुसरीकडे मैत्रीचे धागे उसवले गेले होते...
निशाला समजावण्याचा निखील आणि निकिता दोघांनी प्रयत्न केला पण निशाने आता त्यांच्याशी बोलणे टाकले.....ते कायमचे....
कॉलेज संपले.. दोघी उत्तम मार्कांनी पास झाल्या... निशाला एका मल्टी नॅशनल कंपनीत जॉब ही मिळाला...
दोघींच्या वाटा एकदम वेगळ्या झाल्या...
पण निशा मनात कडवटपणा ठेवुनच निघून गेली... निखील आपल्या आयुष्यात यायला पाहिजे होता... निकिता मुळे तो माझा झाला नाही या विचाराने ती मनोमन निकीताचा मत्सर करायची......
निखील आणि निकीताचे प्रेम पुढे बहरले आणि तिनेक वर्षात ते घरच्यांच्या संमतीने विवाहबद्धही झाले.....
निकिताने निशाला लग्नाचे आमंत्रण स्वतः येऊन दिले होते पण निशाच्या मनातला जळफळाट अजून सरलाच नव्हता...ती गेली नाही आणि आपला नंबरसुद्धा बदलून टाकला.....
निशाला...निखील निकीताचे सोशल मीडियावर कधी फोटो दिसायचे...
दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडलेले फोटो पाहून निशाच्या हृदयात आणि मस्तकात कळ यायची....
हृदयात असंख्य सुया टोचल्यासारखे व्हायचे तिला...
मग तिने ते ही पाहणे सोडून दिले...
बघता बघता अनेक वर्षे लोटली...
निशाला तिचा अनुरूप जोडीदार मिळाला नचिकेतच्या रूपात... आणि ती मागचं सगळं काही विसरून संसारात रमली...
पण मध्येच कधी काही खास गाणी ऐकली की मागच्या आठवणी उफाळून यायच्या आणि निकीताबद्दलचा मत्सर दाटून यायचा निशाच्या मनात.....
आणि आज तिच्या हातात कॉलेजच्या रियूनियन च्या समारंभाचे पत्र पडले होते... जवळपास पंधरा वर्षांनी सर्व बॅचचे विद्यार्थी एकत्र जमा होणार होते...
नाही म्हटलं तरी निशा मनातुन आनंदली... सर्वांच्या भेटीगाठी होतील म्हणून हरखली..
पण पुन्हा निखील आणि निकीता पण येणार या विचाराने निराश झाली...पण प्रोग्रॅमला जायचे तिने ठरवले...
बघता बघता प्रोग्रॅमचा दिवस आला... निशाने छान तयारी केली. ....

मनात थोडी धाकधूक होतीच.... हॉलमध्ये ती पोचतच होती तोच तिच्या कानावर तेच गाण्याचे सुर आले....
हर किसी को नाही मिलता यहाँ प्यार जिंदगी में...
खुशनसीब है जो जिनको है मिली ये बहार जिंदगी में...
क्षणभर ती जुन्या काळात हरवली...
निखिलच्या आवाजाच्या आठवणीनी तिच्या मनात गर्दी केली...
किंचित जड पावलांनी तिने हॉलमध्ये प्रवेश केला...

पण कुणीतरी दुसरीच व्यक्ती ते गाणे गात होती....
निशाने सगळीकडे पाहिले अगदी उत्साहाचे वातावरण होते..
सगळे कितीतरी वर्षांनी भेटत होते एकमेकांना... गप्पाना उधाण आले होते...
निशा सगळयांशी बोलली पण तिची नजर निखील आणि निकीताला शोधत होती...
अखेर तिला ती दिसली...
अखेर तिला ती दिसली...
निकीता... एका कोपऱ्यात उभी होती कुणाशी तरी बोलत...
निशा न राहवून तिच्याकडे गेली नी क्षणभर पाहतच राहिली...
खोल गेलेले डोळे आणि निस्तेज त्वचा हीच का ती पूर्वीची उत्साही आणि गोड चेहऱ्याची निकीता असा प्रश्न तिला पडला...
निशाने चाचरत विचारले... कशी आहेस आणि निखील कुठे आहे??
तेवढ्यात एका मैत्रिणीने निशाचा हात जोरात दाबला....
तेव्हा निकीता म्हणाली.. अगं तिला माहिती नाहीये माझ्या आयुष्यात काय घडलंय ते.. मी सांगण्याचा प्रयत्न केला पण तिच्याशी बोलणेच झालं नाही कधी...
निकीता डबडबलेल्या डोळ्यांनी सांगत होती
लग्नानंतर चार वर्षे खूप सुखात गेली आणि नंतर एका काळरात्री एका मोठ्या अपघातात नियतिने निखीलला माझ्यापासून हिरावून घेतले ...
निकीता डबडबलेल्या डोळ्यांनी सांगत होती
लग्नानंतर चार वर्षे खूप सुखात गेली आणि नंतर एका काळरात्री एका मोठ्या अपघातात नियतिने निखीलला माझ्यापासून हिरावून घेतले ...
पदरी दोन वर्षाचे मुल होते म्हणून जगावं लागलं मला... नाहीतर कदाचित मी ही गेले असते त्याच्या पाठोपाठ....
नियती एवढी क्रूर असेल असं वाटलं नव्हतं... एका ओंजळीत भरभरून सुख दिलं आणि लगेचच ओरबाडून ही घेतलं माझ्याकडून....
घरचे दुसऱ्या लग्नाचा आग्रह करतात... पण मी नाही निखीलशिवाय कुणाचाच विचार करू शकत!!!
निशा निशब्द होऊन ऐकत होती.... एका क्षणाला तिलाही गदगदून रडू आले....
काय नव्हतं त्या रडण्यात.... एवढी वर्षे साचवून ठेवलेला निकीता बद्दलचा मत्सर क्षणात खाक झाला होता आणि त्याची जागा अपराधीपणाने घेतली होती...
निशाला आज स्वतःच्या वागण्याची आणि मनात आकस धरून बसण्याची मनोमन लाज वाटत होती...
जिचा एवढी वर्षे मत्सर केला ती मैत्रीण किती यातनामयी आयुष्य जगत होती या विचारांनी निशा कासावीस झाली.... आणि तिने तीव्र असोशीने निकीताला मिठीत घेतले...कधीही अंतर न देण्यासाठी........
*** समाप्त
© अस्मिता देशपांडे
सदर कथा लेखिका अस्मिता देशपांडे यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने सदर कथा ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. तसं त्यांचं संमतीपत्र आमच्याकडे आहे याची नोंद घ्यावी. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...