© अनुजा धारिया शेठ
भाग १ इथे वाचा
पुढच्या कार्यक्रमाची सुरवात झाली...देशमुख मॅडम येऊन सावी ला घेऊन गेल्या....पण सावी मात्र भूतकाळात गेली.... बघूया काय आठवत असेल तिला?
इथे येऊन आपण थांबलो होतो....आता बघूया पुढे
......
सुधा काकू आणि सुरेश काका...... अगदी छान जोडी.... त्यांची मुले म्हणजे मोठा समीर आणि छोटी सावी....
खुप् लाडूबाई होती सावी..... लहान होती आणि त्यात मुलगी.... काकाना मुली फार आवडत, त्यात दोन पिढी नंतर मुलगी झाली म्हणून सावीचे खूप लाड केले. पण, शिस्तीच्या बाबतीत तेवढेच कडक, दोन्ही मुलाना खूप छान वाढवले.... चांगले शिक्षण दिले....
सावे... अशीच हाक मारत तिला काका..... सावीला लहान असल्यापासूनच चिञकला खूप आवडत असे... तिची चित्रे खूप छान असत.... हळूहळू मोठी झाली.... कला क्षेत्र निवडून पदवी घेतली तिने....
मोठा Dr झाला.... त्याचे लग्न झाले आणि अंकीता आली.... छान होती स्वभावाला पण, समीर कायम तिची तुलना सावी सोबत करी.... त्याला बहिणीचे फार कौतुक....
हि एकच गोष्ट अंकिताला खटकत असे.... त्यामुळे ती सावीचा राग करी..... त्यांचा प्रेमविवाह होता.....अंकिताला डान्स, अभिनय याची आवड, दिसायला पण छान होती fashion Designer होती.....
तिला एकदा सावी आणि सागर बद्दल समजले..... तिला वाटलं हाच चान्स आहे सावी ला सर्वांसमोर खजील करण्याचा.... तिने माहीती काढायला सुरुवात केली.....
तेव्हा तिला समजले की तो गरीब आहे... घरी फ़क्त आई आहे, बाबा नाहीत त्याला..... त्याचे आणि सावीचे गेले दोन वर्षे प्रेम आहे....
तिने घरात स्वतःच्या नात्यात असलेले एक स्थळ आणले सावी साठी..... काका एकदम खुश झाले सून बाई वर..... त्यांनी सावीला बोलावले.... आणि जाब विचारला...
तिला वाटले दादाला दिली तशी मलासुद्धा बाबा परवानगी देतील.... म्हणून तिने आपल्या प्रेमाची कबूली दिली....
पण सुरेश काका एकदम ओरडले.... सावे हे शक्य नाही.... त्यांचा आवाज ऐकताच धावत सर्व आले... काय झाले बघायला... तर काकांचा चेहरा एकदम लाल झाला होता....
काकू घाबरत म्हणाल्या काय झाले??? ह्या पोरीनं नाव खराब केले माझे.... प्रेम आहे म्हणे.... शोभतं का हे??? तुमचे लक्ष नाही....
अंकिताने लगेच उचलून धरल, बरोबर बोलतायत बाबा... मुलगा कसा आपल्या बरोबरीचा हवा.... हो सूनबाई... खर आहे तुमच्या प्रेमाला आमचा विरोध नाही... पण तोला-मोलाचे हवे.... आम्हाला हे मान्य नाही.....
सावे, आम्ही बघितले आहे तिथेच तुझे लग्न होईल..... ती खूप रडली... पण काही उपयोग नव्हता.... तिने सागरला फोन केला आपण पळुन जाऊ माझे बाबा ऐकणार नाहीत.... खूप कडक आहेत.... मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय....
शेवटी जे व्हायला नको तेच झाले त्यांनी पळून जाऊन लग्न केले....अंकिताने जखमेवर तिखट मीठ लावुन तिच्यासाठी या घराचे दार कायमचे बंद केले....
काकांना खूप धक्का बसला.... काकू तर रडत होत्या.....काकांनी सांगितलं ती आपल्याला मेली.... तिच्याशी कोणीच बोलायचं नाही.... नाहीतर माझे मेलेले तोंड बघायला लागेल...
आज तिच्या लग्नाला १० वर्ष झाली तरी कॊणी बोलत नव्हते की कॊणी साधी चौकशी सुद्धा केली नव्हती....
मधल्या काळात खूप घडामोडी घडून गेल्या.... त्यांचा संसार खूप छान सुरू होता.... एक मुलगी होती त्यांना.... सागर मेहनती आणि चांगला मुलगा होता.. सावीची चिञकला पण लोकांना आवडत होती.... खूप मागणी होती तीच्या चित्रांना...... पण तिचे नाव ती लावायची नाही चित्राखाली.... त्यामुळे ती अज्ञात कलाकार म्हणून प्रसिद्ध होती.... फ़क्त एक सिम्बॉल लावायची....
आयुष्यात एवढे चढ-उतार आले की तिच्या मधल्या नव्या कलेचा तिला शोध लागला... उत्तम लेखिका झाली.... तीच्या सासूबाई एक टपरी चालवत होत्या.... त्या गेल्यावर तिथे काही बदल करून तिने... छोटे खानावळ उभी केली अगदी कमी दरात.... ना नफा ना तोटा.... असे उद्दीष्ट होते तिचे.....
आणि मागच्या महिन्यात सागर ने तिच्या साठी हा फ्लॅट घेतला होता विकत.. पण,त्याने मुद्दामून भाड्याने घेतला असे सांगायला लावले.....
इकडे सुधा काकूं ची स्थिती काही वेगळी नव्हती..... त्यांना सुध्दा वाट्त होते लेक समोर आहे तर तिला भेटावे, तिला प्रेमाने जवळ घ्यावे.... सावीसाठी केलेले दागिने तिला द्यावे... पण, तिचा स्वाभिमान त्यांना माहित होता आणि अजूनही तो तसाच होता....
तें त्यांनी थोड्या वेळापूर्वी बघितलं होते.... त्यात मुलाला दोन्ही मुले, मुलगी नव्हती त्यामुळे नाती बद्दल त्यांना प्रेम वाट्त होते.... पण काकांपुढे त्यांचे काही चालत नव्हते.....
ती सोसायटी मध्ये राहायला आलेली समजल आणि काका परत गरजले कॊणी तीच्या सोबत बोलणार नाही..... लक्षात ठेवा सर्वानी.....
सावीला सुद्धा आई जवळ बोलायचे होते, तिची तिने केलेली प्रगती आईला सांगायची होती.... खूप मोठी व्यक्ती झाली होती सावी.... पण अगदी साधी राहणीमान असायच तिचे.... तिला दिखावा आवडत नसे.... आणि स्वतःच स्वतः चे कौतुक करायचे तिला कधी जमलंच नाही.....
आणि घरच्या कोणीच ती काय करते, काय नाही याची साधी चौकशी बाहेरून सुध्दा केली नव्हती.... एवढी वर्ष झाली तरी राग तसाच होता आणि तो ठेवायला अंकीता खत-पाणी घालत होती.....
तेवढ्यात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सावीने डोळे पुसले.. ती भानावर आली.....
देशमुख मॅडम मात्र खूप ऍक्टिव्ह होत्या सोशल म्हणा, कला म्हणा सगळ्याच गोष्टीची आवड होती त्यांना.... सोसायटीमध्ये राहणार्या प्रत्येक व्यक्तीबद्दल महिती करून घेणे, मैत्री करणे त्यांना खूप आवडत असे.... त्यामुळे सावीबदल त्यांना सर्व माहीती होते.... फ़क्त त्यांनी सावीला तसे सांगितलं नव्हते.....
दोघीपण आपआपल्या विचारात असतानाच परत एकदा जोरात टाळ्यांचा कडकडाट झाला... कारण आता कार्यक्रमाची सांगता होणार होती.... सर्व जणी ऑल राऊंडर अशा प्रमुख पाहुणे याना भेटायला उत्सुक होत्या....
देशमुख मॅडम त्यांच्या स्वागत करण्यासाठी तयारी करायला गेल्या होत्या.....
सर्व जण अगदी विचार करत होते कोण असेल??
देशमुख मॅडम स्टेज वर जाऊन घोषणा करत होत्या.... आता आपण आपल्या प्रमुख पाहुणे आले आहेत त्यांना बोलावूया.... आणि जोरात स्वागत करूया एक लेखिका, चित्रकार, गरजुंना अन्न पुरवठा करणारी.. अन्नपुर्णा सावी सागर गायकवाड यांचे..... ज्यांनी सकाळ पासून आपल्या प्रत्येक कार्यक्रमात खूप उत्साहाने भाग घेतला...अन ते ही कसलाच गर्व अभिमान न बाळगता..... जोरात टाळ्या वाजवून स्वागत करूया.....
अंकीता बघत बसली.... सुधा काकूंचा उर अभिमानाने भरून आला.....
बायकांची कुजबुज वाढते.... सगळ्या एकमेंकीकडे बघत असतात.....
देशमुख मॅडम थोडक्यात सावीची ओळख करून देतात.... तिच्या जखमेवर मीठ न चोळता खूप छान आणि कमी शब्दांमध्ये.... त्या नंतर दोन शब्द बोलण्यासाठी सावीला माईक देतात.....
सावी सगळ्यात आधी देशमुख मॅडम चे आभार मानते....व म्हणते खरच मी एवढी मोठी व्यक्ती नाही की मला एवढा मोठा मान मिळावा,म्हणूनच मी लपवून ठेवायला सांगितले होते मॅडम ना कारण मला आजचा हा दिवस सगळ्यांसोबत एन्जॉय करायचा होता.... आधीच समजले असते तर माझी ओळख आज जशी झाली तशी झाली नसती... मी आता जे काही बोलणार आहे त्यातून मला कोणाला कमी लेखायचे नाही आहे, कोणाचे मन दुखावले गेले तर.... म्हणून मी आधीच माफी मागते.... आणि माझे मनोगत व्यक्त करते...
मी सावी माझे लहानपण याच सोसायटी मध्ये गेले, तेव्हा हि सोसायटी एवढी मोठी नव्हती.....तरी बाकीच्या सोसायटी पेक्षा वेगळी आहे तेव्हा आणि आताही.... तर काही जुनी माणसे आहेत त्यांनी मला ओळखले पण ओळख दिली नाही, आणि काही नवीन आहेत ज्यांना माझ्या हातात असलेली सायकल बघून माझ्याशी ओळख करून घ्यावी असे वाटले नाही...असो माझा मुद्दा हा नाही...
मला एवढंच म्हणायचं की आपण एखाद्या व्यक्तीला लगेच जज करून मोकळे होतो की ती अशीच अन ती तशीच....तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एक स्त्री ही दुसऱ्या स्त्री ची शत्रु आहे...तेवढे दुसरे कॊणी नाही....ती कधीच दुसऱ्या बाईचे कौतुक करत नाही किंवा तिला प्रोत्साहन देत नाही....आणि हे जेव्हा बदलेल तेव्हा तो दिवस खरा महिला दिन असेल....
जोरात टाळ्या वाजतात....सुधा काकू कौतुकाने ऐकत असतात...
सावी पुढे बोलते, मी घरच्या लोकांच्या मनाविरुद्ध लग्न केले आणि ह्या सोसायटीचा आणि माझा संबंध कमी झाला.... म्हणून काही जणी मला हसत होत्या तर काही एवढी जुनी सायकल आणली म्हणून.... पण ही तीच सायकल आहे जिच्यामुळे आज आमचा संसार उभा आहे... म्हणूनच ती आम्हाला सोन्यापेक्षा अनमोल आहे..... एवढेच बोलेन मी बाकी माझे कर्तॄत्व मी सांगणार नाही मला तें आवडत नाही...
आज मी जे काही आहे तें माझा नवरा आणि माझ्या सासूबाईंमुळे गेल्या महिन्यात त्या आम्हाला सोडून गेल्या आणि मी खूप हताश झाले.. म्हणून माझ्या Mr. नी माझे लहानपण जिथे गेले तिथे आणले मला.... आणि देशमुख मॅडम सोबत ओळख झाली....त्यानी मला ह्या कार्यक्रमासाठी बोलावले...
माझे वडील खूप शिस्तबद्ध त्यामुळे लहान असल्यापासूनच प्रत्येक चांगली सवय आई लावत गेली... त्यामुळे त्यांना सुद्धा मी श्रेय देईन.... माझे दादा आणि वहिनी नेहमीच माझे कौतुक करून प्रोत्साहन देत आले होते.... पण मधल्या काही काळात माझे माहेर पूर्ण तुटले होते तेव्हा मला आधाराची गरज होती आणि तो दिला माझ्या सासूबाईंनी.....
मी खूप मोठी झाले.... पण कायम अज्ञात राहणे पसंत केले... पण देशमुख मॅडमनि माझी खरी ओळख शोधून काढली.... आणि आज सर्वांसमोर ती करून दिली.....
आता काहीना प्रश्न पडला असेल??? मी अशी का आले दागिने न घालता तर लहान असल्यापासून पण जशी मोठी होत गेले तसे समजत गेले की दागिने म्हणजे घराण्याची शान.... जेवढे त्या बाईच्या अंगावर दागिने जास्त... तेवढे घराणे मोठे.... पण मोठी होत गेले तसे मी ठरवले...
कोणाच्या तरी ओळखीचे ओझं घेऊन नखशिखांत दागिने घालून नटलेली बाहुली होण्यापेक्षा, स्वतः स्व बळावर निर्मांण केलेली स्वतःची वेगळी ओळख हाच खरा दागिना....
आज खूप मोठा दागिना मी मिळवला आहे.... जोरात टाळ्या वाजतात... अंकीता धावत जाते स्टेजवर आणि सावीला मिठी मारते....सर्वांसमोर माफी मागते.... कार्यक्रम संपल्यावर तिला सन्मानाने घरी नेले.....
बाप लेकीची गळाभेट होते... सुरेश काकाना खूप अभिमान वाटतो लेकीचा.... सुधा काकूंच्या डोळ्यात आनंदाश्रु येतात....समीर ला खूप आनंद होतो....
आणि खर्या अर्थाने महिला दिन साजरा होतो.....
कशी वाटली कथा? आवडली असेल तर नक्की अभिप्राय द्या.. अर्थात तुमच्या कंमेंटमधून..
©®अनुजा धारिया शेठ
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
