© राधिका कुलकर्णी

"रानोऽऽ ए रानोऽऽ अगं माझे कानाचे मशिन पाहिलेस का कुठे??"
"कधीची शोधतेय पण कुठे ठेवलेय तेच आठवत नाही.."
"ते हातातले काम सोड आणि आधी माझे मशिन शोध पाहू."
वत्सलाबाई रानोला म्हणजेच आपल्या कामवालीला जरा वैतागुनच बोलत होत्या.
वत्सलाबाई वय वर्षे 78.आताशा कानाला जरा कमीच ऐकु यायचे.त्यामुळे हियरींग एडचा वापर करावा लागत असे.परंतु रात्री झोपताना काढून ठेवलेले मशिन आज काही केल्या सापडत नव्हते.
त्यामुळे सकाळपासुन बिछान्यात पडल्या पडल्या रानो कधी येते ह्याची त्या आतुरतेने वाट पहात होत्या.रोजच्या सवयीनुसार त्यांनी सकाळीच दार किलकिले करून उघडे करून ठेवलेले.
रानो त्यांची केअर टेकर.गेले 20 वर्ष तीच घरची सगळी काम करत होती..
वत्सलाबाई आणि जयंतराव परांजपे काही वर्षापुर्वीच गोरेगावातल्या उच्चभ्रु वसाहतीत फ्लॅट घेऊन रहावयास आले होते.
म्हणजे लग्न झाले तेव्हा परिस्थिती बेताचीच होती.तेव्हा ते डोंबीवलीत एका चाळीवजा घरात भाड्याने रहात होते.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

वत्सलाबाई विवेकानंद शाळेत शिक्षिका म्हणुन काम करत होत्या तर जयंतराव एलआयसीमधे जाॅब करत होते.तसा दोघांच्या पगारात संसार भागायचा पण सेव्हींग फारशी होत नसे.
त्यात आता वत्सलाबाईंना बाळाची चाहूल लागली तसे इन्कम वाढण्यासाठी वत्सलाबाईंनी प्रायव्हेट ट्युशन्स घेणे सुरू केले.जयंतरावांनीही जास्तीत जास्त टारगेट्स करण्याकरता जादा वेळ कामाला देवु लागले.
मुंबईसारख्या ठिकाणी वाढती महागाई पहाता रोजचे खर्च भागवुन मुलांना वाढवणे,चांगल्या शाळेत अॅडमिशन त्यांच्या अव्वाच्या सव्वा फिया,डोनेशन्स आणि वर क्लासेसची फी ह्या सगळ्याचा भार पेलण्यासाठी दोघेही ढोर मेहनत करत होते.
पोटाला चिमटा देऊन देऊन पै पै येणाऱ्या अपत्याच्या भविष्यासाठी जमवत होते.यथावकाश दिवस भरले आणि वत्सलाबाईंनी एका गोंडस मुलाला जन्म दिला.
बाराव्या दिवशी देवासमोर पाटावरच मुलाचे रूधीर असे नामकरण केले.रूधीर जसा शाळेच्या वयाचा झाला वत्सलाबाईंनी आपल्याच शाळेत त्याचा दाखला केला.
ज्या शाळेत आई शिक्षिका म्हणुन कार्यरत असेल त्या ठिकाणी शिक्षकांच्या मुलाची अर्धी फिस कमी होत असे ह्या नियमानूसार अर्ध्या फिसमधेच रूधीरचे दहावी पर्यंतचे शिक्षण पार पडले.त्यात आईच्या म्हणजेच वत्सलाबाईंच्याच क्लासमधे ट्युशन त्यामुळे तेही पैसे वाचले.
जात्याच कुशाग्र बुद्धीच्या रूधीरला दहावीत चांगले मार्क्स पडले.मग पूढे बारावी आणि नंतर इंजिनियरींग करता करता तो कधी नौकरीकरता अमेरीकेला गेला तेही समजले नाही.काळ पूढे पूढे सरकत होता.
जयंतराव रीटायर झाले पण वत्सलाबाईंची मात्र अजून चार पाच वर्ष नौकरी बाकी होती.मधल्या काळात जयंतरावांनी आपल्या ग्रॅच्युईटीतुन गोरेगावला रूधीरच्या सांगण्यावरून टू बीएचके फ्लॅट बुक केला.गोरेगावहून एअरपोर्ट जवळ पडते जायला यायला हे ही एक कारण होते तिकडे फ्लॅट घेण्याचे.
काही दिवसांनी ते तिकडे रहायलाही गेले.एकदा वत्सलाबाईंची रीटायरमेंट झाली की लेकाकडे जाऊन अमेरीका बघायची हे किती काळपासुनचे दोघांनी पाहिलेले स्वप्न अखेरीस स्वप्नच राहीले.
~~~~~~~~~~~~~~~
तो दिवस वत्सलाबाईंच्या शाळेचा शेवटचा दिवस होता.शाळेत त्यांच्या निरोप समारंभाचा जंगी कार्यक्रम झाला. सगळ्या शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थ्यांनी भावूक भाषणे केली.

काहीवेळ वातावरण जरासे भावूक झाले पण वत्सलाबाईंनी आपल्या भाषणात मुलांना छान मार्गदर्शन करून वातावरण पुर्ववत केले.सोहोळा खूपच रंगतदार झाला.जयंतरावही तिथे उपस्थित होते.
कार्यक्रम आटोपून तिकडून दोघेही परस्पर दादर चौपाटीला गेले.
अगदी नवविवाहीत जोडप्यागत हातात हात घालून कितीतरी वेळ ते समुद्र किनाऱ्यावर फिरले.भेळ/पाणीपूरी /चाट खाल्ले.मग थंडगार आईसक्रीम खाऊन घोडागाडीची सैर पण करून झाली.
आज त्यांनी तो दिवस असा काही साजरा केला की जणू आजच त्यांचे लग्न झालेय.
लग्नानंतर परिस्थिती आणि नौकऱ्यांच्या धावाधावीमुळे असे निवांत क्षण त्यांना खचितच जगायला मिळाले होते.आज मात्र त्या सगळ्याची ते पुरेपुर भर काढत होते.
चणाजोरगरमची पूडी हातात घेऊन दोघेही कितीतरी वेळ किनाऱ्यावर मावळतीच्या सूर्याला पहात संधिप्रकाशाची केशरी किरणे अंगावर घेत बसुन राहीले.मावळतीच्या संध्याकाळी त्यांच्या मनात मात्र समाधानाची उषा उमलत होती.
तेवढ्यात फूलांच्या मधूर सुवासाने जयंतरावांचे मन आकृष्ट झाले.किनाऱ्यावरून पोरगेलीशी छोकरी हातात गजरे घेऊन जात होती.त्यांनी तिला बोलावुन दोन तीन गजरे विकत घेतले.
त्यावर वत्सलाबाईंनी लगेच विचारले,"एवढे गजरे कशाला हो घेतले?आता माझ्या लिंबाएवढ्या अंबाड्याला गजऱ्याचा भार कुठे सहन होतोय."
त्यावर डोळे मिचकावत जयंतराव मिश्कीलपणे म्हणाले,"अगं आज तुझ्या नौकरीचा शेवटचा दिवस सेलिब्रेट केला पण रात्र बाकीय ना अजूनऽऽऽ म्हणुन हे गजरे."
त्यावर वत्सलाबाई गोड लाजत लटक्या रागातच म्हणाल्या,"इश्शऽ ऽऽ.!! काहीतरीच काय बाई तुमचं बोलणं."
"आता हे काय वय राहिलेय का आपले असले काही करायचे?"
त्यावर जयंतराव वत्सलाबाईंच्या जरा जास्तच जवळ सरकत म्हणाले,"अगंऽऽऽऽ जो आला तो दिवस आपला,त्याचा सोहोळा करायचा,उद्या कोणी बघितलाय.."
"आज मनाला वाटतेय ना तर मनासारखे जगून घ्यायचे आणि दुसरे असे की वय शरीराचे झालेय मनानी तर मी अजुनही तरूणच आहे आणि तू तर अजुनही तशीच दिसतेस जशी लग्नात दिसायची,फक्त केसात थोडी चांदी वाढलीय एवढाच काय तो फरक.."
"चला चावट कुठचे.!!! आज सरकारांचा मूड काही औरच दिसतोय."
"काही नाही गंऽऽ.आता दोघांच्या पाठिमागची धावपळ संपली.आता उद्यापासुन एक नवे पर्व सुरू.म्हणुन जरा जास्त उत्साही झालोय इतकेच."
"आता आपल्याला एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळेल ज्याची मी कित्येक वर्ष आतुरतेने वाट पाहिलीय."
"एऽऽऽ आता आपल्याकडे बऱ्यापैकी पैसा जमलाय तर रूधीरकडे जाऊयात हं ह्या उन्हाळ्यात..मस्त तिकडच्या थंडीचा उन्हाळ्यात आस्वाद घेऊ..काय..!!"
पण तो दिवस त्यांच्या आयुष्यात कधी आलाच नाही.त्या संध्याकाळी आयुष्याची फिलॉसॉफी ऐकवुन खरचच आहे त्या क्षणांचा सोहोळा करत त्यांनी एक्झिट घेतली.
ती रात्र त्यांची काळरात्र ठरली.त्या रात्री पलंगावर पहुडलेले जयंतराव जे झोपले ते परत कधी न उठण्यासाठीच.त्यांची प्राणज्योत झोपेतच मालवली.सगळी स्वप्न अर्धवट टाकुन ते एकटेच अनंताच्या प्रवासाला निघुन गेले.
वत्सलाबाईंवर तर आकाशच कोसळले.
आत्ता कुठे एकमेकांसाबत काही निवांत क्षण घालवायला मिळणार होते की जोडीदार साथ सोडून गेला.त्या घटनेनंतर वत्सलाबाई खूपच अलिप्त झाल्या.
एकुलता एक मुलगा रूधीर नौकरी निमित्त अमेरीकेत गेला तो तिकडचाच झाला आणि वत्सलाबाई एकट्याच पडल्या स्वत:च्या टु बीएचके फ्लॅटमधे.
रानो मात्र वत्सलाबाईंची अगदी मनापासुन सेवा करत असे.आधी रानोची आई वत्सलाबाईंकडे काम करत असे मग तिचे वय झाले तसे तिची मुलगी काम करू लागली.वत्सलाबाईंना मूलगी नव्हती त्यामुळे लहानग्या रानोचेच त्या खूप लाड पुरवत असत.तिही आपल्या आईप्रमाणेच घरच्यासारखे सर्व काम करत असे.
~~~~~~~~~~~~~~~~~
रानो तर नाही पण "तो" मात्र कालपासुनच दाराजवळ दबा धरून बसलेला.आताशा सांधेदुखीमुळे वत्सलाबाईंना काठी शिवाय चालताच येत नसे.त्यात एकटेपणाने त्या अधिकच खचलेल्या,सदासर्वकाळ रानोवर अवलंबुन दिवस कंठणे चाललेले.
एक जीवघेणा हल्लेखोर दबा धरून बसलाय ह्याची सुतराम कल्पना नसलेल्या वत्सलाबाई तळमळीने दाराकडे डोळे लावुन बसलेल्या.
तेवढ्यात दाराशी हालचाल जाणवली.रानो लॅचकी ने दार लोटुन घरात आली.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
"अरेरेऽऽऽ !!! हिनेही मला साधे बघितले नाही."
"आता कुणाचे शरीर धारण करायला मिळाल्याखेरीज मी वार तरी कसा करू??"
मनातल्या मनात "त्या" चे विचारमंथन सुरू.
योग्य संधीची वाट पहाण्यावाचुन पर्यायही नव्हता.
एक वादळ घरात दाखल झाल्याची साधी कुणकुणही न लागलेल्या दोघी घरात बेफिकीर वावरत होत्या.

रानोने आल्या आल्या स्वच्छ हात धुतले,आेटा पुसला.आज्जींसाठी चहाचे आधण ठेवले.तिकडे चहा होईपर्यंत आज्जीचे तोंड धुणे प्रातर्विधी उरकले.दोघींनी मिळुन चहा घेतला.आज्जींना बिछान्यावर झोपवुन रानोने सगळी कामे झरझर उरकली.रोज सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास ती वत्सलाबाईंकडे असायची.त्यांचे खाणेपिणे सर्व आटोपुन मगच ती घरी जायची.
वत्सलाबाईंना रानोचाच आधार होता ह्या वयात.ती ही आईप्रमाणे त्यांची सेवा करायची.अगदी 17/18 वर्षाची होती तेव्हापासुन तीच काम करत होती.आता तर कोणी नाही म्हणुन जरा जास्तच काळजीने बघायची ती आज्जींकडे.
इकडे "हा" रानोला आपली पहिली शिकार बनवण्यासाठी दाराआड सज्जच.डोळ्यात प्रचंड चमक निर्माण झालेली.आज पहिले सावज मिळणार..लार टपकत होती पण हे कायऽऽ??? ती तर माझ्याजवळही न फिरकता गेली की..हाय रे दैवा..अजुन किती काळ ही प्रतिक्षा..माझी बोहोणी होणार की नाही?"
"खरतर हे मोडक कुचक लाकुड सावज म्हणुन जास्त चांगलेय.."
"नो रिस्क मोडवर पहिल्या दमात माझे खाते उघडेल पण ही खविस बाई जवळ येईल तर शप्पथ.!!"
"तो" विचार करत वाट पाहतोय योग्य संधीची..मनाची तडफड तगमग वाढत चाललेली.वेळ हातातुन निघुन चाललीय.
"ग्रेस पिरिएड संपण्यापुर्वी मला माझे खाते उघडायला लागणार."
"किती सहज एंट्री मिळाली ह्या घरात!!!"
"ना कोणाची चाहुल ना भीती..पण आता हि बया जवळ येईल तेव्हा खरे."
तेवढ्यातऽऽ……..
तेवढ्यात बिछान्याची हालचाल झाली.ह्याचा चेहरा फुलला.आनंद पोटात माझ्या माईना माईना अशी "त्या"ची अवस्था..
आज्जीबाई हळुहळू एक एक पाऊल टाकत दाराच्या दिशेने येत आहेत.दार बंद करताना तरी ही माझ्या सवेंदनकक्षेत येईलच की मी लगेच तिच्या शरीराचा ताबा घेईन.
मनात मांडे रचणे चालु.
स्वर्ग दोन बोटे उरलेला.
आज्जी दाराच्या अगदी जवळ.
आता त्या दाराला हात लावतील आणि मी तिच्या शरीराचा प्रवेशकर्ता होणार…….
पण हाय रे दैवाऽऽ!!!
म्हातारीने दाराला काठीनेच लोटुन बंद केले आणि परत फिरली..
"काय नीच बाई आहे.हाताने बंद करायला हात मोडलेत का हिचे.?".
"देवाऽऽ अजुन किती काळ प्रतिक्षा!!"
"असह्य होतेय आता.."
"माझा अंत यायच्या आत मला हिच्या शरीराचा ताबा मिळु दे देवाऽऽ."
त्याचा धावा चालू.
तेवढ्यात फोन वाजतो.
वत्सलाबाई कोणाशी तरी बोलताएत.
अचानक सुरकुतलेल्या चेहऱ्यावर लाली चढली.
चेहरा हसतमुख.
"कसला एवढा आनंद झालाय थेरडीला??"
"त्या" च्या डोक्यात विचार सूरू.
इकडे वत्सलाबाई फोनवर.वार्तालाप चालू.
"अच्छाऽऽ हो का!!"
"अरेव्वा!
कधी?
ऊद्या येतोएस?
नक्की ना,की मागल्यावेळ सारखे?"
बोलताना नकळत डोळ्यातले पाणी टिपले वत्सलाबाईंनी.
"नाही गं आई,नक्की येतोय..चल ऊद्या भेटू."
वत्सलाबाईंना कोण आनंद झाला.आपला लेक कित्येक वर्षांनी घरी येणार.आनंद डोळ्यातुनही पाझरायला लागलेला.
थरथरत्या हातांनीच त्यांनी रानोला फोन लावला.
"रानोऽऽऽ,जरा लवकर ये गं आज."
"रूधीर येतोय उद्या.तयारी करायचीय बरीच.असशील तशी ये."
"बरं आज्जी." इति रानो.
"तो" ही खुष.अजुन एक सावज गावणार.. रानोची वाट पहात पुन्हा तिथेच ऊभा.
रानो आली वत्सलाबाईंनी सांगितल्या प्रमाणे एक एक काम उरकले आणि त्याच्या हाती न लागताच आली तशी गेलीही.
हा पुन्हा हिरमुसला.आता उद्याची वाट पहाण्याशिवाय पर्याय नाही.चिडचिडत धुसफुसत उद्याची वाट पहाणे सुरू.
सकाळ झाली.नेहमीप्रमाणे रानो आली अन् गेली.
आता त्याला तिच्यात तसाही इंटरेस्ट उरलेला नव्हता.नवा गडी नवे राज ह्या म्हणी प्रमाणे तो येणाऱ्या पाहुण्याची वाट पहात बसला होता.
वत्सलाबाई जितक्या आतुर नसतील तितका "तो" आतूर झाला होता रूधीरला बघायला.
अखेर फोन वाजला."आई आलोय ग मीऽ.
ते शब्द ऐकताच मूकपणे डोळ्यात तळं साचलं.
रूधीर पूढे बोलला,"अगं ऐकतेय नाऽऽऽ..!!
"अंऽऽऽ होऽऽ..बोल ऐकतेय मी."
डोळ्यातले पाणी थोपवत वत्सलाबाई ऋद्ध गळ्यानेच बाेलल्या.
"अग्ंऽऽऽऽ मी हेच सांगत होतो की मी आलोय म्हणुन घाईने दार उघडायला येवु नकोस.मी लॅचकीने दार उघडून येईन."
"बरं बरं ये लवकर."
वत्सलाबाईंचे शेवटचे दोन शब्द त्यालाही आपल्या पहिल्या वहिल्या सावजाची खूण पटवुन देत होते.त्याचा आनंद ओसंडुन वहात होता.
"फक्त काही क्षण आणि मी एका नव्या रूपात नव्या शरीरात प्रवेशणार…"
आनंदाच्या हिंदोळ्यावर विहरत असतानाच दाराची हालचाल.
कोणीतरी दार उघडलेय.
आता घराच्या आत प्रवेश.
"अरेऽऽ पण हा उग्र दर्प कसला येतोयऽऽ!?"
"मला असह्य का होताेय हा दर्प.?"
आणि एक आऽऽऽऽर्त किंकाळी…….
"आह्ऽऽऽ आईआई ग्ंऽ!!!!"
"मेलो मेलो...वाचवाऽऽ!"
"तडफड होतीय."
"वाचवा..!! वाचवा!!!"
वाचवा वाचवा म्हणत क्षणार्धात सगळे शांत….
रूधीरने आत येताना सॅनिटायझरने दारवाजाच्या दोन्ही हँडल्सला क्लिन करून मगच घरात प्रवेश केला होता….
आज एका कोरोनारूपी यमदूताला आईवेड्या मुलाने यमसदनास परतवुन लावला होता.
~~~~~~~~~~~~(समाप्त)~~~~~~~~~~~~~~~~~
®© राधिका कुलकर्णी.
कोरोनाचे संकट अगदी नुकते नुकते सुरू असताना सगळीकडून येणाऱ्या भयावह बातम्या मनातील नकारात्मकता वाढवत असताना काहीतरी सकारात्मक देण्याच्या विचारातुन सुचलेली ही छोटीशी कथा "काळ आला पण……!"
कशी वाटली हे वाचून जरूर कळवा..
📝 माझी लेखणी
फोटो गुगल साभार

सदर कथा लेखिका राधिका कुलकर्णी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल साभार