© अश्विनी टेंबे
त्या छोटेखानी दरवाजा कर्रकर्र आवाज करत उघडला. दरवाजातून वाकून आत आल्यानंतर समोर दिसणार्या उंचच उंच भिंती मान वरुन करुनही एका नजरेत सामावित नव्हत्या.
जेल तो जेलच... एक प्रकारची मन:शांतता भंग करणार ते अतिशांत वातावरण.
जॉर्जेटची वर्कवाली साडी जी आपण एक पाच मिनिटात हजारो रुपये देवून खरेदी करतो. त्या साडीवरच वर्क करायला तब्बल एक महिना लागतो,
जेलमधल्या महिलांनी बनवलेले लाडू... हा काही काळ वादाचा मुद्दा मनला होता खरा... पण आज जेव्हा प्रत्यक्षदर्शी लाडू बनवणार्या त्या महिला, लाडूचं अत्यंत टापटीप असणारं ते वर्कशॉप, ‘कृपया चप्पल बाहेर काढाव्यात...‘ अशी दरवाजावर असणारी सूचना..... हे पाहून मनात कसलाच किंतु राहात नाही.
जेल मे फौंड्रीउद्योग.... पण हे खरच आहे. कोल्हापूरातील नामवंत कपंनीने कैद्यांना फौंड्री उद्योगाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
इतकं काम केल्यानंतर तरी यांना चांगलं जेवण देतात का... असा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे.
त्या छोटेखानी दरवाजा कर्रकर्र आवाज करत उघडला. दरवाजातून वाकून आत आल्यानंतर समोर दिसणार्या उंचच उंच भिंती मान वरुन करुनही एका नजरेत सामावित नव्हत्या.
त्या भिंतींच्या टोकावर चढले तर आकाशाला हात लावता येईल असं वाटायला लावणार्या त्या चार भिंतींच्या आतलं समाजाने हद्दपार केलेल्या काही माणसांच जग.
माणसं अगदी आपल्यासारखीच. पण कधी काळी, कळत, नकळत घडलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगणार्या त्या मानवी जिवांचं एक अवकाश.
या माणसांच्यातही कला आहेत आपल्या बौद्धिकतेला जर विधायक लोकांची साथ मिळाली तर आपल्या हातून काय घडू शकते या ज्वलंत नमुना म्हणून एकदा तरी कळंबा जेल ची सफर करणे खरच आवश्यक आहे.
जेल तो जेलच... एक प्रकारची मन:शांतता भंग करणार ते अतिशांत वातावरण.
दूरदूरपर्यंत नजर टाकली तरी त्याच त्याच चेहर्यांशिवाय इतर काहीही पाहता न येणं.
वर्षानुवर्षे रोज तेच काम. इथे फारसा चेंज नाही की विरंगुळा नाही हा आर्त आक्रोश कैदी पोशाखातील प्रत्येकाच्या चेहर्यावरील रडू आणि हास्य अशा संमिश्र भावात दिसत होता.
चार भिंतींच्या आतला मोठाला एरिया, त्या एरियात असणारी छोटी छोटी वर्कशॉप्स, जिथे हे कैदी आपल्या कलेतून व्यक्त होत होते.
जॉर्जेटची वर्कवाली साडी जी आपण एक पाच मिनिटात हजारो रुपये देवून खरेदी करतो. त्या साडीवरच वर्क करायला तब्बल एक महिना लागतो,
तेही इथले चार कैदी रात्रंदिवस राबून 25 हजारापर्यंतच्या साड्या आणि फॅशनेबल कुर्तीजच्या ऑर्डर्स यांच्याकडे येतात.
पुढेच एक छोटसं लाकूड कामाचं वर्कशॉप आहे. जिथे टेबल, बेड, छोट्या पेट्या, मोल्डिंग टेबल्स, खुर्च्या, लाकडाचे शो पीस, देव्हारा.... बाप रे... अजुनही बरच काही तयार होतं. ज्यांना बाजारात मोठी मागणी आहे.
लाकडावरच ते कोरीव काम, लाकूड तासण्यासाठीची असणारी मशिनरी आणि लाकूड वर्कशॉप्सच्या प्रत्येक खिडकीच्यावर सर्वांना कुठेही काम करताना सहज दिसणारे सुविचार कैद्यांच्यात सकाराकत्मकता वाढवण्याच्या दृष्टीने एका टॉनिकसारख काम करत असतील यात शंकाच नाही.
साडे तीन एकरात या कैद्यांनी फुलवलेली शेती खरच तोंडात बोटं घालायला लावणारी आहे.
चाकवत, पालक, कांदा, वांगी, मिरची, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो..... अशी भरघोस भाजी इथे घेतली जाते.
एक़सारखी ही वार्यासवेे डोलणारी हिरवीगार पिकं पाहताना मन इतकं प्रसन्न होतं की आपण जेल परिसरात आहोत हेच विसरायला होतं.
जेलमधल्या महिलांनी बनवलेले लाडू... हा काही काळ वादाचा मुद्दा मनला होता खरा... पण आज जेव्हा प्रत्यक्षदर्शी लाडू बनवणार्या त्या महिला, लाडूचं अत्यंत टापटीप असणारं ते वर्कशॉप, ‘कृपया चप्पल बाहेर काढाव्यात...‘ अशी दरवाजावर असणारी सूचना..... हे पाहून मनात कसलाच किंतु राहात नाही.
लाडूप्रसादाचं पावित्र्य जपण्यात जेल प्रशासनही मागे नाही ही बाब नक्कीच दाद देण्याजोगी आहे.
जेल मे फौंड्रीउद्योग.... पण हे खरच आहे. कोल्हापूरातील नामवंत कपंनीने कैद्यांना फौंड्री उद्योगाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
सध्या हे कैदी ट्रक्टर तसेच फोर व्हिलर गाड्यांचे पार्टस बनवण्याचे काम करीत आहेत. फौंड्री उद्योगातील एरवी हेडॅक करणारी ती घरघर... तिथे का कोणास ठाउक पण एक उर्जा देणारी वाटली.
इतकं काम केल्यानंतर तरी यांना चांगलं जेवण देतात का... असा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे.
चित्रपटातील जेलप्रमाणे उगाचच, विनाकारण जेलमध्ये हिन दर्जाचे जेंवण कैद्यांना दिले जात नाही. रोजचा मेनू काय, कोण बनविणार त्या कैद्यांची नावे एका फळ्यावर लिहून ठेवले जाते.
तयार होणार्या जेवणाची तपासणी करुन मगच जेवण कैद्यांना दिले जाते.
जेवण जिथे तयार होते ते भव्य असे स्वयपाकघर अतिशय टापटीप, आणि कमालीचे स्वच्छ. खरकट्याचा साधा वासही येणार नाही.
जेवण तयार करण्याची मोठ मोठाली भांडीही आतून बाहेरुन अगदी लखलखीत असतात.
ते दोन तीन तास आतल्या जगाचं अस्तित्व निखरण्यात कसे गेले कळाले नाही.
महिला आणि पुरुष कैदी यांना टेवण्यात आलेल्या कोठड्या मात्र दुरुनच पाहण्यास परवानगी होती.
अंगावरील कपड्यांशिवाय चप्पलही तुरुंगात चालत नाही अस काहीस कानावर आलं.
इतक्यात अंडा बरॅक नावाच्या जेलप्रकार समोर आला.
ज्याचा आकार अंड्यासारखा होता. संपूर्ण अंधार असणारी ती खोली.
जिथे समोरासमोर असणारे कैदीही एकमेकांना पाहू शकत नाहीत की बोलू शकत नाहीत. मोठा गुन्हा केलेल्या गुन्हेगारांना इथे ठेवतात.
या खोलीला चारी बाजूंनी सुर्यप्रकाश आत येण्यासाठी चार कवडसे ठेवलेेले असतात.
जेवण द्यायला येणार्यांना त्याकैद्याचा डोळा दिसू शकेल इतकीच सोय या अंडा बरॅकमध्ये असते. काही कैदी तिथे आहेत असही समजल.
हे ऐकल्यानंतर मन सुन्न झालं. कधी एकदा बाहेरच्या जगातल्या आपल्या माणसांमध्ये जाते असं झालं.
कितीही कलात्मक, हिरवगार वाटलं तरी आतल्या जगाचं दु:ख फार वेगळं आहे, इथली घुसमट वेदना देणारी आहे, इथली व्यथा सांगता न येण्याजोगी आहे.
अश्विनी टेंबे : कोल्हापूर
अश्विनी टेंबे : कोल्हापूर
सदर लेख अश्विनी टेंबे यांचा आहे. लेखाचा कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने तो ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेला आहे. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना कृपया नावासहितच शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...